मराठी प्रमाणलेखनाचे नियम (ऊर्फ गैरसोय आणि गळचेपी)

मला प्रमाणलेखन पाळण्यात काहीही म्हणण्याजोग्या अडचणी येत नसल्या, तरी माझ्या मते मराठी प्रमाणलेखनाचे नियम अत्यंत गैरसोयीचे, अपुरे आणि संदिग्ध आहेत. त्यांच्यात विसंगती आहेत.

खरा संतापजनक भाग हा की, हे नियम पाळता येण्याकरता तुम्हांला फक्त मराठी भाषा नि हे नियम अवगत असणं पुरेसं नाही; तर संस्कृतही ठाऊक असणं क्रमप्राप्त आहे. शिवाय इतर भाषांतले शब्द लिहायचे झाल्यास त्या त्या भाषेतल्या उच्चारांची माहिती असणं आवश्यक आहे, असंही हे नियम सांगतात. हा कुठला न्याय आहे कुणास ठाऊक.

दिवाळी अंकाच्या मुद्रितशोधनाच्या निमित्तानं या नियमांवरची ही चिडचिड पुन्हा एकदा अनुभवली. त्याबद्दल लोकांची मतं / भूमिका / विरोध / मान्यता काय आहेत / आहेत का, याबद्दल कुतूहल वाटलं. म्हणून हा चर्चाप्रस्ताव.

हे काही प्राथमिक प्रश्नः

१. प्रमाणलेखनाचे असे काही नियम असावेत असं तुम्हांला वाटतं का? का?
२. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो असल्यास, सांप्रतचे नियम तुम्हांला पुरेसे / योग्य / सोयीचे वाटतात का? जर वाटत नसतील, तर का?
३. दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी असेल, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असते? नियम पाळून नियमांना विरोध करत राहणे की नियम धाब्यावर बसवून आपल्याला योग्य वाटेल ते लिहिणे? की यापेक्षा निराळं काही?

या प्रश्नांच्या चौकटीबाहेरही बरंच काही असू शकतं, हे मान्य आहे नि ते इथे मांडलंत तर बरंच होईल.

***

मराठी प्रमाणलेखनाचे अधिकृत नियम इथे पाहता येतील.
मला बहुतांशी मान्य असलेली अरुण फडके यांची या नियमांविषयीची भूमिका इथे पाहता येईल.
ही मिसळपावर झालेली याच विषयावरची चर्चा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रत्येक स्वराचा उच्चार र्‍हस्व आणि दीर्घ केला जाऊ शकतो असे असताना केवळ इ आणि उ चे दीर्घ उच्चार भाषेत ठेवले आहेत. वर लिहिण्याचे आणि बोलण्याचे दीर्घत्व यांचे काही सोयरसुतक नाही. कोणते व्यंजन पूर्ण आणि अपूर्ण उच्चारले जात आहे याचा काही संबंध नाही (सग्ळीकडे बोलायचे आणि सगळीकडे लिहायचे).
एकाच अनुस्वारात ५-१० उच्चार खुपसले आहेत.
आमची काही हरकत नव्हती, पण नियम बनवताना मोठमोठ्या लोकांनी अशा चूका केल्या आणि आम्ही मात्र परिक्षेत एक चूक केली की एक मार्क कट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'आयला हो की, हवेत कशाला र्‍हस्वदीर्घ इकार-उकार? एकच कुठलातरी असला तरी पुरेल की' असा विचार तुमचा प्रतिसाद वाचून बळावला नि मी दचकले! पण खरोखर, असा विचारच कधी केला नव्हता. धन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रमाणलेखनाचे पैलू -
१. अक्षरपातळी - अनेक शब्द वेगवेगळे उच्चारले जातात. उदाहरणार्थ पाणी आणि पानी. यांसाठी एकच अक्षर वापरण्याची पद्धत असावी.
२. ऱ्हस्व-दीर्घ, अनुस्वार - सर्व शब्दांची ऱ्हस्वदीर्घाची व अनुस्वारांची चिन्हं सर्वांनी ठरलेल्या पद्धतीने लिहावी.
३. शब्दपातळी - एकाच संकल्पनेसाठी अनेक शब्द असतात. त्यातले मोजके वापरावे. म्हणजे उदाहरणार्थ नवरा आणि भर्तार असे दोन शब्द प्रचलित असतील तर त्यातला नवरा हा शब्द वापरावा. (अललित लेखनासाठी)
४. वाक्यपातळी - सर्वसाधारणपणे व्याकरणाचे नियम निश्चित असावेत व ते पाळले जावेत.

यापैकी क्रमांक २ मधले काही गोंधळ सोडले तर बाकी तीनची परिस्थिती मराठीत ठीकठाक आहे.

मुळात प्रश्न असा आहे की किती अनिश्चितता असतील तर त्या चालवून घ्याव्यात? आपण पिण्याच्या पाण्याचं उदाहरण घेऊ. पाणी शुद्ध असावं हे सर्वांनाच मान्य होईल. पण जगभरच्या वेगवेगळ्या नळांतून येणारं पिण्याचं पाणी तपासून बघितलं तर त्यात असलेली वेगवेगळी द्रव्यं वेगवेगळ्या प्रमाणात सापडतील. म्हणजे आयर्न कुठे २ पार्ट पर बिलियन असेल तर कुठे ३ पार्ट पर बिलियन असेल. आता यातलं कुठचं जास्त बरोबर? सर्वांनीच तो बरोब्बर २ पार्ट पर बिलियन वर आणावा का? नाही. कुठेतरी एक वेळ अशी येते की 'या विशिष्ट मर्यादेखाली प्रदूषकं असतील तर ते पाणी पिण्यास ठीक.' तसं प्रमाण भाषेबद्दल आहे का?

म्हणजे समजा दोन लेखकांना एक उतारा ऐकवला आणि त्यांनी तो लिहून काढला. तर शुद्धलेखनाच्या उघड चुका वगळता किती फरक स्वीकारार्ह असावेत? सुमारे ५०० शब्दांत एखादा ऱ्हस्वदीर्घाचा फरक असेल तर मी तो स्वीकारायला तयार असेन. इतरांचंही तसंच असावं असा अंदाज आहे.

६२ आणि ७६ साली जे नियम अस्तित्वात आले त्यांआधी आणि त्यांनंतर असे प्रयोग करून खरोखरच व्हेरिएबिलिटी कमी झाली आहे का हे तपासून पाहिलं आहे का? माझा अनमानधपक्याचा अंदाज आहे की ही व्हेरिएबिलिटी निश्चित कमी झाली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. अक्षरपातळी - अनेक शब्द वेगवेगळे उच्चारले जातात. उदाहरणार्थ पाणी आणि पानी. यांसाठी एकच अक्षर वापरण्याची पद्धत असावी.

हे इंग्लिशभाषेवर आधारित वाटतंय.

उलट पानी आणि पाणी वेगवेगळे लिहीता येतात ही मला मोठी सोय वाटते. इंग्लिशमधला शब्द often याचा दक्षिण इंग्लंड उच्चार अॉफन आहे, आणि उत्तरेकडे अॉफ्टन. हे त्याच लिपीत लिहायची सोय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उलट पानी आणि पाणी वेगवेगळे लिहीता येतात ही मला मोठी सोय वाटते.

ललित लिखाणासाठी ती सोयच आहे. प्रमाणलिखाणासाठी प्रमाण शब्द आवश्यक ठरतात. कुरणासाठी वळणावळणाची कुंपणं तयार केलेली छान दिसतात. ऑफिसची बिल्डिंग बांधायची तर सरळ भिंती सोप्या पडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रमाणभाषेत पानी हा शब्दच नाही. मग ही सोय नक्की कशासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ललित लेखनात बोली वापराव्या लागतात की. नाहीतर संवाद कसे लिहिणार? अर्थात हे लेखन प्रमाणभाषेच्या तुलनेत नगण्य असतं आणि नियमबियम करावेत इतकं महत्त्वाचं तर नसतंच नसतं, हे मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

साहित्यिक प्रकार (ललित) आणि भाषिक वर्गवारी (प्रमाणभाषा, बोली) या वर्गीकरणात काहीतरी चुकतं आहे.

ललित लेखन हा एक साहित्य प्रकार असून त्यात बोली आणि प्रमाणभाषा या दोन्हीचा वापर होतो. उदाहरणार्थः एलकुंचवारांचं 'मौनराग' हे प्रमाणभाषेत केलेलं ललित लेखन आहे. याउलट दळवींच्या 'सारे प्रवासी घडीचे' या ललित लेखनात मोठ्या प्रमाणावर बोली वापरलेली दिसते.

प्रमाणलेखनात प्रमाणशब्द आवश्यक ठरतात हेही अर्धसत्य. बोलींचं लेखांकन (शब्द योग्य वापरला आहे का?) करताना प्रमाणशब्द वापरून नाहीच चालणार. विशिष्ट क्षेत्रांत (शासनाचा कारभार, प्रमाण पाठ्यपुस्तकं) यांत विशिष्ट पारिभाषिक शब्द वापरावे लागतात, असं तुम्हांला म्हणायचं असावं.

(की मला धड समजत नाहीय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

युनिकोड मराठीद्वेष्टं वाटतं. याची तक्रार सविस्तर लिहीते. आत्ता फक्त रूमाल टाकून ठेवला आहे.

---

मराठी वर्णमालेत क्ष आणि ज्ञ ही मुळाक्षरं म्हणून शिकवली जातात. (निदान मी शाळेत असताना तरी. त्यापुढे बदल झालेत का?) पण यांच्यासाठी एकचएक युनिकोड सिंबल नाही. तीन युनिकोड एकत्र करून ही दोन मुळाक्षरं बनतात. मराठी अॅची आणखीनच गंमत आहे. स्वराची व्याख्या मोडीत काढणारा युनिकोड मराठी अॅसाठी वापरावा लागतो, दोन युनिकोड सिंबल्स वापरावे लागतात.

याउलट क, ख, ग, ज, (आणि इतर काही) अक्षरांखाली नुक्तेही येऊ शकतात. आणि या सनुक्ता अक्षरांसाठी स्वतंत्र युनिकोड सिंबल आहे. संस्कृत, सिंधी, भाषेतल्या मुळाक्षरांसाठी, अन्य सिंबल्ससाठी एक युनिकोड आहे, पण मराठीतले काही स्वर आणि मुळाक्षरं complex पद्धतीनेच लिहावी लागतात. अॅसाठी विकिपीडीया पानांवर U0972 हा सिंबल दाखवला असला तरी सगळे टंक तो स्वीकारत नाहीत.

त्याशिवाय युनिकोडात देवनागरीचा नंबर मागचा असल्यामुळे देवनागरी लिखाणाचा फाईलसाईझ बराच मोठा होतो. पण तो फक्त मराठीद्वेष नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> मराठी वर्णमालेत क्ष आणि ज्ञ ही मुळाक्षरं म्हणून शिकवली जातात. (निदान मी शाळेत असताना तरी. त्यापुढे बदल झालेत का?) पण यांच्यासाठी एकचएक युनिकोड सिंबल नाही. तीन युनिकोड एकत्र करून ही दोन मुळाक्षरं बनतात. मराठी अॅची आणखीनच गंमत आहे. स्वराची व्याख्या मोडीत काढणारा युनिकोड मराठी अॅसाठी वापरावा लागतो, दोन युनिकोड सिंबल्स वापरावे लागतात. <<

१. माझ्या माहितीनुसार क्ष आणि ज्ञ आता जोडाक्षरं म्हणून शिकवली जातात.
२. युनिकोड सिंबल किती हा मुद्दा तांत्रिक आहे. टंकताना तुम्ही कोणता कळफलक वापरता त्यावर टंकताना किती सोपं/अवघड आहे ते ठरतं (किमान सामान्य माणसासाठी तेच महत्त्वाचं असतं.) काही कळफलकांवर शिफ्ट-एक्स = क्ष आणि ऑल्ट-जे = ज्ञ, म्हणजे गमभन कळफलकापेक्षा कमी टंकून ती अक्षरं टंकता येतात.
३. छापखान्यात खिळे बनवतानाही पूर्वी अशाच अडचणी येत असणार. तुमची लिपी किती गुंतागुंतीची आहे त्यावर ते अवलंबून आहे. चिनी-जपानी टंकांना अधिक श्रम पडत असणार. त्यामुळे हा प्रश्न भाषेपेक्षा लिपीबद्दलचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

x = क्ष हे टंकण्यात नक्की काय अडचण आहे?
ज्ञ मात्र jn असेच किंवा dny असेच टंकावे लागते.
बादवे, ॠ सारखाच "लॄ" नावाचाही एक वर्ण होता फार्फार पूर्वी.
तो फक्त बाराखडीतच दिसला/ऐकला. तदनंतर आजवर कुठेच नाही. नक्की भानगड काय आहे?
.
.
"ऋषी" आणि "रुषी" ह्यांच्या उच्चारात काय फरक आहे कुणी सांगेल का?
(इतेह फक्त वाचून्-लिहून कळणार नसेल तर मी तुम्हाला कॉल करायला तयार आहे; नम्बर पाठवा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तो फक्त बाराखडीतच दिसला/ऐकला

ऐकला? आम्ही तर फक्त गिरवायला/लिहायला शिकलो!

तसेच आम्ही ङ आणि ञ हे देखिल फक्त गिरवायला/लिहायला शिकलो. उच्चारायला नाही (कारण शिक्षकांनाच उच्चार ठाउक नसावेत ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अंक" आणि "पंच" ह्या दोन शब्दात ऑल्रेडी आपण सारेच ङ आणि ञ चा उच्चार करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत. "पैंय्चम" हा पञ्चम चा शुद्ध उच्चार असल्याचे पढवले गेले होते. ञ म्हणजे सानुनासिक य् च जणू. किती वर्षे त्या अज्ञानांधःकारात होतो. पण पुढे अर्जुनवाडकरांच्या पुस्तकाने खाडकन डोळे उघडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"ऋषी" आणि "रुषी" ह्यांच्या उच्चारात काय फरक आहे कुणी सांगेल का?

ऋ चा उच्चार मूर्धन्य असतो. पाणिनीच्या मते मूर्धन्य अर्थात जबड्याच्या मागील बाजूस जीभ टेकवल्यावर येणार्‍या ध्वनींपैकी एक आहे. एक पॅरा उद्धृत करतो. पाणिनीला वरिजिनली काय म्हणावयाचे होते त्याचे लघुसिद्धांतकौमुदीत दिलेले 'एक्ष्प्लनतिओन'.

तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम्॥ लसक_१० = पा_१,१.८॥
ताल्वादिस्थानमाभ्यन्तरप्रयत्नश्चेत्येतद्द्वयं यस्य येन तुल्यं तन्मिथः सवर्णसंज्ञं स्यात्। (ऋऌवर्णयोर्मिथः सावर्ण्यं वाच्यम्)। अकुहविसर्जनीयानां कण्ठः। इचुयशानां तालु। ऋटुरषाणां मूर्धा। ऌतुलसानां दन्ताः। उपूपध्मानीयानामोष्ठौ। ञमङणनानां नासिका च। एदैतोः कण्ठ तालु। ओदौतोः कण्ठोष्टम्। वकारस्य दन्तोष्ठम्। जिह्वामूलीयस्य जिह्वामूलम्। नासिकानुस्वारस्य। यत्नो द्विधा - आभ्यन्तरो बाह्यश्च। आद्यः पञ्चधा - स्पृष्टेषत्स्पृष्टेषद्विवृतविवृतसंवृत भेदात्। तत्र स्पृष्टं प्रयतनं स्पर्शानाम्। ईषत्स्पृष्टमन्तःस्थानाम्। ईषद्विवृतमूष्मणाम्। विवृतं स्वराणाम्। ह्रस्वस्यावर्णस्य प्रयोगे संवृतम्। प्रक्रियादशायां तु विवृतमेव। बाह्यप्रयत्नस्त्वेकादशधा - विवारः संवारः श्वासो नादो घोषो ऽघोषो ऽल्पप्राणोमहाप्राण उदात्तो ऽनुदात्तः स्वरतिश्चेति। खरो विवाराः श्वासा अघोषाश्च। हशः संवारा नादा घोषाश्च। वर्गाणां प्रथमतृतीयपञ्चमा यणश्चाल्पप्राणाः। वर्गाणां द्वितीयचतुर्थौ शलश्च महाप्राणाः। कादयो मावसानाः स्पर्शाः। यणो ऽन्तःस्थाः। शल ऊष्माणः। अचः स्वराः। -क-ख इति कखाभ्यां प्रगर्धविसर्गसदृशो जिह्वामूलीयः। -प-फ इति पफाभ्यां प्रागर्धविसर्गसदृश उपध्मानीयः। अं अः इत्यचः परावनुस्वारविसर्गौ॥

या लांबलचक प्यारेग्राफात कुठल्या वर्णाची उच्चारायची जागा कुठली ते दिलेले आहे, उदा. "ञमङणनानां नासिका च" म्ह. ञ,म,ण,न,ङ हे सगळे नाकातून काढावयाचे वर्ण आहेत.

त्यातच "ऋटुरषाणां मूर्धा" असे एक वाक्य दिसेल. म्हणजे ऋ, ष आणि ट या तीनही वर्णांची 'उच्चारजागा' एकच आहे. वर्ण ठरतो दोन गोष्टींनी, एक म्ह. जीभ वरती कुठे टच होते ती जागा आणि शिवाय कशा पद्धतीने तो प्रकार. तर ट, ष म्हणताना जीभ मागे जाते तशीच ऋ म्हणताना मागे गेली पाहिजे आणि र-सदृश उच्चार झाला पाहिजे.

साध्या भाषेत बोलायचे झाले तर आम्रिकन उच्चार असतो बघ-त्याला 'रोल्ड आर' म्हणतात, उदा. "वी आऴ गोईंग देअऴ", त्याच्याशी ऋ ऑल्मोस्ट ऐडेंटिकल म्हटला तरी हर्कत नसावी. मुख्य गोष्ट ही की तो उच्चारल्याने कुठल्या अक्षरावर आघात येऊन गुरुत्व येत नाही. म्हणजे मराठी रेग्युलर उच्चारात उपकृत हा शब्द उपक्रुत असा उच्चारतात त्यामुळे प ला क्रु मुळे गुरुत्व येते. पण ऋ चा योग्य उच्चार केला तर "उपक्ऴति" असा काहीसा होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कृर आणि क्रुष्ण असे का नाही लिहायचे?
उच्चार करुन दाकह्व.
आज कॉल करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

क्ऴष्ण सारखा उच्चार व्हावा त्याचा. क्रूर हा शब्द मात्र मूळ संस्कृतमध्येच क्रूर असा लिहिला जातो, मराठीने काहीच केलेले नाही त्याबाबतीत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तृण वगैरे शब्दातील "तृ" चा उच्चार कसा करावा? त आणि ऋ दोन्ही आघात वेगवेगळ्या ठिकाणी करावा लागतो. जर ऋकार आहे म्हणून टाळूवर आघात करायचा तर टृण हा उच्चार निघतो. 'रु'कार धरावा तर शब्द त्रुण असा लिहावा लावेल.

हाच प्रश्न थृ,दृ,धृ,नृ या अक्षरांपद्दल. यातील ऋकार उच्चारायचा कसा? त्यात आणि रुकारात फरक काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्रुण किंवा ट्रुण असा उच्चार नाही. जे आधी लिहिले ते पुन्हा एकदा पहा. अमेरिकन रोल्ड आर उच्चार तुम्हाला माहितीच असेल- तमि"ऴ" सारखा. तोच उच्चार इथे. ऴ चा उच्चार कळाला की पुढचे सोपे आहे.

तृण्=त्ऴण सदृश. तेच थृ, दृ, धृ, नृ बद्दलही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला मुळात तो नुक्तेवाला ळ सुद्धा या अक्षरांबरोबर म्हणता येत नाहिये Sad
च्यामारी माझ्या जीभेतच कैतरी प्रॉब्लेम आहे की बर्‍याच जणांना यात कन्फ्युजन आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कसे काय? ऴ चा उच्चार करता येतो आहे ना? मग हर्कत नसावी असे वाटते.

धनंजय आणि अरविंद कोल्हटकर यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. मी सांगितले ते बह्वंशी बरोबर आहे असे मला वाटते, त्यात चूक असेल तर योग्य उच्चाराचे स्पष्टीकरण ऐकायला उत्सुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्रिटिश इंडिया आणि स्वतन्त्र भारत ह्या दोघांनीहि भारतीय भाषांमधील शब्द रोमन लिपीत लिहिण्यासाठी अधिकृत मानलेल्या 'Hunterian Transliteration' पद्धतीनुसार ऋ साठी 'ri', (कृष्ण Krishna), उ साठी 'u' आणि ऊ साठी 'ū' अशी योजना केली आहे. अलीकडे बरेच लोक ऋ साठी 'u'(अमृत साठी amruta)असे लिहितात पण ते क्लेशकारक वाटते. ('ऐसी'च्या देवनागरी लेखनातहि ही गैरसमजूत शिरली आहे. येथे ऋ उमटविण्यासाठी Ru अशा कळा दाबाव्या लागतात पण त्याला आता इलाज नाही. ITRANS मध्ये ही चूक नाही. तेथे ऋ साठी ri अशी योजना आहे.)

क्रुद्धः कृष्ण: (रागावलेला कृष्ण) आणि कृष्णश्चाक्रूरश्च (कृष्ण आणि अक्रूर - कृष्णचा एक यादव मित्र) ह्या दोन उच्चरणांमधून 'उ' आणि 'ऋ' मधला फरक स्पष्ट होईल. हे दोन्ही उच्चार ऐका येथे आणि येथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ऐकण्यात काही गफलत असेल तर कृपया सांगावी. तुम्ही दिलेल्या लिंकांमधून ते उच्चार ऐकले पण तो ऋ मूर्धन्य कुठेच वाटत नाहीये. "ट्रिल" सदृश उच्चार वाटतो आहे अन तसा तो बहुतेक नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'तृण'सारख्या शब्दांमधील वा नुसत्या ऋ चा उच्चार हा रु आणि रि च्या मध्ये येतो.
म्हणजे तोंडाचा आकार रि म्हणताना जसा होतो (जिवणी आडवी फाकविणे) तसा करायचा आणि तो तसाच ठेवून रु म्हणायचे. हे केल्याने जो उच्चार येतो तो ऋ चा उच्चार.
(कधी हृदयनाथ मंगेशकरांच्या तोंडून 'हृदय' म्हणताना ऐकले असेल, तर आठवा वा शोधा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो मराठीत फक्त एकाच शब्दात वापरला जातो - क्लृप्ती.
ऋ नि रि / रु यांतल्या उच्चारफरकाबाबत - अमुक यांच्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

> १. प्रमाणलेखनाचे असे काही नियम असावेत असं तुम्हांला वाटतं का? का?
होय, असावेत. असे केल्यामुळे दूरदूरच्या कुटुंबांत बाळपणी भाषा शिकलेले लोक एकमेकांशी लिखित संवाद साधू शकतील. प्रादेशिक आणि कौटुंबिक लहेज्यांमुळे संवाद न समजण्याचा धोका टळेल.

> २. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो असल्यास, सांप्रतचे नियम तुम्हांला
> पुरेसे / योग्य / सोयीचे वाटतात का? जर वाटत नसतील, तर का?
पुरेसे आहेत. सोयीचे नसावेत, अशी शंका येते. अन्य पुरेसा नियम-संच ठरवला तर तो कदाचित सोयीचा होऊ शकेल. सोयीचा नाही असे का वाटते - अनेक लोक असे म्हणतात, त्यावरून असे वाटते.

> ३. दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी असेल, तर त्याबद्दल तुमची
> काय भूमिका असते? नियम पाळून नियमांना विरोध करत राहणे
> की नियम धाब्यावर बसवून आपल्याला योग्य वाटेल ते लिहिणे?
> की यापेक्षा निराळं काही?
नियम पाळून मग जे नियमांना विरोध करतात त्यांना सौम्य अनुमोदन देणे.

राजेश घासकडवी यांचे विवेचन मार्मिक वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर भाषांच्या संदर्भातही त्या भाषांच्या वापरकर्त्यांकडून अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी आल्या आहेत, आणि वापरकर्त्यांच्या सोयीकरिता प्रमाणलेखनाचे नियम मूलभूतरीत्या बदलावेत, असे विचार त्या भाषांच्या संदर्भातही यापूर्वी मांडले गेले आहेत, हे लक्षात घेता, मराठीच्या - आपल्या मातृभाषेच्या! - प्रमाणलेखनावर मूलभूत पातळीवरच्या बदलांचे काही अघोरी प्रयोग करण्यापूर्वी, 'पुढच्यास ठेच' या न्यायाने, इतर भाषांच्या बाबतीत अशा विचारांतून काय निष्पन्न झाले (आणि त्यांची अंमलबजावणी झाली का, अथवा न झाल्यास का झाली नाही), याचा अभ्यास करणे रोचक ठरावे.

सुदैवाने, किमानपक्षी इंग्रजीच्या बाबतीत तरी अशा अभ्यासाकरिता पुरेसे मटीरियल उपलब्ध असावे. (तसेही, बहुतांश मराठी विचारवंतांचे प्रेरणास्थान तथा झेप इंग्रजीपुरतीच मर्यादित असावी, अशी [आमची] अटकळ आहे; सबब, केवळ इंग्रजीचे दाखले देऊन बहुधा भागावे. त्याशिवाय, [खालील क्र. १च्या तळटीपेत सूचित केल्याप्रमाणे,] अंदर की बात म्हणजे, आमचीही झेप तितपतच असल्याकारणाने, इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांतील दाखले देण्यास आम्ही असमर्थ आहोत, याबद्दल दिलगिरी प्रदर्शित करू इच्छितो. अर्थात, जे [इंग्रजीव्यतिरिक्त इतर परभाषांचे दाखले देण्यास] समर्थ आहेत, अशा विद्वानांनी ते [दाखले] येथे जरूर मांडावेत. त्यांचे स्वागतच आहे.)

तर इंग्रजीतील एकाच दाखल्याच्या दोन आवृत्ती या निमित्ताने येथे सेवेसि सादर करू इच्छितो.

आवृत्ती १

आवृत्ती २

(अर्थात, इंग्रजीतही 'अमेरिकन स्पेलिंग' नामक स्पेलिंग'सुधारणे'चा माफक प्रकार आहेच. मात्र, तो तितकाही मूलभूत नाही, [आणि अमेरिका आणि अमेरिकन स्फियर ऑफ इन्फ्लुएन्समधील तुरळक बिगर-इंग्रजीभाषक देश यांपलीकडे फारसा प्रचलितही नसावा,] हेही येथे लक्षात घेण्याजोगे आहे.)

सांगण्याचा मुद्दा, बदल हे हळूहळू होतात, माफक प्रमाणात घडवूनही आणता येतात, परंतु मूलभूत बदल मोठ्या प्रमाणावर (आणि अहोरात्र) 'कोणालातरी वाटले म्हणून', ठरवून (फतव्याने) घडवून आणता येत नाहीत.
==============================================================================================================================================================
'आपणावरून दुसर्‍याला ओळखीत जावे.'

समजा समर्थ असतो, तरी येथे किती जणांना ते समजले असते, ही बाब अलाहिदा. मात्र, ज्यांना समजले असते, त्यांना आम्ही अवश्य 'काका' म्हणून संबोधिले असते, हेही येथे आवर्जून नमूद करू इच्छितो.

जनरीत्यर्थ.

इतःपर त्यांचा उल्लेख आम्ही (त्यांस कंटाळा येईपर्यंत) कोणताही लिंगवयादि भेद न करता आदरपूर्वक 'काका' असाच करू, याची ग्वाही देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकर्त्रीने पुढे मांडलेल्या प्रश्नांपैकी 'क्र.१ प्रमाणलेखनाचे असे काही नियम असावेत असं तुम्हांला वाटतं का? का?' ह्याचे उत्तर मी 'नाही' असे देतो आणि त्यामुळे माझ्या लेखी पुढचे प्रश्न उरतच नाहीत.

आता क्र. १ ला मी असे उत्तर का देतो?

दर बारा कोसांवर भाषा बदलते म्हणून एकाच भाषेची प्रमाणभाषेपासून निराळी अशी स्थानिक रूपे असणे ही काही मराठीचीच खासियत नाही. अशिक्षितांची भाषा सुशिक्षितांपासून निराळी असणे हेहि भारतीय आणि भारतबाह्य अशा सर्वच भाषांमध्ये दिसते. असे असूनहि प्रमाणलेखनाचे तथाकथित नियम आणि त्यावरून गेली कित्येक दशके चालू असलेली वादावादी हे मात्र मराठीचेचे वैशिष्टय दिसते.

इंग्रजी भाषा ही आता जगभर वापरली-बोलली जाते. ब्रिटन-अमेरिका-कॅनडा-ऑस्ट्रेलिया-भारत अशा अनेक ठिकाणी तिचे स्थानिक भेद आहेत पण कोणीहि कसलीहि नियमावलि न घालून देताहि प्रमाण इंग्रजी कोणती ह्याबद्दल कोणाच्याहि मनात शंका नाही. सर्वसामान्यांना ज्यांचे कारण कळत नाही असे स्पेलिंगचे नियमहि आहेत पण त्यावरून कसलीच रणधुमाळी होत नाही. Put पुट तर मग Cut कट आणि but बट का? tion sion xion ह्या सर्वांचेच उच्चार सारखे आहेत तर बाकीचे दोन काढून टाकून एकच स्पेलिंग का ठेवत नाही, through आणि thorough ह्यांचे स्पेलिंग जवळजवळ सारखे असूनहि उच्चार इतके निराळे का, cue आणि queue ह्यांचे उच्चार सारखे असूनहि स्पेलिंग इतके निराळे का, rung सारखे tung का नसावे, tongueच का हवे असे प्रश्न कोणी विचारतांना दिसत नाही. सगळेच आपापल्या कुवतीनुसार आणि गरजेनुसार सर्वमान्य प्रमाणभाषा लिहिण्याचा प्रयत्न करतात. कोणास थोडीफार शंका आलीच तर उत्तर द्यायला शब्दकोष इत्यादि साधने आहेतच. 'आम्हास हे अवघड वाटते, ते सोप्पे करून द्या' असा बालबुद्धि हट्ट कोणी करतांना दिसत नाही.

संस्कृतमधून आलेले शब्द मोठया प्रमाणात रोजच्या वापरात असणे हीहि बाब केवळ मराठीत आहे असे नाही. सर्वच भारतीय भाषांमध्ये असे शब्द आहेत आणि त्या त्या भाषांच्या अल्पशिक्षितांना त्यांचे उच्चार संस्कृतमध्ये कसे होतात हे माहीत नसणार. तरीहि हिंदीमध्ये मराठीसारखी त्यावरून हाणामारी होतांना दिसत नाही. संस्कृत शब्द संस्कृतसारखेच लिहिण्याची तेथे पद्धति आहे. आजच्याच दैनिक जागरणमधून उचललेला पुढील अल्प मजकूर पहा:

<वाराणसी काशीविश्वनाथ मंदिर संबंधित बातमी:
बैठक के दौरान ही एक श्रद्धालु महिला ने बाबा विश्वनाथ के नाम दीप न जला पाने की व्यथा अधिकारियों से कही। तय किया गया कि परिसर में इसके लिए स्थान चिह्नित किया जाएगा।
वृंदावन संबंधित बातमी:
भक्ति और इतिहास का जो सदीप्त उदाहरण वृंदावन में देखा गया वह विश्व में कहीं नहीं मिलता। यहां राजपूत, मुगल और षड गोस्वामियों जैसे विपरीत ध्रुवों के समन्वयन संस्कृति, भक्ति और स्थापत्य के उद्भव का आधार सिद्ध हुआ।
.....
उन्होंने वृंदावन में भक्ति और इतिहास के समन्वयन की परंपरा का उद्घाटन करते हुए कहा जब से नवद्वीप से चैतन्य महाप्रभु इस धाम में आए और अपने आराध्य को प्रकट किया। बताया कि यह भूमि हिंदू इस्लामिक शक्तियों के समन्वय का ऐसा केंद्र बिंदु बन गयी जिसकी महत्ता ऐतिहासिक और प्रमाणिकता को भारतीय ऐतिहासिक परिदृश्य ने स्वीकारोक्ति दी।>

येथे श्रद्धालु,चिह्नित,भक्ति,महाप्रभु,भूमि,बिंदु,स्वीकारोक्ति हे सगळे शब्द मूळ संस्कृतसारखेच लिहिले आहेत. आम्हास हे श्रद्धालू, चिन्हित, भक्ती, महाप्रभू, भूमी, बिंदू, स्वीकारोक्ती असे लिहून द्यावेत कारण हे शब्द संस्कृत आहेत हेच आम्हास माहीत नाही अशी कुरकुर कानावर पडत नाही.

हा सर्व चिघळणारा वाद नियम बनविण्याच्या कंडूशमनामधून निर्माण झाला आहे. नियम, त्याला उपनियम, त्याला उपउपनियम ह्या जंजाळाचे हे फलित आहे. त्याला जोड संस्कृत-प्राकृत-ब्राह्मणी व्याकरण-ब्राह्मण-अब्राह्मण-साडेतीन टक्केवाले-तळागाळातले-शहरातले-गावाकडचे असले पदर हेतुपुरःसर लागल्याने हा वाद कधी शमेल असे वाटत नाही.

ह्याला उत्तर एकच - नियमांचे पुस्तक रद्दीत काढा आणि सुशिक्षितांची विचारपूर्वक लिहिलेली भाषा हीच लेखनाची प्रमाणभाषा अशी व्याख्या निर्माण करा. ज्याला जितपत जरूर असेल तितपत तो ती शिकून घेण्याचा प्रयत्न करेलच. एखाद्याला हे कष्ट घ्यायचे नको वाटते म्हणून सर्वच सोपे करावे हे ऐकू नका.

(ह्या सदाहरित वादावर पूर्वी 'उपक्रम'मध्येहि चर्चा झाली होती ती येथे वाचता येईल. नियमावलीपैकी काही विशेष वादग्रस्त नियमांवर मी तेथे लिहिलेले माझ्या पुढच्या प्रतिसादामध्ये पुनःचिकटवीत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

’आम्हांला नियम पाळून प्रमाणभाषा लिहायची आहे. तेवढे ते नियम जरा माणसांतले करायचं पाहा’ या कुरकुरीला जंजाळ म्हणायचं म्हणजे... ’चाललंय ते बरं चाललंय की. सरकार नि पोलीस नि नाही ती नाटकं हवीत कशाला तुम्हांला, माझ्यासारखा कल्याणकारी हुकूमशहा असताना?’ असं म्हणण्यासारखं आहे. ही कुरकुर वरचेवर चालते, म्हणजे लोकांना नियमांशी काहीतरी देणंघेणं आहे. बरंय की मग. लोकांच्या रेट्यानं नियम बदलतील वा लोकरेटा तेवढा नसेल, तर नाहीही बदलायचे. पण नियमांत सुसंगती आणण्याच्या प्रयत्नाला कंडूशमन म्हणून कसं चालेल?

बाकी ’नियमांचे पुस्तक रद्दीत काढा आणि सुशिक्षितांची विचारपूर्वक लिहिलेली भाषा हीच लेखनाची प्रमाणभाषा अशी व्याख्या करा’ हे वाक्य चक्क भाबडं आहे. ’चार सचोटीचे लोक घ्या नि त्यांना भ्रष्टाचार नियामक मंडळावर नेमा, सगळा भ्रष्टाचार दूर होतो की नाही बघा चुटकीसरशी!’ अशी या वाक्याची चाल आहे. सुशिक्षित या शब्दाची व्याख्या निश्चित आहे का? ती समजा केलीच तर त्या समूहातले लोक जे लेखन करतात त्यात एकवाक्यता / सातत्य आहे का? नि लोक निवडक हवे असतील, तर ते नक्की कुठल्या निकषांवर निवडायचे?

राहिला संस्कृतचा मुद्दा. मी शाळेत शिकत असतानाही निदान २५ टक्के विद्यार्थी संस्कृतच्या पुस्तकाचं तोंडही पाहत नसत. आत्ता परिस्थिती बिघडलेलीच असण्याची शक्यता जास्त. मग ज्या समाजातल्या किमान २५ टक्के लोकांना संस्कृतचा गंधही नसणार आहे त्यांना त्यांचीच मातृभाषा लिहिताना सारखं ’हा शब्द तत्सम असेल की तद्भव’ असं गोड कोडं घालणं सुज्ञपणाचं आहे का? अशानं कोण मरायला नियम पाळायला तयार होईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

’मराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था’ हा लेख वाचला. तेथील दुवा वापरून शुद्धलेखनाचे नियमहि पाहिले. अन्य जागीहि ते आधीच पाहिलेले होते.

लेख वाचताच जाणवले की लेखाचे शीर्षक अन्वर्थक नाही. संपूर्ण लेखातील विवेचन हे मराठी साहित्य महामंडळाने निर्माण केलेल्या आणि राज्यशासनपुरस्कृत अशा १८ शुद्धलेखनाच्या नियमांपैकी काही वादग्रस्त नियमांविषयी आहे आणि ह्या वादग्रस्त नियमांमध्ये ’तत्सम’ (संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे मराठीत आलेले) असे ज्यांना म्हटले जाते त्या शब्दांसाठी केलेल्या विशेष नियमांमुळे हे ’चातुर्वर्ण्य’ निर्माण झाले आहे असा लेखाचा रोख आहे. तदनुसार ’मराठी भाषेच्या शासनपुरस्कृत शुद्धलेखनातील चातुर्वर्ण्य व्यवस्था’ हे शीर्षक अधिक अर्थपूर्ण झाले असते.

तद्भव, देशी आणि परभाषी शब्दांना जे नियम घालून देण्यात आले आहेत ते तत्सम शब्दांना लावण्यात आलेले नाहीत, त्यांच्यासाठी संस्कृतच्या अंगाने जाणारे वेगळे नियम करण्यात आलेले आहेत आणि ह्यामुळे ’चातुर्वर्ण्य’ निर्माण झाले आहे असा ह्या लेखाचा मथितार्थ मला दिसतो.

लेखकाने तसे कोठेहि म्हटलेले नाही पण ’तत्सम शब्दांना एक ’ब्राह्मण’ वागणूक आणि अन्य तीन जातींच्या शब्दांना अन्य वागणूक असे का’ अशा भाषेत मी लेखकाने वापरलेल्या ’चातुर्वर्ण्य’ ह्या शब्दाचा अर्थ लावू शकतो. ’चातुर्वर्ण्य’ हा loaded शब्द लेखकानेच वापरल्यामुळे मला असे म्हणायचे स्वातन्त्र्य मिळाले आहे.

लेखकाच्या मते तत्सम शब्दांना ही ’ब्राह्मण’ वागणूक मुख्यत्वेकरून नियम ५.१ ते ५.६ ह्यांमधून दिसून येते. ५.१ आणि ५.३ प्रमाणे सर्वच इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द (तत्सम आणि अन्य तीन जातींचे) दीर्घ ई आणि दीर्घ ऊ ह्यांनी दाखवावेत. जसे ’कवी, बुद्धी, गती, हरी, मनुस्मृती, पद्धती, कुलगुरू आणि अर्थातच पट्टी (तद्भव) गाडी (देशी), जबरी (परभाषिक). (ह्याला अपवाद म्हणजे ’परंतु, यथामति’ अशाप्रकारची तत्सम अव्यये - ५.२.) हे एकदा घालून दिल्यानंतर ५.५ आणि ५.६ ला लेखकाचा आक्षेप आहे. ५.५ प्रमाणे बुद्धी पण बुद्धिवैभव, विद्यार्थी पण विद्यार्थिमंडळ असे का? हेहि बुद्धीवैभव, विद्यार्थीमंडळ असे का नाही?

लेखकाच्या मते तत्सम शब्दांना दिलेली ही ’ब्राह्मण’ वागणूक अन्य जागीहि दिसते. उदा. नियम ६. येथे अन्य तीन जातींसाठी नियम आहे शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपान्त्य इ अथवा उ ह्रस्वच लिहावा. जसे किडा, विळी इत्यादि. पण तत्सम शब्दांना ह्यातून वगळले आहे जसे गीता (गिता नाही), पूजा (पुजा नाही). हा भेदभाव का? (येथे माझे अवान्तर: शुद्धलेखनाचे नियम निर्माण करतांनाच येथे शुद्धलेखनाचा खून पाडला आहे. ’ह्रस्व’ हा तत्सम शब्द ’र्‍हस्व’ अशा चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे. नियमाचे चित्र पहा. येथे ह्रस्व-दीर्घाचा काहीच प्रश्न नाही, शब्द सरळसरळ संस्कृत आहे. तो तसाच का लिहिलेला नाही? अवान्तर संपले.)

ह्याच्या पुढचे चातुर्वर्ण्य नियम ७.२ मध्ये दिसते. अनुस्वार विसर्ग आणि जोडाक्षर ह्यांपूर्वीचे इकार आणि उकार ह्रस्व लिहावेत हा नियम अन्य जातींवर लादण्यात आला आहे (जसे चिंच, डाळिंब) पण तत्सम ’ब्राह्मणांना’ त्यातून वगळण्यात आले आहे (जसे नावीन्य़, पूज्य, शून्य - नाविन्य, पुज्य, शुन्य नाही.)

चातुर्वर्ण्याचे अखेरचे उदाहरण म्हणजे नियम ८.१. ह्यानुसार उपान्त्यी दीर्घ ई अथवा ऊ असलेल्या अन्य जातींच्या शब्दांचा दीर्घ ई-कार वा दीर्घ ऊ-कार सामान्यरूपांमध्ये ह्रस्व होतो, जसे गरीब पण गरिबाला, मूत पण मुताला, फूल पण फुलाला. गरीब हा शब्द परभाषिक तर मूत आणि फूल हे तद्भव आहेत. अर्थात् दोघेहि अब्राह्मण. पण ’ब्राह्मण’ असलेले शब्द, उदा. दूत दूताला, परीक्षा परीक्षेला, ह्या नियमापासून मुक्त आहेत.

मला असे दिसते की नियम ६, ७ आणि ८ मध्ये दिसणारी ’भिन्न’ वागणूक केवळ अनावश्यक नियम निर्माण केल्यामुळे भासमान होत आहे. नियम ६ मध्ये ’किडा’ हा शब्द ’किडा’ असाच लिहावा हा जावईनियम उगीचच उत्पन्न केला आहे. मुळात ’किडा’ हा शब्द उच्चारानुसार ’किडा’ असाच लिहू जाऊ शकत असल्याने उच्चारानुसारित्व हा default नियमच त्याला पुरेसा आहे. तरीहि त्यासाठी खाजवून खरूज काढल्यासारखा नियम ६ निर्माण केला आहे आणि मग त्यातून तत्सम ब्राह्मणांचा सवतासुभा वेगळा निर्माण केल्यासारखे भासत आहे. तोच उच्चारानुसारित्वाचा default नियम ७ आणि ८ साठी लक्षात ठेवला असता तर ’चींच’, ’डाळींब’ ’गरीबाला’ असे लिहू नका असे सांगण्यासाठी नियम निर्माण करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. (Do not fix it if it is not broken! हे तत्त्व ध्यानात ठेवायला हवे होते.)

आता प्रश्न राहिला नियम ५ चा. मला स्वत:ला हे कळत नाही की थोडा प्रयत्न केल्यावर मति (मती नाही), कवि (कवी नाही) कुलगुरु (कुलगुरू नाही) हे लक्षात ठेवणे अवघड का वाटावे? उच्चारानुसारित्वानुसार मति, कवि, कुलगुरु हे शब्द आपओआपच तसे लिहिले जातात आणि हे उच्चार प्रयत्नसाध्य आहेत. ज्यांना हे उच्चार अवघड वाटतात त्यांना ’थोडा बुद्धीला अजून ताण द्या’ असे सांगण्याऐवजी ज्यांना हे सहजसाध्य वाटते त्यांनाहि ’कवि नाही, कवी’ असे unlearning का करायला सांगितले जात आहे?

मला असे दिसते की ’ब्राह्मण’ आणि ’अन्य जातीचे’ अशा सर्वांना लागू पडेल असे शुद्धलेखन निर्माण करण्याचा हा प्रयत्न ’गाढवहि गेलं आणि ब्रह्मचर्यहि गेलं’ असा फसला आहे. तत्सम शब्द हे तत्समच राहणार आणि त्या मार्गानेच त्यांचे लिखाण झाले पाहिजे असा सोपा नियम केला असता आणि लोकानुरंजनाचा मार्ग टाळला असता तर जातिभेदाचे हे पातक घडले नसते.

शिक्षण हे प्रयत्नानेच घ्यावे लागते असे ठामपणे म्हणायला आपण कधी सुरू करणार? शिक्षण हे ’ब्राह्मण’च असते आणि प्रयत्न करणार्‍याला ते प्राप्त करणे अवघड नसते असे का नाही आपण म्हणू शकत? सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम्?

मी येथे मांडलेल्यापैकी काही विचार अधिक विस्ताराने दिवाकर मोहोनींच्या ’भाषा आणि जीवन’च्या हिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ह्या लेखात वाचायला मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. प्रमाणलेखनाचे असे काही नियम असावेत असं तुम्हांला वाटतं का? का?

होय. कारणे धनंजयशी सहमत

२. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो असल्यास, सांप्रतचे नियम तुम्हांला पुरेसे / योग्य / सोयीचे वाटतात का? जर वाटत नसतील, तर का?

मला ते आवश्यक वाटत असले तरी माझ्याकडून ते पाळले जात नाहीत (- कंटाळा म्हणा, त्याची तितकी गरज भासत नाही म्हणा). ते अपुरे आहेत, अयोग्य आहेत किंवा गैरसोयीचे आहेत यावर टिपणी करण्याइतके जाणीवपूर्वक नियमांचे पालनच मी करत नाहीत. पण तरीही अगदीच 'अप्रमाण' लेखन असल्यास त्रास होतो हे खरे.

३. दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी असेल, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असते? नियम पाळून नियमांना विरोध करत राहणे की नियम धाब्यावर बसवून आपल्याला योग्य वाटेल ते लिहिणे? की यापेक्षा निराळं काही?

यात दोन गोष्टी आहेतः
१. "हा हा नियम कसा अयोग्य आहे मी तो अजिबात पाळणार नाही" किंवा "छ्या! आले मोठे नियम करणारे, मी कशाला पाळू" वगैरे 'बंडखोर' भाव याबाबतीत मी सर्वसाधारणपणे ठेवत नाही. मात्र मुळातच लेखनाच्या नियमांविषयी अत्यंत निरिच्छ वृत्ती असल्याने कसं लिहिलंय यापेक्षा काय लिहिलंय याकडे अधिक बघायचा प्रयत्न केला जातो. एका बेसिक लेव्हलपर्यंत नियमांत बसणार लेखन असल्यास, लहान-सहान चुकांनी दातात सुपारी अडकल्याचे वगैरे फिलिंग अजिबात येत नाही.

२. दुसरे असे की, नियम पाळणारा हा नियम पाळू न शकणार्‍यांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे किंबहुना कसा अधिक बुद्धिवंत आहे, असाच सूर/ आढ्यता/ अहंगंड कुरवाळणारे बघतच लहानाचा मोठा झालो आहे. मात्र, प्रत्यक्षात बुद्धी/शहाणपणा आणि हे लेखानाचे नियम पाळणे यांच्यात मला कोणताही अन्योन्य संबंध दिसलेला नाही. तेव्हा त्या दृष्टीकोनातून मात्र काहिसा बंडखोरपण माझ्या अंगी आहे व "केवळ" नियम पाळणारे लेखन केल्याने जर कोणी स्वतःला शहाणा/बुद्धीवंत समजत असेल तर मी त्यावेळी लेखनाचे नियम पाळण्याचा हट्ट करणार्‍यांना विरोधासाठी विरोधही केल्याचे आठवते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नियम असावेत की नाही हे राज्य कुणाचं आहे, त्यावर टह्रतं.
किंवा माझ्या सोयीनं मी भूमिका घेइन.
(माझे शुद्धलेखन बरे असल्यास इतर स्पर्धकांपेक्षा दोन्-चार गुण बोर्डात जास्त मिळणार असतील तर मी ते करीन.)
.
एखादा कट्टा "भो**त घाला शुद्धलेखनाचे नियम" असे म्हणत ग्राम्य किंवा जरा राउडी वागत असेल, तर मी त्यांच्यातल्याच होण्याचा प्रयत्न करेन.
कार्ण शुद्धलेखन माझ्यासाठी फारच गौण मुद्दा आहे.
मी त्याबद्दल मझी टोपी माझ्या सोयीनं फिरवेन.
(हेच मी इतर महत्वाच्या मुद्द्यांवर करणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे."

पोएटिक लिबर्टी की पाडगां/गावकरांना शुद्धलेखन येत नसावे? Wink

आणि मग पोएटिक लिबर्टी तरी का असावी? :-B

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मग पोएटिक लिबर्टी तरी का असावी?

कवितेला मिटरात घट्ट बशिवण्यासाठी Wink

संस्कृतात अशी लिबर्टी (बहुधा) नसल्यानेच समानार्थी शब्दांची जंत्री निर्माण केली गेली, असा माझा कयास आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> ३. दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी असेल, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असते? नियम पाळून नियमांना विरोध करत राहणे की नियम धाब्यावर बसवून आपल्याला योग्य वाटेल ते लिहिणे? की यापेक्षा निराळं काही? <<

सध्याचे नियम जाचक आहेत हे मान्य. ते बदलावेत. ते बदलत नाहीत तोवर मी शक्य तितके नियम पाळतो.
'नियमबद्ध प्रमाण भाषाच नको; लोकांनी वाटेल तसं लिहावं' हे मला अज्ञानमूलक वाटतं. जगातल्या भाषांच्या माझ्या मर्यादित ज्ञानात अशा प्रवृत्तीचा पुरस्कार कोणत्या भाषेत पाहिलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरा संतापजनक भाग हा की, हे नियम पाळता येण्याकरता तुम्हांला फक्त मराठी भाषा नि हे नियम अवगत असणं पुरेसं नाही; तर संस्कृतही ठाऊक असणं क्रमप्राप्त आहे.

शुद्धलेखनाचे राहो, परंतु व्याकरणाच्या बाबतीतही, इंग्रजीतील ल्याटिनोद्भव शब्दांच्या अनेकवचनांबद्दल ही ओरड सनातन आहे. (अमेरिकन इंग्रजीने हा प्रश्न ल्याटिनोद्भव शब्दांची अनेकवचनेसुद्धा इंग्रजीप्रमाणेच करून सोडविला आहे, परंतु त्यास अमेरिकन इंग्रजीच्या प्रभावक्षेत्राबाहेर फारशी मान्यता नसावी. तर ते एक असो.)

या संदर्भात पुढील विनोद वाचनात आलेला आहे:

It is reported that one Cambridge mathematician wrote to another suggesting they should meet to discuss "some conundra about pendula".

The other replied: "Surely we have better ways to spend a Sunday afternoon than sitting on our ba doing sa."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>(अमेरिकन इंग्रजीने हा प्रश्न ल्याटिनोद्भव शब्दांची अनेकवचनेसुद्धा इंग्रजीप्रमाणेच करून सोडविला आहे, परंतु त्यास अमेरिकन इंग्रजीच्या प्रभावक्षेत्राबाहेर फारशी मान्यता नसावी. तर ते एक असो.)

अमेरिकन इंग्रजीच्या (पक्षी मायक्रोसॉफ्टच्या) प्रभावक्षेत्राबाहेर कितीसा प्रदेश असेल?

अर्थात आपल्याला पाहिजे ती उदा. इंग्लिश (यू के) भाषा निवडण्याची सोय असते. पण कोण तसदी घेतो? [फॉण्ट*च्या यादीत अकारविल्हे एरिअल हा फॉण्ट सर्वात आधी येई म्हणून बहुतांश डॉक्युमेंटे या फॉण्टात लिहिलेली असतात/असत].

* फॉण्ट हे ही अमेरिकनच रूप फाउंट या (राणीच्या इंग्रजीतल्या) शब्दाचं

तो जोक कळला नाही. sa आणि ba ही कशाची बहुवचने आहेत हे शोधून साओअडले नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तो जोक कळला नाही. sa आणि ba ही कशाची बहुवचने आहेत हे शोधून साओअडले नाही. Sad

हिंटः

'conundra' आणि 'pendula' ही नेमकी कशाची अनेकवचने आहेत?

मग तोच नियम, 'ba' आणि 'sa' ही ल्याटिनोद्भव शब्दांची अनेकवचने आहेत, अशी कल्पना करून, उलटा लावून पाहा ना!

(आणखी एक हिंट: नियम ल्याटिनोद्भव नसलेल्या शब्दांना जबरदस्तीने लावलेला आहे.)

(विनोद [आता तरी] कळला असल्यास कृपया हात वर करा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन इंग्रजीच्या (पक्षी मायक्रोसॉफ्टच्या) प्रभावक्षेत्राबाहेर कितीसा प्रदेश असेल?

संगणकीय संबंध वगळता अन्यथा व्यवहारात जेथे म्हणून इंग्रजी वापरण्याची वेळ येते, तेथे (अमेरिकेबाहेर) कितीशा ठिकाणी अमेरिकन इंग्रजी वापरली जात असावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे कितीतरी वेगवेगळे, र्‍हस्वदीर्घाच्या रूढ चौकटीपलीकडचे, महत्त्वाचे मुद्दे आले आहेत. त्यांचं खंडनमंडन सवडीनं होत राहील. (नाहीतरी इथे जमून वादंगाखेरीज आपण दुसरं करतो काय? ;-)) पण वादांपेक्षाही कळीचा वाटणारा मुद्दा आधी लिहिते.

प्रमाणभाषा नि प्रमाणलेखन हवंच कशाला, असं आपण म्हणत असू तर त्याआधी थोडा विचार करायला हवा. प्रमाणभाषा सर्वाधिक नीरस, मृतप्रायतेच्या जवळची, बोलींइतका गोडवा नसलेली भाषा असते; नवनवीन शब्दांकरता तिला सतत बोलींकडेच वळावं लागतं; कुठलीही एक बोली प्रमाण करताना आपण इतर अनेक समाजगटांवर काहीएक अन्याय करत असतो; प्रमाणभाषेला कित्येकदा बोलींपेक्षा वरचा सामाजिक दर्जा दिला जातो आणि बोली बोलणार्‍यांची अवहेलना केली जाते; हे आरोप मान्य करूनही प्रमाणभाषेचं महत्त्व कमी कसं लेखता येईल? मला इथे प्रमाणभाषेची तुलना एखाद्या वृद्ध नदीशी (या संकल्पनेकरता आभार: अश्विनच्या मौजेतल्या लेखाचे) करायचा मोह होतो आहे. नदीच्या वयाचे तीन टप्पे मानले जातात. नुकतीच उगम पावलेली, प्रवाहाला धार असलेली तरुण नदी; एखाद-दुसर्‍या उपनदीला रिचवून विस्तृत, समृद्ध पात्रातून काहीशा संथपणे वाहू लागलेली प्रौढ नदी; आणि आपणच वाहून आणलेला गाळ ओलांडण्याची ताकद नसलेली नि त्यामुळे अनेक वळणं घेत, सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण करत, पात्र विस्तारत अतिसंथ होत चाललेली वृद्ध नदी. प्रमाणभाषा या वृद्ध नदीसारखीच भासते. तिला ताकद नि विस्तार पुरवत, तिच्यात अनेक बोली विलीन झालेल्या असतात नि परिणामी ही भाषा तितकी जोरकस, जिवंत उरलेली नसते. पण तेच तिचं बलस्थान नाही का? सर्वदूर पसरलेल्या, निरनिराळा भूगोल आणि संस्कृती असलेल्या अनेक लोकसमूहांमधला ती दुवा असते. अनेक पारिभाषिक आणि सर्वसामान्य कोशांचं लेखन प्रमाणभाषेत केलं जातं. उच्चशिक्षण आणि शासनव्यवहार प्रमाणभाषेत चालतो. एखाद्या संस्कृतीचा भाषिक व्यवहार परिपक्व झाल्याचं द्योतक म्हणजे प्रमाणभाषा असते. ती जितकी जिवंत, अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणारी, समृद्ध असेल - तितका एखाद्या संस्कृतीचा भाषाव्यवहार जिवंत.

बोलींना लेखनाच्या नियमांत बांधणं जितकं कठीण आणि प्रसंगी अनावश्यकही, तितकंच प्रमाणभाषेला लेखनाचे सुसंगत नि पुरेसे नियम असणं नैसर्गिक. कारण बोली बोलण्यातून जन्म घेतात, वाढतात. प्रमाणभाषा मात्र भाषिक व्यवहाराच्या अशा टप्प्यावर जन्म घेते, जिथे लेखन हे तिच्या आविष्काराचं एक अत्यावश्यक आणि अपरिहार्य अंग असतं.

हां, हे नियम काय, किती, कसे असावेत - याबद्दल वादंग संभवतात. ते व्हावेतच. पण लेखनाचे नियमच नकोत, हे मात्र मला पटण्याच्या पलीकडचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'लेखनाचे नियमच नकोत' हे आम्ही कोठल्या अर्थाने म्हणत आहोत?

१,२,३... असे नियम घातले की त्याविरुद्ध कोठून ना कोठूनतरी बंडाचा झेंडा उभारला जाणारच. करण सर्वांना स्वयंस्फूर्तीने मान्य वाटतील असे नियम मिळणे अवघड आहे - विशेषेकरून जेव्हा त्याला संस्कृत-प्राकृत-ब्राह्मणी व्याकरण-ब्राह्मण-अब्राह्मण-साडेतीन टक्केवाले-तळागाळातले-शहरातले-गावाकडचे असले पदर हेतुपुरःसर लागतात.

आणि इंग्रजी पासून हिंदीपर्यंतच्या कोठल्या भाषेत असे घालून दिलेले 'नियम' दिसतात, जे तुम्हाला मराठी 'नियमां'साठी blue print सारखे वापरता येतील? त्या भाषा जर 'नियमा'शिवाय जगू शकतात तर मराठी का नाही? मराठीलाच कशासाठी हवेत नियम?

उलट मी म्हणेन 'नियम' घालून देऊ नका आणि शिकणार्‍याला सांगा, 'बाबारे, तुला जर अडाणी असा शिक्का आपल्यावर न बसावा असे खरोखर वाटत असेल तर वाचन वाढव, आसपासचे शिक्षित लोक कसे बोलतात-लिहितात ते निरीक्षणाने शीक, तू आपोआप सुधारशील आणि शिक्षित गणला जाशील. तुला किती प्रगति करायची आहे आणि कोठे जायचे आहे हे ठरविणे तुझ्याच हातात आहे.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर्मनमधे आहेत नियम. पण तशी ब्लू प्रिंट कशाला हवी? बाकी कुठल्या भाषेला नकोही असतील नियम. मराठीला आहेत, हवेत. इतकं पुरेसं नाही का?

अजून विचारान्ती:

अमुक एका शब्दाचं स्पेलिंग अमुक हे आहे, हे जे काही इंग्रजीत प्रमाण गणलं जातं; ते नियम नाहीतर दुसरं काय आहे? हिंदीत 'मै' (विना अनुस्वार) लिहिलं तर चूक गणतात, 'मैं' (अनुस्वारासह) लिहिलं तर अर्धा मार्क कापत नाहीत; याला नियम नाहीतर काय म्हणायचं? जर्मनमधे उच्चार आणि लेखन यांच्यात एकवाक्यता आहे, किंबहुना योग्य उच्चार जाणून घेतलात तर योग्य लेखन काय ते तुम्हांला कळेलच अशी व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला नियम नाही म्हणायचं? प्रमाणभाषा लेखनाच्या नियमांशिवाय चालेल कशी? प्रदेश/संस्कृती/पिढ्यांतलं अंतर यांतही न बदलणारा दुवा हे तिचं जे स्थान आहे, त्यालाच धक्का नाही का लागायचा?

दुसरं असं -

शिक्षणानं आणि निरीक्षणानं प्रमाणभाषा कशी लिहायची हे अवगत होण्याचा काहीच मार्ग तूर्तास नाही. पाठ्यपुस्तकांतून / माध्यमांतून / पुस्तकांतून सध्याच्या नियमांना वार्‍यावर सोडून केलेल्या, प्रमाणलेखनाच्या अनंत चुका आणि विसंगती सापडतात. शाळेत प्रमाणलेखनाचे नियम कधीही शिकवले जात नाहीत. बरं, त्या चुकांकरता मार्क कापायची व्यवस्था भाषेच्या परीक्षेत असते, म्हणजे नियमानुसार लेखन करणं आदर्श असं आपल्याकडे अजून तरी मानतात (नशीब!). मग हे अदृश्य नियम, अगदी एकलव्याचा बाप जरी झाला तरी त्यानं, आत्मसात करायचे कसे? समजा, मी संस्कृतशी कधीही संबंध न आलेली एक आफ्रिकन व्यक्ती आहे आणि मला मराठी शिकायची आहे. तर मी अचूक मराठी कसं लिहायचं, हे जाणून घेण्याकरता फक्त निरीक्षण करत राहायचं? आणि त्यातही एकवाक्यता दिसत नाही म्हटल्यावर बहुतांश लोक काय लिहितात याचं प्रमाण तपासत राहायचं? हा अजब युक्तिवाद आहे.

अजून महत्त्वाचं -
प्रमाणलेखनाचे नियम अवगत झाले, म्हणजे माणूस शिक्षित झाला असं मी अजिबात मानत नाही. शिक्षित माणसानं अचूक प्रमाणलेखन करावं अशी अपेक्षा असते, कारण तो प्रमाणभाषेत शिकलेला असतो आणि त्याच्या बोलीचा पैस सोडून इतरत्रही आपले विचार लिहून व्यक्त करणं त्या माणसाला जमावं हे शिक्षणात गृहीत असतं. तो शिक्षणाचा आनुषंगिक फायदा असतो. त्यापलीकडे नियम पाळून लिहिल्यानं तो अधिक ज्ञानी/सुसंस्कृत/उच्च पातळीवरचा झाला, असं माझं अजिबात म्हणणं नाही. प्रमाणभाषा कितीही महत्त्वाची असली, तरी ती मुळात अनेक लोकांच्या सोयीचं माध्यम म्हणून तयार झालेली एक सोय आहे, ज्ञानाचं सार्वत्रिक माध्यम आहे - प्रत्यक्ष ज्ञान नाही (medium of knowledge, not the knowledge itself) याचं मला पक्कं भान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रतिसाद आवडला.
नियम वापरात असावेत, लोकांनी त्यानुसार लिहावे, पण ते नियम कोठे लिहून काढू नयेत हा आग्रह माझ्या आकलनापलीकडचा आहे. हिंदीसाठीचे प्रमाणलेखनाचे नियम इथे सापडले. त्याशिवाय आजच्या घडीला आजूबाजूला किती सुशिक्षित लोक मराठी लिहिताना भक्ति, प्रगति, हि अशाप्रकारे लिहिताना दिसतात? प्रमाणलेखन हे सुशिक्षितांच्या लेखनाचे निरीक्षण करून ठरवले जावे असा आग्रह आणि तरीही आज सुशिक्षित लोक ज्याप्रकारे लिहीत नाहीत त्याप्रकारे लिहिणे ह्यात तर्कविसंगती नाही का?

मूळ लेखाबद्दलः
मराठीतील प्रमाणलेखनाचे काही नियम जाचक वाटतात ह्याच्याशी सहमत. पण सगळे तत्सम शब्द तद्भवांसारखे लिहावेत असे मला वाटत नाही. पण 'कवि'चा 'कवी' करताना कविकल्पना तसाच ठेवण्याचे मला फार कारण दिसत नाही. उच्चाराच्या दृष्टीनेही पाहिले, तर मी सहज बोलताना सुट्टा कवी म्हणताना दीर्घ 'वी' आणि कविकल्पना म्हणताना ऱ्हस्व 'वि' असा फरक माझ्याकडून तरी फारसा होत नाही.
तरीही भौगोलिक, मार्मिक वगैरे भौगोलीक, मार्मीक व्हावेत असे मला वाटत नाही. त्यापेक्षा इक प्रत्यय अशा प्रकारे लागतो हे लक्षात ठेवणे मला सोपे वाटते.

'ऋ'बद्दलः
'ऋ'च्या उच्चाराची जागा इतिहासात काळानुसार बदलत गेल्याचे धनंजय यांच्या एका पॉडकास्टमध्ये ऐकल्याचे स्मरते. 'ऋ' हा कायम मूर्धन्य नव्हता. तृण म्हणताना मी मूर्धन्य ऋ उच्चारू शकत नाही. मला वाटते की तिथे तो तसा उच्चारता येणे शक्य नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋ'च्या उच्चाराची जागा इतिहासात काळानुसार बदलत गेल्याचे धनंजय यांच्या एका पॉडकास्टमध्ये ऐकल्याचे स्मरते. 'ऋ' हा कायम मूर्धन्य नव्हता. तृण म्हणताना मी मूर्धन्य ऋ उच्चारू शकत नाही. मला वाटते की तिथे तो तसा उच्चारता येणे शक्य नसावे.

कुठले पॉडकास्ट? जमल्यास कृपया मलाही पाठवणे. ऋ कायम मूर्धन्य नव्हता म्हणजे कधी मूर्धन्य नव्हता? वेदकाळात नसला तर पाणिनीने तरी त्याला मूर्धन्यच म्हटले आहे ना. की कात्यायन-पतंजली वैग्रेंनी दुसरं काही केलंय? कारण पाणिनीला इतक्या बेशिक मुद्द्यात कुणी विरोध केला असेलसे वाटत नै. विरोध केला असेल तर रोचक आहे.

तृण म्हणताना मूर्धन्य उच्चारल्यास त्रास होतो यात वाद नाहीच. पण अशक्य वाटत नाही. आणि अजून एक मुद्दा म्हणजे काही वृत्तांतले श्लोक म्हणताना ऋ येतो तिथे वृत्तानुसार पाहिले त्याच्या आधीचा वर्ण र्‍हस्व असणे अपेक्षित आहे, पण जर तसा मूर्धन्येतर उच्चार केला तर ते आधीच्या वर्णाला आघाताने गुरुत्व देणारं सरळ जोडाक्षर होतं. त्यामुळे हा विरोधाभास पाहता मूर्धन्य उच्चारच बरोबर असावा असे वाटते, चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सरजी. ऐकतो लौकरच अन प्रश्न विचारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरं तर शुद्धलेखन , प्रमाणभाषेच्या चर्चेला एक अभिजन-बहुजन वादाची सुद्धा किनार आहे.
"ती फुलराणी" मध्ये पु लं नी तो मस्त मांडलाय काही ठिकाणी.
अर्थात, "ती फुलराणी " शॉ च्या मूळ कलाकृतीवर आधारित असल्यानं तिथं शॉ च्या देशात, इंग्लंडातही असा काही सांस्कृतिक झगडा असावा असं वाटतं.
कुणी मुळातून शॉ वाचलाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Upstairs Downstairs, Downton Abbey सारखे period pieces पहा. ते बहुतांशी यूट्यूबवरहि उपलब्ध आहेत. जुन्या ब्रिटनमधली अभिजन आणि अन्य ह्यांना एकमेकांपासून दूर ठेवणारी caste system - British style तेथे चांगली पाहायला मिळेल.

(उत्तम करमणूकहि होते. They are quite addictive!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरी जाउन पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

क्ष, ज्ञ (आणि प्र, क्र, त्र, इत्यादी) जोडाक्षरं असतील तर जोडाक्षर म्हणजे काय असा प्रश्न पडला आहे. ख, घ, झ, ठ, फ या अक्षरांचे उच्चार अनुक्रमे क, ग, ट, प या अक्षरांमधे ह मिसळून केल्यासारखे कळतात. पण ही मुळाक्षरं मानली आहेत. सुरूवातीला उल्लेख केलेली अक्षरं एकच syllable असल्यासारखी लिहीली जातात, मग जोडाक्षराची वागणूक का मिळते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यावर बॅट्या किंवा धनंजय अजून विस्तारानं आणि न्याय देऊन लिहू शकतील.

पण माझ्या मते या प्रश्नाला काहीच अर्थ नाही. मराठीत 'क', 'क'ला काना, 'क'ला मात्रा, वेलांटी... मग 'ख', 'ख'ला मात्रा.. अशी सुटसुटीत व्यवस्था आहे. जपानीत 'का'साठी वेगळं चिन्ह, 'कि'साठी वेगळं चिन्ह, 'के'साठी वेगळं चिन्ह, 'को'साठी वेगळं चिन्ह, 'कु'साठी वेगळं चिन्ह... असा अडाण्याचा कारभार आहे. (हे सापेक्ष आहे, मला मान्य आहे). म्हणजे क हे मुळाक्षर नाही, तर का, कि, कु, के, को ही सगळी मुळाक्षरं.

असं का? तर असं आहे म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण माझ्या मते या प्रश्नाला काहीच अर्थ नाही.
.............मला वाटते की मराठी मुळाक्षरांबद्दल तसे विचारण्यात अर्थ आहे. जपानीबद्दल विचारण्याने हशील नाही, कारण तेथे तर्कसंगती स्पष्ट आहे.
---

क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म

पहिली उभी ओळ घ्या- 'कचटतप'. त्यात उचारी 'ह' मिसळला की पुढेची उभी ओळ मिळते - 'खछठथफ'
तिसरी उभी ओळ घ्या - 'गजडदब'. त्यात उचारी 'ह' मिसळला की पुढेची उभी ओळ मिळते - 'घझढधभ'
त्या नंतर येणार्‍या 'यरलवशषसहळ' ह्यांत ह मिसळल्यास ह्य 'र्‍ह ल्ह व्ह श+ह ष+ह स+ह ह्ह ळ्ह' अशी जोडाक्षरे मिळतात. मात्र ती मुळाक्षरे म्हणून वापरली जात नाहीत.
(श+ह, ष+ह, स+ह ही जोडाक्षरे असलेले शब्द अस्तित्वात आहेत का ?)
पहिली आडवी ओळ घ्या - सगळे उच्चार कंठ्य. त्याच न्यायाने इतर आडव्या ओळींतील अक्षरे उच्चाराचे वेगवेगळे उगम दर्शवितात.
पाचवी उभी ओळ च्या - ही सारी अनुनासिके त्या त्या आडव्या ओळीतील अक्षरांपूर्वी वापरायची अनुनासिके आहेत.

थोडक्यात, काही विशिष्ट तर्कसंगतीने मुळाक्षरांच्या तक्त्याची योजना केल्याचे दिसते.

आता, क्ष चा उच्चार जर 'क्+श' की 'क्+ष' ह्यांपेक्षा वेगळा असेल (नक्की उच्चार काय आहे ?) तर त्यासाठी स्वतंत्र चिन्ह निर्माण करणे व ते मुळाक्षरांत गणणे योग्य वाटते. जर तसे नसेल, तर निव्वळ छपाईच्या (वा इतर कुठल्या) सोयीसाठी क्ष, ज्ञ हे नंतर घुसवले गेले असू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य अाहे. मग? मुद्दा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुद्दा इतकाच की प्रश्न निरर्थक नाही. उत्तरातून काही नवा विचार वा जुनाच पण न उलगडलेला विचार मिळू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय की. अक्षरांचा विचार कधी केला नाही खरा. प्रमाणलेखनाच्या संदर्भात या मुद्द्याचं प्रयोजन माझ्या अजुनी लक्षात येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रमाणलेखनाच्या संदर्भात या मुद्द्याचं प्रयोजन माझ्या अजुनी लक्षात येत नाही.

फारसे नसावे. पण त्या अनुषंगाने / ओघात आलेला अवांतर मुद्दा (/ obiter dictum?) म्हणून दाखल करायला प्रश्न अपात्र नसावा कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानीबद्दल विचारण्याने हशील नाही, कारण तेथे तर्कसंगती स्पष्ट आहे.

?

म्हणण्याचा रोख लक्षात आला नाही. कृपया सविस्तर विशद करू शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला स्वत:ला जपानीचे ज्ञान/माहिती नाही. त्यामुळे, मेघना यांच्या म्हणण्यानुसार जर प्रत्येक काना, मात्रा वेलांटीवाल्या अक्षरांसाठी जपानी भाषेत वेगवेगळी चिन्हे असतील, तर 'प्रत्येक उच्चारासाठी वेगळे चिन्ह असणे' ही जपानी लिपीतली तर्कसंगती झाली, इतकेच मला म्हणायचे होते.

आता तुमच्या ह्या प्रतिसादामुळे माहितीत नवी भर पडली. त्यानुसार जपानीतली तर्कसंगती देवनागरीपेक्षा वेगळी आहे, इतकेच म्हणू शकतो आणि मला आधीही तेच म्हणायचे होते.

जपानीतल्या माहितीबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघना यांच्या म्हणण्यानुसार जर प्रत्येक काना, मात्रा वेलांटीवाल्या अक्षरांसाठी जपानी भाषेत वेगवेगळी चिन्हे असतील, तर 'प्रत्येक उच्चारासाठी वेगळे चिन्ह असणे' ही जपानी लिपीतली तर्कसंगती झाली, इतकेच मला म्हणायचे होते.

ठीक. आता आले लक्षात.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत 'क', 'क'ला काना, 'क'ला मात्रा, वेलांटी... मग 'ख', 'ख'ला मात्रा.. अशी सुटसुटीत व्यवस्था आहे. जपानीत 'का'साठी वेगळं चिन्ह, 'कि'साठी वेगळं चिन्ह, 'के'साठी वेगळं चिन्ह, 'को'साठी वेगळं चिन्ह, 'कु'साठी वेगळं चिन्ह... असा अडाण्याचा कारभार आहे. (हे सापेक्ष आहे, मला मान्य आहे). म्हणजे क हे मुळाक्षर नाही, तर का, कि, कु, के, को ही सगळी मुळाक्षरं.

('जपानी' म्हणजे हिरागाना किंवा काताकाना लिपीबद्दल बोलत आहात, असे गृहीत धरतो.)

ठीक. देवनागरीच्या दृष्टिकोनातून विचार केलात, तर देवनागरीत 'क'च्या बाराखडीत (पक्षी 'क'चा 'कु' किंवा 'के' होताना) मूळ चिन्ह कायम राहते. मात्र 'क'च्या वर्गात (पक्षी: 'क'चा 'ख' किंवा 'घ' होताना) चिन्ह कायम राहत नाही.

हिरागाना/काताकानात का-कि-कु-के-को/ता-चि-त्सु-ते-तो/सा-शि-सु-से-सो/हा-हि-फु-हे-हो वगैरे गणांमध्ये मूळ चिन्ह कायम राहत नाही, मान्य. परंतु 'क'-गणाचा 'ग'-गण होताना ('क'-गणातील चिन्हांची 'ग'-गणातील चिन्हे होताना)/'त'-गणाचा 'द'-गण होताना/'स'-गणाचा 'ज़'-गण होताना/'ह'-गणाचा 'ब'-गण होताना मूळ चिन्हे कायम राहतात, आणि मूळ चिन्हांना फक्त वरच्या उभ्या कोपर्‍यात दोन छोट्याशा उतरत्या-तिरक्या (\) रेषा लागतात. (किंवा, 'ह'-गणाचा 'प'-गण होताना मूळ चिन्हांना वरच्या उजव्या कोपर्‍यात फक्त ते 'डिग्री सेल्शियस'मधल्या अंशांचे छोटेसे वर्तुळ लागते.)

सो, देअर इज़ सम काइंड ऑफ अ मेथड इन द म्याडनेस, आफ्टर ऑल. ओन्ली, द मेथड इज़ डिफरण्ट द्यान द्याट एम्प्लॉइड इन द म्याडनेस ऑफ देवनागरी, द्याट्स ऑल. ज्याच्यात्याच्या सोयीचा प्रश्न.

(जपानी लोकही त्यांच्या दृष्टिकोनातून हेच म्हणू शकतात, की या लेकाच्या मराठी/हिंदी बोलणारांच्या लिपीत 'क' हा 'ग' सारखा दिसत नाही, 'त' हा 'द'सारखा दिसत नाही, सगळा अडाण्यांचा कारभार. त्यापेक्षा आमच्या हिरागाना नि काताकानात कशी छान सुटसुटीत व्यवस्था आहे, म्हणून. [फक्त, तेवढे कानजीपुरते नको बोलूया. अर्थात, तेथेही 'मेथड इन द म्याडनेस' दाखवता येईल, पण या येड्या बाहेरच्या लोकांना ती कळण्याकरिता इथे प्रबंध लिहीत बसावा लागेल, सबब, सुमिमासेन.])

बरे, मग? आपला मुद्दा नेमका काय आहे म्हणालात?

===================================================================================================
सारखी दिसणारी चिन्हे एकत्र करण्यात लिपी नव्याने शिकणारास फायदा असू शकतो. म्हणूनच, देवनागरीच्या संदर्भात पूर्वी याकरिता ग-म-भ-न वगैरे वापरले जात असे. (किंवा, कोणे एके काळी आम्हाला बंगाली शिकवणार्‍या देशमुखमास्तरांनी सुरुवातीसुरुवातीस मुळाक्षरे शिकविताना ब-र-क वगैरे एकसारखी दिसणारी अक्षरे एकत्र शिकविल्याचे आठवते. अन्यथा, बंगाली लिपीचीही देवनागरीप्रमाणे अ-ची बाराखडी, मग क-वर्ग, च-वर्ग वगैरे, अशी व्यवस्था लावता येतेच, नव्हे, सामान्यतः लावली जातेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्लिफे (glyphs) म्हणजे लेखनातले "अणू"
फोनिमे (phonemes) म्हणजे ध्वनिशास्त्रातले भाषाविवक्षित "अणू"

पैकी लेखन हे त्या मानाने अनैसर्गिक आहे. उपचाराने (कन्व्हेन्शनने) ठरलेले आहे. लेखन शिकण्याकरिता आपल्यापाशी नैसर्गिक आणि वेगळे "इंद्रिय" नाही. बाळपणी/शाळेत आपण लेखन कित्ते गिरवून शिकतो. लेखनाचे नियम उघड-विवरणाचे (explicit) आणि पढलेले असतात. त्यामुळे ग्लिफांबाबत आपण ३_१४ विक्षिप्त अदिती विचारतात, तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो - "अमुकच कन्व्हेन्शन का? तमुक कन्व्हेन्शन वापरले, तर सोय अधिक वाढू शकेल ना?" ३_१४च्या शंकेतला पहिला भाग (ज्ञ, क्ष, ... त्र) हा ग्लिफांबाबत आहे.

(मानवी कृती आहे हे लक्षात ठेवून) भाषण हे त्या माने नैसर्गिक आहे. भाषण शिकण्याकरिता आपल्या मेंदूत वेगळा भाग/सोय (फंक्शनॅलिटी) आहे. आपण आपल्या भाषेतील विवक्षित ध्वनी शब्दार्थ कळण्याच्याहीपेक्षा आधी शिकतो - बाळाचे बडबडणे (babbling) आजूबाजूला बोलल्या जाणार्‍या भाषेच्या अनुसार असते. त्या-त्या भाषेत वापरला जाणारा, भाषिकांना वेगळा म्हणून समजून येणारा ध्वनींचा संच ठरवून शिकला जात नाही - तो संच अस्फुट आत्मसात झालेला (implicit) असतो. "अमुक भाषेतील फोनिमांचा संच काय?" हा प्रश्न कन्व्हेन्शनने ठरत नाही, तर अन्य विज्ञानांसारखा निरीक्षणाने ठरवावा लागतो. (क, ग, ट, प...)<->(ख, घ, ठ, फ...) बाबत ३_१४चा प्रश्न वेगळ्या जातकुळीचा आहे.

-----------------------------------
(ज्ञ, क्ष, ... त्र) ग्लिफे :
----
ग्लिफांची संख्या ही लेखनाच्या सोयीकरता ठरत असतात. ध्वन्यनुसारी लेखनाची पद्धत असलेल्या भाषांमध्येसुद्धा फोनिमांची संख्या ग्लिफांच्या संखेशी एकास-एक संबंध राखत नाहीत. काही ग्लिफांनी अनेक फोनिमे व्यापलेली असतात (उदाहरणार्थ, इंग्रजीत "c" चे दोन उच्चार; मराठीत "च"चे दोन उच्चार). कधीकधी एखाद्या फोनिमाकरिता एक ग्लिफ असे नसते, अनेक ग्लिफांचा मेळ केल्यास एक फोनीमाशी संबंध जुळतो (उदाहरणार्थ, इंग्रजीत "ch" अशी दोन ग्लिफे या क्रमात लिहिल्यावर एकच फोनिमाचे एन्कोडिंग होते). मराठीतील "दोन-ग्लिफे -> एक फोनीम"चे उदाहरण इतके लबाड आहे, की पुष्कळांना ते पहिल्या झटक्यात ऑळखूही येणार नाही - मराठीत व्यंजन फोनिमे लिहिण्याकरिता त्या व्यंजनाशी संबंधित ग्लिफ [उदा. "क"'] आणि पाय मोडल्याची खूण [्] ही दोन ग्लिफे वापरतात, मग एकाच "क्" फोनिमाचे अंकन होते. याचे मूळ लेखनाच्या सोयीत आहे. मराठी (आणि एकूण सर्वच मुख्य भारतीय भाषांत सुटे व्यंजन-फोनीम लिहायची वेळ क्वचित येते, आणि व्यंजन+अ-हा-स्वर ही जोडी लिहायची वेळ खूप म्हणजे खूपदाच येते. त्यामुळे कधी काळी ("पूर्ण व्यंजन" दोन फोनिमे->एक ग्लिफ) आणि ("अर्धे व्यंजन एक फोनीम -> दोन ग्लिफ) असे एनकोडिंग सार्वत्रिक झाले असावे. (म्हणजे वेगळी पद्धत भारतातील ऐतिहासिक लिप्यांमध्ये सुद्धा दिसत नाही, इतके सार्वत्रिक.)

आता क्ष, ज्ञ वगैरे म्हणजे थोडेसे त्या सोयीच्या अंगाने जाते. आणि काहीसे सुलेखनाच्या सौंदर्याच्या रूढ झालेल्या कल्पनांमुळे. "क्+ष्" आणि "ज्+ञ्" या फोनीम-जोड्या म्हणा, किंवा ग्लिफे उपलब्ध असल्यामुळे ग्लिफ-जोड्या म्हणा, संस्कृतात पुष्कळदा एकत्र येत. आणि आधुनिक भारतीय भाषांमध्ये त्याचे वारस... कित्येक मराठी बोलींमध्ये "क्+श्" आणि "द्+न्+य्" तसेच पुष्कळदा एकत्र येतात. (रोमन लिपीत उदाहरण इंग्रजीतल्या जुन्या टंकातील "st" "it" "fi" जोड्यांकरिता एक-एकच ग्लिफ, आधुनिक जर्मन कन्व्हेन्शनप्रमाणे "ss"जोडीकरिता "ß" हा ग्लिफ वगैरे, ब्रेलमध्ये "of" जोडीकरिता एकच चिन्ह, वगैरे). या ठिकाणी दोन-वा-तीन फोनिमांना वेगवेगळी ग्लिफे उपलब्ध असूनही आणखी एक नवीन ग्लिफ निर्माण करण्यात थोडीशी सोय असते (कारण ती दोन-तीन चिन्हे जोडीने लिहायची वेळ पुन्हा-पुन्हा येते, एकच चिन्ह लिहिल्यामुळे वेळ वाचू शकत असेल. पण काही हेतू सोयीपेक्षा सुलेखनाचा (calligraphyचा) असू शकतो. आणि अशा प्रकारे काही फराट्याने-जोडून-लिहिलेली-दोन-ग्लिफे लेखनिकांच्या सवयीमुळे, परंपरेमुळे पुढे एकच ग्लिफ बनून गेली. उदाहरणार्थ लॅटिन "et"चे दोन जोडलेले भाग लॅटिन चिन्ह "&" मध्ये दिसून येतात. (इंग्रजी चिन्ह & मात्र "and/अँड" या वेगळ्याच ध्वनीकरिता, आणि फक्त "आणि" या अर्थाकरिता वापरतात. येथे फोनेटिक एन्कोडिंग नाही, तर चिनी भाषेसारखे शब्द-चिन्ह आहे.)

त्याच प्रकारे "क्र, त्र"वगैरेंचे विश्लेषण करता येईल.

----------------------
(क, ग, ट, प...)<->(ख, घ, ठ, फ...)
ख् = क्+ह्; त्याच प्रकारे घ् = ग्+ह्
हे समीकरण नीट कान देऊन ऐकता गुंतागुंतीचे दिसून येते.
"ह्" हे सुटे फोनीम नाद-घोषमय (voiced) आहे. (नाद आणि घोष म्हणजे उच्चार करताना कंठमणीमध्ये होणारे गुंजन. नाद म्हणजे त्या व्यंजनाचा आवाज तोंडाबाहेर फुटायच्या आधीच ऐकू येणारे गूंजन, आणि घोष म्हणजे व्यंजनाचा आवाज तोंडावाटे बाहेर फुटल्यानंतरही ऐकू येणारे गुंजन).
मात्र "ख्" उच्चारताना कंठमणीचे गुंजन मुळीच होत नाही. तर "क्"मध्ये हा जो काय आवाज मिसळतो आहे, तो "ह्" नव्हे.
"घ्"मध्ये कंठमणीचे गुंजन होते खरे, पण ते तर नुसत्या "ग्"मध्ये सुद्धा ऐकू येते. पण क्-ख् आणि ग्-घ् या जोड्या काही तरी बाबतीत समांतर जरूर जाणवतात. जर "ख्"च्या अंतर्गत लपलेला "ह्" नाही, तर या सामांतर्यात "ह्" ऐकू येत नाही. जे काय समांतर ऐकू येते त्याला "अल्पप्राण-महाप्राण-जोडी" म्हणतात. (इंग्रजीत unaspirated/aspirated).

तरी "ख्", "भ्" वगैरेंमध्ये ध्वनीच्या सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग यांच्यात काही वेगळे ऐकू येते खास. पण मग त्यांना दोन-फोनिमांची-जोड मानावे का? मानून काही फायदा होत नाही. तोटाच होतो.

मुद्दा १: मराठीत दोन व्यंजन-फोनिमे जवळ-जवळ आली, तर आपोआप आदल्या व्यंजनाचे द्वित्त होते/ आघात येतो. (पुण्याला/पुण्ण्याला वगैरे थोडे अपवाद सोडून).
उदाहरणार्थ सक्ती->उच्चारी->सक्क्ती.
महाप्राण व्यंजनांच्या बाबतीत असे होत नाही
जर ख् = क् + ह्, तर सखी = सक्ही ?? उच्चारी सक्क्ही ?? नाही!
उलट "सखी" आणि द्वित्त "सख्खी" यांचे अर्थच मराठीत वेगळे असतात.
(आणि हे पुण्याला/पुण्ण्याला सारखे अपवादात्मक नाही. महाप्राणांचे द्वित्त होत नाही, हे सार्वत्रिक आहे. आणि बाकी सर्व जोडी-व्यंजनांचे द्वित्त होते, हे सार्वत्रिक आहे.)
अशा प्रकारे, मराठीभाषकाच्या अंतर्गत जाणिवेत महाप्राण व्यंजने एकजिनसी असावीत, जोड-व्यंजने नसावीत

मुद्दा २: शिवाय जोडून व्यंजने शब्दाच्या शेवटी असली, तर त्यानंतरचा "अ" नीट ऐकू येतो, लोप पावत नाही.
उदा. "पात्र" याचा उच्चार "पात्रऽ" (लांब नव्हे, पण तरी) स्पष्ट ऐकू येतो
मात्र "पार" वा "पात" यांचा उच्चार अनुक्रमे "पार्" आणि "पात्" असा ऐकू येतो.
"पाठ" म्हणजे जर "पाट्ह" असे जोडाक्षर मानले, तर त्याचा उच्चार "पाट्हऽ" असा झाला असता. पण होतो तो "पाठ्" असा. अशा प्रकारे सुद्धा, मराठीभाषकाच्या अंतर्गत जाणिवेत महाप्राण व्यंजने एकजिनसी असावीत, जोड-व्यंजने नसावीत.

----------------------

पुनश्च आठवण ठेवूया -

फोनिमांबाबत काटेकोर "निरीक्षण-म्हणजे सिद्धता" वेगळी आणि ग्लिफांबाबत "सोयीप्रमाणे कन्व्हेन्शन" वेगळे. गफलत करून कामाची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच, आता नीट कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाचतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/