शुद्धलेखन चिकीत्सक

मोझिलाच्या फायरफॉक्सवर मराठी शुद्धलेखन चिकीत्सकाचं अॅड-अॉन आहे. Marathi (India) Dictionary 9.3 असं सध्या माझ्या फायरफॉक्समधे दिसतं. यात नवे शब्द, आपल्या संगणकातल्या शब्दकोशात टाकण्याची सोय आहे.

लेखन करताना जो खोका दिसतो, किंवा चॅट, इमेल लिहीताना 'कंपोज'च्या खोक्यात अशुद्ध शब्द अधोरेखित होतात. अर्थातच या चिकीत्सकाला पुलेशु, किंवा प्रकाटाआ किंवा ल्यापटॉप असे शब्द समजत नाहीत. पण आपल्या संगणकापुरतं आपण त्याला शहाणं करू शकतो. 'पोटऱ्या' हा शब्द त्याला समजला नाही तेव्हा आश्चर्य वाटलं, पण साधारणपणे हा चिकीत्सक उपयुक्त आहे.

हे अॅड-अॉन लिहीणारा ओंकार जोशी म्हणजे तोच ज्याने गमभन लिहीलं आहे, आणि ऐसीवरचं देवनागरी टंकन याच 'गमभन'वरून चालतं.

गमभन वगळता, संगणकावर, स्मार्टफोनवर देवनागरी कसं लिहावं, शुद्धलेखन चिकीत्सेसाठी आणखी काही पर्याय आहेत काय, क्रोम, आयई, किंवा इतर ब्राऊझर्ससाठी चिकीत्सक आहेत का, लिब्रअॉफिससाठी (open source office suite) काही पर्याय आहेत का किंवा संबंधित चर्चा, प्रश्नोत्तरं इथे करता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मग शंका विचारूनच घेतो.

इथे कोणी मॅकबूक वापरतो का? मॅकबूकवरून ऐसी वापरताना अनेक अडचणी येतात असे माझ्या लक्षात आले आहे. लँग्वेज टॉगल की (कंट्रोल+\) काम करत नाही. कॉपी (कमांड सी) होत नाही. काही गोष्टी फक्त फायरफॉक्सवरच चालतात असे दिसते. बाकी फाँट वगैरे व्यवस्थित चालू आहे.

शिवाय, मॅकबूकमध्ये कोणी मराठी कीबोर्ड इन्स्टॉल केला आहे का? कोणता? मॅकचा किबोर्ड ट्रान्सलिटरेशन नाही, शिवाय हिंदी आहे. त्यामुळे बरेच शब्द लिहता येत नाही.

आगाऊ धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

परवाच जंतुंबरोबर याविषयी संवाद झाला. आय ओएस मधे देवनागरी इन्स्क्रिप्ट कीबोर्ड इनबिल्ट आहे. एनेबल करायचा फ़क्त. हे तुझ्या मॅकबुकला लागू आहे का ते चेक कर. आयफोन व आयपॅडवर तरी हे नक्की चालतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

तो केला, पण तो चांगला नाहीए. हिंदी आहे शिवाय ट्रान्सलिटरेशन नसल्याने अजून वैताग. आयफोनवर चालून जातं, लहान प्रतिसाद द्यायला. शिवाय आयफोनवर किबोर्ड बटनं दिसतात त्यावरच टाईप करतो आपण मॅकवर तसं नाही. (म्हणजे किबोर्ड पाहता येतो, पण तो स्क्रीनवर.) मायक्रोसॉफ्टचा भाषा-इंडिया प्रकार आहे तसं काहीतरी हवं!
http://bhashaindia.com/downloads/pages/home.aspx

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>> लँग्वेज टॉगल की (कंट्रोल+\) काम करत नाही. कॉपी (कमांड सी) होत नाही. <<

सहमत.

>> मॅकबूकमध्ये कोणी मराठी कीबोर्ड इन्स्टॉल केला आहे का? कोणता? मॅकचा किबोर्ड ट्रान्सलिटरेशन नाही, शिवाय हिंदी आहे. त्यामुळे बरेच शब्द लिहता येत नाही. <<

मी मॅकवरचा डीफॉल्ट देवनागरी क्वर्टी कीबोर्ड वापरतो. तो फोनेटिक आहे. कोणते शब्द लिहिता येत नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जमलं! धन्यवाद. ऐसीवरती जोडाक्षरं दिसत नाहीएत म्हणून गोंधळ होत होता.

म्हणजे इतरांनी लिहलेली जोडाक्षरं दिसत आहेत. मी स्वतःच ऐसीचे गमभन वापरून प्रतिसाद दिला तर जोडाक्षरं दिसताहेत पण जर मॅकवरचा किबोर्ड वापरून इथे प्रतिसाद लिहला तर जोडाक्षरे नीट उमटत नाहीएत. पण इतर ठिकाणी मात्र तीच जोडाक्षरं व्यवस्थित येत आहेत. तुम्हालाही ही अडचण येत आहे का?

उदा.
१. फक्त (गमभनने लिहलं)
२. फफकत (मॅक-कककवरटी इथे लिहले)
३. फक्त (मॅक-क्वर्टी इतर ठिकाणी लिहले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>> २. फफकत (मॅक-कककवरटी इथे लिहले) <<

हासुध्दा गमभन प्लगिनचा बग आहे.

(त्यावर एक उपाय - शब्द आधी बिनाजोडाक्षराचा टंकायचा आणि मग जिथे जोड द्यायचा तिथे जाऊन 'f' दाबायचं. हा मजकूर तसाच टंकला आहे.)
(दुसरा उपाय म्हणजे वर उल्लेखलेला शुद्धिचिकित्सक वापरला तर तो आपोआप काही बिनाजोडाच्या शब्दांना योग्य पर्याय सुचवतो. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठी transliteration हा एक सोपा पर्याय आहेच.
Google Input Tools हे extension Chrome साठी उपलब्ध आहे. यात मराठीचे कीपॅड आहेत-देवनागरी phonetic व मराठी transliteration, शिवाय ctrl+G वापरून संपूर्ण browser वर हे टुल मराठी-रोमन असे अदलाबदल करून सहज वापरता येते. रोमन लिपीत मराठी शब्दाचा उच्चार लिहिल्यानंतर त्याचे देवनागरी लिपीतील मराठी होताना संभाव्य शब्दांची यादी दिसते. याचा फायदा हा की ऱ्हस्व-दीर्घासाठी shift वापरायची गरज नाही.
हेच tool/ Input Method, Android Play Store मध्ये Google Hindi Input असे/इतकेच उपलब्ध आहे. हे ऑफलाईन आहे. अर्थात ह्या keyboardमधून देखील बरेच मराठी शब्द टंकता येतात. परंतु 'ळ'युक्त शब्द टंकताना त्रास होतो. हिंदी साठी असणारे हे tool बऱ्यापैकी (हिंदीसाठी)चांगले आहे. ते इंग्रजी शब्दाचा उच्चार तंतोतंत हिंदीत करते. उदा. Here ह्या शब्दासाठी पहिले हिंदीकरण 'हिअर' आणि नंतर 'हेरे' येत असल्याने ते जास्त सोयीचे आहे. अजून एक उदाहरण म्हणजे- laptop हा शब्द टंकल्यावर यादीतला पहिला शब्द "लैपटौप" हा येईल. इतर लापटोप/तोप असे असतील. chrome वर उपलब्ध असलेल्या मराठी tool मध्ये मात्र अजूनही खूप इंग्रजी शब्द उच्चाराने यायचे आहेत. शिवाय 'ऱ्या' युक्त शब्दांसाठी, ऑ सारख्या अर्धचंद्री अक्षरांसाठी खूप सुधारणा अपेक्षित आहे.
सवय झाल्यावर हे tools जलद वापरता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँड्रॉईडवर मराठीसाठी चांगला कीबोर्ड आहे का, ज्यात रोमन लिपीही दिसेल? ट्रान्सलिटरेट सोडून, मला ते आवडत नाही. सध्या एनीसॉफ्ट कीबोर्ड - हिंदी आहे, पण त्यात ण, ऱ्या आणि अॅ लिहीता येत नाहीत. ण आणि ऱ्या टाळून मराठीत अर्थावाही वाक्य बनवणं फार तापदायक होतं.

लिनक्सवर मी बोलनागरी वापरते. यात कीबोर्ड हवा तसा बदलता, कन्फिगर करता येतो. हे बोलनागरी सगळ्या अॅप्लिकेशन्सवर चालतं. टेक्स्ट फाईल लिहीण्यासाठी ब्राऊझर उघडावा लागत नाही. हेच प्रकरण विण्डोजमधे टाकायचा प्रयत्न केला तर जमलं नाही. (मी विण्डोज वापरत नाही त्यामुळे फार प्रयत्नही केला नाही. पण इतर कोणाला हवं असेल तर फायदा होईल.)

---

अवांतर - सुंदर दिसणाऱ्या, महागाच्या मॅकवर साध्या साध्या गोष्टी चालत नाहीत हे वाचून अतीव आनंद झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> अँड्रॉईडवर मराठीसाठी चांगला कीबोर्ड आहे का, ज्यात रोमन लिपीही दिसेल? <<

अँड्रॉईडच्या नंतरच्या आवृत्त्यांत जो डीफॉल्ट कीबोर्ड येतो त्यात एक की टॉगल करून लिपी बदलता येते. त्यामुळे त्यात दोन्ही सहज टाइप करता येतं.

>> अवांतर - सुंदर दिसणाऱ्या, महागाच्या मॅकवर साध्या साध्या गोष्टी चालत नाहीत हे वाचून अतीव आनंद झाला आहे. <<

हा गमभनच्या प्लगिनमधला बग आहे. इतर ठिकाणी (फायरफॉक्समध्ये किंवा बाहेर, फेसबुकमध्ये वगैरे) टाइप करताना कॉपी-पेस्ट वगैरे व्यवस्थित चालतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> अवांतर - सुंदर दिसणाऱ्या, महागाच्या मॅकवर साध्या साध्या गोष्टी चालत नाहीत हे वाचून अतीव आनंद झाला आहे. <<

हा गमभनच्या प्लगिनमधला बग आहे. इतर ठिकाणी (फायरफॉक्समध्ये किंवा बाहेर, फेसबुकमध्ये वगैरे) टाइप करताना कॉपी-पेस्ट वगैरे व्यवस्थित चालतं.

हेच म्हणतो! च्यायला! उद्या आमची फरारी तुळशीबागेत घेऊन या म्हणाल आणि कशी झाली फजिती म्हणून हसाल! आधी तुम्ही तुमच्या बोळ-संस्कृतीतून बाहेर या म्हणजे कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बोळा निघणे हा वाक्प्रचार खास बोळसंस्कृतीवाल्यांसाठी असावा की काय, असे क्षणभर वाटून अं.ह. झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अँड्रॉईडच्या नंतरच्या आवृत्त्यांत जो डीफॉल्ट कीबोर्ड येतो त्यात एक की टॉगल करून लिपी बदलता येते. त्यामुळे त्यात दोन्ही सहज टाइप करता येतं.

कोणती आवृत्ती? माझ्या उपकरणावर ४.३ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> कोणती आवृत्ती? माझ्या उपकरणावर ४.३ आहे. <<

मी हा कीबोर्ड किटकॅटवर (४.४) वापरला आहे, पण आधीच्या आवृत्तीतही हा असावा. रोचनाला विचार. तिच्याकडे बहुधा ४.३ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाट बघेन पण एस्टीनेच जाईन. उशीरा का होईना, उजेड पडण्यासाठी वाट बघायची तयारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बोलनागरी चांगलेच आहे. मी Ibus Deamon वापरून पहिला पण मला तो रुचला नाही. तिथेही बरेच काम आहे.
transliterate का आवडत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

transliterate का आवडत नाही?

अतिशहाणं सॉफ्टवेअर आवडत नाही; (जिवंत प्राणी, पक्षी, माणसं कंडीशनली आवडतात). आधी त्या सॉफ्टवेअरला ट्रेनिंग देत बसा, पुन्हा गूगलने कधी "आली लहर केला कहर" केलं तर याची चिंता करा, इंटरनेटशिवाय लिहीता येत नाही, चार सॉफ्टवेअरची सवय करून घ्यायचा आळस म्हणून एक काय तो उपाय करावा आणि तो सगळीकडे वापरता यावा अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिनक्सच्या नवनवीन आवृत्त्यांमध्ये Ibus Deamon बरेच improved दिसत आहे. (पूर्बी मी scim वापरायचो. त्यातुलनेत फारच छान). खरेतर inscript शिकावे हे उत्तम. टंकलेखनाचा बराच वेळ वाचतो व cross platform चांगला standard support मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विन्डोजवर regional and language settings नावाच्या प्रकारात enable complex scripts support असे काहीसे केल्यास सर्वत्र देवनागरी कीबोर्ड उपलब्ध होतो. मात्र त्यात inscript keyboard असल्याचे आठवते आहे. phonetic बाबत नक्की कल्पना नाही. कदाचित उपलब्ध असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँड्रॉईडसाठी उपलब्ध असलेल्या बहुतेक सर्व कीबोर्ड्सवर चंद्रकोर रफार टंकणे शक्य नसते. मराठी स्वरचक्र कळफलकावर ते जमते. ण, ऱ्या, ळ वगैरेही लिहिता येते. मराठी/इंग्रजी वन-की टॉगलही आहे. सॅमसंगच्या मराठी कळफलकात मला काही केल्या चंद्रकोर रफार टंकता येत नाही. तो जमला तर हे इतर पर्याय शोधावे लागणार नाहीत.

अवांतरः उबुन्टु लिनक्सवर तुम्ही वापरत असलेल्या बोलनागरीत चंद्रकोर रफार आहे का? मी iBus मध्ये बरहा देवनागरी कीमॅप (hi-baraha.mim) वापरतो. iBus सिस्टिमवाईड असल्यामुळे कोणत्याही प्रोग्रॅममध्ये देवनागरीत टंकता येतं. तेव्हढा रफार सोडला तर बाकी सर्व व्यवस्थित लिहिता येतं. पायमोडका र तडजोड म्हणून चालवून घेतो.हा हिंदी कीमॅप मला काही वर्षांपूर्वी जालावर सापडला होता. हल्ली ते संकेतस्थळ गायब आहे, पण सुदैवाने मी फाईल व सूचना डाऊनलोड करून ठेवले आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

हा हिंदी कीमॅप मला काही वर्षांपूर्वी जालावर सापडला होता. हल्ली ते संकेतस्थळ गायब आहे, पण सुदैवाने मी फाईल व सूचना डाऊनलोड करून ठेवले आहेत.

हेच का ते? मी येथील सूचना वापरून iBus देवनागरी फोनेटिक कीबोर्ड वापरत होतो. त्याच्या कीमॅप फायलीत बदल केले होते काही. आत्ता नवीन उबंटूत अजून टाकले नाही आहे. बोलनागरीचा कीमॅप बदलायचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. परत बघायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, हाच तो कीमॅप. परंतु त्या पानावरील काही सूचना अनावश्यक आहेत व काही उबुन्टुच्या आताच्या वर्जनला लागू नाहीत. एक म्हणजे, उबुन्टुत रूट उजर म्हणून लॉग-इन होण्याची गरज नाही. डेस्कटॉपवर ती फाइल डाउनलोड केल्यानंतर टर्मिनल उघडून cd Desktop कमान्ड देऊन मग

sudo cp hi-baraha.mim /usr/share/m17n

केलं की काम होतं. नंतर तिथे दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, पण उबुन्टु १३.१०मध्ये System->Preferences ऐवजी Alt+F2 ->ibus-setup
तसेच, स्टार्ट-अपला ibus सुरू करण्यासाठी .bashrc फाइल एडिट करण्याची गरज नाही. Dash->Startup Applications->Add->ibus-daemon करावे.
(तुम्हाला हे सर्व आधीच ठाऊक असल्यास आगाऊपणाबद्दल क्षमस्व, पण इतर कोणातरी फायदा होईल ही आशा आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

च्यायला हल्ली जरा चार ओळी लिहायला लागलो तर बरं हे शुध्दिचिकित्सकाचं प्रकरण काढलंन! बघतो नंतर बसवून. आठच रेव्ह्यूज आहेत त्याला अजून. मी इतका bleeding edge of cutting edge वर नसतो कधी. (ऐका माझं, नका कोणी त्याला मराठी प्रतिशब्द शोधत बसू!)

आणि आधी मॅकवर नी अँड्रॉईडवर मराठीत टंकायचा तिढा सुटुंदे मग शुध्दिचिकित्सकाचं बघू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आणि आधी मॅकवर नी अँड्रॉईडवर मराठीत टंकायचा तिढा सुटुंदे मग शुध्दिचिकित्सकाचं बघू

मॅकचा सुटला. Wink
अँड्रॉइडचा सुटायची वाट पाहत बसलो तर नातवंड होतील की तुम्हाला किंवा आम्हाला! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मुळात म्याक वापरायचंच कशाला म्हन्तो मी....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सदर चिकित्सक नक्की कोणती चिकित्सा करतो?

लेखनातील केवळ चुका दाखवून देत असेल तर तपासक म्हणावे. अयोग्य शब्दासाठी योग्य शब्ददेखिल सुचवत असेल तर सुधारक म्हणावे!

चिकित्सक कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आजचा सुधारक"?

शिवाय सुधारक म्हटलं की चिकीत्सा का चिकित्सा याबद्दल विचार करावा लागत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.