मेटामॉरफोसिस(?)

काहीवेळेस लहान असतानाचे फोटो बघितले कि अस वाटत कि मी त्या फोटोमधल्या गोंडस निरागस बाळासारखा कधी नसावाच. सगळ्यांनाच तसच वाटत असाव आपल्या बालपणीचे फोटो बघितल्यावर,आपण स्वताच स्वताला अनोळखी वाटू लागतो.एखाद्या आयलंडसारख वाटत.चोहोबाजूंनी समुद्राच्या लाटा अंगावर येन आदळत आहेत.त्यांच्यामध्ये एक तीव्रता आहे ती जाणवायला पाहिजे. दाढी मिश्या येण.सेक्स आर्गेनस संबंधी कळायला लागण या शारीरिक लक्षणांव्यतिरीक्त आतमध्ये मनात मोठ होण्याचा वय वाढल्याची जाणीव होते. पंचविशीकडे जाताना सगळ अर्ध अनुभवलेल त्याची संगती नाही लावता येत. पूर्वी फार रिबेल असणार मन सगळ काही स्वीकारत जात. आपण जास्ती बदलाच्या भानगडीत पडू नये.जस पिढ्यानपिढ्या चालत आल आहे तसच राहाव सेटल व्हाव अस वाटायला लागत. सुरवाती सुरवातीला सतावणार्या सर्व तात्विक प्रश्नापेक्षा आयुष्याची लढाई लढण्यात वेळ जाऊ लागतो.मंदिरात रांगेत उभारलो होतो.एका बाईच्या हातात एक गोंडस बाळ होत.लोकरीच टोपड वगैरे घालून.त्या बाळाच लक्ष सारख बाजूला उभारलेल्या माणसाच्या हातातील कमळाकडे जात होत.त्या माणसाने कौतुकाने ते फुल बाळाच्या हातात दिल.मला ते बाळ आता त्या फुलासोबत काय करत हे बघायच होत. त्याने डायरेक्ट ते कमळ तोंडात घालून खायला सुरवात केली.आईने त्याच्या तोंडातून ते फुल बाहेर काढल पण  ते बाळ सारख सारख झेप घेऊन ते फुल खायचा प्रयत्न करत होत.सगळी लहान मुल कुठलीही नवीन गोष्ठ खायची समजतात.माणसाची आदिम सवय पोटाची भूक भागवणे.आदिमानवापासून माँडर्न पोस्टमाँडर्न सगळ कितीही प्रगत वगैरे झाल तरी त्या प्रगती मागे भूकच आहे.फक्त आता शिकार करण्यापेक्षा कार्पोरेट पद्धतिने पैसा कमवून माणूस भूक भागवतो. हे जेव्हा जाणवायला लागत तेव्हा जास्ती अस्तित्ववादी विचार करण्यापेक्षा पलायनवादी भूमिका घेउन आँफिसमध़ली काम करत राहणे, जेवणे,झोपणे आणि उरलेला टाइम भरण्यासाठी टिवी ,नेट,पार्ट्या बाकी सगळ.इप्सित अनुत्तरित.पंचवीशीच्या पूर्वी थोड़ी उर्मी असते असला अस्तित्ववादी विचार करून वेगळ काहीतरी करण्याचा पण अचानक सगळ रिबेलपणा वगैरे सोडून मन मवाळ व्हायला लागत.बाकी लाखो किड्यातला मी एक किडा.
साखरेच्या डब्याच्या आजूबाजूला लागलेली मुंग्यांची रांग आणि खिडकीतून दिसणारी ट्रफिकची मोठी रांग यामध्ये फरकच जाणवत नाही दोन्ही एकसारखे.गाडी चालवताना आजकाल मस्त ट्रान्स लागतो.ट्रफिकच बँकग्राऊंड म्युझिक.रस्त्यावरची हजारो माणस.काही दारू पिऊन रस्त्यातच पडलेली.फुटपाथवरती पेरू विकणारा एक माणूस.सगळे पेरू संपल्यानंतर स्वतःच अंग त्या पेरूच्या टोपलीत कोंबून मस्त झोपला होता.आख्ख शहर गेल खड्डयात.असा सगळा अलिप्तपणा आपल्या अंगात येत आहे का?जसजस मोठ होत जातो तस तस प्रश्न सुटतील अस सांगितल जात पण नंतर कळत कि प्रश्न सुटतच नाहीत पण आपण मिळेल ती उत्तर स्वीकारायला लागतो.प्रश्न पडत राहण्याची उर्मीतरी टिकावी अस वाटत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लेखाचे शीर्षक पाहून, पहिल्याच वाक्यात प्रचंड नि घृणास्पद किडा होऊन पडलेल्या ग्रेगोर साम्साबद्दल लेखात काही शुभवर्तमान असावे, या आशेने लेख उघडला, नि प्रचंड अपेक्षाभंग झाला.

निदान प्रस्तुत लेखाच्या लेखकाचे लेखाच्या पहिल्याच वाक्यात एखाद्या प्रचंड नि घृणास्पद किड्यात रूपांतरण झाले असते, तरीही थोडेफार समाधान लाभू शकले असते. पण दुर्दैव! असो.
======================================================================================================
* प्रस्तुत प्रतिसादाचे शीर्षक 'केएलपीडी' असे देणे हे केवळ सभ्यतेच्या (पक्षी: इतरांच्या सभ्यतेच्या; स्वतःबद्दल असा कोणताही दावा केलेला नाही. धन्यवाद.) निकषापोटी टाळलेले आहे, याची कृपया दखल घ्यावी. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच म्हणते मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप आवडलं चिंतन. शेवटी शेवटी खूप ग्रीप घेतं.

आणि मी जसा आवडलं मधे ल वर ठिपका दिला आहे तसा आपण शंभर एक जागी द्यायचा उरला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चिंतन खूप आवडले. अरुणजोशी म्हणतात तसे ग्रिपिंग आहे खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आदिमानवापासून माँडर्न पोस्टमाँडर्न सगळ कितीही प्रगत वगैरे झाल तरी त्या प्रगती मागे भूकच आहे

हा भ्रम त्या मास्लोने पसरवला आहे. मानवाचे पोट आणि निसर्गातील अन्न यांचे प्रमाण हे लक्षात ठेऊन असावे. शिवाय माणसात आणि इतर प्राण्यांत फरकच करायचा नाही हा ही एक भ्रम आहे. माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा आहे. निसर्गाचं माणसावर विशेष प्रेम आहे. नाहीतर क्रूर निसर्गात पातळ नखं असलेला जीव २-३ पिढ्या देखिल जगला नसता. नाहीतर जगला असता पण मुंग्यासारखा. केवळ प्रचंड पुनरुत्पादन होते म्हणून टिकून राहिलेली जात. पण माणसाचं तेही नाही. नखं नाहीत, खुरं नाहीत, शिंगं नाहीत, गती नाही, झाडावर चढता येत नाही, प्राण्यांना हरवेल अशी ताकद नाही, नऊ महिने गर्भारपण, एकावेळी एकाचा जन्म, आणि लहानग्याला अक्कल यायला लागणारी वर्षेच्या वर्षे!!! खरे तर आपण इतर प्राण्यांचे रेअर स्पेसिस असायला हवे. पण आज आपण भूतलावर राज्य करतो. त्यात थोडे तारतम्य ठेऊन असावे इतके पुरे.

वर survival of the fittest म्हणायचे. मग fittest कोण? त्याचे उत्तर who is surviving असे द्यायचे. असे गोल गोल फिरवत ठेवायचे. जरा fitness चे criteria सांगा म्हटले कि चिडिचूप. कारण निसर्गात इतकं वैविध्य आहे कि कोण फिट आहे आणि कोण नाही याचे निकषच देता येत नाहीत. वाघ? घोडा? हत्ती? बकरी? ससा? साप? बेडूक? गोगलगाय? किटक? गवत? झाडे? झुडुपे? छोटा मासा? किडे? शेवाळ? शार्क? बॅक्टरीया? व्हायरस? कोणत्या आधारावर फिट आहेत? मग जे नष्ट झाले (आणि म्हणून फिट नव्हते.. हा हा हा) त्यांच्यात अशा कोणत्या गोष्टी नव्हत्या? उत्क्रांती हा शब्द काळात पुढे सरकणे या क्रियेला वापरला आहे. खरे तर तो शब्द उत्कांती व अधोक्रांती या दोहोंस आहे. मग अधोक्रांतीची उदाहरणे कोणती?

इतके वर्ष इतके लोक आदिवासी म्हणून जगतात, जगले. ते अन्नान म्हणून मेले का? आणि नागरी संस्कॄतीने त्यांचा भूमिविस्तार रोखला नसता तर ते मरायची शक्यता कमी झाली असती कि जास्त?

हवा नासवली, पाणी नासवले, अन्न नासवले की अर्थातच त्यांची उणिव भासवते. शास्त्रांचे यश लोकसंख्यावृद्धीत मोजले जाते. मग मास्लोचा आणि डार्विनचा भाव वाढतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर survival of the fittest म्हणायचे. मग fittest कोण? त्याचे उत्तर who is surviving असे द्यायचे. असे गोल गोल फिरवत ठेवायचे. जरा fitness चे criteria सांगा म्हटले कि चिडिचूप. कारण निसर्गात इतकं वैविध्य आहे कि कोण फिट आहे आणि कोण नाही याचे निकषच देता येत नाहीत. वाघ? घोडा? हत्ती? बकरी? ससा? साप? बेडूक? गोगलगाय? किटक? गवत? झाडे? झुडुपे? छोटा मासा? किडे? शेवाळ? शार्क? बॅक्टरीया? व्हायरस? कोणत्या आधारावर फिट आहेत? मग जे नष्ट झाले (आणि म्हणून फिट नव्हते.. हा हा हा) त्यांच्यात अशा कोणत्या गोष्टी नव्हत्या? उत्क्रांती हा शब्द काळात पुढे सरकणे या क्रियेला वापरला आहे. खरे तर तो शब्द उत्कांती व अधोक्रांती या दोहोंस आहे. मग अधोक्रांतीची उदाहरणे कोणती?

खूप जास्ती सरसकट बोलून त्याचा निषेध झाल्यास ओनस ऑफ प्रूफ सामनेवाले पे ढकलायचा ही ट्याक्ट लै जुनी आहे. नुस्ता दावा न करता कधीतरी त्याला प्रमाणे द्या.

हवा नासवली, पाणी नासवले, अन्न नासवले की अर्थातच त्यांची उणिव भासवते. शास्त्रांचे यश लोकसंख्यावृद्धीत मोजले जाते. मग मास्लोचा आणि डार्विनचा भाव वाढतो.

पहिल्या अन दुसर्‍या, तसेच दुसर्‍या अन तिसर्‍या वाक्यांचा अर्थदृष्ट्या परस्परसंबंध स्पष्ट झाल्यास आभारी राहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही हो. हा स्टँडालोन कमेंट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नुस्ता दावा न करता कधीतरी त्याला प्रमाणे द्या.

निसर्गात कुणीच, कोणताच प्राणी हजारो वर्षे टिकायला फिट नाही. तरीही ते कसे टिकतात ही फार नवलाची बाब आहे. सर्वक्षम टिकतात हा सिद्धांत लैच तकलादू आहे.

माणूस आफ्रिकेतून सार्‍या जगात पसरला असे म्हणतात. मग प्रत्येक खंडात त्याचा स्किन कलर तोच असायला हवा. तो नाही म्हणजे प्रत्येक पसरलेल्या प्रजातीत म्यूटेशन्स झाली. आता म्यूटेशन्स काही सूर्याची किरणे पाहून नाही झाली. म्हणजे प्रत्येक प्रजातीत सर्व रंगाचे लोक पैदा झाले. पैकी थंड प्रदेशात गोरे टिकले आणि गरम प्रदेशात काळे. आमचे म्हणणे असे आहे कि म्यूटेशन्स आता का नाही होत? हिरवा, निळा, पिवळा माणूस जन्मल्याचे का ऐकण्यात येत नाही? आणि गोर्‍यांना काळी आणि काळ्यांना गोरी मुले अचानक वर्णसंकराशिवाय झाली आणि त्यांना सुट होईल अशा वातावरणात नेले अशा केसेस ऐकण्यातच नाहीत.

जे दिसतंय ते उत्क्रांत आहे पण जे उत्क्रांत होतंय ते दिसत नाही (आता तर ७०० कोटीचे सँपल आहे, कितीतरी म्यूटेशन्स दिसली पाहिजेत. शिवाय पॉल्योशन आहे १०० प्रकारचे, त्या म्यूटेशन्सचे चान्स वाढवायला.)

आता प्रामाणिकपणे सांगा, पुरावा द्यायचं उत्तरदायित्व कुणाचं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निसर्गात कुणीच, कोणताच प्राणी हजारो वर्षे टिकायला फिट नाही. तरीही ते कसे टिकतात ही फार नवलाची बाब आहे. सर्वक्षम टिकतात हा सिद्धांत लैच तकलादू आहे.

पुन्हा एक सरसकट विधान. सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतल्या जाते. परिस्थिती चेंज होते पण रेट बर्‍यापैकी स्लो असल्याने एका कॉन्फिगरेशनचा सर्व्हायव्हल टैम शेकडो हजारो वर्षे इ. असतो. त्यात लोकल चेंजेस होतात पण लै उल्लेखनीय म्हणावेत असे नसतात.

माणूस आफ्रिकेतून सार्‍या जगात पसरला असे म्हणतात. मग प्रत्येक खंडात त्याचा स्किन कलर तोच असायला हवा. तो नाही म्हणजे प्रत्येक पसरलेल्या प्रजातीत म्यूटेशन्स झाली. आता म्यूटेशन्स काही सूर्याची किरणे पाहून नाही झाली. म्हणजे प्रत्येक प्रजातीत सर्व रंगाचे लोक पैदा झाले. पैकी थंड प्रदेशात गोरे टिकले आणि गरम प्रदेशात काळे. आमचे म्हणणे असे आहे कि म्यूटेशन्स आता का नाही होत?

म्यूटेशन्स आताही होतच आहेत, पण तुमची अपेक्षा म्हणजे गेल्या दीडेकशे वर्षांपासून फुटलेल्या शास्त्रदृष्टीने गेल्या लाखो करोडो वर्षांच्या प्रोसेसचा रिझल्ट पाहून शंभरेक वर्षांत तितकाच चेंज अपेक्षिण्यापैकी आहे.

हिरवा, निळा, पिवळा माणूस जन्मल्याचे का ऐकण्यात येत नाही? आणि गोर्‍यांना काळी आणि काळ्यांना गोरी मुले अचानक वर्णसंकराशिवाय झाली आणि त्यांना सुट होईल अशा वातावरणात नेले अशा केसेस ऐकण्यातच नाहीत.

सँपल स्पेस प्रचंड मोठा असला तरी त्यातील सर्व कॉन्फिगरेशन्स प्रत्यक्षात येतील असे नसते.

जे दिसतंय ते उत्क्रांत आहे पण जे उत्क्रांत होतंय ते दिसत नाही (आता तर ७०० कोटीचे सँपल आहे, कितीतरी म्यूटेशन्स दिसली पाहिजेत. शिवाय पॉल्योशन आहे १०० प्रकारचे, त्या म्यूटेशन्सचे चान्स वाढवायला.)

सँपल मोठे असले तरी टाईम फ्रेम शंभरेक वर्षांची पकडताय, मग कसं होणार ते? ही अपेक्षाच मुळात चूक आहे. शिवाय वातावरणात पोल्यूशन वाढलं तरी गेली फारतर शंभरदीडशे वर्षे हा इफेक्ट आहे. इतक्या कमी वेळेत दिसू शकतील असे बदल कधीच दिसत नसतात. टाईम स्केलच्या कल्पनेविना असे प्रश्न उपस्थित करून वर डार्विन वैग्रेंना अंडररेट करायचे हा चूक अन तितकाच हास्यास्पद प्रकार आहे.

आता प्रामाणिकपणे सांगा, पुरावा द्यायचं उत्तरदायित्व कुणाचं आहे?

उपस्थित केलेल्या प्रश्नांतच एक सैद्धांतिक भोंगळपणा आहे. तो सुधारला तर मग पाहता येईल काय करायचं ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुन्हा एक सरसकट विधान. सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतल्या जाते. परिस्थिती चेंज होते पण रेट बर्‍यापैकी स्लो असल्याने एका कॉन्फिगरेशनचा सर्व्हायव्हल टैम शेकडो हजारो वर्षे इ. असतो. त्यात लोकल चेंजेस होतात पण लै उल्लेखनीय म्हणावेत असे नसतात.

चेंज स्लोच का असतो? जगात प्रत्येक सजीवाच्या भिन्न भिन्न पेशीला (सगळी भिन्नता एका झटक्यात आली असे मानले तरी) एक सवती उत्क्रांती मानून (फक्त विद्यमान सजीवांमधे) एकूण किती पेशी प्रकार असतील? हे सगळं स्लो कसं? केंब्रियन एक्सप्लोजन ५५ करोड वर्षांपूर्वी २ करोड वर्षे झाले म्हणतात.
दुसरे म्हणजे आपण सगळे एकाच अमिबापासून आले आहोत तर आजची सगळी भिन्न भिन्न जीन्स (नुसत्या एकट्या मानवातच) ही ही वेगळी वेगळी म्यूटेशन्स मानावी लागणार. खरा दांभिकपणा काय? बदल दाखवा म्हटले कि 'करोडो वर्षे लागतात' म्हणणे आणि करोडोच्या वर जैववैविध्य दाखविले कि पून्हा ते उत्क्रांतीनेच झाले आहे असे म्हणणे.

म्यूटेशन्स आताही होतच आहेत, पण तुमची अपेक्षा म्हणजे गेल्या दीडेकशे वर्षांपासून फुटलेल्या शास्त्रदृष्टीने गेल्या लाखो करोडो वर्षांच्या प्रोसेसचा रिझल्ट पाहून शंभरेक वर्षांत तितकाच चेंज अपेक्षिण्यापैकी आहे.

अहो, '७००*१०^७ माणसे १०० वर्षे' आणि '१००० वा १०००० माणसे (आता म्हणू नका हा फार कमी आहे म्हणून. ११ हजार वर्षांपूर्वी ३० लाख लोकसंख्या होती. मी बोलतोय २२ लाख वर्षंपूर्वीचं)७००*१०^६ किंवा ७००*१०^५ वर्षे' यांच्यात तितकीच म्यूटेशन्स व्हायला हवीत. एवढ्यात माणसाचा माकड कसा झाला हेच काय, कशापासून माकड झाले हे देखिल कवर होतेय. हिशेब करून बघा. आणि तुमच्या काहीच उदाहरणं नसावित? आणि मीच भोंगळ?

सँपल स्पेस प्रचंड मोठा असला तरी त्यातील सर्व कॉन्फिगरेशन्स प्रत्यक्षात येतील असे नसते.

वर सांगीतलं आहे.

सँपल मोठे असले तरी टाईम फ्रेम शंभरेक वर्षांची पकडताय, मग कसं होणार ते? ही अपेक्षाच मुळात चूक आहे. शिवाय वातावरणात पोल्यूशन वाढलं तरी गेली फारतर शंभरदीडशे वर्षे हा इफेक्ट आहे. इतक्या कमी वेळेत दिसू शकतील असे बदल कधीच दिसत नसतात. टाईम स्केलच्या कल्पनेविना असे प्रश्न उपस्थित करून वर डार्विन वैग्रेंना अंडररेट करायचे हा चूक अन तितकाच हास्यास्पद प्रकार आहे.

उत्क्रांतीचा किसच पाडायचा म्हटला ना तर डार्वीन इतका मोठा हास्यास्पद प्रकार कोणी निघणार नाही.

उपस्थित केलेल्या प्रश्नांतच एक सैद्धांतिक भोंगळपणा आहे. तो सुधारला तर मग पाहता येईल काय करायचं ते.

मी फक्त मुद्द्यांवर बोलणे पसंद करतो.

आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश नाझ्ग गिम्बातुल, आश नाझ्ग थ्राकातुलुक, अघ बुर्झुम ईशी क्रिम्पातुल!!!!

याचाही अर्थ सांगा. काय लोकांना न कळणार्‍या सह्या मिरवता राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चेंज स्लोच का असतो? जगात प्रत्येक सजीवाच्या भिन्न भिन्न पेशीला (सगळी भिन्नता एका झटक्यात आली असे मानले तरी) एक सवती उत्क्रांती मानून (फक्त विद्यमान सजीवांमधे) एकूण किती पेशी प्रकार असतील? हे सगळं स्लो कसं? केंब्रियन एक्सप्लोजन ५५ करोड वर्षांपूर्वी २ करोड वर्षे झाले म्हणतात.
दुसरे म्हणजे आपण सगळे एकाच अमिबापासून आले आहोत तर आजची सगळी भिन्न भिन्न जीन्स (नुसत्या एकट्या मानवातच) ही ही वेगळी वेगळी म्यूटेशन्स मानावी लागणार.

कळालं नाही. चेंज स्लो असतो म्हणजे मानवी लाईफस्पॅनच्या तुलनेत स्लो असतो. आपापल्या पद्धतीने फास्ट असेलही, पण मी माणूस आहे आणि माझ्या निरीक्षणाला ते स्लोच वाटणार.

खरा दांभिकपणा काय? बदल दाखवा म्हटले कि 'करोडो वर्षे लागतात' म्हणणे आणि करोडोच्या वर जैववैविध्य दाखविले कि पून्हा ते उत्क्रांतीनेच झाले आहे असे म्हणणे.

अफाट जैववैविध्य अन करोडो वर्षे यात अंतर्विरोध असण्याचे कारण एकच-मनाच्या अपेक्षा.

अहो, '७००*१०^७ माणसे १०० वर्षे' आणि '१००० वा १०००० माणसे (आता म्हणू नका हा फार कमी आहे म्हणून. ११ हजार वर्षांपूर्वी ३० लाख लोकसंख्या होती. मी बोलतोय २२ लाख वर्षंपूर्वीचं)७००*१०^६ किंवा ७००*१०^५ वर्षे' यांच्यात तितकीच म्यूटेशन्स व्हायला हवीत. एवढ्यात माणसाचा माकड कसा झाला हेच काय, कशापासून माकड झाले हे देखिल कवर होतेय. हिशेब करून बघा. आणि तुमच्या काहीच उदाहरणं नसावित? आणि मीच भोंगळ?

२२ लाख वर्षांत होमिनिडचा माणूस झाला, तो तुम्ही गेल्या दीडशे वर्षांत अभ्यासला. आता दीडशे वर्षांत माणसाचे अजून एखादे व्हेरिएशन दाखवा म्हटले तर लाखो-हजारो वर्षे लागणार असे आजवरचा अनुभव सांगतो. यावर "का?" ला उत्तर नाही. निरीक्षण केलेय त्यात असे दिसले इतकेच उत्तर. त्यामुळे दीडशे वर्षांत पिवळा/हिरवा माणूस पैदा झाला नाही याचा अर्थ डार्विन खोटा इ.इ. बादरायण संबंध लावू पाहणं रोचक आहे.

आणि प्रत्यक्ष सँपल स्पेस फार जास्त मोठा आहे. मागे धनंजय यांनी स्पष्ट केलेले होते. ते जमल्यास पाहणे.

उत्क्रांतीचा किसच पाडायचा म्हटला ना तर डार्वीन इतका मोठा हास्यास्पद प्रकार कोणी निघणार नाही.

प्रत्यक्ष प्रयोगांतीच्या निष्कर्षांचा सैद्धांतिक पातळीवर कीस पाडून विरोध करणे याइतका हास्यास्पद विचार दुसरा नसावा. प्रयोग काय केले, निरीक्षणे काय होती, हे न पाहता फक्त काही हाफ-बेक्ड शंकांच्या आधारे संपूर्ण शास्त्राला मोडीत काढू पाहणे हे कौतुकास्पद असले तरी मूलतः चूक आहे. त्यात डिटरमिनिझमचा वास आला आणि त्याआधारे डिटरमिनिझमला विरोध केला तर ठीक, पण म्हणून ओव्हरऑल कारणमीमांसेला मोडीत काढणे म्हणजे महाभारतातील एखाद्या प्रक्षिप्त उल्लेखावरून तत्कालीन समाजाबद्दल निष्कर्ष काढणे होय. (या विधानाला पूर्वीच्या कुठल्याची चर्चेचा संदर्भ नसून उपमा म्हणून वापरलेय फक्त.)

मी फक्त मुद्द्यांवर बोलणे पसंद करतो.

त्या मुद्यांमध्ये अवास्तव अपेक्षा आहेत, सबब त्यांवर टीका योग्यच आहे.

याचाही अर्थ सांगा. काय लोकांना न कळणार्‍या सह्या मिरवता राव!

लॉर्ड ऑफ द रिंग्ज नामक पिच्चरमध्ये जी "वन रिंग" असते त्यावरचा लेख आहे हा. "One ring to rule them all, one ring to find them; one ring to unite them all and in the darkness, bind them." हे त्याचं भाषांतर आहे. The language is that of Mordor, which I will not utter here Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२२ लाख वर्षांत होमिनिडचा माणूस झाला, तो तुम्ही गेल्या दीडशे वर्षांत अभ्यासला. आता दीडशे वर्षांत माणसाचे अजून एखादे व्हेरिएशन दाखवा म्हटले तर लाखो-हजारो वर्षे लागणार असे आजवरचा अनुभव सांगतो.

हा उत्क्रांतीच्या काळाचा नियम आहे का? म्हणजे उत्क्रांती व्हायला करोडो स्पेसीस (शक्यतेचे संभाव्य पॉइंट्स) असताना लाखो वर्शेच लागतात. आज जितके वैविध्य आहे ते पाहता, उत्क्रांती व्हायला खूप जागा मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वैविध्य आणि बदलाची टाईमफ्रेम यांचा पर्स्परसंबंध लावण्यात गल्लत होतेय. वैविध्य कितीही असले तरी बदलाचा रेट कमीच असणार. शिवाय माणसांच्या इतक्या मोठ्या सँपल साईझबद्दल तुम्ही सांगितलेत त्यामध्ये नक्की कशात अन किती वैविध्य आहे ते पहा म्हणजे कमी वेळात कशा प्रकारचे बदल अपेक्षिणे किमान रास्त आहे हे स्पष्ट होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा उत्क्रांतीच्या काळाचा नियम आहे का? म्हणजे उत्क्रांती व्हायला करोडो स्पेसीस (शक्यतेचे संभाव्य पॉइंट्स) असताना लाखो वर्शेच लागतात. आज जितके वैविध्य आहे ते पाहता, उत्क्रांती व्हायला खूप जागा मिळतात.

मुळात माणूस या प्राण्याला उत्क्रांत व्हावेसे वाटावे यामागे काय प्रेरणा आहे असे तुम्हाला वाटते? सध्याच्या माणसात त्याच्या जीवावर बेतेल असे काय आहे जे त्याने पुढिल पिढ्यांमध्ये बदलावे? थोडक्यात माणसाला आता या जगात जगण्यासाठी फारशी चॅलेंजेस न उरल्याने आधीच मंद असलेला उत्क्रांतीचा वेग अधिकच मंदावला आहे हे विधान फार चुकीचे ठरू नये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा दुवा तुम्हाला अधिक रोचक वाटावा.
शिवाय मनुष्यात काही एन्युजुअल म्युटेशन्स चालूच असतात ती जगायला उपयुक्त नसल्याने कॅरी होत नाहीत इतकेच. इथे १० अपवादात्मक म्युटेशने बघायला मिळातील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हेही चूकच.

मुद्दा इतकाच आहे की आधीच्या काळापेक्षा वेगळे बदल बघायचे असतील तर टाईमफ्रेम मोठी पाहिजे. आणि आत्ता ज्या पद्धतीने सुधारणा वैग्रे चालू आहेत, ते काही कायमचं टिकणारे थोडीच? काही हजार वर्षे टिकेल, परत मग येरे माझ्या मागल्या होईल. असे युनिलॅटरली काही होईल ही अपेक्षा मला अवास्तव वाटते. ते एक असो, मुख्य आक्षेप असा की काही शे वर्षांत उत्क्रांतीच्या रिष्टवाचातला काटा सेकंदानेही हलत नै तिथे तो आधीपेक्षा जास्त/कमी वेगाने हलतो असे कसे म्हणू शकाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा इतकाच आहे की आधीच्या काळापेक्षा वेगळे बदल बघायचे असतील तर टाईमफ्रेम मोठी पाहिजे.

मुळातल्या आक्षेपाशी सहमत आहेच.

ते एक असो, मुख्य आक्षेप असा की काही शे वर्षांत उत्क्रांतीच्या रिष्टवाचातला काटा सेकंदानेही हलत नै तिथे तो आधीपेक्षा जास्त/कमी वेगाने हलतो असे कसे म्हणू शकाल?

उत्क्रांतीची गरज मानवाच्या सुरूवातीच्या काळात त्याच्या भोवतालच्या असुरक्षिततेमूळे + जगभरात पसरायच्या प्रोसेसमुळे जितकी होती तितकी तीव्र राहिली नाही असे मला वाटते. अर्थात विदा/ठाम तर्क असा माझ्याकडे नाही व तसे नसल्याचे कोणि दाखवल्यास मान्य करायला अजिबात हरकत नाही.

एकूणच या विषयात गती बरीच कमी असल्याने अशी विधाने करून अधिकची माहिती मिळाली तर आवडेलच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात माणूस या प्राण्याला उत्क्रांत व्हावेसे वाटावे यामागे काय प्रेरणा आहे असे तुम्हाला वाटते? सध्याच्या माणसात त्याच्या जीवावर बेतेल असे काय आहे जे त्याने पुढिल पिढ्यांमध्ये बदलावे? थोडक्यात माणसाला आता या जगात जगण्यासाठी फारशी चॅलेंजेस न उरल्याने आधीच मंद असलेला उत्क्रांतीचा वेग अधिकच मंदावला आहे हे विधान फार चुकीचे ठरू नये

ऐसी वर हळूहळू उत्क्रांतीचे स्वरुप उलगडत आहे. वरील विधाने उत्क्रांतीच्या कार्यकारणभावाचा नियम म्हणून सांगता यावीत. आता एक आदर्श सजीव बनला आहे तेव्हा त्यास पुढील उत्क्रांतीची गरज नाही हे रोचक निरीक्षण मानतो.

बाय द वे ऋषिकेश, बॅक्टेरिया हे पर्फेक्ट सजीव आहेत का? म्हणजे नसतील तर ते मानवांपेक्षा अब्जावधी पट जास्त प्रमाणात आहेत. त्यांच्यात कोणत्या उत्क्रांती होत आहेत? रादर त्यांच्यात कोणत्या सुधारणा होत आहेत?

मानवाचे जगण्याचे चॅलेंजेस संपले आहेत ते केव्हापासून? गेल्या १०००० वा १०० वर्षापासून? मग त्याच्या लागलीच पूर्वी काय उत्क्रांती झाली? माणसाला शोध लागले हीच तर उत्र्कांती असे तर म्हणायचे नाही आपल्याला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुळात मी उत्क्रांती होतच नाहिये / होणारच नाही किंवा आदर्श सजीव जन्माला आला आहे वगैरे कोणतीही विधाने केलेली नाहित.
सध्या जो सजीव आहे त्याला बदलावे लागेल असे कोणतेही मोठे बदल त्या प्राण्याच्या सभोवती घडत नाहियेत, उद्या परिसर बदलला तर माणसात पुन्हा बदल होतीलच. उदा. खंडांच्या प्लेट्स सरकत आहेत त्यांची रचना काही लाख/कोटी वर्षात बदलली तर त्यानुसार माणसात आवश्यक ते बदल होतीलच किंवा समजा नवे हिमयुग आलेच नाही व बर्फ वितळातच राहिला व राहण्यायोग्य जमीन नाहिशीच होऊ लागली तरी माणसात (केवळ माणसात नाही इतरही प्राण्यात व एकूणच इकोसिस्टिममध्ये) मोठे बदल होतीलच.
मात्र हे बदल लाखो वर्षांत होतील.

मात्र समजा एखादा रोग वरचेवर माणसाला होऊ लागला व रोगचे उच्चाटन / किमान उपाय माणूस करू शकला नाही व त्या रोगामूळ माणसाची "मोठी" हानी होऊ लागली तर त्यावर उपाय म्हणून होणारी म्युटेशन्स किंवा प्रसंगी उत्क्रांती होण्यासाठी काही हजार वर्षेही पुरेशी व्हावीत.

वैधानिक इशारा: ही विधाने मला समजलेल्या माहितीवरून आहे व माझी माहिती दुर्लक्ष करण्यायोग्यतेची असु शकते. सदर विषय हा माझा रुचीविषय/अभ्यासविषय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माणूस हा इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे हे पटलं नाही.किमान भूक आणि रिप्राँडक्शन च्या बाबतीत तरी माणूस इतर प्राण्यासारखाच आहे.
जर भूक नसती तर आज बर्याच लोकांनी आत्महत्या केल्या असत्या अस वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wish you were here...

आहार , निद्रा , भय, मैथुन असे चार basic instincts मान्य केले तर …
आहारामुळे नाही पण भय नसत तर नक्की आत्महत्या केल्या असत्या बर्याच लोकांनी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान मांडलत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आवडला. अस्तित्ववाद ही माझी तत्त्वज्ञानाची आणि तत्त्वज्ञान्ची आवडती जातकुळी. (मी स्वतःला कुठल्याही 'वादा'शी चिकटवून ठेवत नाही पण कशाचाही अभ्यास, रसग्रहण करण्यात स्वःला अडकाठी आणत नाही.) वर चालू असलेली ही प्रतिक्रियांची देवाण-घेवाण (त्यातून रोचक माहिती मिळाली असली तरीही) जैविक-वैज्ञानिक अंगानेच का व्हावी हे कळत नाही. अभिमन्यूचा लेख ज्या प्रश्नांकडे तळमळीने आपलं लक्ष वेधतोय त्यांची उत्तरं शोधायला फक्त विज्ञान पूरं पडेल असं मला नाही वाटत. विज्ञानाच्या, अध्यात्माच्यासुद्धा पलीकडे जाऊन आपण कुठल्याही क्षेत्रातील पूर्वसुरींना उधृत न करता स्वतंत्रपणे विचार करायला हवा ह्या प्रश्नांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin