अ‍ॅनिमल युथनेशिया : एक मानवतावादी उद्योग

मी एक शाकाहारी आहे, असण्याच कारण धार्मिक जराही नाही पण मांस खाण्याचा विचार केला तरीही गिल्ट येतो. प्राण्यांची हत्या बघवत नाही. झटाका (वेदनामयच पण) त्यातल्यात्यात थोडा बरा … हलाल वैगेरे प्रकार तर फारच अंगावर येतो, कोंबडी ,बकरे इत्यादींच्या फक्त मानेवर सुरा चालवायचा आणि वेदनामय मरण मरण्यास सोडून द्यायचे.
का?
काहीही तर्क लागत नाही उत्तर पण सापडत नाही.

शाकाहारी पण हत्या करतात वृक्ष-वल्ली मध्ये पण (मेन्दु नसला तरीही) जीव-वेदना असतातच पण त्याच्या वेदना निदान दिसत तरी नाहीत आणि प्राण्यांपेक्षा कमी असतात.
किटकनाशकाचा वापर इ. पण गिल्ट येत नाही. तर्कसंगत नाही पण एकंदरीतच जगण,संस्कार वैगेरे पण काही तर्कसंगत वाटत नाही. ज्या ठिकाणी, वातावरणात, धर्मात, जातीत जन्माला येतो त्यांचे काही जनुक असतात म्हणतात शरीरामध्ये, ते कारण असाव कदाचित गिल्ट न येण्याच असो!

युरोप - अमेरिकेमध्ये अनीमल युथोनेशिया( चांगला मृत्यू ) हा एक प्रकार प्रचलित आहे ज्यामध्ये प्राण्यांना पूर्णपणे वेदनारहित मरण देता येऊ शकत. परत खाताना चव पण बदलत नाही यावर पण बराच Research झालेला आहे.पाळीव प्राण्यानासुद्धा काही असाध्य रोग-जखम झाल्यास अनीमल युथोनेशिया वापरतात.

अनीमल अ‍ॅनिमल युथनेशिया मध्ये केमिकल वापरत नाहीत जेणेकरून मांस खाण्यायोग्याच राहाव.

उदा . पोल्ट्रिफार्म वैगेरे मध्ये कोंबड्यांना किंवा प्राण्यांना एका चेम्बर मध्ये नायट्रोजन / कार्बोन डाय-ऑक्साइड मध्ये श्वासोछ्वास करायला लावतात आणि नंतर ते बेशुद्ध पडतात(डॉक्टर ऑपरेशन च्या वेळी युथनेनेशिया देतात त्याप्रमाणे), मरतात मग त्यांना कापल्या जात. मायाजालावर बरीच माहिती उपलब्ध आहे.

जीव दोन्ही ठिकाणी घेतल्याच जातो पण मुद्दा आहे पद्धतीचा, मारतांना दिल्या गेलेल्या वागणुकीचा.

प्रश्न : अनीमल युथोनेशिया हा भारतामध्ये एक उद्योग म्हणून सुरु केल्यास प्रतिसाद मिळेल काय? (किंमतीमध्ये +५-१० रु चा फरक असल्यास)

कृपया चर्चेला धार्मिक वळण देऊ नये एक व्यवसाय म्हणून हा प्रश्न उपस्थित केलाये. कुठला धर्म चांगला आणि कुठला वाईट हि चर्चा फारच बोर होते.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

निव्वळ जाड्या टायपातील प्रश्न पाहिला तर प्रतिसाद मिळू शकेलही. जे लोक विशिष्ट पद्धतीनेच मारलेल्या प्राण्याचे मांस खातात उदा. हलाल त्यांच्याकडून प्रतिसाद मिळणे अवघड आहे पण प्रतिसाद मिळूही शकेल.

दॅट असाईड, मारायचेच आहे तर कसेही मारण्याने काय फरक पडतो असेही वाटते अन पेनलेस पद्धतीने मारावे असेही वाटते. यात भवति न भवति झाली की मग जाऊदे गप गड्या आपला शाकाहार बरा असे वाटू लागते. पण बर्‍याच दिवसांत तोंडाला वशाट कैतरी लागले नसेल तर मांस चापण्याचा मोहदेखील आवरत नाही.

थोडक्यात काय, इट्स ब्लडी मेस. असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाजूच्या धाग्यावरही हेच लिहायचं होतं.
ही गुंत मला समजत नाही.
मी भाजीपाला कापताना पाहू शकतो, भाज्या,धान्ये खातो.
दूध पितो.दूध काढले जाताना क्वचित पाहिलेही आहे.
म्हैस्-रेडा किंवा कोणताही प्राणी कापला जाताना बघवत नाही पण त्यांचे मांस खाणे सोडवतही नाही ह्या प्रकारास नक्की काय म्हणावे समजत नाही.
रेशीम कसे बनते ते ऐकल्यापासून ते वापरण्यासही कसेसेच होते. पण जनरेट्यामुळे वापरणे भाग पडते धार्मिक कार्यप्रसंगी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बॅटमॅन आणि मन ,दोघांचाही ब्लडी मेस, मनातील द्वंद्व कळलय …. माझापण तसाच काही तरी होत फरक इतकाच त्यामुळे मी आजवर तरी शाकाहारी म्हणून कायम आहे. बाबा बर्वे यांना दिलेला प्रतिसाद वाचून कृपया बाकीच्याच सोडा पण तुम्ही ५-१० रु जास्त खर्चायची तयारी ठेवाल काय ?
४-५ किलोमीटर गाडीच जास्त पेट्रोल खर्च काराल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फळे, भाजीपाला, धान्य व दूध इत्यादींचा समावेश माझ्या आहरात करतो.
रुढार्थाने मांसाहार म्हणतात तसे काहीही मी सध्यातरी करत नाही.
"म्हैस्-रेडा मारले जाताना वाईट वाटणे" हे मी बॅटमन ह्यांना म्हणालो.
पलीकडील धाग्यावर "कशाला उगाच त्यांना मारले जाताना पहायचे" असे ते म्हणतात, वर आवडीने चापून मांसभक्षण करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मसालेदार गिरवीत न्हालेले मांसाचे तुकडे चापावयास काही वाटत नाही पण ते प्राणी मारताना पाहून नै म्ह्टले तरी पोटात अंमळ ढवळतेच.

हे पलीकडील धाग्यावर मि आधिच बघितले होते आणि मला सगळ्यात पहिला प्रतिसाद
बॅटमनच देईल असे वाटले आणि निव्वळ योगायोगाने तसे घडले सुद्धा ( त्यामुळे माझा इगो सुखावला Smile ).
आवड म्हंटल्यावर झालेल्या/केलेल्या हिंसेच थोडाफार गिल्टसह मांसाचे तुकडे चापावया काय हरकत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवड म्हंटल्यावर झालेल्या/केलेल्या हिंसेच थोडाफार गिल्टसह मांसाचे तुकडे चापावया काय हरकत ?

ते तर तसेही चापतोच मूड असेल तेव्हा. Smile

मुद्दा इतकाच आहे की कधी कधी जे वाईट वाटते ते तेवढ्यापुरते खरेच असते. मग त्या वेळेस किंवा काही दिवस मांसाहार केल्या जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इल्लॉजिकल वाटण्यासारखं आहे खरं पण आहे हे असंच आहे, त्याला इलाज सध्यातरी नाही. अन असे वाटणारे कैक मांसभक्षी लोक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकीबाब बा भ बोरकर ह्यांनी मनसोक्त मासे आणि समुद्री अन्न आयुष्यबह्र आवडीने हादडले.
"मी मेल्यावर मला समुद्रात फेका म्हणजे मी बर्याच माशांवर जगलो, तसे कित्येक मासे माझ्यावर जगतील." अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती.
ती प्रत्यक्षात आणली की नाही ते ठाउक नाही. पण एक कल्पक प्रकार वाटला स्वतःला नैसर्गिक साखळीत सहजतेने झोकून द्यायचा.
म्हणजे खाताना, म्नभरुन खा, नंतर जिथून घेतलं तिथं परत करा.
(च्यामारी दवणे स्टाइल लिहोतोय काय? सॉरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile

बादवे हे वाक्य जैवंत दळवींनी म्हटले असल्याची शक्यता जास्त वाटते. अन तसे केले तरी प्रदूषण वैग्रे भानगडी आहेतच. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आठवत होते तसे टंकले.
दुरुस्तीबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भटक्या कुत्र्यांना मारण्यास सध्या भारतात बंदी आहे. पुण्यात गेल्या वर्षाभरात बारा हजाराहून अधिक लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आणि पंधराएक लोक रेबीजने मृत्यू पावले. भटकी कुत्री मारु नयेत, कारण त्यांना मारण्याची पद्धत वेदनादायक आहे अशी जर प्राणीमित्रांची भूमिका असेल तर या पद्धतीने प्राण्यांना मारायला त्यांची संमती असेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

भटक्या कुत्र्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना मारले जावे कारण गाडी चालवायला भारतात बंदी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण अदरवाईज कुत्री मारू नयेत, नसबंदी करावी ही कन्सेप्ट थोडी त्रासदायक ठरलिये, ती आपल्या देशातील सर्वव्यापी भ्रष्टाचारामुळे.
कुत्री पकडून मारायला नेणे, यासाठी लागतो तितका खर्च केल्यानंतर नसबंदी ऑपरेशनला व कुत्रे मारून त्याची विल्हेवाट करायला सारखाच खर्च येतो. फक्त फीमेल्सची नसबंदी केली तर निंम्मिच कुत्री पकडावी लागतील इत्यादि लॉजिस्टिकवर आधारित निर्णय कोर्टाने दिला असावा.
प्रॉब्लेम कागदोपत्री नसबंद्या दाखविणार्‍यांमुळे आहे.

बाकी गाडीखाली बद्दल सहमत.

मी एक एयर रायफल स्पेशल कुत्र्यांसाठी आणून ठेवली आहे. २०० फुटाच्या परिघात कुत्रे दिसल्यास पेलेटचा फटका देण्यात येतो. रात्रीबेरात्रीच्या कॉल्सना फार जीव घेतात हे कुत्रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी एक एयर रायफल स्पेशल कुत्र्यांसाठी आणून ठेवली आहे.
ही कुठे मिळते? किंमत काय?
प्राप्त करण्याचे वैध मार्ग कोणते ? प्रोसेस काय?
सिरियसली विचारतोय.
उत्तर दिल्यास आभारी असेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लायसन्स लागत नाही.
बिन्धास्त विकत आणा.
अडीच तीन हजारापासून अडीच तीन लाखापर्यंत किमती असतात.
Wink
हे पहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चुका काढण्याचा हेतु नाही पण हा शब्द Euthanasia यूथनेजिया असा काहीसा आहे. उच्चार येथे ऐका. 'युथोनेशिया' असा नाही. (तुम्ही ह्या क्षेत्रात काही व्यवसाय सुरू करण्याची चाचपणी करीत आहात असे वाटले म्हणून ही अनाहूत माहिती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'अनीमल' हा शब्द काळजास भिडला.

(वास्तविक, यातील मारण्याची पद्धत ही संपूर्णतया रक्तहीन आहे, हे लक्षात घेता, यास 'अनीमल'पेक्षा 'अनीमिक' यूथनेजिया असे संबोधणे कदाचित अधिक सयुक्तिक ठरणार नाही काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुरुस्तीबद्दल दोघाचेही आभार,बदल केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ऐकलेली माहिती (अर्थात ती गैरसमज असण्याची शक्यता आहे). हलाल पद्धतीने प्राण्यास मारल्याने मरताना त्या प्राण्याच्या शरीरात काही केमिकल्स निर्माण होतात. त्या केमिकल्स मुळे खाणार्‍याला 'सु'परिणाम होतात.

युथेनेशियामध्ये हा इफेक्ट येईल का? नाहीतर ज्यांना तसे मांस हवे आहे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळणार नाही.

(बंगलोरमध्ये जितकी हॉटेल्स पाहिली तेथे सर्वत्र हलाल मांस मिळत असल्याची ग्वाही दिलेली असते. उलट झटक्याचे मांस मिळेल अशी ग्वाही सहजपणे दिसून आली नाही. सर्व मुस्लिमेतर -हिंदू, ख्रिश्चन, ईशान्य भारतीय, शीख- लोक हलाल मांस सहजपणे-कोणताही किंतु न येता- खाताना दिसतात).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नक्की कोणते ते या क्षणी लक्षात नाही, गूगलून बघतो,
पण बेसिकली दोन टेक्निक आहेत.
१. मान पिरगळून मारणे,
२. मानेवर सुरी फिरवून.

दुसर्‍यात रक्त वाहून जाते, व पहिल्यात ते उतींमध्येच थिजते. परिणामी चव बदलते. फ्रेश कोवळ्या मटारच्या उसळीची चव फ्रोजन मटारीला येते का हो? खाणार्‍याला बरोबर समजते. Wink

बाकी केमिकल अन पॉझिटिव्ह परिणाम वगैरे नेहेमीच्या भूलथापा असाव्यत. त्यात्या धर्माच्या धर्मगुरुंना तमुक प्रकारची चव जास्त आवडत असल्याने त्यांनी त्या प्रकारचे मांस खाणे 'देवास आवडते' अशी लोणकढी मारलेली असावी असे माझे स्पष्ट मत.

(हे म्हणजे श्राद्धाला उडदाचे वडे कंपल्सरी का असतात या प्रश्नाच्या उत्तरासारखे आहे Wink )

ता.क.
गूगलल्यानंतर रिफ्रेश्ड मेमरी : हलाल म्हणजे 'परमिसिबल'. यात मुस्लिम नियमानुसार पोर्क, ब्लड इत्यादी वर्ज्य आहेत, म्हणजे २ नंबराप्रमाणे असावे.
असेही मोठे प्राणी मारताना १ क्र. ची टेक्निक वापरणे अंमळ कठीणच म्हणावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

निसर्गतः जे होते ते बाय डिफॉल्ट बरोबर असते हा सुप्त विचार हलाल मागे दिसतो. विशेषतः गळ्यावर सुरी मारणे वगैरेत.
चित्ता , वाघ किंवा मानवी निरिक्षणाचे विषय ठरलेले प्रमुख मांसाहारी सस्तन हे शिकारीच्या नरडीला नख लावतात. व तसेच घायाळ करुन मारतात अशी पारंपरीक निरिक्षण्/समजूत आहे.
आता शिकार करताना चित्ता, सिंह हे रेड्याचे पाय, पाठ जे हाती लागेल ते घट्ट धरुन त्याला तात्पुरते जायबंदी करत असतीलही; पण त्यांचा मुख्य निशाणा हा गळा/मान हेच असते.
माणसाने वाघाच्या छातीचे/धडाडीचे असावे, स्त्रीने हरीणाक्षी/मीनाक्षी असावे, सिंहकटी व गजगती असावे , लढवय्याने चित्त्यासारखे चपळ व हरणाइतके सावध्/चाणाक्ष असावे;
अशा समजुती प्रचलित असताना, वन्य जीवांच्या निरिक्षणाचा मानवी संस्कृतीवर पगडा असतानाच्या काळात विविध धर्म्,परंपरा निपजल्या. ह्यात बायो मिमिक्री हा प्रमुख उद्देश आहे.
अर्थातच ही सारी ऐकिव माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सिंहकटी
हे पुरुषाचे लक्षण आहे.
स्त्रीची कटी शिंव्हासारखी चिव्वळ नको.
Wide hips and ample breasts signify easy childbirth and excellent feeding capabilities. ergo, desirable in male point of view.
A male with Big chest and narrow hips, is active, virile, and being a better hunter, can procure more food, and protect the young in better way, than a paunchy male with narrow chest and short breath.. Wink imagine which one is more desirable from female point of view.. Obviously, u need to get rid of those bloody love-handles!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सिंहकटी हे स्त्री विशेषण बरोबरच आहे. हिप्स म्हणजे कंबर नव्हे. हिप्स म्हणजे नितंब. कटी म्हणजे वेस्ट. पहा 'हिप्स टू वेस्ट' रेशो. ३२-२४-३८ मध्ये २४ ही कटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायेबा, २४ ही कटी, असे सांगताना किमान मी शिंपी न्हाय डाग्दर हाये, आन कशाले काय म्हंतेत तित्कं शिक्लो हाय इत्कं तं क्रेडिट द्या?

कटिबंधाची हाडे = पेल्व्हिक गर्डल.
जऽरा गूगला.

१.
सौंदर्यसाधना
डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, December 17, 2010 AT 09:09 PM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
सौंदर्याच्या दृष्टीने तसेच एकंदर व्यक्‍तिमत्वाच्या दृष्टीने शरीरबांधा खूपच महत्त्वाचा असतो. स्त्री असो किंवा पुरुष असो, उत्तम बांधा हा सौंदर्यासाठी अत्यावश्‍यक असतो. सिंहकटी, रुंद छाती, कणखर शरीर हे पुरुषाच्या सौंदर्यात, रुबाबात भर घालतात. तर कमनीयता, बारीक कंबर, प्रमाणबद्ध छाती-नितंब हे स्त्रीसाठी महत्त्वाचे असतात.
२.
ती सिंहकटी देखोनी असुर व्यापिला कामबाणीं ह्मणे इची या नखावरुनी सांडणी करुं जिवाजी ॥१०॥
हे तर साक्षात परशुरामाचे वर्णन आहे.

च्याय्ला! माहितीपून्र श्रेणी देताना म्हायती भेट्टेय का न्हाय यासाठी गुगलभट्टास्नी तरी इच्चरत जावा की!!

बाकीची उदाहर्णे डकवत नाही. जरा गूगलत जावा किमान. बिन्धास्त ठोकून देणे ठिकाय. श्रेण्या देणे जरा जास्त होते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे घ्या गूगलबाबा -

मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोष -
सिंहकटी (p. 852) [ siṃhakaṭī ] f S A lion-waisted (i.e. having a waist delicately slender) female. A term of praise.

"ऐसी ती सुरत सुंदरी विमळासुरें गिरी शिखरीं पाहतां धांवला सत्वरी तियेलागीं स्पर्शावया ॥९॥ ती सिंहकटी देखोनी असुर व्यापिला कामबाणीं ह्मणे इची या नखावरुनी सांडणी करुं जिवाजी ॥१०॥ ती ऋषिकन्या ब्रह्मरुप श्रृंगार गंगा रमणीय दीप भोगा भिलाषें साक्षेप करिता जाला अत्तियुक्ती ॥११॥" - परशुराम महात्म्य. हे स्त्रीचे (लोमहर्षणाच्या -व्यासांच्या शिष्याच्या- षोडशवर्षीय मुलीचे)वर्णन आहे. परशुरामाचे नव्हे. Smile

"रुंद कपाळ, सरळ नाक, बदामी डोळे, कोरीव भुवया, सिंहकटी आणि घन-उन्नत उरोज ही सांकेतिक भारतीय स्त्री-सौंदर्याची सर्व लक्षणे कलाकाराने त्यांचे रेखाटन करताना कटाक्षाने पाळली आहेत." - मराठी विश्वकोष

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेऊनियां - संत तुकाराम (कटी म्हणजे कंबर)

"त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतील, विशेषतः संस्कृत नाटके व साहित्य यांत वर्णन केलेल्या यौवनांमध्ये आढळणारी सिंहकटी, उन्नत उरोज, पृथुल नितंब ही पारंपरिक व आदर्शवत सौंदर्यलक्षणे येथे क्वचित दिसतात. त्यामुळे चुनेगच्चीतील स्त्री-प्रतिमा/अगदी शृंगार मूर्तीतूनसुद्धा/रसरशीत/उन्नत वाटत नाहीत." -वाई महागणपती संस्थळ

असो.... तरीही आमचेच चुकले असेल तर माफ करा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंहकटी (p. 852) [ siṃhakaṭī ] f S A lion-waisted (i.e. having a waist delicately slender) female. A term of praise.
<<
याच्यात फिमेल, हे 'सिंहकटी' शब्द स्त्रिलिंगी आहे इतकाच अर्थ आहे.
बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

A lion-waisted -(i.e. having a waist delicately slender)- female.कंस सोडून वाचा. हे स्पष्टपणे एका स्त्रीचे वर्णन आहे.केवळ तो (सिंहकटी) शब्द स्त्रीलिंगी आहे असा त्याचा अर्थ नाही.
हे चालू द्या?
की सिंहकटी हे परशुरामाचे वर्णन नाही ही स्पष्ट बाब चालू द्या?
की उन्नतस्तना, सिंहकटी,पृथुलनितंबी हे भारतीय शिल्पकलेतील स्त्रीचे आदर्श चित्र आहे हे चालू द्या..?
बाकी काय काय चालवायचे या बाबतीत ते तर सांगा.
की गिर्‍या तो भी टांग उप्पर हे चालू द्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आजवरच्या अभ्यासा प्रमाणे हा एक शुध्द गैरसमज आहे. अजूनही अभ्यास सुरु आहे. कुणी तज्ञ असल्यास अजून प्रकाश टाकावा.

बंगलोरच नाही इतर शहरांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे . टाटा (स्टार बझार) आणि गोदरेज ब्रांड च चिकन सुद्धा हलाल च असता खाणार्यांची संख्या लक्षात घेऊन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अनीमल युथोनेशिया मध्ये केमिकल वापरत नाहीत जेणेकरून मांस खाण्यायोग्याच राहाव".
उदा . पोल्ट्रिफार्म वैगेरे मध्ये कोंबड्यांना किंवा प्राण्यांना एका चेम्बर मध्ये नायट्रोजन / कार्बोन डाय-ऑक्साइड मध्ये श्वासोछ्वास करायला लावतात आणि नंतर ते बेशुद्ध पडतात (डॉक्टर ऑपरेशन च्या वेळी एनेसथेशिया देतात त्याप्रमाणे) मग त्यांना कापल्या जात.

मानेवर सुरी फिरवून मारणं वेदनादायक आणि चेम्बर मध्ये नायट्रोजन / कार्बोन डाय-ऑक्साइड मध्ये श्वासोछ्वास करायला लावणं वेदनादायक नाही काय ? सुरा भोसकून मारणं आणि गळा आवळून मारणं सारखचं नाही का ?? (डॉक्टर ऑपरेशन च्या वेळी एनेसथेशिया देतात तेव्हा रुग्णाला आपल्याला बेशुद्ध केलं जातय याची जाणीव असते इथे तसा काही प्रकार दिसत नाही.) हा कसला मानवतावादी उद्योग ??
आम्ही पूर्णतः शाकाहारी किंवा मांसाहारी नाही .. पण असल्या फसव्या उद्योगासाठी ५ -१० रुपये जास्त मोजायची आपली तरी तयारी नाही बुवा ..

अवांतर - युरोप - अमेरिकेमध्ये मासे कसे मारतात हो ? पाण्याबाहेर काढूनच मारतात ना ... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

वीकांतात मी थोडा मायाजालापासून दूर असतो त्यामुळे प्रतिसाद द्यायला थोडा उशीर झाला.

सुरा भोसकून मारणं आणि गळा आवळून मारणं सारखचं पण युथनेशिया मध्ये तसलं काही होत नाही उलट हे सुखकारक पण असू शकत.

नायट्रोजन / कार्बोन डाय-ऑक्साइड मध्ये श्वासोछ्वास करायला लावल्यास प्राणी वा पक्षांना काहीही त्रास होत नाही. ते सहज श्वासोछ्वास करीत राहतात. आपण मरत आहोत किंवा बेशुद्ध होत आहे हे कळत नसल्यामुळे ते resist पण करत नाहीत नंतर oxygen च्या कमतरतेमुळे मुळे बेशुद्ध पडतात आणि त्यातच १-१.५ मिनटामध्ये त्यांचा मृत्यू होतो त्यानंतर त्यांना कापल्या जात. ही पद्धत पूर्णपणे वेदनारहित असते.
कार्बोन डाय-ऑक्साइड मुळे कधी कधी प्राणी वा पक्षी जास्त resistant असल्यासं शेवटचा हुंदका देऊ शकतात. पण नायट्रोजन हा वायू वातावरणात ८० % असल्यमुळे आणि प्राणी-पक्षांना त्याची सवय असल्यामुळे ती पण शक्यता नाहीशी होते.

लहानपणी खूप वेळ श्वास रोखून धरणे घरी किंवा swimming tank मध्ये हा खेळ खेळले असल्यास युथनेशिया पद्धतीचा अनुभव असू शकतो यामध्ये कधी मेंदूला oxygen च्या कमतरतेमुळे भोवळ येते. Fainting Game/self-induced hypocapnia.

खूप जोरजोरात श्वासोछ्वास केल्यास खूप जास्त वेळ श्वास वेळ रोखून धरता येतो कारण आपण oxygen घेण्यासाठी नसून कार्बोन डाय-ऑक्साइड बाहेर फेकण्यासाठी श्वासोछ्वास करतो.त्यामुळे मेंदूला oxygen ची आवश्यक मात्रा मीळत नाही आणि ब्रेन डेड होतो(bohr effect). याच कारणामुळे कधी - कधी गोताखोर श्वास घ्यायला विसरतात व पाण्यातच मरतात आणि त्याचा देह काहीवेळाने पाण्याने फुगून बाहेर येतो.

काही विक्षिप्त याचा वापर समागमा च्यावेळी गळ्याला फक्त दोरी बांधून फक्त शरीराला पुरेसाच oxygen घेऊन परमोच्च बिंदू गाठण्यासाठी( euphoria etc.) करतात आणि अस करताना मृत्यू होण्याची पण शक्यता असते. अधिक माहितीसाठी World's Greatest Dad हा सिनेमा बघावा अजूनही काही आहेत आता नाव आठवत नाही.

'न'वी बाजू च्या भाषेत डिस्क्लेमर : कुणीही वरती दिलेल्या गोष्टीचा वापर कृपया कुणीही करू नये केल्यास सिफ़र नावाचा प्राणी जवाबदार राहणार नाही व त्याच्यावर स्वत: युथनेशिया घ्यायची वेळ येऊ शकते.

अवांतर - युरोप - अमेरिकेमध्ये मासे कसे मारतात हो ? पाण्याबाहेर काढूनच मारतात ना ...
मी वर्चस्व आणि तेलासाठी बळी घेणार्यांना मानवतावादी अस संबोधलं नाहीये फक्त पद्धतीला मानवतावादी म्हणायच आहे मला

अजूनही आपणास हा उद्योग फसवा वाटतो का?कृपया कळवावे

अती- अवांतर : विक्षिप्त लोकांसारखा Euphoria cum बोरकरांच्या भाषेतला संधीप्रकाशात सुखोत्सवे असा जीव अनावर होऊन माझ्या पिंजऱ्याचे दार उघडल्यास मला पण आवडेल. बोरकरांची अतीउच्च कविता या दुव्या वर ऐकावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"यात जनावरांवर प्रयोग करण्यात आलेले नाहीत" / "Not Tested on Animals" अशा स्वरूपाचा एखादा डिस्क्लेमर छापल्यास धंदा चालेलही कदाचित जोरात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण त्याच्या वेदना निदान दिसत तरी नाहीत आणि प्राण्यांपेक्षा कमी असतात.

छ्या! प्राजक्ताची पडणारी फुले आणि 'ते त्यांचे' असे श्री.चंद्रशेखर गोखले आठवले Wink

बाकी मला अनेक प्राणी/पक्षी खायला आवडतात, मी त्यांना मारताना बघायला जातच नै - गेलेलो नाही -जाण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे कल्पना नाही.

परिसरात रहाणार्‍या अनेक आगरी/ख्रिश्चन मित्रांनी पक्ष्यांना बेचकीने मारून पाडलेले लहानपणी अनेकदा बघितले आहे (जातीचा उल्लेख म्हटले तर अनावश्यक आहे हे आगाऊ कबूल) त्यापैकी क्वचित काही पक्षी लगोलग शेकोटीवर भाजून मिळाल्याने स्वाऽहाऽ केलेलेही आहेत. तेव्हा ते बघून फार काही वाईट वाटलेले आठवत नाही. अर्थात आम्ही धावत जाईपर्यंत व तिथे पडलेला पक्षी शोधेपर्यंत बहुतांश वेळा पक्ष्याची तडफड थांबलेली असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सिफरजी, मी आपल्याला काही भूतमूल प्रश्न विचारू इच्छितो.
मानवतावाद म्हणजे नक्की काय? प्राणी मरू नये अशी इच्छा कि प्राण्याला कमी त्रास व्हावा पण तो मरावा अशी इच्छा?
जर मरू नये हा मोठा मानवतावाद आणि कमी त्रासाने मरावा हा त्यापेक्षा कमी दर्जाचा मानवतावाद असेल तर तेच लॉजिक पुढे लावून शाकाहार हा अजूनही श्रेष्ठ मानवतावाद आहे असे म्हणाल का?

(अन्न हा विषय बाजूला ठेऊन) दुसरे म्हणजे मानवतावाद ही नैसर्गिक संकल्पना आहे का? कि तो एक मानवी संस्कृतीचा कृत्रिम पण दॄढ संस्कार आहे? प्रत्येकाच्या ठायी मानवतावाद असतो का? लोक अधिक मानवतावादी बनण्याकरीता कष्ट घेतात का? त्याग करतात का?

मला तरी सम्यक दृष्ट्या (मानवेतर नजरेने पाहून) पाहिले असता वास्तविक मानवतावाद हाच एक घॄणास्पद विचार वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सारासार विचार करून युथनेशिया च्या context मध्येच मानवतावाद मांडायच तर मांसाहार थांबणार नाही हे त्रिकालाबाधीत सत्य जाणून प्राणी मरणारच हे सुद्धा सत्य मानावे.
मग ते कमीतकमी त्रास होऊन मेलेत तर बर असा हा मानवतावाद. आपल्यामुळे कमी त्रास व्हावा एव्हडाच उद्देश. न पटल्यास खुशाल धुडकावून लावावा.
शाकाहार हा अजूनही श्रेष्ठ मानवतावाद आहे अस माझ माझ्यापुरतच मत आहे, कुणावर लादायच नाही.
वेगवेगळ्या धर्मात, जातीत, प्रांतात हा बदलत जातो त्यामुळे त्रिकालाबाधीत सत्य पण नाही.

(अन्न हा विषय बाजूला ठेऊन) दुसरे म्हणजे मानवतावाद ही नैसर्गिक संकल्पना आहे का? कि तो एक मानवी संस्कृतीचा कृत्रिम पण दॄढ संस्कार आहे? प्रत्येकाच्या ठायी मानवतावाद असतो का? लोक अधिक मानवतावादी बनण्याकरीता कष्ट घेतात का? त्याग करतात का?

ज्या प्रांतात , वातावरणात, धर्मात, जातीत जन्माला येतो त्यांचे काही जनुक असतात अस मान्य केल्यास काही प्रमाणात पण नैसर्गिक म्हणायला हरकत नाही .
तस अंगावर कापड घालणे सुद्धा नैसर्गिक नाही कदाचित करोडो वर्षाआधी आपल्या पूर्वजांनी कापड घातली नसती तर आपण सुद्धा उत्कांतीत तितकेसे immune झालो असतो परत त्याच प्रमाणे भाजून न खाता कच्च मांस पण पचवल असत.

मला तरी सम्यक दृष्ट्या (मानवेतर नजरेने पाहून) पाहिले असता वास्तविक मानवतावाद हाच एक घॄणास्पद विचार वाटतो.

मैथुन नैसर्गिक आहे पण बलात्कार न करणे हा तो एक मानवी संस्कृतीचा कृत्रिम पण दॄढ संस्कार आहे( किंवा आता तरी झाल्लेला आहे न मानल्यास शिक्षा आहे ) त्यामुळे बलात्कार न करणे हे घॄणास्पद आणि करण्याच समर्थन करता येईल काय?

लोक अधिक मानवतावादी बनण्याकरीता कष्ट घेतात का?

हा प्रश्न स्वतःलाच सम्यक पद्धतीने विचारल्यास उत्तर मिळेल कदाचित,प्रत्येकाला वेगळ मिळू शकत.
नैसर्गिकरित्या हिंदू संस्कृतीत (सध्याच्या) मानव polygamous असून सुद्धा आजही एकाशीच संबध ठेवायचा प्रयत्न काही प्रमाणात का होईना पण करतोच ना ? यालापण घॄणास्पद म्हणता येत नाही ना ?

ही पळवाट नव्हे पण दुवा अखिल मानवतावादावर भाष्य करण्यासाठी नाही असं मला वाटतं, चर्चा झाल्यास हरकत पण नाही पण मला तरी युथनेशिया च्या context मधेच अपेक्षित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिवंत माणूस खाणे, मृत माणूस खाणे, मृत माणसाचे देहभाग माणसाच्या इतरकामांकरीता वापरणे, जिवंत प्राणी खाणे, हालहाल करून प्राणी मारणे, हाल न करता प्राणी मारणे, हालांचा विचार न करता प्राणी खाणे, प्राणीदेह इतरकामांकरिता वापरणे, ज्यातून जीव निर्माण होणार अशी अंडी खाणे,ज्यातून जीव निर्माण होणार नाही अशी अंडी खाणे, न दिसणारे सुक्ष्मजीव कळत नकळत खाणे, पर्णपुष्पादी खाणे, पिके खाणे, बीजे खाणे, वृक्ष इतर कामांसाठी वापरणे, चोचले न पुरवणे, शक्य तितके उपाशी राहणे, हे उतरत्या क्रमाने श्रेयस्कर आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? याचे समर्थन काय?
१. माणसाला होणारी अपराधीपणाची भावना कमी होणे.
२. अन्नास कमी त्रास होणे.
३. सृष्टीचे संतुलन राखणे
४. इतर

यात मानवी भावनांचे मार्केटींग यशस्वीरित्या करण्यासाठी काय करता येईल. इतर तीन युक्तिवाद खोडून काढण्यासाठी सोपे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क्रम तसा विशेष पण मुद्दा फक्त १.हालहाल करून प्राणी मारणे किंवा २. हाल न करता प्राणी मारणे एव्हडाच आहे.
आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतांना कुठला निवडल हा प्रश्न?
याच उत्तर मी तुमच्याकडून पर्याय क्र. १ अस समजावा काय?
भावनाचे मार्केटिंग हा पण मुद्दा तसा रोचकच पण मरतांना जर थोड कमी वेदनामय मरण दिल्यास काय हरकत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या समाजात कोलोसियमचे प्रेक्षक (भावार्थाने) खचाखच भरले आहेत त्या समाजात उलटे व्हावे हा ही विचार दृढ होऊ शकतो. रोमांच, सळसळ, ट्विस्ट, शौर्य, कठोरता या भावना आणि शिकार नावाचा 'खेळ', प्राण्यांना झुंजवणे, प्रथा म्हणून प्राणी मारणे, इ इ मानवता सुचक आहेत. तेव्हा मानवी भावनांचे परिपालन करायचे हा पडदा घालून प्राण्यांचे क्रौयापासून रक्षण केले पाहिजे. स्वतः झळ सोसून प्राण्याचे मॄत्यूदु:ख कमी करेल असा मार्केटेबल ग्रूप बाजारात मिळणार नाही. ते लोक अलरेडी खातच नाही. त्यामुळे दिलेल्या रेंजच्या टोकांना आणणे सोपे आहे. मध्यभागी तराजू झुलत राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मार्मिक,
आवड आणि सुदृढ शरीरासाठी मांसभक्षण चांगल आहे म्हणून आणि प्राण्यांना यातना दिल्यामुळे थोडसा अपराधीपणा घेऊन खाणारे लोकपण आहेत. एखादी गोष्ट परत परत केल्यास अपराधीपणा ची भावनापण कमी होते, पर्यायच उपलब्ध नाही मग भावना बोथट होणारच , रोज मरे त्याला कोण रडे प्रमाणे …

पण वेदनारहित पर्याय उपलब्ध असल्यास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी भाजी घेताना जे करतो तेच मी मांस विकत घेताना सदर प्राणी/पक्षी कसा मारला आहे त्यापेक्षा त्या मांसाची स्वच्छता, ताजेपणा, मत्साहार असेल तर स्पर्श अन् वास व त्याच्या तुलनेत मांसाची किंमत याच गोष्टी लक्षात घेईन. जर या इतर गोष्टी सारख्याच असतील तरच मी दोन्ही प्रकारचे मांस ट्राय करून जे चवीला अधिक रुचेल ते नेहमी घेईन. केवळ वेदनारहित मारले आहे म्हणून अधिक किंमत नक्कीच देणार नाही.

मानवतावाद हा एक्स्क्लुझिव्हली 'मानवांसाठी' आहे, भूतदया प्राण्यांसाठी आहे (आणि मी एका मर्यादेबाहेर भूतदयावादी नाही) याच्यात मी गल्लत करत नाही हे एक. आणि बहुतांश वेळा अन्नाला कोणतेही भावनिक परिणाम लावत नाही हे दुसरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चुकिच्या ठि़काणी प्रतिसाद दिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षकातला मानवतावाद हा शब्द प्राण्यांच्याबाबत गैरलागू आहे. भूतदया हा शब्द ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भूतदया हा जास्त समर्पक शब्द वाटतोय....इंग्रजी मध्ये The humane euthanasia अस म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका चिनी सहकार्‍याने कासवाच्या चविष्ट पदार्थाची पाककृती सांगितल्यावर हलाल वगैरे फारच सौम्य प्रकार असल्याचे वाटू लागले. तर कासवाचे मांस चविष्ट कसे करावे याची कृती:

प्रथम जिवंत कासवाला एका पाट्यासारख्या सपाट दगडावर बसवले जाते. कासवाच्या कवचावर आणखी एक जाड दगड ठेवला जातो जेणेकरून कासवाला पायांची हालचाल करता येणार नाही. कासव ज्या दगडावर आहे त्याखाली खड्ड्यात जाळ करावा. कासवाच्या समोर मसालेदार पाणी ठेवावे. जसजशी उष्णता वाढू लागते तसतसे कासव तहाणते व समोर ठेवलेले मसालेदार द्रव्य प्राशन करत जाते. व्याकुळ कासवाच्या शरीरात मसाले या प्रकारे चांगलेच मुरतात व कासव अतिशय चविष्ट लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तश्या पद्धतीने बनवलेले कासव खाल्लेत का? कसे लागले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कासव तसे किंवा आणखी वेगळ्या प्रकारे बनवलेले कधीच खाल्लेले नाही. ईशान्य चीनच्या भागात असे कासव खाणे हे बर्‍यापैकी मेनस्ट्रिम असावे. ऐकल्यानंतर बराच वेळ मलाच कासावीस (हा शब्द याच पाककृतीमुळे उद्भवला असावा काय?) झाल्यासारखे वाटत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकी सुंदर डेलिकसी समोर बनत असताना चाखली नाहीत याबद्दल निषेध!

रच्याकने.
आंबेमोहोर तांदूळ स्मशानाजवळच्या शेतातला अतीशय उत्तम व चविष्ट असे.
का, कुणास ठाऊक Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जी ए कुलकर्णी ह्यांच्या कथेतील एक पात्र चवीने सरणावर , चितेवर भाजून कणकेचे गोळे खाते असा प्रसंग आहे.
(बहुतेक प्रवासी कथा आहे.)
त्या छापाच्या कुणाच्या आवडी आहेत काय इथे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुळातच आंबेमोहराची सर कश्शाकश्शा भाताला नै हे आमचे मत आहे.
हल्ली बासमती च्या अतिमार्‍यात हा तांदूळ सहज मिळणे दुष्कर होत चालले आहे याचे अपार दु:ख होते Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुण्याला गेलो की घेऊन येतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनाना सोतालेच डुआयड्या काढून श्रेण्या देऊ र्‍हाय्ले असा डाऊट येऊन र्‍हायला भो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नाय हो. विसुनाना तसलं काही करायचे नाहीत यावर आमचा तरी मनापासून विश्वास आहे. आंबेमोहोर तांदूळ मिळणार या आनंदाने कोणा पुणेकराने दिली असावी बहुतेक. तसंही चांगल्या श्रेण्या 'थॅंक्यू, वा वा, लय भारी' म्हणण्यासाठी आहेत. त्या जरा लखनवी पद्धतीने अतिरेकी वापरल्या म्हणून बिघडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३ माहितीपूर्ण म्हणजे ३ जणांनी माहितीपूर्ण श्रेणी दिलीय असं वाटतय का तुम्हाला? तसे नाहीय. श्रेणी एकानेच दिलीय (मीच ती. कारण मला आंबेमोहर कसा लागतो माहित नाही. आणि बासमती, कोलम खाऊन कंटाळा आलाय :-D) आणि ती देताना विसुनानांच पुण्य २ होत म्हणुन score 3 झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा श्रेण्यांचा अल्गोरिदम जरा समजावून सांगेल का कोणी?
मागे चौकशि केली होती पण कोणाला (ज्यांना मी विचारले त्यांना) ते नीटसे सांगता आले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोणीही नविन प्रतिसाद दिला की त्या प्रतिसादाचा score बाय डिफॉल्ट 1 असतो. त्या प्रतिसादाला धन श्रेणी मिळाली की score 1 ने वाढतो आणि ऋण मिळाली की 1 ने कमी होतो. हे बेसिक आहे. ठीक?
लॉजीक थोड अजुन कॉम्प्लिकेट करावं म्हणुन यात पुण्य देखील लक्षात घेतलय. जर प्रतिसाद देणार्याच पुण्य 2 असेल तर फक्त पहिल्या धन श्रेणी साठी score 2 ने वाढतो आणि फक्त पहिल्या ऋण श्रेणी साठी score 0 ने कमी होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात पुण्य देखील लक्षात घेतलय. जर प्रतिसाद देणार्याच पुण्य 2 असेल तर फक्त पहिल्या धन श्रेणी साठी score 2 ने वाढतो

बरोबर. ज्यांना अनेक वेळा चांगल्या श्रेणी मिळालेल्या आहेत त्यांचं पुण्य जास्त असतं. म्हणजे त्यांनी दिलेेल्या श्रेणीला वेटेज जास्त मिळतं.

असो, या श्रेणीव्यवस्थेचा फार विचार करण्याची गरज नाही. ४, ५ मिळालेले प्रतिसाद आवर्जून वाचण्याजोगे, ०, -१ मिळालेले टाळण्याजोगे आणि बाकीचे मधले इतपतच ढोबळपणे समजायचं. कुठच्याही रॅंकिंग सिस्टिमप्रमाणे हीही आदर्श नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यात विशेष भयंकर असेलही पण अशा बर्‍याच क्रूर समजल्या जाणार्‍या पाकृ ऐकल्या आहेत.
उदा:-
एक कोरियन पाक्रु जालावर कुठेतरी दिसली होती. अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले , अगदि एखाद मिनिटभरापूर्वी बाहेर आलेले कोंबडीचे पिल्लू घ्यावे.
त्याच्या चिकट चिकट द्रावासह त्याला जिवंत तसेच कढईत टाकवे. ते तसेच लुसलुशीत गट्टम करुन टाकावे.
(ते नुकतेच बाहेर आलेले पिलू होते, की पूर्ण भरत आलेल्या अंड्यातून पिलाने अंडे फोडून बाहेर यायच्या आधीच आपणच, त्याची वाढ जरा बाकी असतानाच
बाहेरून खळकन् अंडे फोडायचे ह्याबद्दल साशंक आहे. अशा प्रकारचीही एक रेसिपी ऐकली आहे. ते अर्धवट पिलू बनलेले अंडे फोदून खाण्यात लै मज्जा येते म्हणे.)
.
.
दुसरा प्रकार मॅक डी का कोणत्यातरी नामांकित कंपनीच्या विशेष पाकृ बद्दल ऐकला. त्यावर नंतर बंदीही आली.
ते जिवंत कोंबडीला उकळत्या पाण्यात का उकळत्या तेलात टाकत्. त्याने विशेष चव येते असे त्यांचे म्हणणे.
प्रकार उघड झाल्यावर त्यांना ते उत्पादन मागे घ्यावे लागले.
.
.
जपान मध्ये मंकी मीट काही थिकाणी खात असल्याचे ठाउक आहे. माकडास मारुन खाणे.
त्यातील काही विशेष खाद्यप्रेमी माकड खाउनही तृप्त वाटत नसल्यास लुसलुशीत लहान मानवी बाळ मारुन खातात.
त्याचे नवजात बेबी फॅट्स का काहीतरी छान लागते असे म्हणणे.
अर्थातच हे तिथेही बेकायदेशीर असले, तरी होतेच.(कोकेन्,अफू,चरस वगैरे अंमली पदार्थ बेकायदेशीर ठरुनही त्यांचे सेवन होते, तसेच हे.)
एक दक्षिण भारतीय खाद्यप्रेमी भारताबाहेर भेटला असताना त्याने टायगर सूप काश्मीरमध्ये पिल्याचे सांगितले.
मांसहारी सस्तन हे मानवाच्या खाद्यात असण्याबद्दल तेव्हा प्रथमच माहिती झाली.
तोवर मानव भक्षण करीत असलेले सस्तन हे शाकाहारी असतात असा माझा समज होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सापाचे सूप प्यालेला माझा एक मित्र, त्यानं फेबुवर फोटोही टाकलेला. एकदा चाखून पहायची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते ही नदीतला मासा.
गोडे पाणी वाला.

फक्त, रेप्टाईल्स मधे काही फूड पायझनिंगवाले जंतू असतात हे लक्षात ठेवावे, व नीट शिजले असेल तरच खावे. या चिनी लोकांत अर्धवट शिजवून वा कच्चेही खाण्याची पद्धत आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रोचक!! धन्यवाद भौ. हे लक्षात ठेवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जे जास्त प्रचलित असते ते विकृत नसते असा मानवेतचा गोड गैरसमज आहे. आहाराच्या बाबतीत तर अजूनच मोठा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सिफरजी प्रतिसाद वाचताना दोन प्रश्न मनात आले -
१. मरण सुखकारक कसं काय असु शकतं ?
२. नायट्रोजन / कार्बोन डाय-ऑक्साइड मध्ये श्वासोछ्वास करायला लावल्यास प्राणी वा पक्षांना काहीही त्रास होत नाही हे कसे काय ? सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. अशा परिस्थितीत ऑक्सिजन न मिळाल्यास त्रास होणार नाही का ?

आपण मरत आहोत किंवा बेशुद्ध होत आहे हे कळत नसल्यामुळे प्राणी / पक्षी resist पण करत नाहीत नंतर oxygen च्या कमतरतेमुळे मुळे बेशुद्ध पडतात आणि त्यातच १-१.५ मिनटामध्ये त्यांचा मृत्यू होतो - हा प्रकार तर निव्वळ क्रूर वाटतो. नकळत एखाद्याला त्याच्या मरणाकडे घेउन जाणे मानवतावादी नव्हे.

प्रश्न जर मारण्याच्या पद्धतीविषयी असेल तर कमी त्रास देणारी पद्धत नक्कीच स्वीकारार्ह असेल. अ‍ॅनिमल युथनेशिया जर मांसभक्षणासाठी असेल तर मानवतावादी नकीच वाटत नाही. प्राणी मरू नये अशी इच्छा मानवतावादी म्हणता येईल, परंतु प्राण्याला कमी त्रास व्हावा पण तो मरावा अशी इच्छा मानवतावादी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

दुवा जरी oxygen प्राणवायू असलातरी आपण oxygen घेण्यासाठी नसून कार्बोन डाय-ऑक्साइड बाहेर फेकण्यासाठी श्वासोछ्वास करतो. Hypocapnia बद्दल पण वाचावे.

मनुष्य हा पूर्णपणे शाकाहारी(मनुष्यला पण सुळे असतातच) प्राणी नाही त्यामुळे प्राणीहत्या थांबूच शकत नाही.

Autoerotic Asphyxiation बद्दल वाचव मृत्यू कसा कधीकधी सुखकारक असतो अस नाही पण वाटतो हे समजण्यास मदत होईल. बाकी उत्तरे मागल्या प्रतिसादामध्ये दिलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक शाकाहारी प्राण्यांपेक्षा माणसाचं जठर, पचनमार्ग लहान असतो. तरीही माणूस पूर्णपणे शाकाहारी का/कसा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माणूस पूर्णपणे शाकाहारी? मी हे कधी म्हन्ट्ल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नायट्रोजन चा वापर करून त्रास न देता प्राण्यांना कसे मारता येइल ते या डॉक्युमेंटरी मध्ये दिसेल. (२ मिनिटानंतर बघावे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राण्यांना त्रास न होता मारण्याचा एकमेव उपाय मज्जारज्जूला (स्पायनल कॉर्ड) झटका (जर्क) देणे एवढाच असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रश्न : अनीमल युथोनेशिया हा भारतामध्ये एक उद्योग म्हणून सुरु केल्यास प्रतिसाद मिळेल काय? (किंमतीमध्ये +५-१० रु चा फरक असल्यास)

उत्तरः

व्यक्तिगतः हो. प्राण्याला कमीतकमी वेदनांमधे मृत्यू येणे शक्य असल्यास मी जास्तीचे पैसे देऊन तशा पद्धतीच्या खाटीकखान्याचे मांस खरेदी करायला तयार आहे. (उदा. रियलगुड किंवा तत्सम कंपनीने अशी सर्टिफाईड यंत्रणा बसवून घेतली तर मी त्यांच्याकडून मांस घेत जाईन, आणि त्याकरिता रास्त प्रमाणात जास्त किंमत देईन.)

भारतामधे एकूणः बहुधा नाही. पण इथे मात्र सरळ हो / नाही सांगता येत नाही. त्यासाठी मुख्यतः खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

१. टारगेट ऑडियन्समधे "ऑर्गॅनिक फूड" वगैरेची जशी जाहिरात आणि मार्केटिंग केलं जातं तसं या "भूतदयेचं" केलं जाण्यावर बराच फरक अवलंबून आहे.
२. पहिली बरीच वर्षं टारगेट कस्टमर हा शहरीच असेल. त्यातलाही आर्थिक उच्च वर्ग (मॉलमधून चिकनमटण घेणारा)
३. ही जाहिरात / कन्सेप्ट मार्केटिंग मांस विकणार्‍या कंपन्यांनी करायला लागेल, आणि ही नवी हत्यापद्धत अरेंज करुन देणार्‍या सर्व्हिस प्रोव्हायडरचा तिथे उल्लेख असेल. (पॉवर्ड बाय सिफर पेनलेस स्लॉटर सिस्टीम्स इ.)
४. खरोखर फक्त प्रतिकिलो मांसामागे ५-१० रुपयांचीच वाढ होईल किमतीत की आणखी जास्त?
५. सद्यस्थितेत ब्रँडेड कंपन्या (वेंकीज, अल कबीर, गोदरेज, सगुणा इ इ) या प्रकारचे वेदनारहित मृत्यूचे प्रकार त्यांच्या स्टँडर्ड प्रोसेसमधे ऑलरेडी वापरत नसतील अशी खात्री आहे का?
६. या पद्धतींमधे हत्यापूर्व इलेक्ट्रिक झटका हाही एक उपाय जगभरात वापरला जातो. मोठ्या जनावरांना कॅप्टिव्ह बोल्ट गनच्या वापराने स्टन केलं जातं, तुम्ही उल्लेखल्याप्रमाणे नायट्रोजन / कर्बद्विप्रणिलवायूचा चेंबर हाही उपाय केला जातो. यापैकी प्रत्येक उपायाची किंमत वेगवेगळी असू शकते. त्यामुळे उत्पादनखर्चात किती फरक पडेल ते पद्धतीवर अवलंबून आहे.
७. या पद्धती इन्स्टॉल करणं भयंकर अवघड किंवा खर्चिक असेलच असं नव्हे, पण तसं करण्याची आवश्यकताच बर्‍याच खाटीक / कंपन्यांना वाटत नसू शकते. असंवेदनशीलता हे एक कारण आहेच. त्यामुळे केवळ अशा साधनांची उपलब्धता करुन देणे हा च्यालेंज नसून मानसिकता बदलणं हा जास्त मोठा चॅलेंज आहे.
८. ही यंत्रणा लहान टपरीवाल्या खाटकांना फीजिबल ठरेलसे वाटत नाही. ती मोठ्या स्लॉटरहाउसेस आणि प्रोसेसिंग कंपन्यांपर्यंतच मर्यादित राहील अशी शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जनरली सर्वसामान्य हिंदूंना (शीख आदि वगळता) कशाही पद्धतीने मारलेल्या प्राण्याचे मांस सेवन करण्यामधे फारसा इश्यू नसतो. हलाल अमानुष वाटलं तरी त्याची फार चिकित्सा आणि त्यात बदल करण्यासाठी, हलाल पूर्ण टाळण्यासाठी मोठे प्रयत्न किंवा किमान त्याविषयी गंभीर हरकत घेतली जाणे / बहिष्कार घालणे असं होत नसावं.

पण हलाल /कोशर इ बाबत आब्राहमिक धर्म मात्र बरेच ठाम असतात. त्यामुळे झटका कंप्लायन्स पेक्षाही आपण हलाल कंप्लायंट कसे आहोत याच्या नोटिसा वेळोवेळी आणि जागोजागी दाखवणं हा मांस प्रोसेस करणार्‍या कंपन्यांचा प्रयत्न असतो. वेदनारहिततेचे सर्व मार्ग हे त्या हत्येला हलाल ऐवजी हराम ठरवत असल्याने मुस्लिम गिर्‍हाईक जाईल अथवा तीव्र विरोध करेल..तस्मात मानवतावादी / भूतदयावादी कंप्लायन्स आपल्या देशात तरी तयार होईल असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

time is changing.
and I hope it will continue to change.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुसलमान लोक मांस हलाल असावे याचा आग्रह धरताना पाहिलेत. पण शीख लोक यासदृश आग्रह धरतात का? मला माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिखांना 'रेहत मर्यादा' पाळावी लागते. ही शिखांनी स्वतःसाठी आखून घेतलेली नियमावली / आचारसंहिता आहे. तिच्यानुसार मुस्लिम किंवा इतर कुठल्याही धर्माच्या कर्मकांडांप्रमाणे मारलेल्या / बळी दिलेल्या प्राण्याचे मांस शिखांसाठी वर्ज्य आहे. अश्या प्रकारच्या मांसाला 'कुत्था मांस' हे प्रचलित पंजाबी नाव आहे.
मुस्लिम अंमल असतांना गुरु गोविंद सिंहानी हलाल मांसावर सामुहिक बहिष्काराचे आवाहन केले होते असे वाचल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा. हे माहिती नव्हते. माहितीकरिता धन्यवाद!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शीख लोक हलाल नकोच असा आग्रह धरतात. कारण धार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यात लॉजिक नाय.
हलाल मध्ये निदान बायो मिमिक्रीचे लॉजिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हलाल करतांना (अथवा गळ्यावर सुरी फिरवितांना म्हणुया सोयीसाठी ) अगोदरच प्राण्याचा जीव गेलेला नसेल तर तश्या पद्धतीचे मांस हलालच मानले जाईल. त्यामुळे स्टनिंग करून नंतर गळ्यावर सुरी फिरवून मिळवलेले मांस 'हलाल' समजले जाईल जे मुस्लिमांना चालेल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे नाहीये.

स्टनिंग करण्यामधे अनेकदा प्राण्याचा जीव जाऊ शकतो. ही केवळ शक्यताही हलाल ठरण्यासाठी डिसक्वालिफाईंग ठरते.

दुवा:

http://en.wikipedia.org/wiki/Dhabihah

क्वोटः

Inducing unconsciousness[edit]

Stunning the animal with a bolt-gun, as is the standard practice in FDA-approved slaughtering houses, may cause instantaneous death. Muslims regard meat from such a slaughter to be haraam, considering such meat as carrion.

मज्जारज्जू शाबूत ठेवून फक्त गळ्याच्या शिरा, श्वासनलिका, अन्ननलिका हा भाग कापण्याने हृदय जास्त वेळ चालू रहावे आणि जास्तीतजास्त रक्त बाहेर जावे हाच मुळात उद्देश असल्याने अन्य कोणत्याही मार्गाने केलेली हत्या हलाल म्हणून मान्य होत नाही.

मज्जारज्जू शाबूत ठेवल्याने आणि गळ्याच्या बाजूच्या शिरा कापल्याने मागील बाजूने मेंदूचा रक्तपुरवठा बराच काळ चालू राहून तितका वेळ प्राण्याला वेदनांची जाणीव राहते. त्यामुळे ही पद्धत वेदनादायक आहे असं म्हटलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे. कॅप्टीव बोल्ट गन स्टनिंगमुळे जीव आधीच गेलेला असेल तर मग ती पद्धत बाद होते. स्टनिंगच्या इतरही पद्धती असतील तर मग त्या वापरू शकतील असे वाटते पण त्यातली मेख अशी की प्राणी प्रत्येकवेळी स्टनिंगमुळेच मेलेला नाही आणि हलालच केला गेलाय याची खात्री मांसविक्रेत्या कंपन्या कशी देणार. एकंदर अवघड आहे पण तडजोड होऊ शकत असावी कारण जगातल्या बऱ्याच देशांमध्ये स्टनिंग सक्तीचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका आवडलेल्या पुस्तकातला एक प्रसंग आठवला. प्रयोगांनी शेवटी अशा प्रकारचे गाय-बैल घडवयात आले आहेत की त्याना आपले मांस खाऊ घालणे सुखाची आणि हवीशी वाटणारी गोष्ट आहे. हाटेलात तो बैल येऊन ' माझा अमका स्टेक खाउन बघत का? फार छान आहे. किंवा तमका..' इत्यादी बोलत असतो.
जर कधी काळी असे करता येण्याची शक्यता निर्माण झालीच तर प्राण्याचा जीव घेऊन खाणे किंवा त्यांना वेदना देऊन मारणे यांना विरोध करणार्या गटांची काय भूमिका असेल असा विचार मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकही तळटीप नसल्यामुळे प्रतिसाद कळला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0