वाचन-लिखाण....

‘मी का वाचते?’ ह्याचा विचार करताना जाणवले ते असे ---
२००४ साली वाचनाला नव्याने सुरूवात झाल्यापासून आजपर्यंत, जवळ-जवळ प्रत्येक पुस्तक वाचताना नकळतपणे मी स्वत:शी भिडत आले. इथे ‘स्वत:’ म्हणजे निव्वळ ‘मी’ नसून त्यानिमित्ताने एकंदरीत आपल्याभोवतीची परिस्थिती-घटना-माणसे-इ. कडे बघण्याची नवी नजर मिळत राहिली, प्रत्येक वाचनातून !!!

वाचन करताना लेखकाचा उद्देश काय असू शकेल ह्याचा विचार मी आजवर कधी केला नाही. त्याची भूमिका समजून घेण्याची गरज फारशी जाणवली नाही. कारण बर्‍याचदा मनोगतातून ती थेटपणे व्यक्त झालेली असते आणि जिथे मनोगत नसते (उदा. कथा-कादंबर्‍या-कविता) तिथे त्या कलाकृतीकडे ‘माझ्या’ नजरेतून बघावेसे वाटते, लेखकाच्या नव्हे!

`मी का वाचते' ह्याचा विचार केला, त्याचप्रमाणे ‘मी का लिहिते?’ हेही वेळोवेळी तपासून बघताना काही गोष्टी लक्षात आल्या--
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे
स्वानंद! स्वत:साठी लिहिणे, स्वत:च्या आनंदासाठी विस्ताराने लिहिणे... पहिला टप्पा!

विचारांची स्पष्टता येते.
वाचताना सुटलेल्या काही गोष्टी लिहिताना विचारात घेता येतात.
हा आनंद मिळत राहिला की आपोआपच ‘माझा लेख इतरांना वाचताना काय वाटेल’ असं वाटू लागतं. हा दुसरा टप्पा!

मग मला ‘असे का वाटले’ ते लिहिताना आपलेच विचार जास्त स्पष्ट होत रहातात
त्यावरील इतरांची मते वाचताना, ‘असाही (आपण केला त्यापेक्षा वेगळा) विचार असू शकतो’ हे ध्यानात येते.
थोडक्यात, ‘लिखाण वाचण्याने’ अन ‘वाचलेल्या लिखाणा’विषयी लिहिण्याने ‘अनेक’ विचारांच्या शक्यता जाणवतात आणि आपल्या आकलनात भर पडते.

चित्रा राजेन्द्र जोशी.
१६.०७.२०१२

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडल. आणखीन विस्ताराने लिहिता येईल या विषयावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

यावरून व्यावसायिक लेखनाचे माझ्या एका गुरूंनी सांगितलेले तीन नियम आठवले.

१. शक्यतो लिहिणं टाळा. अगदीच रहावलं नाही तर लिहा.
२. कमीत कमी शब्दांत लिहा. आपल्या शैलीच्या प्रेमात पडू नका.
३. तिसरा नियम नाही. वरचे दोन नियम कसोशीने पाळा.

म्हणजे व्यवसायाशी संबंधित लेख, टीका-टिप्पण्या, कॉन्फरन्स पेपर्स वगैरे
याचा लय त्रास व्हायचा. आपण एखादा ड्राफ्ट त्यांना दिला, की त्यावर सुधारणा वगैरे सुचवून वर "मेक इट २/३ इन लेंग्थ" असं काहीतरी भयानक उद्दिष्ट ठेवायचे. असं किमान दोनदा तरी घडायचं. आपण ३००० शब्दांत ऐसपैस लिहिलेला पेपर शेवटी बाराशे-पंधराशे शब्दांत कोंबून बसवायला लागायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.