कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

पार्श्वभूमी:
Crabby ह्या शब्दाचा Crabbie असा अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल.

मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.

प्रकार व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
मालिबू २ औस (६० मिली)
संत्र्याचा रस १ औस (३० मिली)
अननसाचा रस १ औस (३० मिली)
बर्फ
ग्लास मॉकटेल ग्लास

कृती:

कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.

झक्कास आणि क्रॅबी चवीचे 'क्रॅबी कॉकटेल' तयार आहे Smile

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

छान! फोटो भारी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इयर-एन्ड-पार्टी-स्पेशल दिसतंय. ज्यूसपेक्षा रम जास्त म्हणजे पोटंट असणार चांगलंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोत्रि = रसिक व्यक्तिमत्व.
जरा मॉकटेल्सच्याही कृती टाका की राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नववर्षासाठी कॉकटेलबरोबर एखादे फक्कड मॉकटेलही सांगा की राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!