बाप माणुस

बाप माझा बाप
बाप मानुस होता.
फाटकी चड्डी
मळकट बनियान
मनाने मात्र तो
साफ माणुस होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.

टकलावर तुरा अन
डोळ्यावर जाड काचा.
आरे मोठठ व्हायच
तर भरपुर वाचा.
अस नेहमी ओरडणारा
तो ताप माणुस होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.

वयात आली जवानी
घेऊन नवि उर्मी.
स्वभावात रगेल पणा
बोलण्यात उद्धट गुर्मी.
दोस्तांच्या गप्पात मग
एकेरी उल्लेख होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.

आज जेंव्हा मी
हळवा बाप होतो.
लेकाला माझ्या
घट्ट जवळ घेतो.
फुटतो सारा बांध कारण
समोर चेहरा त्याचा होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.

तक्रार नाही केली
की कधी नाही चिडला.
आयुष्य भर झिजला
संसाराचा गाडा ओढला.
माझा बाप जेंव्हा मेला
केवळ सपळा उरला होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.

मडके घेऊन खांद्यावर
पवलो पावली थिजलो.
चिता त्याची पेटली
मी मात्र विझलो.
धुरकट झाले डोळे
पण तो लखाखत होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.

ज्वाळांतुन चेहरा दिसला
खुप प्रसन्न तो भासला.
नाही कुठली खंत
नाही कुठली वेदना.
भरभरुन जगल्याचा मात्र
आनंद वाहत होता.
बाप माझा बाप
बाप मानुस होता.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

...................

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Sad आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधी, सोपी, कळणारी, परिणामकारक कविता.
पित्याचे स्थान सांगणारी, समर्पकपणे, खासकरून माजोरड्या मूलास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.