Skip to main content

मराठी साहित्य आणि चांगले लेखन कशाला म्हणाव?

मराठी मध्ये लिहताना मला कायम एक प्रश्न पडतो बर्याच वेळेस जुन्या प्रस्थापित लेखकांनी जे लेखनाचे मापदंड तयार केलेले असतात त्यांना अनुसरून लिहील तर लोकांना ते लिखाण आवडत. नेमाडें, ढसाळ , भाऊ पाध्ये इत्यादी लेखकांनी त्या कोशातून बाहेर यायला मदत केली. अस असाल तरीदेखील काही प्रमाणात समीक्षेची मापदंड वेगळी असतात.नक्की कोणत्या आधारावर लेखन चांगल आहे किंवा नाही हे ठरवलं जात?चांगल्या लेखनाचे निकष काय? अतिशय बाळबोध पद्धतीने लिहिलेलं चांगले अनुभव हेच चांगल लेखन आहे का? मराठी मध्ये सुर्रेअल लेखन कुणी केल आहे का?(हारूकी मुराकामी सारख)मराठी साहित्य आहे त्या ठिकाणी बसकण मारून आखडून गेल आहे का? जगातली पंधराव्या नंबरची भाषा(लोकसंख्येनुसार)असणर्या या अमृताहून गोड भाषेला फक्त अमृताहुनी गोड अनुभव सांगण्यातच धन्यता का वाटावी?अजून बरेच प्रश्न आहेत? नक्की भावना पोचल्या असतील अस समजतो. चर्चेच्या अनुषंगाने एक सांगावस वाटत चर्चा जातीवादाकडे न घेऊन जाता भाषेबद्दल बोलन सोयीस्कर राहील.

मिसळपाव Tue, 04/02/2014 - 01:53

व्याख्या करता येईल का खरंच? हे व्यक्तिसापेक्ष असणारे नाहि का? माझ्यासारख्या खूप वाचन पण फारच थोडं लेखन करणार्‍याने "चांगले लेखन कसं असावं" हे सांगावं म्हणजे अतिच झालं! पण चर्चाविषय म्हणून काढलायस तर, वाचक म्हणून तरी, एक छोटसं उदाहरण घेतो. जयवंत दळवींचं सारे प्रवासी घडिचे मी खूप वेळा वाचलंय/वाचतो. पण चक्र/स्वगत (आणि अजून एक-दोन, नावं आठवत नाहियेत आत्ता) मधनं फक्त विकृत वासना असलेली पात्रं, ढगळ/सुमार कथा, तरंगते शेवट यापलीकडे काहिहि हाती लागत नाहि. एकदा पण कशीबशी वाचली. सा. प्र. घ. मधे पण दारिद्र्य, विचित्र स्वभाव, खोटं बोलणारी/हपापलेली माणसं हे सगळं आहे. पण पुस्तक सुरू केल्यावर खिळवून ठेवणारं, परत परत वाचावसं वाटणारं पण काहितरी आहे! मला तरी नक्कि काय आहे ते नाहि सांगता येणार.

आणि गोड अनुभव असले तरच लिखाण चांगलं किंवा अगदी पु.लं.च सुध्दा सगळं लिखाण चांगलं किंवा सुखान्त असला तरच चांगलं, झोपडपट्टितल्या जीवनावर आहे म्हणून बाय डीफॉल्ट वाईट असं काही तर अजिबात नाहिये. असो. "बनगरवाडीला कसं जायचं?" या प्रश्नाला "कुणी सांगितलं तुम्हाला बनगरवाडीला जायचा रस्ता आहे म्हणून?" हे उत्तर दिल्यासारखा माझा प्रतिसाद झालाय खरा :-) पण मला आवडलेल्या लिखाणाचं (पुल, व्यमा, गोनीदा पासून ते संजोपरावांपर्यंत) कुठलेहि मापदंड/निकश वापरून त्रैराशिक मांडता येईल असं वाटंत नाही......असं आपलं मला वाटतं.

थोडं अवांतर, पण अप्रासंगिक नव्हे: तुझ्या लिखाणावर मी 'भिकार' असा शिक्का मारला. त्यातनं हा तुझा चर्चाविषय आला आहे का काय? (माझा म्हंटलं तरी माझी एकट्याची नाहि, बाकि काहिंची पण नकारार्थी प्रतिक्रिया आली. माझ्या एकट्यामुळे लोकं लिहायची थांबली तर मी सुपार्‍या घ्यायला लागेन!) काहि का असेना, त्यामुळे तू लिहायचा थांबलास तर that would be sad. मला तुझं लिखाण दुर्लक्षित करता येतं. (दोन कवितांचं तेच केलं, लेखावर पन्नासावर प्रतिक्रिया दिसल्यावर लिहिलयंन तरी काय याने आता? म्हणून वाचलं) माझी प्रतिक्रिया भिकार आहे म्हणून सोडून दे - क्विटस! माझ्या शिक्क्यामधे विखारी/जहरी काही नव्हतं एव्हढं नक्कि.

सुशेगाद Tue, 04/02/2014 - 03:52

In reply to by मिसळपाव

थोडं अवांतर, पण अप्रासंगिक नव्हे: तुझ्या लिखाणावर मी 'भिकार' असा शिक्का मारला. त्यातनं हा तुझा चर्चाविषय आला आहे का काय?

हो त्यामधूनच हा चर्चाविषय आला आहे. मला लिहिता येत का नाही हे मला माहिती नाही. पूर्वी माझ्यापुरत लिहायचो. असा कुठला किडा पण घुसला नाही आहे कि जबरदस्त लेखक बिखक बनायचा.पण आपण एवढ भिकार लिहतोय तर नक्की चांगल लेखन काय असत याची माहितीतरी करून घेऊया.

मिसळपाव Tue, 04/02/2014 - 05:10

In reply to by सुशेगाद

.... चांगल लेखन काय असत याची माहितीतरी करून घेऊया.

ही काही उदाहरणं बघ/वाच. (माझ्या दृष्टिने चांगली लेखनं);
मुसळीवर गविचा लेख!
अमृता प्रीतमच्या कवितेचं सुंदर रसग्रहण
क्रांती चित्रपटाची खुसखुशीत चिरफाड!
खुसखुशीत वरनं आठवलं - मेघना पाककृत्या मस्त लिहिते. :-) वानगीदाखल हे वाच
भोचक छान लिहायचे. चटका लाउन गेला. त्याचा हा एक हृद्य लेख...
चरचरीत डाग पाडणारी हि कविता वाच
हलकं फुलकं झकास वाचायचं असलं तर हा सन्जोपरावांचा लेख वाच!

हि जालावरची निवडक, पटकन आठवलेली. छापील साहित्य तर मोप आहे. मी आधी म्हंटल्याप्रमाणे चांगल्या लेखनाची व्याख्या मला देता येणार नाही. पण उदाहरणाना तोटा नाहि!!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/02/2014 - 02:27

साहित्य मी फार वाचत नाही. कोणत्याच भाषेतलं नाही. त्यात मला फार गमतही नाही.

पण लैंगिकतेबद्दल शैक्षणिक प्रकारचं लेखन वाचते, अशा प्रकारचे चित्रपटही काही पाहिले आहेत. तुमच्या 'विचित्र मुलगी' लेखात आले आहेत तसे काही अनुभव My life as a dog या चित्रपटात पाहिले. यातला मुलगा थोडा लहान आहे, मुली मुलापेक्षा किंचित मोठ्या आणि किंचित जास्त अक्कल असणाऱ्या. त्यात लहान मुलांचे लैंगिक म्हणावेत असे अनुभव दाखवले आहेत. तो मुलगाही भांबावलेला. पण त्यात कोणत्याही शरीराचं वस्तूकरण नाही. अनुभव आले तसे सांगितले, दाखवले. उलट स्त्रीच्या शरीराचं वस्तूकरण करणाऱ्यांबद्दल अप्रीती निर्माण होईल असाही एक प्रसंग आहे.

१०-१२ वर्षाच्या मुलाचा निरागसपणा पुढच्या काही वर्षांत कमी होईलही. पण त्या-त्या वयाला साजेसा खुलेपणा आणि आकलन नसेल तर मग वीस वर्षांच्या मुलाने १२-१४ वर्षांसारखं वागावं का, असा प्रश्न पडतो. अशा वागण्याचं चित्रण प्रामाणिक असेल पण ते लोकांना वाचावंसं वाटेल का? स्त्री शरीराचं वस्तूकरण इतर बऱ्याच ठिकाणी असतं; फारच प्रामाणिक आहे म्हणून पॉर्न साहित्यालाही प्रतिष्ठा द्यावी का?

बॅटमॅन Tue, 04/02/2014 - 02:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वस्तूकरण आहे या कारणासाठी प्रामाणिक कथनाला नावे ठेवण्याची पोथीनिष्ठता रोचक वाटली. प्रत्येकाने लेखन करताना असले मानदंड मनात ठेवले पाहिजेत ही अपेक्षाही तितकीच रोचक वाटली. शिवाय, अनुभवकथनात स्वतःचे बायस किंवा अनकॉन्शसलि वातावरणातून येणारे बायस येणे अध्याहृत असते. ते तेवढ्यापुरता स्वीकारण्याचा मोकळेपणा नसणे आणि ऑन दि अदर हँड अन्य प्रकारच्या मोकळेपणासाठी आग्रह धरणे हा विरोधाभास सर्वांहून रोचक वाटला.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/02/2014 - 02:39

In reply to by बॅटमॅन

हा संपूर्ण परिच्छेद एकत्र वाचावा अशी विनंती. विशेषतः सुरूवातीचा भागही.

१०-१२ वर्षाच्या मुलाचा निरागसपणा पुढच्या काही वर्षांत कमी होईलही. पण त्या-त्या वयाला साजेसा खुलेपणा आणि आकलन नसेल तर मग वीस वर्षांच्या मुलाने १२-१४ वर्षांसारखं वागावं का, असा प्रश्न पडतो. अशा वागण्याचं चित्रण प्रामाणिक असेल पण ते लोकांना वाचावंसं वाटेल का? स्त्री शरीराचं वस्तूकरण इतर बऱ्याच ठिकाणी असतं; फारच प्रामाणिक आहे म्हणून पॉर्न साहित्यालाही प्रतिष्ठा द्यावी का?

बॅटमॅन Tue, 04/02/2014 - 02:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एखाद्याच्या आकलनाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याने नक्की काय साध्य होतं हे समजलं नाही.

लोकांना वाचावंसं वाटणं न वाटणं यावरून श्रेष्ठत्व ठरेल, पण मुळात वस्तूकरण आहे म्हणून अन्य कुठलेही कारण विचारात न घेता झोडा या आग्रहाचे मूळ असलेली अतिरेकी पोथीनिष्ठा त्यापेक्षा अधिक गर्हणीय आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/02/2014 - 02:59

In reply to by बॅटमॅन

मला काय म्हणायचं आहे हे मला कदाचित नीट मांडता आलं नसावं. My life as a dog पाहिल्यास कदाचित ते उमजू शकेल. पण सध्या मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादाकडे बोट दाखवून थांबते. मला त्या धाग्याबद्दल जे काही 'सुमार'मधून सुचवायचं होतं ते त्यांनी व्यवस्थित लिहीलं आहे.

बाकी, जेनेरिक पोथीनिष्ठा गर्हणीय आहे हे मत साधारणपणे मान्य आहेच.

गब्बर सिंग Tue, 04/02/2014 - 02:57

तत्वज्ञ टिबोर माचन हे एकदा म्हणाले होते की मानवी स्वभाव (व त्याची बेसिक फिचर्स) गेली अनेक शतके बदललेला नाही. व एव्होल्युशनरी सायकॉलॉजी च्या तज्ञांची मते (निष्कर्ष) ही याच्या नेमकी विरुद्ध असू शकतात.

जर मानवी स्वभाव जर बदललेला नसेल (अनेक शतके) ... तर साहित्यिक मापदंड बदलतील का ? बदलावे का ? बदलले तर तो बदल फार काल टिकेल का ? Will we not go back to the previous standards/benchmarks ?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/02/2014 - 03:02

In reply to by गब्बर सिंग

हे प्रश्न आवडले.

आजूबाजूची परिस्थिती बदलेल तसं साहित्यही बदलेल. ना.सी.फडकेंचा रोमँटिक नायक आता कुठे दिसेल? (अभिनय करू शकणारा एकमेव देओल) अभय देओल मागे रेडिओ मिरचीच्या जाहिरातीत म्हणाला होता, "पूर्वीच्या सिनेमांत फार निरागसता होती. आता ते नाही." (हे विधान गतकालाच्या आठवणींनी अश्रू काढणारं नव्हतं.) मानवी मूल्यं बदलतील तसं साहित्यही बदलेल.

पण यात उत्क्रांति दिसायला फार वर्ष जावी लागतील. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रीमुक्तीचा आवाज यायला लागला. त्याचे काही परिणाम उत्क्रांतिमधून दिसले तरी दिसायला निदान काही लाख वर्ष जावी लागतील. कोणा माणसाच्या आयुष्यकालात हे परिणाम दिसतील याची शक्यता शून्य वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/02/2014 - 03:19

In reply to by बॅटमॅन

या फक्त शक्यता आहेत; हे असं होईलच याला काही आधार नाही.

स्त्रियांच्या कंबर-बुडाच्या परीघाचं गुणोत्तर ०.७ असणं आकर्षक मानलं जातं; 'एक-किंवा-दोन-बस्स'च्या जमान्यात हे फार महत्त्वाचं राहणार नाही. स्त्रियाही कमावत्या झाल्यामुळे पुरुषांना रुंद हाडापेराचं असण्याची आवश्यकता नाही, तशाही नोकऱ्या, कामं कमी कष्टाची होत आहेत. स्त्रिया पुरुष निवडताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करतील. बायका कमावत्या झाल्यामुळे, भरणपोषणासाठी पुरुषांवर अवलंबून नसणं* आणि/किंवा होणाऱ्या/झालेल्या मुलाचा पिता कोण हे DNA चाचणीमधून शोधता येतं म्हणून कामीकाझी स्पर्म्स तयार होणं बंद होईल.

बायकांनी जहाल-स्त्रीमुक्ती-तत्त्वज्ञान स्वीकारलं तर पुढच्या काही पिढ्यांनंतर उत्क्रांतीसाठी मनुष्यजातच राहणार नाही.

*(याचं बरंच स्पष्टीकरण लिहावं लागेल, पण सध्या क्षमस्व.)

बॅटमॅन Tue, 04/02/2014 - 12:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

:)

ओक्के.

बायकांच्या शहाणपणावर विश्वास असल्याने याप्रकारचे जहाल तत्वज्ञान स्वीकारण्याचा मूर्खपणा त्या करणार नाहीत याची खात्री आहे.

गब्बर सिंग Tue, 04/02/2014 - 03:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे विधान गतकालाच्या आठवणींनी अश्रू काढणारं नव्हतं

नॉस्टाल्जिया हे देखील एक मस्त मूल्य आहे असे मला वाटते.

ऋषिकेश Tue, 04/02/2014 - 11:54

चांगले लेखन कशाला म्हणाव?

माझ्या पुरतं याचं उत्तर आहे जे मला आवडतं किंवा आवडलं नाही तरी रोचक (इंटरेस्टिंग) वाटतं त्याला.

मला जे आवडत नाही त्याची पिसं काढायला मी मोकळा आहे.
-
लेखकाने लेखन करताना आपले लेखन "चांगले" असले/दिसले/भासले/वाटले पाहिजे हा अट्टाहास का ठेवावा हे समजले नाही. काहीही लिहिल्यावर ते प्रकाशित करताच तिथे वाचकांची टेरीटरी सुरू होते. त्याचा अर्थ कसा लावावा, काय/किती प्रतिक्रीया मिळावी याचा अंदाज लेखक करू शकेल पण अपेक्षा नाही आणि आग्रह तर नाहीच नाही!

ऋषिदांच्या विचारांना पॅरलल विचार कवि ग्रेस यांनी व्यक्त केले होते. - त्यांचे शब्द - कवितेबद्दल स्पष्टीकरण द्यायला मी काय गुन्हेगार आहे का ? असा थेट प्रश्न विचारला होता.

( मी कविता सादर करतो व नंतर ती आपल्या बलावर उभी राहू शकली नाही तर मी टेकू लावणार नाही - असे साधारण त्यांचे पुढे म्हणणे होते.)

मन Tue, 04/02/2014 - 12:33

In reply to by गब्बर सिंग

"मी माझ्य कवितेच्या प्रियकर नाही" असं काहीतरी (की "माझी अक्विता म्हणजे माझी प्रेयसी नाही") असलं काहीतरी ते म्हणाले.
"गुन्हेगार" नाही हो.
त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ असा असावा :-
ज्याला जे त्या कवितेतून समजेल ते त्याच्यापुरतं सत्य्/खरं च असेल. कवितेच्या अर्थाचं प्रमाणीकरण करु नये.
(doenst matter what you look at; it matters what you see!)

प्रकाश घाटपांडे Tue, 04/02/2014 - 12:54

चांगले साहित्य वा वाईट साहित्य कोणते हे सापेक्ष असावे. त्या विषयी माझ्यासारख्या साहित्य अरसिकाला बोलता येणार नाही. पण आवडलेले साहित्य व न आवडलेले साहित्य असे वाचकाला ठरवता येते. मग जे बहुसंख्य लोकांना बहुसंख्य वेळा आवडते ते चांगले साहित्य व याच्या उलट ते वाईट साहित्य अशी कृष्णधवल मांडणी करता येते. आता का आवडते किंवा का आवडत नाही याला तसे काही समर्पक उत्तर नाही.

मन Tue, 04/02/2014 - 13:18

In reply to by प्रकाश घाटपांडे

लोकप्रिय - सवंग असॉओ शकणं; कमी संख्येतील लोकांना आवडणार्‍अय गोष्टींना इतरांनी उच्चभ्रू म्हणणं;
classes-masses ह्या नेहमीच्या हिट्ट जालचर्चेची आठवण झाली.

मी Tue, 04/02/2014 - 17:15

>>त्यांना अनुसरून लिहील तर लोकांना ते लिखाण आवडत.
>>अस असाल तरीदेखील काही प्रमाणात समीक्षेची मापदंड वेगळी असतात

चांगलं म्हणजे लोकांना(लोकप्रिय) जे आवडतं ते असं तुमचं म्हणणं असल्यास उत्तर प्रश्नातच आहे, चांगलं हे चौकट-सापेक्ष आहे असं लक्षात घेतल्यास चांगल्या लेखनाच्या वेग-वेगळ्या चौकटींचे वेग-वेगवेगळे निकष तुम्हाला माहित आहे असं दिसतं. इतर कारणांमुळे तुम्ही हा मुद्दा मांडला असल्यास तुमच्या शंकेचे समाधान व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.

चिंतातुर जंतू Tue, 04/02/2014 - 18:31

>> नेमाडें, ढसाळ , भाऊ पाध्ये इत्यादी लेखकांनी त्या कोशातून बाहेर यायला मदत केली. अस असाल तरीदेखील काही प्रमाणात समीक्षेची मापदंड वेगळी असतात.नक्की कोणत्या आधारावर लेखन चांगल आहे किंवा नाही हे ठरवलं जात?चांगल्या लेखनाचे निकष काय? अतिशय बाळबोध पद्धतीने लिहिलेलं चांगले अनुभव हेच चांगल लेखन आहे का? मराठी मध्ये सुर्रेअल लेखन कुणी केल आहे का?(हारूकी मुराकामी सारख)

नेमाडे, ढसाळ किंवा भाऊ पाध्यांनी मराठीला कोषातून बाहेर यायला मदत केली; कोशातून नव्हे असं तुम्हाला म्हणायचं असावं. म्हणजे इथे पहिला मुद्दा येतो तो भाषेविषयी - भाषेची मोडतोड करायला हरकत नाही, आणि ती उमजून केली तर तिच्यामुळे साहित्यमूल्य वाढण्याला मदत होऊ शकेलही, पण न उमजताच केली तर असे अर्थाचे अनर्थ होण्याची शक्यता वाढतेच, शिवाय लोक वाचायला कंटाळतील आणि 'सुमार' दर्जा देऊन मोकळे होतील अशी शक्यतासुद्धा वाढते.

जेव्हा लिखाणात नवे प्रयोग होतात (जसे नेमाडे, ढसाळ किंवा पाध्यांनी केले) तेव्हा त्यामुळे मापदंडच बदलतात. त्यामुळे सुरुवातीला बरेचसे समीक्षक किंवा वाचक बिचकतात. त्यामुळे असं मूल्यमापन काही काळ गेल्यानंतर करणं अधिक परिणामकारक ठरू शकतं.

मराठीमध्ये सर्रीअल हा शब्द अंमळ सैलपणे वापरला जातो. मुराकामी हा सर्रीअल आहे, पण ते सर्रीअलचं एक विशिष्ट रूप आहे. विलास सारंग, दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकर ह्यांचं काही लिखाण सर्रीअल मानता येईल. पण त्याहीआधी खरं तर 'मुंगी व्याली तिला शिंगी झाली' किंवा 'आपुलें मरण पाहिले म्यां डोळा' अशा काही लिखाणात सर्रीअल घटक आहेत.

सुशेगाद Tue, 04/02/2014 - 20:17

In reply to by चिंतातुर जंतू

एक सहा महिने तरी जातील शुद्ध लेखनाच्या सगळ्या चुका सुधारायला.गूगल मराठी इनपुट वापरत आहे.मुळात आळशी मनुष्य असल्यामुळे द्रफ्तिंग वेगैरे च्या भानगडीत पडत नाही. आतापासून सुरवात करतो. व्याकरण आणि शुद्ध लेखनाला कायम फाट्यावर मारणे देखील योग्य नव्हे हे कळाल .धन्यवाद

मिहिर Tue, 04/02/2014 - 21:53

In reply to by मन

मनोबा लोकांना शुद्धिचिकीत्सक सुचवताहेत हे पाहून ड्वाळे पाणावले! :प

मन Tue, 04/02/2014 - 22:47

मिसळपावनं म्हटल्याप्रमाणं चांगल्या लेखनाचं उदाहरण :-
हे घ्या उदाहरण :-
मोकलाया दाहि दिश्या
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३
.
.
श्रेय अव्हेर :-
http://www.misalpav.com/node/6332

बॅटमॅन Wed, 05/02/2014 - 00:18

In reply to by सुशेगाद

त्याचबरोबर हेही वाचा.

http://www.misalpav.com/node/24745

या कवितेचा अंतिम प्रेरणास्रोत मोकलाया हा आहे. पण मध्ये अजून काव्येही आहेत.

उपाशी बोका Wed, 05/02/2014 - 10:38

माझ्यामते चांगले लेखन म्हणजे आपल्या विचारसरणीशी सुसंगत लेखन, मग ते मराठीतले असो अथवा इतर कुठल्या भाषेतले. आपल्याला आवडते तेच आपण बहुतेकदा वाचतो आणि मग तेच आपल्याला चांगले वाटते.

विचार करून बघा. आपण सर्वजण बहुतेकदा कळत-नकळत, आपल्याला आवडणार्‍या आणि पटणार्‍या गोष्टी(च) करत असतो. We love to agree with people who agree with us. यामुळे ठराविक साईट्स बघितल्या जातात, ठराविक वर्तमानपत्र वाचली जातात, ठराविक टीव्ही चॅनेल्स बघितले जातात (CNN बघणारा क्वचितच Fox News बघतो & vice versa), ठराविक मित्रांबरोबर उठबस होते ज्यांचे विचार आपल्या विचारांशी मिळतेजुळते असतात. या सर्व प्रकारातून आपले एक मत तयार होते आणि ते अजून पक्के होत जाते. कंफर्मेशन बायस हा प्रत्येकात असतो. Confirmation bias — the often unconscious act of referencing only those perspectives that fuel our pre-existing views, while at the same time ignoring or dismissing opinions — no matter how valid — that threaten our world view. आणि मार्केटिंगचे लोक याचा अचूक वापर करून घेतात. (पण त्याबद्दल नंतर कधीतरी..)