ज्याचे करावे भले.....

भिकाऱ्यांच्या त्रासाने गणपतराव त्रासले होते. जेथे बघावे तेथे भिकारी. ह्या भिकाऱ्यांचे करायचे तरी काय?असा प्रश्न गणपतरावांना पडला. सकाळी ऑफिसला जायला निघाले तर नाक्यावरचा भिकारी पैसे मागायचा.त्याचे झाले कि ट्रेनमध्ये कळकट भिकारी अंगचटीला येवून पैसे मागायचे कि त्यांच्या जवळकी पेक्षा पैसे देणे गणपतरावांना प्रशस्त वाटायचे.गणपतरावांचा मूळ स्वभाव हा भिडस्त होता. लोक काय म्हणतील याची त्यांना नेहमी भीती वाटत असे. इतर माणसे जशी भिकाऱ्यांना हाकलून लावत, खर्जातला आवाज काढून त्यांच्यावर ओरडत ते काही केल्या गणपतरावांना जमत नसे. त्यामुळे ह्या भिकाऱ्यांच्या त्रासापासून त्याची सुटका काही होत नसे. भिकारी झाले कि ट्रेन मध्ये तृतीयपंथी येत त्यांची ती अदाकारी, डोक्यावून हात फिरवणे,गालाला हात लावणे ह्याने गणपतरावांचा थरकाप उडत असे व ते पटकन खिशात हात घालून त्यांना चिल्लर देत. ह्या भिकाऱ्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी गणपतराव नेहमी खिशात वीस रुपयांची चिल्लर ठेवत ऑफिस वून घरी येण्यापर्यंत त्या पैशांचा बोऱ्या वाजलेला असे.

एकदा मात्र कहर झाला काही कामानिम्मित गणपतराव ठाण्याला गेले होते. भूक लागली म्हणून वडापाव घेवून ते खायचे काम चालले होते तेवढ्यात एक भिकारीण आली व त्यांच्यासमोर उभी राहिली. गणपतरावांचा घास तोंडातच राहिला. ती म्हणाली,"साहेब,काही खायला द्याना. कालपासून भुकेली आहे. गणपतरावांना तिची दया वाटली त्यांनी तिला एक वडापाव घेवून दिला. हे दृश्य दुसऱ्या एका भिकाऱ्याने पहिले नि तो हि गणपतरावां वडापाव मागू लागला. गणपतरावांनी त्यालाही वडापाव घेतला. इतक्यात अचानक अजून पाच सहा भिकारी पोरे, दोन तीन भिकारी बायका,चार बाप्प्ये तेथे उगवले नि त्यांनी गणपतरावांना घेराव घातला.ह्या सर्व भिकाऱ्यांना वडापाव खायला घातल्याने गणपत रावांकडे रुपयाही शिल्लक राहिला नाही. त्यातच रस्त्यावरचे लोक आपल्याकडे वळून वळून बघतायत हे पाहून गणपतरावांना मेल्याहून मेल्यासारखे झाले.त्यातच एका बाईचे उद्गार त्यांच्या कानावर पडले कि ह्यांच्यासारख्या लोकांमुळेच भिकाऱ्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे गणपतरावांनी तिथून त्वरित पळ काढला.

ह्या प्रसंगामुळे गणपतराव अस्वस्थ झाले.भिकाऱ्यांची भीती त्यांच्या मनात भरली आणि हि भीती ते कुणालाही सांगू शकत नव्हते.त्याच अस्वस्थतेमुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी ऑफिसला दांडी मारली नि ते घरी स्वस्थ पडून राहिले. सकाळचे वर्तमान पत्र वाचता वाचता त्यांचे लक्ष एका जाहिरातीकडे गेले ती जाहिरात अशी होती "कोणत्याही भीतीवर मात करण्यासाठी भेटा संमोहनतज्ञ भा. स.ससाणे.". गणपतरावांनी तडक कपडे केले व ते ससाणेंच्या ऑफिसकडे निघाले. एका कळकट बिल्डिंग मध्ये ससाणेंचे ऑफिस होते. गणपतराव ससाणेंना जावून भेटले. 'बोला, काय सेवा करू? ससाणेंनी विचारले. गणपतरावांनी लाजत लाजत आपला प्रोब्लेम सांगितला भिकाऱ्यांची भीती वाटते. ससाणे म्हणाले, 'अहो, असे लाजू नका.बऱ्याच लोकांना तुमच्यासारखे विचित्र प्रोब्लेम असतात तुम्हाला 'भिकारी फोबिया' झालाय मी बऱ्याच जणांचे प्रोब्लेम दूर केलेत. थांबा मी तुम्हाला आता संमोहन अवस्थेत नेतो नि तुमची भीती कायमची काढून टाकतो.ससाणेंनी गणपतरावांना संमोहनात नेले नि त्यांच्यावर उपचार केले. संमोहन निद्रेतून जागे झाल्यावर गणपतरावांना उत्साही वाटू लागले येतानाचे आपण नि आता जातानाचे आपण यातला फरक त्यांना जाणवला. आत्मविश्वासाने आता गणपतराव परिपूर्ण झाले होते. गणपतराव ह्याच आत्मविश्वासाने बाहेर पडले.

दुसया दिवशी ऑफिसला जाताना नाक्यावरचा भिकारी त्यांना आडवा आला गणपतराव त्याला नेहमी रुपया देत. आज गणपतराव आल्या आल्या त्याने हात पुढे केला. गणपतरावांनी थंड नजरेने त्याच्याकडे पहिले. व त्याला विचारले,'काय, पाहिजे? भिकारी म्हणाला, 'साहेब, गरिबाला द्या काही तरी'.

"तुला काही तरी देवू म्हणजे पैसे देवू. का? तू माझ्याकडे ठेवायला दिले होतेस? भिकारी गांगरला .गणपतरावांनी विचारले,'तुझे, नाव काय? भिकारी चपापून म्हणाला, "घणसू". "तू कोठे राहतोस"? 'साहेब त्या तिकडे झोपडपट्टीत'. "झोपडपट्ट्या बऱ्याच आहेत नक्की कोठल्या झोपडपट्टीत"?'टिळक नगर झोपडपट्टी'. "तुझे लग्न झालेय? 'हो साहेब दोन मुलेही आहेत' ह्यावर गणपतराव कडाडले "लाज, नाही वाटत भिक मागायला. उद्या तुझी पोर मोठी झाली तर काय सांगतील आमचा बाप भिकारी आहे. अरे, स्वतासाठी नाही तर पोरांसाठी तरी लाज बाळग. तुला काय वाटते तू भिक मागतोस म्हणजे मोठे काम करतोस. चल चालता हो इथून.परत जर ह्या नाक्यावर भिक मागताना दिसलास तर भिक मागणारे दोन्ही हात तोडून टाकेल". गणपतरावांच्या सरबत्तीने तो भिकारी गांगरून पळत सुटला.

गणपतराव आता सुसाट सुटले होते. रस्त्यावर जी पोर, पोरी भिक मागत त्यांना जावून ते गाठत आणि भिक मागणे कसे वाईट आहे तुम्ही शिक्षण घ्या असा घोषा लावत आणि जे तरुण भिकारी दिसत त्यांना ते मेहनत करण्याचा सल्ला देत. त्यामुळे गणपतराव दिसले कि रस्त्यावरचे भिकारी हे पळून जात. आता उलटे झाले होते. पूर्वी गणपतराव भिकाऱ्यांना घाबरत आता मात्र भिकारी त्यांना घाबरू लागले. गणपतराव येताना दिसले कि भिकारी त्या रस्त्यावरून पोबारा करत.गणपतराव हे आता त्यांच्या विभागात चांगलेच फेमस झाले होते. विभागात एखादे लग्न कार्य असले कि गणपत रावांना लग्न घराचे आग्रहाचे आमंत्रण असे. गणपतराव लग्नाला आलेले पाहून भिकारी तेथे फिरकत नसत.

गणपतरावांमुळे भिकाऱ्यांचा धंद्यावर मंदीचे सावट घोंघावू लागले. सोन्याची अंडी देणारा हा धंदा बंद करावा लागतो कि काय असे भिकाऱ्यांना वाटू लागले. शहरातील एका प्रसिद्ध देवळा बाहेरच्या भिकाऱ्यांची गणपतरावांनी एकदा दाणादाण उडवली होती ते हि गणपतरावांवर डुख धरून होते. ह्या एका माणसामुळे आपला धंदा डबघाईला येतो कि काय अशी रास्त भीती त्यांना वाटू लागली. गणपतरावांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार ते करू लागले. त्यांच्या मिटिंग वर मिटिंग भरू लागल्या.

अशाच एका प्रसन्न सकाळी गणपतराव हे भाजी आणण्यासाठी मंडईत निघाले होते तेथे त्यांना एक लहान मुलगी भिक मागताना दिसली तिला बघून गणपतरावांना वाईट वाटले. आपण कितीही प्रयत्न केले तरी भिकारी भिक मागणारच असा त्यांच्या मनात विचार आला पण त्या नकारात्मक विचारांना दूर सारून आपल्याकडून जेवढे होइए तेव्हडे करायचेच ह्या विचाराने ते त्या मुलीकडे आले. मुलीने त्यांच्या पुढे हात पसरले अवघी सात ते आठ वर्षाची ती चिमुरडी होती.गणपतरावांनी एक बिस्किटचा पुडा घेवून तिला दिला. व विचारले 'बाळ, तू शाळेत का जात नाहीस? तुला भिक मागायला कोण भाग पाडते"? ती मुलगी घाबरली तिच्या तोंडून शब्द फुटेना. इतक्यात एक दणकट पंजा गणपतरावांच्या खांद्यावर पडला गणपतरावांनी मागे वाळूने पहिले तर एक दांडगेश्वर इसम मिश्या पिळत होता."ये, भावू भिक देवून झाली निघ कि आता, काय विचारतात बसलास माझ्या पोरीला? गणपतराव संतापले,"तुला,लाज नाही वाटत पोरीकडून भिक मागून घ्यायला"?

'ह्यात लाज कसली, भिक मागणार नाही तर खाणार काय?

"ह्याचा विचार पोर पैदा होण्या आधीच करायचा असतो" गणपतराव उद्गारले.

'अहो, भावू सारी दुनियाच भिकारी प्रत्येकाची कोणा न कोणाकडून काही तरी अपेक्षा असायचीच. आता माणूस देवळात जातो तोही स्वतासाठी, पोरांसाठी देवाकडे काहीना काही मागणे मागतोच कि मग आम्ही लोकांकडून पैसे मागितले तर काय बिगडले'.

"अरे मूर्ख माणसा, शाळेत जाण्याच्या कोवळ्या वयात तू मुलीकडून भिक मागायचे काम करतोस नि त्याचे निर्लज्जपणे समर्थन हि करतोस. मिशा पिळून कोणी मर्द होत नाही स्वताचे व स्वताच्या कुटुंबाचे पालनपोषण स्वताच्या हिमतीवर कर तरच तू खरा मर्द".

गणपतराव नि त्या इसमाची बाचाबाची चालू असताना त्या इसमाने इशारा केला त्यासरशी गणपतरावां भोवती भिकाऱ्यांचा जमाव जमला. सर्व भिकारी हिस्त्र पणे गणपतरावांकडे पाहत होते. त्यांनी अचानक गणपतरावांवर हल्ला केला. गणपतरावांना बेदम मारहाण करण्यात आली.

अत्यवस्थ अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. गणपतरावांच्या पत्नी जानकीबाई ह्यांनी धावत पळत रुग्णालय गाठले नवऱ्याच्या प्रकृतीची चौकशी करताच डॉक्टर पांडे म्हणाले,"उन्हे अब दवाकी नही दुवाकी जरुरत है".

भिक मागण्यासारख्या वाईट सवयीशी एकाकी लढा देणाऱ्या गणपतरावांना आज भिकाऱ्यांनी ह्या अवस्थेपर्यंत आणून सोडले होते.

संध्याकाळची वेळ होती गणपतराव अत्यवस्थ होते नि जानकीबाई आपल्या नवऱ्याच्या प्राणाची भिक देवाकडे मागत होत्या.

field_vote: 
3.166665
Your rating: None Average: 3.2 (6 votes)

प्रतिक्रिया

फार छान लिहिलं आहे. वाचायला मजा आली. माणसाला त्या पात्राच्या जागी आपण आहोत असे कल्पायला फोर्स करणारी कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दुसर्‍या परिच्छेदातला प्रसंग जस्साच्या तस्सा माझ्यासोबत घडला आहे; त्यामुळे वाचताना एकदम "सचीन्ला हे कसे ठाउक?!" असे आश्चर्य वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वावा! सुंंंंंंदर कथा आणि असेच कायकाय बरेच.
"उन्हे अब दवाकी नही दुवाकी जरुरत है">>>> भिखारियोंकी दुवाकी जरूरत है -> अतएव भिकार्‍यांना भीक घाला. चला, एक चक्र पूर्ण झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0