हाक

गावची नदी येते स्वप्नात
स्वप्नात नदीला पूर असतो आलेला
स्वप्नात समुद्रासारख्या उसळतात नदीच्या लाटा
वार्‍यानं घरंगळत जाते मी
पण पडत नाही पाण्यात नदी बेफाम हाका मारत असताना

स्वप्नात गावातल्या
खचलेल्या रस्त्यांना पडतात भूकंप झाल्यागत भेगा
त्या भेगेत जाऊन पडते सायकलरीक्षा
ज्यात बसलेय मी आणि चालवतोय एक लहान मुलगा
पण वाचतो आम्ही दोघंही, फक्त वाहन गायब होतं

स्वप्नात गावचं घर दिसतं
घरासमोरच्या मैदानात निजलेय मी उघड्यावर
आणि दोन आडदांड पाहून दचकते
ओरडते तर निघतच नाही घशातून आवाज
हाक मारू पाहतेय... बाबा... बाबा... बाबा...
काय असते दहशत काय असते भीती काय असतं किंकाळी न फुटणं तोंडातून काय असतं हाक
मारणं बापाला जीवाच्या आकांताने काय असते काळी रात्र काय असतो चिरफळलेला आवाज
काय असतं कुणालाच ऐकू न जाणं

कुठे आहे मित्र कुठे आहे प्रेम कुठे आहे हत्यार संरक्षणाचं कुठेय शब्द जो दिला होतास कुठेय
विश्वास की असशील कायम सोबत कुठाय आई जन्म देऊन मरून गेलेली कुठायत पाठची भावंडं
कुठाय गोतावळा

पिंड द्यायला जमा होणारे कुठे असतात कुणी भुकेने मरताना
कुठे असतात अग्नी देणारे दिवा तेवत ठेवून पिठावर पावलं उमटण्याची वाट पाहणारे मेणबत्या
घेऊन निघणारे जेव्हा ठिणगी बुटाखाली चिरडली जाते

किती वेगाने फिरतेय ही पृथ्वी
डोळे विझताहेत

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी हीच भावना मला सकाळपासून होतेय Sad .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0