मेन्स टॉक

(शुक्रवारी संध्याकाळी जुन्या मित्रांची ओली-सुकी पार्टी करायचा बेत एका गार्डन रेस्टारंन्ट मध्ये ठरला. सगळ्यांना कधीनव्हे ते बायकांकडुन परमिशन पण मिळाली)

कारे जानव्या! उरफाट्या न्हाई आला अजुन? … बन्ट्या
(ठुश्या वैतगलेल्या सुरात)
तुले लै आठोन येउन र्‍हायली त्याची? असन भहिनमाय कुठ्तरी फकाल्या तानत! ...ठुश्या

तु काहुन अंगार मुतुन र्‍हायला बे? ...बन्ट्या

अंगार? भाडखाव परवा घरी आला अन भांड्न लाउन गेला आम्च्यात.
हीले सायचा हा वहीनी नाय म्हन्नार तं, काय,
" ताई! कश्या आहात? बरं चाल्लये ना? आजकाल काम जरा वाढलयं वाटतं साहेबांच? फीरायला नाही गेले एव्हाना कुठं? आम्ही जाणार नेक्स्ट विक गोव्याला, आमच्या हीची इच्छाच होती तशी, स्त्रिहट्ट शेवटी! आपण काही कोणाचं मन नाही मारत बॉ! साहेबांना विचारलं येता काय तर ऑफिसमध्ये काम आहे म्हणे."
बायक्या सायचा!!! हा चाल्ला गोव्यात दारु प्याले अनं काय तं स्त्रिहट्ट म्हने!
अन माया बाय्कोले हा लै आयडीयल वाट्टे, मायची कटकट साले दोन दिवस झाले, बायको अजुनही सरकी बोलुन न्हाई र्‍हायली.
(सगळे खि खि खि Biggrin Biggrin Biggrin )
तुमालेकाय खि खि खिदडा सायचेहो. ...ठुश्या

(परिस्थीतीचा वेध घेत, एक डोळा मारत ;))
अरेओ पिठमांग्या! माया चुगल्या करुन र्‍हायला काबे ? … उरफाट्या

तुले त कुशीत गुद्दे माराले पायजे भाडखाव … ठुश्या

तुवा ह्याच्या घरी भांड्न लावले म्हन्ते हा ...जानव्या

ऑ! मंग रोज काय काकडा अन भजनं होते कायरे ठुश्या तुयाघरी? भौ याले आपुन आधिच सान्गतलं होत बॉर्न एन्ड ब्राऑटप पुन्यातली शायनी बायको करु नको म्हनुन!
बेट्या बाय्को कशी लठ्ठं आनी मठ्ठं पाह्य्जे. Wink हुश्शार अस्न अनं समजदार अस्न याच्यात जमीन-आस्मान असते भौ! घेना मंग आता बहिरम बुवाचे टोले Wink ... उरफाट्या

काल तुयी त लै ताई होती रे आज लगे शायनी झाली नै? लै हरामी हायेस बे तु … ठुश्या

आजै ताईच हाय आपली, पन ताई शायनी नस्ते हे कोनं म्हन्टलं ?
ह्या शायन्या पोट्ट्या काय तं सावित्रीच्या लेकी म्हने. र्‍हाइले जिजाउ अन सावित्री समजल्या काय? ह्यायची मुक्ती म्हन्जे कमी कपडे अनं चार लफडी. ... उरफाट्या

(बन्टी, ठुश्याची चिडचिड वरुन उरफाट्या च्या आई-बहिणींचा कडक शब्दात उद्धार. अर्थात शिव्यांना काही अर्थ नसतोच हा सर्वमान्य नियम)

जौद्यानाबे! ठुश्या अन फाट्याचं रोज्चच हाये ऑर्डर द्या आधी ....बन्ट्या
हा भाडकाव कै खात नै का पेत नै अन घैइ यालेच, तु आम्चा चकना खतम कर फक्त बेटा आज,..... जौदे तु देवाचं नाव घ्युन प्याले सुर्र्वात करं आज पासुन ...उरफाट्या
न्हाई बे बन्ट्या न्हाई पेनार, मले पेल्यावर घरी कोन सोडत जैइन मन्ग? Wink … ठुश्या
(खि खि खि Biggrin Biggrin Biggrin )
(बीयर, विस्कि, शितपेय इ. ऑर्डर देण्यात आली)

बरं कारे जानव्या पोरगी पाहाले गेल्ता तं काय झालं तिकडे? ...बन्ट्या
टींक्के लाग्ले म्हन्ते ? ... उरफाट्या
तुले कोनं सान्गतलं बे फाट्या ?... जानव्या

अरे वॉ! अभिनंदन! अभिनंदन! ...बन्ट्या
अइ हाई व! देख देख लोंढा शरमा रहा है Wink इस बात पे गले मिल दोस्त, कॉन्गर्रट्स! कॉन्गर्रट्स! … ठुश्या

मले फोन आल्ता केशव चा, त्यानंच साग्तलं ...उरफाट्या
भाडकाव साला! ...जानव्या
केशवसुत चिड्ले, भाडकाव कोण मी का माया दोस्तं केशव? Wink ...उरफाट्या
( खि खि खि Biggrin Biggrin Biggrin केशव म्हणजे जानव्या चे वडील)

पाहलेच गेलतो तसा, पोरगी दीसाले व्यवस्थीत वाट्ली, दोन्ही साईडची पसंती झाली. त्याच दिवशी टिक्के लौन घेत्ले डबल चक्कर केल्यापेक्षा, एक्दम सुपरफाश्ट ... जानव्या

तुले फ्याल्ट घ्याचा म्नजे नौकरी वालीच असन न्हाई? बरं जौदे कोन्त्या कंपनीत हाये ते सांग आघी ... उरफाट्या
ठुश्या झाला मोकळा आत्ता मायी बारी न्हाई? ...जानव्या
कारे फाट्या तुवा कधीतरी सर्रका प्रश्न विचार्रला कारे कोनाले … ठुश्या
तु सर्काच त बोल्तं रे भौ माया ताई शी कै फाय्दा झाला का तुया? मादरटट्टु साला! ... उरफाट्या
'ग' च्या 'गां'त जाय. तुया तोन्डाले तोन्ड देनं म्हन्जे डुकराशी कुस्ती ...ठुश्या
गुड ठुश्या देव तुय जितकं झालं त्याच्यापेक्षाई जास्त भलं करो! ... उरफाट्या
मादरटट्टु खि खि खि नवीन शब्द डिक्श्नरीत अ‍ॅडेड! ...जानव्या

जौद्यानारे बावा! पोरगी कॉग्नीझंटात सॉफ्टवेयर टेस्टर आहे. ...जानव्या
बापरे जानव्या! भहिनमाय तुयी होनारी म्हन्जे एक्सपर्ट विथ एक्सपिरीयंन्स हाय राजा, लागले बेट्या तुये! ... उरफाट्या
ऑ! म्हन्जे? ...जानव्या
अरे बावा बाय्का आधिच चुका काढ्न्यात माहिर.. म्हन्जे एक्सपर्ट.. अन तुयी होनारीले टेस्टिंग चा अनुभव म्हन्जे तुया सॉफ्टवेयर चे लागले का नाय? खि खि खि तुया लग्नात स्टेजवर येउन पक्क्यात दोन मिन्टाचं मौन पाळू बेट्या आपुन खि खि खि. ... उरफाट्या
खि खि खि भाडखाव साला, तुले मनबिन हाय का नाही बे, जाउदे खुश र्‍हाउ दे बिच्चार्याले काही दिवस Wink ...ठुश्या

मंग रात्रिचे फोनंगिनं झाले अस्तीन? अन लग्नाची तारिख? ... जानव्या
होत र्‍हायते बोलनं कधी कधी, लग्नाची तारिख दिवाळी नन्तर म्ह्नुन र्‍हायले सगळे ... बन्ट्या

ते पाय्ह तिकडे मस्त आय्टम चाल्लीये ... उरफाट्या
(सगळ्यांच्या नजरा गप्पांना स्वल्पवीराम देउन जाणार्‍या पोरीकडे)

अरे बावा असं एकदम सगळेच्यासगळे नका पाहु नाबे! तुम्च्यासोबत बसाचीई लाज वाटुन र्‍हायली. अन तुय तं आत्ताच लग्न जुळलं नाबे जान्व्या? ... बन्ट्या

बर्र! तुले लाज वाटुन र्‍हायली न्हाई? मले एक सांग त्या पोट्टीनं एव्हढे कमी कपडे कार्‍हुन घात्ले असनं? ऑ ? चांग्ल दिसावं, लोकांईन तिच्याक्डे पायलं पाईजे म्हनुन्नच ना? ... उरफाट्या

हाव ...बन्ट्या

मंग आम्ही पाय्ल तं लगे तोन्ड काहुन तिरपं केलं तिनं? भौ ह्या बाय्काईच्या डोकशात अल्ल्ग्चं कॉन्फ्लिक्ट रायते? म्हन्जे एक मन म्हन्ते लोकांईन पाय्लई पायजे अनं दुसर मन म्हन्ते नाही पाय्ल पायजे. ते म्हन्तात ना "ऑल मेन आर पिग्स एन्ड हाउ टु इम्प्रेस पिग" तंस्स काईतरी .म्हनुन तं मी म्हन्तो का पोट्ट्या अर्ध्या म्याड र्‍हायतात . ... उरफाट्या
(हाउ टु इम्प्रेस पिग खि खि खि ...सगळेच Biggrin Biggrin Biggrin Biggrin )

बर्र! म्हन्जे तुले म्हनाच आहे का पुरुष लै सुधे र्‍हायतात नाई? ...बन्ट्या
नाई, म्हन्जे निसर्गानच पुरुषांले दिसाले लैच बाप बनोलं हाये पन डोक्शानं पुरे पैदल.म्हन्जे बाई दीसली का डोक्सं पुरं बंद. ... उरफाट्या
म्हन्जे? ...बन्ट्या
प्रुव्ह करु काय? ऑ? ... उरफाट्या
हाव तु प्रुव्ह करचं ...बन्ट्या

आता मले सांग दिसाले कोण जास्त भारी? ... उरफाट्या
मोर का लांडोर ? ... उरफाट्या
मोर ...बन्ट्या
सिंह का सिंहीन? ... उरफाट्या
सिंह ...बन्ट्या
कुत्रा का कुत्री? ... उरफाट्या
कुत्रा ...बन्ट्या
स्त्रि का पुरुष? ... उरफाट्या
आ$$$.... स्त्रि ...बन्ट्या
स्त्रि! हेन्स प्रुव्ह्ड! बाई दीसली का डोक्सं पुरं बंद भौ! ... उरफाट्या
(खि खि खि Biggrin Biggrin Biggrin Biggrin )

बर्र! उरफाट्या तु सांग स्त्रि का पुरुष?...बन्ट्या
नॅचरल अनं लॉजिकली पुरुष दिसाले भारी र्‍हायते, ... उरफाट्या
हेन्स प्रुव्ह्ड! यु आर अ गे. खि खि खि ...बन्ट्या
(एकचं ठ्ठो ,हा हा हा ही ही ही खि खि खि Biggrin Biggrin Biggrin सगळेच ROFL )

कारे जानव्या तुय लग्न दिवाळीनन्तर, अ.. म्हन्जे हिवाळा जोरात म्ह्नाच नाई Wink बरं जौदे मंग हनिमुन ले कुठं? ...ठुश्या

माया त कुठच जाचा विचार नाही भौ पन गेलोच त कश्मिर ले जाव म्हन्ट्ल ... जानव्या

हिवाळ्यात कश्मिर! डोक्स फिरलं काय तुय? भौ आपला चम्या हाय ना? तो गेल्ता म्हन्ते थंडीचा तिकडे, काय त हाउस बोट मध्ये हौस फेडाची होती म्ह्नते त्याच्या बाय्कोले, काय इचारतं खत्रा थंडी .. लागली ना भौची... आपल्या चम्याच्या सामानचा जागेवार काजु झाल्ता म्हन्ते.. मंग काय त उरलेली हौस रम अन विस्कि पिउन पुरी करा लागली म्हने. भोकाड्या तुही इज्जत गमावशीन काय आम्ची तिकडे जौन ? ... उरफाट्या

मी म्हन्तो आपली होमपिचच बेश्ट ,कम पैशात घरच्याघरी एक्दम बेश्ट. पाच्सहा महिन्यान जाना बावा मंग फिराले कोन अडवलं तुमाले? फाल्तु कामात खर्च नाही आवडत आपल्याले. म्हन्जे काम तसं फाल्तु नाही Wink पन खर्च हुन्च र्‍हायला त मंग फिरनंइ झालं पाह्यीजे बॉ. ...ठुश्या

अशे सल्ले देते ना हा ठुसक्या मंग शिव्या खात माया ताई च्या Wink हनीमुन ले तं भौ जाचं लागते. आयुष्यभर शिव्याखाची तय्यारी अस्नतच या ठुसक्याच आईक. आप्ल ऐकशीन त केरळले जाय एक्दम बेश्ट!... उरफाट्या
(खि खि खि ....सगळे)

कारे मंग आता तु 'उपवरा'हुन 'वर' झाला नै? ...ठुश्या
पन भौ आजकाल 'वर' फक्त लग्नपत्रिकेत्च 'वर' र्‍हायले बाकी सगळीकड खालीच, योगासनबिगासणंही पार बद्द्ले भौ आता, कलीयुग अजुन काय? न्हाई कारे ठुश्या Wink ...उरफाट्या
(...सगळेच Biggrin Biggrin Biggrin Biggrin )

आजकाल च्याबहिन कोनाचंही लगन झालं का पहिले सारखं "अरे वा! मज्जा हाये मंग" असं नाई निंगत तोन्डतुन. पयला प्रश्न बरं चाल्लं हाय नारे भौ? ... बन्ट्या

हाव ना राजा पयले सालं बाय्कालै माहेरी जौ नव्हते देत म्ह॑न्ते तं आज्काल बाय्का जा जा केलं तरी जातचं न्हाई बहिनमाय ...ठुश्या

मले आपल्या सगळ्याइत तो चम्या खुश दिसते भौ. बाय्कोई एक नंबर हाय त्याची अन बम्बाट खुश दिस्ते दोघच्या दोघही, कधी पायलं का हाथात हाथ अन तोन्डानं खि खि खिदडनं ... जानव्या

आपलं त एक ऑबझर्र्वेशन हाये भौ! असं बोलु नै पन बाहेर नवर्राबाय्कोनं लै आगावु कल्ला केला अनं लोकांइसमोर लै प्रेमगिम दाखवलं का काईतरी गेम र्‍हायते. काई दिवसात भांड्न-तंट्टा काडीमोडीची खबर उभी. त्यात चम्याच्या बाय्कोवर शाहारुख खान चे संस्कार मंग काय पाहा लाग्ते, ओम शान्ती ओम. ... उरफाट्या

लैच हरामी हायबे तु, तुले कोनाचच चाग्ल पाहावतच नाही ... बन्ट्या

जौदे रे बॉ! माय ऑबझर्र्वेशन माग घेतो अन अस काई नसावं अशी देवाले प्रार्थना कर्र्तो झाल समाघान?. ... उरफाट्या

खरंत चम्या येनार होता आज ... बन्ट्या

तुम्च्या गोष्टी आय्कून मायी तं लैइच फाटुन र्‍हायली लग्न कराले भौ ... जानव्या

कै भेउ नको तु, मैई हु ना! भौ इच्छा असो का नसो, गोड लागो का कडु, आप्ल्या इंडीयन सोसायटीत मरेपर्यंत जरा बरं जगाचं असन तं लग्न कराच लाग्ते ...उरफाट्या
पटलं ... बन्ट्या

भौ बाय्का कश्या पतंगी सारख्या पायजे म्हन्जे दोरी कशी हरदम आप्ल्या हातात. पतगं सलकली तं कै वांधा नै पन सन्नावाले नै पाह्यीजे. ... उरफाट्या
अन सम्जा सन्नावलीच तं ? ... जानव्या
अन सम्जा सन्नावलीच तं शेपुट द्याची लौन एक ... उरफाट्या
शेपुट म्हन्जे? … ठुश्या
म्हन्जे एक लेकरु गिफ्ट कराचं बाय्कोले वीषय कट. खेळा म्हना वात्सल्य! वात्सल्य! ... उरफाट्या
तुले खरचं मन नाहीच, लैच क्रुर विचार हायेत बे तुये विचार ... बन्ट्या

तु क्रुर म्हन का कै म्हन. आपुण जातीवंत हरामी पन आप्ले सन्सारं एक नंबर चाल्तात भौ! एकही फेमिनीस्ट बाई फेमिनाइन नस्ते अन एकही फेमिनीस्ट पुरुष मस्क्युलीन असुचं शकत र्‍हाई असं आप्ल पक्कं मतं!
तुम्ही म्हजे हिजाडी जमात, उद्या बाय्काईन म्हन्ट्ल ना तर ऑपरेशन करुन गर्भपीशव्याई बसुन घ्यान तुम्ही, मेट्रोसेक्सुअल साले! ....उरफाट्या

(बन्टी अचानक शांत पण थोडासा अनकर्फरटेबल)

सांगाव का नाई विचारच करत होतो पन चम्या चा फोन आल्ता महिन्याभर्या पहीले,तीनचार महिन्यापासुन चम्याले सोडुन माहेरी गेली म्ह्न्ते त्याची बाय्को. पुरा कावला तो जिन्दगीले. ... ठुश्या
(सगळेच अवाक, शिट यार, fXXX , अरेरे ई. शांतता )

सगळ्यात पहीले भौ या अफझल गुरुपेक्षा या शाहारुख खान ले फाशी द्याले पाहीजे होतं. जिन्दग्या याईले म्हन्जे डीडीएलजे वाट्टे ना, फिल्मी साले! ... ठुश्या

(उरफाट्या खुश होउन हसत)
दे टाळी! तशेही आपले अंदाज चुकत र्‍हाईच म्हना. भौ सन्सारं करावं तं आम्च्या सारख्यानं. दु:ख इतकचं का च्यामारी चम्यासाठी केलेली प्रार्थना वाया गेली. तसं बरंच झालं सुटला चम्या एकदाचा. ... उरफाट्या
(उरफाट्या सोडुन कुणीच हसलं नाही)

हसावं कसंकाय वाट्टेबे तुले अश्या बातम्याईवर?
हरामी साल्या, थु तुया तोन्डावर. तुयी बाय्को सोडुन जाइन ना तेव्हा तुले सम्जन दुसर्याच्या भावना अन बायकोची किंमत. ... बन्ट्या

अबे ओ जोडव्या! मले नको शिकवु कसा दुसर्याच्या भावना अन संसार. ...उरफाट्या

(जोडव्या या शब्द उच्चारल्या क्षणी बन्टी प्रचंड चिडला आणी रागारागात, शिव्या देउन, भावणेच्या भरात उरफाट्याला धक्का देउन निघुन गेला. जानव्या धावत बन्टीला माघारी आणायला. उरफाट्या ने बन्टीला 'जोडव्या' का म्हणाला आणी एरवी शांत असणारा बन्टी असा का वागला हे सगळ्यानाचं कोड्यात टाकणारं होतं. कधीनव्हे ते उरफाट्या च्या चेहरयावर दु:ख आणी अपराधीपणाची भावना. काहीवेळ स्मशान शांतता. जानव्या एकटाचं परत आला )

बन्ट्याले काय झालं एकदम? तनंतनं निघुन कार्‍हुन गेला? अनं हे जोडव्या म्हन्जे काय प्रकर्न बे फाट्या? ...जानव्या

ह्म्म्म...(थोडा वेळ सांगु की नाही हा विचार करत उरफाट्या)

अरे त्यादिवशी बन्ट्या च्या घरी गेल्तो तं काय हा आपला अमोल पालेकर हातात त्याच्या बाय्कोची जोडवी घेउन रडुन र्‍हायला होता. अनं टीव्ही वर गान कोन्तं तं गुलझारचं "एक अकेला इस शहर मै... आबोदाना ढुंढता हु". कडवं सुरु कोन्तं तं "दिन खाली खाली बरतन है और रात है जैसे अंन्धा कुवा." भौचा बाय्कोवर भारी जीव! बाय्को ले कोन्तातरी डेंजर मानसीक आजार होता म्हन्ते. म्ह्न्जे याले अनं डॉक्टरलेच तो आजार वाटे बाकी कोनाले भरोसा नव्हताच. बाकीच्याईले वाटे का पोट्टी मुद्दामच करते.
एकदिवस याची बाय्को याच्या आंगावर पायतली जोडवी फेकुन निघुन गेली म्हन्ते तेव्हा पासुन माहेरीच. होत आलं वर्ष आता.
(सगळे अवाक, चेहरे पडलेले. उरफाट्या थोडावेळ घेउन )

बंट्या बोल्ला न्हाई कधी ... ठुश्या

मले ते पोट्टी काही मेंटलगिंटल नाही वाटत बॉ! चांग्ली जॉब करते. तेव्हापासुन हा पालेकर "जीने की वजह तोह कुछ भी नही मरने का बहना ढुंढता हु!" टाइप वाग्ते. याले असं वाट्टे का ते पोट्टी याचं नाव घेउन "मेरा कुछ सामान तुम्हारे पास" म्हनुन "जब इसको दफनाउंगी खुद भी वही सो जाउंगी" म्हनत अस्न. चुत्या आहे भैXX.. म्या त्याले विचारलं कारे भौ "सोन्याचं मंगळसुत्र काहुन नाई फेक्ल मंग तिनं तुया आंगावर?" तं चिड्ला मायवर.
जौदे दु:ख अन स्वताहाले फसवनं ह्या मानसीक गरजाचं हाये म्हना मानसाच्या. ...उरफाट्या

भडवे कीतना हरामी है बे तु? सीनेमे दिल नही है तेरे ...ठुश्या

देख भाई उसकी सारी गिरहें१ मुझे भी साफ दिखाई पडती है. पर उसको कोई तरकीब भी तोह हम दोस्तो को ही सिखानी पडेगी ना? एकटं चुत्यासारखं रडन्यात का अर्थ हाये ऑ ?

"एक अकेला" नन्तर जोडव्या च्या टीव्हीवर कोन्त गानं लाग्ल म्हाइत हाय? त्याच मातीखाऊ गुलझाराचच "नैनो की मत सुनीयों रे.. नैना ठग लेंगे"
"लिखत पढतं रसीद ना खाता" हे खर्रच हाये भौ! ...इति उरफाट्या

१-> गुलज़ार ची संत कबीराला उद्देशुन लिहलेली गिरहें नावाची नज़्म

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

मेन्स टॉक लय आवडलं भो!!

अजून लयदा वाचा लागते, आमचे विदर्भी पोट्टे एकदम असंच बोलतेत.

कुनी याले आता 'येक विचित्र पोट्टी'गत फाडू र्‍हायले तं औघड है भौ पन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुनी याले आता 'येक विचित्र पोट्टी'गत फाडू र्हायले तं औघड है भौ पन >> चायला Biggrin मलापण तोच धागा आठवला.

बाकी लिखाण रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद भौ!

कुनी याले आता 'येक विचित्र पोट्टी'गत फाडू र्‍हायले तं औघड है भौ पन.

हे ठुश्या,जानव्या,जोडव्या काई कामाचे न्हाई. उरफाट्या ले बोलवु मंग हेल्प कराले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दंडवत स्वीकारा हो भौ! __/\__

ऐसीवर बोलीभाषेतलं असेच लिखाण उत्तरोत्तर येवो ही सदिच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा ! मस्त! बोलीभाषेची मज्जा काही औरच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेफाट आवडलं भौ!

बोलीभाषा हे एक कारण. ते तर भारी आहेच.

त्याहून महत्वाचं कारण म्हणजे ही "मोठं होत जाण्याची कथा" वाटली (त्याला एक तगडा जर्मन वाटणारा शब्द आहे). माणूस वैयक्तिकरीत्या मॅचुअर्ड वगैरे झाला / तसं भासवत असला, तरी आपल्या सर्वात जवळच्या "चड्डी" दोस्तांच्या कळपात वेगळा वागतो. ते इररिवेरंट, जगाला फाट्यावर कोलायचे दिवस खुणावत रहातात, आणि "मी बदललो नाही" हे कळपातल्या इतरांना आणि मुख्यत्वे स्वतःला पटवावं लागतं. पण असे क्षण येतात जेव्हा संपूर्ण कळपच्या कळप मोठा, मॅचुअर होतो.

तशी काहीतरी गोष्ट वाटली. एक नंबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्याहून महत्वाचं कारण म्हणजे ही "मोठं होत जाण्याची कथा" वाटली (त्याला एक तगडा जर्मन वाटणारा शब्द आहे). माणूस वैयक्तिकरीत्या मॅचुअर्ड वगैरे झाला / तसं भासवत असला, तरी आपल्या सर्वात जवळच्या "चड्डी" दोस्तांच्या कळपात वेगळा वागतो. ते इररिवेरंट, जगाला फाट्यावर कोलायचे दिवस खुणावत रहातात, आणि "मी बदललो नाही" हे कळपातल्या इतरांना आणि मुख्यत्वे स्वतःला पटवावं लागतं. पण असे क्षण येतात जेव्हा संपूर्ण कळपच्या कळप मोठा, मॅचुअर होतो.

सलाम! तुम्हालाही प्रतिसादांहून पुढे लिहितं करायला पाहिजे याची खुणगाठ बांधतोय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते इररिवेरंट, जगाला फाट्यावर कोलायचे दिवस खुणावत रहातात, आणि "मी बदललो नाही" हे कळपातल्या इतरांना आणि मुख्यत्वे स्वतःला पटवावं लागतं. पण असे क्षण येतात जेव्हा संपूर्ण कळपच्या कळप मोठा, मॅचुअर होतो.

आहा! काय नेमकं लिहिलंय!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आदूबाळ आपण लिहीतं व्हावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेन्स टॉक जब्रा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेस्टर म्हणजे चुका काढण्यात माहिर असे विनोद, किंवा अमोल पालेकर / गुलझारविषयी प्रेम ह्या गोष्टी बाकीच्या (रांगड्या) संस्कृतीसंदर्भात काहीशा उपऱ्या वाटल्या.
जाता जाता : तुम्हाला सुहास शिरवळकर आवडतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमचा प्रतीसाद वाचुन सुहास शिरवळकरां बद्दल आताच वाचल. त्याचं एकही पुस्तक वाचलेल नाही आणी दुनियादारी 'देवकी' या शिरवळकरांच्या कथेवर आहे हे पण आत्तच कळालं सिनेमा बघीतलेला नाही, बघायची इच्छा पण नाही.

अमोल पालेकर / गुलझारविषयी प्रेम ह्या गोष्टी बाकीच्या (रांगड्या) संस्कृतीसंदर्भात काहीशा उपऱ्या वाटल्या.

संस्कृती रांगडी का वाटली तुम्हाला? उरफाट्या तेव्हडा रांगाडा आहे, पण रांगाड्यानां गुल़जार आवडत नाहीत हा शोध काही कळला नाही.

अमोल पालेकर अव्हरेज वाटतो. त्या "एक अकेला" मध्ये मवाळ पालेकर हा नट आहे इतकाच काय तो हेतु. )उरफाट्या ने तरीही अमोल पालेकर चा उपहासच केला आहे असो.

गुल़जार वर माझ्यासारख्या (रांगड्या) संस्कृतीतुनं आलेल्याचं प्रचंड प्रेम.

टेस्टर म्हणजे चुका काढण्यात माहिर असे विनोद रीयल मेन्स टॉक मध्ये तसे काही नवीन नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> संस्कृती रांगडी का वाटली तुम्हाला? <<

एकविसाव्या शतकातले शिकलेले, आय.टी.तल्या बायका करणारे पुरुष एकमेकांत ज्या गप्पा मारतात ते पाहता ते रांगडं वाटलं.

>> रांगाड्यानां गुल़जार आवडत नाहीत हा शोध काही कळला नाही. <<

ज्यांना गुलझार आवडतात (मी त्यात नाही) त्यांना साधारणतः त्यांच्या काव्यात (किंवा सिनेमातही) तलमपणा वगैरे दिसतो आणि तो त्यांना भावतो असं निरीक्षण आहे. तो तलमपणा आणि रांगडेपणा ह्यांचा मेळ कसा बसतो ते मला कळत नाही, पण समजून घ्यायला आवडेल.

जाता जाता : Real Men Don't Eat Quiche पुस्तक वाचलंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एकविसाव्या शतकातले शिकलेले, आय.टी.तल्या बायका करणारे पुरुष एकमेकांत ज्या गप्पा मारतात ते पाहता ते रांगडं वाटलं.

बरोबर आहे कारण स्त्रियासोबत बोलतांना पुरुष जरा वेगळे बोलतात परत भाषेतं रांगडेपण आहेच.
विर्दभात खरतर हिंदी प्रभाव आहे त्यामुळे गुलझार मुखपाठ असणारे पण बरेच रांगडे आहेत.

तो तलमपणा आणि रांगडेपणा ह्यांचा मेळ कसा बसतो ते मला कळत नाही, पण समजून घ्यायला आवडेल

मानवाचा मानस ही गोष्ट मुळातच फार विचित्र असल्यामुळे तलमपणा आणि रांगडेपणा चा मेळ याच उत्तर कदाचीत मानसशास्त्रातचं शोधावा लागेल.
"सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" लिहीणारे सुरेश भट्ट हे पण मुळचे अमरावतीचेच मुळात त्यांची भाषा आणी तो माणुस रांगडाच पण काही ठिकाणी तलमपणा जानवतोच.

गुल़झार ओ साथीरे पण लिहीतात आणी गोली मार भेजे मे, रात के धाई बजे , ढान ट ढयान पण लिहीतात.

जाता जाता : Real Men Don't Eat Quiche पुस्तक वाचलंय का?
नाही वाचल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> गुल़झार ओ साथीरे पण लिहीतात आणी गोली मार भेजे मे, रात के धाई बजे , ढान ट ढयान पण लिहीतात. <<

ते 'बीडी जलाईले' वगैरे ह्या रांगड्या गड्यांना आवडत असलेलं दाखवलं असतं तर इतकं आश्चर्य वाटलं नसतं.

>> तलमपणा आणि रांगडेपणा चा मेळ याच उत्तर कदाचीत मानसशास्त्रातचं शोधावा लागेल. <<

ते ठीकच आहे, पण ह्या दोन गोष्टी एका पुरुषात नांदत असल्या, आणि बायको निवडताना आपल्यातला तलमपणा जिला आवडतो अशी निवडली आणि तिच्यासोबत रांगडं वागलं तर संसारात अडचणी येणारच असं वाटून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुण्याबाहेरून पुण्यात आलेल्या आणि पौगंडावस्थेत असलेल्या काही तरुण लोकांमध्ये तलम+रांगडा प्रकार पहायला मिळतो हे तुम्हीच आठवण करून दिलेल्या सुशि वरून आणि इथल्या कथेवरून तकलादूपणे* का होईना पण सिद्ध होतं, रिअल मेन पुरुषांना करड्या रंगात दाखवत नाही त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी शहरी पुरुषांपर्यंत मर्यादित आहे, निम-शहरी संस्कृतीतून आलेल्या आणि शहरी संस्कृतीत रुजू पाहणाऱ्या आणि त्यामुळे भंजाळलेल्या वाटणार्‍या हा गटाला स्थावर व्हायला वेळ लागणार असं वाटतं.

बाकी कथेतील आशयावर टिका म्हणजे ते लेखकाचं यश समजावं असं वाटलं.

*साहित्य-विद्या अभावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते ठीकच आहे, पण ह्या दोन गोष्टी एका पुरुषात नांदत असल्या, आणि बायको निवडताना आपल्यातला तलमपणा जिला आवडतो अशी निवडली आणि तिच्यासोबत रांगडं वागलं तर संसारात अडचणी येणारच असं वाटून गेलं.

जरं कथा व्यवस्थीत(स्त्रि-पुरुष baised न होता) वाचली तर लक्षात येइल की लग्न दारु नं पिनार्या, तलमपणा असलेल्या,उरफाट्याला क्रुर म्हणनारर्या, बायकोवर भारी जीव असनार्‍या बंटीचं( जोडव्या)मोडत. उरफाट्याच नव्हे उल्टा उरफाट्याला माज आहे त्याचं लग्नं टीकतं हयाचं.
रागड्या संस्कृतीत वाढ्नार्‍यांचे लग्न बरे टीकतात थोर शहरी संस्कृतीपेक्षा आणी बरेचदा लग्नं तुटायची कारणे पण काय तर थातुरमातुरचं.

हे माझं मत नाहीये.
काल-परवाची बातमी आहे लोकसत्तात की पुण्यात नवविवाहीतांना घटस्फोट घ्यायला पण वेळ नाही आणि रोज कुटुंब न्यायालयात किमान १०-१२ घटस्फोटाचे अर्ज दाखल होतात. एक्मेकाना द्याय्ला वेळ नाही, नवरा-बायाकोला एकमेकांची फार गरज उरलेली नाही,लग्नसंस्था मोडीत काढायला पाहीजे हे मुद्दे तरी जरा बरे वाटतात. लग्न 'आयटी'वाल्यांचे जास्ती तुटतात हे पण लक्षात घ्यावे.

तुटणारी लग्ने यासाठी तलमपणा आणि रांगडेपणा हे मुद्दे म्ह्णजे अभ्यासचा फारच अभाव आणि कल्पना दारीद्रच दर्शवते.

तलम गुलज़ार यांच पण लग्न मोडलेलच ते एक असोच.

जाता जाता, आईकडे न जाता गुलज़ारांकडेच राहनारी त्यांची मुलगी मेघना हीने गुलज़ारांवर लिहिलेलं पुस्तक वाचलयं का हे नाही विचारनार. पुस्तकांवर कीती विश्वास ठेवावा हे ज्याचं त्यानीच ठरवावं. नीदान पुस्तकं भारतीय संस्कृतीला धरुन तरी असवी. ते एक असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> लग्न 'आयटी'वाल्यांचे जास्ती तुटतात हे पण लक्षात घ्यावे. <<

दोन वेगवेगळ्या मुद्द्यांचा गोंधळ होतोय असं वाटतं. आय्टीवाल्यांकडे रांगडेपणा नसतो असं नाहीच, तो वेगळा रांगडेपणा असतो आणि त्यामुळे लग्नं तुटतात हे तर मी अनेकदा पाहिलेलं आहे. पण इथे तो मुद्दाच नाही.

>> तलम गुलज़ार यांच पण लग्न मोडलेलच ते एक असोच. <<

मला गुलझार तलम वाटतच नाहीत. इतरांना वाटतात असं मी म्हणतोय. त्यामुळे ह्या मुद्द्यातून माझ्या मते काहीच सिद्ध होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

टेस्टर म्हणजे चुका काढण्यात माहिर असे विनोद, किंवा अमोल पालेकर / गुलझारविषयी प्रेम ह्या गोष्टी बाकीच्या (रांगड्या) संस्कृतीसंदर्भात काहीशा उपऱ्या वाटल्या.

हे (काहिसं कप्पेदार-स्टिरीओटिपिकल) निरिक्षण चिंजंसारख्या व्यक्तीकडून यावं याचं आश्चर्य वाटलं आणि म्हणूनच उत्सुकता वाटली. असं का म्हणावंसं वाटलं? नै कळ्ळे

माझं निरिक्षण असंय की गावातून/निमशहरांतून/लहान शहरांतून आलेल्या मराठी व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये जर एखादा "शहरातला" (अर्थात उतरत्या क्रमाने मुळचा पुण्या-मुंबईतला) मित्र असेल तर त्याच्यासोबत व एरवी आपल्या एक्ल्युझिव्ह गावसोबत्यांच्या ग्रूपपेक्षा वेगळे वागतात. (नी ते स्वाभाविकही आहे. शहरातल्यांच्या/अनेकदा माझ्या वागण्यातला टोकदारपणा/कडकपणा मी आजन्म शहरांत राहुनही मला लगेच जाणवतो, तर त्यामुळे नव्या व्यक्तीच्या वागण्यात त्याने फरक पडणारच) आणि त्यांचं 'तसं' (गावसोबत्यांसोबत वागतात तसं) वागणं पहायला तुमची मैत्री खूप गाढ व्हावी लागते.

तर सांगायची गोष्ट, वरच्या "टॉक"चे मित्र हे बरेच जुने, मुरलेले मित्र वाटतात. तेव्हा त्यांना आयटीतले टिपिकल मुखवटे लागु पडणार नाहित असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निरिक्षण चिंजंसारख्या व्यक्तीकडून यावं याचं आश्चर्य वाटलं +१,

नावात जंतु म्हन्टंल की पुरुष आयडीचं असा माझा एक स्टिरीओटिपिकल मानस Wink

पण प्रतिसादावरुन मला हा एक स्त्रि आयडी असेल अशी शंका आली आणी त्यामुळेच खरतर मी प्रतिसादात "जरं कथा व्यवस्थीत(स्त्रि-पुरुष baised न होता) वाचली असल्यास" असा उल्लेख/आगावुपणा केला. माफी असावी.

पण चिंजं ला भेटल्यावर जंतु म्हन्टंल की पुरुषच याची पुष्टी झाली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> हे (काहिसं कप्पेदार-स्टिरीओटिपिकल) निरिक्षण चिंजंसारख्या व्यक्तीकडून यावं याचं आश्चर्य वाटलं आणि म्हणूनच उत्सुकता वाटली. असं का म्हणावंसं वाटलं? नै कळ्ळे <<

त्यात खरं तर लिखाणाविषयी टिप्पणी होती. म्हणजे पुरुषाला भावुक वगैरे दाखवण्यासाठी त्याला उदाहरणार्थ गुलझार/जगजित सिंग वगैरे आवडतात हे दाखवणं खूप स्टीरिओटिपिकल वाटलं. जर पात्रं वरच्याप्रमाणे जरा वेगळ्या ढंगातली (म्हणजे इथल्या वाचकांना 'हटके' वाटतील अशी) दाखवायची तर त्यापेक्षा वेगळं काही तरी त्यांना भावुक करताना दाखवलं असतं तर लिखाणाची ओरिजिनॅलिटी वाढली असती असा माझा मुद्दा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जाणीवपूर्वक स्टिरिओटिपिकलपणा सोडण्याचा प्रयत्न करणे हाच एक स्टिरिओटाइप होउ शकतो.
किंवा मुद्दाम वेगळे लिहायचे म्हणून तसा प्रयत्न करणे काहीसे कृत्रिम लिखाणाला जन्म देउ शकते.
सहजतेनं जे जसं बनतय ते तसं बनू द्यावं असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> सहजतेनं जे जसं बनतय ते तसं बनू द्यावं असं वाटतं. <<

माझ्या मते लिखाण (किंवा एकंदर निर्मिती) ही प्रक्रियाच सहज नसते. काय सांगायचं आणि कसं सांगायचं ह्याची निवड मुळात लेखकाला करावीच लागते. म्हणजे त्याच्या डोक्यात संपादनाची पहिली पायरी होते. (एखाद्या जबरदस्त लेखकाचा विरळा अपवाद वगळता) आज आपण ज्यांचं साहित्य उत्तम मानतो त्यातल्या बहुतेकांच्या लिखाणावर त्या पहिल्या पायरीनंतर साक्षेपी संपादकांनी केलेल्या सूचना वगैरेंचे परिणाम असतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या पुष्कळशा लिखाणाला वरचं विधान लागू होणार नाही हे इथे लक्षात घ्यायला हवं असं वाटतं. अर्थात, लिखाणातली मूळ ताकद न गमावता ते कसं करता येईल हे पाहण्यात पुष्कळ कौशल्य मात्र असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कश्यप च्या डेव्ह-डी मधील देव चं कॅरेक्ट्र्र बद्द्ल आपलं काय मतं आहे?

लहानपणा पासुनच अति-नालायक,कुणाचाही विचार न करणारा , सेल्फ-सेन्ट्रिक देव अचानक हळवा होउन "कुछ नही हुवा बच्चा मै हु ना" म्हणुन चन्द्रामुखी अर्थात एका वैश्येला बाप जसा मुलीला जवळ घेतो तसा जवळ घेतो. त्याबद्द्ल आपल मतं जाणुन घेउ इछीतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> कश्यप च्या डेव्ह-डी मधील देव चं कॅरेक्ट्र्र बद्द्ल आपलं काय मतं आहे? <<

इथे अवांतर होईल आणि मग संपादक ओरडतील. नंतर कधी तरी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संपादक घेतील चालवून .
कीम्वा "रसग्रहण कसे करावे" वगैरे नावाचा नवीन धागा बनवतील उपचर्चेतून.
नंतर नको.
आताच सांगा बुवा..
.
बाकी " संपादक हे चालवून घेणार नाहित " हे म्हणणं म्हणजे राहुल गांधी ह्यांनी "काँग्रेस हायकमांडला हे चालणार नाही" असं म्हणण्यासारखं आहे.
अरे हाय कमांडमधला तूही एक आहेस भो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुद्दा तसा अवांतर नाहीये/संपादक/ओरडणार पण नाही पण असो.

तसा सुहास शिरवळकर आवडतात काय?, अमोल पालेकर / गुलझारविषयी प्रेम, रांगडी संस्कुती हे मुद्दे पण तसे अवांतरच होते.

विर्दभाच्या रांगड्या संस्कुतीने बरेच कालीदास, भवभुती ,सुरेश भट ( कायम हिंदी बोलणारे पण लाभले आम्हा सोभाग्य बोलतो मराठी लिहीनारे) भुमीपुत्र पण पाहीलेले आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तसा सुहास शिरवळकर आवडतात काय?, अमोल पालेकर / गुलझारविषयी प्रेम, रांगडी संस्कुती हे मुद्दे पण तसे अवांतरच होते.<<

ती लिखाणाविषयीच टिप्पणी करण्याची माझी एक रीत समजा. त्यामुळे ते माझ्याकडून अवांतर नव्हतं. पण ते असो. देव डी मधली केंद्रस्थानची व्यक्तिरेखा ही मला खरं तर खूपच भावुक वाटते. त्या भावुकतेचं काय करायचं हे न समजल्यामुळे किंवा तिचा योग्य निचरा न झाल्यामुळे त्या व्यक्तिरेखेची शोकांतिका होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एका वैश्येला बापासारखं जवळ घेणे हे सोडल्यास देव कुठेही (माय-बापाशी वागतांना,भावशी, पारोशी,चन्द्रमुखीशी कधीही भावुक वागत नाही.
तो एक स्वतः वर प्रेम करणार नार्सीस्ट असतो.

भावुक असणं आणी रीअ‍ॅक्टीव्ह, कोरडं, un-empathetic असनं यात गल्लत होतेय तुमची.

भावुकतेचं नाही "स्वतःला कायम केंद्रस्थानी बघनार्या व्यक्तीच्या 'आत्मकेन्द्री भावणांचा' योग्य निचरा न झाल्यामुळे त्या व्यक्तिरेखेची शोकांतिका होते"
हे वाक्य ठिक आहे.

नार्सीस्ट लोकांना अपमान/टीका सहन होत नाहीत आणी जेव्हा पारो देव ला भेटायला हॉटेलला येते आणी ती देव चा अपमान करते त्यावेळी तो तीला हॉटेलमधुन धक्के मारुन हाकलुन देतो. तुम्च्या सोबत मानसशास्त्रावर बोलायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेश्या. वैश्या नव्हे.
बाकी चालू द्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धन्यवाद. गलती से मिश्टेक Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घेन्न रे बाप्पू करना रे लगीन
आता काऊन करते घीन घीन घीन . ...... येकदम बंडी उलार करून लिवलय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, हात्त बहिन्माय! 'बाप्पू' शब्द टाकाचा र्‍हाउनच गेला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बंडी उलार म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

टांगा पलटी घोडे फरार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टांगा पलटीचं एक्दम बरोबर

फकत विर्दभात बैलगाडी म्हन्जेच बैलबंडी म्ह्नुन शब्दश: बंडी उरावर(अंगावर) अनं बैल फरार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र ! आम्हांला वाटलं की सौरव गांगुलीगत यक्दम बंडी उतरवून लिहिलंय ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ल्हीत र्‍हावा! झकास लिवलंय. आदूबाळास्नीभी गालगुच्चा! (मला वाचताना जरा स्लो झालं. तुम्ही सतत लिहित राहीलात, सवय झाली की सहज वाचता येईल.:))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लिखाण आवडलं. वापरलेली भाषा, लिखाणाचा विषय सर्व काही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.

शैली प्रवाही आहे, ते आवडलं. भाषा वगैरे वेगळी असल्याने तेही आवडलं. थोडं अमरावतीच्या बाजुच्या पण आता आयटीत असलेल्यांच्या गप्पांच्या फडात रमलो आहे, जामच बोलबच्चनगिरी असते, किस्से रंगवून सांगण्याच्या पद्धती अफाट असतात, मुळ गप्पांची सर बर्‍यापैकी येत आहे पण विषय भलताच विषयकारक आहे. विदर्भाकडे 'ळ'चा ड होतो न? इथे तसे जाणवले नाही ते इम्प्रोव्हायजेशन केले आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. ळ चा ड हे. अमरावतीत नाही होत. भंडारा साइड ला होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांतील रांगडेपणा अन कोमलपणा याच्या अंमळ बायनरी (पुस्तकी?) कल्पना रूढ असल्याचे प्रत्यंतर येते आहे. आदूबाळ यांची कमेंट एकदम नेमकी आहे, ती बरेच काही सांगून जाते. बारावीनंतर फर्स्ट ईयरपासून ओळख असणार्‍या मित्रांच्या जाणिवांमध्ये कसकसा बदल होत जातो हे पाहिलं तर यात एवढं आश्चर्य वाटायचं खरं तर काहीच कारण नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुरुषांतील रांगडेपणा अन कोमलपणा याच्या अंमळ बायनरी (पुस्तकी?) कल्पना रूढ असल्याचे प्रत्यंतर येते आहे. +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१. मित्रांच्यात असताना लौकिकार्थानी अत्यंत घाण/अश्लील बोलणारे पण एरवी सुंदर, भावूक कविता करणारे/ त्यांना चाली लावणारे मित्रं आहेत काही. म्हणून मला तरी काही वावगं वाटलं नाही की या वाह्यात मुलांमध्ये गुलजारचे फॅन आहेत. मला वाटतं की एकच माणूस मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये किंवा हपिसात प्रचंड वेगळा असू शकतो. लेख मस्तच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आपल्या चम्याच्या सामानचा जागेवार काजु झाल्ता म्हन्ते..
एकही फेमिनीस्ट बाई फेमिनाइन नस्ते अन एकही फेमिनीस्ट पुरुष मस्क्युलीन असुचं शकत र्‍हाई असं आप्ल पक्कं मतं!
तुम्ही म्हजे हिजाडी जमात, उद्या बाय्काईन म्हन्ट्ल ना तर ऑपरेशन करुन गर्भपीशव्याई बसुन घ्यान तुम्ही, मेट्रोसेक्सुअल साले!
हरामी साल्या, थु तुया तोन्डावर. तुयी बाय्को सोडुन जाइन ना तेव्हा तुले सम्जन दुसर्याच्या भावना अन बायकोची किंमत. ...
एकदिवस याची बाय्को याच्या आंगावर पायतली जोडवी फेकुन निघुन गेली म्हन्ते तेव्हा पासुन माहेरीच. >>>>>>>

इनोदाइनोदातून एकदम सिरियस... भले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम झक्कास! भाषेचा लहेजा मोहवून गेला.

- (मॅन) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुमाल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या बोलीशी ओळख नसल्याने नेहमीच्या वेगात वाचता आले नाही... सावकाश वाचले...
चांगले झालेत संवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले. बोलीशी फारशी जवळीक नसल्याने वाचायला जरा वेळ लागला.
आणखी येऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेट्या बाय्को कशी लठ्ठं आनी मठ्ठं पाह्य्जे.

शी पुरुष असले तारे तोडतात की काय? Biggrin
______
भाषा कळत नाहीये पण वाचणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायको --
कळकट , मळकट कामाला दणकट.

-- दुनियादारी चित्रपट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शी पुरुष असले तारे तोडतात की काय?

हे तर काहीच नाही, पुरुषांचे 'तारांगण' फार फार गहन असते Biggrin

- (तारे तोडणारा) सोकाजी

----------------------------------------------

'शी पुरुष' मध्ये काल्प्निक विरामचिन्ह गृहीत धरले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांचे१ 'तारांगण' फार फार गहन असते

अनंत कोटि ब्रह्मांडे असतात त्यात Wink

शी पुरुष' मध्ये काल्प्निक विरामचिन्ह गृहीत धरले आहे!

अगागागागागागागागागा ROFL धन्य _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अन त्यातल्या एकेका ब्रह्मांडावर कोटी कोटी कोट्या होऊ शकण्याचं पोटेन्शिअल असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी!

(कोटिभास्करपदाकांक्षी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं