Skip to main content

"चिडकी चिऊताई -" (बालकविता)

खिडकीत दिसली चिऊताई
बाळाची बोलावण्याची घाई
"ये ये" म्हणाला हात दाखवून
"खाऊ घे" म्हणाला खिडकीतून -

चिऊताई होती फारच चिडकी
समोर दिसली बंद खिडकी
चोच आपटली खिडकीवर
टकटक केली काचेवर -

बाळाने उघडली हळूच खिडकी
पटकन शिरली चिऊताई चिडकी
बाळाने दाखवला लाडूचा खाऊ
चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ -

बाळाने मुठीत लाडू लपवला
बाळ हळूच खुदकन हसला -
चिडकी चिऊताई खूप चिडली
खिडकीत "चिव चिव " ओरडली . .

.

सुशेगाद Thu, 20/03/2014 - 17:00

लहान मुलांसाठी लिहिणे हे जगातील अवघड टास्क असते.
एक जापनीज कार्टून आहे. dead fish folktales from Japan. torrent वर मिळेल बहुतेक. ते पहा अस मी सुचवतो.