’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी

’ऐसीअक्षरे’ च्या प्रत्येक पानावर वरच्या उजव्या कोपर्‍यात एक शोधपेटी असते. हिचा उपयोग कसा करायचा ह्याबद्दल काही मार्गदर्शन हवे आहे.

ही शोधपेटी नक्की काय शोधते? माझी अपेक्षा अशी आहे की तिच्यामध्ये एखादा शब्द भरला तर तो शब्द ’ऐसी’च्या संस्थळावर कोठेकोठे वापरला आहे त्याची यादी पुढ्यात यावी. ही अपेक्षा बरोबर आहे का दुसर्‍या काही प्रकारचा शोध ही पेटी घेते?

पेटीमध्ये मी प्रथम ’सुधारणा’ हा भरपूर वेळा वापरला जाणारा शब्द घालून शोध घेतला. त्यावेळेस मी अरुणजोशींच्या ’ऐसीअक्षरे`मधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा’ ह्या पानावर होतो. मला समोर दिसणारा ’सुधारणा’ हा शब्द शोधपेटीला दिसला नाही. इतकेच नाही, तर हा शब्द तिला एकूण संस्थळातच कोठे दिसला नाही. मला उत्तर मिळाले ’You must include at least one positive keyword with 3 characters or more.’ म्हणजे मी नक्की काय करायचे?

तदनंतर मी माझेच पूर्ण नाव शोधपेटीत घातले. ह्या वेळेस माझे नाव असलेल्या एकूण २५ जागा मला दाखविण्यात आल्या. वस्तुत: माझे नाव एव्हाना संस्थळावर इथेतिथे शेकडो वेळा आलेले असणार. त्यांपैकी मला केवळ २५ जागाच का दाखविण्यात आल्या?

ह्या २५ जागांमध्ये नंदन ह्यांचा ’थालेपारट’ शीर्षकाचा २५/०९/२०१२ ह्या दिवशी सुरू केलेला धागा दिसला कारण तेथे माझा एक प्रतिसाद आहे. तदनंतर मी ’थालेपारट’ हाच शब्द शोधपेटीमध्ये घातला. ह्या वेळी पेटीला तो धागा सापडला नाही. त्या ऐवजी मला ’You must include at least one positive keyword with 3 characters or more’ हा मौलिक सल्ला मिळाला!

शोधपेटी वापराचे गूढ कोणी उलगडून सांगू शकेल काय?

प्रतिक्रिया

Smile मलाही हाच/हेच प्रश्न आहे आता बोला!
कॉलिंग, अदिती/चिंज/राजेश!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१२. सर्च इंजिनने शब्द सर्च केला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

द्रुपलमध्ये दिलेली शोधसोय ही सोय नसून गैरसोय आहे हे माझं अनेक वर्षांपासूनचं मत आहे. गूगलमधली एक सोय वापरून मी हा प्रश्न सोडवतो. उदा : ऐसीवर 'सुधारणा' शोधण्यासाठी -
तुमच्या नेहमीच्या गूगल सर्च पानावर जा. (google.co.in किंवा google.com वगैरे)
सर्च टर्म म्हणून हा पर्याय द्या : site:aisiakshare.com सुधारणा

आता हे शोधल्यावर मला गूगल हे पहिले पाच पर्याय देत आहे -

 • धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा
  www.aisiakshare.com/node/112
  1 nov. 2011 - ऐसी अक्षरे व्यवस्थापनातर्फे साइटवर सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील. आपला पाठिंबा या प्रयत्नांना ...
 • ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा ...
  www.aisiakshare.com/node/2377
  ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा. लेखक/लेखिका: अरुणजोशी (गुरुवार, 19/12/2013 - 06:48). सुधारणांचे स्वरुप ...
 • संसद: मान्सून सत्र २०१३ | ऐसीअक्षरे
  www.aisiakshare.com/node/2003
  1 août 2013 - THE PARLIAMENT (PREVENTION OF DISQUALIFICATION) AMENDMENT BILL, 2013 हे सुधारणा विधेयक राज्यसभेने बहुमताने ...
 • 'ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी | ऐसीअक्षरे
  www.aisiakshare.com/node/2378
  Il y a 10 heures - त्यावेळेस मी अरुणजोशींच्या 'ऐसीअक्षरे`मधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा' ह्या पानावर होतो.
 • नावे सुचवा | ऐसीअक्षरे
  www.aisiakshare.com/node/1063
  22 juil. 2012 - सुधारणा अतिशय योग्य ! मला देखील तेच सुचले होते.. फक्त 'ओबेलिक्स मागे'च्या ऐवजी 'ओबेलिक्समागे' असे ...

सध्या तरी हा पर्याय मला सर्वात सोपा आणि सुयोग्य वाटतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत आहे. पण ते मायबोलीवर गूगल पॉवर्ड सर्च आहे, तसं कै इथं करता येईल का? त्याला पैशे लागत असले तर राहूदे अर्थात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मागे कधीतरी पाहिलेलं होतं तेव्हा ते तसंच दिसलं होतं. त्याशिवाय अपाचे सोलर नामक शोधसुविधाही आहे. (आमच्या स्थानिक ग्रंथालयात ती आहे, मस्त चालते.) पण ती शेअर्ड होस्टिंगवर चालत नाही.

त्यामुळे दुसरी टॅब उघडून गूगल सर्च हा पर्याय मी ही बरेचदा वापरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

I also have observed the same function on I think UPAKRAM.
So +1 to Bats.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यायला, जवळचा चष्माही लागला की काय अशी शंका येतेय. चाळिशी आलीच म्हणा..

"ऐसीअक्षरेमधील शवपेटी" असं शीर्षक वाचून दचकलोच. आणि काहीतरी सनसनीखेज ई-खुनाची रहस्यकथा लिहिलेय कोल्हटकर साहेबांनी असं दीड नॅनोसेकंद वाटलं. पुलंची "क्याफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका" सुद्धा मास्तरांच्या आवाजात कानात वाजून गेली.

नीट निहाळल्यावर उलगडा जाहला..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.