पुण्यातला हिवाळा

ऑक्टोबर मधल्या गरमीचे कंटाळवाणे दिवस सरता सरत नसताना अचानकपणेच यावर्षी हिवाळा पुण्यात येऊन दाखल झाला. भारतीय द्वीपकल्प किंवा निदान या द्वीपकल्पातील मध्यवर्ती भागात असलेल्या दख्खनच्या पठारी प्रदेशाला, खरे तर उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणणेच योग्य ठरावे, कारण वर्षातील बहुतेक महिने या प्रदेशात गरम हवाच सातत्याने असते. परंतु विषुववृत्ताच्या बर्‍याच उत्तरेला किंवा दक्षिणेला असलेल्या भूप्रदेशांवर जसे उन्हाळा-हिवाळा हे दोनच ऋतू येतात तसे दख्खनच्या पठारावर न येता प्रत्यक्षात 3 ऋतू येतात. हा तिसरा अगांतुक ऋतू, उन्हाळा पराकोटीला पोचलेला असताना सुरू होणार्‍या नैऋत्य मॉन्सून वार्‍यांबरोबरच अचानकपणेच येतो. या वार्‍याबरोबर भारतीय द्वीपकल्पावरचे हवामान एकदम बदलते. उन्हाळ्याच्या झळांचे एकदम शीतल आणि सुखद अशा वार्‍यामध्ये रूपांतर होते व हवामान एकदमच सुखदायक बनते. जादूच्या कांडी सारखे हवामान बदलणार्‍या या ऋतूला अर्थातच आपण वर्षा ऋतू या नावाने ओळखतो.

साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पाऊस ओसरण्यास सुरुवात होते व भारतीय द्वीपकल्प उन्हाळ्याच्या तडाख्याखाली काही दिवसांसाठी का होईना पण परत एकदा सापडते. परंतु ओसरणार्‍या नैऋत्य मौसमी वार्‍यांची जागा आता ईशान्य मौसमी वारे घेतात आणि परत एकदा भारतीय द्वीपकल्पाच्या प्रामुख्याने दक्षिण भागावर पावसाळी ढग दाटू लागतात. हे वारे कर्नाटकातील बेंगळूरू शहरापासून दक्षिणेकडे तामिळ्नाडू आणि पार केरळापर्यंत परत एकदा वर्षा ऋतू आणतात.

ईशान्य मौसमी वार्‍यांच्या प्रभावाखाली येणार्‍या या पट्ट्याच्या बरेच उत्तरेला पुणे शहर स्थित असल्याने हे पावसाळी ढग पुण्यापर्यंत पोचण्यात यशस्वी होत नाहीत आणि याच सुमारास उत्तरेकडून वाहणारे वारे मात्र हिमालयातील थंड हवा पुण्यापर्यंत पोचवतात व परिणामी पुण्याला या दिवसात छान कोरडी हवा व थंडीची चाहूल देणारे तपमान हे नेहमीच अनुभवण्यास मिळते. पण याच काळात बंगालच्या उपसागरात चक्री वादळे निर्माण होण्यास सुरूवात होते आणि या चक्री वादळांपैकी बहुतेक भारताच्या पूर्व किनार्‍यावर एका पाठोपाठ येऊन धडकत राहतात. एकदा का ही चक्री वादळे भारताच्या पूर्व किनार्‍यावर पोहोचली की त्यांचे कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागत नाही आणि या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे त्या भागातील आकाशात परत एकदा कृष्ण मेघ येऊन दाखल होतात. हे कृष्ण मेघ पुण्यावर काही दिवसातच पोहोचतात व पुण्याला वादळी पावसाचे हवामान परत एकदा जाणवू लागते. हा कमी दाबाचा पट्टा हिमालयाकडून येणार्‍या थंड वार्‍यांना पळवूनच लावतो आणि पुण्यातील हवा परत एकदा पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसात असते तशीच बनते. उकाडा आणि चिकचिकाट यांनी लोक त्रस्त होतात. हे असे थोडे दिवस चालते पण मग मेघ लुप्त होतात आणि परत एकदा उत्तरेचे थंड वारे मस्तपैकी गारवा घेऊन पुण्यात अवतीर्ण होतात.

या वर्षी सुद्धा साधारणपणे याच धर्तीवर हवामान बदलत गेले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस छान गारवा सुरू झाला होता आणि रात्रीचे किमान तपमान 11 अंशांपर्यंत खाली उतरले होते. पण या नंतर फायलिन हे चक्री वादळ प्रथम आले व त्याच्या मागोमाग हेलन आणि लेहर ही चक्री वादळे आली. या प्रत्येक चक्री वादळाने बरोबर पावसाळी मेघ आणले आणि पुण्यातील हवामान परत एकदा उकाडा, मेघगर्जनेसह पाऊस आणि चिकचिकाट यांच्या चक्रातून गेले. आता जरा कोठे या पावसाळी हवेपासून पुणेकरांची सुटका झाल्यासारखी दिसते आहे. हवा परत एकदा थंड झाली आहे व रात्रीचे किमान तपमान दशकाच्याही खाली उतरले आहे. सकाळी आता चांगलेच थंड होते आहे व दुपारचे 3 वाजत नाहीत तोच संध्याकाळच्या लांब सावल्या पडू लागल्या आहेत व येणारे दिवस आता लहान असणार आहेत याची जाणीव करून देऊ लागल्या आहेत.

भारतीय द्वीपकल्पावरचा हिवाळा हा उत्तरेकडच्या भागावर येणार्‍या या ऋतू पेक्षा बराच निराळा असतो. द्वीपकल्पावरच्या भागातील बहुतांशी झाडे 12 महिने हिरवीगार रहातात व पानगळ अशी नसते. त्यामुळे उत्तरेकडे येणारा फॉल हा ऋतू येथे येतच नाही. उत्तरेकडे एकदा फॉल सुरू झाला की वृक्षांची सर्व पाने गळून जातात आणि पुढचे 3 किंवा 4 महिने सर्वच वातावरण मंद, कुंद, नैराश्य पूर्ण आणि असाहाय्य असल्यासारखे भासू लागते. द्वीकल्पावरील भागात मात्र झाडांवर हिरवीगार पाने दिसतात व छान आणि प्रखर नसणारे ऊन पडते. यामुळे हा ऋतू येथे लोकांच्या विशेष आवडीचा असतो यात नवल असे ते काहीच नाही.

काही दशकांपूर्वी पुणे हे 2 लाख वस्ती असलेले छोटेखानी शहर होते. शहरात कॉन्क्रीटची जंगले, फ्लायओव्हर नव्हते. अगदी चौकाचौकात आढळणारे वाहतूक नियंत्रक दिवेही तेंव्हा नव्हते. त्या काळच्या पुण्याच्या हिवाळ्यात परत एकदा येथे डोकावण्याचा मोह मला आवरत नाहीये. त्या काळातला हिवाळा म्हणजे सकाळी हुडहुडी भरवणारी थंडी आणि धुके- छान उबदार दुपारी- आणि लांब लांब रात्री असे थोडक्यात सांगता येईल. सकाळी उठल्यावर समोर येणारा वाफाळलेला चहा आणि रात्री माझ्या आईचे गरमागरम जेवण हे लगेच माझ्या नजरेसमोर येते. त्या काळात पुण्यात एवढी झाडे झुडपे होती की आजूबाजूला जरा शोधले की भरपूर काटक्या मिळत. या काटक्या वापरून सकाळ संध्याकाळ रस्त्याच्या कडेला पेटवलेल्या शेकोट्या व त्यांच्या शेजारी शेकत बसलेली मंडळी नेहमी दिसत असत.

आजकालचे पुणे शहर खूपच बदललेले आहे. आताचे पुणे म्हणजे एक महानगर झाले आहे आणि जुन्या पुण्याच्या आठवणी क्वचितच कुठेतरी रेंगाळताना दिसतात. असे जरी असले तरी प्रत्येक हिवाळ्यात माझे मन परत एकदा माझ्या लहानपणच्या पुण्याच्या हिवाळ्यात गेल्याशिवाय राहूच शकत नाही आणि गेले ते दिवस! असे मनाला वाटल्याशिवायही रहात नाही. पण यालाच तर जीवन ऐसे नाव! म्हणायचे, नाही का?

19 डिसेंबर 2013

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अगदी छान लेख. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छान लेख. लहानपण पुण्यात न गेल्याने जुने पुण्याच्या आठवणी फक्त ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान लेखन! आवडले.

अवांतरः याही वेळा पुन्हा "गरमी" हा हिंदी-मराठी संमिश्र शब्द खटकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश यांचा हिंदी-मराठी संमिश्र शब्दांबद्दल रोश का आहे ते मला समजू शकत नाही. माझ्या मताने लेखनात एक विशिष्ट फ्लेवर हचा असला तर उर्दू, फारसी, हिंदी किंवा इंग्रजी शब्द वापरण्यानेच तो आणता येतो. तेथे समान अर्थाचा मराठी शब्द घालून तो आणता येत नाही. उदाहरणार्थ वरील वाक्यातील फ्लेवर हा शब्द आहे. मला हवा असलेला अर्थ मी येथे चव हा शव्द वापरून आणू शकत नाही. कोणता आणि कोणत्या भाषेतला शब्द आपल्याला पाहिजे असलेला अर्थ वाक्यामधून निघण्यासाठी वापरायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य लेखकाला असते आणि असले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. या अशा ललित लेखनात असे स्वातंत्र्य असले पाहिजे याच्याशी संमत आहेच.
फक्त कसे आहे की, आपले वरील लेखन हे त्या संमिश्र लहेज्यातील नाही. उर्वरीत सारे लेखन प्रमाणभाषेत असताना, 'गरमी' हा अचानक येणारा बोली भाषेतील शब्दप्रयोग मला खुपला. त्याऐवजी 'उकाडा' हा शब्द बाकी लेखाच्या प्रकृतीमध्ये अधिक साजला असता असे वैयक्तीक मत.

अर्थातच गरमीमध्ये 'गैर' असे काही नाही, पण प्रत्येक प्रकारच्या लेखाकडून एक चौकट आपोआप अपेक्षिली जाते. एखादे लेखन ही चौकट असे काही भेदते की आनंदाश्चर्य वाटते तर काही वेळा प्रयोग खुपतो. स्तुती बरोबरच, तो खुपणारा प्रयोग एक वाचक म्हणून व्यक्त करणेही मी योग्यच समजतो.

बाकी, या लेखात आलेला एखाद्या ठिकाणी 'गरमी' आहे असे म्हणताना 'उकाडा' आहे याहून वेगळी- एखादी विशिष्ट- अर्थछटा (किंवा मराठीत 'फ्लेवर') अभिप्रेत असेल तर माझा आक्षेप मागे घेतोच, मात्र या शब्दातून कोणता 'फ्लेवर' मिळतो आहे याची जिज्ञासेपोटी विचारणाही करतो.

जाता जाता: हाच शब्द हवा अशी मागणी नाही. पण तरी गरमी हा शब्द मात्र खुपतो. अर्थात या आक्षेपाला मान्य करणे/ न करणे, शब्द बदलणे/न बदलणे हे लेखकाच्या अखत्यारित आहे आणि त्याच्या मताचाही आदर आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता या विषयावर चर्चा आलीच आहे म्हणून मी उकाडा व गरमी या दोन शब्दातील मला अभिप्रेत असलेला फरक येथे देतो. माझ्या मताने मुंबईला होतो तो उकाडा असतो आणि पुण्याला जाणवते ती गरमी असते. शास्त्रीय शब्दात बोलायचे तर ह्युमिड हीट आणि ड्राय हीट यातील तो फरक आहे. लेख पुण्यासंबंधी असल्याने गरमी हा शब्द माझ्या दृष्टीने जास्त योग्य ठरतो. अर्थात प्रत्येक वाचक याच्याशी सहमत असलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा अर्थातच नाही.

आपण लेखातील पुढचा परिच्छेद बघितलात तर तेथे उकाडा हा शब्द वापरलेला आपल्याला दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उकाडा हा फक्त आर्द्र उष्णतेस वापरला जातो हे मला माहिती नव्हते.
मी गरमी हा शब्द वापरलाच तर तो माफक-माईल्ड उष्णतेला वापरत असल्याचे पाहिले होते.

तुमच्या प्रतिसादानंतर मुद्दाम मोल्सवर्थमध्ये पाहिले तर असे दिसते की
गरमी (p. 225) [ garamī ] f ( P) Heat or warmth.
उकाडा (p. 085) [ ukāḍā ] m (उकडणें) Sultriness or close heat

पण असो.
तुम्ही म्हणताय तो अर्थ मला 'उकाडा'मध्येही दिसला नाही तेव्हा माझा आक्षेप मागे घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अवांतरः
एकाच अर्थाच्या एकाहून अधिक अर्थछटा दाखवणारे अनेक शब्द असतात. त्यांची मुळं वेगवेगळ्या भाषांमधे असतात. अजाणता / मुद्दामहून केलेला वापर / शब्दाचं मूळ / शब्दाची भौगोलिक व्याप्ती; पारिभाषिक / बोली भाषांमधे त्या त्या शब्दांना प्राप्त झालेले अर्थ... या सार्‍यामुळे शब्दांना या अर्थछटा चिकटतात. या अर्थछटा निश्चित करण्याचं काम कोशांनी केलं पाहिजे. पण दुर्दैवाने मराठीत हे झालेलं नाही. जे झालं आहे त्यात एकवाक्यता नाही. परिणामी त्याचा काहीही उपयोग नाही. माहोल, वातावरण; सरहद्द, सीमा; उकाडा, गरमी, उष्णता.... असे असंख्य शब्दगट सापडतील.
अतिअवांतरः
अशा शब्दांच्या व्याख्या निश्चित करण्यात कुणाला रस आहे काय? इथे असा एक धागा मस्त चालेल आणि महत्त्वाचं कामही होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१
मुळात समानार्थी शब्द म्हणजे "अर्थ साधारतः समान मात्र अनेकदा अर्थछटा वेगळी" असाच शिकवला पाहिजे.

अशा शब्दांच्या व्याख्या निश्चित करण्यात कुणाला रस आहे काय? इथे असा एक धागा मस्त चालेल आणि महत्त्वाचं कामही होईल.

काही ठाम व्याप्ती व मर्यादेला निश्चित करून धागे येत असतील तर आवडेल Smile
नाहितर नुसतीच सारख्या शब्दांची यादी तयार व्हायची त्याची व्याख्या निश्चिती दूरच रहायला नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशा शब्दांच्या व्याख्या निश्चित करण्यात कुणाला रस आहे काय? इथे असा एक धागा मस्त चालेल आणि महत्त्वाचं कामही होईल.

अगदी!!

अवांतर - कोकणात "उकाडा" हा शब्द "रतीब" ह्या अर्थानेदेखिल वापरला जातो. उदा. रामभाऊंनी आजपासून दुधाचा उकाडा लावला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तर जाहिरातींमधून 'गरमी परमा' अशा संदर्भातहि 'गरमी' हा शब्द पाहिला आहे. मोल्सवर्थ साहेबांचे सगळे साहाय्यक एकादष्ण्या-श्रावण्या करणारे आणि साजूक तुपातले लाडूच खाणारे असल्यामुळे त्यांना ह्या अर्थाचा पत्ताच नव्हता असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तर जाहिरातींमधून 'गरमी परमा' अशा संदर्भातहि 'गरमी' हा शब्द पाहिला आहे.

आम्ही तर उलट आपण म्हणता त्या एकमेव संदर्भात 'गरमी' हा शब्द मराठीत वापरलेला पाहिलेला आहे. मोरेश्वरभटास अथवा त्याच्या तुपातल्या सहकार्‍यांस तो मराठीत 'उकाडा' अशा (किंवा तत्सम) अर्थाने वापरला गेलेला कधी (आणि कोठे) दिसला, तेच जाणोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या एकमेव संदर्भातच गरमी हा शब्द वाचला होता. उकाडा या अर्थाने गरम हा शब्दच पाहिला आहे. (हुश्श!... काय गरम होतंय)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरमी हा शुद्ध मराठी शब्द आहे. डिक्शनर्‍या बघायची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'गरमी' हा शुद्ध मराठी शब्द असण्याबद्दल दुमत नाही. मात्र, त्याचा मराठीतील अर्थ आपणांस अपेक्षित असलेला नसावा, एवढेच सुचवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरमी हां शब्द काही जणांच्या बोलण्यात ऐकला आहे पण शुद्ध पुणेरी भाषेत नाही. उकाडा, काहिली हे शब्द मात्र ऐकले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. प्रमाण मराठी वाचताना गरमी हा शब्द खुपतो ह्या ऋषिकेशच्या मताशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरमी या शब्दाचा दुसरा अर्थ मला ज्ञात आहे. परंतु ड्राय हीट या इंग्रजी शब्दांचे चपखल भाषांतर होईल असा दुसरा मराठी शब्द मला तरी सुचलेला नाही. इतर कोणी सुचवल्यास लेखातील मूळ शब्द बदलत येईल. अर्थात उकाडा हा शब्द या जागी योग्य नाही. त्याशिवाय दुसरा शब्द जरूर सुचवावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यातून उष्माघात होतो तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उष्माघात हा एक विकार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तलखी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्फेक्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गरमी मुळे तलखी होते. तेंव्हा हा शब्द अयोग्य वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच पुण्यातील हिवाळा मीहि अनुभवला आहे.

त्याची एकच आठवण नोंदवतो. थंड हवेमध्ये आवाज दूरवर जातो हे शाळेमध्ये आपण शिकतोच. त्याचा मला आलेला अनुभव म्हणजे पुणे स्टेशन शंटिंग यार्डमधील शंटिंगचा डबे एकमेकांवर आपटण्याचा आवाज मी रात्रीच्या शान्ततेमध्ये सदाशिव पेठेमध्ये खजिना विहिरीजवळ ऐकलेला आठवतो.

मर्ढेकरांनी वर्णिलेला मुंबईतील हिवाळा पहा. एकेकाळी मुंबईतहि तो थोडा जाणवत असे.

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर.
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा,
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा...

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी.
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी.
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती.
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती.

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी.
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध,
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध.

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा.
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा,
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रीमान कोल्हटकर,

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा.
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा

"अर्ध्य" हा शब्द मराठीत आहे का? असल्यास त्याचा अर्थ काय?
तो "अर्घ्य" असा असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेच म्हणाल, तर 'परवशतेच्या नभात तूचि आकाशी होशी'ला तरी काही अर्थ आहे काय? ते 'परवशतेच्या तमात' असावयास नको काय? पण वाजवतेच आहे ना 'आकाशवाणी' इतकी वर्षे 'नभात' म्हणूनच, आणि ऐकून घेतोच आहोत ना आपण तस्सेच? (सावरकर इतकेही दुर्बोध नसावेत बहुधा, की ओळीचा अर्थ लागला नाही तरी त्यात कोणास काही वावगे वाटू नये... ;))

मग ते जर खपवून घेत आलो आजवर, तर हेही खपवून घेऊयाकी! (तसाही कवितेच्या अर्थाने इथे नेमका कोणास नि काय फरक पडतो? ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे म्हणणे बरोबर आहे. 'अर्घ्य' असे हवे 'अर्ध्य' नाही.

तेथेच थोडे आधी 'अजस्र' असे हवे होते, 'अजस्त्र' नाही.

कॉपीपेस्ट केल्याचा परिणाम! रामदासांनी म्हटलेच आहे 'जो दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख थोडासा विस्कळीत वाटला, पण विषय आवडीचा असल्याने आवडला.
हा तिसरा अगांतुक ऋतू, उन्हाळा पराकोटीला पोचलेला असताना सुरू होणार्‍या नैऋत्य मॉन्सून वार्‍यांबरोबरच अचानकपणेच येतो.
हे थोडे खटकले. पावसाळा (मान्सून या अर्थी) ही प्रक्रिया समुद्रावर आणि भूतलावर कित्येक महिने आधी सुरु होते असा माझा समज आहे. चू.भू.दे.घे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मॉन्सूनची प्रक्रिया आधी काही महिने चालू झालेली असेल पण पुण्यामध्ये तो ज्येष्ठाचे कडक ऊन पडलेले असतानाच येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते आपण दोघे पुणे नावाच्या दोन वेगवेगळ्या गावांबद्दल बोलत आहोत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हा तिसरा अगांतुक ऋतू, उन्हाळा पराकोटीला पोचलेला असताना सुरू होणार्‍या नैऋत्य मॉन्सून वार्‍यांबरोबरच अचानकपणेच येतो.

पहिला अधोरेखित शब्द 'आगंतुक' असा असावयास नको काय?

शिवाय, दुसरा अधोरेखित शब्द हा बहुधा 'नैर्रृत्य' (बोले तो, 'ऋ'वर रफार, च्यामारी इथे नीट उठत नाही वाटते - कॉपीपेस्ट करून 'नैर्ऋत्य') असा लिहिला जातो, असे वाटते. (चूभूद्याघ्या. आणि मोरेश्वरभट काहीही म्हणो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोनिअर विल्यम्समध्ये निर्ऋति/नैर्ऋति (निर्-ऋ-ति/नैर्-ऋ-ति) (Nir-ri-ti/Nair-ri-ti) हे एका राक्षस-सदृश व्यक्तीचे नाव दाखविले असून तो स्वामी असलेली दिशा म्हणून नैर्ऋत्य (Nair-ri-tya)असे दाखविले आहे. मो.वि. कोशातील diacritical खुणा येथे दाखविता येत नाहीत पण ri मधील r च्या खाली एक बिंदु आहे आणि अशा बिंदुयुक्त ri ह्याचा उच्चार 'ऋ' असा होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते 'निर्ऋति/नैर्ऋति' इथे कसे टंकलेत? (की कॉपी-पेस्ट?)

(मला जमले नाही, कॉपी-पेस्ट करावे लागले, म्हणून विचारतोय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैर्ऋती
नै *rr * ऋति
मग एक r कमी करा बॅकस्पेसने Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

र्ऋ rr-backspace-Ru

रोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐसीअक्षरे' येथे पायमोडकी वगैरे अक्षरे दाखविण्यास बराच त्रास पडतो. अशा वेळी मी तेवढे बराहामध्ये टंकून येथे कॉपीपेस्ट करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटलेच मला. (वर सारीकातैंनी दिलेली ट्रिक चालतेसे दिसते, पण ती लक्षात यायला कठीण आहे. एकंदरीत हा प्रकार इंट्यूटिव नाही, आणि त्यापेक्षा कॉपी-पेस्ट अनेकदा परवडते खरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगांतुक म्हणजे अवचित किंवा अकस्मात
आगंतुक म्हणजे न बोलवता आलेला पाहुणा

असे मला तरी वाटते. कदाचित हा शब्द दोन्ही पद्धतीने लिहिला जात असण्याचीही शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आगन्तुक हेच बरोबर आहे. अगांतुक हे त्याचे बोलीभाषेत झालेले रूपान्तर आहे पण त्यालाहि वापरामुळे मान्यता मिळाली आहे असे वाटते. मोल्सवर्थमध्ये केवळ 'आगंतुक' दाखविला आहे पण १९२० साली प्रथम प्रकाशित झालेल्या वा.गो.आपटे ह्यांच्या 'मराठी शब्दरत्नाकरा'त दोन्ही शब्द आहेत.

'कर्तुमकर्तुम्' ह्याचे बोलीभाषेत 'कर्तुं कर्तुं' होते, 'एकादशी'चे 'एकादष्णी' होते, 'सूर्यापोटी शनैश्चर'चे 'सूर्यापोटी शनैश्वर' होते आणि 'अठराविसे दारिद्र्य' 'अठरा विश्वे दारिद्र्य' होते तसेच!

'आगन्तुक'वरून त्याच नावाच्या सत्यजित राय ह्यांच्या सुंदर चित्रपटाची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा पण भिंग घेऊन चुका काढण्याचा हेतू नव्हता.
सहज दिसले आणि खटकले म्हणून दाखवले.
मी काही फार शुद्ध लिहितो असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भिंग घेऊन चुका काढण्याचा तुमचा हेतू होता, असे कोण म्हणतो?

"The road to hell is paved with good intentions" हे कधी ऐकले नाहीत काय?

पाहिलेत ना, काय सुरू केलेत ते? कोठे फेडाल ही पापे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असाहाय्य = असहाय्य?
शुद्ध = शुध्द??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'असहाय'.

बाकी, 'शुध्द' अशुद्ध!!! ('शुद्ध'!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

oops I used to think 'शुध्द' is correct word Sad
Thanks for correcting.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या शब्दांमध्ये बराच गोंधळ होतो. 'सहाय' म्हणजे मित्र (सहाय दुसरा नसे तुजविणे बळे आगळा, न हो जरि उताविळा स्वरिपु कापितो हा गळा -मोरोपंत केकावलि) आणि 'असहाय' म्हणजे ज्याला कोणी मित्र नाही असा.

'सहाय' पासून भाववाचक नाम 'साहाय्य' (सहायस्य भावः साहाय्यम्.) साहाय्य देणारा म्हणजे साहाय्यक.

ह्यापलीकडे जाऊन मोनिअर विल्यम्सने 'साहायक' (मदत देणारा) असाहि एक शब्द 'सहाय' पासून दाखविला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<(वर्षा ऋतु) उन्हाळा पराकोटीला पोचलेला असताना सुरू होणार्‍या नैऋत्य मॉन्सून वार्‍यांबरोबरच अचानकपणेच येतो. >

अचानकपणेच? तर मग 'नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा' ह्याचा अर्थ काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्षा ऋतू नेमेचि अचानकपणे येतो असे समजायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, यामुळेच ऊपक्रमावर जायचं बंद केलं होतं...
असो
चंद्रशेखरभाऊ, लेख आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक यू !
एक मार्मिक घेउन टाका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लहानपणी पुण्याच्या अत्यंत निसर्गरम्य cantonement भागात बालपण गेलेले आहे. टेकड़ी वर मनसोक्त हुंदडणे व थंडीच्या दिवसात काटक्यांची शेकोटी करुन शेक घेत गप्पा हाकणे या अत्यंत सुस्त व रम्य आठवणी आहेत.

बर्फीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुने
आँखों में भीगे-भीगे से लम्हे लिए हुए

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी पुण्याच्या अत्यंत निसर्गरम्य cantonement भागात बालपण गेलेले आहे.

(१) आणि मग मोठेपणी बालपण कोठे गेले? (आता "हरऽवले!", "काऊने नेले!" म्हणून सांगू नका प्लीज.)
(२) Cantonement नव्हे हो, Cantonment! (अच्छा क्याम्पातल्या होय तुम्ही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भलतेच छिद्रान्वेषी बॉ तुम्ही ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रचंड प्रचंड अश्लील!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छिद्र म्हणजे दोष असा अर्थ संस्कृतमध्ये आहे त्यावरूनच हा शब्द आलेला आहे. आमच्या पदरीचा नोहे. Smile

हा बघा पुरावा. त्या क्रियावाचक शब्दावरून हे विशेषण तयार झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile camp nahi pan tithech. Netaji nagar Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं मस्तं लेखाची या शब्ददांडग्या लोकांनी किस काढून वाट लावलीय.
अर्थात जुने स्कोअर सेट करित असतील तर माहिती नाही.
आणि मस्तं हा शब्दही मराठीत चांगला अश्या अर्थाने न वापरता माजोरडा अश्या अर्थाने वापरावा असे काही लोकांचे म्हणणे आहे हे ही माहित आहे.

मला लेख आवडला.
यावर्षी पूण्यात जरा जास्तच थंडी पडलीय.
बाकी हल्लीच्या थंडीला पूर्वीच्या पूणे/ बंगलोर/ मुंबई/ झुमरीतलैया च्या थंडीची सर नाही असे विचार डोक्यात येऊ लागले की आपल्या सावल्याही लांब पडू लागल्यात हे ओळखावे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं मस्तं मस्त मस्त.
किस कीस.
जुने स्कोअर सेट जुने स्कोअर सेट.
माहित माहीत.
पूण्यात पुण्यात.
पूणे पुणे.
झुमरीतलैया च्या झुमरीतलैयाच्या.

हिशेब येणेंप्रमाणे. (इन्स्टंट सेटलमेंट.) तूर्तास व्याज आकारलेले नाही. कलोअ.

बाकी हल्लीच्या थंडीला पूर्वीच्या पूणे/ बंगलोर/ मुंबई/ झुमरीतलैया च्या थंडीची सर नाही असे विचार डोक्यात येऊ लागले की आपल्या सावल्याही लांब पडू लागल्यात हे ओळखावे.

"'सर पे कफ़न बाँधे' फिरणार्‍या पठाणागत एक पाय कायम थडग्यात (नि दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोवून) हिंडणार्‍यांस सावल्यांकडे लक्ष देण्यास फुरसत नसते." - 'न'.बा. दवणे (की काळे? चूभूद्याघ्या.), इन्स्टंट क्वोट.

(अतिअवांतर: 'लेखाची वाट!' हे शीर्षक वाचून, प्रस्तुत लेखाचा लेखक ज्याप्रमाणे मॉन्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहतो [असे मानावयास जागा आहे], तद्वत प्रस्तुत प्रतिसाददात्री ही आजवर [का कोण जाणे, पण] प्रस्तुत लेखाची आतुरतेने वाट पाहत तिष्ठत उभी होती, असे वाचावयास मिळेल, या आशेने प्रतिसाद वाचावयास घेतला, नि प्रचंड अपेक्षाभंग झाला. [असो, होते असे; चालायचेच!])

=================================================================================================================

तळटीपा:

पहा: २:२५ ते साधारणतः ३:२०.

पहा: "Life is a sexually transmitted disease, and the mortality rate is one hundred percent."

ज्याचीतिची आवड, त्याला काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक!
पण मी बोटं तोडलीत तरी मस्त लिहिणार नाही. मस्तं लिहिणार.

दवणेगिरी मात्र चुकून झाली हो.
लेखातले सावल्यांविषयीचे शब्दं वाचून लिहिले ते दवणीय झाले.
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचून पुन्हा काही काळापूर्वीचे चंद्रशेखर ह्यांचे लेख आतह्वले. तेही आवडले होतेच. ("अ‍ॅपल"वाल्या लेखामुळे चंद्रशेखर ह्यांचा आयडी चोरीला गेला से वाटले.)
मागे एकदा तुमच्या लेखाणात "खोदकाम" ऐवजी "खोदाई" शब्द खटकला होता.
पण माहितीने खच्चून भरलेल्या लेखाबद्दल हा खडा काढून का दाखवा म्हणून गप बसलो होतो.
आता तशीही शाब्दिक धुळवड सुरु आहे, तर मीही पिंक टाकतो एक.
.
.
बादवे, अर्थ कळतोय, कळतान फारसा त्रास होत नाहिये, इतके पुरेसे असावे. कोणता शब्द कुठला वगरिए सोडून द्यावे असे वाटते.
सोन्यावरचा कचरा काढायला त्याला जाळतात म्हणे. तसे शब्द बंबात घालून जाळला की मागे उरतो तो अर्थ्.तो पोचल्याशी मतलब, जळणाकडे कशाला लक्ष द्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars