हॉस्टेलचा पहिला दिवस

“व्यवस्थित सांभाळून राहा. इकडे तुझी काळजी लागेल अस काही करू नको . अभ्यासच करा आणि फोन करत जा”
“हो ग आई , मी पुर्वीपण राहिलो आहे होस्टेलला तुला सोडून आणि आता कळतंय सगळ मला कॉलेजला चाललोय आता मी ”
आई माझी दृष्ट काढत होती. मी देवाच्या पाया पडत पडत आईला धीर देत होतो. गावातच बर्यापैकी पराक्रम केल्यामुळे आईचा पुण्याला शिकायला ठेवायला विरोध होता. पण कॉलेज चांगल होत. भविष्य घडेल म्हणून तयार झाली होती.
बराच वेळ दृष्ट काढण्याच्या नादात माझी बस चुकेल म्हणून मी ओरडलो
“तुला माहिती आहे ना कि माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे मी देवही मानत नाही आणि भूतही, आवर लवकर आता नाहीतर बस चुकेल ”
एकदाच आईच दृष्ट काढून संपलं.
भाकर ओवाळून टाकणे, मिरची मिरी काहीतरी ओवाळून टाकणे हे सगळ विनोदीच वाटत.
पुण्यात आलो. एवढा मोठ शहर ,मोठे रस्ते , एवढ्या सगळ्या गाड्या रस्त्यावर, तोंडाला एवढा मोठा स्कार्फ बांधलेल्या मुली , मोठ्या मोठ्या बिल्डींग्स म्हंटल , एवढा मोठा शनिवारवाडा, मोठे मोठे malls , इकडे तिकडे नजर टाकेल तिकडे पूल , नदी कुठे आहे हे नंतर कळाल. खरोखरच इथे नक्कीच भवितव्य घडणार.
कॉलेज खूपच मोठ होत. गावाकडे मित्रांना सांगताना अभिमानाने सांगायचो कि माझ कॉलेज पासष्ट एकरात वसलेलं आहे. कॉलेजच्या समोरचा रस्ता अतिशय रहदारीचा होता. समोर विविध प्रकारची सोउथ इंडिअन आणि चकचकीत कॉफीशोप्स होती. कधी न बघितलेल्या गाड्या त्या रोडवर सहज बघायला मिळायच्या.आख्ख्या पुण्यात कॉलेजचा रोड सुंदर, सुंदर मुलींसाठी प्रसिद्ध होता.आपण फक्त इकडे अभ्यास करायचा हे मनावर ठासून आलो होतो. एकदा कॉलेजच्या आत पाऊल टाकलं कि ट्राफिकचा आवाज आपोआप विरायचा.
कॉलेज सुरु झाल. काहीदिवस मामांच्या घरी राहिलो. कारण होस्टेलमध्ये रूम मिळायला वेळ होता.
होस्टेल रूमच्या अडमिशनसाठी रेक्टर कडे गेलो. त्यांनी लोकल गार्डियन म्हणून प्रोपर पुण्यातल्या कुणाला तरी बरोबर घेऊन यायला सांगितलं होत. मी माझ्या बर्यापैकी खडूस मामांना बरोबर घेऊन गेलो(त्यांची कुठल्यातरी मिटिंगला जायची घाई झाली होती त्यामुळे ते थोडे त्रस्त होते)
त्यात होस्टेलच्या अडमिशनस मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो अस कळाल होत. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्ती पैसे घेऊन होस्टेल बुक केली जातात आणि उरलेल्या रूम्स अश्या चिकट अडमिशन प्रक्रियेद्वारे देतात अस कळाल होत. एकूणच रेक्टरचा कायम ‘मा’कारात्मक शिवितूनच उल्लेख व्हायचा.
होस्टेलचा फॉर्म भरताना व सह्या करताना रेक्टर बौद्धिक घेत होते.
“दिवसाला किती सिगारेट पितोस?दारू वगैरे जास्ती पिऊन होस्टेल मध्ये येऊन दंगा करू नको अश्यावेळी मामाच्या घरीच झोपायला जात जा”
अशा मोलाच्या सूचना मामांसारख्या पापभीरू माणसासमोर देतच त्यांनी मला रूम अलॉट केली.
“कुठल्याही ग्रुपमध्ये (विद्यार्थी चळवळीत) घुसू नको फक्त अभ्यास करा. त्यात तुझ सायन्स आहे. आमचा गेल्या वर्षीचा बोर्डात आलेला विद्यार्थी देखील तुमच्याच गावाचा होता”
जाता जाता तिथला शिपाई म्हणाला.
एकूणच कॉलेज मध्ये बराच काही करायला वाव दिसतोय अस वाटल. handbook मध्ये बरेच रुल्स लिहिले होते म्हणजे ते सगळे वाचून काढले.
‘ स्पीकर वर संगीत लावू नयेत. हेडफोन कानात घालून संगीत ऐकायचे असेल तर रेक्टर कडून परवानगी घ्यावी’
‘होस्टेलमध्ये कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तीस घेऊन येऊन नये(आई किंवा बहिण देखील याला अपवाद नाही)’
‘रात्री दहानंतर होस्टेलचे गेट बंद केले जाईल’
हाच नियम गर्ल्स होस्टेलला ‘सातच्या आत होस्टेलात’ असा होता.
कॉलेज ब्रिटीशांच्या काळात अठराशे मध्ये कधीतरी सुरु झाल होत तेव्हापासून एकाच handbook आहे अस वाटल. बाकी कॉलेजचे नाव एका ब्रिटीश ऑफिसरचे नाव असल्याने कुणालाही सांगताना अतिशय थोर वाटत.(दुसर्या एका सपक कॉलेजला देशी नाव आहे म्हणून फॉर्मच भरला नव्हता!)
रेक्टर ऑफिस मधून बाहेर आल्या आल्या कॉलेजच्या मेन बिल्डींग समोर एक कुरळ्या केसांची मुलगी, तिच्या डोळ्यात काजळाची आख्खी डबीच भरली होती.तिचे कपडे देखील अतिशय आधुनिक होते. धोतर घालतात तस काहीस तिने घातलं होत.
अचानकच माझ्याकडे बघत बघत तिने “हे ड्यूड लोंग टायम नो सी? आय कॉलड यू ना येस्तर्दे” मी एकदमच बघितलं आल्या आल्या नवीनच काय झेंगट?
तर माझ्यामागून एक साडेचार फुट उंचीचा ‘यो’ जटाधारी मुलगा आला जिम मोरीसन का आयर्न मेडनचा (आपल्यला पण माहित आहेत कि जिम मोरीसन भाऊ ,आयर्न भाऊ यम टीवीची कृपा आणि काय) रोक्स्टारी शर्ट घालून आला होता. त्या दोघांनी एकमेकांना बर्याच वर्षांनी भेटल्यासारख घट्ट आलिंगन दिल. ‘यो’ असण हेही काय वाईट नाही. उगाच कम्युनिस्ट लोकांसारख बेंगरूळ दाढ्या वाढवून खादी घालून राहण्यापेक्षा किंवा पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाड्यातून आलेल्या भाया दुमडून फोर्माल शर्ट घालणाऱ्या आदर्शवादी तेलकट मुलापेक्षा ‘यो’ असण बर आहे.
नाहीतरी आयुष्यात शेवटी ‘यो’च बनायचं असत.
चांगल आहे म्हंटल.एकदा घरातून दूर गेलो कि मलापण हिप्पीज सारखी केस वाढवयाचीच होती. कॉलेजमध्ये तेही करू. बाकी बर्याच सुंदर सुंदर दिसणाऱ्या मुली इकडून तिकडे बागडत होत्या. सायाकोलोजी डिपार्टमेंट ला खूपच सुंदर मुली होत्या. लोकांची मनं ओळखणार्या मुली सुंदरच असायला पाहिजेत नाहीतर काय उपयोग समुपदेशनालाला कोण जाणार?
माझ्याकडे जास्ती काही सामान नव्हतं. सगळी पुस्तक पुण्यातच घेणार होतो. दोन bag मधेच माझा सगळा राहण्याचा प्रपंच उरकला होता.
होस्टेलच्या दरवाज्यात पोचलो अगदी जेल सारखा दरवाजा होता. बर्याच हिंदी फिल्म्स मध्ये आमच होस्टेल जेल म्हणून चित्रित केल होत.अगदी वाकून आत जायला लागत .आतमधून मात्र होस्टेल बराच मोठ होत. चौकोनी आणि प्रत्येक बाजूला १५ रूम्स तरी असाव्यात. प्रत्येकाला सिंगल रूम होती. मध्ये चार कट्टे होते. त्यामध्ये बरीचं मोठी मोठी झाड होती. त्यातल एक झाड कधी पडेल ते सांगता येत नव्हत.
अचानकच कुणीतरी ओरडल
“आहा ओल्ड मोन्क क्या फिगर है बे तेरी”
एक बारीक अंगकाठीचा मुलगा टोवेल गुंडाळून उघडा अंघोळीला चालला होता.
माझी रूम पहिल्या मजल्यावर त्या पडणाऱ्या झाडाच्या अगदी समोर होती. झाड माझ्या रूमच्या दिशेनेचं कलल होत. रूम तश्या ऐतिहासिक आणि जुन्याच होत्या. माझी रूम कोपर्याच्या अलीकडे होती. बाकी रूम्सच्या छतांपेक्षा माझ्या रूमचे छत जास्ती उंच होत. त्यामुळे रूम भव्य भासली. रूम मध्ये लोखंडी चेपका बेड आणि लाकडी टेबल खुर्ची होती , एक rack होत काही मुलं ते चप्पल ठेवायला वापरायचे तर काही पुस्तक ठेवायला.
कोसला वाचूनच आलोय म्हणा. रूमवर प्रेम तर करणार. हीच रूम नंतर भुतासारखी वाटणार.कि आपण स्वताच स्वतला भुतासारखे वाटणार? असले काहीतरी चुतीयाटिक विचार डोक्यात येऊन दिले नाही पाहिजेत.पांडुरंग सांगवीकरछाप.
पण आपण शेक्सपिर किंवा शाहरुख खान पेक्षा एडिसन, आईनस्टाईन , आर्किमिडीज असल्या लोकांना मानतो. पहिल्यांदा वाटल होत कला शाखा, कला शाखा म्हणून पण काय उपयोग नाही साला. कोसला वाचूनदेखील कलाशाखेला अडमिशन घेणे म्हंजे जाणूनबुजून केलेला चुत्यापणाच. आता एवढ्या मोठ्या कॉलेजात आलोच आहोत तर थोडीफार कला तर दाखवणारच. त्यापेक्षा डोक्टर किंवा इंजिनिअर बनून तेपण आयआयटीतून डायरेक्ट अमेरीक्केला जायचं. ते शकू आत्याच्या मुलाला नाही का कलिफोर्निया मध्ये ३ लाख पगार आहे महिन्याला. आपल गणित थोड कच्चचं आहे पण ठीक आहे सरळ सरळ रट्टा तर मारूच शकतो. दहावीच्या एक्जाम मध्ये नाही का सगळ प्रमेय आहे तस आल होत.प्रश्न पूर्ण न वाचताच उत्तर लिहील होत. डायरेक्ट लिहील होत. बरोबरच निघाल शेवटी असेच मार्क्स मिळवायचे असतात.
नक्की कॉपी करणे आणि रट्टा मारणे यात फरक काय असे तात्त्विक प्रश्न काही वेळेस समोर येतात पण ठीक आहे स्पर्धा आहे सगळीकडे जर मार्क्स मिळवून इकडे बारा भानगडी केल्या तरी कोण विचारणार नाही घरात. मग आय आय टी, अमेरिक्का, गोरी बायको इत्यादी इत्यादी.
भारतात नाहीतरी फारच धूळ आहे.
रूम झाडता झाडता असले सगळे विचारांचे ढग डोक्यात आले होते. रूम झाडून खिडकी उघडली तर आहा काय नजरा होता. टेकडी, झाड , दोन पायवाटा एकत्र येऊन तर्यार झालेला मोठा रस्ता, त्यात पावसाळ्याचे दिवस एकदम रोमांटिक.मिश्या थोड्या वाढल्या होत्या.दाढी करावी का नको याच संभ्रमात बरेचं दिवस होतो. आता कॉलेजात आलोच आहोत तर दाढीही करून टाकू हेही ठरवलं.
रूम मध्ये एक पाल होती जाता जाईना. एकवेळेस झुरळ चालेल, उंदीर चालेल , साप चालेल पण पाल अजिबात नाही. शेवटी झाडून भिंतीवर मारून मारून तिला खिडकीतून बाहेर ढकलला. तशी उगाच हिंसा करू नये. पालीला मी पळवून लावलं तेपण टेकडीच्या दिशेला.चला आता रूम माझीच. शांतपणे गादी टाकली आणि झोपलो.
झोपताना दरवाजा लावला. दावाज्याच्या मागच्या बाजूला लक्ष गेलं तर एकदम कोपर्यात छोटा अंजेलिना जोलीचा फोटो होता आणि त्याखाली मोबाईल नंबर लिहिला होता. म्हणजे माझ्या आधी या रूम मध्ये राहणारा मनुष्य भलताच छदिष्ट होता म्हणायचं.
४ वाजता जाग आली. वर्गातले दोन,तीन मित्र त्यांचं सामान घेऊन होस्टेलवर सेटल झाले होते. वर्गात लेक्चरला तश्या ओळखी झाल्या होत्या. अमेय अभ्यंकर म्हणून एक मित्र झाला होता. हुशार आणि सुसंस्क्रारीत वाटत होता. तो नाशिकचा होता.बर्याच वेळ आम्ही नाशिक चांगल कि कोल्हापूर चांगल असे निरर्थक वाद घातले होते. त्यामुळेच मैत्री झाली होती. त्याला दुसर्या कोपर्यातली जिन्याच्या जवळची रूम मिळाली होती. अमेयाच्या रुमच्या बाजूची रूम haunted आहे अशी अफवा होती.
होस्टेल मधल्या तीन चार रूम्स बदल भरपूर अफवा होत्या. विद्यार्थांनी केलेल्या आत्महत्याच्या घटना , जुन बांधकाम या सगळ्याचा अश्या भुताच्या गोष्टीमध्ये मस्त रंजक उपयोग व्हायचा. त्या गोष्टी एकूण गडी जाम घाबरला होता. त्याचा पंखा सुरु होत नव्हता. खर तर बाहेरून मेन स्वीच बंद होता. तो आत गेला कि मी आणि आणखी काही वर्गमित्र मिळून तो मेन स्वीच बंद करायचो. त्याला काळात नव्हत कि पंखा तर सुरु असतो आपण आत गेलो आणि बसलो कि कस काय बंद पडतो. त्यात बाजूची रूममध्ये भूत आहे हे देखील त्याने मनावर घेतलं होत. अशी बराच वेळ मज्जा करून झाल्यावर चहा पिऊन आलो. उद्यापासून मेस लावू म्हणून अमेय आणि मी उत्तपा खाऊन आलो.
रात्री दहा साडेदहा वाजले असतील
रूम मधलं सगळ व्यवस्थित लावलं. तो भिंतीवरचा अंजेलिना जोलीचा नंबर कडे बघत झोपायच्या तयारीत होतो. तेवढ्यात दरवाजा वाजला. दरवाजा उघडला तर अमेय गादी हातात घेऊन उभारला होता .
“माझ्या रूम मधला fan काही सुरु होत नाही आहे. त्यामुळे मी आज तुझ्याकडे झोपू शकतो का?”
“हो ये कि आत ये “
त्याने गाडी खाली टाकली.
fan बरोबर चेष्टा करता करता त्याचा fan खरच बंद पडला होता. पण दिवस पावसाळ्याचे होते fan ची काहीच गरज नव्हती तो नक्क्कीच घाबरलाय हे माहिती होत.थोडावेळ आम्ही चेस खेळत बसलो.खिडकी उघडली बाहेर भुरभूर पाउस पडत होता. बाहेर खूप अंधार होता आणि लाईट्स देखील नव्हत्या. टेकडी एकदम भयाण दिसत होती. त्यात अमावस्या होती. झाडांचा आवाज आणि पावसाचा आवाज एकमेकात मिसळून जात होता.
टेकडीच्या अलीकडे झाडाच्या इथे काहीतरी हालचाल झाल्यासारख दिसलं आमच्याकडे टोर्च नव्हती. ते काय आहे हे बघण्याची उत्सुकता चाळवली गेली. रूमवर एक डीओ स्प्रे होता. माझ्या आधी इथे राहत असलेल्या विद्यार्थाचा असावा. माझ्याकडे माचीस होती.
मी अमेयला माचीसने एक कागद जाळून खिडकीत धरायला सांगितलं. मी डीओ त्या जळत्या कागदावरच्या आगीवर फवारला,एकदमच भसकन वायू बाहेर पडला आणि एक मोठी आगीची रेष उठली.
“भेन्चोद!हात जळला असता कि”
अमेय काडी फेकून मला मारायला धावला.
“सॉरी... सॉरी....“
म्हणत मी बाजूला झालो.
आम्ही पोट दुखेपर्यंत हसलो.
घडाळ्यात बघितलं तर पावणेतीन वाजले होते. अमेय मुतायला बाथरूम मध्ये गेला.
मी खिडकीच्या बाहेर काय दिसतंय का हे बघायचा प्रयत्न करत होतो. अचानक जोरात ओरडण्याचा, पळण्याचा आवाज एकू आला.
मी पटकन बाहेर आलो. समोरच्या सर्व रूम्समधली लाईट बंद होती. बाथरूम मध्ये जाऊन बघितलं. तिथेही अमेयचा पत्ता नाही. रात्रीची शांतता इतकी होती कि संथ पावसाचा आणि रातकिड्यांचा आवाजच मोठा वाटत होता. दोन तीन वेळेस अमेयला हाक मारली पण काही उत्तर आलं नाही. मी बाहेर उभारून इकडे तिकडे बघत होतो तेवढ्यातच एक मोठी सावली दिसली. सावली माणसाची वाटलीच नाही.काहीतरी गोल काळ पळत गेल्यासारख वाटल. समोरच्या बाथरूम मधून मोठा आवाज आला ओरडायचा आणि पळायचा. मलादेखील दरदरून घाम फुटला. आता काय होईल ते होईल म्हणालो आणि पळतच बाथरूमच्या दिशेने गेलो तिथे अमेय थरथरत उभा होता त्याच्या तोंडाला तो फेस आला होता. माझीही तशीच अवस्था होती नक्की चाललय काय काहीचं कळत नव्हत.
आम्ही दोघेही घाबरून रूम मध्ये आलो. मी सिगारेट पेटवली. सहसा दिवसाला एकापेक्षा जास्त सिगारेट पीत नाही पण प्रसंगच असा घडला होता.सगळीकडूनच फेस आला होता. भूत बित काय नसतंय म्हणता म्हणता पहिल्याच दिवशी भुताने इंगा दाखवला.
“मी मुतत्त होतो आणि अचानक टोय्लेट मधून काळ भुतासारख काहीतरी बाहेर पडल. नक्की काय होत ते दिसलं नाही. तसाच अर्धवट मुतायचा सोडून मी पळत पळत बाहेर पडलो ओरडलो “
“पण नक्की होत काय ते? तोंड कस होत?”
“तोंड अस काय नव्हताच त्या आकृतीला”
अमेयची pant खरच थोडी ओली दिसत होती. त्यामुळे तो चेष्टा करत नाही आहे याची खात्री पटली.
वातावरण पण इतक जबराट भीतीदायक होत कि मी शांतच बसलो. आता सकाळ होईपर्यंत रूम चा दरवाजा उघडायचा नाही अस ठरवला. भूत आलच तर काहीतरी शस्त्र जवळ असाव म्हणून फणस कापायचा चाकू चुकून सामानातल्या पिशवीमधून आला होता तो बाहेर काढून ठेवला
अचानकच मोठा आवाज झाला
“पकड पकड आआ ...आआआ”
शिपाई मामांच्या ओरडायचा पण आवाज आला अमेय आणि मी पटकन सिगारेट विझवून पळत रूमच्या बाहेर गेलो. होस्टेलचे दोन ब्लॉक होते. आमच्या ब्लॉकला लागून post graduate वाल्यांचा ब्लॉक होता. तिथे बरीच अंकल टाईप टक्कल पडलेली विविध विषयातील प्राध्यापक होण्याची इच्छा बाळगणारे, आयुष्याचा अर्क समजलेली मुल राहायची. त्या ब्लॉक बद्दल खास गूढच होत. त्या ब्लॉक मध्ये जाण्यासाठी आमच्या ब्लॉक मधूनच चिंचोळी जागा होती. त्या जागेच कुंपण उंचीला फारस मोठ नव्हत. म्हणजे ज्यांना इल्लीगली दहाच्या नंतर होस्टेल मध्ये यायचं आहे किंवा रात्री बाहेर जायचं आहे असे धाडसी लोक त्या मार्गाचा उपयोग करत. (हे नंतर कळाल)
मी आणि अमेय त्या अरुंद जागेतून आवाज येत होता तिकडे पळालो.तर तिथे शिपाई मामा , एक जाड चष्मा घातलेला मुलगा आणि एक शाल ने तोंड झाकून घेतलेली मुलगी तिघेजण उभारले होते. मुलीने थ्री फोर्थ घातली होती. तिच्या गुढग्यातून रक्त येत होत. आम्ही तिथे आल्याच बघितल्यावर मामानी आम्हाला तिथून हाकलला.

दुसर्या दिवशी सकाळी कळाल.
तर झालेलं अस हा जाड चष्मेवाला मुलगा होस्टेल चा जनरल सेक्रेटरी होता. त्याच एम.अ संपल होतं तो धाडसाने national social service(N.S.S.)च्या कम्प मध्ये ओळख झालेल्या एका धाडसी मुलीला घेऊन रात्री उशिरा कुंपणावर चढून तो तिला रूम मध्ये घेऊन आला. हे दोघ आत तर आले पण प्रोब्लेम असा होता कि रात्री मध्येच त्या मुलगीला नैसर्गिक उर्मी झाली. त्यांच्या ब्लॉक मधल बाथरूम तुंबल होत. पाणीदेखील नव्हत त्यामुळे हा जाड चष्मेवाला तिच्या तोंडावर शाल वेगैरे टाकून तिला घेऊन आमच्या ब्लॉकच्या बाथरूम मध्ये आला.त्याच सुमारास अमेय अभ्यंकर महाशय बाथरूम मध्ये गेले. त्याला पाहून हि मुलगी आणि जाड चष्मेवाला मुलगा पळत सुटला. ती मुलगी आहे हे कळू नये म्हणून ती बया तोंडावर शाल घेऊन तशीच वाट फुटेल तिकड पळत गेली. आम्हाला वाटलं हे एखाद भूतच आहे.
आम्हाला घाबरवून हे दोघ धाडसी जोडप त्या चिंचोळ्या जागेतील काम्पौंडवर पडून उडी मारत असताना ती धाडसी मुलगी खाली पडली. तिच्या गुढग्याला लागल. त्या आवाजाने शिपाई मामा जागा झाला. डायरेक्ट जी.एस. लाच असा ‘लेडीज’ रूम मध्ये आणण्याचा गंभीर गुन्हा करताना बघून त्यालादेखील काय बोलायचं ते कळेना. शेवटी सकाळ होईपर्यंत ती मुलगी त्याच्या रूममध्ये राहिली . सकाळी आम्ही जास्ती लोकांना न सागता देखील हि खबर वार्यासारखी सगळ्या होस्टेल मध्ये पसरली होती. बरीच मुल एखादा वाघ पकडून पिंजर्यात टाकतात असलं काहीतरी थरारक बघत असल्यासारख त्या मुलीकडे बघत होती. जाताना त्या मुलीला निरोप द्यायला आख्खा जनसमुदाय लोटला होता. नंतर पुढे काय झाल ते माहिती नाही काही दिवसांनी जाड चश्मेवाला मुलगा एम.ए. तत्वज्ञान करून आमच्याच कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून नोकरीला लागला.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

हा लेख बाकी आवडला. कॉलेजचं चार अक्षरी नावही समजलं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यातल्या बघ्य 'सायको' डिपार्ट्मेंटच्या नावाने चांगभलं!
जय हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाविद्यालय समजले असे वाटते. त्या महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधला हा तिसर्‍या क्रमांकाचा ब्लॉक असावा. या तिसर्‍या ब्लॉकातल्या कोपर्‍यातल्या बाथरुमच्या युरिनलपाशी असलेली एक खिडकी चौथ्या ब्लॉकात उघडते. या खिडकीचे काही गज निघालेले असल्याने चौथ्या ब्लॉकातून तिसर्‍या ब्लॉकात घुसता येते. पण चिंचोळी वाट असल्याचे पाहण्यात नाही. (तिसर्‍या ब्लॉकातल्या एका रुमच्या खिडकीचे गज काढता येतात. त्या रुममधूनही रात्री १०नंतर आत शिरता येते.) चौथ्या ब्लॉकात पोस्ट ग्रॅज्युएट करणारी मंडळी राहतात हे खरे पण तिसर्‍या ब्लॉकात कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांना राहता येत नसे. ते लोक पहिल्या ब्लॉकमध्ये असत. आता चित्र बदलले असावे. असो.

अवांतरः एके काळी कोपर्‍यातल्या (बर्‍याचदा काम न करणार्‍या ट्युबलायटी असलेल्या) अंधार्‍या टॉयलेट्सकडे न जाता रात्रीच्या वेळी अनेक लोक रुमबाहेर येऊन ओट्यावरून/बाल्कनीतून लघुशंकेचा कार्यक्रम उरकत असत. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधला हा तिसर्‍या क्रमांकाचा ब्लॉक असावा. या तिसर्‍या ब्लॉकातल्या कोपर्‍यातल्या बाथरुमच्या युरिनलपाशी असलेली एक खिडकी चौथ्या ब्लॉकात उघडते. या खिडकीचे काही गज निघालेले असल्याने चौथ्या ब्लॉकातून तिसर्‍या ब्लॉकात घुसता येते. >>>>तिसर्या आख्ख्या ब्लॉक मध्ये प्रत्येक मजल्यावर एकच बाथरूम आहे. हे बाथरूम चौथ्या ब्लॉकच्या विरुद्ध दिशेला आहे.आपण जे बोलत आहात तेच खिडकीवाल बाथरूम तुंबलेले असल्याने प्रस्तुत कथेतील महाशय वरच्या फ्लोर वरील बाथरूम मध्ये आपल्या सखीला घेऊन आले. आता ते खालच्या मजल्यावरच्या बाथरूम मध्ये का गेले नाहीत?(यासाठी त्याचं सायको department मधल्या मुली ऐसी वर असतील तर त्यांनी विश्लेषण कराव) खालच्या फ्लोर वर शिपाई मामा जागा होण्याची शक्यता असावी त्याला चुकविण्यासाठी जाड चष्मेवाला मनुष्य वरच्या मजल्यावरील वरील बाथरूम मध्ये आला असण्याची एक शक्यता नाकारता येत नाही. असो.

पहिला ब्लॉक काही काळासाठी बंद होता. कनिष्ठ महाविद्याल्यातील लोक दुसर्या ब्लॉक मध्ये राहतात. (दोन वर्षापासून पहिला ब्लॉक पुन्हा डागडुजी करून उपलब्ध केला आहे.) दुसर्या ब्लॉक मधील सर्व रूम्स भरलेल्या असल्याने प्रस्तुत कथेतील व्यक्तीला काही काळासाठी तिसर्या ब्लॉक मध्ये रूम अलॉट करून दिली होती. असो. हेही अवांतरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

कॉलेजचं चार अक्षरी नावही समजलं.

चार अक्षरी? हम्म्म... हा काहीतरी 'एफ वर्ड' वाटतोय. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'र्ग्यू' की 'र्ग' हा एक - फेरवादी/नाफेरवादी - - जहाल/मवाळ - वगैरे वाद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पहा उच्चार हवे तसे करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण लिहायचं कसं ते त्या पाटीकडे बघूनच ठरवा की. तिथे र्ग्यु लिहिलं आहे. तेव्हा नो आर्गमेंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इकडे मूळ माणसाचे नाव काही वेगळेच दिसते.पण लगेच पुढे ते पाटीवर लिहिलेले नाव आहे तेव्हा... वोक्के बॉस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या पिढीतला उच्चार 'र्ग' होता या दाव्याला पुष्टी देणारा एक व्हिडो तूनळीवर आहे. निनाद बेडेकर वा.सी. बेंद्र्यांबद्दल बोलतानाचा, त्यात असा उच्चार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोसला+भुताचा जन्म.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिहित रहा.
शेवटची दोन वाक्यं विशेष आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL जबरा! मस्त लिहीलय!
तरी बरंय त्या GS ने सिँगल सिटर रुममधे मुलगी आणलेली. मी कोथरुडला राहणार्या PGत तर एका मुलीने तीन सिटर रुममधे मित्राला आणुन बेडखाली लपवून ठेवलेल ४ ५ तास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिचारा तो मित्र!! तुझ्या मैत्रिणी स्त्रीवादी दिसत नाहीत वाटत. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

लेखनाचा दर्जा सुधारतोय असे वाटले. आणखी येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख. काही तरल जागा पकडल्या आहेत. विशेषतः

नंतर पुढे काय झाल ते माहिती नाही काही दिवसांनी जाड चश्मेवाला मुलगा एम.ए. तत्वज्ञान करून आमच्याच कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून नोकरीला लागला.

ने झालेला शेवट भारीच. डीओचा स्प्रे करून आगीचा लोळ करणे वगैरे खास होस्टेलीय जीवनातले कीडे करण्याचं वर्णन आल्याने लेखाला रंग भरला आहे. असंच लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile मजा आली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0