बंडू नि दिगु गुप्तचर बनतात

शेरलॉक होम्स ह्या गुप्तचराच्या कथा वाचून बंडू अतिशय प्रभावित झाला होता. जे होम्स करू शकतो ते आपण का नाही?आपण ही काही कमी हुशार नाही. होम्सकडे वाटसन हा मित्र होता आपल्याकडेही दिगु आहे. आपले कारनामे तो शब्दबद्ध करेन. फक्त आपण योग्य तो तर्क लावायचा, तर्कशास्त्राचा वापर करून आपण हि होम्स प्रमाणे गुन्हे शोधायचे. मूळ हुशारी तर आपल्यात आहेच फक्त आपण निरीक्षणावर लक्ष द्यायचे. असे विचार बंडूच्या मनात चालले होते.

तेवढ्यात त्याचा प्रिय मित्र दिगु आला. दिगुला पाहिल्यावर नेहमी प्रमाणे बंडूचा चेहरा आनंदाने फुलला. दिगुने टेबलावरचे पुस्तक उचलले नि ते तो चाळू लागला.’दिगु, तू वीज बिलभरणा केंद्रातून आलास.’ ‘तुला कसे माहित’? दिगुने विचारले. बंडू गूढ हसला, ‘दिगु, तू वरण भात खाल्लास ना. आता मात्र दिगु चकित झाला,’अरे, बंडू तुला कसे कळले? तुझ्यात अतींद्रिय शक्ती आली कि काय? बंडूने दिगुला शांत केले व हे कसे घडले ते तो सांगू लागला. बंडू म्हणाला ‘दिगु, तू घरात आलास तेव्हा तुझ्या खिशातून डोकावणारे वीजबिल दिसले. त्यावरून मी तर्क केला कि तू वीजबिल केंद्रातून आलास.’ ‘आणि मी वरण भात खाल्ला हे तू कसे ओळखलेस’? ‘अरे, त्यात काय नवल कोणीही चाणाक्ष माणूस तुझ्या शर्टाचे निट निरीक्षण केले तर सांगू शकेल कि तू वरण भात खाल्लास’.’ अरे, हे तर सोपे होते, बंडू मी उगाचच चकित झालो.’ ‘तुला हे आता सोपे वाटतेय दिगु, पण खर सांग मी उलगडा करेपर्यंत तू विचारात पडला होतास कि नाही’.’ हो हे मात्र खरे’ दिगु म्हणाला. ‘अरे, दिग्या ह्यालाच म्हणतात तर्कशास्त्र. हे शेरलॉक होम्स वापरायचा हे पुस्तक वाच. ह्यात त्याच्या चातुर्यकथा आहेत. आपण हि आपले तर्कशास्त्र वापरून लोकांना मदत करूया’. हे दिगुला पटले.

दोघेजण बाजारात गेले बंडूने स्वताला एक ह्याट घेतली नि जुन्या बाजारातून एक लांबलचक कोट खरेदी केला. तो कोट चढवल्यावर नि ह्याट घातल्यावर जणू शेरलॉक होम्स बंडूच्या अंगात संचारला. दिगु हा आपल्या घरी निघून गेला. बंडूने मात्र आज रात्री सर्वत्र निजानीज झाल्यावर बाहेरचा एक चक्कर मारायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिगु हा बंडूच्या घरी गेला तेव्हा बंडू त्याला निजलेला आढळला. त्याच्या कपाळावर एक टेंगुळ आले होते. ‘हे काय रे? हे कसे झाले? तेव्हड्यात दिगुचे लक्ष खुर्चीवर पडलेल्या कोटावर गेले तोहि जागोजाग फाटला होता.’काय रे, हे कसे झाले?’अरे, रात्री हा कोट घालून खाली नाक्यापर्यंत गेलो. तर मला ह्या अवतारात बघून गल्लीचे सारे कुत्रे मागे लागले, माझ्या कोट्शी झोंबू लागले, पळता पळता खांबावर डोके आपटले’. दिगु हसू लागला. ‘अरे, दिग्या माझी हि हालत झाली नि तुला हसू येतेय. “अरे, जावू दे रे बंडू ‘जान सलामत, तर कोट पचास’. “अरे, मरू दे तो कोट नि हयाट. आपण आपले भारतीय वेषातच गुप्तहेर बनूया”.” अरे, पण बंडू तुझी हयाट कुठे गेली?. ‘अरे, काल पळताना पडली कुठेतरी'. 'म्हणजे नेमके झाले काय? दिगुने विचारले. “अरे काल कुत्रे मागे लागले पळताना ती हयाट नुसती डोळ्यांवर येत होती. खरतर त्या हयाटमुळेच माझे डोके आपटले मरू दे ती हयाट’. “मला माहित आहे तुझी हयाट कुठे आहे” दिगु म्हणाला. ‘कुठे’? बंडूने विस्मयाने विचारले. ‘त्या नाक्यावरच्या भिकाऱ्याकडे’. ‘तुला कस माहित? ‘अरे, मी तुझ्याकडे येताना नेहमी त्याच्याकडच्या पोत्यावर रुपया टाकतो. पण आज त्याने त्या पोत्यावर पैसे ठेवण्यासाठी ती हयाट उलटी करून ठेवली होती.मला हयाट बघितलेली वाटली पण लक्षात आले नव्हते. अरे बंडू ती तुझीच हयाट आहे. चल आपण आणूया परत’. ‘अरे, मरू दे ती हयाट. आपल्या तर्फे त्याला भिक दिली असे समजू’. बंडू आपल्या टेंगुळावर हात फिरवत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी बंडू नि दिगु घरात गप्पा मारत बसले होते रात्रीचे आठची वेळ होती इतक्यात लाईट गेले बंडूने दरवाजा बंद केला तो नि दिगु जावून चाळीच्या गेटजवळ गप्पा मारत उभे राहिले. थोड्यावेळाने लाईट आली तेव्हड्यात दोघांना बंडूच्या मजल्यावर काहीतरी गडबड सुरु असल्याचा आवाज आला दोघेही त्वरित तेथे गेले. घारूअण्णा बंडूचे शेजारी ह्यांच्या दारात गर्दी जमली होती. घारूअण्णा हताश होवून बसले होते. चौकशी केली असता बंडूला कळले कि घारू अण्णांनी कालच बुटाचा नवीन जोड घेतला होता तो कोणीतरी पळवला. गडबडीचे खरे कारण कळताच जो तो आपापल्या घरी पांगला.

घारूअण्णा मारक्या म्हशीसारखे प्रत्येकाकडे संशयाने बघत होते. हि केस आपल्यासाठी योग्य आहे हे बंडूच्या ध्यानात आले तो दिगुकडे बघून गूढ हसला. दिगुने बंडूच्या मनातले ओळखले नि त्याला टाळी दिली दोघेजण एकमेकाला टाळ्या देतात हे पाहून घारूअण्णा कडाडले “इथे, माझे नवे बूट चोरीला गेले. नि तुम्ही टाळ्या कसल्या देताय”. ‘अहो, ते त्यासाठी नाही दिगुने सारवासारव केली. बंडूने घारूअण्णांना आपल्या घरी बोलावले त्यांना सांगितले ‘घारूअण्णा, तुमचे बूट मी मिळवून देतो तुम्ही अजिबात चिंता करू नका’. ‘अहो पण तुम्ही कसे मिळवून देणार गेल्यावर्षी तुमची सायकल चोरीला गेली होती ती अजून तुम्हाला मिळाली नाही’. आपल्या चोरीला गेलेल्या सायकलच्या उल्लेखाने बंडूचा चेहरा पंक्चर झालेल्या सायकलच्या टायर सारखा झाला. तो म्हणाला ‘ते जावू द्या घारूअण्णा, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा माझ्याकडे तर्कशास्त्र नव्हते.’काय नव्हते’? घारूअण्णा म्हणाले. ‘ते जावू द्या हो तुम्हाला बूट हवेत कि नको.’ ‘अहो, हे काय विचारणे झाले हवेत तर मग तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. दिगु हे सर्व नोंदवून ठेव. ‘ठीक आहे’ दिगु म्हणाला. दिगुने पेन नि वही घेतली हे जे काय चालले होते त्याकडे घारूअण्णा आश्चर्याने बघत होते बंडूने विचारलेल्या माहितीवरून त्याला कळले कि बूट आठ नंबरचे होते त्यांचा रंग काळा होता नि बुटांवर लालरंगाचे ठिपके होते. घारूअण्णांची रंगाची आवड अशीच जगावेगळी होती हे बंडू चांगलेच जाणून होता.

घारूअण्णा निघून गेल्यावर बंडू म्हणाला ‘हि आपल्या चाळीतली पहिलीच केस आपल्याला मिळालीय ह्या केसमध्ये पैसा नाही बघायचा. हि केस यशस्वी झाली कि आपल्याकडे केसेसची रांग लागेल. आता आपण आपले तर्कशास्त्र चालवू. हे बघ, लाईट आठ वाजता गेली मी घरातला नि घराबाहेरचा पसारा आवरला नि आपण आठ वाजून दहा मिनिटांनी चाळीच्या खाली उतरलो. आपण दोघे चाळीच्याच गेटजवळ गप्पा मारत होतो ह्या काळात मला तर कोणीच खाली येताना आढळले नाही बरोबर’. दिगु म्हणाला ‘कमाल आहे बंडू तुझी’. ‘दिग्या, ह्याचा अर्थ चोर आपल्या चाळीतच आहे. त्यामुळे त्याला शोधून काढणे सोपे झालेय’. ‘अरे, बंडू पण शोधायचे कसे’? ‘दिगु माझ्या डोक्यात एक कल्पना आलीय काय पण त्यासाठी आपल्याला थोडे श्रम घ्यावे लागतील. ‘म्हणजे काय’? ‘अरे, तू गम्मत बघच.बंडूच्या चाळीत २० खोल्या होत्या घारूअण्णा नि बंडूचे घर सोडले तर चोर ह्या अठरा खोल्यांपैकी एकातच आहे ह्याविषयी बंडूला खात्री होती.

बंडू दिगुला घेवून मार्केटमध्ये गेला तेथून त्याने ५० बूटपोलीशच्या डब्या घेतल्या इतक्या डब्या पाहून दिगु चकित झाला. ‘अरे बंडू काय लावलेस काय तू इतके बूटपोलिश घेवून काय आख्या चाळीचे बूटपोलिश करायचेत कि काय तुला’?’करेक्ट फक्त मलाच नाही तर तुला ही’. ‘काय’ दिगु जवळजवळ किंचाळलाच. बंडू गालात हसला नि त्याने दिगुला आपली योजना समजावली. त्या योजनेनुसार दिगु नि बंडू हे बंडूच्या चाळीत फिरले व त्यांनी चाळकर्यांना सांगितले कि दिगुचे आजोबा हे नवे बूट घालून फिरायला जात असताना त्यांचा पाय मुरगळला नि पायाचे हाड मोडले आजोबा ठीक व्हावे म्हणून दिगुने भांडुपचे जगद्गुरु पळपुटेबाबाकडे नवस केला होता कि आजोबा ठीक झाले तर १००लोकांच्या बुटांना मोफत त्यांच्या घरी जावून पोलिश करेन. आजोबा ठीक झाले नि दिगूला नवस पूर्ण करायचा आहे नि ह्या कामात एक मित्र म्हणून बंडू त्याला मदत करणार होता. हे लोकांना पटण्याजोगे होते नि आपले चाळकरी कसे आहेत हेहि बंडूला चांगले माहित होते. जरी नवस नसता नि कोणी फुकटात बूटपोलिश करतेय म्हटल्यावर चाळकरी घरातले सर्व बूट चपला ह्या पोलिशला देणार ह्यात बंडूला तिळमात्रहि शंका नव्हती.

बंडूच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. बंडूने दिगुला बजावले चांगले लक्ष ठेव एकही बूट नजरेतून सूटता कामा नये काळा बूट नि लाल ठिपके. योजनेनुसार कामाला सुरवात झाली दिगु हा साठेकाकांच्या घरात गेला. साठे काकांनी दिगुचे उत्साहात स्वागत केले घरातले सारे बूट चपला आणून त्याच्यासमोर टाकल्या नि साठे काका टीव्ही बघत बसले. दिगुने सर्व बूट, चपला मनातल्या मनात शिव्या घालत पण चेहऱ्यावर हास्य ठेवून पोलिश केल्या. दिगु पोलिश करत असताना साठेकाकांच्या घरी पाहुणे आले घरात पसरलेले बूट नि पोलिश करत बसलेल्या दिगुला पाहून ते चकित झाले पाहुणे साठे काकांना म्हणाले ही ‘काय हो हे काय पोलिशवाल्याला घरी बोलावले कि काय? साठेकाका म्हणाले तस नाही हो नि त्यांनी दिगुचा नवस पाहुण्यांना सांगितला. पाहुणे म्हणाले ‘अहो, ग्रेट आहे हा पोरगा आपल्या आजोबांसाठी आजकाल इतके कोण करत हो. दिगुला ग्रेट ग्रेट म्हणत त्यांनी बाहेर ठेवलेले आपले बूटहि दिगुला आणून दिले नि गदगदलेल्या आवाजात दिगुला म्हणाले ‘पोरा, तू खरच महान आहेस. आम्ही काय तुला फक्त तुझा नवस फेडायला मदत करू शकतो हे घे माझे हि बूट मस्तपैकी पोलिश कर’. म्हातार्याला खावे कि गिळावे असे दिगुला वाटले. पण आलीय भोगासी असे पुटपुटत तो कामाला लागला. बंडू हा मैनाताई ह्यांच्या घरी गेला त्यांनी आपल्या शाळेत जाणार्या पोरनचे हि बूट त्याच्याकडून पोलिश करून घेतले दिवसभर हा बूटपोलिश कार्यक्रम चालला,.चाळीत सार्यांचे बूट मस्तपैकी फुकटात पोलिश करून मिळतायत नि आपले बूट ह्याच वेळेला चोरीला जावे ह्याने घारूअण्णा अजूनच खट्टू झाले होते. आक्ख्या चाळीचे बूटपोलिश करून झाले तरी बंडूला नि दिगुला जे बूट हवे होते ते काही मिळाले नाहीत.दोघांचा अवतार पाहण्यासारखा झाला होता.

दिगु म्हणाला ‘चायला, बंडू काम तर काय झाले नाही. फुकट चाळवाल्यांचे बूटपोलिश करून दिले .बंडू खिन्नपणे बसून होता. दुसर्या दिवशी बंडूच्या चाळीत दिगु येत होता तोच त्याला घारूअण्णा येताना दिसले अण्णा खुशीत दिसत होते. ‘काय, दिगू बंडूकडे का’ “हो, अण्णा. ‘हे बघ काय माझी बूट मिळाली’ “काय? कशी? कुठे’? दिगुने विचारले. ‘अरे बंडूने शोधून दिली’. काय म्हणता बंडूने.

अण्णांचा निरोप घेवून दिग्या बंडूकडे निघाला बंडू दारातच होता दिग्या त्याच्या गळ्यातच पडला नि म्हणाला ‘बंडू, तू माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे. अरे जी केस आता सुटू शकत नाही असे मी समजत होतो ती तू सोडवलीस. मानल, तुला नि तुझ्या तर्कशास्त्राला. बंडू तू इंडियन शेरलॉक होम्स आहेस नि माझा मित्र आहेस ह्याचा मला अभिमान वाटतो”....”बस, झाले पुरे झाले आता”. ‘अरे, बंडू पण हा चमत्कार तू केलास कसा? नि चोर कोण होता?’ बंडू खिन्नपणे हसला नि म्हणाला, ‘चोर, तुझ्यापुढे आहे दिगू.’ ‘म्हणजे तू घारूअण्णांचे बूट चोरलेस तेहि काळे बूट लाल ठिपके असलेले तुझी पत एवढी खालावेल असे मला वाटले नव्हते. बंडू, मघाशी तुझ्या स्तुतीपर काढलेले सारे शब्द मी विनाविलंब मागे घेत आहे’.

’अरे, दिग्या माझे एकूण तर घे’. तुला घटनाक्रम सांगतो ‘त्यादिवशी आपण गप्पा मारत बसलो होतो अचानक लाईट गेली मी त्या अंधारातच घरातला पसारा आवरला. दाराबाहेर ज्या चपला बुट आम्ही ठेवतो ते मी आत घेवून चपला ठेवण्यासाठी जे लाकडी कपाट बनवले आहे त्यात टाकले आता तूला तर माहितच आहे घारूअण्णांचा दरवाजा माझ्या दरवाजाला खेटूनच त्यांनी चुकून माझ्यादारासमोर बूट काढले नि मी हि अंधारात ते माझेच समजून आत ठेवले. त्यात ऑफिसला तीन दिवस सुट्टी म्हणून मी काही ते कपाट खोलले नाही. बाहेर जायच्या चपला तर मी कधी त्या कपाटात ठेवतच नाही पलंगाखाली ठेवतो. त्यामुळे गेले तीन दिवस हे बुटांचे कपाट काही उघडले नाही’.’चांगले आहे बंडू’ मग हे तू अण्णांना सांगितले नि त्यांना पटले. ‘अरे, मला घारूअण्णांचा स्वभाव माहित आहे मी त्यांना हे सांगितले असते तर त्यांना काय पटले नसते म्हणून मी त्यांचे बूट घेतले नि चाळीच्या मागच्या कोपर्यात टाकून दिले नि नंतर घारूअण्णांकडे गेलो नि त्यांना सांगितले चाळीच्या मागच्या कोपऱ्यात कुणाचे तरी बूट पडलेले दिसतात तुमचे आहेत का जावून बघूया. हरवलेले बूट परत मिळतात.हे एकूण घारूअण्णा इतके खुश झाले माझ्याबरोबर बाहेर पळतच आले नि बूट पाहून हेच माझे बूट म्हणत खुश झाले.

‘च्यायला, बंडू तुझा गुप्तहेर व्हायचा नाद किती रे महागात पडला . कोटाचे पैसे गेले, हयाटचे पैसे गेले, पोलिशच्या डब्यांचे पैसे गेले, अक्ख्या चाळीला फुकटात बूटपोलिश करून दिले'.

बंडू उत्साहाने म्हणाला ‘अरे, मरू दे रे ते, पण केस निकाली निघाली ना. हि आपली पहिली नि शेवटची केस. चल बाहेर जावून मस्तपैकी चहा घेवू’.

field_vote: 
2.8
Your rating: None Average: 2.8 (5 votes)

प्रतिक्रिया

गमतीदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक्
मजेदार आहे!
या धर्तीवर अजून काही कथा चाल्तील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त आहे. बालभारतीच्या इयत्ता तीसरी ते पाचवी साठी क्रमिक पुस्तकात या कथा छापायला हव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लायमॅक्स लै भारी असेल असे वाटायला लागले होते, पण ठिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीदार
अजून येऊद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कथा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

आवडल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0