संक्रांति ऋतू परिवर्तन (क्षणिका)

दिनांक: १८.१.२०१४.
संक्रांति दरवर्षी जनवरीच्या १४ किंवा १५ तारखेला येते. त्या पूर्वी दिल्लीच्या कुडकुडत्या हिवाळ्यात माणूस काय लेखणी ही जमून जाते. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होतो.संक्रांति पासून मोठा होणारा दिवस जाणवू लागतो. सकाळी थंड वर आणि दुपारी सूर्याच्या उन्हात थोडी उष्णता जाणवते. पर्वतांवर बर्फ वितळू लागते. उत्तरेकडून येणारे वारे सुरु होतात ते शिवरात्री पर्यंत ४० दिवस राहतात याला ‘चिल्ला जाडा’असे म्हणतात. धुक्याचा परदा दूर होतो. शेतांत सरसोंला(मोहरी) फुले येतात. दूरपर्यंत पिवळा गालीचा पसरलेला सहज दिसतो. जुनी पाने गळून पडतात, झाडांना नवे कोंब फुटतात जणू धरती वसंताच्या स्वागतास सज्ज होते आहे. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होता. ढगाळ वातावरण असल्यामुळे बाहेर थंडी आहे, तरी ही एक उत्साह मनात निर्माण झाला. आज सकाळी लवकर अंघोळ केली आणि सकाळी मनात आलेले विचार (क्षणिका) टंकित करू लागलो.

(१)
रात्रीची विराणी
धुक्यात विरली
प्रेमाची गाणी
ओठांवर आली.

(२)
धुक्यातुनी डोकावली
गुलाबाची कळी
प्रेमाची लाली
गालावर पसरली.

(३)
हळद लाउनी
धरती नटली
लेक लाडकी
निघाली सासरी.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

पण विराणी म्हणजे निर्जन ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वीरान = निर्जन हा हिंदी अर्थ. त्याचा मराठीत वैराण होतो.

पण इथे विराणी=विरहिणी असे वाटते आहे. असा फॉर्म अन्यत्रही पाहिल्याचे आठवतेय.

विराणा/णी=निर्जन या अर्थाने तो शब्द मला वाटते गोनीदांनी वापरला आहे. अन्य कोणी वापरला असल्यास ठौक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"वार्‍यावारती विरून गेली एक उदास विराणी" यातही विराणी आहे. मला वाटतंय की विराणी म्हणजे विरहगीत किंवा त्या प्रकारचे गाणे / कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस. तोच अर्थ आहे. ज्ञानेश्वरांच्या विराण्या फेमस आहेत.

"भवतारकु कान्हा तो वेगीं भेटवा का" इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विराणी म्हणजे विरह गीत. कडकडीत हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात, सर्वत्र उदासीन असे वातावरण निर्मित होते. संक्रांति म्हणजे परिवर्तन वसंताच्या आगमनाची चाहूल. पुन्हा नव्याने प्रकृती फुलू लागेल. हाच आशय मांडण्याच्या प्रयत्न केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0