चित्रातून निघणारा अर्थ

मागे एकदा चितकलेविषयी एक चर्चा झाली होती.

नुकतेच एक चित्र (पेंटिंग) पाहण्यात आले. त्यावरून मला तरी चित्रकाराला काय दाखवायचे असावे याचा अंदाज आला नाही. म्हणून चित्र ऐसीकरांना दाखवतो आहे. या चित्रातून काय अर्थ प्रतीत होतो आणि तो का प्रतीत होतो हे सांगण्याचा प्रयत्न करावा.

मी ज्या ठिकाणी हे चित्र पाहिले त्यावरून ते बर्‍यापैकी किमती (आणि कदाचित प्रसिद्ध) चित्र असावे.

चित्र दिसले नाही तर इथे पाहता येईल.

चित्राच्या प्रताधिकाराबाबत काही कल्पना नाही. इथे चर्चेला टाकण्यास बहुधा प्रत्यवाय असू नये.

व्यवस्थापकः कृपया width="" height="" टाळावे किंवा अवतरण चिन्हात योग्य ते रोमन आकडे द्यावेत, आकडे न देता तॅग्ज ठेवल्यास काही ब्राऊझर्सवर चित्रे दिसत नाहीत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

>> या चित्रातून काय अर्थ प्रतीत होतो आणि तो का प्रतीत होतो हे सांगण्याचा प्रयत्न करावा.
मी ज्या ठिकाणी हे चित्र पाहिले त्यावरून ते बर्‍यापैकी किमती (आणि कदाचित प्रसिद्ध) चित्र असावे. <<

चित्रातून काय अर्थ प्रतीत होतो ह्यावर चर्चा करण्यापेक्षा चित्रात काय दिसतंय ह्याविषयी लोकांनी आपली मतं मांडली तर आवडतील. किंमतीचा संबंध अर्थशास्त्राशी लागतो; तुम्ही म्हणता त्या अर्थाशी संबंध लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आर्थिकदृष्ट्या सामान्य माणसांचं कुटुंब दिसतंय. तरुण स्त्री नुकतीच मुलाला पाजून, कमरेला पदर खोचून कामाला लागायच्या तयारीत असावी. कदाचित मूल तिचं नसेलही, दुसऱ्या स्त्रीच्या मुलाला पाजलं असेल. घरात कावळा-कुत्रा राजरोस आहेत, याचा अर्थ भिंती, खिडक्या नीट करायलाही पैसे नाहीत. चित्राच्या उजव्या बाजूला असणाऱ्या मुलाचं धोतर तसं स्वच्छ आहे, त्याचा वर्ण मधे दिसणाऱ्या पुरुषासारखा रापलेला नाही. आई वडील मुलाला कष्ट करायला लागू नयेत इतपत मिळवत असावेत. मुलाच्या डोक्यात पतंग उडवण्याचे विचार असू शकतात. थोड्या मागच्या काळातलं किंवा गावाकडचं सामान्य लोकांचं चित्रण वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रात एकही मूल नाही. आपल्याला "दुसर्‍या स्त्रीच्या मुलाला" असा कयास कसा करता आला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चित्रकार कोण आहे? आणि चित्र कुठे पाहिलत?

मला वाटत तो घराचा आतला भाग नाहीय, ओसरी आहे. वेड्यावाकड्या मांडलेल्या चार खाटा, ३ चटया, एक माठ कशाला दाखवलेत काय माहित Beee
पहील्यांदा स्त्रीचा चेहरा भारतीय वाटला नाही. आता २ ३दा बघीतल्यावर कंफ्युज झाले.
कुत्रा, कावळा, पुरुष, पौगंड मुलगा आणि स्त्रीचा उघडा स्तन यावरुन एकदंर समाज/पुरुष स्त्रीकडे ज्या वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात ते दाखवायच असेल चित्रकाराला Biggrin Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुत्रा, कावळा, पुरुष, पौगंड मुलगा आणि स्त्रीचा उघडा स्तन यावरुन एकदंर समाज/पुरुष स्त्रीकडे ज्या वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात ते दाखवायच असेल चित्रकाराला (दात काढत) (डोळा मारत)

पुरुषाबद्दल आणि पौगंडावस्थेतील मुलाबद्दल समजू शकतो. नुकत्याच झालेल्या ('काकस्पर्शा'संबंधीच्या) चर्चेच्या प्रकाशात कावळ्याच्या दृष्टिकोनाबद्दलही खुलासा एक वेळ होऊ शकतो. पण कुत्र्याचा स्त्रीकडे पाहण्याचा नेमका कोणता नजरिया अपेक्षित आहे, आणि तो या चित्रातून नेमका कसा प्रतीत होतो, ते कळू शकले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कावळा, कुत्रा हे प्राणी म्हणुन घ्यायचेच नाही, समाजाच्या/माणसाच्या/पुरुषाच्या मनोवृत्तीचे रिप्रेझेँटेटीव समजायच...
एनीवे मी wink केलेल आहे त्या वाक्यांनंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुत्र्याची मनोवृत्ती... ही नेमकी काय असावी, याचा विचार करतोय.

अरे हां... त्या हेमामालिनीला तो धर्मेंद्र म्हणतो, नाही का, 'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना' म्हणून? त्यावेळी त्या ज्यांना 'कुत्ते' म्हणून संबोधले आहे, त्या सर्वांची असते, तशी नजर काय? नाही म्हणजे, तिथेही 'कुत्ते' हे लिटरली म्हटलेले नसावे, असे वाटते, म्हणून विचारले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र उतरवून मोठे करून पाहिले तरी तपशील नीट दिसत नाहीत म्हणून चित्र मोठ्या आकारात टाकावे, ही विनंती.
(उदा. डावीकडची व्यक्ती स्त्री आहे असे मला तरी नक्की सांगता येत नाही.)

इतर गोष्टी -
पाचही जणांची (कुत्रा व पक्षी [तो कावळा आहे, असे इतरांना का वाटले कळले नाही.] मिळून) नजर चित्राबाहेर डावीकडे आहे.
चित्राला तीन घड्या पडलेल्या आहेत की चित्र तीन भागात रंगांनी मुद्दामहून विभागले आहे ते नीट कळत नाही.
उजवीकडच्या पतंगासारखा एक पिवळा तुकडा डावीकडच्या व्यक्तीच्या डावीकडे आहे, तो काय आहे नीट दिसत नाही.
पिवळ्या तुकड्याखाली काळसर करडे एक भांडे(?) आहे, ते काय आहे ते दिसत नाही.
कुत्र्याचा पुढचा उजवा पाय हाताची घडी घातल्यासारखा दुमडला आहे ! मुलाच्या उजवीकडे असलेल्या मेजाचा पाय दुमडला (तिमडला ?) आहे.
एकूणात, चित्र मोठे केलेत तर अधिक काही बोलता येईल.
---
अर्थाच्या दृष्टीने -
१. डावीकडची व्यक्ती पुरूष असल्यास, प्रथमदर्शनी पाहता माणसाच्या बाल्यावस्था, गृहस्थाश्रम आणि संन्यासवृत्ती (वानप्रस्थाश्रम) अश्या तीन अवस्था दाखविलेल्या वाटतात. हे जर असे असेल तर डावीकडून मृत्यूचे (यमाचे) आगमन होत आहे की काय ? असे वाटते. (डावी दिशा ही दक्षिण दिशा दर्शविली गेली असती तर [आपल्या संस्कृतीत दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली गेली आहे] या गृहितकास बळकटी आली असती. पण तसे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही.)
२. डावीकडची व्यक्ती स्त्री असल्यास, पाचही जण डावीकडे पाहत आहेत. (कुणाकडे, कशाकडे पाहत आहेत वा वाट पाहत आहेत, हे नीट कळत नाही.)

अधिक काय दिसले ते तपशील पाहून कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एकूणात, चित्र मोठे केलेत तर अधिक काही बोलता येईल.

मोठ्या आकाराचे चित्र येथे पाहता येईल.

चित्र तीन सेपरेट बोर्डांवर मिळून काढलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला त्या तिघांचे पायही वैशिष्ट्यपुर्ण वाटले. मुलाने त्याचा उजवा पाय उत्तरीयाखाली झाकलाय. माणसानेही त्याचा उजवा पाय प्रयत्नपुर्वक लपवलाय. कुत्र्याचेही दोन्हि उजविकडचे पाय दिसत नाहियेत. आणि तो मोठा कावळा, त्याचाही उजवाच पाय नाहिये. खाटेच्याही उजव्याच बाजुला ठिगळ लावलेय. एकट्या स्त्रिचे मात्र दोन्ही पाय व्यवस्थित दिसतायेत. काही अर्थ असावा का यात पण? मला नाही लावता येत. पण निरिक्षण नोंदवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र पाहून melancholic feeling आलं एकदम.
माणसाचं नीरस अस्तित्व, असुंदर शरीर, मालकीच्या चारदोन अडगळीसारख्या वस्तू त्याही कळाहीन,
घराच्या रंग उडालेल्या भिंती आणि तसंच आयुष्य! कुत्र्या-कावळ्याहून वेगळे नसलेले.
पण त्यातूनही जाणवणारी एक विचित्र आसक्ती आणि भविष्य सुंदर, गोरे-गोमटे असेल असा हटवादी आशावाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक गोष्टीस अर्थ असलाच पाहिजे का?

---------------------------------------------------------------------------------
"It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing." - पी.जी. वुड्डहौस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक गोष्टीला, विशेषतः चित्राला, अर्थ असलाच पाहिजे असे काहीही नाही.
पण;
"It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing." - पी.जी. वुड्डहौस.
याऐवजी
"It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing." - 'न'वी बाजू
असे असते तर वरील प्रतिसादाला "कैच्याकै" श्रेणी मिळाली असती बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राथमिकतेत दिसणार्‍या गोष्टी म्हणजे - अनेक खाटा आहेत, लाल, निळा रंग आणि चौकडींचा वापर जास्त आहे, प्रत्येकाने आपला एक हात लपविला आहे, अगदी कुत्र्याने देखील एक पाय मुडपल्यासारखा दिसतो आहे, क्षितिज(?) तिघांच्या चेहर्‍याच्या मध्यभागाच्या मागून जात आहे(आठवा(रिमेम्बर) मोनालिसा), मुलगा आणि स्त्रीची चेहरेपट्टी आणि रंग हे मिळते-जुळते वाटते त्यामुळे तो तिचा मुलगा असण्याची शक्यता आहे, स्त्रीचा डावा डोळा उजव्या डोळ्यापेक्षा थोडा वेगळा वाटतो आहे(व्यंग?). स्त्रीचे शरीर, पतंग, कावळा, माणसाच्या पायापाशी भोकं पडलेली सतरंजी ह्या सगळ्यातून काय अर्थ निघतो ते कळत नाही.

चित्रामधे दिसणार्‍या अनेक गोष्टींचा संबंध चित्रकाराच्या स्थानिक गोष्टींशी असण्याची शक्यता असते त्यामुळे त्याचा अर्थ त्यासंदर्भात बदलू शकतो, त्याचबरोबर चित्रशैली(गाण्यातील घराण्याप्रमाणे) चित्राबद्दल अधिक सांगू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा अर्थ लागतोय/नाही नंतर बघुया. आधी मला यात काय काय दिसते आहे ते बघुया: (निव्वळ हीच यादी प्रत्येकाला वेगळी दिसेल त्यामुळे अर्थ अर्थातच वेगळा लागेल)

चित्र बघताना सर्वप्रथम लक्ष जाते ते तीन घड्यांवर. मुळात चित्र तीन भागात दुमडले होते अशी शंका यावी अश्या त्या तीन घड्या चितारल्या आहेत. अर्थात एका मोठ्या अवकाशात तीन स्वतंत्र तरीही एकमेकांना पुरक/संबंधित विश्वे/चौकटी तयार झाल्या आहेत.

त्यानंतर माझे लक्ष जातेय ते तीन व्यक्तींकडे, आळीपाळीने एका क्रमाने असे नाही. तरी तो तरूण/कुमारवयीन मुलगा, उतारवयीन पुरूष व एक केशरी वस्त्रातील व्यक्ती (ही स्त्री आहे का पुरूष हे मी पहिल्या फटक्यात ठरवू शकलेलो नाही). प्रत्येकाची वेषभुषा, वय आणि अवस्था वेगळी आहे, मात्र तरीही प्रत्येकाची स्वतंत्र अशी चौकट/अवकाश आहेच नी प्रत्येकासाठी एक खाट अस्तित्त्वात आहे.

मुलाच्या विभागात खाटा सोडल्यास एक पक्षी आहे. उतारवयीन व्यक्तीच्या भागात एक माठ, कुत्रा, फाटकी चादर आहे. पट्टेदार चादर गादीवर न अंथरता खाली आहे. व्यक्ती कृश आहे, खाटेला ठिगळं जोडलेली आहेत तरी हताश नाहीये. कणा ताठ आहे काहिशा ताठ्यात बसली आहे. उत्तरीय नीट घडी करून वापरले आहे.

सर्वात डावीकडील व्यक्तीला मग निरखून पाहतो. त्या व्यक्तीचा एक स्तन उघडा आहे. मात्र तरी तो पुरूष आहे की स्त्री समजायला कठीण आहे. गळ्यात आधी मंगळसुत्र वाटावे असेकाहीतरी आहे पण अधिक निरिक्षणानंतर ते जानवे वाटु लागते. पहिल्या चित्रातील भिंतीवरील पतंग इथे खाली रुतल्यासारखा पडला आहे. त्याखाली एक कमंडलुसारखी काळी आकृती आहे पण ती बघायला चित्र अधिक मोठे हवे असे वाटते. व्यक्तीकडे पाहिल्यावर ती अधिकाधिक पुरूष असल्याचे वाटु लागले आहे. एक सन्यस्त पुरूष. भगवे उत्तरीय पांघरलेला. अधरीय अजूनही सफेदच आहे.

एकुणात लागलेला (की लावलेला माहित नाही) अर्थः
हे आयुष्य एका धर्मशाळेप्रमाणे आहे. इथे प्रत्येकाला एक खाट मिळते पण त्यावर तिचा मालकी हक्क नसतो. बाल्यावस्था/कुमारावस्था स्वच्छंदी असते. एखाद्या पक्षाप्रमाणे, पतंगाप्रमाणे विचार प्रवाही असतात, भरार्‍या घेत असतात. गृहस्थाश्रमात व्यक्ती स्थायी होते. एका जागी बसलेली राहते. कुत्र्यासारखे इमानी राहते. गरीबी असली तरी स्वाभिमानाला चिकटून असते. इथे पतंगाचा विसर पडलेला असतो, त्यापेक्षा अधिक गरजेचा व उपयुक्त माठ आयुष्याच्या प्रायॉरीटीजवर आला असतो. शेवटी वानप्रस्थाश्रम/सन्यस्थाश्रम आला की जुना पतंग ढळल्याची जाणीव असतेच पण त्याच बरोबर इतर वस्तुंची आसक्ती राहत नाही. शेजारच्या काही खाटाही रिकाम्या झालेल्या दिसतात. इथे तीनही आकृती एका प्रतलावर नाहीत, काहिशा एकापुढे एक आहे. एका दिशेला बघताहेत. तीच ती आयुष्याच्या मार्गाची दिशा. इथे मागे बघायला/जायला वाव नाही. बदल अटळ आहेत नी या अवस्थही. वगैरे वगैरे.

बाकी चिंज/अमुक यांनी यावर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>चित्र बघताना सर्वप्रथम लक्ष जाते ते तीन घड्यांवर. मुळात चित्र तीन भागात दुमडले होते अशी शंका यावी अश्या त्या तीन घड्या चितारल्या आहेत. अर्थात एका मोठ्या अवकाशात तीन स्वतंत्र तरीही एकमेकांना पुरक/संबंधित विश्वे/चौकटी तयार झाल्या आहेत.

चित्र तीन सेपरेट बोर्डांवर मिळून काढलेले आहे असे दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते, कृपया चित्रकाराचे नाव माहिती असल्यास द्यावे. त्यानंतर प्रताधिकाराचा प्रश्न येऊ नये असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्रकार ठाऊक नाही.

मी सध्या ज्या क्लायंटकडे जातो तिथे हे चित्र लावलेले दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कुंपणीत असल डिप्रेसिँग चित्र लावणारा क्लायंट खुळाच असणार :-|.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक अश्लील अर्थ निघताहेत.
मानवी अर्धनग्नता ही थीम असावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

खि खि 'अनेक अर्थ' इथे लिहीलेत तरी चालेल असं वाटतय Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र पाहून न समजलेल्या काही गोष्टी:-
१.दिवस आहे की रात्र हे समजत नाही. (ते समजले तर पात्रांचा मूड बरोबर पकडता येइल)
२.चित्र घरात/खोलीत आहे की पडवीत्/ओसरीवर आहे हे समजत नाही.
३.मागे भिंत दिसते. भिंतीवर पतंग लटकावला आहे की पतंगाचे चित्र आहे हे समजत नाही.
४.पतंग असेल तर त्याची चक्री का दाखवली नाही हे समजत नाही.
५.ज्यावर माणूस बसलाय मध्यभागी ती खाट आहे हे समजते. पण त्याशिवाय दोन बाजूला दोन चौकटी चौकटी असणारे जे काही आहे, बुद्धीबळाच्या पटासारखे जे दिसत आहे, ते काय आहे , खाट, पलंग, मोढा, दिवाण की अजून काही, आणि चौकटी आहे त्ती त्यावरची चादर आहे की अजून काही हे समजत नाही.

६. इतर दोन व्यक्ती उपस्थित असताना स्त्री स्तन उघडा का टाकेल ते समजत नाही. हा दवाखाना असून ते दोघे डॉक्टर आहेत असेही नाही.
म्हणूनच दोन व्यक्तींसमोर स्तन उघडा एखादी स्त्री का टाकत असावी ते समजत नाही.

७.नक्की चित्र दिसते आहे तर त्यात प्रकाशाचा स्रोत कोणता हे समज्त नाही. (घरात दिवे,पंखे नाहित्.कंदिल नाही. सूर्यप्रकाशही जाणवेल इतपत नाही. उजव्या बाजूने किंचित एक प्रकाश झलकार येताना दिसते पण तो सूर्यप्रकाशाच आहे का हे समजत नाही.)

८.पक्षी त्याचे तोंड सोडून उर्वरित काळा आहे. आकाराने कावळ्याच्या जवळ जातो. पण कावळ्याचे तोंडही कुट्ट काळेच असते.
ह्यातला पक्षी कोणता ते समजत नाही.

९.समोर दिसणारा प्रकार ओसरी नसून खोलीच असेल तर आख्ख्या दृश्यात कुठेच माठ सोडून एकही वस्तू दिसत नाही.
पूर्ण भिंतीवर एखादे तैलचित्र्,मूर्ती,धार्मिक खूण किंवा धार्मिक नसल्यास अन्य श्रद्धास्थान किंवा अजून काहीतरी ह्याचा लक्षणीय अभाव का अहे ते समजत नाही.

१०.घरात कपाट, खण नाहीत हे ठीक आहे. पण भिंतीमध्ये तरी कप्पे असावेत, तेही दिसत नाहित.
खोली असेल तर खोलीची खिडकी व दार नक्की कुठे असावे ह्याचा अंदज येत नाही. (उजव्या बाजूहून प्रकाश आल्यासारखा वाटतो. पण खात्री नाही.)

११.मुलाच्या मागे जमिनीवर छोटिशी वस्तू पडली आहे. ती लेखणी आहे की एखादा लाकडाचा तुकडा ह्याचा अंदाज येत नाही.

१२.स्त्रीचा स्तन उघडा असला तरी तिकडे स्वतः स्त्रीचे व इतर दोघांचे विशेष लक्ष दिसत नाही.

वरील प्रतिक्रियांपैकी ननि ह्यांना ह्या चित्रात जी ए कुलकर्णी ह्यांच्या काही कथा वाचल्यावर (किंवा मेल गिब्सनचे काही चित्रपट पाहिल्यावर) एक विचित्र भकासपणा दाटून येतो तसे काही म्हणायचे आहे काय असे वाटून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कुत्रा व त्या स्त्रीचा एक उघडा स्तन एवढ्या दोन गोष्टी नजरेत भरल्या. बाकी काही कळाल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

थोड्या जुन्या काळातील (१९४०-५०) बंगालमधील एक उच्चवर्णीय परंतु दरिद्री कुटुंबाचे चित्र वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यद्यपि उच्चवर्णीयच असे कै वाटत नै तरी बंगालमधले वाटते खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कशामुळे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चित्रातल्या बाईचा तोंडवळा, कपडे. पुरुषाचाही तोंडवळा व कपड्यांची स्टाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला ते बंगाली कमी व उडिसामधील असण्याचा अधिक संभव वाटतो. किम्वा एम पी - छत्तीसगड वगैरे प्रांतातील मागास भागाचे नागरिक वगैरे.
बंगाली असले तर किंचित , कळत - नकळत मंगोल झाक चेहर्‍यात दिसायला हवी (नेपाळी लोकांसारखी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बंगाली असले तर किंचित , कळत - नकळत मंगोल झाक चेहर्‍यात दिसायला हवी

आजिबात नाही. दोन वर्षे बंगालात काढल्यामुळे मी इतके तरी नक्कीच म्हणू शकतो. मंगोलॉईड फीचर्सचे नामोनिशाण नसलेले शेकडो बंगाली पाहिलेत. बंगाल फार मोठा रीजन आहे, मंगोलॉइड अ‍ॅडमिक्श्चर हे उत्तर अन पूर्व भागांतच जास्त दिसून येते. मंगोलॉइड मिक्श्चर हे आसामात जास्त दिसून येते. बाकी जण्रल बंगालात काहीच संबंध नाही-म्ह. उल्लेखनीय रीत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला ते सौथ इंडियन वाटले :-D. का विचारु नका. मला उत्तर माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोरगा सौदिंडियन वाटतोय खरा.

पण बाकीचे दोघे नै वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"त्यावरून मला तरी चित्रकाराला काय दाखवायचे असावे याचा अंदाज आला नाही. म्हणून चित्र ऐसीकरांना दाखवतो आहे. या चित्रातून काय अर्थ प्रतीत होतो आणि तो का प्रतीत होतो हे सांगण्याचा प्रयत्न करावा."
चित्रकारालाच चित्रात काय दाखवायचे हे विचारणे उत्तम...दुसरा उपाय नाही खरतर माझ्या मते.

चित्रात प्रत्येकाचा एक हात काहीतरी लपवतोय. कुत्राही या बाबतीत माणसांचे अनुकरण करू पहातोय असे वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा आमचा बर्ट कूपर, आणि आमचा त्यावर भारी जीव! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

"हा आमचा अमुक तमुक, त्यावर आमचा भारी जीव." याचा कॉपीराईट आदितीतैंकडे आहे असे नोंदवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डागदरसाहेब, तुमचं अज्ञान बाहेर आलं पहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ज्ञानदान करा Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

स्थानक तेच. फलाट निराळा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका गरीब कुटुंबाच्या घरात पांच खाटा का ? आणि त्या स्त्रीने(हो, ती स्त्रीच वाटते आहे) आपला स्तन उघडा टाकण्याचे कारण काय? मनुष्य काळा असला तरी मुलगा आईच्या वर्णावर उजळ आहे. कुत्रा,जो कोणी खायला देईल त्याच्याकडेच बघेल,त्यामुळे कुत्रा स्तनाकडे बघतो आहे असे वाटत नाही.
चित्राला काही आशय असेल तर तो गरिबी दाखवणे हाच असू शकेल.

अवांतरः लोकांना निरर्थक गोष्टींमधे गुंतवून ठेवून महत्वांच्या मुद्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होईल हे पहाणे, या 'कांग्रेसी' तंत्रात धागाकर्ता मुरला आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनागाची(कोलकाताचा रेड लाईट एरिया) येथील हे चित्र आहे.
तो गोरा दिसणारा मुलगा त्या स्त्रीसाठी गिर्हाईक घेऊन आला आहे.
स्त्री वेश्या आहे त्यामुळे स्तन उघडा असणे नसणे याने तिला काही फरक पडत नाही पण तो मुलगा, आणि तो मनुष्य यांना अवघडल्यासारखे होत आहे त्यामुळे त्यांनी पाय दुमडून आपल्या आतमधली अस्वस्थता व्यक्त केली आहे.
एकूणच स्त्रियांच्या शरीराचा उपभोग घेणाऱ्या पुरुष जातीत आणि त्या कुत्र्यामध्ये काही फरक नाही आहे अस दाखवण्यासाठी कुत्र्याने देखील पाय मुडपला आहे.
चित्रात उभ्या रेखांनी तिघांची तीन समांतर वेगवेगळ जग आहे हे दर्शवल आहे.
चित्रातील सर्व व्यक्ती एकमेकांकडे न पाहता आउट ऑफ फ्रेम पाहत आहेत. तेदेखील बघणार्याच्या डोळ्याला डोळा भिडवून. याचा अर्थ असा आहे कि त्या confront करत आहेत.आमच आयुष्य असच आहे , आम्ही असाच जगतो.
रंगसंगती- मागे क्षितिजरेखा निळी आणि पिवळा रंग वापरून दर्शवली आहे. याचा काही अर्थबोध होत नाही. एक प्रकारचा भकास , नीरसपण दर्शवण्यासाठी तास केलेलं असू शकत.
स्त्रीच्या साडीचा रंग लाल आहे. हा रंग हिंसा , राग दर्शवतो.
बहुतेक तो मुलगा त्या स्त्रीचा अपत्य असू शकते. खात्री नाही.
प्रत्येकाने एक हात लपवला आहे. स्त्रीने डावा हात लपवला आहे तर पुरुषाने उजवा हात.मुलाने देखील उजवा हात लपवला आहे.
शरीराचा एखादा भाग लपवण म्हणजे आपल्या खर्या भावना लपवण. या व्यक्ती एकमेकांविषयीच्या त्यांच्या भावना लपवत आहेत.
बहुतेक तो माणूस त्या वेश्येच्या प्रेमात पडला आहे पण तो तिला सांगू शकत नाही. तसाच ती वेश्या तिच्या मुलाला सांगू शकत नाही कि ती हे सगळ का करत आहे. त्या मुलाला राग येतो आहे पण त्याच कारण नक्की काय आहे हे त्याला कळत नाहीं आहे त्यामुळे राग तो आतल्या आता जिरवायचा प्रयत्न करत आहे.
अख्या चित्रात फक्त कुत्रा त्या स्त्रीकडे बघत आहे याचा अर्थ असा होतो कि कुत्रा तिच्या वेदना समजू शकतो.

बेड च्या खाली असणारा माठ काय दर्शवतो हे कळत नाही आहे.
आणि एक निरीक्षण लाईट्स च्या बाबतीत तो मुलगा फक्त प्रकाशात आहे. बाकी ती स्त्री आणि माणूस अंधारात दिसत आहेत.
म्हणजे कुठेतरी थोडीफार आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हे चित्र डाव्या विचारसरणिच्या चित्रकाराने काढले असावे. खाटेवर बसलेला पुरुष आणि स्तन उघडा असलेलि स्त्रि दारिद्रयाने खंगलेले दिसतात. साधारण भिक्षुकि करणारा पोरसवदा माणुस सवर्णांच्या सुधेगाद अवस्थेचे प्रतिक वाटतो. पतंगातुन एक प्रकारचा भरारि घेउ शकु असा आशावाद दिसतो. सगळ्या चित्रभर एकमितिय उथळपणा तसेच बकाल बरेचसे पृष्ठभाग पसरलेले दिसतात. हात लपवलेले असणे कदाचित आपल्या हातात काहि नाहि, सगळे नशिबावर आहे या नैराश्याने भरलेल्या धार्मिक फोलवादाचे प्रतिक असावे. हे चित्र बकाल वास्तवातहि दिसणार्‍या विषमतेवर भाष्य करत असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद