ते दिवस परत हवेत

तुझी आठवण येत राहीली अन सुगंधी सुगंधी वाटत राहीलें. लाला लाल पळसासारखी मी फुलत राहीले, टपटपणार्‍या प्राजक्तासारखी बरसत राहीले - आतल्या आत, बसमध्ये, गर्दीमध्ये, कामामध्ये. केवड्याचा मादक सुगंध नव्हताच तो, लॅक्टोकॅलमीन अन लव्हेंडरचा शांत सुवास येत राहीला.
कॉलेजच्या दिवसांची आठवण येत राहीली. ते अबोल खरं तर मूकंच प्रेम आठवून आठवून, पाडस-वेडे दिवस आठवून सुगंधात भीजत राहीले. साधे प्रयोगशाळेतील, रसायनशास्त्राचे प्रयोग त्यात काय जादूमय असणारे? पण डेमो पहायला गटागटाने उभे रहाणे आठवेले. माझी नजर तुला शोधायची. पण उभे मात्र आपण डयगोनलात. कारण जवळ येऊन इभे रहायची हिंमतच नसायची. फक्त दर्शनसुखाची लालसा.
किती तरी बोल्ड अँड ब्युटीफुल मुली होत्या तुमच्या ग्रुपमध्ये.माझ्यासारख्या बावळट खरं तर आत्मविश्वास नसलेल्या मुलीकडे पहायची तुला काय गरज होती? अन तरीही तेव्हाच्या तुझ्या कृती, आठवणी आता अ‍ॅनॅलाइझ करते अन वाटतं तुला जाणीव होती, तुझंही कदाचित प्रेम होतं.
परवा तू फेसबुकावर दिसलास अन भरुन आलं. अगदी तस्साच दिसतोस अजूनही. काळे (इतके काळेभोर डोळे कसे असतात बाई एखाद्याचे?) काळे डोळे अन करारीपणा. तुझी अतिशय गोड, किती किती गोंडस मुलगीदेखील पाहीली. OMG what a cutie!!!
खूप विचार करुन मेसेज अन रिक्वेस्ट पाठवली.
.
.
मेसेजला उत्तर दिलस पण रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली नाहीस. का ते माहीत नाही. एवढ्या ३००-४०० फ्रेन्ड्समध्ये सगळे काही बिझनेस इन्ट्रेस्ट्स किंवा खरेखुरे मित्र-मैत्रिण असतील असं वाटत नाही. मीदेखील गर्दीतील एक परीचीत म्हणून राहीले असते त्यांच्यात. पण इतक्या जुन्या ओळखीला अ‍ॅड करणंही तुला जड झालं.! का माझं इन्टरप्रिटेशन चुकतय? असो.
.
.
आज सुगंधात भीजताना परत परत एकच विचार मनात येत राहीला - Everybody gets what they deserve!
मला त्या कोवळ्या दवसातल्या निर्व्याज प्रेमाच्या आठवणीत भीजता येतय कारण त्या भावनांची ऊंची मोजायची, त्या भावना परत अनुभवण्याची माझी क्षमता आहे. कुठेतरी खूप निर्व्याज, निर्मळ प्रेम मी केलं आहे. खरं तर खूप अभिमानच वाटतोय.
.
.
कोणी मला परत ते जादूमय, मंतरलेले दिवस बहाल केले अन आत्ताचा आत्मविश्वास दिला तर तुला माहीते मी काय करेन? I will build you up. तुला आवडेल अशी वागेन. बेस्ट ऑफ लक देईन, कॉम्प्लिमेन्ट्स देईन. प्रयोगशाळेत, तुझ्या जवळ उभी राहीन , तुझ्याशी गप्पा मारेन. I will build you up.
फार काही नको, ते दिवस हवेत.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कॉलेजच्या दिवसात नेलंत! सुरेख लिखाण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

I'm sure, I'm in control
A lady with a plan
Believing that life is a neat little package
I hold in my hand
I've got it together, they call me
"the girl who knows just what to say and do"
Still I fumble and fall, run into the wall
'Cause when it comes to you, I'm
Just another woman in love
A kid out of school
A fire out of control, just another fool
You touch me and I'm weak,
I'm feather in the wind
And I can't wait to feel you touching me again
With you, I'm just another woman,
Just another woman in love.
.
.
.
.
खरच गेले दिवस परत हवे!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वैर रुपांतरः
==============
मी खरं सांगतेय, मी आहे माझ्या कह्यात.
मी आहे एक योजनाबद्ध स्त्री.
माझं आयुष्य म्हणजे काय? तर मी बरंच काही एकत्र करून
व्यवस्थित गुंडाळलेलं
माझ्या हातात धरून ठेवलेलं
छोटंस पॅकेज.
सगळे नेहमी म्हणतात
बोलायचं काय, करायचं काय?
या मुलीला सगळंच नेमकं माहिती हाय.
मात्र तरी,
प्रश्न येता तुझा,
मी ठेचकाळते, समोरच्या भिंतीवर
धावताना ठोकरते, कारण
तेव्हा मी असते अगदी सामान्य -
चारचौंघींसारखी प्रेमात पडलेली स्त्री.
एखादे नुकतेच शाळा संपलेले मूल
किंवा कह्यात न येणारी आग, की
अशीच एक वेडी?
(चारचौघींसारखी!
मी लाजाळू होते)
मला हात लावताच शक्तीहीन होते,
वार्‍याच्या कवेत पीस होऊन जाते, अन्
पुन्हा
तु मला स्पर्शून टाकण्याची वाट पाहणेही
कठीण होऊन बसते
म्हटलं ना, तुझ्या सोबत मी असले की असते,
प्रेमात पडलेली एक स्त्री
अगदी चारचौघींसारखीच!
=========

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जिन्दगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

क्या बात है प्रकाशजी Smile चपखल गाणे शोधलेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

खरं आहे. प्रघा व अतुल ठाकुर दोघांचेही खूप आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगल मांडलय.
calf love म्हणतात ते हेच का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Exactly. Correct word. Thanks Manoba.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाशरावांच्या गाण्यास दुजोरा.

१९५१ च्या तराणा चित्रपटातलं - "वोह दिन कहा गये बता ... जब इस नजर मे प्यार था" हे ऐकून पहा. जरा जास्तच ट्रॅजिक टोन आहे. पण लताजी व मधुबाला एकत्र असले की सगळ्च सुसह्य होतं.

आणि लतादीदींचा आवाज म्हंजे तलवारीच्या पात्यासारखा (या गाण्यात तर विशेषत्वाने जाणवतो.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Loved that song. Specially first 2 lines caught attention!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. छान लिहीलय.
घाटपांडेचा प्रतिसाद अगदी मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाय हाय! लैच भारी!
कधीतरी रुचीपालट म्हणून असं गोग्गोड वाचायला काय मजा येते!

गेले ते दिन गेले.. वरची विंग्रजी कविताही अतिशय आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कधीतरी रुचीपालट म्हणून असं गोग्गोड वाचायला काय मजा येते!

आम्लप्रेमी असूनही वरील वाक्यास जाहीर पाठिंबा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile Smile Thanks a lot.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile thanks a lot Rishikesh. That poem is Ann Murray's song. It's so lovely. -

https://www.youtube.com/watch?v=65QWT9lvFk4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी लिहिलाय! आपलं आठवणींचं जग नाजूक असणं, त्याची आपल्याला आठवण करून देणं हवंहवंसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छान लिहिलं आहे.

तुम्ही जर तुमचे दिवस परत आणायला गेलात तर येताना माझेही घेऊन याल का? काय एक्स्ट्रा बॅगेज चार्ज वगैरे असेल तो देईन मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile Hahaha!!!
Ghaskadvi & Joshi - Thanks to both of you for the comments.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™