Skip to main content

बाळाची शर्यत-

'
एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .

तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .

पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .

सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .

नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.

विदेश Tue, 13/05/2014 - 12:47

अरुण जोशी- उशीरा आभार मानतोय. क्षमस्व !