आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?

मित्रांनो!
एक विनंती

आपण अशा कोणत्या संघटने चे सभासद बनला आहात का की जी प्रत्यक्षात एक cult आहे? आपण ज्या ही संघटनेत (धार्मीक वा तत्सम) असाल त्या संघटने च्या कार्यप्रणाली चे संचालकांचे एकदा तरी कठोर परीक्षण करुन बघा जर त्यात खालील प्रकारच्या गोष्टी आढळत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपला अमुल्य वेळ,पैसा आणि क्षमता वाया जाण्या पासुन स्वतःला वाचवा ही कळकळीची नम्र विनंती !
CULT म्हणजे नेमके काय ? तिची वैशिष्ट्ये कोणती ?
याची एखादी स्पष्ट व्याख्या करणे तसे फार अवघड आहे पण अशा संघटने त काय चालते काय नाही हीची कार्यप्रणाली कशी आहे यावरुन कुठली संघटना cult आहे व कुठली normal organization आहे हे निश्चितपणे ठरवता येते.या विषयावर भरपुर संशोधन झालेले आहे आणि आंतरजाला वर ही भरपुर माहीती उपलब्ध आहे.या संशोधना च्या आधारे cult ची काही specific features आहेत जी संशोधना अंती निश्चित केली गेली आहेत ती खाली दिलेली आहेत.आपण एकदा प्रामाणिक पणे आपण ज्या संघटनेचे सभासद आहात तीला ही लागु पडतात की नाही हे तपासुन पहावे. नसतील लागु पडत तर आनंद च आहे पंण जर असे काही तुमच्या संघटनेत तुम्हास आढळत असेल तर मात्र वेळीच सावध व्हा ही विनंती!
१-प्रमुख/गुरु सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वशक्तीमान
cult चा प्रमुख व्यक्ती व त्याच्या निकटचे सभासद यांना जगाचे अंतिम ज्ञान हे पुर्णपणे झालेले आहे,त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे ते जिवनाचे संपुर्ण रहस्य आणि भुत-भविष्य (शिष्या चे धरुन )जाणता ते big boss knows everything या पध्दतीने वारंवार शिष्यांना सांगितले जाते.ते सर्वव्यापी आहेत कुठे ही काय चालु आहे ते सर्व जाणतात (त्याच्यापासुन तुमची कुठलीही गोष्ट लपुन राहु शकत नाही) आणि ते सर्वशक्तीमान आहेत ते काहीही करु शकतात absolutely anything
२-चिकीत्सेला संपुर्ण विरोध
प्रमुख/गुरु ने केलेल्या कुठल्याही विधानाला किंवा संघटने मांडलेल्या कुठ्ल्याही थेअरी ला किंवा नियम वा तत्वांची चिकीत्सा करायला परवानगी तर नसतेच.पण असे करणे म्हणजे बंडखोरी किंवा वेडेपणा चे/ पतित झाल्याचे लक्षण मानले जाते व त्यावर योग्य असा इलाज शि़क्षा अथवा समज (brainwash) करुन दीला जातो, असे करणार्‍याला सह्जासहजी सोडले जात नाही ( हा प्रयोग करुन बघा)
३-बिनशर्त संपुर्ण समर्पणाची अपेक्षा
शिष्याने स्वतःची कुठली ही अट न ठेवता स्व्तः चे संपुर्ण शारीरीक-आर्थिक-मानसिक समर्पण गुरु/संघटने प्रती करावे ही मागणी वारंवार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.यात संपत्तीचा मोठा वाटा देण्यापासुन ते उत्पन्नातील ठराविक भाग दर महीना देण्यासाठी दबाव आणला जातो अशा दानाचे महत्व सतत बिंबविले जाते. विवीध प्रकारची शारीरीक कामे विनामोबदला सेवेचे मह्त्व पटवुन करवुन घेतली जातात ( चपला सांभाळणे ते पुस्तके विकणे ते प्रत्यक्ष गुरु सेवा करणे इ.) ( नकार देउन बघा )
४-अंतिम,अपरीवर्तनीय अशी एक Typical Exclusive Theory
प्रत्येक cult आपल्या सभासदांना एक असे रेडीमेड गोळीबंद तत्वज्ञान देतात जे की अंतिम सत्य च आहे असे भासविण्यात येते. या Typical Exclusive Theory ला वर म्हटल्या प्रमाणे कधीही चुकुनही challenge करता येत नाही.यात काय वाटेल ते असु शकते जसे आपले गुरु कोणाचा अवतार आहेत पासुन ते एक धुमकेतु अमुक दिवशि येणार त्याला धरुन आपल्याला जायचे आहे म्हणुन आत्मह्त्ये साठी तयारी करा ते अमुक दिवशी जगबुडी होणारच आणि आपण जे सर्व दीक्षीत आहोत तेच जिवंत राहणार किंवा जगातील प्रत्येक स्त्री-पुरुष हे बहीण भाउ च आहेत काय वाटेल ते यात बरेच नियमांची जंत्री असु शकते, बाहेरच्यां विषयी एक मार्गदर्शन केलेले असते काय चांगले काय वाईट याचे वर्गीकरण केलेले असते. याचा इतका पगडा शिष्यांवर टाकण्यात येतो. कि ते पुर्ण जिवनाल याच Typical Theory च्या चश्म्यातुन च बघतात.स्वतः च्या अनुभवाशी व बुध्द्दी शी ही असे शिष्य प्रामाणिक राहु शकत नाही. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे.ते सभोवताली घडणार्‍या कुठ्ल्याही घटनेचा अन्वयार्थ निखळ चिकीत्सा करुन लावु शकत नाहीत.आणि ते पराकोटीचे संकुचित आणि संवेदनाशुन्य बनत जातात ( फलाइन वाद्ळ ना बरोबर च आहे आपल्या गुरुजींनी नव्हत का सांगितल की......)
५-आपण "विशेष" आहात म्हणुनच येथे आहात !
हे गाजर प्रत्येकच cult देते. यात शिष्यांना सतत एक गोष्ट सांगितली जाते की ते नक्की काहीतरी वेगळे आहेत सामान्यांपेक्षा विशेष आहे म्हणुन तुम्ही आमच्या संघटनेचे सभासद बनला आहात.तुमचे पुर्वजन्मी चे पुण्य वा संचित आहे ज्यामुळे तुम्ही येथे आहात.यात माणसाचा स्वाभाविक अहंकार भरपुर खतपाणी घालुन फुलविला जातो. यांचा खास शब्द म्हणजे तुम्ही chosen few आहात.आणि म्हणुन मग या शिष्यांचा द्रुष्टीकोण हा इतर लोकांविषयी हे "बाहेर चे" कोणी तरी दुर्दैवी जीव आहेत ( जे आमच्या संघात नाहीत) असा किंवा हे लायक च नाहीत असा बनत जातो.
क्रमशः

(पुर्वप्रकाशीत लेख)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

ऐसी अक्षरे या कल्ट मधे आपले स्वागत! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

एका मराठी संकेतस्थळावर हा अनुभव आला होता. संकेतस्थळाचे संपादक, व सल्लागार मंडळ यांना जगाचे अंतिम ज्ञान झाले होते. ते सर्वशक्तीमान असल्याने काहीही करु शकत होते. कोणत्याही स्वरुपाच्या चिकीत्सेला प्रतिसाद उडवून उत्तर मिळत होते. मुद्दे ३, ४, ५ यावर तर फार मोठा प्रतिसाद लिहिता येईल. असो. संकेतस्थळाचे नाव सांगायची गरज नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्लीच काही ख्रिश्चन स्त्रियांबरोबर बायबल वाचन करण्याचे प्रयोग केले*. त्यांचा उत्क्रांतीला असणारा विरोध, अनेक गोष्टींमधे दिसणारा स्त्रीद्वेष, जीजस असला तरी तो मेलेल्यांना जिवंत करू शकत नाही हे मानण्यास नकार वगैरे गोष्टी या cult प्रकार म्हणाव्यात अशाच आहेत.

*हे प्रयोग मी केले असं माझं मत. त्यांनी माझ्यावर काही प्रयोग केले का, हे समजण्याचा मार्ग नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिशय सुंदर विषयाला हात घातलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विचार करण्यासारखं.
अर्थात कल्ट मध्ये नाहित ते नेहमीच म्हणतील "आम्ही कल्टी नाहित" म्हणून.
जे कल्ट मध्ये असतील तेही "आम्ही कोणत्याच कल्ट मध्ये नाही, पण अमक्या अमक्याचं मनापासून पटतं" वगैरे वगैरे बड्बड करतील.
दुसर्‍यांचा कल्ट नेहमीच व्यक्तीला स्पष्ट जाणवेल; स्वतःचा नाही.
स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ - मुसळ . . .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्यात हे सर्व फिचर्स असतात त्यांना कल्ट म्हणावे की ५ पैकी १ लागू झाला की त्याची बोलावणी कल्ट मध्ये करावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

आणि आपण हे संशोधानातून आलेले फीचर्स आहेत असा उल्लेख केला आहे. त्याचे references जर लेखा च्या शेवटी दिले तर वाचकांना अधिक फायदा होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes