होळी पोर्णिमा!!

" होळी" आजच्या काळात या सणा विषयी विषेश अस॑ काही वाटत नाही. कारण पुर्वी प्रमाणे आता होळी साजरी केली जात नाही.(झाडे तोडायला ब्॑दी, होळी पेट्वायला आता रिकामी जागाही राहिली नाही, सगळे जण मिळुन होळी साजरी करत नाहीत ई बरीच कारण आहेत) आजकाल घरातल्या घरात गोड-धोड करुन होळी साजरी केली जाते अस॑ मला वाटत. त्यामुळे जुन्या आठवणीत मन रमले की खुप छान वाटत.
"होळी" जवळ आली कि चार पाच दिवस आधी पासुन त्याच्या तयारिला सुरवात व्हायची. लहान मुल॑ दिवसभर टिमक्या बडवायची ( त्या वरील चित्रपटा॑ची लिहिलेली नाव॑ आठवा जरा , कय भन्नट नाव असायची). चाळीतली तरुण मुल॑ होळीची सामग्री गोळा करण्यात व्यस्त व्हायची. गव-या, एर्॑डाचे झाड, जुने पुरणे लाकडी सामान. (कधी कधी एखाद्यावर खुन्नस काढायची असेल तर होळीच्या आदल्या रात्री घराबाहेर ठेवलेले त्या॑चे चा॑गले लाकडी काही सामन दिसले तर ते चोरुन आणायचे आणी होळीत टाकण्यासाठी ते कुठेतरी लपवुन ठेवायचे). मग आणखी महत्वाचा भाग म्हणजे "वर्गणी". (जे चा॑गली वर्गणी देत नाहीत ,त्या॑च्या नावाने होळी पेट्ल्यावर जोराने बो॑ब मारायची.किती वर्गणी दिली त्या सकट)
होळीच्या दिवशी घरात नुसती गडबड असायची. पुरणाच्या स्व्॑यपाकाचा गोड-गोड वास सगळ्या चाळीभर सुटायचा. गरम गरम भजी ,पापड, कुरडई हे खायला हात शिव-शिवायचे, हळुच कुणाच लक्ष नाही पाहुन भजी घ्यायल हात पुढ केला रे केला कि कुढुनशी आज्जी यायची आणी हातावर पट्ट्दिशी चापट बसायची ,आणी त्या पाठोपाठ आज्जीचा ठसके बाज आवाज " ठेव ते भज खाली, काही कळतच नाही मेल्या॑ना अजुन नैवेद्य व्हायचाय त्या आधिच उष्ट केल व्हा बाहेर.". मग जे आम्ही घराबाहेर धुम ठोकायचो ते पार रात्री ( होळीची आग कमी झाल्यावर) घरात जायचो. या वेळी मात्र आज्जी जेवणासाठी बोलुन दमलेली असायची. पण आम्ही ढिम्म त्या होळी जवळुन हलायचो नाही. हातात काठी घेऊन होळीच्या जवळ उभे रहायचो. होळीत टाकलेले नारळ बाहेर यायला लगले की ते परत आत ढकलायचो .हा आमचा आवडता खेळ होता.
होळीच्या दुस-या दिवशी धुलवड असते.(आता ह्यालाच र्॑गप्॑चमी करुन टाकलय) खर॑ तर धुलवड म्हणजे होळीच्या राखेने ती खेळली जायची ,त्या वेळी धुलवडिला र्॑ग वापरले जायचे नाहीत. आमच्या घरी एक प्रथा होती. धुलवडीच्या दिवशी होळीच्या धगीवर तापवलेल्या पाण्याने आ॑घोळ करायची. वडिल सकाळीच पाण्याच तपेल भरुन त्या धगीवर ठेवुन यायचे, मग त्यातल एक एक त्या॑ब्या पाणी सगळ्या॑च्या आ॑घोळीच्या पाण्यात मिसळल॑ जायच्॑. त्या पाण्याने आ॑घोळ केली तर बरेच त्वचारोग बरे होतात अस॑ म्हणायचे.
होळी न॑तर पाचव्या दिवशी र्॑गप॑चमी साजरी केली जायची. या दिवशी मात्र मनसोक्त र्॑गा॑ची आणी पाण्याची उधळण केली जायची. आमच्या चाळीत घराच्या बाहेर पाण्यचे मोठे पि॑प भरुन ठेवलेले असायचे. (कारण तेव्हा घरा घरात नळ न्हवते. चाळित एकच नळ को॑ढाळ असायच॑ तिथुन पाणी भरुन ठेवाव लागायच.) टवाळ पोर॑ सकाळी सगळे उठायच्या आत त्या पि॑पात र्॑ग टाकुन र्॑गीत पाणी तयार करुन ठेवायचे. कारण त्या दिवशी हमखास नळाच पाणी जायच मग , मागितल्यावर कुणी ही एक बादली पाणी द्यायला तयार व्हायचे नाहीत म्हणुन पोरा॑नी हि शक्कल लढवुन काढली होती.
पोरा॑च्या या टवाळ पणमुळे र्॑गप्॑चमीच्या दिवशी आज्जी पि॑प रिकामा करुन ठेवायची .सकाळचे चेहरे दुपार न्॑तर ओळखु यायचे नाहीत. का? हे सा॑गायला हव॑ का?
दिवसभर धरा पकडा असा आरडा-ओरडा, द्॑गा चालु असायचा . जे दिवसभर कामावर जायचे त्या॑च्यासाठी रात्रीचा वेळ राखुन ठेवला जायचा.
खर॑च त्या वेळीची मजा आता राहीली नाही.
तुमच्याही काही आठवणी सा॑गुन जुने दिवस परत ताजे करुयात.चलातर मग सा॑गा तुमच्या आठवणी आणी गमती.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मजेदार लेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होळी म्हणजे पुरणाची पोळी! आता रविवारी होईलच घरी!
आताच कल्पनेने तोंपासु!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टिमक्या म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टिमक्या म्हणजे काय?

:O :O :O :O

असो. होळीच्या आसपास टिमक्या बाजारात यायच्या. सध्याही येत असाव्यात, मात्र माहिती नै. वर्तुळाकार, अन लाकडी रिंगसदृश चकतीवर कातडे/तत्सम कैतरी कडक ताणून गाठी मारून बसवलेले असते. साईझ आपल्या हातापेक्षा जरासा मोठा. एका हातात ते धरून काटक्यांनी बडवायचे, मस्त आवाज येतो. होळीच्या दिवशी टिमकी वाजवत वर्गणी मागायची, झालंच तर होळी सुरू होईपर्यंत टिमक्या वाजवायच्या. एकदा होळी पेटली की मग बोंबलत प्रदक्षिणा घालून, प्रसाद वैग्रे खाऊन मग बैका अन इतर वडीलधारी मंडळी पूजा करून परत गेली, की पोरापोरांत शिव्यांचा अड्डा जमवायचा. क्रिएटिव्हिटी काय उफाळून यायची वाह!!!!

रात्री जाणवणारी धग, लाकडे चोरतानाची मजा आणि शिवीअड्ड्यातील यमके व चिरमुर्‍यांचा प्रसाद हे सगळेच अतिशय थोर....पुनरेकवार आठवले. धन्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'टिमकी'चं अनेकवचन! Tongue टिमकी ही चामड्यापासून बनवलेली असते, हलगीसारखी वगैरे. जालावर काय लगेच फोटो घावला नाही. मला लहानपणी फार आवडायची. Smile
आमच्या इथली काही बारकी पोरं 'होळीची वर्गणी द्या' असं म्हणायच्या ऐवजी 'होळी द्या' म्हणायची! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लय भारी प्रकार होता राव टिमकी म्हणजे. Smile

बाकी, "आज होळी उद्या पोळी, बामण मेला संध्याकाळी" असे एक तद्दन जातीयवादी यमकही तेव्हा प्रचलित होते. याचा अर्थ काय अन संदर्भ काय, हे तेव्हाही कळाले नव्हते अन आत्ताही ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"आज पोळी उद्या नळी (धुळवडीला)!बामण मेला संध्याकाळी" असे म्हणायचे आणि बोंब मारायची अशी पद्धत कोल्हापुराकडे आहे ब्वा!
एका ब्राम्हण मैत्रीणीचा भाऊ लहान असताना इतरांचे ऐकून असे बोंबलत घरी गेला तेंव्हा त्याच्या कर्मठ आज्जाने त्याला चांगला बेदम बडविल्याचे लक्षात आहे. ROFL
एकूणात कोल्हापूराकडे ब्राम्हणी अस्मितांना लहान वयात त्या तयार होण्याआधीच ठेचून काढतात असे निरिक्षण आहे! आता त्याच्या बदल्यात इतर शहाण्णव कुळी अस्मिता वगैरे मुबलक आहेत म्हणा!!एकूण आपल्याकडे अस्मितांची काहीच कमी नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL

बिच्चारा ROFL

बाकी ही पद्धत कोल्लाप्रात आहे हे ठौक नव्हते. तत्रस्थ होळी कधी अटेंडविली नाही. मिरजेत हे यमक काही लोकांकडून ऐकलेले तेवढे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी नगरमध्येही ऐकले आहे. (शिवाय बामणाला बंदुकीची गोळीवगैरे पण काहीतरी ऐकल्याचे स्मरते. 'कल्पकतेला' तोटा नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'कल्पकतेला' तोटा नाही.

अगदी अगदी!!

अन त्या यमकांची क्रिएटिव्हिटी तर आस्मान की बुलंदी वगैरे स्पर्शायची एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुंबैला आमच्याकडे गोळी साय्बाला असे.
लहानपणी बोंब मारायला शिकवताना ताई 'सायबाच्या पोटात...' शिकवत असे. नंतार मंडळींत ऐकायला मिळाले की गोळी पोटात नसून थोडे खाली मांडीत की कुठेशी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्राम्य भाषेत आजही, xंड टेकून बसा असे म्हणतात, त्या अवयवाचा उल्लेख असे. होळीची बोंब ही शिव्या देण्याची हौस फेडण्यासाठी असल्याने, ते अ‍ॅक्सेप्टेपबल असे.

होळीची वर्गणी मागायला, घरोघरी ५ गोवर्‍या ५ लाकडे द्या होऽ अशी हाळी असे.

'बंबफोड' नामक प्रकार घरोघरी असण्याच्या जमान्यात दर खुंटावर २-४ मण लाकूड सहज जमा होत असे. याशिवाय 'मारलेली' अर्थात चोरलेली लाकडे व गोवर्‍या. जंगला/डोंगरावरून तोडून आणलेली लाकडे. दांडी पौर्णिमेपासून होळीपर्यंत लाकूड हा एकमेव आयटम (प्लस गोवर्‍या. जळाऊ माल) चोरण्याची अधिकृत परवानगी असे. आम्ही मुले लाकडे चोरायला जात असू व सर्वांच्या आईबापांची अध्यहृत परवानगी असे..

धुळ्याकडे 'डोलची' नामक एक प्रकार असतो.
पाँड्स पावडरच्या डब्याला तिरका काप देऊन एक भांडे बनविलेले असते. एक्स्पर्ट हातात हे धरुन त्यात पाणी भरून जर कुणाच्या पाठीत त्या पाण्याचा सपका मारला, तर अंगातला शर्ट फाटेल असा चाबुक मारल्यासारखा फटका बसतो.
सायकलमधे हवा भरायच्या पंपांची पिचकारी, ३र्या मजल्यापर्यंत पाणी उडवीळ अशी, प्लस डोलच्या. ही तिकडची खासियत. धुळवडीच्या दिवशी सकाळी गावात फिरणे फक्त शूरवीरांचे काम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आमचे शरीरशास्त्राचे आणि ग्राम्य भाषेचे ज्ञान तोकडे आहे. त्यामुळे ग्राम्य भाषेत काय टेकून बसतात ते नीटसे कळले नाही.
" *ंड " शी जुळणार्‍या नावांचे विशिष्ट अवयव टेकून वर आरामात बसणे जरा अडचणीचे होणार नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विंट्रेष्टिंग.

म्ह. त्या त्या ठिकाणचा असूयार्ह गट निवडलेला आहे तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कर्मठ आज्जाने त्याला चांगला बेदम बडविल्याचे लक्षात आहे.
.........थोडक्यात आज्जाने टिमकीची हौस भागवून घेतली ;).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जालावर काय लगेच फोटो घावला नाही.

................तुम्ही म्हणता ती टिमकी अशी होती का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा फोटो दिसला होता गुगलल्यावर, पण मी वाजवलेल्या टिमक्या तरी अशा दुसर्‍या बाजूने धातूने जोडलेल्या नव्हत्या. चामड्याचा भाग ठीक आहे, बाकी दुसर्‍या बाजूने मोकळ्या असायच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा. थोडक्यात, काड्यांनी बडवायचा (चामडे अधिक ताणलेला) डफच तो.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खालचा हेमिस्फेरिकल भाग नव्हता. चकतीवरच कातडे ताणून बसवलेले असायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही नाय काय. छोट्या डफली सारखी असते टिमकी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

ही टिमकी नाही.
हलगी किंवा डफ म्हणू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या इमारतीत होळी असायची. इमारतीसमोर थोडं मोठं अंगण होतं, आजूबाजूच्या इमारतींमधली मुलं खेळायला यायची, तशी होळीलाही यायची.

अगदी लहान होते त्या काळात बाबा, शेजारचे बाकीचे काका लोक होळी रचायचे. आम्ही पोरंटोरं लाकडं जमवायचो. त्या बाबतीत मोठे लोक निरुत्साही होते. पण मोठी मुलं, अगदी माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठीसुद्धा लाकडं जमवायला यायची. शिव्या, "जाडीअम्मा जाडीअम्मा पेटी वाजव" असा 'सांस्कृतिक खजिना' त्या वेळेस बिनबोभाट पुढच्या पिढीकडे यायचा. "गांडू अशी शिवी असते तर कुल्लु, ढुंगणू, बोचू असं का म्हणत नाहीत?" हा प्रश्न होळीच्या काळातच कधीतरी यत्ता दुसरीत वगैरे वयाची असताना ऐकला होता.

आमच्या इमारतीत कानू नावाचा वॉचमन होता. दारूडा माणूस आणि त्याची सगळ्या सामाजिक स्तरातल्या पोरांनी खेचलेली टांग बघणे यामुळे बालपण काही अंशी समृद्ध झालं, त्यासाठी कानूचे आभार मानले पाहिजेत. लहानपणी त्याला कानू म्हटलं तर आई ओरडायची, मग कानूकाका म्हणावं लागायचं. कानूची बायको गंगूबाई, (आम्ही तिला गंगूबाई म्हणायचो, इतर घरांमधे इतर काही नावं होती) ती पण पक्की खमकी बाई होती. तिचं नक्की नाव काय हा प्रश्न वगळता ती तशी फार मजेशीर नाही. पण कानूला दम द्यायला लागली की आम्ही पोरं फुकट शो बघायचो. पण होळी म्हटली की खास कानू आठवतो. तो रात्री इमारतीच्या आवारात नसायचा, घरी जायचा. पण त्या वर्षी होळीच्या वेळेस, कसा कोण जाणे, तिथेच होता. शेजारच्या मोहीतने त्याचा एक झाडू पळवला आणि होळीत पेटवला. त्याच काळात "मिले सूर मेरा तुम्हारा" प्रसिद्ध होतं. त्यात कपिल देव जसा मशाल घेऊन पळतो तसं पळायची हौस आम्हालाही. पण कानू झाडू जाळल्यामुळे भडकला. मोहीत जळता झाडू घेऊन पुढे आणि कानू मागे असा तो मजेशीर देखावा होता. तसाही मोहित तेव्हा टीनेजर असेल, मॅरेथॉनमधे पळायचा आणि कानू हा दारू पिऊन उरलेला खोका. दोघांची दहा-पंधरा मिनीटं पकडापकडी झाली. शेवटी काका, मोहीतचे बाबा मधे पडले आणि मोहितला दम देऊन तो प्रकार संपला. पण 'परंपरा' सुरू झाली.

पुढच्या वर्षीपासून आम्ही एक झावळी, फांदी काहीतरी पेटवून कानूचा झाडू जाळणे+कपिल देवसारखं मशाल घेऊन पळणे याला सुरूवात केली. दुसरी एक गोष्ट मात्र परंपरेत बदलली नाही. पैसे पडायचे ना! एकदा होळी पेटत नव्हती, तर वरचा उपेंद्र रॉकेल घेऊन आला. त्यांचं घरचं बाकीच्यांपेक्षा बरंच बरं. (उपेंद्रची मुलं माझ्या वयाची असली तरी त्याला काका, दादा, मामा म्हणण्याबद्दल घरी आग्रह नसे.) बाबा, शेजारचे काका वगैरे लोक होळी पेटवण्यासाठी फार प्रयत्न करत होते, पण लाकडं ओलसर होती. उपेंद्र नेहेमीप्रमाणे 'चढवून' आला होता. त्याने पाच लिटरचा रॉकेलची बुधलाच आणला. बाबा, काका लोकं पुरुष असले, "वेव्हार समजत नसला" तरी पाच लिटर रॉकेल पाहून सगळ्यांचे डोळे बाहेर आले. त्या वर्षीची होळी उपेंद्रमुळे लक्षात राहिली.

शेजारची वेदा, मुद्दाम, कधी मला चिडवायला "होळी ऑन कधी करणार" असं विचारायची. आता मलापण तो शब्दप्रयोग आवडतो. आम्ही दोघी "होळी ऑन कधी करणार?" असं विचारतो.

माझ्या आठवणीतली, मुद्दाम सांगण्यासारखी सगळ्यात अलिकडची होळी म्हणजे २००१ सालची. तसा उशीर झाला होता, दहा वाजून गेले होते. आम्ही कॉलेजवयाची पोरंपोरीच खाली राहिलो होतो, होळी सुरू होती. आमच्या घरात त्याच वर्षी मृत्यु झाल्यामुळे फार आरडाओरडा करू नये, असा 'जीआर' म्हणे निघाला होता. मी आणि भाऊच तो मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण जुन्या आठवणी कशा जाणार? ते विसरायला म्हणून तरी मी पण चकाट्या पिटत बसले होते. तेव्हा गेटमधून एक अनोळखी बाई येताना दिसल्या, हातात पूजेचं तबक होतं. त्या दोन पावलं आत आवारात येऊन तिथेच थांबल्या. मी त्यांना पाहिलं आणि त्यांच्याशी बोलायला पुढे गेले. कमी उंचीची, चांगल्या घरातली स्त्री. त्यांनी गुजराथीमिश्रित हिंदीत मला विचारलं, "मी तुमच्या होळीची पूजा केली तर चालेल का?" मला काय अडचण असायची, मी लगेच हो म्हटलं. त्या म्हणाल्या, "तसं नाही. आमच्या घरी या वर्षी बरेच लोक गेले. तुम्हाला चालेल का?" मला आक्षेप असायचं काहीच कारण नव्हतं. त्या म्हणाल्या, "बाहेरच्या रस्त्यावर जे दुकान आहे ते आमचं. आमचं कुटुंब सगळं कच्छमधे असतं ... २६ जानेवारीच्या भूकंपात ..."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोकणात होळी खूप दिवस चालते.
दहा दिवस आधीच एक उंचसे झाड रोवून त्याच्या बुंध्याशी रोज थोडी थोडी लाकडे जाळतात.
आणि मग रात्रभर आट्यापाट्या खेळतात.
दर रात्री सोंगे येतात . म्हणजे वेगवेगळा वेश, स्त्रीवेश घेतलेली माणसे पारंपारिक गाणी म्हणत नाचून पैसे मागतात.
यात वाघ, सिंह, हनुमान अशी सोंगे येत.
राक्षसही असत.
होळीच्या आसपास बाजारात असे प्लॅस्टिकचे मुखवटे येत आणि आम्ही मुलेहि ते लावून घरोघर फिरत असू.
कधीकधी खूप मेकप करून टिपीकल बाल्या डान्सचा ड्रेस घालून बाल्या नृत्य पथक येत असे. ते रिंग करून पाय आणि कमरेची विशिष्ट हालचाल करत डान्स करत.
'गणा धाव रे , गणा पाव रे' हे फेमस गाणं.
तीन चार जोड्या त्यात अर्धे स्त्रीवेष केलेले लोक एका बिशिष्ट प्रकारे पुढे मागे जोड्या शफल करून नाचत. शेजारच्या आडी गावातले लोक असतील तर 'आडीतले कोली उतरले खाली' या गाण्याने सुरूवात असे.क धी त्यात दारूबंदी , दारूने संसाराचे हाल असे विषय असत.
एकेकटे सोंग आल्यास 'आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना ' हे गाणे असे.
आम्ही मुलं या सोंगांच्या पाठोपाठ वाडितल्या प्रत्येक घरी जात असू.
वार्षिक परीक्षा जवळ असली तरी. Wink
होळीच्या दिवशी आमच्या गावात सामुदायिक होळीची प्रथा होती.
चतु:सिमेचे सगळे मानकरी दोन तीन लांबच लांब बाम्बूची ही होळी वाजत गाजत गावच्या सीमेवरून आतल्या शंकराच्या देवळापर्यंत आणत.
तिथे गवताचे भारे , गोवर्या जाळुन ही मोठिच्या मोठि होळी पेटवली जाई.
प्रत्येक जातीच्या माणसाचे होळीत काहिना काही ठरलेले काम असे. त्याला 'मान असणे' म्हणत.
होळीसमोर शिव्या घालण्याची जास्ती पद्धत नव्हती.
गावकार गार्हाणे घालत असे.
त्याने गावासाठी एक एक मागणे मागितल्यावर सगळ्यानी 'होय म्हाराजा' चा कोरस करायचा असे.
होळी धडधडून पेटली की यावर्षी किती वेळ पेटेल, कुणा दिशेला पडेल अशी चर्चा मोठ्या लोकांत रंगत असे.
त्यावरून मग पाऊसपाणी कसे होणार, काय संकटे येणार वैगेरे ठरत असे.
होळी विझवायला हमखास पाउस पडे.
धुळवडीला या सामूहिक होळीची राख घेऊन थोडीफार धुळवड खेलत.
खरी मजा रंगपंचमिला असे.
त्यातही रत्नागिरीत एक निळ्या रंगाचि फॅक्टरी असल्याने तिथला रंग वापरुन सगळि रत्नागिरी निळीशार होई.

शिव्या फारच माफक प्रमाणात आणि फक्त तरूण मुलगेच देत.
तसेहि रत्नागिरीत 'आयचा घो, बाझवलास, तुझ्या मायला' या शिव्या नाहीतच.
Wink

बंदुकीची गोळी 'ब्राह्मणाच्या' नव्हे तर 'पाटलाच्या' घुसत असे ते पण '*डीत' नव्हे तर '*च्यात'
या पाटलाचा व्याजबट्ट्याचा धंदा आणि माडीचे दुकान होते.
तो जातीने ब्राह्मण, मराठा नसुन भंडारी होता.

एकंदर मी लहानपणी पाहिलेली होळी बरीच धार्मिक आणि सभ्य होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणातल्या होळी बद्दल खुप ऐकल आहे. तुम्ही जे वर्णन केल आहे , त्या वरुन थोडी कल्पना आली. कधी जमल तर कोकणात होळीच्या वेळेला जरुर जाणार आहे.कोकणातली दिवाळी मात्र अनुभवली आहे. तो अनुभव पण खुप छान होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0