एक प्रकल्प - मराठी संस्थळांचं योगदान

मन यांनी एका प्रतिसादात म्हटलं आहे...

बाकी,ज्योतिष वगैरे विषयावर हल्ली दोन्ही बाजूंनी सर्वसाधारणपणे तेच तेच मुद्दे येताना दिसताहेत.
रंगमंचावर नवीन अभिनेत्यांनी जुनीच गाजलेली पात्रे वठवत रहावीत आणि जुन्यांनी संन्यास घ्यावा तसे काहीसे.
अभिनेते गाजतात, जातात, पात्रे कायम तीच, तिथेच असतात, संवादही तेच ते बोलतात...

'हेच मराठी संस्थळं सुरू झाल्यापासून चालू आहे आणि चालत राहणार.' हा निराशावाद यातून दिसून येतो. आणि त्यात अर्थात तथ्य आहे. मराठी संस्थळांवर वांझ भाकड चर्चांपलिकडे नक्की काय होतं? तेच तेच विषय उगाळले जातात, तेच तेच मुद्दे मांडले जातात, त्याच त्याच ठरलेल्या भूमिका दिसतात, तेच ते मेगाबायटी प्रतिसाद आणि त्यांची मुद्देसूद खंडनं, तेच ते आरोप प्रत्यारोप, तीच ती हमरीतुमरी, तीच ती कंपूबाजी आणि कंपूबाजीबद्दलची तक्रार.... याच्यापुढे नक्की काय? "मराठी संस्थळांचं योगदान काय?" असा प्रश्न अधूनमधून विचारला जातो. दिवाळी अंकाच्या निमित्ताने आणि त्यानंतरही ऐसीवर काय आहे, काय आवडतं आणि काय आवडेल याबद्दल चर्चा सुरू आहे. "तुम्ही नियमितपणे काय वाचता" या धाग्यातून दुसरं असं दिसलं की अनेक हुशार लोक त्या-त्या वेळेस जे समोर येतं तेवढ्यापुरती माहिती वाचतात. मग ही चर्चांच्या निमित्ताने चालणारी ज्ञानसाधनाही केवळ वादविवादांपुरतीच का? मग केवळ एखाद्या वादविवाद मंडळापलिकडे काही होत नसेल तर हा सगळा आटापिटा कशासाठी करायचा?

पण सगळंच टाकाऊ आहे का? याचं उत्तर अर्थातच सगळं टाकाऊ नाही. किंबहुना ऐसीच नव्हे तर इतर अनेक संस्थळांवर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं, आनंद घेण्यासारखं मोठ्ठं भांडार आहे. कारण शेकडो लेखकांनी हजारो तास घालवून ललित आणि वैचारिक लेखन केलेलं आहे. पण हे सगळं कोणासाठी? याचा फायदा नक्की कोणाला? या सगळ्यातून निष्पन्न काय होतं? एका बाजूला या चर्चांतून खरोखर पांडित्य दिसून येतं. सर्वसाधारण वृत्तपत्रांमधून 'वैचारिक' किंवा 'माहितीपूर्ण' सदराखाली येणारं लिखाण कःपदार्थ ठरेल असं लिखाण वेगवेगळ्या संस्थळांवर दिसून येतं. पण हे सगळं जातं कुठे? ज्यांना या संस्थळांची माहिती नाही, अशांचं काय?

उदाहरणच द्यायचं झालं तर विकीपीडियाचं घेऊ. इंग्लिशमधे आज त्रेचाळीस लाख विकीपानं उपलब्ध आहेत. मराठीत किती आहेत कल्पना आहे का? दहा हजारच्या आसपास! पोलंडची लोकसंख्या महाराष्ट्राच्या १/३ पेक्षा थोडी जास्त आणि पोलिश भाषेतली विकीपानं आहेत मराठीपेक्षा १०० पट जास्त. आणि नुसत्या पानांच्या संख्येवर जाऊन उपयोग नाही. माहितीची प्रत हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्क्रांतीच्या पानाचं उदाहरण घेऊ. इंग्लिश पान Evolution, मराठी पान उत्क्रांती, उत्क्रांतीवाद. या पानांवर सापडणारी माहितीची खोली आणि व्याप्ती पाहिल्यावर दहा हजार हा आकडादेखील किती पोकळ आहे हे जाणवतं.

ही परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही एक प्रकल्प सुचवू इच्छितो. आपण सगळ्यांनी मिळून मराठी विकीपीडियाची पानं समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया. आणि अशा समृद्धीसाठी प्रयत्न करण्याची प्रचंड गरज आहे. मराठी भाषेचं मराठी विकीपान पाहिलं तर त्यातही 'बोलीभाषा' हे पान रिकामं आहे. अनेक महत्त्वाचे मराठी संत, कवी, साहित्यिकांच्या नावाची मराठी पानं रिकामी आहेत. मराठी भाषा अभिजात आहे का नाही, प्रमाण भाषा महत्त्वाची आहे का नाही याचे वाद होत राहतीलच. त्याबरोबरच माहितीचं आदानप्रदान म्हणून ज्या विकिपीडीयाकडे सर्वप्रथम पाहिलं जातं त्याची थोडी वाढ करता आली तर पाहू या. हे काम सोपं नाही. पण आवश्यक आहे. याचा फायदा आत्ता नाही, पण पुढे अनेकांना होऊ शकेल. कारण विकीपीडिया या शब्दाला जी ओळख आहे ती इतर कुठच्याही मराठी संस्थळाला नाही. असा गरीब असला तरी मराठी विकिपीडीया मराठीमधल्या संस्थळांमधे ट्रॅफिकच्या क्रमानुसार आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मराठी विकीपीडियावर माहिती ठेवणं हे फायद्याचंच ठरणार आहे.

हे कसं करायचं? ज्यांना स्वतंत्र वेळ काढून, वेगळा अभ्यास करून काही लिहीणं शक्य नाही त्यांना आवडत्या विषयाची विकी पानं भाषांतरित करणं हा एक पर्याय आहे. अजून एक पर्याय म्हणजे सोपे, आवडीचे आणि व्यवहारात दिसणाऱ्या गोष्टींबद्दलचे प्रश्न घेऊन त्याबद्दल लिहावं; उदा: पाऊस कसा पडतो, ATM यंत्राच्या आत नक्की काय असतं, fiat currency म्हणजे काय, खोट्या नोटा बनू नयेत म्हणून काय काळजी घेतली जाते ... असं काहीही. विमानोड्डाणाबाबत माहितीची देवाणघेवाण प्रश्न विचारण्यातून सुरू झाली, तशी सुरूवातही करून देता येईल. विकीपीडियाचा फायदा असा की माहितीचे तुकडे ठेवले तरी चालतात. ते स्वतंत्रपणे जोडणारी पानं नंतर तयार करता येेतात.

ऐसीवरचा धागा-प्रतिक्रिया असा सगळाच मसाला विकीच्या फॉर्ममधे नसेल; त्यामुळे तिथे नेण्यापूर्वी त्यावर विकी-संपादन प्रक्रिया करावी लागेल. लिखाणातला ललित भाग काढणे, जिथे कुठे अधिक संदर्भ आवश्यक आहेत त्याची यादी बनवणे इ. ज्या लोकांना लिहावं काय असा प्रश्न असेल आणि/किंवा विकिपीडीयाबद्दल अधिक प्रेम आहे त्यांना या प्रकारच्या संपादनात मदत करता येईल. विकीवर 'बाह्य दुवे' म्हणून लेखाच्या खाली ऐसीची लिंक देता येईल. विकीपीडीयावर लेखन केलं असता लेखकाला श्रेय मिळत नाही. पण बाह्य दुव्यांवरून अप्रत्यक्षपणे अंदाज करता येईलच.

या प्रकल्पाचे निरनिराळे पैलू तपासून पाहणं, आणि त्यासाठी काय प्रकारची मदत आवश्यक आहे, ती कोण कोण करायला तयार आहे यावर चर्चा करू.
०. विकीपीडियावर लेखन करण्यासाठी काय करावं लागतं?
१. तुम्ही कुठच्या लेखाचं भाषांतर करायला तयार आहात का?
२. तुम्ही काही तांत्रिक भागात मदत करायला तयार आहात का? (विकीवर प्रसिद्ध करणं, वेगवेगळ्या संस्थळांवर किंवा ब्लॉगवरच्या लेखकांची माहिती/संमती/मदत मिळवणं इ. इ.)
३. या प्रकल्पाचा आराखडा कसा असावा? प्रगती कशी मोजावी? विशिष्ट विषयांसाठी टीम्स तयार कराव्यात का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

इंग्रजी विकिपीडियावर मी लिखाण केलेलं आहे; पण मराठीत कधी नाही. स्थूलमानाने माझी भूमिका काय आहे ते सांगतो.

समजा नेहा या व्यक्तीला 'व' या विषयावर माहिती हवी आहे. जर नेहाकडे संगणक असेल, तिला तो थोडाफार का होईना वापरता येत असेल, आणि इंटरनेट म्हणजे काय किंवा विकिपीडिया म्हणजे काय हे ठाऊक असेल, तर हे सगळं विचारात घेता नेहाला इंग्रजी मुळीच येत नसण्याची शक्यता फार कमी वाटते. त्यातदेखील जर 'व' हा विषय सामाजिक, राजकीय किंवा वैज्ञानिक वगैरे असेल तर त्यावरचं मराठी पान इंग्रजीच्या दर्जाला आणणं हे जिकिरीचं काम असतं. त्यामुळे 'व' ह्या विषयावरचं इंग्रजी पान सोडून तुलनेने तुटपुंजी माहिती असलेलं मराठी पान बघायला नेहाला काही कारण उरत नाही. परिणामी नेहा आणि तिच्यासारखे अनेकजण मराठी पान पाहण्याच्याच फंदात पडत नाहीत; मग त्यात भर घालणं दूरच राहो. अशा प्रकारे हे दुष्टचक्र चालू राहतं.

माझ्या मते ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ती सोडून देणं हा मार्ग श्रेयस्कर आहे. जर एखाद्या विषयात विशेष 'मराठीपण' असं काही नसेल (उदाहरणार्थ, 'पोकर', 'बीजगणित', 'उत्तर आयर्लंडचा प्रश्न', 'अमेरिकेची राज्यघटना', 'स्कॉच व्हिस्की', 'उत्क्रांती', 'ग्लोबल वॉर्मिंग', 'क्लायमेट चेंज डिनायल', 'सॅडोमॅसॉकिझम') तर त्यावर मराठीत विकिपीडिया एंट्री करण्याच्या खटाटोपात मला तरी फार तथ्य दिसत नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे अशा विषयात रस असणाऱ्या व्यक्तीला इंग्रजी पान समजणार नाही असं होणार नाही. (त्यातदेखील विकिपीडिया 'simple English' मध्ये सुद्धा असतो हे विसरता कामा नये.) अशा विषयावरचा मराठी लेख चांगला होणं शक्य नाही असा माझा मुद्दा मुळीच नाही, तर तो चांगला करण्यासाठी खर्ची घालावे लागणारे कष्ट इतरत्र जास्त उपयोगी पडतील असा आहे. अर्थात काही असलं तरी ज्याला ज्यात रस वाटतो ते त्याने केलं तर अडवण्याचा प्रश्नच नाही. समजा एखाद्याने व्हेनेझुएलाच्या राजकारणावर मराठी विकिपीडियात लेख लिहायचा ठरवला तर माझ्या शुभेच्छा त्याच्यामागे असतीलच. पण तो लेख मी वाचण्याची शक्यता कमी आहे.

याउलट 'व' हा विषय काही ना काही कारणाने 'खास मराठी' असेल, तर त्यावर मराठी विकिपीडियात पान असणं आणि ते चांगलं लिहिलेलं असणं मोलाचं आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक बऱ्यापैकी इंग्रजी पुस्तकावर पान असतं, तसं ते 'तुंबाडचे खोत' किंवा 'सखाराम बाईंडर' किंवा 'पण लक्षात कोण घेतो?' किंवा 'गोलपीठा' वर असायला हवंच हवं. 'जात्यावरच्या अोव्या', 'बालगंधर्व', 'संभाजी ब्रिगेड', 'अजित पवार' अशा कित्येक विषयांबद्दल हेच म्हणता येईल. तेव्हा अशा ठिकाणी कष्ट खर्ची घातले तर ते जास्त प्रमाणात कारणी लागतील असं वाटतं. करण्यासारखं काम इथे खूप आहे.

अवांतर: खुद्द 'ऐसी अक्षरे' याच विषयावर मराठी विकिपीडिया एंट्री सुरू करायला काय हरकत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

जर नेहाकडे संगणक असेल, तिला तो थोडाफार का होईना वापरता येत असेल, आणि इंटरनेट म्हणजे काय किंवा विकिपीडिया म्हणजे काय हे ठाऊक असेल, तर हे सगळं विचारात घेता नेहाला इंग्रजी मुळीच येत नसण्याची शक्यता फार कमी वाटते.

हाच युक्तिवाद आपण तीस वर्षं मागे नेऊन पाहू.

जर नेहाकडे ही संगणक नावाची भानगड असेल आणि तिला थोडंफार का होईना त्यावर खाटखुट करता येेत असेल, तर तिला अत्यंत समृद्ध लायब्ररी उपलब्ध नसण्याची क्षमता फार कमी वाटते.

विकिपीडियाची सुरूवात २००१ साली झाली. पहिल्या वर्षभारात दहा हजार लेख नव्हते. पण एक्स्पोनेन्शियल वाढ होणं महत्त्वाचं आहे.

मुद्दा आत्ता संगणक आणि इंटरनेट असणारांचा नाहीच. महाराष्ट्रात ज्यांना उच्चशिक्षण आहे, इंग्लिशही येतं अशांकडेच प्रथम संगणक येणं साहजिकच आहे. ते डेमोग्राफिक सॅच्युरेट झालेलं आहे. पाच वर्षांनी कॉंप्युटर हातात घेणारी, (किंवा सरळ मोबाइलवरूनच नेटवर जाणारी) पिढी ही मराठी माध्यमातून शिकलेली असणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे लेख दर्जात्मक दृष्ट्या कुठे येतात हे मी स्वत:च सांगणं इष्ट नाही.ते मी वाचक मंडळींवर आणि जाणकारांवरच सोडतो.
पण अब्राहमिक धर्मांबद्दलचे दोन्-चार लेख, १९६५ युद्ध, बाबक खुर्रामुद्दिन ह्या पारशी योद्ध्याची गोष्ट,
आणि पुजालो- गार्बो ह्या दुसर्‍या महायुद्धातल्या डबल एजंटची थरार कामगिरी हे सगळे धागे माहितीपर
लिखाणाकडे झुकणारे आहेत. हे सरळ उचलून कुणी विकीमध्ये टाकले तर माझी हरकत असणार नाही.
निनाद ह्यांनी मला व्यनि वगैरे करुन ते विकीमध्ये टाक्ण्यासआठी विचारणा केली आहे. पण मला
बहुसंख्य वेळेस सायटी उघडण्यास जमत नाही, हापिसातून; अगदि विकीसुद्धा. घरी असताना इतर कामात व्यग्र.
वेळ पुरत नाही. त्यामुळे माझ्याऐवजी इतर कुणी ही माहिती इथून उचलून तिथे टाकली तरी माझी ना नाही.
माहिती तयर आहे. तुम्हाला फक्त इकदून उचलून तिथे पेस्टवायची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्यनीतून कोणते दुवे विकीवर टाकायचे आहेत ते कळवावे. वेळ होईल तशी मी त्यांची विकीपाने करेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुवे पाठवलेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्यनीतून कोणते दुवे विकीवर टाकायचे आहेत ते कळवावे. वेळ होईल तशी मी त्यांची विकीपाने करेन

माझा वॅलेंटाईन्स डे वरचा लेख विकीवर खपेल काय हो? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

विकिपिडियाखेरीज अजून काही शक्यता नाहीत का? विकिपिडिया साउण्ड्स बोअरिंग. शिवाय मी चिपलकट्टींशी बहुतांशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> समजा नेहा या व्यक्तीला 'व' या विषयावर माहिती हवी आहे. जर नेहाकडे संगणक असेल, तिला तो थोडाफार का होईना वापरता येत असेल, आणि इंटरनेट म्हणजे काय किंवा विकिपीडिया म्हणजे काय हे ठाऊक असेल, तर हे सगळं विचारात घेता नेहाला इंग्रजी मुळीच येत नसण्याची शक्यता फार कमी वाटते. <<

इथे थोडासा गोंधळ होतो आहे असं वाटतं. इंग्रजी मुळीच येत नसण्याची शक्यता कमी आहे हे खरंच आहे, पण आज संगणक/मोबाईल/इंटरनेट अनेक सामाजिक स्तरांत पोहोचलं आहे; तसंच मोठ्या शहरांबाहेरसुद्धा पोहोचलं आहे.

As per the data, Uttar Pradesh, with 14.85 million subscribers, has the maximum number of mobile internet connections, followed by Maharashtra (including Goa) with 12.64 million and Andhra Pradesh with 10.32 million connections, as of March-end this year.

संदर्भ - ६ ऑगस्ट २०१३.

ह्यातले अनेक वापरकर्ते कामापुरतं इंग्रजी कसंबसं वापरू शकतात, किंवा दहावी-बारावीपर्यंत त्यांनी इंग्रजीचा पेपर कसाबसा पास केलेला असतो. त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना इंग्रजीची जवळपास शून्य गरज असते. ही माणसं फेसबुक इ. सोशल मीडिआवर दिसतात तेव्हा त्यांच्या इंग्रजीचा कमकुवतपणा अगदी स्पष्ट दिसतो. किंवा ते फक्त मराठीत (म्हणजे रोमन लिपी वापरून किंवा देवनागरीत) व्यक्त होत असतात. अशा लोकांना गंभीर विषय इंग्रजीत अभ्यासायला जड जातात असा माझा अनुभव आहे.

>> याउलट 'व' हा विषय काही ना काही कारणाने 'खास मराठी' असेल, तर त्यावर मराठी विकिपीडियात पान असणं आणि ते चांगलं लिहिलेलं असणं मोलाचं आहे. <<

ह्याच्याशी सहमत. एक उदाहरण देतो : स्त्रीवाद ह्या विकिपीडिया एंट्रीत रखमाबाई खटल्याचा उल्लेख आहे, पण रखमाबाईंवर विकी पान दिसत नाही. ते असणं गरजेचं आहे. दिवाळी अंकातल्या मस्त कलंदर यांच्या ह्या लेखातून काही मजकूर घेऊन ते बनवता येईल. गंमत म्हणजे 'रखमाबाई सावे' असं गूगलवर शोधलं तर आज पहिला दुवा 'ऐसी'वरच्या लेखाचा मिळतो. बाकी एकदोन वृत्तपत्रीय लेख सोडून फार काही हाती लागत नाही.

मी पुढे जाऊन असंही म्हणेन की 'भारतीय' विषयांतदेखील मराठी विकिपीडिया अद्ययावत हवा. कारण लोकांना ज्ञानाची आस आहे, पण इंग्रजी किंवा हिंदी त्यांना दूरची वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समजा नेहा या व्यक्तीला 'व' या विषयावर माहिती हवी आहे. जर नेहाकडे संगणक असेल, तिला तो थोडाफार का होईना वापरता येत असेल, आणि इंटरनेट म्हणजे काय किंवा विकिपीडिया म्हणजे काय हे ठाऊक असेल, तर हे सगळं विचारात घेता नेहाला इंग्रजी मुळीच येत नसण्याची शक्यता फार कमी वाटते.

या कडे मी जरा वेगळ्या दृष्टीकोनातुन बघतो. आज भारतात साधारण किती लोक इंग्रजीचे ज्ञान नसताना मोबाईल फोन्स वापरतात. एस एम एस चा वापर करुन आपल्या शेतातल्या पंपाला चालु बंद करणारा इंग्रजीचा गंध नसणारा शेतकरी पाहिलेला आहे. अशा शेतकर्‍याला जर शेती विषयक माहिती जर मराठीतुन मिळाली तर त्याचा ती वापरण्याचा कल अर्थातच जास्त आहे. आपल्या देशात मोबाईल वरुन इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या दिवंसेदिवस वाढत आहे. इंग्रजी न येणार्‍याला सुद्धा मोबाईल वापरणे हे संगणक वापरण्यापेक्षा जास्त सोपे आहे.त्यामुळे भारतीय भाषातुन असणार्‍या ज्ञानाची गरज दिवंसेदिवस वाढत जाणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. भारतीय भाषांमधून ज्ञानाची गरज दिवसेंदिवस वाढत जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम उपक्रम(सुचना). मराठी विकिपिडियाचे काम हे अवघड असले तरी करायला हवे हे मलाही वाटते. मराठी संस्थळं साधारणपणे मायक्रो-ब्लॉगिंगच्या परिघात येत असल्यामुळे अभ्यासपुर्ण तपशीलवार मत नोंदविणारे इथे तुलनेने कमी असतात किंवा मायक्रो-ब्लॉगिंग करणार्‍यांचा कलही त्याकडे एकंदर कमीच असतो, त्यातुन सर्वच मराठी संस्थळांची पोहोच(रीच?) फारशी नसल्याने(सदस्यसंख्या फार नसल्याने) फारसे कार्यकर्ते मिळणे अवघड आहे. पण तयार असणार्‍या सदस्यांबरोबर हा उपक्रम चालु करुन त्याचे वेगळे (साजेशी भुमिका असलेले) संस्थळ बनविल्यास त्यास जास्त प्रतिसाद मिळेल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी विकिपिडियाचे काम हे अवघड असले

अवघड नक्कीच नाही! फक्त 'अरे! हे विकिवर टाकले पाहिजे' इतका विचार मनात असला की पुरते. पुढचे सरावाने जमते.
त्या पानाचा शोध घ्यायचा आणि ती माहिती त्यात चिकटवायची बास!

सगळे काम आपलेच आहे असे नाहीच. कुणीतरी वर्गवारी करते. कुणीतरी चित्रे जोडते. दुवे येतात. हे सगळे आपोआप झालेले पाहायला पण मस्त वाटते. (पण कधी कधी काही पाने अगदी दुर्लक्षित ही राहतात Smile ते ही ठीकच!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

विकिपीडीया प्रकाराने लिखाण करणं मला कठीण जातं. त्या प्रकाराने माहितीची रचना करणं, एकसारखी शिस्त ठेवणं आणि ललित बाज पार काढून टाकणं हे किचकट वाटतं. पण मी स्वतःच किती गोष्टी विकिपीडीया वाचून शिकले हे पहाता हे करण्याचा कंटाळा दूर करावा हे ही लक्षात येतं.

मराठीभाषिकांबाबत - पुण्यात रहाणारे पण मुळात पुण्याचे नसलेले, अंनिसचं काम करणारे, संस्थळांवर गेली काही वर्ष सहजतेने वावरणारे प्रकाश घाटपांडे स्वतः बऱ्यापैकी वाचत असणार, संगणक, फोन व्यवस्थित वापरत असणार याबद्दल वेगळं सांगायला नको. त्यांची प्रतिक्रियाही अशी येते. या वर्गाचं पुरेसं representation संस्थळावर आहे असं दिसत नाही. फेसबुकावर काही लोकांनी "तू काय त्या इंग्लिशमधल्या लिंका टाकतेस, त्या मी वाचत नाही" असं मला म्हटलं आहे. विद्यापीठीय शिक्षणाची वंशपरंपरा नसणारे, आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गाकडे येणारे आणि शिकलेले, मुलांना शिकवण्याची इच्छा बाळगणाऱ्या गटातले फार लोक इंग्लिश वाचत असतील असं वाटत नाही. या लोकांचा जालावर असणारा वावरही, त्यांच्या संख्येच्या तुलनेत फार कमी दिसतो.

मी पुढे जाऊन असंही म्हणेन की 'भारतीय' विषयांतदेखील मराठी विकिपीडिया अद्ययावत हवा. कारण लोकांना ज्ञानाची आस आहे, पण इंग्रजी किंवा हिंदी त्यांना दूरची वाटते.

भारतीय विषयाबाबत सहमती. त्याशिवाय सध्याच्या घडामोडींमुळे भारतीयही झालेले विषय, अणूऊर्जा, पर्यावरण, हवामान असे विज्ञानसंबंधी विषय यावेत असं वाटतं. कालच्या लोकसत्तामधे ही बातमी आहे. पण यात फ्लॅमनव्हिलं मॉडेल काय, ईपीआर तंत्रज्ञान काय याची काहीही माहिती नाही. १४३० मेगावॉट क्षमता आहे असं ‌वाचल्यावर सध्या (किंवा गेल्या) उन्हाळ्यातला महाराष्ट्रातला वीजतुटवडा किती होता असाही लगेच प्रश्न पडला. ही संबंधित मराठी विकीपीडीयाची (काही) पानं:
वीज, सौर ऊर्जा
अणूऊर्जेचं पान रिकामं आहे. भारतातली ऊर्जा/वीजनिर्मिती हे पान सहज सापडलं नाही. (इंग्लिशमधे ही दोन पानं व्यवस्थित भरलेली आहेत.)

तयार असणार्‍या सदस्यांबरोबर हा उपक्रम चालु करुन त्याचे वेगळे (साजेशी भुमिका असलेले) संस्थळ बनविल्यास त्यास जास्त प्रतिसाद मिळेल असे वाटते.

साजेशी भूमिका म्हणजे नक्की कशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>साजेशी भूमिका म्हणजे नक्की कशी?

म्हणजे जालावर वावरणारे अनेक जण असे असतील जे तपशीलवार लेखन करतही असतील पण इथल्या चर्चा/प्रतिसादमय परिघात येणं त्याना रुचत नसावं किंवा माहितही नसावं, अर्थात हा एक अंदाजच कारण एवढ्या जाल-साक्षर लोकांपैकी बर्‍यापैकी लोकप्रिय संस्थळावर एवढेच लोक अ‍ॅक्टिव्ह असतात म्हणजे उरलेले लोकं इथ न येण्याचं काही कारण असावं. त्यांना साजेसं संस्थळ मिळालं(उदा. हलक्या-फुलक्या चर्चा नसणारं, गंभीरपणे मुद्दे हताळणारं वगैरे) तर कदाचित त्या प्रकृतीचे लोकं जास्त आकर्षित होण्याची शक्यता आहे काय? अन्यथा इतर लोकांनी ह्या किंवा इतर संस्थळांवर गर्दी न करण्याचं कारण काय असावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्यथा इतर लोकांनी ह्या किंवा इतर संस्थळांवर गर्दी न करण्याचं कारण काय असावं?

तपशीलवार लेखन - टंकन - करण्यासाठी लागणारा वेळ, त्याला मिळणारी प्रसिद्धी / रीच यांच गणित अजून तरी असमान असल्याने असे लेखन करणारे 'टंकाळा' करत असावेत असा प्राथमिक अंदाज आहे.

दुसरे असे की सराव नसलेल्या व्यक्तीला मराठी टंकन तुलनेने अधिक वेळखाऊ असल्याने तपशीलवार इंग्रजीतून करणे अधिक सोपे व गुगलवगैरेवरून सहज शोधण्यासारखे असल्याने अधिक रीच असलेले असल्याने मराठीतून टंकाळा हे कारण वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथं केलेल्या लिखाणाचं श्रेय मिळतं का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

इथं केलेल्या लिखाणाचं श्रेय मिळतं का ?

तुमचा प्रश्न इथे केलेल्या लेखनाचं विकीवर श्रेय मिळतं का, असा असेल तर उत्तर मर्यादित होकारार्थी आहे. समजा काही अभ्यासू मंडळींनी इथे लेखन केलेलं आहे. ते किंचित स्वरूप बदलून विकीसाठी तिकडे डकवलं तर अतिरिक्त वाचनासाठी म्हणून, किंवा संदर्भ म्हणून इकडचा दुवा देता येतो.

हा सर्वसाधारण प्रश्न असल्यास, उत्तर होकारार्थी आहे. अनेक लेखकांची आपली स्वतंत्र ओळख आहे. आणि अगदी मर्यादित का होईना पण वाचकवर्ग आहे. इथे केलेलं लेखन कोणी जसंच्या तसं इतरत्र छापलं तर कॉपीराइट अधिकारही लागू होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा. इथे हा शब्द वापरण्याइअवजी स्पेसिफिकली विकीपीडिया असं म्हणायला अवं होतं. काही ठिकाणी लेखकाचं नाव दिसतं. पण काही ठिकाणी लिखाण कुणी केलय हे समजत नाही. बरेचदा माहिती बदलत राहते. इथे केलेल्या लिखाणाचं श्रेय मिळणार यात मनात कसलीच शका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

मी (इंग्रजी) विकिपीडियावर थोडंफार लिहिलेलं आहे, पण त्याचं श्रेय मिळावं अशी माझी अपेक्षा नसते. कुठल्याही पानावरचं 'history' हे बटण क्लिक केलं तर कुठल्या वेळेला कुणी काय लिहिलं अाहे ते कळतं, पण बहुतेक वेळा ती 'screen names' किंवा नुसते IP addresses असतात. त्यामागची खरी नावं फारच क्वचित कळतात आणि तेच अपेक्षित आहे. त्यातसुद्धा तुम्ही जे लिहिलं असेल ते इतरजण सुधारू शकतात किंवा त्याची पुनर्रचना करू शकतात हे गृहीत धरलेलं आहे.

विकिपीडियामागचा विचार असा की ज्याला जी माहिती असेल ती त्याने (जास्तीतजास्त काळजीपूर्वक) लिहून इतरांचं भलं करावं आणि असे इतर लाखोजण तेच करतील. एकूण परिणाम म्हणून सगळ्यांना जास्तीतजास्त ज्ञान जवळपास नगण्य खर्चात उपलब्ध होईल. तेव्हा आपण लिहिलेलं कुणी ना कुणीतरी वाचतं आहे हेच लिहिणाऱ्याचं श्रेय ठरतं.

विकिपीडियात त्रुटी नाहीत असं मुळीच नाही, पण सर्वसाधारणपणे त्या प्रकल्पाबद्दलचं माझं मत बरं आहे. (पण हा विषय तसा खूप काथ्याकूट करण्यासारखा आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

विकिपीडियात त्रुटी नाहीत असं मुळीच नाही, पण सर्वसाधारणपणे त्या प्रकल्पाबद्दलचं माझं मत बरं आहे. (पण हा विषय तसा खूप काथ्याकूट करण्यासारखा आहे.)

ह्याबद्दल अधिक वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

योजना आवडली.
माझ्याकडून सुरूवात म्हणून माझ्या एका लेखनाचे रुपांतर इथे विकी पानावर केले आहे. संपूर्ण रूपांतर करण्यात १० मिनिटे लागली.

बरेच संदर्भ व चित्रे असल्यास अधिक वेळ लागावा, अन्यथा मोठ्या लेखांनाही १०-१५ मिनिटे पुरेशी आहेत. सरावाने वेळ कमी लागू शकेल.

विकीपाने करताना भारताशी/महाराष्ट्राशी संबंधित लेखनावर अधिक भर दिला पाहिजे याच्याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी आज विचार करत होतो की उत्क्रांतीचं पान आणि त्याला संलग्न असलेली पानं थोडी सुधारण्यासाठी हात वर करावा. पण, 'ऋषिकेश, तू माझ्याही पुढे गेलास'

एक चौकशी - मिड डे मील हा लेख लिहिला. तो समजा 'भारतीय सरकारच्या योजना' अशा भावी पानाचा भाग करायचा असेल तर ते नक्की कसं करायचं? म्हणजे या लेखाप्रमाणे इतर दहा जणांनी विविध दहा योजनांची पानं तयार केली. त्यानंतर मी ते पान तयार करायला बसलो. तर मला कसं कळणार की या दहा पानांचा समावेश व्हायला हवा? मिड डे मील पानाला काही टॅग देण्याची सोय असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या अल्पशा माहितीनुसार नव्या पानवर या पानाच्या नावाला [[ ]] अशी चौकट टाकली आपोआप या पानावर डिरेक्ट होईल. फक्त ब्रॅकेटमधील पानाचे नाव (टायटल) जसेच्या तसे चौकटीत हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा प्रश्न थोडा वेगळा होता. समजा भौतिकशास्त्र या विषयातल्या कुठच्याच भागासाठी एकही पान नाही. मी न्यूटनचे नियम या विषयावर पहिलं पान तयार केलं. दुसरं कोणी तरी घर्षण या विषयावर लिहिलं. तिसऱ्या कोणीतरी फ्री बॉडी डायग्राम्सवर लिहिलं. आता ही तीनही पानं क्लासिकल मेकॅनिक्स या व्यापक विषयाचे भाग आहेत. आणि क्लासिकल मेकॅनिक्सची पानं, तसंच क्वांटम मेकॅनिक्सची पानं... अशी मिळून भौतिकशास्त्राची पानं तयार होतात. आता पहिलं पान तयार करताना मला अशी काही व्यवस्था करता येेते का की जेव्हा कोणी क्लासिकल मेकॅनिक्सचं पान तयार करेल तेव्हा आपोआप माझं न्यूटनच्या नियमांच्या पानाचा दुवा किंवा उल्लेख तिथे व्हावा? आणि एक पातळी वर जाऊन भौतिकशास्त्राचं पान कोणी तयार करेल तेव्हा आपोआप क्लासिकल मेकॅनिक्सच्या पानाचा दुवा किंवा उल्लेख तिथे व्हावा...

हे जर शक्य नसेल तर फिजिक्सच्या इंग्लिश पानावर जाऊन 'आख्खं स्ट्रक्चर मराठी विकीत आण, जी रिकामी पानं असतील ती रिकामी राहू देत, जमेल तसतशी मी भरेन' असं काही म्हणता येतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
सुरुवातीसच हे केलं तर बरचस रिवर्क* वाचेल.
.
रिवर्क ला मराठीत नक्की काय म्हणायचं?
व्यर्थ जाउ शकणारे कष्ट? पण ते फारच पुस्तकी वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मूळ शंकेबद्दल माहिती नाही. निनादला विचारायला हवं

रीवर्क : इथल्या संदर्भात पुनर्लेखन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी पाने बनवताना त्या समुहाची पाने बनवून टाकतो.
त्यावर एकमेकांचे दुवे देतो. फार मोठे असेल तर साचे बनवतो आणि ते पानांवर लावत जातो. जसे साचा साचा:सामाजिकशास्त्र शाखा ‎ दुवा https://mr.wikipedia.org/wiki/साचा:सामाजिकशास्त्र_शाखा यामुळे सगळी पाने एकत्रित दिसायला उपयोग होतो.

साचे बनवणे सोपे असते आणि ते लावणे तर अजून सोपे.
उदा. पुरातत्त्वशास्त्र या पानावर शेवटी {{साचा:सामाजिकशास्त्र शाखा}} इतका द्विकंस टाकला की काम झाले.

या शिवाय जर साचा लावायचा नसेल तर हे ही पाहा नावाचे दुवे तयार करतो.
जसे की पान https://mr.wikipedia.org/wiki/माशी या पानावर हे ही पाहा

खोडमाशी
मधमाशी
मधमाशांचे पोळे
गांधीलमाशी

हे दुवे दिलेले आहेत.

(हे सर्व योग्यच असेल असे नाही पण आंतरविकि दुवे किती आहेत यावरही त्या त्या भाषेच्या विकिची गुणवत्ता ठरते. म्हणून असे केलेच पाहिजे.)

पानांचे विकिकरणही करत राहणे गरजेचे असते. यासाठी आपण ऑटोमेशन वापरले पाहिजे. माझी एक फार जुनी मागणी आहे की असा एक बॉट बनवला पाहिजे. की जो मी नवीन पान बनवले की सर्व मराठी विकि चाळून जेथे जेथे त्या पानाचे नाव असेल तेथे त्याचा दुवा बनवेल.

उदा. जर एक रखमाबाई जनार्दन सावे हे पान बनले तर त्या बॉट ने सर्व मराठी विकि शोधावा आणि जेथे रखमाबाई जनार्दन सावे हे नाव आले असेल त्याचा दुवा बनवावा. (रच्याकने व्यक्तींच्या नावाची पाने बनवताना संपुर्ण नावाचे पान बनवायचे असते.)

प्रगत: हे करताना बॉट ने प्रत्येक नाव दुवा बनवू नये. तर त्या पानावर येणारे पहिले उल्लेख शोधावेत आणि त्याचेच दुवे बनवावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

अनेक तांत्रिक स्वरूपाच्या विषयांवर मी मराठीमध्ये लेखन केलेले आहे. ते विकीपीडियावर टाकावे अशी सूचना किंवा विनंतीसुद्धा मला केली गेली होती. त्यासाठी करावे लागणारे संपादनाचे काम जास्त कठीण नसावे हे मला मान्य आहे. त्या वेळी मी दोन मुद्दे उपस्थित केले होते. त्याबद्दल माझे अज्ञान मात्र अजूनही तेवढेच राहिले आहे.
१.विकीपिडियावरील माहिती अचूकच आहे याची खातरजमा करण्याची कोणती व्यवस्था अस्तित्वात आहे?
२.समजा मी मेहनत करून एक लेख लिहिला आणि विकीवर चढवला आणि उद्या कोणीतरी त्याचे संपादन करण्यासाठी त्यात (मला न विचारता) हव्या तशा सुधारणा केल्या आणि त्या माझ्या लेखाशी विसंगत असतील किंवा त्याने माझे लेखन उडवून टाकले तर माझ्या मेहनतीचा काय उपयोग?
विकीवर माहिती देण्याच्या खटपटीचा कोणाला काय किंवा किती उपयोग आहे? हा एक मुद्दा आहेच. त्यावर बरीच चर्चा झालेली आहे. हा प्रश्न आंतरजालावरील माझ्या इतर लेखनालासुद्धा तितकाच लागू पडत असल्याने त्याबद्दल मी फार विचार करू नये असे कोणीही म्हणू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> १.विकीपिडियावरील माहिती अचूकच आहे याची खातरजमा करण्याची कोणती व्यवस्था अस्तित्वात आहे? <<

खातरजमा कशी करावी इथे पाहा. विशेषतः स्रोत देणं गरजेचं आहे. अन्यथा 'स्रोतांची खातरजमा आवश्यक आहे' असा शिक्का लेखावर बसू शकतो.

>> २.समजा मी मेहनत करून एक लेख लिहिला आणि विकीवर चढवला आणि उद्या कोणीतरी त्याचे संपादन करण्यासाठी त्यात (मला न विचारता) हव्या तशा सुधारणा केल्या आणि त्या माझ्या लेखाशी विसंगत असतील किंवा त्याने माझे लेखन उडवून टाकले तर माझ्या मेहनतीचा काय उपयोग? <<

आपण लिहिलेल्या पानांवर नजर ठेवता येते. त्यामुळे त्यात बदल झालेले कळतात. हे बदल योग्य वाटले नाहीत, तर त्यासाठी चावडी असते. अर्थात, आपण स्वतः ते बदल (योग्य कारणं देऊन) उलटू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मूळ लेखाचा आशय आणि उद्देश आवडला.

एक अवांतर मुद्दा : विकीपीडीयाची माहिती किती विश्वासार्ह असाही एक प्रवाह आहे. तरी देखील सध्या तो माहितीचा एक मुख्य स्त्रोत आहे. ब्रिटानिका किंवा एनकार्टा एनसाय्क्लोपीडिया विकत घेऊन वाचणारे, नवी आवृत्ती घेऊन अपडेट ठेवणारे लोकही आहेत.. सध्या या दोन्ही विश्वकोषांचे ईअंक विक्रमी संख्येने खपताहेत. विकीपीडीया पेक्षा इथल्या माहितीची जबाबदारी कुणीतरी घेतलेली असणे हे आश्वासक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

या प्रश्नांची उत्तरं (किंवा मदत पानाचा दुवा) इथेच असतील तर शोधायला बरं पडेल.

१. विकीपीडीयावर नवीन पान कसं सुरू करावं?
२. शीर्षकात सुधारणा कशी करावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. आपल्याला हवे असलेले पान विकिच्या शोध यंत्रात शोधावे. उदा दर्पण मराठी वृत्तपत्र
२. उपलब्ध असल्यास ते दिसेलच.
३. नसल्यास दुवा लाल रंगात येईल. त्यावर टिचकी द्यावी की संपादनाची खिडकी उघडेल.
४. त्यात आपला मजकूर टंकावा.
५. योग्य ते दुवे द्यावेत
६. पानाची वर्गवारी करावी. पान जतन करावे.
७. पान इतर भाषांत जोडावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

अलीकडील बदल हे उपयुक्त आहे.
त्यामुळे विकीवर काय चालले आहे याचा अंदाज येतो.
तसेच आपले लेख किंवा आपण ज्यात बदल केला ते लेख यात ठळक दिसतात. त्यामुळे आपल्याला ही बदलांवर लक्ष ठेवता येते.
दुवा:
https://mr.wikipedia.org/wiki/विशेष:अलीकडील_बदल

तसेच नवीन लेखकांसाठी
https://mr.wikipedia.org/wiki/सहाय्य:संपादन हे पानही चांगले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8

वर दिलेल्या दुव्यात आपल्याला माझे योगदान दिसू शकेल परंतू आपण जी माहिती तिथे नोंदवितो त्याबद्दल ते आपला उल्लेख करण्याचे सौजन्य दाखवित या कारणास्तव मी तिथे पुन्हा काहीही योगदान दिले नाही / देणारही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

समलैंगिकतेसंदर्भातला सध्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि लोकांचं मतप्रदर्शन पहाता या विषयावर विकीपीडीया मराठीमधे अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता दिसते आहे. वेगवेगळी संस्थळं, फेसबुकावरच्या विविध प्रकारच्या लोकांच्या भिंती यांच्यावरची चर्चा पहाता हे सगळं मराठीत लिहीण्याची गरज दिसते. फुटकळ वाद घालण्यापेक्षा किंवा फक्त निषेध नोंदवण्यापेक्षा या संदर्भातली वेगवेगळी पानं आपण भरली तर ते अधिक रचनात्मक काम होईल.

आहेत ती विकीपानं भाषांतरित करण्याचं काम तसं सोपं असावं. या पानांची यादी काढून, काम करण्यास इच्छुक स्वयंसेवकांमधे कामाचं वाटप करण्यासाठी वेगळा धागा काढणं किंवा काही हे ही ठरवता येईल. या संदर्भात समलैंगिकता, gender evolution, लैंगिकता, उत्क्रांती ही पानं मराठीत, अधिक प्रमाणात भरता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझं नाव घे नोंदवून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ना. गो.कालेलकर ह्यांच्यावर इंग्रजी विकीपीडियावर तुटपुंजी माहिती आहे, पण मराठीत तेवढीही नाही. इथलं कुणीतरी मदत करू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठी विकीपीडियात अमुकतमुक पाने आहेत अशा बातम्या नेहमी येतात. पण एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी म्हणून मराठी विकीपीडिया कितपत वापरला जातो आहे याचा काही विदा आहे काय? थोडक्यात वापरकर्ते कमी आणि योगदान देणारेच जास्त असे काहीतरी...
उदा. 'महाराष्ट्र' या विषयाची थोडी माहिती मराठी विकीपीडियाच्या पानावर उपलब्ध आहे. आता या विषयाची माहिती घेणारे इंग्रजी विकीपान वि मराठी विकीपान यापैकी कसला वापर करतात यांची काही तुलना/ट्रेंड कुठे उपलब्ध आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मह्णता तसा ट्रेंडचा विदा ठेवावाच.
पण जालाच्या मराठीकरणाचे काम "नेटा"ने सुरु आहे तर थांबवूही नये.
पाणपोई उघडताच एखादेवेळी लागलिच उपयुक्त वाटत नसेल, पण ती सुरु ठेवावी.
त्याचे काही गरजवंत तरी तिथपर्यंत पोचतीलच. निदान त्यांना तरी आपण तृप्त करु शकू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मराठीकरणातला विकीकरण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे हे निर्विवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा असा विदा कसा मिळवायचा हे माहित नाही. पण मराठी भाषेतल्या संस्थळांमधे विकीपीडियाचा नंबर आठवा आहे. वृत्तपत्रांची संस्थळं आघाडीवर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फुटकळ वाद घालण्यापेक्षा किंवा फक्त निषेध नोंदवण्यापेक्षा या संदर्भातली वेगवेगळी पानं आपण भरली तर ते अधिक रचनात्मक काम होईल.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद