भगवद्गीता: मुख्य देवतेला कसे ओळखावे?

येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I
तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l
न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l
(भगवद्गीता ९.२३ व २४)

अर्थ: भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणाले, अर्थात कुठल्या ही देवतेची पूजा करा, ती पूजा मुख्य देवतेपाशी पोहचते आणि त्यानुसार भक्ताला त्याचे फळ ही प्राप्त होते.

भक्ताने विचारले स्वामीजी, हे कसें शक्य आहे?

स्वामी त्रिकालदर्शी: इतर देवतांची पूजा करणारे लोक जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन असतात, त्यांचे अध्यात्मिक पातळी कमी असते आणि मुख्य देवतेला ओळखणे त्यांना शक्य नसते.

भक्त: स्वामीजी, मुख्य देवतेला कसे ओळखावे?

स्वामी त्रिकालदर्शी: ज्या देवतेच्या समोर अन्य देवता हात जोडून उभ्या असतील. तीच मुख्य देवता. जसे श्रीरामा समोर हनुमंत हात जोडून उभे असतात. श्री राम मुख्य देवता आणि हनुमंत कनिष्ठ देवता. कनिष्ठ भक्त हनुमंताची भक्ती करतात आणि त्याला नवैद्य दाखवितात. श्री रामाच्या कृपेचा प्रसाद त्यांना ही मिळतो. हे असेच आहे, जसे संकटात अडकलेला माणूस सरकारी कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्याला नेवैद्य अर्पित करतो आणि वरिष्ठांची कृपा त्यावर होते. आपल्याला देशात हनुमंताचे मंदिरे अधिक दिसतात कारण सामान्य माणूस अर्थात कनिष्ठ भक्त मुख्य देवता ओळखण्यास समर्थ नसतो. हरकत नाही. मुख्य देवतेच्या सेवकावर सुद्धा वक्र दृष्टीने पाहणे कुणाला ही शक्य नसते म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे, ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे’.

उच्च अध्यात्मिक पातळी असलेले भक्त, मुख्य देवतेला ओळखतात. विभीषण आणि सुग्रीवाने श्री रामाची भक्ती केली, दोघांना श्री रामच्या कृपेने राज्यपद लाभले. मोठे फळ मुख्य देवतेच्याच कृपेने प्राप्त होते. अर्थात कनिष्ठ देवतेची भक्ती केल्यास लहान-सहन कामे पूर्ण होतात. मुख्य देवताच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, त्याचाच कृपेने देशाचा कारभार चालतो. मुख्य देवतेला न ओळखणारे चुकीच्या देवतेची भक्ती भक्ती करतात आणि संकटात पडतात. अश्या मूढ भक्तांचा सर्वनाश अटळ असतो.

भक्त: स्वामीजी, आपल्या देशात अनेक देवता आहेत. त्या आपसांत भांडतात ही. अश्या परिस्थितीत मुख्य देवता कशी ओळखायची? कुठल्या देवतेला मतरुपी नेवैद्य अर्पित करावा.

स्वामी त्रिकालदर्शी: मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात. काही देवता हात जोडून समोर उभी राहतात. पूर्वी महाभारताच्या काळी, इंद्राने कर्णाची कवच-कुंडले मागून, त्याला शक्तीहीन केले होते. त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे ‘शुकास्त्र’ असते. मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते. शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात. अश्यारितीने मुख्य देवता कनिष्ठ देवतांना अर्पित केलेला नैवेद्य (मत) हरण करते. भक्त गोंधळात पडतो. वत्सा तुला माहितच आहे रामायणात बाली ज्याच्या बरोबर युद्ध करीत असे, त्या योद्ध्याचे अर्धे बळ बालीला मिळत असे. त्यामुळे त्याला पराजित करणे कोणत्याही योद्ध्याला शक्य नव्हते. स्वयं श्री रामाला बालीवधासाठी क्षत्रियांना न शोभणारा मार्ग वापरावा लागला. असो. मुख्य देवता ही प्रसन्न होऊन, कनिष्ठ देवतांना ‘सुवर्णास्त्र’ प्रदान करते. सुवर्णास्त्राच्या कृपेने कनिष्ठ देवता स्वर्गसुखाचा उपभोग घेतात. कनिष्ठ देवतांची भक्तांवर कृपा करण्याची क्षमता ही कमी असते, त्यांच्या भक्तांच्या पदरी निराशाच पडते. दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणतात, अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिताअन्य देवतांची उपासना करतात आणि त्यांचे पतन होते. अध्यात्मिक दृष्टीने उन्नत लोक मुख्य देवतेला ओळखतात आणि तिची पूजा करतात आणि आपल्या सर्व भौतिक कामना पूर्ण करतात. वत्सा, आध्यात्मिक पातळीच्या उच्च स्तरावर पोहचल्यावर तू ही मुख्य देवतेला ओळखण्यास समर्थ होईल. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

रोचक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा रोचक, पण प्रतिसाद येतील खोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अर्थ: भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते.

मुसलमान लोक मूसा/मोझेस, ईसा/जीजस या अब्राहमिक परंपरेला मानतात. त्यांच्या समजानुसार मूसा आणि ईसा हे दोघेही कुराणाचाच संदेश कथन करत होते. पण लोकांना तो न समजल्याने सगळा घोळ झाला आणि म्हणून प्रेषित महम्मदाने मग कुराणाचा खरा संदेश लोकांना सांगितला. वरच्या गीतेतल्या कथनातून त्याची आठवण होते.

>> स्वामीजी, आपल्या देशात अनेक देवता आहेत. त्या आपसांत भांडतात ही.

अलिकडेच झालेल्या देवतांमधील अशा भांडणाची काही माहिती देता येईल का? पेपरमध्ये कधी वाचायला मिळाले नाही. Sad भक्तांची भांडणे होतात असे वाचायला मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमच्यासारख्या ओरिजिनल अश्रद्धांना वाटते की हे सर्व देव, त्यांच्या कथा आणि पुराणे, त्यंच्या तथाकथित लीला हे सर्व हिंदु मानवी मनाचे गेल्या दीड-दोन हजार वर्षातले खेळ आहेत. मोठी माणसे मुलांच्या भातुकलीकडे आणि त्यातल्या हर्षामर्षांकडे जितक्या सहनशील दुर्लक्षाने पाहतात त्याहून अधिक लक्ष ह्या पुराणकथांकडे द्यायची आवश्यकता नाही. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा स्रोत म्हणून अशा कथांचे वाचन करा, त्या लक्षात ठेवा पण त्यांच्यावर शब्दशः विश्वास ठेवू नका. जगात कसे वागावे ह्यासाठी स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला मार्गदर्शक करा. ती तुम्हाला नेहमीच योग्य रस्त्यावर ठेवील. त्यासाठी कृष्णभगवान काय म्हणतात इकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैवेद्य, मते, सुवर्णास्त्र इ उल्लेखांकडे आम्ही पाहता हे केवळ पुराणकथांवरील भाष्य वाटत नाही हे आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचणार्यांना कळावे म्हणून काही शब्द वापरले. बाकी 'जाकी राही भावना जैसे प्रभू मुरत देखी तिन तैसी'. काही महिन्यानंतर लेख वाचल्यावर अर्थ कळेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रुपक'-दृष्टांत आवडला.
सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हा अधिकच खुलून दिसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुख्य देवता कोण हा प्रश्न कायमच आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरलेला आहे. एक काळ असा होता की भक्तांना कुणाची पूजा करायची याचं स्वातंत्र्य नव्हतं. ठरलेल्या देवासमोर त्यांना गुढगे टेकवणं आणि हात जोडणं भाग होतं. नंतर ही परिस्थिती बदलली. भक्तांच्या संख्येप्रमाणे देवस्थानं आणि पर्यायाने त्यातील देवता मुख्य - कनिष्ठ वगैरे ठरायला लागल्या. मग अर्थातच भक्तगणांना खुष ठेवणं हेच देवाचं काम व्हायला लागलं. महाआरत्यांसाठी महागुरु बोलावले जाऊ लागले. आरत्यांच्या आधी आरास-सजावट झगमगीत डिस्को लाइट लावून, आणि देवाचा जैजैकार डॉल्बीचे स्पीकर्स ढाण ढाण करून व्हायला लागले. आणि मुक्त हस्ताने तीर्थ-प्रसाद वाटणं तर जुनीच गोष्ट. पण तिलाही एक राजेशाही थाट आला. बाजारांची देवळं झाल्यावर देवळांचे बाजार झाले नाही तर काय होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक काळ असा होता की भक्तांना कुणाची पूजा करायची याचं स्वातंत्र्य नव्हतं. ठरलेल्या देवासमोर त्यांना गुढगे टेकवणं आणि हात जोडणं भाग होतं.

कसं काय बॉ? देवांचा सेट ऑफ चॉइस फायनाईट असला म्हणून स्वातंत्र्य नव्हतं असं तर नै ना म्हणायचंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लादलेला देव या अर्थाने चॉइस नव्हता. आता निदान निवडण्याचा थोडा फार चॉइस असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव कोणी लादल्याची उदा. निदान भारतात मला माहिती नाहीत. अमुकच एका देवाची आराधना करा नैतर फेस द कॉन्सिक्वेन्स असे भारतात कुठे झाल्याचे मला दिसले नै. उदा. असेल तर पहावयास आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी खंडीभर उदाहरणं आठवतीलच खनपटीला बसल्यास. पण तूर्तास लगेच आठवलेलं - हिरण्यकश्यपू - प्रल्हादाचं काय झेंगट होतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पौराणिक उदा. वेगळं अन प्रत्यक्षातलं वेगळं. प्रत्यक्षातलं उदा. पाहिजे. तसं तर मग द्रौपदीचं उदा. घेऊन अनेक पती करण्यास भारतीयांची संमती होती असेही म्हणता यावे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शैववैष्णवांच्या हाणामार्‍या, चार्वाकाचा छळ, जिझिया कर... फार मागे कशाला, ते ग्रॅहम स्टेन्सच्या खुनाचं प्रकरण? ते काय होतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्केलचा विचार व्हावा असा मुद्दा समोरुन येउ शकतो मेघनात्ते.
"भारतीय भूमीला अलिकडच्या इतिहासात व्यापक हिंसक महायुद्धाचा किंवा यादवी युद्धाचा अनुभव नाही " असं कुणी म्हटलं तर लागलिच "आमच्याकडे दंगली नियमित होतच नाहित का" , "फाळणीच्या वेळेला केवढा प्रचंड रक्तपात झाला" किंवा इतर हिंसक घटना १९८४ शीख मुद्दा, १९९२ दंगल, २००२ गोध्रा गुजरात प्रकरण हे सगळे समोर येते.
पण तरीही ह्या सगळ्याची एकत्रित स्केल किती ? ह्यामुळे जनमानसाची दंगल करायची रग एकदाची जिरली का ?
युरोपची तशी रग बर्‍अयच प्रमाणात जिरलेली दिसते द्वितीय महायुद्धानंतर .
कारण दोन्ही महायुअद्धतल्या आकड्यांवर नजर टाकली तर डोळे गार होतात.
पहिल्या महायुद्धात फ्रेंच - जर्मन लढाइ, वर्देंन इथं चक्क सात लाख माणसं माणसं मारली गेली काही महिन्यात.
अशा कैक लढाया दोन्ही महायुद्धात मिळून झाल्या.
अणू बॉम्बचा विध्वंस वजा केला तरी जे उरतं तेसुद्धा युद्ध महाविध्वंसक म्हणता येइल असं होतं.
(युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात तर कहर झाला होता. बॅटल ऑफ बर्लिन मध्ये जर्मनांची लै वाईट लागली. इतर कैक शाहरे शब्धश राख, बेचिराख झाली. तिकडे रशियातील स्टॅलिनग्राड, लेनिनग्राड आणि ग्रीसपाशी क्रीटच्या लढायात तर आख्ख्या जर्मनीचा तारुण्याचा मोहोर कापला गेला.समूळ नायनाट! हेच ब्रिटिश, रशियन ह्यांनाही भोगावं लागलं इतर काही लढायात.)

तर सांगायचं म्हणजे हे असलं अलिकडच्या काळात भारतावर काही कोसळलं नाही; असं माणूस म्हणतो तेव्हा तो " त्या स्केलवर काही झालं नाही" असं म्हणत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझा नाकेबराबर तोकडा अभ्यास असल्यामुळे 'हा मुद्दा मान्य आहे' असं म्हणणं क्रमप्राप्त आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारतातच नाही तर जगातच अंतर्गत व दोन वा अधिक देशांतीलही हिंसेचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाले आहे (एक काळ असा होता, अनेक देश, खंडच्या खंड यादवीयुद्धे, स्वातंत्र्यलढे यात गुंतलेले होते. त्या मनाने दोनेकशे देशांपैकी आता एखाद-दुसर्‍या देशात यादवी सुरू असते, तीही काही आठवड्याच्या वर टिकत नाही, त्यातही जीवहानीपेक्षा वित्तहानीच अधिक होते)

त्या तुलनेत भारतात इतक्या दंगली होणे फारसे भुषणावह नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भूषणावह नाहिच.
पण भारतीय समाजमानसाला तितक्या व्यापक हिंसेचा इतिहास्/स्मृती नाही; असे म्हणणे आहे.
खुनाखुनी , जाळपोळ अयोग्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारतात एकावेळी मोठ्या संख्येने हिंसा होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे असे सकृतदर्शनी म्हणता येईल कदाचित.

मात्र भारतभर एखाद-दोन एखाद-दोन करत होणार्‍या हिंसेचे प्रमाण बघितले तर एकुणात परिस्थिती फारशी आशादायक वाटत नाही. जातीबाह्य प्रेमप्रकरणातून खून, हुंडाबळी, लहान-सहान जातीय दंगली, क्वचित धार्मिक दंगली, शेतकर्‍यांवरील गोळीबारासारख्या घटना, नक्षलवादी हिंसा, अभिव्यक्तीस्वांतंत्र्याची गळचेपी करणारी आंदोलने, पुस्तके-चित्रपट-नाटकांवर बंदीसाठी वित्तहानी, भ्रुणहत्या, नरबळी, ऑनर किलिंग वगैरे अनेक ठिकाणी चालु असणारी लहान स्केलची मात्र अधिक घातक व वरवर लक्षात न येता हळुहळू भिनत जाणारी हिंसा अधिक घातक व दूरगामी परिणाम करणारी आहे असे माझे मत आहे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुद्दा असा आहे की देवता निवडीचे स्वातंत्र्य भारतात आधी नव्हते अन आता जास्त आहे इ.इ. ग्रॅहम स्टेन्सचे उदा. तर अगदी अलीकडचे, ते तर मुद्याला कौटरच जाते.

भारताच्या इतक्या मोठ्या इतिहासात मुस्लिम कालखंड सोडला तर शैववैष्णव झगडे, शशांक अशी २-३ उदा. सोडल्यास सक्तीची घाऊक उदा. कोणीतरी दाखवूनच द्या बॉ.
तशी जर घाऊक उदा. सापडली- अ‍ॅक्रॉस स्पेस & टाईम, तर मीही तुम्हांला अनुमोदन देतो. पण सापडत नैत तोवर असे घडण्याचा पॅटर्न नव्हता, असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे.

आयसोलेटेड घटना काय घडतच राहतात. सोमनाथाचे देऊळ फोडणारा गझनीही स्वतःच्या नाण्यांवर संस्कृत भाषा वापरतच असतो, पण त्यावरून कोणी त्याच्या हिंदुधर्मसहिष्णुतेचा अंदाज लावू पाहील तर ते चूक आहे.

अन चार्वाकाचा छळ कोण केला? याचा उल्लेख कुठल्या ग्रंथात आहे? तो ग्रंथ किती जुना आहे?

मुस्लिम काळातही मुघलपूर्व कालखंडात हे जास्त बघायला मिळते. मुघल काळात इतके नव्हते-औरंगजेबाचा सणसणीत अपवाद वगळला तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे बरंय राव. उदाहरणं दिली की मग 'हां, ते पुराणातलं आहे', 'ते अपवादात्मक', 'ते मुस्लिम राजवटीतलं', 'ते अगदी अलीकडचं'... अशी रद्दबातल करायची. पण हे सगळं भारतातच घडलं की नाही?

असो, हा काही माझ्या अभ्यासाचा विषय नाही. लिहिण्याचा उद्देश हा की 'तुलनेनं' भारतीय लोक सहिष्णू / उदासीन मानले गेले असले, तरीही धार्मिक छळ आणि त्यावरून हाणामार्‍या इथेही होत्याच. अजूनही आहेत. प्रकार निराळे असतील. प्रमाण कमीजास्त असेल. पण भारतीय लोक धुतल्या तांदळाचे होते, असा सरसकट बचाव करणं अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अंहं. आजिबात नाही.

भारतात अमुक एका गोष्टीचा पॅटर्न होता असा क्लेम असेल तर त्याला स्पेस, टाईम, अशी बंधने घातल्याशिवाय प्रतिपादनात शिस्त येत नाही. जातिभेद होता हे सत्य आहे कारण कैक ग्रंथांतून अन अन्य ठिकाणांतून त्याची माहिती मिळते. मुस्लिम कालखंडात कत्तली अन बाटवाबाटवींची उदा. त्या त्या राजांच्या क्रॉनिकल्स मधून डीटेलवारी मिळते. कुतुबमिनारच्या जवळ जी कुव्वतुल इस्लाम मशीद आहे, तिथे एक शिलालेखच सांगतो की ही मशीद उभारायला २७ देवळे पाडली म्हणून. अन हे फक्त दिल्लीत नै तर दक्षिणेतही झालेले आहे.

शैववैष्णवांचे झगडे तमिऴनाडू सोडून कुठे झाले? शशांकाने बौद्धांचा छळ केला असे म्हणतात, पण त्यासारखे किती राजे होते?

आयसोलेटेड घटनांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये कारण त्यातून आपला इन्फरन्स स्क्यू होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

देव कोणी लादल्याची उदा. निदान भारतात मला माहिती नाहीत. अमुकच एका देवाची आराधना करा नैतर फेस द कॉन्सिक्वेन्स असे भारतात कुठे झाल्याचे मला दिसले नै. उदा. असेल तर पहावयास आवडेल.

कपाळाला हात लावण्याची स्मायली हवी तेव्हा सापडत नाही नेमकी! अहो बॅटकाका, विवेक पटाईतांनी ज्या अर्थाने 'देवता' हा शब्द वापरला होता त्याच अर्थाने मी वापरला. असो, त्यांनी म्हटल्याप्रमाणे काही महिन्यांत या सगळ्याचा उलगडा होईलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

असो. गफलत झाली खरीच ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं