<पीएमएस उर्फ बाई गं, जरा बाजूला बस.>

बरेच दिवस हा विषय डोक्यात होता. पण निमित्त मेघनाच्या धाग्याचं झालं. त्यामुळे या धाग्याचं पापपुण्य मेघनालाच लखलाभ.
***
मासिक पाळीच्या अनुषंगाने येणारी चिडचीड, त्या दिवसांबद्दलचे गैरसमज, 'ऑन द रॅग' असण्याबद्दलच्या चेष्टा या अतिरंजित असाव्यात असा माझा एक गोड समज होता. नुकताच मला माझ्या मित्र आणि त्याच्या बहिणीबरोबर पर्यटनाचा अनुभव आला आणि माझा समज रीतसर उद्ध्वस्त झाला.

पर्यटनाचा काळच मित्राच्या बहिणीची पाळी चालूहोण्याआधीच. मित्राची बहीण म्ह्टलं तर स्त्रीवादी आणि म्हटलं तर पारंपारिक गोग्गोड ब्यूटी. तिने तिचा नेहमीचा गोग्गोड ब्युटीफुलपणाच चालू ठेवला असता तर काही प्रश्न नव्हता. पण मुलीनं 'चालू' व्हायच्या आधी अकारण पुरुषांना नावं ठेवण्याची, स्त्रियांना कसं पुरुष (पक्षी: आम्ही) वाईट वागवतो, तिच्यावर कसा अन्याय होतो, हे जरा जास्तच स्पष्टपणे सांगण्याची अकारण इच्छा होत होती. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिने ती अमलात आणली. मित्राला तिच्या स्वभावाचा वैताग आणि मला या सगळ्या विनोदी प्रकाराचा निषेध करण्याची खुजली. परिणामी दिवसभर बडबडताना तिची पिरपीर सुरू झाली रे झाली की मित्र आणि मी गजाननमहाराजांचे उपासक असल्यासारखे लांब जाऊन एक सिगरेट ओढून येत असू.

यात अनेक गप्पा झाल्या
"या दिवसांत बायकांच्या डोक्याचं तपमान वाढलेलं असतं. म्हणून आपण त्यांच्या जवळ जाऊ नये. आपला उत्साह नक्की करपून जातो."
"पुरुषांना या दिवसांत विश्रांतीची नितांत गरज असते."
"नि मुद्दामहून विषाची परीक्षा पाहायला जावं कशाला? आपणच लांब बसावं"
"एकीची पिरपीर चालू झाल्याचं कळलं की लगेच दुसरीची चालू होतेच होते..."
"पपई / खजूर वगैरे काहीतरी खायला घालून, लेबर इंड्यूस करतात तसं इंड्यूस करता आलं असतं तर..."
....
एक ना दोन. यातल्या बर्‍याच गोष्टींचा काही उपयोग नाही हे स्वयंस्पष्ट होतं. काही प्रयत्न करावा, इतकीही त्या विशफुल थिंकिंगची लायकी नव्हती. पण मुदलात या विषयावर काही बोलायची अनिच्छा / संकोच / भीती, विषयाबद्दलचे गैरसमज आणि भल्याभल्या शिक्षित घरांमधे चालू ठेवली जाणारी निरर्थक परंपरा - हे सगळं अंगावर आलं खरं. तेव्हापासून काही प्रश्न डोक्यात घोळताहेत.

१. 'तिची पाळी सुरू होणार आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
२. तुमची गर्लफ्रेंड/बायको असं वागायला लागली की केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणून देण्यात तुम्हांला संकोच/भीती वाटते का? का?
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत नसल्यास या दिवसांत मुद्दामून असलं काहीतरी काढून गर्लफ्रेंड/बायकोजवळ न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? नसल्यास का नाही?
४. तुमच्या गर्लफ्रेंड/बायकोची पाळी एकदाची आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करून आनंद साजरा करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? नसल्यास का नाही?
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
***
'ऐसी' हे तसं पोलिटिकली करेक्ट संस्थळ आहे याची मला कल्पना आहे. इथे इतक्या पुरुषी प्रश्नांची चर्चा करण्याची पद्धत कदाचित नसेलही. अनेकांना या विषयावर बोलणं काहीसं भीतीदायकही वाटू शकेल. पण माझ्या मित्राच्या अनुभवानंतर मी या विषयाबद्दलची लोकांची मतं ऐकायला आणि त्यांच्या घरांतल्या प्रथा जाणून घ्यायला उत्सुक आहे. प्रश्नांची ही सैल चौकट केवळ सुरुवात करण्यापुरतीच आहे. त्यात प्रश्नांची भर घातली, अनुभव सांगितले, निराळ्या दिशेनं चर्चा गेली, तरीही ते स्वागतार्हच आहे. (नसून सांगता कुणाला?!) पण तुमच्या गर्लफ्रेंड/बायकोला ही चर्चा 'योग्य' वेळीच दाखवा हा अनाहूत सल्ला.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

Lol!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१. 'तिची पाळी सुरू होणार आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?

खुल्या आवाजात एरवीच फारसं बोलता येत नाही, त्यामुळे आता 'कामाची पाळी' माझी आहे हे सुद्धा दबक्या आवाजात सांगावं लागतं, खर म्हणजे सांगणार तरी कोणाला माझ्या एका मित्राच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपलीच मोरी आणि आपल्यालाच मुतायला करायाला चोरी.

२. तुमची गर्लफ्रेंड/बायको असं वागायला लागली की केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणून देण्यात तुम्हांला संकोच/भीती वाटते का? का?

दोघींना एकाचवेळी असं काही होणं भयंकर असावं, आणि छे संकोच वगैरे वाटत नाही त्यानिमित्ताने घराबाहेर पडता येतं, तणावमुक्त वातावरणात जगता येतं, वास्तविक पहाता ह्यावरचा विनोद आठवला - माणूस पॅड्स अणायला जातो तर सेल्समन त्याला पार फिशिंग रॉड, टेन्ट पासुन बरच काही खपवतो म्हणतो तु घरी काय करणार?

३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत नसल्यास या दिवसांत मुद्दामून असलं काहीतरी काढून गर्लफ्रेंड/बायकोजवळ न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? नसल्यास का नाही?

कधी-कधी ऑफिसात काम खूप असतं, पण माझे मित्र महिन्याच्या ठराविक वेळेलाच संध्याकाळचा बराच वेळ आपल्याकडे का घालवतात ह्या प्रश्नाचे उत्तर देता देता नाकी नउ येतात.

४. तुमच्या गर्लफ्रेंड/बायकोची पाळी एकदाची आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करून आनंद साजरा करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? नसल्यास का नाही?

बाहेरुन जेवण मागवतो, त्यात गोड असतंच, त्यानिमित्ताने जरा बरं जेवायला मिळतं.

५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?

मी शहर आणि ग्रामीण भागाच्या मधे रहातो आणि आमच्या घरात शिक्षणाची परंपरा असावी अशी माझी आज्जी सांगते, घरातले लोकं धार्मिक असावेत म्हणजे घरी आल्यावर हात-पाय वगैरे धुतात, त्यामुळे मलापण हात धूवून हा प्रतिसाद द्यावा लागला हाच काय तो फरक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२. तुमची गर्लफ्रेंड/बायको असं वागायला लागली की केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणून देण्यात तुम्हांला संकोच/भीती वाटते का? का?

भीती वाटत नसेल तर वाटायला हवी. दर महिन्याला कसली आल्ये खरेदी. एका प्रकारचा पॅक दोन-तीन महिने पुरतो. या पुरुषांना वेव्हारज्ञान म्हणून नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या पुरुषांना वेव्हारज्ञान म्हणून नाही.

ओ तै, तुमच्या लक्षात येत नाही. पुरुष बिचारे त्या काळात काय वाट्टेल ते कारण सांगून बाहेर जायला बघतात. त्यासाठी आधीचे चार पॅक पडलेले असतानाही, केमिस्टकडे जाऊन मागण्याची लाज वाटत असतानाही जातात... त्यांना त्या अर्ध्या तासात मिळणाऱ्या शांततेचं मूल्य शंभर पॅकइतकं असतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुष बिचारे त्या काळात काय वाट्टेल ते कारण सांगून बाहेर जायला बघतात.

अर्ध्या तासात मिळणाऱ्या शांततेचं मूल्य शंभर पॅकइतकं असतं!

बाहेर जाऊन जे काय मिळतं त्याला शांतता म्हणणारे तुम्ही पह्यलेच बघा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

निळ्या, बाळा, का तू असा आपला अननुभव जाहीर करतो आहेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दे संपले की माणसं व्यक्तिगत बोलू लागतात ती अशी!

असो. तुम्ही खरेदीच करायची तर सरळ फिशरॉडच का आणत नाही? नसती रडारड कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्य धन्य ते गुर्जी ROFL ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> अनेकांना या विषयावर बोलणं काहीसं भीतीदायकही वाटू शकेल. <<

सर्व प्रश्नांची उत्तरं अनुभवाअभावी 'नॉट अ‍ॅप्लिकेबल'. फक्त, तपशीलात एक दुरुस्ती सुचवेन. मी 'भीती' असा शब्द वापरला नव्हता, तर -

विषयाचा टॅबू नसेल त्याला तरीही त्याला मुळातच अनुभव नसण्याची शक्यता उरतेच. म्हणजे अशा वेळी त्याला कोपरखळी मारायला बोलतं करण्यासाठी किंवा तुमचं त्या विषयावरचं इनोदी बोलणं ऐकावंसं वाटण्यासाठी त्यातदेखील काही तरी 'समअनुभवी इनोदी' असायला हवं. आणि ते नसलं तर समोरच्याची विनोदमूढता स्वीकारताही यायला हवी.

म्हणजे 'अनुभवाभाव' किंवा 'विनोदमूढता' म्हणता येईल, पण 'भीती' शब्दाची जबाबदारी मी उचलत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इथे सैतानाऐवजी गुर्जी म्हणायला हरकत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खल्लास ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"पपई / खजूर वगैरे काहीतरी खायला घालून, लेबर इंड्यूस करतात तसं इंड्यूस करता आलं असतं तर..."

इंड्यूस करण्याचे बरेच उपाय आहेत...पण या पुरुषांना वेव्हारज्ञान म्हणून नाही! त्यातला शेवटचा उपाय तर (उभयपक्षी) उपयुक्त असू शकतो... पण काय आहे ना, भितीपोटी जन्मलेली, 'त्या दिवसांत' बायकोजवळ न फिरकण्याची जाचक अंधश्रद्धाळू परंपरा अनेकांना असले उपाय वापरण्यापासून थांबवत असावी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांनी खरोखरच पपईचा ज्यूस प्यायला सांगितला आहे! वॉव!

त्यातला शेवटचा उपाय तर (उभयपक्षी) उपयुक्त असू शकतो...

तै, त्यात केवढा अप्रोच अव्हॉडन्स कॉन्फ्लिक्ट आहे, हे तुम्हाला कळलं तर तुम्ही वेव्हार कळत नाही, अंधश्रद्धा वगैरे बोलणार नाहीत. 'आगीचा त्रास होत असेल तर उपाय सोप्पा आहे, त्या आगीच्या आणखी जवळ जायचं! मग ती आप्वॉप थंड होते' या लेव्हलचा तुमचा सल्ला आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आगीचा त्रास होत असेल तर उपाय सोप्पा आहे, त्या आगीच्या आणखी जवळ जायचं! मग ती आप्वॉप थंड होते'

अगदी अगदी.
नाणीजकर नरेण्द्र महाराज म्हणे मधुमेह्याला दाबुन साखर खायला सांगायचे. लोहा लोहे को काटता हे, हे लॉजिक!

बाकी ह्या भारतीय मानवी प्रजननाच्या झोलाने (स्त्रीवक्षा) पपई वर भयानक अन्याय केला आहे. कुटुंबनियोजनाचे बोधचिन्हच असायला हवी ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

गुर्जी हे Parody Makers' Squad चे अग्रणी हे लिहायला विसरलोच ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL हहठा. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कहर! धागाही नी 'मी'चा व अमुकचा प्रतिसादही!
तिघांनाही __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL कहर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धागा तो धागा, प्रतिसाद सुभानअल्ला!

- (गुर्जींची 'सैल चौकट' आवडलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0