माणूस पायावर नव्हे, पोटावर चालतो!

२०१० च्या दिवाळीत मी प. बंगालच्या अभ्यास दौ-यावर गेलो होतो. टाटाच्या सिन्गुर प्रकल्पाच्या फियास्कोचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. राजकारण, समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांचे अनेक कंगोरे या दौ-यात मला समजू शकले. सैन्य पायावर नव्हे, तर पोटावर चालते, असे पूर्वी म्हटले जायचे. हा नियम आता सामान्य माणसालाच जास्त लागू पडतो. या देशातील सर्वसामान्य माणूस खरोखरच पायावर चालतो, हे सत्य या दौ-यात कळले. रेल्वेच्या डब्यात माझ्यासोबत बहुतांश बंगाली कुटुंबे होती. पोटासाठी महाराष्ट्रात आलेली ही कुटुंबे दिवाळीसाठी गावाकडे चालली होती. सगळी रेल्वेच अशा परतीच्या दिवाळीवाल्यांनी भरलेली होती. कोलकत्यात गेल्यावर दुसरेच चित्र समोर आले. कोलकत्यात पोटापाण्यासाठी आलेल्या बिहारी नागरिकांची संख्या प्रचंड मोठी असल्याचे दिसून आले. या संपूर्ण दौ-याच्या काळात मला कोलकत्यात एकही टॅक्सीवाला मूळ बंगाली भेटला नाही. बहुतांश सर्वच टॅक्सीवाले बिहारीच होते.

येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की, दिवाळीसाठी प. बंगालला परत चाललेल्या माझ्या सहप्रवाशांत बहुतांश लोक उच्च शिक्षित होते. या उलट कोलकत्यात मला भेटलेले बहुतांश बिहारी स्थलांतरित अशिक्षित, अर्धशिक्षित होते. अंगावरची कामे करीत होते.

लोक अभावाकडून संपन्नतेकडे स्थलांतरीत होत असतात. भारतात अभावच अभाव आहे. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे.

वरील दोन लेखांपैकी एक लेख मी माझ्या ब्लॉगवर आहे. दुसरा मला सापडत नाहीए. सापडला की तोही ब्लॉगवर टाकीन. सुजान वाचकांनी हा सचित्र लेख अवश्य वाचावा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

>>लोक अभावाकडून संपन्नतेकडे स्थलांतरीत होत असतात. भारतात अभावच अभाव आहे. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. <<
जिथे अभाव नाही तिथे ते स्थलांतरीत होणार ना! मग भारतात अभावच अभाव असेल तर ते कुठे स्थलांतरीत होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सगळा देश बिहारी लोक चालवतात हे आपल्याला माहित नव्हते कि काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.