वेडा पप्पू

सचीन यांना सकाळी सकाळी आपल्याकडे पाहून पिग्विजय महाराज खुश झाले. "या या अण्णा, अलभ्य लाभ, आज आमच्याकडे कस येणे केले. यावर सचीनभाऊ उतरले,"अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा पप्पू वेड्यासारखे वागतोय, इतका शिकला पण हुकलाहो. भलते सलते प्रश्न विचारतो. हे अमुक का? हे तमुक का?

मागे ३ महिन्यापूर्वी तुमच्याकडे चांगले दहा हजार कोटी खर्चून त्याची शांती केलीय. पण आता तर तो भलताच अशांत झालाय. तुम्ही खरेच न हो बरोबर शांती केली होती? "तर हो, आपल काम म्हणजे सोळा आणे खरे" "अहो आम्ही प्रवक्ते, म्हणजे पाँग्रेसमधले सर्वज्ञच हो.

"ते मरू द्या,तुमचे कीर्तन. मला आमच्या पप्पूची झकास पैकी कुंडली काढून द्या. त्याची आधीची गहाळ झालीय कस होणार पोराचे देव जाणो'.

पप्पूच्या हातात कुंडली पडताच तो खवळला पिग्विजय काकांशी भांडू लागला "हे काय केलेत काका, पुन्हा पैसे वाया घालवलेत. तो पिग्विजयशी भांडू लागला तेवढ्यात त्याची बहीण बियांका तेथे आली तिलाही खबर लागलीच होती कि पप्पू हल्ली वेड्यासारखे वागतोय.

बियांकाला घेऊन तडक पप्पू पिग्विजय काकांकडे गेला तो पिग्विजय काकांना म्हणाला. "ओ काका,माझ्या कुंडली काढण्याचे जे पैसे काढलेत ते द्या आणि हि कुंडली घ्या परत, माझा विश्वास नाही यावर". बियांका त्याला गप्प करत होती, "अरे पप्पू, हे काय करतोस?". पिग्विजय काका गोड हसले बियांकाला म्हणाले, "तुम्ही नका बोलू त्याच्याशी,मी बोलतो हं, तर बोल गणू,तुला मी काढलेल्या कुंडलीत काय खोटे वाटले".

"अहो काका,त्यात खर वाटण्यासारखे काय आहे"."मग इतके लोक जे माझ्याकडून कुंडल्या काढून घेतात ते काय मूर्ख आहेत?". "मला दुसर्यांबद्दल काही सांगू नका, माझा विश्वास नाही, मला माझे पैसे परत द्या. "अरे पण का विश्वास नाही?

"हे पहा काका, तुम्ही हिला नवकार्यक्रमांची कुंडली म्हणता आणि पप्पू बरंच काही बकवास बोलला. मघापासून पप्पूचे हे बोलणे ऐकत दारापाशी त्याची मम्मी उभी होती. ती तडक पुढे झाली त्यांनी पप्पूची कॉल्लर खेचून त्याच्या मुस्कटात भडकावली. "पप्पू, नालायका, पिग्विजय काकांना प्रश्न विचारतोस? काकांशी उलटे बोलायचे नसते हे हि तुला माहित नाही. पिग्विजय काका याला माफ करा, हा वेडा झालाय वेडा."

"अरे पप्पू तू यांना प्रश्न विचारतोस यांचा अभ्यास आहे तुझे काय?.ज्या विषयातल आपल्याला काही माहित नाही त्यात नाक खुपसू नये कळल का.माफ करा पिग्विजय महाराज हा वेडा झालाय वेडा". "अगं मम्मी मला माहित आहे मी या विषयातला तज्ञ नाही पण माझ्या प्रश्नांची उत्तरे कोणी देयील का बाबा? गप बस. आणि घराकडे चल. आणि मम्मी त्याला खेचत मनपथावरच्या घरात घेऊन गेली.

रस्त्याने परत जाताना शाम विचार करत होता नक्की पप्पू वेडा आहे ना? आणि त्यांना जाताना बघून पिग्विजय महाराजांनीही निश्वास सोडला.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !