मला तर बाबा काहीच कळत नाही

चहाच्या कपाकडे निरखून पाहत,
खिडकीला लागलेला गंज बघता बघता
त्याला साक्षात्कार झाला -
मला तर बाबा काहीच कळत नाही
मला तर बाबा काहीच कळत नाही

मासेबाजारात झटापटीत फ़ीश विकत घेताना,
एका मृतनेत्री मत्स्याकडे टक लावताना
त्याला साक्षात्कार झाला -
मला तर बाबा काहीच कळत नाही
मला तर बाबा काहीच कळत नाही

परीक्षेतील भयाकृती आकडे जेव्हा
कागदाबाहेर येऊ लागले तेव्हासुद्धा,
त्याला साक्षात्कार झाला -
मला तर बाबा काहीच कळत नाही
मला तर बाबा काहीच कळत नाही

काही तास खर्चून सुद्धा ऐसीवरती,
गूढ गुंजनी चर्चा अजिबात झेपेनात तेव्हा
मला देखील साक्षात्कार झाला -
मला तर बाबा काहीच कळत नाही
मला तर बाबा काहीच कळत नाही

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (3 votes)

प्रतिक्रिया

मला बी काय कळानी झालयं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कोणा एका कवीने म्हटलं होतं की poem does not have to mean, but be... तसंच चर्चांबाबतही म्हणून बघा. चर्चा हा कलाप्रकार आहे. त्यामधून अर्थनिष्पत्ती शोधण्याऐवजी त्या चर्चेच्या नाजूक आंदोलनांवर तुमचं चित्त वरखाली होऊ द्या. मग तुमच्या लक्षात येईल की ऐसीवर सर्वोत्तम कलाकृती निर्माण होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हाय!
काही धागे पाहिल्यावर "गड्या आपुला देश बरा" असं म्हणून हताश होत्साता ते बंद केले होते. आता त्यातील सौंदर्य नव्याने शोधणे आले! :-B

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मासेबाजारात झटापटीत फ़ीश विकत घेताना,
एका मृतनेत्री मत्स्याकडे टक लावताना
त्याला साक्षात्कार झाला -
मला तर बाबा काहीच कळत नाही
मला तर बाबा काहीच कळत नाही

पारंपरिक मत्स्याहारी जे असतात, त्यांना त्या मेलेल्या माशाच्या नजरेस नजर भिडवून, (आकंठ प्रेमात बुडलेल्या दोन प्रेमिकांगत) डोळ्यात डोळे घालून (झालेच तर डोळा उचलून) बरेच कायकाय समजते म्हणे. (जसे, कार्बन डेटिंग केल्यासारखे अचूक नाही, तरी माशाच्या मृत्युसमयाचे बर्‍यापैकी ढोबळ निदान, वगैरे. निदान, असे ऐकलेले आहे. खरेखोटे एक तो परमेश्वराचा प्रथमावतारच जाणे.)

थोडक्यात, वरील काव्यपंक्ती वाचून,

"कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?" (- पु.ल.)

या निष्कर्षाप्रत येता यावे काय?

(दुसरे म्हणजे, वरील काव्यपंक्तींतील 'फ़ीश' या शब्दाचा वापर. हा बहुधा त्या माशाइतकाच डेड गिववे मानता यावा. अन्यथा, पारंपरिक मत्स्याहारी हा शब्द बहुधा पारंपरिक बिगरमत्स्याहार्‍यांशी / बिगरपारंपरिक मत्स्याहार्‍यांशी बोलत असल्याखेरीज सहसा वापरत नसावेत, अशी अटकळ आहे.)

- (कारण शेवटी भटच) 'न'वी बाजू.

---------------------------------------------------------------------------------------------------

बोले तो, मासा खाता येण्याइतपत ताजा आहे की नाही, इतपत ढोबळ. मासा कोठल्या शतकात मेला, इतपत अचूक नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येक्स्प्लेन केल्याबद्द्ल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin मलापण बै कै मंजे कैच कळ्त नै!
चर्चा लाइव्ह वाचत असल्यास कदाचीत मजा येऊ शकते. पण कधीकधी जास्तच काथ्या कुटला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0