निवडणूक प्रचार - खालावलेली पातळी एक चिंताजनक बाब

निवडणुका जस जशा जवळ येवू लागल्यात देशातील राजकारण बदलू लागले आहे अनेकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आपला पक्ष हा कुचकामी तर नेतृत्व हे स्वार्थी वाटू लागलेय. जो तो आपली राजकीय सोय बघू लागलाय एका रात्रीत पक्ष बदल घडू लागलेत व दुसर्या पक्षाकडून त्यांना बक्षिसादाखल उमेदवारीही मिळत आहे. जो कार्यकर्ता पक्षासाठी राबतो त्याच्या एवजी अशा आयाराम गयारामांना राजकारणात चांगलाच भाव येवू लागलाय. अनेक युत्या, महायुत्य,, आघाड्या होवू लागल्यात .जो तो पक्ष आपण काहीही करून सत्तेवर कसे येवू ह्याचा प्रयत्न करू लागलाय.

सध्या भारताच्या राजकारणात अरविंद केजरीवाल नामक एक व्यक्ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्यांनी जो आप पक्ष स्थापन केलाय त्याने अत्यंत कमी कालावधीत यश संपादन केले ते कौतुकास्पद आहेच. आता दिल्ली पुरते मर्यादित न राहता आपले पंख पसरण्याचा आपचा प्रयत्न चाललाय . नुकतीच अरविंद केजरीवाल ह्यांनी वाराणसीत जी प्रचार यात्रा काढली त्यावेळी त्यांच्या यात्रेवर अंडी फेकण्यात आली शाई फेकण्यात आली. नुकताच त्यांच्यावर एकाने हल्लाही केला. तसेच अमेठी मधेही कुमार विश्वास ह्यांच्याकार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली अशी बातमी टीवी वर पाहण्यात आली. आपच्या कार्यालायान्वेरही हल्ले झालेले आहेत.

आपने जो भ्रष्टाचाराचा मुद्दा घेतलाय तो स्तुत्य आहे ह्यात शंकाच नाही. अरविंद केजरीवाल ह्यांच्या झंजावताने व भ्रष्टाचार हा मुद्दा प्रमुख करून दिल्याने दिलेल्या जमालगोट्याने भल्या भल्यांची तंतरली आहे हे कोणी कितीही नाकारले तरी ती वस्तूस्तिथी आहे.केजरीवाल ह्यांचा पक्ष निवडणुकीत कशी कामगिरी करेल हे येणारा काळच सांगेल पण एखाद्या पक्षावर असे हल्ले होणे हि बाब लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

हल्ली पक्ष असे हातघाईवर का येतात हा एक लोकशाही साठी चिंताजनक ठरणारा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्यात प्रचार करणे हा प्रत्येक पक्षाचा हक्क आहे परंतु रस्त्यावर हाणामार्या करून एक मेकांवर निंद्य भाषेत टीका करून प्रचार करणे हे निंदनीय आहे लोकांना जो उमेदवार योग्य वाटतो त्याला ते मत देतील मग तो कॉंग्रेस असो भाजपा असो कि इतर पक्ष.. पण प्रचाराची पातळी इतकी खालावलीय त्यात हे शाई फेकणे, अंडे फेकणे असले फालतू प्रकार बघून मन वीटते. आणि हे प्रस्थापित पक्ष हे आपल्या असभ्य कार्यकर्त्यांना समज देण्या एवजी त्यांचे समर्थन करतात हे पाहून चिंता अजून वाढते.

कॉंग्रेसवर त्यांचे विरोधक टीका करतात कधी कधी व्यक्तिगत पातळीवर उतरूनही टीका केली जाते पण कॉंग्रेसचे नेतृत्व त्यावर प्रतिक्रिया देत नाही हे अतिशय योग्य आहे. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास त्या पक्षाला आहे त्यांचे नेतृत्व हे सार्वजनिक सभेत बोलताना इतरांवर हीन भाषेत टीका करत नाही हि त्या पक्षाची जमेची बाजू आहे. कॉंग्रेस नेतृत्वावर हीन भाषेत टीका केली जाते ती ज्यांच्याकडून केली जाते त्यांना ते शोभते पण उद्या सोनिया गांधी अथवा राहुलजी ह्या भाषेत बोलले तर ते त्यांना शोभणार नाही. मात्र हल्ली ह्या पक्षाचे अनेक नेते हे विरोधकांबद्दल वादग्रस्त विधाने करतात मग ते मणिशंकर अय्यर ह्यांचे विधान असो कि दिग्विजयसिंग ह्यांचे. त्यांच्यावर कॉंग्रेस नेतृत्व अंकुश लावताना दिसत नाही हि सत्य स्तिथी आहे.

सत्ताधारी पक्षाने आपण जनतेसाठी काय केले व पुंन्हा सत्तेवर आलो तर काय करणार ह्यावर भर दिला पाहिजे तर विरोधी पक्षाने सत्ताधार्यांनी काय चुकीचे केले व आपला पक्ष सत्तेवर आल्यावर देशाच्या विकासासाठी काय करेल हे सांगणे आवश्यक आहे.परंतु सध्या ज्या प्रकारचा प्रचार चाललेला आहे त्यात व्यक्तिगत निंदा नालस्ती, हाणामार्य,, तोडफोड ह्यांच्या शिवाय काहीच दिसत नाही. हि बाब आपल्या लोकशाहीला कमीपणा आणणारी आहे तिची विटंबना करणारी आहे असे मला वाटते .ह्यातून निघून जेव्हा आपली लोकशाही प्रगल्भ होईल समाजाला दिशा दाखवणारे नेते मिळतील तो सुदिनच म्हणावा लागेल

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पॉलिटिकल मडस्लेजिंग हे भारतीय वास्तव आहे. जोवर त्याच्या नेत्यावर हे होत नाही तोवर त्या पक्षाला काही बेस नाही असे समजतात म्हणे! Wink
तेव्हा केजरीवाल यांच्या आआपने बर्‍याच लवकर "मोठ्या पक्षांत" प्रवेश केला आहेच, त्यांच्यावरील स्लेजिंगमध्ये तर ते मोदी नी गांधी परिवाराला तोडीस तोड टक्कर मिळाते आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पातळी उंचावली आहे. उगाच कॅमेरासमोर काय येते त्याची तुलना करू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्यक्तिगत पातळीवर उतरून हिणकस टीका हा खूप जुना प्रकार आहे. प्रह्लाद केशव अत्रे त्यातले पी एच डी होते.

ठाकरे यांनी तो प्रकार पुढे चालवला.

पण समाजाची एकंदर पातळी उंचावली असल्याने अत्रे बोलतात ते आवडीने ऐकायला (उच्चभ्रू) लोक जात तसे अलिकडे ठाकर्‍यांचे ऐकायला जात नसत. पातळी उंचावली आहे या अरुणजोशींच्या मताशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अत्र्यांचा अग्रलेखाचा हा एक नमुनाः http://bhaupadhye.blogspot.in/2010/07/blog-post_7487.html

अधिक माहितीः पु.भा.भावे यांनी अत्रे यांच्याच पातळीवर उतरून अत्यंत गलिच्छ शैलीचे अग्रलेख लिहून केलेल्या कुस्तीचा संग्रह 'आदेश विरुद्ध अत्रे' या पुस्तकात जिज्ञासूंना वाचावयास मिळेल. अत्र्यांची वनमाला वगैरे प्रेमप्रकरणे, नाशिक स्थानकावर दारु पिऊन घातलेला गोंधळ वगैरे 'कऱ्हेचं पाणी' मध्ये न आलेला समग्र इतिहास या छोटेखानी पुस्तकात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रचंड सहमत. आदेश विरुद्ध अत्रे या पुस्तकात इतकी खतरनाक भाषा आहे की हैट्ट वाटते एकदम. एक उदा. पुरे पडावे. अत्र्यांनी सावरकरांवर टीका केली म्हणून पु भा भावे खवळले आणि त्यांनी अत्र्यांवर टीका केली.

सावरकर आणि अत्रे यांची तुलना करताना भावे लिहितात,

या दोघांची तुलना म्हणजे कुंतीपुत्र अर्जुन आणि विराटपुत्र उत्तर यांच्या तुलनेप्रमाणे आहे. रणभूमी हे एकाचे वांछित शय्यास्थान, तर शय्यास्थान ही दुसर्‍याची वांछित रणभूमी!!

शेवटी अत्रे चिडले आणि त्यांनी अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला- जो ते हरले. इतका वैट्ट पराभव त्यांना कदाचित एकदाच सहन करावा लागला असेल. लेडीज हाष्टेलात संशयास्पदरीत्या ठेवलेला पलंग, वनमालेबरोबरचे संबंध, इतर मालमत्ता, इ.इ. गोष्टी इतक्या खतरनाक आहेत की अत्र्यांबद्दलच्या प्रतिमेला पूर्णच तडा जातो ते वाचून. ते पुस्तक वाचल्यावर आमच्या घरी अत्रेवाङ्मय का नाही त्याचा उलगडा झालासे वाटले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवरा! काय जहाल अग्रलेख आहे! बाप रे...
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिगत पातळीवर उतरून हिणकस टीका हा खूप जुना प्रकार आहे. प्रह्लाद केशव अत्रे त्यातले पी एच डी होते.

अवान्तर - खरंय अगदी. अत्र्यांच्या आक्रस्ताळी आणि कमरेखालच्या विनोदाचं तथाकथित मराठी मध्यमवर्गाला एवढं का कौतुक आहे/होतं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कमरेखालच्या विनोदाचं तथाकथित मराठी मध्यमवर्गाला एवढं का कौतुक आहे/होतं ?

अजूनही आहे की..... फेसबुक पहात नाही का तुम्ही?
फक्त ते आवडत असल्याचे हल्ली ते जाहीर करत नाहीत.... पक्षी अशा सभांना वगैरे जात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.