लपाछुपी -एक उत्क्रांती
क्रिकेटचा बॉल जेव्हाजेव्हा खिडकीला डोळा मारून जातो, सोसायटीत कुठेतरी लांब एक ज्वालामुखी जागा होतो.
मैदानावर वय ६
धड्म धूम वितळे ज्वाला -पळा पळा नाना आला
दात वाजले कडाम-कुडुम - नाना आले बस दडून
मैदानावर वय १६
लपू नको सायकलीमागे - चालवणारीत गुंतले धागे
आला आला तो बघ तो - हा तर तिच्या आईचा घो.
मैदानावर वय २६
मुतारीच्या मागे जाउ- एक दम मारून येऊ
मार साल्या अजून बाता - कपाळात गेल्यात आता.
मैदानावर वय ३६
हाण भडव्या अजून एक - आमची नुसती फेकमफेक.
कडेसरीला बसून आता - उरल्या आहेत फक्त बाता.
खिडकीमागे वय काकू
न धरी शास्त्र करी मी
करेन विळीचा- युक्तीने वापर
खिडकीमागे वय - शिरीष कणेकर
ब्रॅडमन किंवा CK इतकं - खेळत नाही कोण्णी छान
अतिपुरातन गोष्टींचा - भरलासे व्होल्सेल अभिमान
खिडकीमागे वय - द्वारकानाथ संझगिरी
सामनातुनि लेखननलिका रोजशीच ती इथे गळे
हॉटेलातही मिळत नसतो इतुका 'उपमा' इथे मिळे
कोल्ह्याची आंबट द्राक्षं जिथे बोन्साय वेलींना लटकतात, गल्लोगल्ली तेव्हा तेव्हा नकली सिंह जन्म घेतात.
प्रतिक्रिया
गमतीदार. आंबट द्राक्षं
गमतीदार. आंबट द्राक्षं बोन्साय वेलीला चिकटल्याची कल्पना केली. मजा आली.
मजेशीर कविता. हे असं रोचक फार
मजेशीर कविता.
हे असं रोचक फार लिहू नका हो. मी पण कविता वाचायला सुरूवात करेन अशाने.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
:)
बरय.
बादवे, लपाछपी हा हिंदी शब्द असून मराठीत त्याला लपंडाव म्हणत असावेत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आम्ही लपाछुपी/लपाछपीच
आम्ही लपाछुपी/लपाछपीच म्हणायचो. लपंडाव पुस्तकी वाटत.
संपूर्ण सहमत.
संपूर्ण सहमत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
छान! आवडली कविता
छान! आवडली कविता
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
+१
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मस्त कविता! क्रिकेटचा बॉल
मस्त कविता!
मला चाचा चौधरी आणि साबू आठवला एकदम!
बादवे - मैदानावर वय ४६ "फुकट कोचिंग" हाही अवतार पाहिला आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अस्वल कहरच!
अस्वल कहरच!
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!
आहा!!!!! अगदी फ्रेश अन
आहा!!!!! अगदी फ्रेश अन मस्त!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अस्वल गुदगुल्या करुन मारते
अस्वल गुदगुल्या करुन मारते म्हणतात.
अस कै नस्त अस्वल चान्ग्ल असत
अस कै नस्त अस्वल चान्ग्ल असत
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!