मोहेंजो-दारो साठी मृत्यू घंटा

तत्कालीन भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या पश्चिम मंडलाचे प्रमुख पुरातत्त्व अधिकारी कै. पी.डी बॅनर्जी यांनी सिंध मधील आणि सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका जागी, 1922 मध्ये उत्खनन करण्याचा जेंव्हा निर्णय घेतला तेंव्हा त्यांना त्या जागी बहुधा कुशाण कालीन बौद्ध स्तूप आणि मठाचे पुरातन अवशेष सापडतील एवढीच अपेक्षा होती. सिंध मधील एका वैराण अशा कोपर्‍यात असलेली ही जागा कराची बंदरापासून सुमारे 425 किमी एवढ्या अंतरावर होती. या जागी असलेल्या मातीच्या ढिगार्‍याखाली एक पुरातन बौद्ध स्तूप आहे याची साधारण कल्पना पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना असल्याने प्रत्यक्षात 1923 साली त्यांनी हा स्तूप ज्या जागेवर असेल असे वाटत होते त्याच्या बाजूंनी उत्खनन करण्यास सुरूवात केली. या पुरातन स्तूपाचे बांधकाम मातीच्या भाजलेल्या विटांनी केलेले होते व तो आजूबाजूच्या सपाट जमिनीपासून किमान 70 फूट तरी उंच असल्याचे या शास्त्रज्ञांना आढळून आले होते. कै. बॅनर्जी यांच्या अपेक्षेप्रमाणे स्तूपाभोवतीच्या चौरस आवाराच्या बाहेर त्यांना सर्व बाजूंना मिळून, बौद्ध भिख्खूंसाठी बांधलेले एकूण 30 निवास कक्ष तेथे आढळले होते. या निवासकक्षांचा काल कोणता असावा? याचा स्पष्ट पुरावा, पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात होऊन गेलेला कुशाण राजा वासुदेव याच्या कालातील नाणी, एका पुरातन निवास कक्षात सापडल्याने मिळाला होता. कै. बॅनर्जी यांचे उत्खननात सापडलेल्या या गोष्टींमुळे समाधान न झाल्याने त्यांनी मातीच्या ढिगार्‍याच्या चहोबाजूंनी आणखी खोल असा चर खणण्यासाठी सूचना आपल्या सहकार्‍यांना दिल्या. खाली खणत असताना उत्तरेला असलेल्या हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या व चित्रलिपी मधील मजकूर ठसवलेल्या सील्स सारखे दिसणारे एक मातीचे सील प्रथम तेथे सापडले. यानंतर तेथे या प्रकारची आणखी 2 सील्स सापडली. सील्सच्या या शोधानंतरही, इतिहास पूर्व कालातील या सील्सचे असाधारण महत्त्व, कै. बॅनर्जी व त्यांचे सहकारी यांच्या पूर्णपणे लक्षात आले होते असे म्हणता येणार नाही.

मात्र पुरातत्त्व खात्याचे तकालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांना बॅनर्जी उत्खनन करता असलेल्या जागेवर सापडलेली सील्स आणि या आधी शोध लागलेल्या हडप्पा येथील इतिहास पूर्व कालीन जागेवरच्या उत्खननात सापडलेली सील्स यांच्या मधील साधर्म्य लगेच लक्षात आले आणि ते अशा निष्कर्षाप्रत आले की या दोन्ही जागी केलेल्या उत्खननात सापडलेले भग्नावशेष हे आजवर अज्ञात असलेल्या आणि आता नवीनच सापडलेल्या एका प्राचीन संस्कृतीचे आहेत. त्यांनी आपला शोध लगेचच इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या नियतकालिकात प्रसिद्ध केला आणि जगाला किमान 4000 वर्षे पुरातन असलेल्या या प्राचीन संस्कृतीची प्रथम ओळख झाली. या नंतर या जागी केलेल्या उत्खननात, सध्या मोहेंजो-दारो या नावाने ओळखले जाणारे, एक विशाल शहर येथे अस्तित्वात होते असे आढळून आले. भारताच्या 1947 मधील फाळणीनंतर ही इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थळ पाकिस्तानात गेले आणि आता या स्थळाची निगराणी आता पाकिस्तानचा पुरातत्त्व विभाग करत असतो. या स्थळाचा समावेश आता यूनेस्कोने आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला आहे आणि या स्थळाला “outstanding universal value” असलेले स्थळ असा दर्जा दिलेला आहे.

मोहेंजो-दारो भग्नावशेष हे सिंधू नदीच्या पात्राच्या अगदी लगत सापडलेले आहेत हे आपण वर बघितलेच आहे. गेल्या शेकडो वर्षात या नदीला सतत येणार्‍या पूरांमुळे या भागातील भूजल पातळी ही सतत वर वर येत राहिलेली आहे. यामुळे येथील जमिनीत असलेले खारवट क्षारांचे प्रमाण वाढत राहिलेले आहे. याचा एक दुष्परिणाम म्हणजे मोहेंजो-दारो येथील भग्नावशेषांखालील माती ढिसूळ होते आहे व त्यांना धोका निर्माण झाला आहे. 1970 मध्ये यूनेस्कोने या विषयासंबंधी एक मोहीम आंतर्राष्ट्रीय पातळीवर हाती घेतली होती. या मोहिमेमुळे मुख्यत्वे विटांचे बांधकाम असलेल्या या इतिहास पूर्व कालीन भग्नावशेषांची होणारी हानी काही प्रमाणात का होईना! थोपवण्यात यश आले आहे. या बाबत यूनेस्कोच्या वेब साइट्वर खाली दिलेला उल्लेख सापडतो.

” या ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या स्थळाची, त्याच्या परिसरात आढळून येणार्‍या, सिंधू नदीला नेहमी येणारे पूर, सतत वर येत राहणार्‍या भूजल पातळीमुळे जमिनीत वाढलेले खारट क्षारांचे प्रमाण आणि परिसरात साठलेल्या पाण्याचा निचरा न होणे, या सारख्या पर्यावरणास हानिकारक अशा बाबींमुळे आणि येथील अतिशय विषम हवामान यामुळे सतत हानी होत असल्याचे आढळून येते आहे. पाकिस्तानी सरकारने 1974 मध्ये याबाबत यूनेस्कोला केलेल्या विनंती नंतर यूनेस्कोने मोहेंजो-दारो वाचवण्यासाठी एक आंतर्राष्ट्रीय मोहीम हातात घेतली होती. या मोहिमेचे कार्य 1997 पर्यंत चालू होते. या मोहिमेच्या अंतर्गत 23 मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च करून हे स्थळ वाचवण्यासाठी, नदीच्या पुराचे पाणी आत न येऊ देण्यासाठी बंधारे, भूजल पातळी वर येऊ न देण्यासाठीचे उपाय, स्थानिक व्यवस्थापनाला या पद्धतीचे उपाय सतत चालू ठेवता येतील यासाठी त्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि या स्थळाचे संवर्धन व त्यावर सतत लक्ष ठेवणे यासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा या सारखे कार्यक्रम हातात घेण्यात आले होते.

मोहेंजो-दारो आंतर्राष्ट्रीय संवर्धन व बचाव समितीचे कार्य कार्य 1997 मध्ये संपल्यानंतर यूनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा व जागतिक वारसा केंद्राने या स्थळाच्या स्थानिक व्यवस्थापनाला सहकार्य देऊ केले होते व 2004 या वर्षापर्यंत काय पद्धतीने संवर्धन कार्य चालू ठेवता येईल या बद्दल सूचना दिल्या होत्या. या सूचनांत स्थानिक व्यवस्थापनाची यंत्रणा, संवर्धन आणि निगराणी, शिक्षण आणि कार्यक्षमता वर्धापन, पर्यटन केंद्र म्हणून विकास अशा विषयांमधील सूचनांचा समावेश होता. सध्या पर्यंत एकूण व्यवस्थापन, संवर्धन आणि पुरातन कालात बांधलेल्या भिंती व बांधकामे यांची सद्यःस्थिती टिकवून ठेवणे, संवर्धन कार्याचे राष्ट्रीय पातळीवर शिक्षण आणि प्रत्यक्ष स्थळावर असलेले व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्या कामाचा दर्जा सुधारणे या सारख्या कार्यांना मदत दिली जात आहे.”

मोहेंजो-दारो येथील मुख्यत्वे विटांचे बांधकाम असलेल्या या इतिहास पूर्व कालीन भग्नावशेषांची स्थिती आता किती नाजूक बनली आहे याची चांगलीच कल्पना वरील अहवालावरून आल्याशिवाय रहात नाही. या भग्नावशेषांचे सतत संवर्धन जर केले नाही तर भारतीय उपखंडातील हा सर्वात महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा काळाच्या ओघात नष्ट झाल्यावाचून राहणार नाही हे दिसून येते आहे. पाकिस्तान मधील एक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. आसमा इब्राहिम असे म्हणतात की ज्या पद्धतीने या स्थळाची हानी होताना दिसते आहे ती बघता पुढच्या 20 वर्षात हे स्थळ नष्ट होईल अशी भिती वाटते आहे. दुर्दैवाने पाकिस्तान मधील राजकारण्यांना मोहेंजो-दारो भग्नावशेषांची स्थिती किती नाजूक बनली आहे याची कल्पना सुद्धा बहुतेक नसावी असे त्यांनी पुरस्कृत केलेल्या व दोन आठवडे चालणार्‍या एका सांस्कृतिक महोत्सवावरून वाटते आहे. पाकिस्तानच्या सांस्कृतिक वारशाची लोकांना ओळख व्हावी म्हणून हा महोत्सव आखण्यात आलेला असून तो मोहेंजो-दारो मधील भग्नावशेषांच्या अगदी लगतच उभारलेल्या एका भव्य मंचावर सादर केला जाणार आहे. पाकिस्तान मधील ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी‘ने श्री बिलावल-भुट्टो-झरदारी यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे उद्घाटन एका भव्य समारंभाने 1 फेब्रुवारी 2013 या दिवशी केले गेले.

हा महोत्सवाचे आयोजन करणार्‍यांचे असे म्हणणे आहे की या महोत्सवाद्वारे सिंध प्रांताची वैशिष्ट्यपूर्ण असलेली संस्कृती सर्व जगासमोर येईल आणि त्यायोगे या संस्कृतीचा वारसा टिकून राहण्यास मदत होईल. मात्र पहिल्या दिवशीच्या उद्घाटन समारंभामध्ये लेसर शो, फॅशन शो आणि ऐनी खलीद या लोकप्रिय पॉप गायकाचे गायन यासारखे कार्यक्रमच सादर केले गेले. या सर्व कार्यक्रमांचा परंपरागत सिंधी संस्कृतीशी दूरान्वयानेही संबंध लावणे शक्य नव्हते. पाकिस्तान मध्ये पुरातन स्थळांची निगराणी आणि संवर्धन यासाठी अनेक कायदेकानून केलेले आहेत. यामध्ये 1975 मधील पुरातत्त्व कायदा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या कायद्यातील तरतुदींप्रमाणे असा कोणताही महोत्सव साजरा करण्यापूर्वी त्याचा कोणत्याही संरक्षित पुरातन स्थळांवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही ना? याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक मानले आहे. मात्र मोहेंजो-दारो महोत्सवाआधी असा कोणताही अभ्यास महोत्सवाचे आयोजन करणार्‍यांनी केलेला नव्हता. त्यामुळेच हा महोत्सव म्हणजे मोहेंजो-दारो साठी वाजवलेली भय-सूचक घंटा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

मोहेंजो-दारो मधील उत्खननात मिळालेल्या दोन अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या वस्तू दिल्ली मधील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शनात मांडलेल्या आहेत. यापैकी एक, इ.स.पूर्व 2500 मध्ये बनवलेला एका नर्तकीचा 10.8 सेमी. उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे धर्मगुरू-राजाचा चिनी माती मधे बनवलेला एक मुखवटा आहे. पाकिस्तानी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे या दोन्ही वस्तू सर मॉर्टिमर व्हीलर या एका ब्रिटिश पुरातत्त्व अधिकाऱ्याने 1946 मध्ये दिल्लीला एका प्रदर्शनात मांडण्यासाठी म्हणून नेल्या होत्या. फाळणीनंतर पाकिस्तानने या दोन्ही वस्तू परत केल्या जाव्यात अशी मागणी केली होती असेही हे अधिकारी सांगतात. परंतु या वस्तू भारत परत करील याचे सूतराम शक्यताही मला तरी वाटत नाही.

या वस्तू परत करण्याचे कोणतीही नैतिक किंवा कायदेशीर बंधन भारतावर दोन कारणांसाठी नसल्याचे मला तरी वाटते आहे. प्रथम कारण म्हणजे सर मॉर्टिमर व्हीलर यांनी जर 1946 मध्ये या वस्तू खरोखरच दिल्लीला नेलेल्या असल्या तर या वस्तूंचे त्यांचे नेणे हे अपहरण केलेल्या वस्तू एका देशातून दुसर्‍या देशात (सिंधमधून दिल्लीला) नेल्या प्रमाणे होते असे म्हणणे शक्य होत नाही कारण हे दोन्ही प्रांत एकाच देशामधील दोन स्थाने त्या वेळी होती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या वस्तू जर 1946 मध्ये हलवलेल्या असल्या तर 1970 मधील यूनेस्को कनव्हेंशन प्रमाणे त्या वस्तू पाकिस्तानला परत करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन भारतावर येऊ शकत नाही. या कनव्हेंशन प्रमाणे एखादी अशी वस्तू 1970 नंतर जर निर्यात परवान्याच्या शिवाय हलवली गेलेली असली तर मात्र ती परत करण्याचे बंधन ज्या देशात ती वस्तू आहे त्या देशावर येते. या कारणांमुळेच भारत या वस्तू पाकिस्तानला देण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.

हा वाद-विवाद बाजूला ठेवून आपण अशी आशा करुया की भविष्यकाळात तरी पाकिस्तान सरकार हा महोत्सव मोहेंजो-दारो अवशेषांच्या लगत साजरा करण्यास परवानगी नाकारेल व हा महोत्सव या अवशेषांपासून काही किमी लांबवर असलेल्या एखाद्या स्थानी आयोजित केला जाईल व भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाच्या पुरातन संस्कृतिच्या या वारशाचे संरक्षण करण्यास पाकिस्तान सरकार हातभार लावील.

(लेखातील चित्रे द एक्सप्रेस ट्रिब्यून मधून घेतलेली आहेत व ती या वृत्तपत्राच्या कॉपीराइटची असू शकतात.)

17 फेब्रुवारी 2014

माझ्या मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

ती महोत्सवाची बातमी वाचली होती. तुम्ही म्हणताय तेच मलाही वाटलं होतं.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोरंजक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ह्यातील रंजनमूल्याबद्दल अधिक सांगितलत तर आभारी राहिन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

परंपरागत सिंधी संस्कृती आणि हरप्पा/मोहेंजोदारो संस्कृतीत काही साम्य आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हडप्पा संस्कृती आणि अगदी आजची भारतीय संस्कृती यात सुद्धा कितीतरी साम्यस्थळे मिळतात. (येथे मी संस्कृती या शब्दाचा अर्थ पु.लं नी सांगितल्याप्रमाणे "वागण्याची तर्‍हा" असा घेतो आहे) नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाला दिलेली एखादी भेट सुद्धा यासाठी पुरेशी आहे. स्वैपाकाची भांडी, स्त्रियांचे अलंकार अशी अनेक उदाहरणे देता येतात. माझे तर अगदी स्पष्ट मत बनले आहे की भारतीय संस्कृती ही हडप्पा आणि त्या आधी इतरत्र भारतात अस्तित्वात असलेल्या लोकांच्या वागण्याची तर्‍हा यांच्या मिलाफातूनच बनलेली आहे. सध्याचे शंकर आणि देवीमाता या देवांच्या कल्पना हडप्पा कालीन स्त्रीफलोधारणाशक्तीची देवी (मदर गॉडेस) आणि पुरुष लिंग पूजन या संकल्पांतूनच निर्माण झालेले आहेत. सिंधी संस्कृती भारतीय संस्कृतीपेक्षा फारशी भिन्न नसल्याने हे साम्य अर्थातच त्यालाही लागू होतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाब चिंताजनक आहे हे निश्चितच पण त्याबरोबर ईश्वराचे आभार ह्यासाठीहि मानावेसे वाटतात की पाकिस्तानात हे संभाळण्याजोगे अवशेष आहेत अशी काही लोकांना तरी जाणीव आहे.

माझ्या समजुतीनुसार पाकिस्तानचा सध्या सर्वसंमत असलेला इतिहास पैगंबरापासून सुरू होतो आणि घोरी-बाबर अशी वळणे घेत इक्बाल-कायदे आझम येथपर्यंत येतो. अन्य वारशांना त्यात स्थान नाही. अरबी संबंधाचे गोडवे ज्यात गायले जात नाहीत असा कोणताहि अन्य संबंध मानला जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पाकिस्तानचा सध्या सर्वसंमत असलेला इतिहास पैगंबरापासून सुरू होतो आणि घोरी-बाबर अशी वळणे घेत इक्बाल-कायदे आझम येथपर्यंत येतो.

ही खरोखरची परिस्थिती आहे की अशी समजूत आहे? नाही मला जेन्युइन शंका आहे. म्हणजे त्याची लीगसी अमान्य करणे एकवेळ समजू शकतो. पण पैगंबराच्या आधी जग अस्तित्वातच नव्हते असे तर शिकवत नसावेत. फार तर गोरीच्या आधी लोक अडाणी काफिर होते आणि मूर्तिपूजा वगैरे करत असत असं शिकवलं जाऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

येथील हा उतारा पहा

In a 1995 paper published in the International Journal of Middle East Studies, historian Ayesha Jalal stated that "Pakistan's history textbooks amongst the best available sources for assessing the nexus between power and bigotry in creative imaginings of a national past." She points out authors whose "expansive pan-Islamic imaginings" detect the beginnings of Pakistan in the birth of Islam on the Arabian peninsula. A Text Book of Pakistan Studies claims that Pakistan "came to be established for the first time when the Arabs under Mohammad bin Qasim occupied Sindh and Multan'; by the thirteenth century 'Pakistan had spread to include the whole of Northern India and Bengal' and then under the Khiljis, Pakistan moved further south-ward to include a greater part of Central India and the Deccan'. [...] The spirit of Pakistan asserted itself', and under Aurangzeb the 'Pakistan spirit gathered in strength'; his death 'weakened the Pakistan spirit'." Jalal points out that even an acclaimed scholar like Jameel Jalibi questions the validity of a national history that seeks to "claim Pakistan's pre-Islamic past" in an attempt to compete with India's historic antiquity. K. Ali's two volume history designed for BA students traces the pre-history of the 'Indo-Pakistan' subcontinent to the Paleolithic Age and consistently refers to the post-1947 frontiers of Pakistan while discussing the Dravidians and the Aryans.

उतार्‍यातील लक्षणीय मुद्दे: १)अरबस्तानात इस्लामचा उदय झाल्यापासून पाकिस्तानचे मूळ रोवले गेले. २)मोहम्मद-बिन-कासिमपासून पाकिस्तान अस्तित्वात आला. ३) खिलजी काळामध्ये पाकिस्तान अधिक वाढून उत्तर हिंदुस्तान आणि बंगाल व्यापला गेला. ४) औरंगजेबाच्या राजवटीत त्याची वृद्धि झाली पण त्याच्या मृत्यूनंतर त्याचा काही र्‍हास झाला.

ह्यामध्ये मोहंजोदारो कोठेच नाही, तक्षशिलेचा पाणिनि दूरच राहिला! पाकिस्तानची इस्लाम-पूर्व मुळे शोधणार्‍यांच्या पदरी टीकाच येते.

आता तुमचा प्रश्न - <पण पैगंबराच्या आधी जग अस्तित्वातच नव्हते असे तर शिकवत नसावेत.>

अगदी इतक्या टोकाला ते जात नाहीत (for which thanks be!)पण पैगंबरापूर्वीहि काही लक्षणीय आणि अभ्यसनीय होते ह्याची पुसटशीहि शंका ते येऊ देत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे थोडेसे मराठी लोकांसारखेच झाले. 'आपला' इतिहास शिवाजी महाराजांपासून सुरु होतो आणि संपतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मा. संपादक,
वरच्या प्रतिसादातला (मा. कोल्हटकर यांच्या) दुवा गंडलाय असे दिसते. तो कृपया दुरुस्त करणार का? मूळ लेखन वाचायची इच्छा आहे.
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण पैगंबराच्या आधी जग अस्तित्वातच नव्हते असे तर शिकवत नसावेत.

नाही. पण पूर्ण अनुल्लेखाने मारून तोच इफेक्ट साधता येतोच.

फार तर गोरीच्या आधी लोक अडाणी काफिर होते आणि मूर्तिपूजा वगैरे करत असत असं शिकवलं जाऊ शकेल.

तेही नाही शिकवले, किंवा केवळ उडतउडत उल्लेख केला, तर घोरी/बिन-कासिम/मुहम्मद/जो कोणी तात्कालिक उत्सवमूर्ती असेल तो, त्यास ऑपॉप बिगब्यांगत्व प्राप्त होते. (व्हॉट यू डू नॉट नो अबौट, प्र्याक्टिकली डझ नॉट एक्झिष्ट, अ‍ॅण्ड नेव्हर एक्झिष्टेड तत्त्वाने.)

नाही म्हणायला, दाहिर नावाचा एक वैट्ट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!! दुष्ष्ष्ष्ट!!!!!! राजा असतो, त्याचा ओझरता उल्लेख होतो म्हणतात. (सिंधचा शेवटचा हिंदू राजा. याचा पराभव करून मुहम्मद बिन कासिमने तिथे धर्मसत्ता प्रस्थापित केली होती म्हणे. पाकिस्तानचा जन्म तेव्हाचा, असे आजकाल तिथे शिकवले जाते. किंबहुना, झिया उल हकच्या कारकीर्दीत तिथल्या अभ्यासक्रमाचे तथाकथित 'इस्लामीकरण' पद्धतशीरपणे व्हायला सुरुवात झाली, तेव्हापासून त्याआधीच्या सर्व उल्लेखांचे उच्चाटन होऊ लागले असून, 'आपण' - बोले तो पाकिस्तानच्या भूभागाचे आजचे रहिवासी - हे अरबांचे वंशज आहोत, इथपर्यंत काय वाट्टेल ते शिकवले जाते म्हणे. म्हणजे, झियापूर्व काळातील लोकांना दाहिर, झालेच तर पाकिस्तानचा प्राचीन/बिनकासिमपूर्व इतिहास, यांची थोडीफार कल्पना तरी असायची; आजकालच्या मुलांना तीही नसते.)

अवांतर: या गाण्याच्या चित्रफितीचा जरूर आस्वाद घ्या. एन्जॉय!

"देखो यह है सिंध, यहाँ ज़ालिम दाहिर का टोला था
यही मुहम्मद बिन-क़ासिम अल्लाह-ओ-अकबर बोला था
टूटी हुई तलवारों में क्या बिजली थी, क्या शोला था
गिनती के कुछ ग़ाज़ी थे, लाखों का लष्कर तोला था

इथल्या कणाकणातुनि आता सत्ता आहे धर्माची
याच्यासाठी अम्हीं दिली आहुती लाखो प्राणांची!
पाकिस्तान विजयी भव! पाकिस्तान विजयी भव!!!"

===================================================================================================

डिस्क्लेमर:

प्रस्तुत माहितीच्या तुकड्यांचा स्रोत हा कोठलेही हिंदुत्ववादी संकेतस्थळ वा प्रकाशन नसून, खुद्द पाकिस्तानातील वर्तमानपत्रांतून / पाकिस्तानी (खाजगी) माध्यमांतून (झियापूर्व काळात वाढलेली) जुनी आणि जाणती, लिबरल मंडळी वेळोवेळी बोंबलून बोंबलून देत असतात (लिबरल इकडूनतिकडून सगळे सारखेच! चालायचेच.), त्याआधारे प्रस्तुत माहिती (समजली आणि आठवली तशी) येथे मांडली आहे. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल धन्यवाद.

प्रांतिक इतिहासात काय शिकवतात?

उदा पंजाबच्या इतिहासात रणजितसिंग नामक दुष्टाचे राज्य मधल्या काळात येऊन गेले असे सांगतात की कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाकिस्तानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व्यक्तिशः केलेला नसल्याने, अथवा, पाकिस्तानी माध्यमांतून आजवर या विशिष्ट मुद्द्याबद्दल काही माहिती न मिळाल्याने (अथवा, आली असल्यास, ती माझ्या नजरेतून सुटलेली असल्याने), याविषयी कल्पना नाही. शिवाय, पाकिस्तानी माध्यमांतील व्यक्तिमत्त्वांशी दुर्दैवाने माझा काहीही संपर्क अथवा पत्रव्यवहार नसल्याकारणाने, याबद्दल ऑन डिमांड माहिती मिळवणेही दुर्दैवाने माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. माध्यमांतून मिळतील ती ज्ञानमौक्तिके भ्रमरवृत्तीने वेचणे, एवढेच मी करू शकतो, आणि आजवर करत आलेलो आहे. तरी, अशी काही माहिती यापुढे उपलब्ध झाल्यास त्याकरिता जरूर लक्ष ठेवीन आणि शक्य झाल्यास (अशी काही माहिती मिळाल्यास ती) येथे मांडीनही. (नौ द्याट यू हॅव ब्रोच्ड द टॉपिक, माझेही कुतूहल चाळवले आहे.)

मात्र, याबद्दल उपलब्ध प्रत्यक्ष माहितीअभावीसुद्धा काही शक्यता वर्तवता येतात. (अर्थात, प्रत्यक्ष माहिती उपलब्ध झाल्यास / झाल्यावर त्या पडताळून त्यांना पुष्टी देता येते अथवा त्या खारिज करता येतातच. मात्र, सध्या जी माहिती उपलब्ध होते, त्यातील एकंदर ट्रेंड पाहता काही तर्क, एवढेच; याहून अधिक माहिती उपलब्ध होईपर्यंत या विशिष्ट तर्कांस तूर्तास याहून अधिक गंभीरपणे घेऊ नये.)

- "रणजीतसिंह कोण?" असा प्रश्न विचारता येणे हे शक्यतेच्या परिघाबाहेरील (अथवा अवैधही) नसावे.

- पंजाबच्या इतिहासात एक कोणीतरी रणजीतसिंह होऊन गेला, असा उल्लेख कर्सरिली करून मामला तेथेच सोडून देता येऊ शकतो.

- उपरोल्लेखित रणजीतसिंह हा वै.! वै.!! वै.!!! वै.!!!! वै.!!!!! दु.!!!!!! दाखवलाच पाहिजे, असेही नाही. अर्थात, काही करून जर तो तसा दाखवता आला, तर ते सोन्याहूनही पिवळे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्याकडच्या शालेय पाठ्यपुस्तकांत नाही का, 'महाराष्ट्राच्या इतिहासा'खाली छत्रपती शिवाजीमहाराज आणि पेशवे यांच्या इतिहासावर विशेष भर असायचा. बाकी, भारताच्या प्राचीन इतिहासात सिंधुसंस्कृतीपासून ते मौर्य काय, हर्षवर्धन काय, झालेच तर सातवाहन काय, रामदेवराय काय, कृष्णदेवराय काय, खरे तर बरेच कोणकोण, रादर सर्वच असायचे, पण ते अशा पद्धतीने शिकवले (रादर गुंडाळले) जायचे, की त्यांपैकी रामदेवराय नि सातवाहन या मंडळींचा महाराष्ट्राशी काही संबंध होता, याची मला परवापरवापर्यंत१अ पुसटशीही कल्पना नव्हती.१ब

सांगण्याचा मतलब, फारशा तपशिलांत न जाता, केवळ वरवर उल्लेख करून भल्याभल्या गोष्टी ऑब्लिटरेट करणे सहज शक्य असावे.१क (आफ्टर ऑल, व्हॉट यू डू नॉट नो अबौट, डझ नॉट, अँड डिड नॉट, एक्झिष्ट, अँड इफ एव्हर अ मेन्शन टू इट वॉज़ मेड, इट एक्झिष्टेड ओन्ली इन द्याट पर्सन्स फर्टाइल इम्याजिनेशन.)

१अ अवांतर: आजमितीस माझे वय अठ्ठेचाळीस आहे.

१ब शिवाय, तक्षशिला आणि नालंदा ही विद्यापीठे कांदिवली-बोरिवली अथवा पिंपरी-चिंचवडसारखी एकमेकांशेजारच्या उपनगरांत वसलेली होती, अशीही काही गोड गैरधारणा होती.

१क अर्थात, रामदेवराय आणि सातवाहन यांच्या स्मृती जाणूनबुजून ऑब्लिटरेट करणे हा माझ्या समकालीन महाराष्ट्र शासनाचा हेतू होता, असा माझा दावा नाही; परंतु, इथे 'नेव्हर अट्रिब्यूट टू म्यालिस द्याट विच क्यान बी अडिक्वेटली एक्स्प्लेन्ड बाय इन्कॉम्पीटन्स अलोन' (हॅन्लनसाहेबाची - हा जो कोणी असेल तो - क्षमा मागून), हा वस्तरा कामी येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(जरी माझा प्रश्न स्पेसिफिकली आपणास नसून जेनाराल* सर्वांसाठी होता तरी) सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

*जेनाराल = जनरल

अवांतर - तक्षशीला-नालंदा ही विद्यापीठे शेजार-शेजारच्या उपनगरात असण्याची बरीच शक्यता असल्याचे (इतिहास-पुनर्लेखक) पंतप्रधान पदेच्छुक महोदयांच्या बोलण्यावरूनही दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'जेनारेल'.

बाकी चालू द्या.

-------------------------------------------------------------------------------------------------

अवांतर - तक्षशीला-नालंदा ही विद्यापीठे शेजार-शेजारच्या उपनगरात असण्याची बरीच शक्यता असल्याचे (इतिहास-पुनर्लेखक) पंतप्रधान पदेच्छुक महोदयांच्या बोलण्यावरूनही दिसते.

अतिअवांतर: म्हणजे नेमके कुठले? तूर्तास दोन आहेत, असे उडतउडत कळते, म्हणून विचारले. अर्थात, भारतातील चालू राजकीय परिस्थितीबद्दल तूर्तास फारसा अभ्यास नसल्याकारणाने, दोघांच्या तुलनात्मक इतिहासपुनर्लेखनक्षमतेबाबत दुर्दैवाने कल्पना नाही. पैकी एकजण भगतसिंहांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात करतात, असे खात्रीलायकरीत्या कळते. दुसर्‍या महोदयांबद्दल कल्पना नाही, परंतु त्यांच्या दिवंगत तीर्थरूपांचे (ईमृशांदे) सुप्रसिद्ध इतिहाससंशोधन अजूनही लक्षात आहे, त्यामुळे 'लाइक फादर, लाइक सन' या वाक्प्रचारात जर का काही तथ्य असेल, तर आशेचे किरण, टू कॉइन अ न्यू फ्रेज़, डोळ्यांसमोर तारे चमकवून जातात. असो.

-------------------------------------------------------------------------------------------------

'इन द गूड ओल्ड डेज़ ऑफ रामराज्या, व्हेन हिंदूज़, मुस्लिम्स, सिक्ख्स अँड ख्रिश्चस यूज़्ड टू लिव टुगेदर इन पीस अँड हार्मनी...'

की म्हणीत? माझा नेहमी गोंधळ होतो. असो; चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ संपादक,
या टीपा अन तळटीपा देऊ देऊ लिवलेल्या पर्तिसादास्नी किचकट अशी श्रेणी द्याची सोय करा ब्वा. मोबाईलवर वर खाली करू करू जीव जातो वाचतानी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जर तळटीपावाला प्रतिसाद मी मोबाइलवरून लिहू शकतो, , तर तो मोबाइलवर वाचायला तुम्हालाच इतके कष्ट का पडावेत?

-------------------------------------------------------------------------------------------------------

एकदा ते सुपरस्क्रिप्ट अँड्रॉइडवरून१अ लिहून पहा, म्हणजे कळेल.

१अ जाहिरात: माझ्याकडे अँड्रॉइड आहे.

हौसेला मोल नसते, हेच खरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ हौसेला मोल नसते, हेच खरे!
<<
अशी कशी मेली किचकट्ट हौस Wink
*
एकाचा खेळ होतो दुसर्‍याचा जीव जातो. अशीही एक म्हण आहे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

(काहीसे अवांतर आहे, पण...) एक रोचक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0