प्लास्टिकच्या बाटलीमध्ये लावलेली तुळस

प्लास्टिक च्या बाटलीमध्ये लावलेली तुळस
हवेत काहीच वारा नाही आहे
ना झाडाची पण हलत आहेत
ना खिडकीत वळत घातलेले कपडे
टेबल आणि खुर्ची अस्ताव्यस्त
रूमभर पेपरची रद्दी पसरली आहे
प्लास्टिक च्या बाटलीमध्ये लावलेली तुळस खिडकीमध्ये आहे
कधीतरी जळते आणि पाणी घातल्यावर पुन्हा टवटवीत दिसते
खिडकीच्या बाहेरची झाड खूप मोठ आहे
त्याच्या फांद्यांनी आकाश भरून गेला आहे
रस्ता आणि आवाज
रिक्षाचा आवाज
कार चा आवाज
मधेच ब्रेक दाबलेल्याचा आवाज
होर्न चा आवाज
बस चा कर्कश आवाज
रोज किती वाहन जातात या रस्त्यावरून
या खिडकीकडे कोणी कधी पहिले नसेल?
जर बघितलाच असेल तर
त्यांनी पाहिलं असेल खिडकीत वाळत घातलेले टॉवेल
आणि तुळशीच झाड प्लास्टिक बॉटल मध्ये लावलेलं
निश्चल निस्तब्ध
रिकामेपणाचा एक वेगळाच वास जाणवतो
कोमट पाण्यासारखा …
ना थंड ना गरम
अतिशय संथ
रस्त्यावरची ट्राफिक लाखो वर्षांपासून कानात गुणगुणत आहे अस वाटत
मला नक्की काय वाटत ?
रूम मध्ये भिंती फोडून झाड उगवावी अस वाटत
म्हणजे थंडपणे झोपता येईल त्यामध्ये
त्या झाडाच्या मुळाशी बसून वाचता येईल
हा समोरच रस्ता बंद करून टाकावा कायमसाठी
रस्ता बांधायच्या पूर्वी होती तशी जमीन पाहिजे
ओबड धोबड जमीन पाहिजे
कचरा हवाय सगळीकडे हे इतक साफ नको
रस्ता आणि झेब्रा क्रोसिंग नको
डोंगर पर्वत टेकड्या होत्या तश्या हव्यात
पाणी नदीला तोंड लावून प्यावं
चार पाचशे मैल चालतच जाव कसलीच तक्रार करू नये
नाहीतर सगळ्यांनी झाडासारख आपल्या जागी थिजून रहाव
जसं आहे तसं
शाळा कॉलेज बंद करून टाकावीत
माणसां स्वताचा हत्यारासारखा वापर करावा
स्वतसोबतच खेळ खेळावेत.
आवाज फक्त पक्ष्याचे आणि पावसाचे एकू यावेत
भाषा वैगेरे पण मिटवून टाकाव्यात
चित्र काढून बोलत रहाव एकमेकांशी
म्हणजे प्राण्यांची भाषा पण कळेल
प्राणी चित्र काढतील माणसांची
कपडे घालन , केस विंचरणे , चप्पल घालणे सगळ नकोच
वाहत जावं पाण्याचा प्रवाह जिकडे नेईल तिकडे
स्त्री आणि पुरुष अस काही नसावाच वेगळ
कोणी रिसर्च वैगेरे करू नये माणसाच्या इवोल्युशनवर
त्यापेक्षा फुलांचा सुगंध घेत पडून रहाव
झाडाची पण तोडून त्याचे रंग बनवून चित्र काढावीत एकमेकांच्या अंगावर
जन्मताना बाळाची नाळ तोडावी
तास काहीस वाटतंय आता ..
त्या बाळाला कस वाटत असेल
जर याचा विचार करता आला तर?
माणस मरावीत जास्ती त्रास न होता
कोणी देव बनू नये
कोणी काही लिहू नये
फक्त चित्र काढावीत
गळ्यात फळांच्या माळा घालाव्यात
गवतात पडून रहाव….
निर्जीव वाटल तर पाण्यात बुडून जाव
सजीव होईपर्यंत वर येऊ नये
दिवस वेळ वैगेरे मोजू नये
हे सगळ्यात महत्वाच…
पांढर्या होणार्या केसांवरून ओळखाव आपला काळ जवळ आलाय
आणि मराव शांतपणे कोणी प्रेत पुरू नये किंवा जाळू नये
प्राणी येउन खातील आणि अन्नसाखळीत पुढे जाव
कार्बोन , नाट्रोजन पुन्हा कार्बोन , नाट्रोजन मध्ये रुपांतरीत होतो
जस्ट केमिकल रिअक्शन!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

शुद्धलेखनाच्या चूका जास्तच आहेत. बाकी अशा कवितांचा गर्भितार्थ काय असतो हे मला कधीच कळत नाही.

पण ' तोंड लावून नदीचे पाणी प्यावे' ही ओळ आवडली. लहानपणी करत असू असे. आता गावाकडचे ओढेही प्रदूषित झाले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमेन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0