बंडू नि दिगु समाजसेवा करतात

बंडू थोर समाजसेवक बाळू भुरकूटे ह्यांचे आत्माचरित्र वाचत होता. त्याचे डोळे भरून आले होते लेखकाला आपल्या वयाच्या तिसऱ्या वर्षीपासूनच्या घटना आठवत होत्या नि आपल्याला मात्र काल खाल्लेली भाजी आज आठवत नाही ह्याचे बंडूला वैषम्य वाटले .

समाजसेवक भुरकूटे हे त्यांच्या आत्मचरित्रात वयाच्या तिसर्या वर्षी घडलेल्या घटनाही तंतोतंत वर्णन करून लिहित होते हे वाचून बंडूचा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. हेच खरे समाजसेवकाचे लक्षण असे म्हणून त्याने मनोमन त्यांना नमस्कार केला. आत्मचरित्रात लेखकाने वयाच्या सातव्या वर्षातील एक घटना नमूद केली होती. समाजसेवक बनता येत नाही तर जन्मावा लागतो जसे माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे समाजसेवकालाही समाजसेवा कशी करायची हे शिकवावे लागत नाही.

भुरकूटे सात वर्षाचे असताना एका दुपारच्या वेळी जेवायला बसले असताना दारात एक भिकारी येतो काहीतरी वाढा हो कालपासून उपाशी आहे भिकारी केविलवाण्या स्वरात सांगतो भिकाऱ्याचा तो आर्त स्वर एकूण बाल भुरकूटे पानाहून उठतात नि आपले ताट नेवून त्या भिकाऱ्याला नेवून देतात. भिकारी हा तन्दरुस्त असतो आपल्या सारख्या लहानग्याच्या जेवणाने त्याचे काय होणार हे जाणून बाल भुरकूटे आपल्या वडिलांचे ताटहि त्या भिकाऱ्याला नेवून देतात. वडील येतात आपले वाढलेले ताट कुठे गेले ह्याचा आश्चर्याने शोध घेवू लागतात त्यांचे दाराकडे लक्ष जाते भिकारी मजेत त्यांच्या ताटात जेवत बसलेला असतो . ह्या नंतर वडिलांकडून अनेक हिंसक घटना घडतात त्या हिंसक घटनांनी तीन पाने व्यापली होती.

बंडूला त्या आत्म चरित्रातील आवडलेले आणखी एक प्रकरण म्हणजे ‘मी आणि माझे आजोबा’ हे प्रकरण ह्यातील एक प्रसंग बंडूला अतिशय आवडला .बाल समाजसेवक भुरकूटे ह्यांचे आजोबा हे झोपलेले असतात बाल भुरकूटे हे उन्हातानात भटकणाऱ्या एका फेरीवाल्याला बघतात नि त्यांना त्याची दया येते ते त्याला आपल्या घरी बोलावून उन्हापासून त्याचा बचाव व्हावा म्हणून आजोबांची जरीची टोपी त्याला देतात. फेरीवाला कृतकृत्य होतो त्याची तुटलेली चप्पल बघून भुरकूटे त्याला आजोबांची नवी कोरी कोल्हापुरी चप्पल हि देतो. नंतर झोपेतून उठल्यावर झाला प्रसंग आजोबांना कळल्यानंतर आजोबा जे काही तांडव नृत्य करतात ते पाहून एखाद्याने समाज सेवेचा विचार मनातून काढून टाकला असता पण भुरकूटे ते भुरकूटेच त्यांच्या मध्ये भावी समाज सेवक दडला होता त्याची हि चुणुकच होती.

बंडू हे आत्मचरित्र अतिशय तन्मयतेने वाचत होता इतक्यात त्याचा प्रिय मित्र दिगु ह्याचे आगमन झाले बंडूचा भारावलेला चेहरा पाहून दिगुने विचारले ‘काय रे बंडू काय झाले? बंडू म्हणाला,’आपले जीवन व्यर्थ आहेर रे दिग्या मी आताच थोर समाजसेवक बाळू भुरकूटे ह्यांचे आत्म चरित्र वाचत होतो. खरा समाजसेवक तो. नि आपण सामान्य माणसे. ते काही नाही आपण पण आपल्या परीने समाजसेवा करायची.’ ‘तू म्हणतो त्यात तथ्य आहे बंडू, दिग्या म्हणाला. ‘पण समाजसेवा करायची म्हणजे नक्की करायचे काय? ‘तेच तर मलाही सुचत नाही दिगु, थांब मी गरम गरम चहा बनवतो मग आपण ठरवू. बंडूची बायको गीता हि माहेरी गेली होती नि बंडूच्या हातच्या चहाची चव दिगुच्या चांगलीच परिचयाची असल्याने दिगु गयावया करत म्हणाला, ‘चहा, नको रे बंडू, मी घेवून आलोय.’ ‘ते काही नाही तुला माझ्या हातचा चहा घ्यावाच लागेल’ बंडू चहा घेवून आला दिगुने चहाच कप तोंडाला लावला तोच बंडूला एक कल्पना सुचली नि त्याने आनंदाने दिगुने ज्या हाताने चहाचा कप धरला होता तो गदा गदा हलवला सारा चहा दिगुच्या कपड्यांवर सांडला. दिगु फ्रेश होवून आला नि त्याने दिगुला चहाचा दुसरा कप दिला. दिगु तो चहाचा कप घेवून बंडू पासून सुरक्षित अंतरावर बसला नि म्हणाला, ‘सांग, तुझी कल्पना.’ बंडूने त्याला कल्पना सांगायला सुरवात केली ती अशी होती कि रेल्वे स्टेशन लगतजी झोपडपट्टी होती तेथे जावून साफसफाई मोहीम राबवायची पुढचा रविवार ह्या मोहिमेसाठी त्यांनी निश्चित केला.

रविवारी बंडू नि दिगु समाजसेवका सारखे पांढरे कपडे घालून झोपडपट्टीकडे निघाले. झोपडपट्टीत जावून आपण स्वतः तिथे स्वच्छता करायची नि आपल्या कृतीतून समाजसेवेचा संदेश द्यायचा असे त्यांनी ठरवले. निघण्यापूर्वी थोर समाजसेवक भुरकूटे ह्यांच्या तस्विरीला नमस्कार केला. झोपडपट्टीत साफसफाई करण्यासाठी ते आत घुसले. चारीबाजूंनी झोपड्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या मध्ये थोडी मोकळी जागा होती तेथे लहान मुले शौचाला बसली होती. राडेने माखलेली सातआठ डुकरे त्या मुलांच्या आजूबाजूने फिरत होती. वातावरणात एक प्रकारचा कुबट वास पसरला होता. सकाळी ऑफिसला जाताना बंडू नि दिगु रोज ह्याच रस्त्याने जात पण कधी आत जाण्याचा प्रसंगच आला नव्हता. झोपडपट्टी परिसरात पावूल टाकताच दिगुला एक कळून चुकले कि बगळ्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घालून इथे येण्यात आपण फारच मोठी चूक केली. बंडू नि दिगु आत शिरताच तेथील लोक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागले.ते जेथे जेथे जावू लागले तेथे तेथे लोक त्यांच्या मागे कुतूहलाने जावू लागले

बंडूने त्या लोकांना सांगितले ‘मी समाजसेवक बंडू नि हा दिगु’ आम्ही तुमची झोपडपट्टीत साफसफाई करण्यासाठी आलोय’. ‘अस, आहे होय तर चालू द्या तुमच काम’ लोकांमध्ये निरुत्साह पसरला नि जो तो आपापल्या कामाला लागला बंडूने एका झोपडीपुढचा केर काढायचे ठरवले वाकून वाकून त्याची कंबर दुखू लागली तेव्हा एकदाचा केर काढणे संपले नि बंडूने समाधानाचा निश्वास सोडला पण त्याचे समाधान जास्त वेळ टिकले नाही झोपडीतून एक म्हातारी बाहेर आली नि तिने तेथे पुन्हा घमेले भर केर ओतला बाहेर उन्ह मी म्हणत होत बंडू घामाघूम झाला होता पाठीतून कळा येत होत्या.समाजसेवेसाठी साफसफाई हा विषय घेवून आपण मोठी चूक केली असे त्याला वाटले. तो थकलेल्या नजरेने दिगुला शोधू लागला.

तेव्हड्यात दिगु एका झोपडीतून बाहेर येताना दिसला त्याचा चेहरा रागाने फुलला होता तो बंडूला म्हणाला,’ आताच्या आता इथून चल.’ ‘का रे? काय झाले?’ ‘ तू तिकडे गेल्यावर एक म्हातारी माझ्याकडे आली नि म्हणाली, ‘तुम्ही समाजसेवक ना मला थोडी मदत कराल? मी म्हणालो, ‘का नाही? त्यासाठीच तर आम्ही इथे आलोय’ तर तिने मला तिच्या घरात नेवून भांडी घासायला लावली नि स्वत मजेत झोपून घेतले. ‘चायला, तुला सांगतो बंडू ह्यांना आपल्या कामाची कदर नाय, आपण समाजसेवक आहोत त्याचे काय घेणे देणे नाही, आपले काम कोणीतरी येवून फुकटात करतोयना त्यातच ते खुश आहेत मरु दे ती समाजसेवा चल घरी जावून मस्त बियर पीत बसू, सारा रविवार तुझ्या नादी लागून फुकट घालवला’. बंडू हि खुश झाला त्यालाही तेथून लवकरात लवकर बाहेर पडायचेच होते पण दिगुवर उपकार केल्यासारखा चेहरा करून तो म्हणाला,’अरे दिगु समाजसेवेत कशाचीही अपेक्षा करायची नसते.’ दिगु उखडला त्याने आपल्या हातातला झाडू बंडूच्या हातात कोंबला नि म्हणाला,’एक काम कर माझ्या वाटची साफसफाई पण तू कर, मी चाललो घरी.’

दोघांचा वाद चालू असतानाच दोन उग्रट माणसे तेथे आली. त्यांनी दोघांना दरडावून आपल्या बरोबर येण्यास भाग पाडले. बंडू नि दिगुचि चांगलीच टरकली. त्या दोघांना घेवून ती माणसे झोपडपट्टीदादा काल्याभाईकडे घेवून आली त्यातला एक उग्रट म्हणाला, ‘काल्याभाई, हीच ती दोन कबुतर सकाळपासून आपल्या वस्तीत फडफड करतायत.’ दादाने त्यांना विचारले,’कोण तुम्ही?’ दिगू म्हणाला, ‘मी समाजसेवक दिगु नि हा बंडू’. नंतर काल्याभाईने दोघांची कसून चौकशी केली दोघे जन सरळसाधे आहेत ह्याची त्याला खात्री पटली तो आपल्या एका माणसाला उद्देशून म्हणाला, ‘बारक्या, दोघे खरच कि समाजसेवक आहेत त्यांची खेप वाया जायला नको. ह्या दोघांना आपल्या गुत्त्यावर घेवून जा नि गुत्ता चांगला साफसूफ करून घे त्यांच्याकडून’. दोघे समाजसेवक मुंड्याखाली घालून त्याच्या मागून चालू लागले दोघेही गुत्त्यावर पोहोचले तेव्हड्यात तिथे पोलिसांची धाड पडली तेथे जमलेल्या सार्यांना अटक करण्यात आली .एक आडवा तिडवा इन्स्पेक्टर जो समोर येईल त्याला लाफे मारत होता बंडूला हि दोन लाफे पडले दिगुने तो समाजसेवक आहे हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण पाठीत गुद्दे बसल्यामुळे त्याच्या तोंडून शब्दही फुटेना ह्यांची वरात झोपडपट्टीकडून पोलीस स्टेशनात निघाली .रस्त्याने जाताना दिगु नि बंडूने रुमालाने चेहरा झाकून घेतला. इतरजन मात्र मस्त पिकनिकला जात असल्याप्रमाणे पोलिसांबरोबर जात होते.

पोलिस स्टेशनमधेय पोहोचताच त्यांना एका बाकड्यावर बसून ठेवण्यात आले तितक्यात बंडूला आपल्या चाळीतले मोरे हवालदार दिसले बंडूने त्यांना गहिवरल्या आवाजात हाक मारली. मोरे हवालदार बंडूला नि बरोबर दिगुला बघून चकित झाले बंडू नि दिगुने त्यांना सारी हकीकत सांगितली. मोरे त्यांना तिथेच बसवून आपल्या साहेबांकडे गेले त्यांना सारी हकीकत सांगितली. ती एकूण साहेबाने बंडू नि दिगुला सोडून दिले.

संध्याकाळी बंडूच्या घरी बंडू नि दिगु मस्त पैकी बियर पीत बसले गप्पा मारता मारता आपल्या सुजलेल्या गालाला हात लावत बंडू म्हणाला ‘दिग्या, भुरकूटे समाजसेवक बरोबर सांगतात समाजसेवक बनता येत नाही तो जन्मावा लागतो’.”नाही रे, तस काही नाही बंडू समाजसेवक बनता हि येत पण त्याच्यासाठी जी लायकी लागते, कळवळा लागतो तो आपल्यात नाही 'आपण नि समाजसेवक नो चान्स'.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लिहिलयं. विषय खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बंडूचे बाबा आणि आजी समाजसेवा करता करता शहीद झाले होते का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पगारे आपण खरडत जा आमी वरडत जातो आपलं वाचत जातो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

लेख वाचताना चिमणराव आणि गुंड्याभाऊ बडोद्याला काहीतरी नैसर्गिक आपत्ती आलेली असताना समाजसेवा करायला म्हणून जातात, आणि त्यामुळे त्यांना कसे गमतीदार अनुभव येतात ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखन. गंमतशीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा हा Biggrin मजा येतेय बंडू आणि दिगुच्या गोष्टी वाचायला. येउद्यात अजुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0