Skip to main content

मिर्झा गालिब - अनुवाद सेतु माधवराव पगडी.

मिर्झा गालिबच्या साहित्याचे सेतु माधवराव पगडी यांनी अनुवाद केलेले पुस्तक शोधत आहे. पॉप्युलर प्रकाशनचे हे जुने पुस्तक आता तिथेही उपल्ब्ध नाही. पुन्हा नव्याने काढतील याची शक्यता दिसत नाही.

कुणाकडे मिळू शकल्यास, फोटोप्रत काढून घेता येऊ शकेल.

फोटोप्रत काढून पुस्तक आठवणीने व `नक्की' परत करण्यात येईल.

कुणी थेट फोटोप्रत दिली तर त्याचा खर्चही पाठवता येईल..

मदतीच्या अपेक्षेने इथे विचारले आहे.... सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा बाळगली आहे..

धन्यवाद!

सानिया Tue, 04/02/2014 - 22:36

माझ्या माहितीप्रमाणे बर्‍याच वर्षांपासून हे पुस्तक उपलब्ध नाहीये. दुदैवाने सध्या माझ्याकडेही ते नाहीये, पण मला मिळवता आल्यास तुम्हाला नक्की कळवेन. तुमचा धागा वाचून त्या पुस्तकाच्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.

शहराजाद Wed, 05/02/2014 - 06:17

मोठया शहरांतील सर्कारी ( महानगरपालिकेच्या) वाचनालयांत शोधून पहा. चिकाटी लागेल, पण मिळण्याची बरीच शक्यता आहे.
जुन्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांच्या वाचनालयातही असण्याची खूप शक्यता आहे. अर्थात तिथेही चिकाटीची नितांत गरज आहे.

विसुनाना Thu, 06/02/2014 - 13:34

मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांनी समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य १० खंडांमध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यातल्या ५-अ खंडात हे गालिब अनुवादाचे पुस्तक छापलेले आहे. अंदाजे पाने २५० ते ३००. संपूर्ण संच विकत घ्यावा लागतो. (अंदाजे किंमत रु. १०,०००/-) फक्त.
मिळवण्याचे अन्य मार्ग असू शकतात. एखाद्या ग्रंथसंग्रहालयात हा संच असेल तर सोपे आहे.

भीडस्त Thu, 06/02/2014 - 14:53

माझ्याकडे होते पण घर बदलाबदलीच्या धांदलीत हरवून गेले. पंधरा वर्षे होत आली त्याला. पण काळाबरोबर कमी होण्याऐवजी ती 'खलिश'अजून तीव्रच होत चालली आहे.
देवनागरीतला दीवान ए ग़ालिब घेतलाय.
डॉ विनय वाईकरकृत एक अनुवाद ही घेतलाय

पण.....

जला है जिस्म जहा दिल भी जला होगा
कुरेदते हो राख़ जो अब जूस्तजू क्या है