हार्डडिस्क

हार्डडिस्क

एकदाचा धीर एकवटला आणि निश्चय केला की, काहिही करुन आज माझी हार्डडिस्क फॉरमॅट मारायची. या वेळेस फॉरमॅट मारलं की, ईंटरनेट कायमच बंद करणार आहे मी. डोक्याला शॉट नको. भले मग सगळ्यांशी संपर्क तुटला तरी चालेल पण माझी सिस्टम स्वच्छ पाहिजे मला. होतं न्हवतं, जुनं नवं , सारं सारं पुसून टाकायचं. काहीच शिल्लक ठेवायच नाही. हल्ली सिस्टम साली खुप स्लो झालीय. वेगवेगळ्या व्हायरसने जाम लोचा केलाय आयुष्याचा. नाही म्हणायला अ‍ॅन्टीव्हायरस आहे पण, रोज नवे व्हायरस जन्म घेतात आणि आपण रोज त्यांचा अपडेट घ्यायचा, मशिन रोज स्कॅन करायची.... वैताग वैताग आलाय ह्या सगळ्याचा.

फॉरमॅट मारुन एकदा का पाटी कोरी करकरीत झाली की, मग नव्याने सारं लिहीणार, नव्या वेगानं, नव्या दमानं, नव्या जोमानं. सारं काही नवं नवं, नवा मदर बोर्ड, नवा प्रोसेसर, नवी रॅम इतकं कशला? साजेस मोठं नवं घर देखिल घेतलय मी त्यांच्या साठी. सगळी सिस्टीम कशी नवी वाटली पाहीजे. खुप नवी स्वप्न आहेत माझ्या डोळ्यात. बाहेर बाजारात खूप सारे नवे बदल आले आहेत आणि मी मात्र अजुन तीच जुनाट मशीन वापरतोय वर्षानुवर्ष. तसे पार्टीशन्स पाडले आहेत हार्डडिस्कचे पण आत्ताचा जो हल्ला होता ना ! नेमका "सी" ड्राईव्ह वर होता. म्हणुनच काही तरी कठोर आणि गंभीर निर्णय घेण आवश्यक होत.... ह्या वेळेस.

घाईघाईत फॉरमॅट मारण्यापुर्वी महत्वाचा बॅकअप घ्यायला हवा. आयला हे बॅकअप प्रकरण पण ना ! किती तो गोंधळ ? हे घ्यावं की ते घ्यावं ? हे टाकवं की ते टाकवं ? एव्हढ्या वर्षांचं संचित आहे ते. सहजा सहजी कसं बरं सुटेल? पार गोंधळ उडालाय जाणिवांचा. मुंग्या आल्या आहेत मेंदुला. फक्त आणि फक्त निवडक/ अत्यावश्यक गोष्टीच घ्यायच्या, हे ठरवुन देखिल निम्मी हार्डडिस्क परत जुन्यानेच व्यापली आहे, जुन तेच परत नव्याने साठत गेलय. ठिका आहे. उरलेली निम्मी तरी वाट्यास आली हे पण नशिबच म्हणायच झालं. पण हे काय? उरलेल्या भागत हे बॅडसेक्टर कुठून आले?, कसे आले ? कधी आले? कळायचच बंद झालय मला. आता डिफ्रॅग पण होत नाहीये,फिझीकल डॅमेज आहे म्हणे तीच्यावर.... कायम स्वरुपीचा.

नको, नको तो विचार पण नको. आता हार्डडिस्क बदलायची माझ्यात ऐपत पण नाही आणि त्राण पण नाही.

(अवांतर = मला माहीत आहे शुध्द लिखाणाच्य खुप चूका असतिल. लहान पणा पासुनच या बाबतित खुप गोंधळ होतोय माझा अगदी तारे जमींपर मधल्या ईशान सारखा)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

छोटेखानी, रूपकात्मक लेखन आवडलं. पण याकडे मी तरी एक संकल्पना म्हणूनच बघतो आहे.

एक सूचना आहे. अशा लेखनात एक अडचण येते म्हणजे ज्यांना या तांत्रिक संज्ञा माहीत नाहीत, त्यांच्यापर्यंत हे लिखाण पोचू शकत नाही. त्याचबरोबर हे छोटंही झालेलं आहे. तेव्हा या लेखातल्या नरेटरचे दोन भाग करा. एक म्हणजे 'मी' जो या सर्व कॉंप्युटर, हार्ड ड्राइव्ह वगैरेबाबत अनभिज्ञ आहे. दुसरा त्याचा तांत्रिक सल्लागार. तो त्याला अमुक कर, तमुक कर असं सांगतो. त्यांचे संवाद, त्यामध्ये येणाऱ्या कृती, त्याबद्दल असलेली 'मी'ची चलबिचल यातून अधिक उत्तम नाट्यनिर्मिती होऊ शकेल. या एवढ्या मोठ्या रूपकाला एक ब्रीथिंग स्पेस पाहिजे, वाचकाच्या आत मुरायला वाव पाहिजे. तोही मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"एकाच या जन्मी पुन्हा फिरुनी नवी जन्मेन मी" हे गाण्यात ठीक आहे. प्रत्यक्षात किती कठीण आहे ना? जुन्या आठवणी, सवयी, ऋणानुबंध सोडवतच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'इटरनल सनशाईन...'ची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाह! अशी लहान पण नेमकी मुक्तके अधिक पोचतात नै..
आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नेमके!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

राजेशजी खरं म्हणजे लहान मोठं अस काहीच ठरवल नव्ह्त. जे जे सुचत गेल ते उतरवत गेलो.
सर्व वाचकांचे आणि प्रतीसादकांचे धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास!

- (कशाकशाचा बॅकअप घ्यावा ह्या प्रश्नात पडलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0