माझे पंतप्रधान[पदाच्या मुख्य इछुकां(भाग: ३/३)]वरील आक्षेप

याआधीच्या दोन भागांत आपण मावळते पंतप्रधान श्री मनमोहन सिंग (भाग १), भाजपा/एन्डीएचे पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार श्री नरेंद्र मोदी व काँग्रेस उपाध्यक्ष व त्या पक्षाचे संभाव्य उमेदवार श्री राहुल गांधी (भाग २) यांच्यावरील माझ्या आक्षेपांचे विवेचन वाचले. या शेवटच्या भागात पंतप्रधानपदाच्या उर्वरित इच्छुक व काही प्रमाणात संभाव्यता असणार्‍या पक्षनेत्यांवरील माझे आक्षेप विशद करणार आहे. अर्थात लेखात व्यक्त झालेली मते ही पूर्णपणे वैयक्तिक आहेत.

भाजपा व काँग्रेस या पक्षांव्यतिरिक्त समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत. पैकी यावेळी डाव्यांची ताकद केरळ व बंगाल दोन्हीकडे रोडावल्याने त्यांच्या नेत्याला पंतप्रधानपद मिळणे कठीण वाटते. शिवाय डाव्यांची कोणतीच आर्थिक नीती मला रुचत नाही. शिवाय डाव्या विचारसरणीच्या मर्यादा व फायदे हे इतिहासात अनेकदा स्पष्ट झाले आहेत त्यामुळे डाव्या पक्षांपैकी कोणीही पंतप्रधान झालेले मला आवडणार नाही. त्यांचे भारतीय राजकारणात एक विवक्षित स्थान आहे हे नाकारण्यात अर्थ नाही पण तरीही देशाचे सर्वोच्च पद एका डाव्या पक्षातील नेत्याने भूषवण्याकडे जाणारा रस्ता बराच मागे पडला आहे असे वाटते.
उर्वरितांपैकी, श्री शरद पवार यांची राजकीय ताकद खूप असली तरी १०-१२ च्यावर शीटा मिळतील का नाही हेच समजत नसल्याने त्यांच्याबद्दल पंतप्रधान म्हणून आक्षेप मांडायची गरज वाटत नाही. श्रीमती ममता बॅनर्जी यांचे डाव्यांपेक्षाही डाव्या असणे त्यांना बंगालात आवश्यक असेलही देशाचा पंतप्रधान म्हणून अगदीच अडसर ठरते.या व्यतिरिक्त जयललिता, बिजु पटनायक, नितीश कुमार/शरद यादव वगैरे मंडळीही आहेत पण इतक्या लोकल नेत्यांनी पंतप्रधान होऊ नये असे वाटते.

आता उरलेल्या पक्षांपैकी सपा व बसपा असे पक्ष आहेत ज्यांची मोठी ताकद उत्तरप्रदेशात आहे + इतरही राज्यांत १-२ सीट्स ते मिळवत असतातच. त्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे आहे.

समाजवादी पक्षाचे श्री मुलायमसिंह यादव यांनी प्रकटपणे आपल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेचे सूतोवाच केले आहे. माझा त्यांच्यावरील सर्वात प्रमुख आक्षेप आहे तो म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्या पक्षाला येणारे अपयश(आक्षेप सपा-१). सध्याचे त्याच्या मुलाचे उत्तरप्रदेशातील राज्य असो की पूर्वीचे खुद्द मुलायमसिंहांचे राज्य असो कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत राजकीय हस्तक्षेप प्रचंड असतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांना खुली छुट असणे, त्यातून वाढणारी गुंडगिरी वगैरेचा इतिहास फार जुना नाही. या बाबतीत सापत्न वागणूक ठेवणार्‍या नेत्याने पंतप्रधानपदी बसावे असे अजिबात वाटत नाही.

यांच्याबद्दल दुसरा आक्षेप आहे, जुनाट विचारसरणीचा.(आक्षेप सपा-२) समाजवादी पक्ष हा "समाजवादी" असल्याने म्हणा किंवा लोहियावादी असल्याने म्हणा आधुनिकतेकडे त्यांची पाठ असणार हे स्पष्ट आहे. पण कंप्युटरचा वापर टाळणार, कायद्यात धार्मिक हस्तक्षेपाची सोय वगैरे त्यांच्या घोषणा कोणत्याही प्रगतिशील देशाला मानवणार्‍या वाटत नाहीत. केवळ आर्थिकच नाही तर त्यांची राजकीय विचारसरणी, अनुशासन पद्धती सगळेच जुने आहे. काळाबरोबर बदल घडवणारा हा नेता नसल्याने त्यांच्यावर आक्षेप घेण्यासारख्या अनेक गोष्टी वेळोवेळी समोर येत असतात.

बहुजन समाज पक्षाच्या कु. मायावती यांच्याबद्दल मला एक मोठा आक्षेप आहे तो म्हणजे (बसपा-१) सरकारी पैशाचा गैरवापर. अर्थात हा आक्षेप इतरही पक्षांवर घेता येईल पण बसपाचे वैशिष्ट्य हे की हा वापर एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक फायद्यासाठी वगैरे फारसा न होता मायावतींच्या प्रतिमा वर्धनासाठी होतो. जसे हत्तीचे ढीगभर पुतळे उभारणे, स्वतः मायावतींचे सर्वत्र पुतळे उभारणे.

मायावती यांच्यावर दुसरा आक्षेप असा (आक्षेप बसपा-२) की त्यांची आर्थिक, परराष्ट्राशी संबंधित भूमिका स्पष्ट नाही. देशाचा पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यात परराष्ट्रसंबंध हा मोठा फरक असतो. त्याच बरोबर आर्थिक धोरणे, कल्पना स्वच्छ असणेही गरजेचे असते. कु. मायावती यांच्यामध्ये दोन्हीचा अभाव जाणवतो. स्थानिक/अंतर्गत राजकारणात त्यांची एक ठाम भूमिका/स्थान आहे पण आंतरराष्ट्रीय मंचावर त्या भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील का या बद्दल साशंक आहे.

या सगळ्यांनंतर कानामागून येऊन तिखट झालेल्या आम आदमी पक्षाबद्दल म्हणा किंवा केजरीवाल यांच्याबद्दल म्हणा लिहिणे आता गरजेचे झाले आहे.

पंतप्रधानपदासाठी म्हणून माझा श्री.केजरीवाल यांच्यावरील सर्वात प्रमुख आक्षेप होता एकाधिकारशाहीचा. मात्र गेल्या महिन्याभरात विशेषतः निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षाचा कारभार पूर्वीइतका व्यक्तीकेंद्रीत वाटत नाहीये. तरी इतक्या नवख्या व अननुभवी (आआप-१) व्यक्तीने थेट देशाचा पंतप्रधान व्हावे असे वाटत नाही हे ही खरे.

अजून एक आक्षेप म्हणजे पक्षाची आर्थिक नीती व राजकीय स्थान (आआप-२). यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय म्हणा किंवा व्यक्त केलेली भूमिका म्हणा, मला यांच्यात व सौम्य डाव्या पक्षांत विलक्षण साम्य दिसते. लोहियावादी पक्षांचा आयडियलिझम यांच्यात पुरेपूर उतरला आहे आणि म्हणूनच यांच्या आर्थिक धोरणावर सतत शंका वाटत असते. झोपडपट्ट्या अधिकृत करणे काय किंवा मोफत पाणी वा विजेवरील सबसिडी काय डावीकडे किंवा सरकार केंद्रित दिवसांकडे अर्थात परमिट राजकडे यांची वाटचाल चालली नाहीये ना अशी शंका येते.

तिसरे व सर्वात महत्त्वाचा आक्षेप म्हणजे हे (आआप-३) व्यक्तीकेंद्रीत निवडणुका लढतात. समोरच्या व्यक्तीविरुद्ध राळ उडवून द्यायची इतकी की लोकांच्या डोळ्यात जाऊन त्यांना खरे-खोटे समजेनासे व्हावे. भारतीय राजकारणात हे सर्वत्र चालते हे खरेय पण जेव्हा एखादा पक्षा 'आदर्शवाद' हीच आपली कार्यप्रणाली आहे असे म्हणतो तेव्हा निवडणुका लढवायची ही पद्धत नक्कीच आदर्श वाटत नाहीत. काँग्रेस व भाजपापेक्षा वेगळा म्हणवणार्‍या पक्षालाही टीकेचा स्वीकार सकारात्मक रितीने करता येत नसेल तर हे इतर पक्षांची मोठे साम्य दाखवणारे ठरते.

शेवटचा मोठा आक्षेप असा की (आआप-४) लवचीकतेचा अभाव. आम्हालाच सगळे कळते, बाकी सगळे मूर्ख आहेत असा यांचा आविर्भाव असतो. योग्य वेळी लवचीकता दाखवणे केजरीवाल यांच्या क्षणिक राजकीय फायद्याचे असेलही मात्र एक पंतप्रधान म्हणून हे एककल्ली वागणे मला घातक वाटते.

असो. या पक्षांवरही तपशिलांत लिहेन असे वाटले होते पण याहून अधिक वेळ या पक्षांवर व प्रमुखांवर घालवावा असे वाटले नाही. थांबतो.

(समाप्त)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

मायावती देवी.... मुलायम शेठ
अरे देवा...
नको देव राया अंत आता पाहू.
.
.
हर शाख पर उल्लू बैठा है, अंजाम-ए-गुलिस्तां क्या होगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वैयक्तिक मत म्हणून मान्य आहेच. पण तुमचे नक्की आक्षेप काय आहेत?
का फक्त कानफाट्या नाव पडल्याने त्यांच्या नावावर फुल्ली

हा प्रश्न एकट्या मनोबाला नाही. ही दोन नावे घेतली की अनेकांची कोणत्याही कारणाशिवाय हीच प्रतिक्रीया असते.
मला वैयक्तिकरित्या मायावतींची कारकिर्द इतकी वाईट वाटली नव्हती. इतका टोकाचा विरोध नक्की का हे कळेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या "त्यांच्यातल्या" आहेत ना?
आणि मुलायमसिंग म्हणजे १९९० मध्ये साधुसंतांना गोळ्या घालणारा क्रूरकर्मा "मुल्लासिंग"

हे आक्षेप मनोबांच्या मनातले आहेत असे नाही..... जण्रल निगेटिव्ह प्रतिक्रिया देणार्‍यांच्या मनातले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत आहे.
विशेषतः मायावती यांच्यासंदर्भात तर माझेही तेच निरिक्षण आहे. प्रत्यक्षात "कु. मायावतींच्या राज्यात, उत्तरप्रदेशमध्ये याआधीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या काळात झाली नसतील इतकी कामेही झाली व तुलनेने सर्वाधिक चोख कायदा-सुव्यवस्था होती" असे विधान करण्यास मी तयार आहे. पण सदर लेख माझे आक्षेप नोंदवण्यापुरता असल्याने प्रत्येक नेत्याचे प्ल्स पॉईंट्स दिलेले नाहित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची कारकिर्द चांगली होती/ इतकी वाईट नव्हती/ वाईट होती हे आपण दुसर्‍या राज्यात राहून कसं ठरवतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी एका मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीच्या माझ्या पर्सेप्शनचि तुलना त्याच राज्याच्या अन्य मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दिच्या माझ्या पर्सेप्शनशी करत आहे. वरील विधान तुलनात्मक आहे अ‍ॅबसोल्युट नव्हे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुठल्या कुठल्या माध्यमांमधून पर्सेप्शन बनवता तुम्ही? किंवा इतर कोणिही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बाकीचं सोडा, पण मायावतीबाईंचा मोठमोठे पुतळे उभारण्याचा अन त्यापायी वेस्टेज करण्याचा सोस हे एक कारण आहे. शिवाय यूपी म्हटले की जण्रल मराठी माणसाच्या मनात जी प्रतिमा तयार होते ती आणि त्यात परत 'त्यांच्यातली' असणे असा कारणसमुच्चय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मायावतीबाईंचा मोठमोठे पुतळे उभारण्याचा अन त्यापायी वेस्टेज करण्याचा सोस हे एक कारण आहे.

+१ सहमत आहेच. हा आक्षेप मी लेखातही नोंदवला आहेच.

शिवाय यूपी म्हटले की जण्रल मराठी माणसाच्या मनात जी प्रतिमा तयार होते ती आणि त्यात परत 'त्यांच्यातली' असणे असा कारणसमुच्चय आहे.

उत्तरार्धाशी सहमत आहेच.
वाजपेयीसुद्धा युपीतील होते. त्यांच्याबद्दल मराठी मनांत अशी प्रतिमा दिसत नाही, अगदी युपीतील गांधी परिवाराबद्दलही त्या टोकाची नाही. पण मायावती 'त्यांच्यातील' आहेत हे कारण असावे. "त्यांच्यापैकी" कुणी "आमच्यावर" राज्य करावे हे भल्याभल्यांना सहन होत नाही असे अनेकदा दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. पण 'त्यांच्यातील' असणे हा एकमेव फ्याक्टर नाही इतकेच सांगावयाचे होते. बाकी ठीकच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मायावतीबाईंच्या (सर्व) पुतळ्यांच्या वेस्टेजपेक्षा कितीतरी पट जास्त खर्च गुजरातेतील सरदार पटेलांच्या पुतळ्याला आला आहे असे नुकतेच कुठेतरी ऐकले. (बहुदा केतकरांच्या मुलाखतीत.) मात्र त्यासाठी कोणी मोदींचा द्वेष करत असल्याचे दिसले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, त्याला खर्च दांडगाच येणारे-पण मोदींची प्रतिमा विकासपुरुष अशी असल्याने ते झाकून जाते. मायावतींची अशी प्रतिमा आहे का? खरंखोटं जाऊद्या, प्रतिमेबद्दल बोला फक्त. तसे पाहिले तर मायावतींची प्रतिमा पॅन इंडियन लेव्हलवर काय आहे? मला नै वाटत फार कै पॉझिटिव्ह आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पीआर कंपन्या आणि माध्यमांना हाताशी धरून मोदींनी आपली प्रतिमा विकासपुरूष अशी उभी केली आहे हे मान्य आहे. मायावतींकडे इतका माध्यमसाळसूदपणा नक्कीच नाही. कदाचित त्यांची महत्त्वाकांक्षा मोदींइतकी मोठी नसल्याने त्यांना त्यांच्या प्रतिमेची काळजी नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माध्यमसाळसूदपणा>>>>नक्कीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलायमसिंग, मायावती यांना तर मी पंतप्रधान पदाचे उमेदवार पण मानत नाही. उद्या अजित पवार म्हटला मला पंतप्रधान व्हायची इच्छा आहे तर लगेच तो त्याचा उमेदवार होत नाही. इच्छुक फारतर!

केजरीवाल.... ह्ह्म्म्म.... नेतॄत्वाची दुसरी (आणि त्या खाली पण सुद्धा) सक्षम फळी "आप" पक्षात उभी राहिल्याशिवाय आणि ते सुद्धा "केजरीवाल" इतके ध्येय प्रेरित आहेत (संधीसाधू नव्हे) हे सिद्ध झाल्याशिवाय त्यांचा देशाच्या पातळीवर विचार जरा अवघड आहे. सध्या "आप" म्हणजे "केजरीवाल" आणि "केजरीवाल" म्हणजे "आप" असे चित्र दिसते अर्थात मिडिया ने उभे केलेलेसुद्धा असू शकते माहित नाही.. पण एकूणातच - इट्स टू अर्ली टू कॉमेंट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सहमत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तर लगेच तो त्याचा उमेदवार होत नाही. इच्छुक फारतर!

सहमत आहे. या लेखात अश्याच इच्छुकांबद्दलच आक्षेप मांडले आहेत. लेखाच्या शीर्षकातही ते स्पष्टच केले आहे.

केजरीवाल .... इट्स टू अर्ली टू कॉमेंट!

माझ्यासाठी तेही इच्छुकच आहेत. अजून तरी उमेदवार वगैरे नाहितच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही योगेद्र यादव चे मोठ्ठे पंखे आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

Smile
होतील होतील.. ते कदाचित हरयाणाचे मुख्यमंत्रीही होतील!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतके आक्षेप घेतल्यानंतर मत नक्की कुणाला देणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अध्यक्षीय लोकशाही नसल्याने आपण तसे ही "पंतप्रधान" पदाच्या उमेदवारासाठी मत देणार नाही आहोत.

आणि पक्ष्/आघाडी बद्दल म्हणाल तर - १०-२०-३० करणे हा पर्याय कसा वाटतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

१०-२०-३० करणे म्हणजे काय करणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खेळात राज्य पहिले कोणावर येणार हे कसे ठरवायचा बुवा तुम्ही?

आम्ही १०-२०-३०....-१०० असे करायचो ज्याच्यावर १०० त्याचावर राज्य!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आमच्याकडे एक मोठी कविता होती यासाठी. 'इळिंग, पिळिंग, लवंगा चिळिंग, .....,गाय गोट, चंदन पोट, उतरला राजा' अशी त्यात शेवटची ओळ होती इतकेच आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्ही तर 'अरिंग मिरिंग लवंग चिरिंग, चिरता चिरता डुगडुग बाजा, गाई गोपी उतरला राजा' असे म्हणायचो! लवंग चिरण्याचे चिरिंग असे इंग्रजी रूप त्यात पाहून गंमत वाटायची. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मत कोणाला द्यावे याबद्दल माझा एक ठाम अल्गोरिदम आहे. त्यानुसार जो उमेदवार योग्य वाटेल त्याला देईन.
लोकसभेसाठी राष्ट्रीय पक्षालाच मत देईन हे नक्की

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सद्य राष्ट्रीय पक्ष

 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
 • भारतीय जनता पक्ष
 • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
 • बहुजन समाज पक्ष
 • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
 • कम्युनिस्ट पार्टि ऑफ इंडिया

संदर्भ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इलेक्शन कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रीय पक्ष आहे हे खरे,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पक्ष राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी किमान ५ राज्यांत त्याला बर्‍यापैकी मते (प्रत्येक राज्यांत पडलेल्या एकूण मतांच्या किमान ६% मते) मिळालेली असतात हे लक्षात घेता माझ्यापुरते हे लोकसभेच्या मतदानासाठी पुरेसे आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बीजेपीला मिझोराममधे ६% मते मिळत नसणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

किमान ५ राज्ये म्हटले आहे त्यात.

बाकी, ते पर्सेंटेज कसे काढता बॉ तुम्ही? पेस्तनकाकांनंतर तुम्हीच असे दिसतेय एकूण ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पेस्तनकाका कोण? Let me beat him (in record I mean).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हंड्रेड परसेंट पेस्तनकाका म्हणून पुलंचं एक स्फुट आहे. त्यातले मेन क्यारेक्टर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाक्यरचना संदिग्ध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमी काँग्रेस किंवा बीजेपीला मत देणार. असं मनात आलं उगाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझा मुख्य आक्षेप आहे तो लोकप्रिय घोषणांबाबत. कालच बातमी होती की प्रचंड गर्दीमुळे जनता दरबार आवरता घ्यावा लागला, बंद पडला. आता, पत्रे आणि ऑनलाईन सुविधा वापरुन तक्रारी सांगायच्या आहेत.

दुसरे हे की केजरीवाल यांची अण्णांबद्दलची भुमिका आणि अण्णांची केजरीवालसंबंधी भुमिका हे मोठंच गौडबंगाल आहे. त्यामुळे केजरीवाल दाखवतात तितके साळसुद नसावेत असे उगीचच वाटत राहते.

चर्चा ऐकताना या माणसांकडे फारसे मुद्दे नाहीत हे जाणवतं. इतर पक्षांवर टीका करताना नेहेमी फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळे याबद्दलच बोलुन कसं चालेल? तुमची आर्थिक नीती काय? परराष्ट्रीय धोरण काय? काश्मीरबद्दल मांडणी काय? पाकीस्तानबद्दल विचार काय? काहीच बोलत नाहीत. त्यांची धोरणे असतीलही मात्र त्यांची जी काही माणसे टीव्हीवर ऐकली ती तरी याबद्दल बोलताना दिसली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

तुमच्या "भ्रष्टाचार हा एकच मुद्दा" या मताशी सहमत.
तरीही, एखादा राज्यस्तरीय पक्षाचं आर्थीक धोरण, काश्मीरबद्धल मांडणी, परराष्ट्रीय धोरण असतं का? उदाहरणार्थ (फक्त उदाहरण म्हणूनच.. तुलना नाही) शिवसेनेचं आहे का? जेव्हा आप हा केंद्रीय पक्ष होईल तेव्हा हे सगळे प्रश्न महत्वाचे ठरतील. आत्ताच त्यांच्याकडे ठोस परराष्ट्रीय धोरण नाही म्हणजेच काहीतरी गौडबंगाल आहे हे कितपत बरोबर वाटतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-------------------------------------------

आप आता लोकसभा निवडणुका लढवीत आहे. तेव्हा त्यांच्याकडे ठोस परराष्ट्रीय धोरण नको? केंद्रीय पक्ष होईपर्यंत वाट पाहायला हवी हे मान्य करणे कठीण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

आताच एक बातमी वाचायला मिळाली :-
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalkrishna-adwani-bjp-nare...

आडवाणींनी केली पक्षाची गोची

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना राज्यसभेत पाठवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना आडवाणी यांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. मी येणारी लोकसभा निवडणूक लढणार आहे तिही गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून, असे स्पष्टपणे आडवाणी यांनी सांगितले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्षाने दिलेली पंतप्रधानपदाची उमेदवारी आडवाणी यांना फारसी रुचलेली नाही. त्यामुळेच मोदींकडे पक्षाने लोकसभा निवडणुकांचं नेतृत्व सोपवल्यापासूनच आडवाणींचे रुसवे-फुगवे सुरू आहेत. त्यांनी कधी थेट तर कधी इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये मोदींची कानउघाडणीही केलेली आहे. एकीकडे जनमत चाचण्यांमध्ये मोदी यांना भावी पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती मिळत असताना पक्षातीलच ज्येष्ठ नेतृत्व त्यांना लक्ष्य करत असेल तर त्याचा संदेश वेगळा जाईल, अशी भीती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळेच आडवाणी यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट करुन त्यांची राज्यसभेत पाठवणी करायची व या दोन्ही नेत्यांमध्ये 'सुरक्षित' अंतर निर्माण करायचे, असं 'राजकारण' पडद्यामागून शिजत होतं. याबाबत शनिवारी पक्षाच्या सूत्रांकडून बातम्याही पेरण्यात आल्या होत्या. मात्र, आडवाणी यांना अशी शक्यता फेटाळून लावत पक्षाची गोची केली आहे. मी राज्यसभेवर जाण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टपणे सांगत आडवाणी यांनी मी अजूनही मैदानात असल्याचाच इशारा पक्षाला दिला आहे.
.
.
.
निवडणुकीच्या व तडजोडिच्या राजकारणात अनंत बलाबलांचा सामना होत असतो, पर्म्युटेशन कॉम्बिनेशन्स होत असतात. व एकूणच भरवशानं कधी काय होइल हे नक्की सांगता येत नाही.
अगदि कालपर्यंत अशक्य वाटावी अशी घटना आज घडाते, अशी परिस्थिती आज प्रत्यक्षात उद्भवते; व कैकदा "आता हे अमुक अमुक होइलच ;
लगेच झालं नाही तरी लवक्रच कधीतरी होइल" अशा वाटनारय गोष्टीही घडायच्या राहून जातात. सारच कसं अगदि अगम्य.
आडवाणींच्या डोक्यात ह्यातलं काही चालत असावं का ? :-
जर काहीतरी करुन भाजपाला बर्‍याच जागा मिळाल्या, पण सरकार बनवायला थोड्याशाच कमी पडल्या, मित्रपक्ष जमेनात अशी स्थिती आली तर ??
तर मग निदान त्या परिस्थितीत तरी पंतप्रधान म्हणून आपल्याला पुसटशी का असेना संधी असू शकते; कारण एखादा जरी मित्रपक्ष "मोदी नको;
पण अडवाणी चालतील" असे बोलला, व त्याने सरकार बनत असेल, तर आपल्यालाच संधी मिळेल.
अर्थात हे राजय्सभेत जाउनही करता येइलच. पण लोकसभा लढवून "मी अजूनही सक्रिय राजकारणात आहे, लोकांम्ध्ये, मासेसमध्ये सहभागी आहे" हा संदेश पक्षातील प्रमुख वजनदार व्यक्तींकडे पाठवता येइल.
.
.
.
स्वगत :-
मनोबा, दरवेळी राजकारणावर गप्प रहायचं टह्रवतोस आणि विक्रम्-वेताळ कथातल्या विक्रमासारखं बोलतच राहतोस.
छ्या. तुझं काय खरं नाय गड्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आता कोणत्याही सामान्य/तर्क्य परिस्थितीत अडवाणींना पंतप्रधानपद मिळेलसे वाटत नाही.
अगदीच मोदी नको म्हणाले कोणी तर राजनाथ सिंह यांना चानस है, पण त्याहून अधिक (किमान तेवढाच) चानस मोदींचे जवळचे मित्र अरूण जेटलींचा आहे.

भाजपाला २००हून कमी जागा मिळाल्या व तिसर्‍या आघाडीलाही १८० वा त्याहून कमी जागा मिळाल्या (अर्थात कॉग्रेस-युपीएने बर्‍यापैकी बरे पर्फॉर्म केले) तर अडवाणी गटाकडे चान्स आहे म्हणा. पण त्याही वेळी अडवाणी स्वतःऐवजी सुषमा स्वराज यांचे नाव पुढे करतील असा अंदाज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पप्पू - फेकू वगैरे स्वस्त रणधुमाळी माध्यमांत सुरु आहे. कुठे विद्वज्जन अमुकच एक आल्याने काय भले होणार हे ठासून सांगताहेत. "सत्तेवर कोण यावं " ह्याबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही.
पण---
कोण येउ शकतं असं मला वाटतं हे सांगतो :-
सत्तेवर या ना त्या प्रकारे काँग्रेस येणार. सध्या जो कर्कश्श प्रचार,धुराळा माध्यमांनी उडवला आहे, तो लक्षा घेतला तरी वाटते की " काँग्रेसचे पानिपत होणार " हा ओव्हरहाइप्ड तर्क आहे.
बीजेपीवाले गर्जना, वल्गना करण्यात आणि निवडणुकीपूर्वीच "जितं मया" म्हणत आनंदात मश्गुल होण्यात,विजयापूर्वी उत्सव साजरे करण्यात आणि नंतर रडत बसण्यात, स्वतःस उल्लू बनवण्यात पटाइत आहेत.
सध्या प्रोजेक्ट केले जाते आहे तितकी बीजेपीची स्थिती मजबूत नाही.
सध्या प्रोजेक्ट केले जात आहे तितकी काँग्रेसची स्थिती वाईट नाही.
"भ्रष्टाचार उघड झाले", "फार मोठी नावं 2g, coal scam वगैरे मधून बाहेर आली" वगैरे लोक म्हणताहेत.
प्रत्यक्षात राजकारण्यांसाठी व नियमित मतदान करणारयंसआठीही हा business as usual असाच प्रकार आहे.
२जी मध्ये खरोखरिच फार मोठा आकड्याचा घोळ वगैरे झाला असलाच तरी ते तितकं मतदात्यासाठी महत्वाचं असेलच असं नाही.
मतदार नक्की काय विचार करेल हे सांगू शकत नाही. पंण काँग्रेसला जितकं दुर्बल, *त्या म्हणून प्रोजेक्ट केलं जातं आहे, तसं नक्कीच नाही. काँग्रेस सत्तेवर येणार किंवा जो सत्तेवर येइल त्याला पाठिंबा देणार हे नक्की.

*कोण यावं, ह्याची चर्चा करु इच्छित नाही. कोण येताना दिसतय ह्याचा अंदाज सांगतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझा अंदाज विपरीत आहे

१. सध्या ज्या गोष्टी चालु आहेत त्यानुसार परिस्थिती चौथ्या सिच्युएशनकडे सरकत आहे. युपीए १५०-१६० च्या पुढे जाणे कठीण असले तरी सध्याच्या एन्डीएलाही सत्तामिळणे शक्य नाही तसेच सध्याच्या तिसर्‍या आघाडीलाही नाही (सद्य एन्डीए+युपीए > २७२).
तेव्हा छोट्या पक्षांपुढे पर्याय राहतात ते असे:
अ. भाजपा-एन्डीए सरकारला बाहेरून पाठिंबा (हे सरकार अस्थिर बनेल व ५ वर्षे पूर्ण करणे कठीण असेल. अशावेळी मोदींना पंतप्रधान होता येणार नाही)
ब. तिसर्‍या आघाडीला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा (हे ही सरकार अतिशय अस्थिरच असेल. व यावेळी काँग्रेस १९९८ची चुक (भाजपाला सत्तेवर येऊ न दिल्याने सिंपथी मिळवण्याची) पुन्हा करेल का शंका आहे)
क. एका आघाडीला भाजपाचा पाठिंबा (जर पवार मोदींना भेटले असतील या शक्यतेला कव्हर करायचा उद्देश असावा असा अंदाज आहे)

आता मोदींना त्यांच्याशिवाय भाजपा सरकार आलेले बहुदा चालणार नाही. अशावेळी 'क' शक्यतेत पवारांसारख्या 'धर्मनिरपेक्ष' चेहर्‍याचा नंबर लागु शकतो. यात काँग्रेस, जदयु, सपा, डावे व अण्णाद्रमुक वगळून उर्वरीतांची आघाडी असेल. तिथे पवारांना भारी पडेल असे बिजद आहे ज्यांनी कालच पंतप्रधानपदाची इच्छा नसल्याचे घोषित केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरील प्रतिसादात भाजपवाले गर्जना -वल्गना करण्यात तरबेज आहेत असे म्हटले आहे.
हे त्याचे ताजे उदाहरण :-
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5268577345397236832&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140326&Provider=-&NewsTitle=मोदींच्या 'भारत विजयसभां'ना आजपासून सुरवात

मोदींच्या 'भारत विजयसभां'ना आजपासून सुरवात
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी देशभरात 'भारत विजय सभा' घेणार असून, त्याची सुरवात आज (बुधवारी) उधमपूर मतदारसंघातील हिरानगर येथून करणार आहेत.

मोदी देशभर एकूण १८५ 'भारत विजय सभा' घेणार आहेत. यामध्ये २९५ लोकसभा मतदारसंघांसाठी ते प्रचार करणार आहेत.
मोदी जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये सभा घेऊन या 'भारत विजय सभां'ना सुरवात करणार आहेत.

वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमधील प्रचाराला सुरवात करणार आहेत. गुजरात, तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकांनी सोमवारी उंच पर्वतावर असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिरात सुरक्षा परेड घेतली.

मोदींचा दिल्लीत 'डिनर'
भारत विजय रॅलीतील आजच्या प्रचारसभांनंतर रात्री दिल्लीतील हॉटेल अशोका येथे नरेंद्र मोदींसोबत सशुल्क सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आम आदमी पक्षानंतर निधी उभारणीसाठी भाजपनेही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

.
.
.
हे लोक जिंकण्यापूर्वीच जितं मया करीत डांगोरा पिटतात. कधी जिंकतातही.
पण जिंकले नाहित तर बेक्कार आपटतात तोंडावर.
ह्यांना यात्रांना जराशी मवाळ पण समावेशक अशी नावं देता येत नाहित का ?
"भारत सुधार यात्रा" , "भारत जागरण यात्रा" , "भारत नवव्यवस्था यात्रा" वगैरे.
जिंकण्यापूर्वीच इतक्या वल्गना करतात की कैकदा "आपले लोक जिंकणारच आहेत" असं मानून ह्यांचे पारंपरिक मतदार घरी झोपा काढतात.
.
.
भाजप- काँग्रेस्-आप- किंवा अजून ़ऑनता पक्ष चांगला किंवा वाईट कसा आहे; ह्याबद्दल काहिच बोलायचे नाहिये मला.
फक्त त्यांच्या ब्रॅण्डींगबद्दल बोलतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars