Skip to main content

रॅण्डम आणि आर्बिट्ररी ह्या संकल्पना

विज्ञानविषयक लेखनात तसेच संख्याशास्त्रीय चाचण्यांसंदर्भात रॅण्डम ही संज्ञा वापरलेली आढळते. ह्या संज्ञेचा अर्थ काय आहे आणि तो विविध संदर्भांनुसार बदलतो का अशी शंका मनात आहे. ह्या संज्ञेचा मराठी पर्याय म्हणून यादृच्छिक, वाटेल तसे, कोणतेही, अनियत, आकस्मिक, स्वैर, इतस्ततः, संधानविरहित, क्रमरहित असे पर्याय महाराष्ट्र शासनाच्या भाषासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या पारिभाषिक शब्दसंग्रहांत दिलेले आहेत.
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd…
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd…
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd…
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd…
अपत्य हे आई किंवा वडील ह्यांपैकी कोणासारखे असेल हे ठरण्याची प्रक्रिया यादृच्छिक असते. ह्यासारखे वाक्य जनुकशास्त्राशी संबंधित लेखनात वाचलेले आठवते.

वरील पारिभाषिक शब्दसंग्रहात एका ठिकाणी आर्बिट्ररीचा मराठी पर्याय म्हणूनही यादृच्छिक ही संज्ञा दिली आहे.
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=arbitrary&field_pratish…
भाषाविज्ञानांवरील मराठी पुस्तकांत भाषिक ध्वनी आणि अर्थ ह्यांच्या संबंधाविषयी सांगताना आर्बिट्ररीचा पर्याय म्हणून यादृच्छिक ही संज्ञा वापरलेली आढळते. उदा. ध्वनी आणि अर्थ ह्यांतील संबंध आर्बिट्ररी असतो. त्यांत कार्य-कारण-भाव अथवा एखादा अनिवार्य तार्किक संबंध नसतो. मा-क-ड ह्या विशिष्ट क्रमाने येणाऱ्या ध्वनिसमूहाने एखाद्या प्राणिविशेषाचा बोध व्हावा ह्याला केवळ एखाद्या जनसमूहात तसा संकेत असणे एवढेच कारण आहे. प्रत्येक काळी आणि प्रत्येक स्थळी ह्या ध्वनिसमूहाने हाच अर्थ व्हावा अशी निकड नाही.

ह्या दोन संकल्पनांतील साम्यभेद समजून घेण्यासाठी मी एका मित्राकडे विचारणा केली. त्याच्या मते हा भेद निवड करण्याच्या बाबतीत असतो. आपण फासा टाकला तर ६ बाजूंपैकी कोणतीही एक बाजू येऊ शकते. पण कोणती यावी ह्यात म्हणजे निर्णय घेण्यात आपला काहीच सहभाग नसतो. हे रॅण्डम असण्याचे उदाहरण आहे. तर आपण एखाद्याला फासा देऊन कोणतीही बाजू निवडायला सांगतो. तेव्हा निवडीसाठी कोणताही निकष लावला जात नाही आणि बाजू निवडण्यात येते हे आर्बिट्ररी असण्याचे उदाहरण आहे. दोहोंत १/६ अशीच संभाव्यता असते.

वरील उदाहरण चांगले आहे. पण तरीही पूर्ण समाधान होत नाही. एखाद्या चाचणीसाठी रॅण्डम पद्धतीने निवड करण्यात येते. अशा उदाहरणांत निवड तर होते. मग तिथे रॅण्डमचा वरील उदाहरणांत अभिप्रेत असलेला अर्थ जुळत नाही. तेव्हा गोंधळ हा केवळ मराठी संज्ञा कोणती वापरावी हा नसून मूळ संकल्पनाच पुरेशी स्पष्ट झालेली नाही ह्यामुळे आहे. तरी जाणकारांनी ह्याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

नितिन थत्ते Fri, 17/01/2014 - 15:13

पाण्याच्या उत्कलनबिंदूला १०० अंश आणि गोठणबिंदूला ० अंश म्हणावे हा आर्बिट्ररी चॉईस आहे. म्हणजे त्याला ५० का म्हणायचे नाही याचे कोणतेही उत्तर नाही. किंवा गोठणबिंदूला १०० का म्हणायचे नाही याचेही काही उत्तर नाही.

परंतु यात १०० आणि ० या ज्या संख्या आहेत त्या रॅण्डम नाहीत आर्बिट्ररी आहेत. या कोणत्या घ्याव्यात याचे स्वातंत्र्य ठरवणार्‍याला होते.

त्या समजा एकदा डब्यातून चिठ्ठी काढून ७ आणि ९३ अशा आल्या असत्या तर त्याला रॅण्डम म्हणावे लागले असते.

तुमच्या मित्राने योग्यच स्पष्टीकरण दिले आहे.

आर्बिट्ररीला मन:पूत (वाट्टेल ते या अर्थी) म्हणता येईल का?

मन Fri, 17/01/2014 - 15:33

शिंक येउन शेंबूड बाहेर पडला तर बाहेर पडणार्‍या शेंबडाची मात्रा रँडम असते. (ती किती असेल हे आधीच स्पष्ट करता येत नाही. त्यला कर्ता असेलच असेही नाही.)
कुणी नाक शिंकरल्यावर जो शेंबूड बाहेर पडतो त्याला आर्बिट्ररी म्हणता यावे.
म्हणजे हळू, किम्वा जोरात शिंकणे ऐच्छिक आहे, पण त्याउप्पर शेंबडाच्या मात्रेवर स्पेसिफिक असे शिंकरणार्‍याचे नियंत्रण नाही.
.
बायको भडकली की हाताला लागेल ते भांडे उचलून मारते. ते भांडे आर्बिट्ररी मह्णता यावे.
ते भांडे जिथे जाउन आदळते त्यास रँडम म्हणता यावे, नेमके कुठे लागेल, नाकावर आपटेल, की टाळके फोडेल हे बायकोला, नवर्‍याला किंवा खुद्द भांड्याला माहित नसते.

बॅटमॅन Fri, 17/01/2014 - 15:42

In reply to by मन

बायको भडकली की हाताला लागेल ते भांडे उचलून मारते. ते भांडे आर्बिट्ररी मह्णता यावे.
ते भांडे जिथे जाउन आदळते त्यास रँडम म्हणता यावे, नेमके कुठे लागेल, नाकावर आपटेल, की टाळके फोडेल हे बायकोला, नवर्‍याला किंवा खुद्द भांड्याला माहित नसते.

अण्भव काळजाला भिडला. कट्ट्यास येताना डेटॉल-कापूस घेऊन येऊ काय?

अजो१२३ Fri, 17/01/2014 - 15:49

In reply to by मन

बायको भडकली की हाताला लागेल ते भांडे उचलून मारते. ते भांडे आर्बिट्ररी मह्णता यावे.

एव्हढ्यातच अशी उदाहरण. अजून दिल्ली फार दूर आहे.

लॉरी टांगटूंगकर Fri, 17/01/2014 - 15:42

आर्बिट्ररीमध्ये आपला निर्णय येतो. एखादा डेटा रॅण्डम असतो, किंवा रॅण्डम कंपने (vibrations, उदा. भुकंप) असतात (काहीतरी समोरून येणारं असं). त्यावर आपला काहीही कंट्रोल नाही, असं काहीसं डोक्यात येत आहे. आर्बिट्ररी पद्धतीनी आपण डेटा मधले काही पॉइंट्स निवडू शकतो.

बाकी जाणकारांच्या प्रतीक्षेत.

राजेश घासकडवी Fri, 17/01/2014 - 16:04

इथे पुटिंग द कार्ट बिफोर द हॉर्स होतंय का?

या चर्चाप्रस्तावात मला खालील गृहितकं दिसतात.
१. रॅंडम आणि आर्बिट्ररी हे दोन शब्द आहेत.
२. संकल्पनांचं जे अवकाश आहे त्यातले दोन वेगवेगळे विशिष्ट बिंदू त्यांनी निदर्शित होतात
३. मराठीत त्यांचे प्रतिशब्द शोधण्यासाठी आधी या दोन बिंदूंशी संलग्न अशी सर्व उदाहरणं आपल्याला इकडे वा तिकडे करता यायला हवीत.

यात मला दोष असा वाटतो की या शब्दांनी निदर्शित होणारे दोन बिंदू नसून एकमेकांना छेदणारी धूसरशी वर्तुळं आहेत. आणि त्यांचा वापर व्हेन डायाग्रामप्रमाणे होतो. म्हणजे जेव्हा एखाद्या उदाहरणात वापर करायचा असतो तेव्हा काही वेळा निश्चितपणे रॅंडम हा शब्द वापरला जातो, काही वेळा निश्चितपणे आर्बिट्ररी हा शब्द वापरला जातो, तर उरलेल्या वेळी कुठचा शब्द वापरायचा हे आर्बिट्ररी असतं (किंवा रॅंडमली ठरतं).

त्यामुळे माझ्या मते आधी प्रतिशब्द शोधावेत (उदाहरणार्थ - रॅंडमनेस याला यदृच्छा, आणि आर्बिट्ररी याला संधानविरहित). हे तांत्रिक शब्द म्हणून प्रस्थापित करावेत. आणि मग जिथे जिथे खात्रीलायकरीत्या रॅंडमली हाच शब्द योग्य आहे तिथे यदृच्छेने हा शब्द वापरावा. (रॅंडम वॉक, रॅंडम नंबर जनरेटर, रॅंडम डिस्ट्रिब्यूशन...) तेच आर्बिट्ररीविषयी. आणि मधल्या संकल्पनांना काय वापरावं यावर तसं काही बंधन नसावं.

अजो१२३ Fri, 17/01/2014 - 16:12

१. आर्बिट्ररिर्ली एक धागा उघडला आणि एक रँडम प्रतिसाद दिला.
२. रँडमली एक धागा उघडला आणि एक आर्बिट्ररीर्ली प्रतिसाद दिला.
३.रँडमली ............ रँडमली......दिला.
४. आर्बिट्ररीर्ली ...........आर्बिट्ररीर्ली......दिला.

काय वेगळे केले या चारही जागी?

धनंजय Fri, 17/01/2014 - 22:57

तुमच्या मित्राचे स्पष्टीकरण बरेचसे बरोबर, पण...

आपण फासा टाकला तर ६ बाजूंपैकी कोणतीही एक बाजू येऊ शकते. पण कोणती यावी ह्यात म्हणजे निर्णय घेण्यात आपला काहीच सहभाग नसतो. हे रॅण्डम असण्याचे उदाहरण आहे. तर आपण एखाद्याला फासा देऊन कोणतीही बाजू निवडायला सांगतो. तेव्हा निवडीसाठी कोणताही निकष लावला जात नाही आणि बाजू निवडण्यात येते हे आर्बिट्ररी असण्याचे उदाहरण आहे. दोहोंत १/६ अशीच संभाव्यता असते.

ठळक ठशातले शेवटचे वाक्य चुकलेले आहे, असे मला वाटते. आर्बिट्ररीमध्ये प्रत्येक आकडेनिवडीची संभवनीयता (प्रॉबॅबिलिटी) १/६ येते, असे म्हणण्याकरिता काही आधार दिसत नाही. या बाबतीत संभवनीयता व्याख्यात नाही (नॉट डिफाइन्ड). त्यामुळे "१/६ नव्हे तर किती आहे?" हा प्रश्न निरवकाश आहे.

गब्बर सिंग Sat, 18/01/2014 - 12:13

आर्बिट्ररी म्हंजे काय याच्या एकापेक्षा जास्त व्याख्या असू शकतीलही.

हायेक सायबांनी अर्थशास्त्रात उडी घेण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतलेली होती. व त्यांची आर्बिट्ररी ची व्याख्या खालील व्हिडिओ मधे आहे -

.