होळी रे होळी !

होळीच्या चार दिवस आधी पासूनच आमच्या चाळीत होळीची तयारी सुरु झाली.चाळीत शिरताना कुठून फुगा येऊन टाळक्यात बसेल याची शाश्वतीच नव्हती.जीव मुठीत धरून चाळीत शिरावे लागे.होळी हा सण आम्ही चाळकरी मोठ्या उत्साहात साजरा करत असू.आमच्या चाळी समोर एक छोटेसे पटांगण होते तेथे होळीचा खड्डा खणात असत.

शेजारच्या डोंगरावर असलेल्या रानात जाऊन पोर लाकडे तोडून आणत.मात्र ह्या वेळेस लाकड तोडायला जायचे नाही असा सर्वांनी संकल्प केला होता.कारण मागच्या होळीला बंडू नाना लाकड तोडायला झाडावर चढला होता इतर मुले हि लाकडे तोडत होती.तेवढ्यात 'मेलो मेलो, तात्या मला वाचव'अशा किंकाळ्या आम्हाला ऐकायला आल्या पाहतो तर काय बंडूनाना सैरावैरा पळत होता व मधमाश्या त्याचा पाठलाग करत होत्या.बंडू नानाला वाचवायला त्याचा जिवलग मित्र तात्या पुढे धावला तर एक मधमाशी त्याच्याही नाकाला चावली तोही बंडू नाना सारखा बोंबलत पळू लागला. ते भयानक दृश्य पाहून आम्ही जी धूम ठोकली ते चाळीच्या कट्ट्यावरच येऊन थांबलो.बंडू नाना आणि तात्या शेवटी घाण पाण्याच्या नाल्यात शिरले तेव्हा कुठे त्यांचा जीव वाचला. नंतर आम्ही चाळीच्या कट्ट्यावर बसून दोघांची आतुरतेने वाट पाहू लागलो.बंडू नाना व तात्या दोघेही सुजून परतले.आमीर खान सारखा सुंदर दिसणारा बंडू नाना आता ओमपुरी सारखा दिसू लागला. बंडू नाना होळीला जो सुजला तो शिवजयंतीला बरा झाला.

गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून ह्या वेळी लाकड विकत आणण्याचे ठरवले.आमच्या चाळीत चाळीस खोल्या होत्या प्रत्येक खोलीतून वीस रुपये वर्गणी काढली. काहींनी दिली तर काहींनी नाही आमच्या चाळीतली मुले फार वात्रट होती परांजपेनी वर्गणी दिली नाही म्हणून आपल्या वरांड्यात ज्या आराम खुर्ची वर बसून परांजपे पेपर वाचत बसत तीच खुर्ची पोरांनी होळीत टाकून दिली.

होळी पेटलेली असताना एक अजब दृश्य दिसले पहिल्या मजल्यावरचे पाटिल आजोबा जोरजोरात पळत होते. ते आपला वात्रट नातू पिंटूच्या मागे लागले होते पिंट्या पळत पळत आला आणि त्याने आजोबांची सागवानी काठी होळीत टाकून दिली.ते पाहून पाटिल आजोबा मटकन खाली बसले व पिंट्याला शिव्या देऊ लागले .होळी पेटल्यावर मुलांनी एकमेकावर गुलाल टाकायला सुरवात केली होती. पाटिल आजोबा तसेच डोक्याला हात लाऊन बसले होते. त्यांच्या पाठीत कुणी तरी रंगीत पाण्याने भरलेला फुगा मारला पाटिल आजोबा रागाने उठले तोपर्यंत पोरांनी त्यांना रंगाने रंगवून टाकले होते. नेहमी पांढराशुभ्र लेंगा व सदरा घालणारे पाटिल आजोबा पंचरंगी पोपटासारखे दिसू लागले. मुलांच्या नावाने शिव्या घालत ते त्यांच्या घरी गेले तेव्हा पाटिल आजी त्यांना घरात घेईना आजी म्हणाली "कोण तुम्ही?कोण पाहिजे?हे घरी नाहीत ते आल्यावर या."शेवटी शेजारच्या मधुकाकानी सागीतल्यावर आजीची खात्री पटली कि हेच आपले यजमान.अशा प्रकारे होळी एकदाची संपली.

आता दुसरा दिवस धुळवडीचा धुळवडीच्या दिवशी तर घराबाहेर डोकावण्याची पंचायत पोर इतकी वात्रट कि म्हातारा, म्हातारी, ओळ्खी अनोळ्की कुणालाही रंगवत बदाबद फुगे मारत.मी शाकाहारी ब्राह्मण, मागच्या होळीला कोणीतरी माझ्या डोक्यावर अंडे मारले होते त्या अंड्याच्या वासामुळे मला चार दिवस उलट्या होत होत्या त्या मुळे मी धुळवडीचा धसकाच घेतला होता. ह्यावेळी होळी खेळायला जायचेच नाही असे मी ठरवले होते. एवढ्यात आमच्या दाराची कडी वाजली आमचे चाळकरी मित्र मला रंगवायला आले होते ते दार वाजवू लागले मी काही केल्या दार खोलेना बाहेर नुसता गोंगाट चालला होता मी कानात मस्तपैकी कापसाचे बोळे घातले आणि आरामात पलंगावर पडून राहिलो. तासाभराने कानातले बोळे काढले आणि बाहेरचा कानोसा घेतला बाहेर सामसूम होती. म्हणून मी दार उघडून हळूच बाहेरपाहिले तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. बाहेर माझे तीर्थरूप उभे होते.

आत आल्या आल्या त्यांनी माझ्या कानाखाली आवाज काढला 'बंड्या,नालायका, दार उघडायला काय झाले.अर्धा तास झालाय दार वाजवतोय ह्या पोरांनी रंग चोळून चोळून माझा पंचरंगी पोपट बनवून टाकलाय, अर्धा तास झालाय फुग्यांचा मार खातोय फुगे लागून लागून अंग दुखायला लागलेय आणि नालायका दार लाऊन काय बसलायस. "अरे देवा" गावाहून यायला मला हाच मुहूर्त भेटला होता का रे!वडिलांचा अवतार बघून माझी पाचावर धारण बसली काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले "अण्णा तब्येत कशी आहे तुमची?" वडील उखडले "गावाहून येईपर्यंत तर ठीक होती आता काही सांगता येत नाही, 'साल्या चाळ वाल्यांनी माझ्या असहायतेचा फायदा घेत चांगला अर्धा तास पाण्याचा मारा लावला होता.

मी गप्प बसलो नंतर काही तरी विचारायचे म्हणून विचारले "अण्णा, हि लाल टोपी तुम्ही कधी घेतलीत तुम्ही तर नेहमी पांढरी शुभ्र टोपी घालता" ह्यावर अण्णा भडकले "अरे गाढवा हि पांढरीच टोपी आहे तुझ्या नालायक चाळ वाल्यांनी रंगवून रंगवून तिला लाल केलेय." आता मात्र मी पुरता गप्पा बसलो. वडिल बडबड करतच आंघोळीला गेले.मि रागाने मित्रांना व चाळ करी यांना शिव्या देत बाहेर पडलो.

तोच माझ्यावर आभाळातून गारा पडाव्या तसा फुग्यांचा वर्षाव झाला. ज्याची मुख्य भीती होती तेही झाले चार पाच अंडीही अंगावर येउन फुटली एवढे कमी म्हणून कि काय मुलांनी एक पाण्याचं डबक तयार केले होते त्यात मला टाकले आता मी हि होळीत पुरताच रंगून गेलो होतो आणि आनंदाने इतरांना रंगवू लागलो आणि ओरडू लागलो "होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा".

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मी शाकाहारी ब्राह्मण, मागच्या होळीला कोणीतरी माझ्या डोक्यावर अंडे मारले होते त्या अंड्याच्या वासामुळे मला चार दिवस उलट्या होत होत्या

कथेचे इसवीसन काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कच्च्या अंड्याचा केसांना जो दिवसभर वास मारतो तो अंडे न खाणार्‍यांनाच काय पण अंडेखाऊंनाही त्रासदायक वाटू शकतो, स्वानुभव आहे. मी लहानपणी ( जरा मोठ्या लहानपणी ) एकदा कोणाच्यातरी सांगण्यावरून डोक्याला कच्चे अंडे लावून सुकेपर्यंत ठेवले होते. ' केसांचे पोषण व केस रेशमासारखे मुलायम' करण्यासाठी.
शंका असल्यास स्वतः प्रयोग करून बघावा.
आपुलकीची सूचना: हा प्रयोग शक्यतो सुटीच्या दिवशी आणि बायको-मुलगा सासुरवाडीस गेले असताना करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस, या संपूर्ण मृत वस्तूचे 'पोषण' बदाम, अंडी, व्हिटॅमिन्स ए, ई इ. इ. घालून कसे काय करतात हे मला अद्याप न उलगडलेले कोडे आहे.

वरतून त्यासाठी पांढरेशूभ्र एप्रन्स घातलेले, रुबाबदार पुरुष व आकर्षक बांधा/चेहरा असलेल्या तरूणी 'संशोधन' करीत लाल हिरव्या निळ्या नळकांड्यात बुडबुडे निघणार्‍या टेबलांनी सजलेल्या वातावरणात -ज्याला "लॅब" समजावे अशी अपेक्षा असते- अत्याधुनिक १०० इन्ची टचस्क्रीनवर बोटे फिरवत आपल्याला फंडे देत असतात!

याने म्हणे केसातले कोंडे कमी होतात. अन केस कसे मुलायमसिंग होतात... अहो, टकलावर केसही उगवतात!! आहात कुठे?

कठीणेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

केस मृत पेशी समजल्या जातात हे मान्य आहे.

पण केसांच्या मुळाशी मज्जातंतू असतात. केसांची हालचाल, केसांना झालेला स्पर्श यावरून बरेच प्राणी परिसराचा अंदाज घेतात. प्रयोग म्हणून पापणीच्या केसांना चष्म्याची काडी लावली. न बघतासुद्धा पापणीला स्पर्श झालेला समजला. यात काही प्रमाणात kinesthetic sense असेल (हात आणि हातातला चष्मा डोळ्यापासून किती अंतरावर आहे याचा अंदाज येत होता) हे नाकारत नाही. पण मांजरांच्या मिशा तर याच कारणासाठी वापरल्या जातात. त्यात हा सेन्स उलट प्रकारे वापरला जातो.

कोरड्या झालेल्या केसांना तेल लावून ते धुतलं की केस मुलायम होतात. याचा अर्थ केसाच्या बाहेरच्या आवरणावर तेलाचा काहीबाही परिणाम होत असणार. जसा कोरड्या त्वचेवर तेल किंवा अन्य मॉइश्चरायजर्सचा होतो. मेंदी केसाला लावली की केस रंगतात आणि तुकतुकीतही होतात (करून पहा, शिवाय वासही मस्त येतो. आणि किंचित घाम आल्यावर मेंदीचा आणखी छान गंध येतो).

आणि या सगळ्या कित्येक शतकं माहित असलेल्या गोष्टी आहेत. 'केसाचं पोषण' या शब्दाची व्याख्या केसाच्या वरच्या आवरणाचा तुकतुकीतपणा अशीही असू शकते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

केसांवर तेल लावले की ते तुकतुकीत दिसतात.
गाडीवर वॅक्स लावले कि तिची त्वचा तजेलदार दिसते.
डेड, इज डेड.
त्याच्या मुळाशी जीव आहे, याला अर्थ नाही. मुळे मजबूत तर केस मजबूत! असतील कदाचित. त्याबाबतीत माझा अभ्यास कमी आहे असे म्हणू हवेतर.
तरीही, केस अन चामडी यांचा रंग, तुकतुकितपणा, इ. बद्दल जाहिरातींतून आपल्याला जितके मूर्ख बनविले जाते तितके इतर जाहिराती पाहिल्यात तर फक्त डिटर्जंट्स = कपड्यांचे साबण दिसतात. कपडे=सरोगेट स्किन?
असो.

***

रच्याकने,
केसांमुळे सेन्सेशन्स मधे इतकी एन्हान्समेंट असेल, तर शरीरावरच्या 'इतर' केसांच्या (मुळांच्या) पोषणासाठी स्पेशल गुजगोष्टी शांपू असतात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ते केस काढायची परंपरा आहे. आणि त्यासाठी खासंखास उत्पादनं मिळतात. डोक्यावरचे केस कापायला वापरली जाणारी यंत्रं तिथे वापरत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकाच शरिराच्या काही भागातील केस जोमाने वाढावेत म्हणून त्यांना पोषण आहार, अन इतरांची सरळ कत्तल?? तीही खासम्खास साधनांनी? बहुत नाइन्साफी है ये Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गाडीवर वॅक्स लावले कि तिची त्वचा तजेलदार दिसते.
डेड, इज डेड.

गाडी आणि शरीराच्या त्वचेत फरक आहे. वरच्या स्तरातल्या निर्जीव पेशीखाली नवीन पेशी बनण्याची प्रक्रिया चालू असते. नुस्ते तेल/ मेण सदृश पदार्थांनी सूक्ष्म खळगे भरून गुळगुळीत करणे एवढा हा मर्यादित विषय नाही. कुठल्या 'वरून' लावलेल्या पदार्थांनी त्वचेचा पोत, डाग, कोलिजिनची निर्मिती, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, छिद्रांचा आकार, अतिसूक्ष्म सुरकुत्या इत्यादीत सुधारणा होऊ शकते किंवा नाही यावर खूप संशोधन झाले आहे, होत आहे.

त्याच्या मुळाशी जीव आहे, याला अर्थ नाही. मुळे मजबूत तर केस मजबूत! असतील कदाचित. .

मुळाशी जीव असला तरी वरचा केस निर्जीव असतो हे खरे. मुळांच्या मजबूतीमुळे निर्जीव केसाला मजबूती येत नाही. पण वरचा केस खराब झाला तरी मुळातून वाढणारा नवा भाग चांगला उगवतो आणि धरून ठेवला जातो. पण केसाच्या वरचे आवरण खराब झाले तर मुळे चांगली असूनही ती ते दुरुस्त करू शकत नाहीत. अशा वेळी तेल, कंडीशनर आणि तत्सम उपायांनी तेवढ्यापुरती सुधारणा होऊन केस चांगले दिसतात/ वाटतात.

तरीही, केस अन चामडी यांचा रंग, तुकतुकितपणा, इ. बद्दल जाहिरातींतून आपल्याला जितके मूर्ख बनविले जाते तितके इतर जाहिराती पाहिल्यात तर फक्त डिटर्जंट्स = कपड्यांचे साबण दिसतात. कपडे=सरोगेट स्किन?

प्रसाधनांच्य जाहिरातीत आकर्षक वाटणारी पण धादांत खोटी/ अतिरेकी/ आभासी(...skin appears to look firmer...etc) केली जातात याला १००% सहमती. पण ते फक्त प्रसाधने किंवा साबणांपुरतेच लागू आहे असे मात्र अजिबातच नाही.
सरोगेट स्किनचे काय ते समजले नाही , पण ते असो.

त्याबाबतीत माझा अभ्यास कमी आहे असे म्हणू हवेतर

आपणच काय हवे ते म्हणा, आम्ही तर ब्वॉ कैच्च बोलत नै. Smile

जरा खौचटपणा:
आडकित्तेसाहेबांकडून 'माझा अभ्यास कमी आहे' हे एवढे चार शब्द आले हादेखील अदितीबैंच्या शिरपेचातील तुरा आहे.
(अकि हल्के घेणे )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते कपड्यांचं टंकाळा आला म्हणून सोडून दिलं होतं लिवायचं

जाहिरातींत मुख्यत्वे केस, स्किन यांचे शांपू, साबण, तेले, कंडिशनर, सनस्क्रीन, गोरे बनवणारी क्रीम्स इ. व त्यानंतर कपड्यांचे साबण, अन कंडिशनर यांच्याच जाहिराती प्रचण्ड प्रमाणात दिसतात. केस हे त्वचेचेच एक उपांग आहे. तसंच ती त्वचा शरीर झाकायला आहे, - त्वचेप्रमाणेच शरिराचे उन/पाउस/थंडीपासून रक्षण करणारे कपडे आहेत, यावरून या एकाच अवयवावर, त्यातही जिथे जास्त प्रमाणात मृत पेशींचेच बाह्य आवरण आहे, आपण किती लक्ष देतो, असं काहीसं डोक्यात होतं.

त्वचारोग हा माझा विषय नाही, त्यामुळे यात अभ्यास कमी आहेच Wink अन बाकी आम्ही नोइटॉल1 आहोतच Blum 3

होळीचा धागा म्हणुन अंमळ दंगा घालत बसलोय, बाकी काही नाही.

----------------------------
1. know it all
2. सबब, हलके घेणे!
३. टीपा, तळटीपा इ. देण्याची किच्चकट सवय अंगी बाणविण्याचा प्रयत्न करतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'अंडी आणि केशसंवर्धन' वेगळा धागा निघालाच पाहिजे (वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या चालीवर वाचावे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

३. टीपा, तळटीपा इ. देण्याची किच्चकट सवय अंगी बाणविण्याचा प्रयत्न करतो आहे. >> का? तळटीपसम्राटांना गुलाबी पत्र अत्तर वगैरे टाकुन येतात म्हणुन? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंड्याने केसांचे पोषण होत नाहीच. आणि म्हणूनच ते वाक्य अवतरणचिन्हात दिले आहे. प्रतिसाद पहावा. टीनएजमध्ये ते माहित नव्हते म्हणून वयाचा उल्लेख केलेला आहे. त्या वयात असे काहीतरी करून बघण्याची प्रवृत्ती असते.

केस निर्जीव असला तरी अंड्यातील स्निग्ध पदार्थांनी त्यावरील खवलेदार आवरण जास्त गुळगुळीत होते आणि केस चमकदार दिसतात. दुसरे म्हणजे ते किंचित भरदारही दिसतात. काही काळ तरी. पण कंडीशनिंग करणारे खूप अधिक चांगले अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असताना दिवसभर वास मारणारे अंडे केसाला कशाला लावावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केशसंवर्धनावरची ही चर्चा वाचून पूर्वी पाहिलेली शकुंतला हेअर ऑइलची व्यांगचित्ररूप जाहिरात आठवली.

प्रवासातून मुलगी घरी परतते आणि बॅगेतून एक घोंगडे बाहेर काढते. ते पाहून आई: "गधडे. तरी तुला सागितलं होतं की शकुंतला हेअर ऑइलची बाटली आणि चादर शेजारीशेजारी पॅक करू नकोस!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अद्यापही अशी जमात अस्तित्वात आहे अन ती फक्त ब्राह्मणांपुरती मर्यादित नाही. कैक लिंगायत, झालंच तर अनेक गुज्जू-मारवाडी लोक असे आहेत. कैक ब्राह्मण अजूनही अंड्यासही शिवत नाहीत यद्यपि मांसाहार्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

बाकी मलाही अंड्याचा वास आवडत नाही. चिकन इ. खायला सुरुवात केल्यापासून तर अंडे खाणे ना के बराबर झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जैन धर्मिय म्हणायचंय का तुम्हाला?
अहो, चखन्याला बटाट्या ऐवजी केळ्याच्याच चिप्स खातात ते! का, तर जमीनीखाली उगवणारी कंद्/मुळे 'मांसल' असतात. किती तो सात्विकपणा!!

(*सदर कॉमेंट इतरत्र पूर्वप्रकाशित. सर्व हक्क स्वाधीन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लार्जलि जैन, पण बिगरजैनही पाहिलेत.

बाकी सात्विकपणा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(वेगळा मुद्दा असल्याने वेगळा प्रतिसाद दिला आहे)

"वास, ही दुरून घेतलेली चव असते."
वास आवडत नाही, तर अंडी कशी काय खाता तुम्ही ब्याटोबा? मासेखाऊ, त्यातही बंगालमध्ये म्हणजे समुद्रातली मासळी, जास्त वास, अशी तुम्हाला आवडते/ली अशी आमची समजूत आहे ती चुकीची आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ROFL

मुद्दा बरोबर, पण ती चव आमच्या नाकाला तादृश आवडत नै असे समजा. जिव्हेला यद्यपि चालत असली तरी वेगवेगळ्या अवयवाचे नखरेही वेगवेगळे असणारच, नै का?

अन खरे तर मासळीही आम्हांस आत्ताआत्तापर्यंत आवडत नसे-वासामुळेच. अलीकडे मात्र त्यावर मात करण्यात यश आलेय ते भेटकीसारख्या बिनवाशी कमकाटी उत्तमचवी माशांमुळेच.

बाकी बंगालमध्ये गोड्या पाण्यातील मासळीच जास्त चालते इन जण्रल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं