निरोप

दाराला तोरण आंब्याचे,रंगित रांगोळीने अंगण सजले=*=*=
पाहुण्यांची रेलचेल, छोट्यांची गडबड वाढते
आज दिन सोनियाचा माझी लेक सासरला ग जाते...
आईच्या डोळ्यात भरले ग पाणी:(
पापणी लवता मोती येतिल ग खाली.....
ऊरातिल धडधड वाढतच जाते
लेक माझी आज सासरला ग जाते
बघता बघता डोक्यावर अक्षत पडते
सुर गुंजती सनईचे चऊघडा ग वाजे
लेक आईची कशी सप्तपदी चालते*******
लेक माझी आज सासरला ग जाते
लहान असताना धरे आई- वडिलांचा हात
सप्तपदी चालताना तिला होते का आठवण,
टोपली दिव्यांची ठेवली डोक्यावरती
झाल देताना लेकीची पाणवले डोळे बोलती
मुली तेवत रहा अशी सदा सासरी
झाले सर्व विधि नवरी अंबा ग शिंपते
आईच्या कुशीत सुखावणारी लेक
आज नव-याच्या पाठीशी खंबिर उभी ग राहते
पदराने डोळे पुसत लेक सगळयांचा निरोप ग घेते
आईने दिलेला फराळाचा डबा मग ऊराशी कवटाळुन धरते [::]
पिता ऊभा मागे कोप-यात
या क्षणाला सामोरे जाण्याचे नाही त्याच्यात धाडस,
आशिर्वाद घेण्याला वाकली जावई-लेक,
हात डोक्यावर नेता दाटुनी आला कंठ अडकले तोंडातच शब्द
पित्याच्या संस्काराची शाल पांघरली खांद्यावरी
लेक माझी झाली आज नवरी,
संस्काराच्या शालीला मारली समजुतदार पणाच्या ऊपरण्याची गाठ
नवरा-नवरीची पडली साता जन्माची गाठ
हुंदका देत लेक चाले सासरची वाट
तिच्या भोवती सा-या नातेवाईकांचा घाट
नविन आई-वडिल मिळाले तिला आज
मुली सासरी जाउन कर आईने दिल्या जन्माचे सार्थक.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

खूपच छान.जबरदस्त शब्दप्रभुत्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

छान कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.