तुझे रेशमी कवडसे

तुझे रेशमी कवडसे
स्मरणांच्या खिडकीतून
घेऊन येतात
विसरलेले क्षण ओलेसे

तुझे रेशमी कवडसे
काली आकाशातून
मेग सोडवीत येतात
हरवलेले मन कधीचे

तुझे रेशमी कवडसे
पहाटेच्या धुक्यातून
थंडी घेऊन येतात
उबदार क्षण पूर्वीचे

तुझे रेशमी कवडसे
पावसातल्या उन्हासारखे
इंद्रधनुष्य बनून येतात
वास्तवाच्या वाळवंटात
बिखरलेले रंग काहीसे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मिश्र उपमा/रूपके (mixed metaphor) मला आवडत नाहीत आणि माझ्यासाठी रसभंग करतात*. तरी मराठी कवितेत पुष्कळ लोकांना मिश्र उपमा/रूपके आवडतात, हे मी ओळखतो. कवीला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, आणि वाचकाला रसग्रहणाचे.

असो. माझ्यापुरते कमीतकमी रसभंग करणारे (म्हणजे थोडेफार आवडलेले) कडवे हे -

तुझे रेशमी कवडसे
पहाटेच्या धुक्यातून
थंडी घेऊन येतात
उबदार क्षण पूर्वीचे

----------------
*अर्थात कुठल्याही ढोबळ नियमासारखे आहे. कौशल्याने नियम मोडले, तर हेतुपुरस्सर वाचकामध्ये काही परिणाम घडवता येतो. परंतु असे कौशल्य मला या कवितेत जाणवले नाही, अथवा माझ्यावर तरी या रूपकाच्या सरमिसळीमुळे अधिक गहिरा परिणाम झाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहवा! आवडली कविता. अजून येऊदे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !