कोल्हा आणि काळविट

(दृश्य : जंगलातील एक नदी. एक कोल्हा येतो; नदीवर पाणी पिऊ लागतो. थोड्या वेळात अंगावर सुंदर ठिपके असलेले एक काळवीट येते. कोल्हा जिथे पाणी पित आहे, त्या जागेपासून सुरक्षित अंतरावर; मात्र पाण्याच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूने काळवीट पाणी पिऊ लागते. काळविटाला पाहून कोल्हा ओरडा ओरड करू लागतो)

कोल्हा : अरेरे हे काय केलेस तू हे?
काळविट : काय झाले भाऊ?
कोल्हा : अरे, तू माझे पाणी उष्टे केलेस. तेच मला प्यावे लागले. अरे, मला आज उपवास आहे. माझा उपवास बाटला.
काळविट : भाऊ, मी तुमचे पाणी कशाला उष्टे करू?
कोल्हा : पुन्हा प्रश्न विचारतोस? मी पाणी पित असताना तू पाणी पिलास. तुझ्या तोंडचे पाणी वाहून माझ्या तोंडात आले.
काळविट : भाऊ, मी प्रवाहाच्या खालच्या बाजूने आहे. तुम्ही वरच्या बाजूने आहात. मग माझ्या तोंडचे पाणी तुम्च्याकडे कसे येइल? माझ्या तोंडचे पाणी खालच्या दिशेने वाहून जात आहे.
कोल्हा : ते काही नाही. तू अपराध केला आहेस. तू काल माझे पाणी उष्टे केले असणार. काल तू वरच्या बाजूने पाणी पिला असणार. होय नक्कीच. आठवले मला. तू काल माझे पाणी उष्टे केले होते. बरा सापडास. माझे पाणी उष्टे करण्याची आणि माझा उपवास बाटविण्याची किंमत तुला चुकवावीच लागेल.

काळविट : भाऊ, मी तर काल या नदीवर आलोच नव्हतो.
कोल्हा : असे कसे? तू काल पाणी तर पिला असशीलच ना? मला शिकवू नकोस.
काळविट : भाऊ, मी काल या नदीवर नव्हे, त्या पलिकडच्या नदीवर पाणी पिलो.
कोल्हा : तेच... तेच म्हणतोय मी. काल तू पलिकडच्या नदीवर पाणी पिलास. तेथेच मी सुद्धा पाणी पिलो. तेथे तू मला तुझे उष्टे पाणी पाजलेस. या पापाची शिक्षा तुला भोगावीच लागेल.
काळविट : भाऊ, मी पलिकडच्या नदीवर पाणी पिलो तेव्हा, तुम्ही तिथे नव्हता. मग माझे उष्टे पाणी तुम्ही कसे काय पिलात?
कोल्हा : ते काही नाही. तू निघून गेल्यानंतर मी तेथे आलो होतो. तू जिथे पाणी पिलास तिथेच मी पाणी पिलो. तू कुठे पाणी पिलास हे तू मला आधी सांगायला पाहिजे होते. म्हणजे मग, तुझे उष्टे पाणी पिण्यापासून मी वाचू शकलो असतो. चल पापाची शिक्षा भोगायला तयार हो.
काळविट : भाऊ, मी पाणी पिऊन गेल्यानंतर माझे उष्टे पाणी तर खाली वाहून गेले. मग तुम्ही माझे उष्टे पाणी कसे काय पिलात?

कोल्हा : तू मला उलटून बोलत आहेस. तू मला शिव्या देत आहेस. तुला तुझ्या संपूर्ण हरीण जातीची फूस दिसते आहे. तुम्हा लोकांना याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. तू फार माजला आहेस... माझ्याशी असांसदीय शब्दांत बोलू नकोस...
काळविट : भाऊ, मी तुम्हाला कोणतीही शिवी दिली नाही. आपला संवाद आठवून पाहा. त्यात एकही असांसदीय शब्द तुम्हाला सापडणार नाही.
कोल्हा : (सगळे संवाद आठवतो. एकही अपशब्द सापडत नाही.) अरे ढोंग्या, मी आजचे बोलत नाही. तू मला काल शिव्या दिल्या असणार. नक्कीच. तू मला कालच असांसदीय भाषेत बोलला.
काळविट : भाऊ, आपण काल भेटलो सुद्धा नाही; तर मग मी तुम्हाला असांसदीय भाषेत कसा काय बोलेन? असे नीच कृत्य माझ्या हातून कधी होणार नाही.
कोल्हा : हे पाहा तू मला नीच म्हणालास. वाघ-सिंह, चित्ते-बिबटे या उच्चवर्णीय शिकारी प्राण्यांपेक्षा आमची जात नीच आहे, म्हणूनच तू असे बोललास. मी जर का, वाघ, सिंहाच्या जातीत जन्मलो असतो, तर तू असे बोलण्याची हिंमत केली नसती.
काळविट : भाऊ, येथे जातीचा काय संबंध?
कोल्हा : तू माझी जात काढलीस. तू मला जातीवरून शिविगाळ केलीस. अरे मी नीच जातीत जन्मलो असलो तरी माझे काम नीच नाही. आमच्या पूर्वजांनी या जंगलाची सेवा केली आहे. सेवा करून आम्ही काही पाप केले आहे का?

काळविट : भाऊ, एक शंका आहे.
कोल्हा : शंका? तू जातीयवादी आहेस, यात कोणतीही शंका नाही.
काळविट : नाही भाऊ, शंका अशी आहे की, कोल्हा ही जात तर शिकारी आहे. सगळ्या शिकारी जाती उच्चवर्णीय असताना, तुमची एकटी कोल्हा जातच कशी काय मागास जातीत येते.
कोल्हा : कोणती जात उच्चवर्णीय आणि कोणती जात मागास हे ठरविण्याचा अधिकार माझाच आहे. मीच कोल्हा जातीला मागासवर्गीय म्हणून जाहीर केले आहे आठ वर्षांपूर्वी.
काळविट : भाऊ, असे कसे...?
कोल्हा : (त्याचे बोलणे तोडत)...तुझी मानसिकता उच्चवर्णीय आहे... (पुढे काय बोलावे हे सुचत नाही. डोके खाजवून) ...तू हे आहेस... तू ते आहेस... आणखी तू तेहे आहेस. ... नाही, नाही, नाही. आता हे मला सहनच होत नाही. तू मला ओळ्खत नाहीस. माझी छाती ५६ इंच आहे. तुला याची किंमत चुकवावीच लागेल. मी आता माझ्या सगळ्या भाईबंदांना येथे बोलावून घेतो. आणि तुला जन्माची अद्दल घडवतो.

(कोल्हा आपल्या भाईबंदांना बोलावण्यासाठी कोल्हेकुई सुरू करतो.)

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (6 votes)

प्रतिक्रिया

नमो नमो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रागा रागा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंय!
जीएंच्या "विदूषक" कथेतल्या "कावळे आणि हंसांच्या" रूपककथेची आठ्वण झाली हे वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स.
मी वाचलेले नाही. आता नक्की वाचीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त कथा आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नीच (जातीचा) राजकारणी म्हटले हा मोदींचा केकाट अनावश्यक/चूकीचा/स्वार्थी होता. 'जातीचा' हा न उच्चारलेला शब्द मधे आणणे तर अजूनच अतार्किक होते.

अर्थातच काँग्रेसी (प्रियंका धरून) काटवीटी साळसूद आहेत असे म्हणणे तितकेच चूक आहे. ज्या माजात तिने "मी राजीवची मुलगी आहे" व "कोण स्मृती?" म्हटले ते पाहता सबब रुपक एकांगी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>'जातीचा' हा न उच्चारलेला शब्द मधे आणणे

राजकारणात हे चालतेच. जसे मोदींच्या वाराणसीतल्या एका सभेला परवानगी नाकारली म्हणून भाजपने भरपूर थयथयाट केला. प्रत्यक्षात त्या जागी सभा घेणे योग्य नाही असा 'गुजरात पोलीसांनी' सल्ला दिल्याने ती सभा रद्द करण्यात आली होती असे बातम्यांतून दिसते.

Election Commissioner H S Brahma had earlier said that a Gujarat police official, who was part of the Advance Security Liasson team of the BJP Prime Ministerial candidate, had "indicated" that the chosen ground for holding the rally was not a "desirable" place for the VIP to address his rally. The Gujarat police official said it would "not be possible" to hold a rally at the venue as it was "highly congested" and "complicated", Brahma had said.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गुजरात पोलिस मंजे बीजेपीचे पोलिस का? गुजरात पोलिसच्या किती अधिकार्‍यांनी, कितीदा, मोदीला, त्याच्या सरकारला embarassing situations मधे आणले याची गिनती आहे का?... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय संबंध?

बेसिकली गुजरात पोलीस (म्हणजे मोदीचे रिपोर्टीज) तिथे पाहणी करून सभा घेऊ नये असे सांगतात तरी सभा घेऊ दिली नाही असा मोदी अधिक भाजप इलेक्शन कमिशनवर आळ घेतात....... हे निवडणुकीच्या काळात चालायचेच असे मी म्हटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

निवडणूक काळात परवानगी देण्याचे काम निवडणूक आयोग करतो. पोलीस केवळ 'सल्ला' देतात. जो सहसा निवडणूक आयोग पाळते, पण निर्णय ज्याने घेतला त्यावर टिका/स्तुती होणे अगदीच गैर वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुजरात पोलिसच्या किती अधिकार्‍यांनी, कितीदा, मोदीला, त्याच्या सरकारला embarassing situations मधे आणले याची गिनती आहे का?..

मोदींनी पोलिस अधिकार्‍यांना वापरून नंतर वार्‍यावर सोडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या माजात तिने "मी राजीवची मुलगी आहे" व "कोण स्मृती?" म्हटले ते पाहता सबब रुपक एकांगी आहे.

आपल्या बापाला बाप म्हणण्यात माज शोधणे जरा अतीच नाही काय? कोणी आपला बाप होण्याचा प्रयत्न करीत असेल तर काय त्याचे स्वागत करायचे की काय? मला तर वाटते, प्रियंका यांनी फारच सौम्य भाषा वापरली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येड पांघरून पेडगावला जाणे हे ही अतिच नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

येड पांघरून पेडगावला जाणे हे ही अतिच नाही का?

एक शंका, येड पांघरून पेडगावऐवजी खेडगावला, वडगावला अथवा झेडगावला जाणे चालते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो... चालतं की... वायझेडगावाला गेलेलही चालतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

समजले! बंदी फक्त पेडगाव पुरती मर्यादित आहे, तर!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बंदी फक्त पेडगाव पुरती मर्यादित आहे, तर!!

अनलेस यू ह्याव पेड फॉर इट, ऑफ कोर्स. मग बंदी नाही.

फुकटात जाता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हेरी गूड. म्हण्जे, पेमेन्ट केले तर, पेडगावला बी जाता यील म्हणा की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काँग्रेस वा प्रियंका कथेतील काळवीटाइतके नम्र नाहीत हे नमूद करू इच्छितो.

आपण म्हणता तर मी या (इतक्या नीच) माणसाला पित्यासमान मानायला तयार नाही हे म्हणायचा अधिकार तिला आहे असे मानू. पण 'कोण स्मृती?' म्हणणे?
आणि 'कुमार विश्वासला मारेन' म्हणणाराला 'नंतर भेटा' म्हणणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

राजनाथ सिंग यांनी राज ठाकरेंना 'तुमचा पाठिंबा मागितलाय कोणी' असे म्हणणे हा माज आहे की नाही? विशेषतः राज पोटेन्शिअल समर्थक असताना.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Let's talk out Priyanka Gandhi first. She is projected as a humble deer in this thread. I wanted to make a limited point that such delineation is incorrect.

Of course, BJP is not short of cunningness. But this story is one sided. I am ok if this story is meant to be a Congress propaganda. However, if the author wants to make an implication that he has made an impartial assessment, I want him stand corrected.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Let's talk out Priyanka Gandhi first. She is projected as a humble deer in this thread. I wanted to make a limited point that such delineation is incorrect.

आपण म्हणता तर मी या (इतक्या नीच) माणसाला पित्यासमान मानायला तयार नाही हे म्हणायचा अधिकार तिला आहे असे मानू. पण 'कोण स्मृती?' म्हणणे?... आणि 'कुमार विश्वासला मारेन' म्हणणाराला 'नंतर भेटा' म्हणणे?

अरुणभौ, तुमच्या या दोन युक्तिवादांत मोठे क्वॉन्ट्राडिक्शन आहे. राजनाथ सिंग यांचा विषय काढताच तुम्ही "I wanted to make a limited point" असे म्हणता. या उलट माझी ही कथा "नीच" या शब्दावरून झालेल्या राजकारणावर मर्यादित असताना (तुमच्या भाषेत सांगायचे तर "नीच" हा शब्द माझ्या कथेचा "limited point" आहे.) तुम्ही "स्मृती इराणी"ला आणि "कुमार विश्वास"ला मध्ये आणता. हे कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

So long as your story is limited to just one word - mean, base - I fully coincide with you. It was deplorable of Modi to bring in his OBC status.

The moment you want to extend it to entire propaganda of Priyanka or Congress, I more than disagree with you.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

The moment you want to extend it to entire propaganda of Priyanka or Congress, I more than disagree with you.

आपला आक्षेप नेमका कोणत्या गोष्टींना आहे. यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनीच प्रचाराची पातळी खाली आणली, याच्याशी तरी तुम्ही सहमत आहात की नाही. नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सरकारची "माँ-बेटे की सरकार" अशा शब्दांत केलेली हेटाळणी योग्य होती, असे आपणास म्हणायचे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनमोहन सिंग स्पाईनलेस होते हे अजून किती लोकांकडून ऐकायची आहे? राहुलबाबाने अध्यादेश कसा फाडला त्याचा व्हिडिओ पाहा. माकेन साहेबांचा 'बेटा' च्या एंट्री पूर्वीचा नि नंतरचा स्टान्स पाहा. बरुआंच्या पुस्तकातून उचललेली ती फ्रेज आहे.

शिवाय प्रचाराची पातळी काँग्रेसने खाली आणली. मोदीला त्यांनी वापरलेली सारी विशेषणे एकत्र वाचा. मग कळेल.

"प्रियंकाचे प्रचार करणे समजण्यासारखे आहे. कोणीही आपल्या आईचा, भावाचा प्रचार करेलच. त्यात आपत्तीजनक काही नाही. माझ्यावर जी टिका ती करेल त्याचे मी उत्तर देईन. अन्यथा ती मला मुलीसमान आहे." - मोदी. "मी फक्त राजीवची मुलगी आहे." - प्रियंका. हेटाळणी कोण करतंय?

कितींदा मोदी म्हणाले कि प्रचारात आम्ही टिका करतो पण आमचे रिलेशन्स चांगले आहेत.

बाय द वे, या काळवीटाला जे 'नीच' राजकारण दिसले ते काय होते हे सांगाल का? 'हिटलर', गूंडा, मारेकरी, कसाई, जातीयवादी, खूनी, राक्षस, याला तुकडे तुकडे केले पाहिजे, देशद्रोही, इ इ लै मोठि डिक्शनरी आहे काँग्रेसची. जस्ट असे करा - a congress leader + on Modi असे गुगल करा. कोणीही एक सज्जन, नीट भाषा वापरणारा, अपवाद असेल तर मला सांगा. आणि लक्षात घ्या ते एका ३ टाईम मुख्यमंत्र्याबद्दल बोलताहेत. विरोधी पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या नेत्याविषयी बोलताहेत. शिवाय त्याचे राज्य याच काँग्रेसने एक उत्तम प्रशासित राज्य म्हणून मान्य केले आहे. आणि शेवटी - तुम्ही सुप्रिम कोर्टापेक्षा स्वतःला शहाणे समजत असाल तर फक्त हो म्हणा, बाकी उत्तरे द्यायची गरज नाही मग.

मोदी लै संतासारखे वागले मी म्हणत नाही. त्यांनी ही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. पण बीजेपीचा प्रचार काँग्रेसपेक्षा लै बरा होता. आणि मी काँग्रेसची शेवटच्या दिवशीचे चिकन आणि दारू सोडून बोलतोय. ते पकडलं तर विसराच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

@अरुणजोशी,

काही शंका आहेत, विचारून घेतो.

१. "मी फक्त राजीवची मुलगी आहे." या वाक्यात वाइट काय आहे? कोणी कोणाचा बाप होण्याचा प्रयत्न करू नये, हे योग्य नव्हे का?

२. "हिटलर, गूंडा, मारेकरी, कसाई, जातीयवादी, खूनी, राक्षस" ही विशेषणे गांधी परिवारातील कोणत्या सदस्याने वापरली, हे जरा सांगता का? बरे ही विशेषणे अगदीच खोटी आहेत का? समजा ती खोटी आहेत, तरीही ती मोदींनाच का लावली जात आहेत? वाजपेयी यांना कोणी कधी का लावली गेली नाहीत?

३. संघोट्यांच्या परिवारातील नेत्यांकडून वापरली गेलेली विशेषणे कोणती होती?

४. सुप्रीम कोर्टाचे म्हणत असाल तर राजीव गांधी यांना बोफोर्स प्रकरणामधून त्यांच्या म्रुत्यूनंतर २५ वर्षांनी दोषमुक्त केले. तोपर्यंत जे डेमेज व्हायचे ते होउन गेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण वन बाय वन जाऊ.
१. तुम्ही स्वतःला सुप्रिम कोर्टापेक्षा शहाणे समजता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सुप्रिम कोर्ट सुद्धा स्वतःला तुम्ही म्हण्ता त्या पातळीवरचे "शहाणे" समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी प्रश्न पून्हा विचारतो -
१. सुप्रिम कोर्टाच्या निकालाचा आपण कितपत आदर करता? भारतीत न्यायव्यवस्था काम करते असे मानता का? कि भारताच्या कोणत्याही व्यवस्थेने काहीही म्हटलेले असो, जे स्वतःला वाटते ते सर्वात योग्य असे मानता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आणि मी काँग्रेसची शेवटच्या दिवशीचे चिकन आणि दारू सोडून बोलतोय. ते पकडलं तर विसराच.

भले बहादर. भाजपाच्या शिबिरात सत्यनारायणाचे तीर्थ प्राशन करुन प्रचार केला जात होता, हे माहिती नव्हते ब्वा आपल्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका ३ टाईम मुख्यमंत्र्याबद्दल बोलताहेत

एका दोन टाईम पंतप्रधानांबद्दल बोलताना स्पाईनलेस, मौनमोहनसिंग, हुजऱ्या, रटाळ वगैरे बऱ्याच मोठ्या स्पेक्ट्रमवर सर्वत्रच टीका होत होती. मुख्यमंत्री त्यामानाने फारच छोटी व्यक्ती झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मौनमोहनसिंग हे नाव नव्याने कळाले. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कितींदा मोदी म्हणाले कि प्रचारात आम्ही टिका करतो पण आमचे रिलेशन्स चांगले आहेत.

मोदीसोबत आमचे पण रिलेशन्स चांगलेच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्तुत्य आहे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी वर विचारलेले प्रश्न पण स्तुत्य आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग त्यान्ची उत्तरे नाही दिलीत.

प्रश्न पुन्हा पेस्ट करू का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, मी सारी उत्तरे देत आहे. उगाच कंफ्यूजन नको म्हणून वन बाय वन इश्श्यूज चर्चू या ना. आपले जे काही योग्य, रितसर म्हणजे आहेत ते, माझ्या चूका मान्य करून, मी ऐकायला तयार आहे.

आता कृपया त्या सुप्रिम कोर्टाच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मी आपल्या सार्‍या शंकांचे समाधान करेन याबद्दल निश्चिंत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ठीक. मी सुप्रीम कोर्टापेक्षा शहाणा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कं
टा
ळा

ला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

तंतोतंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन


ला


कं
टा
ळा

ला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

कंटाळा आला असताना एवढे <br> किमान एन्टर मारणं म्हणजे फार कंटाळा आलेला नाही हे धागालेखकाला सुचवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागालेखक की प्रतिसादलेखक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धागालेखक लिहिल्यावर परत बदलायचा मला कंटाळा आला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी सुद्धा कंटाळलो आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I have not seen (in video) the tone, tenor, choice of words and body language of Rajnath. You may be correct in talking of his arrogance.

However, to say that by supporting NDA's leader and by entertaining meetings with leaders like Gadkari, MNS is confusing the voters of Mahayuti, seems correct. Saying no such support is his obligation as ally of Shivsena.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आवडली. आधी वाचल्यासारखी वाटतेय. संदर्भ वेगळा होता बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल लोकसत्तात वाचली. थोड्या वेगळेस्वरुपात.
बाकी वादात नाही पडायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल लोकसत्तात वाचली. थोड्या वेगळेस्वरुपात.
बाकी वादात नाही पडायचे.

श्री. जेपी, लिंक द्या. आम्हाला पण वाचू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुपक कथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धमाल! मझा आला!!

- (नीच कृत्य न करणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक. मी सुप्रीम कोर्टापेक्षा शहाणा नाही.

ठिक. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा.
चर्चा काय करायची आहे.
१. "मुलीसारखी.."- मोदी + "नीच.." -प्रियंका इतकीच
२. एकूण प्रियंकाचे बोलणे नि त्यावरील केवळ मोदीचे बोलणे
३. गांधी घराणे विरुद्ध मोदी एकटे
४. गांधी घराने वि भाजप
५. काँग्रेसचा एकूण प्रचार वि भाजपचा एकून प्रचार -

विधानांचे अर्थ, बेजबाबदारी, कोनत्या पदावरच्या, किती मोठ्या नेत्याने बोलले, कायदेशीर पणा, नैतिकता,इ इ.
Let's keep it brief.
मुद्दा ५ वर माझे मत नि आपले मत वेगळे असू शकते. त्यावर सन्मानजनक मतभेद ठेऊन, एक दोन बाबी अ‍ॅग्री करून, समारोप करू. पण इतकी चर्चा नको.
ललित लिहिताना तुम्हाला जे काही अभिप्रेत होतं, तितकंच बोलू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या शंकास्पद प्रतिसादातून निर्माण झलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या :

प्रश्न वर दिलेच आहेत, पण तुम्ही विषयांतर करीत आहात, म्हणून पुन्हा पेस्ट करतो. तर प्रश्न असे. विषयांतर न करता थेट उत्तरे हवी आहेत.

१. "मी फक्त राजीवची मुलगी आहे." या वाक्यात वाइट काय आहे? कोणी कोणाचा बाप होण्याचा प्रयत्न करू नये, हे योग्य नव्हे का?

२. "हिटलर, गूंडा, मारेकरी, कसाई, जातीयवादी, खूनी, राक्षस" ही विशेषणे गांधी परिवारातील कोणत्या सदस्याने वापरली, हे जरा सांगता का? बरे ही विशेषणे अगदीच खोटी आहेत का? समजा ती खोटी आहेत, तरीही ती मोदींनाच का लावली जात आहेत? वाजपेयी यांना कोणी कधी का लावली गेली नाहीत?

३. संघोट्यांच्या परिवारातील नेत्यांकडून वापरली गेलेली विशेषणे कोणती होती?

४. सुप्रीम कोर्टाचे म्हणत असाल तर राजीव गांधी यांना बोफोर्स प्रकरणामधून त्यांच्या म्रुत्यूनंतर २५ वर्षांनी दोषमुक्त केले. तोपर्यंत जे डेमेज व्हायचे ते होउन गेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. "मी फक्त राजीवची मुलगी आहे." या वाक्यात वाइट काय आहे? कोणी कोणाचा बाप होण्याचा प्रयत्न करू नये, हे योग्य नव्हे का?

ठिक आहे. म्हणणे १००% मान्य. आपले रुपक पुन्हा वाचले. "मी ओबीसी आहे" या रुपकाचे पार्श्वभूमीवर, या वाक्यात काय वाईट आहे. ते आहेत म्हणून म्हणत आहेत. घटनेने मना केले आहे का? मग तुम्ही रुपकात जातीच्या उल्लेखाचा उल्लेख जसा केला आहे तो चूक आहे.

मला मोदी चूक का बरोबर याच्याशी मतलब नाही, तुमची स्टोरी वन सायडेड आहे असे म्हणायचे आहे. म्हणून रुपक बदला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो, त्यांनी स्वतच आपल्या जातीला ओबीसी दर्जा दिला आहे, असे आरोप होत आहेत, गेले १५ दिवस. त्यांचे "ओबिसी"पण वाद्ग्रस्त ठरले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, ते जेव्हा 'मी ओबीसी आहे' म्हणत होते तेव्हा ते होते कि नाही? यावरून आपले रुपक खोटे ठरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>"हिटलर, गूंडा, मारेकरी, कसाई, जातीयवादी, खूनी, राक्षस" ही विशेषणे गांधी परिवारातील कोणत्या सदस्याने वापरली

सोनिया गांधी यांनी त्यांना मौत के सौदागर म्हटले होते असे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
(वा.. थत्तेचाचांचा हा गुण आवडतो बुवा मला. कॉग्रेससमर्थक असले तरी काँग्रेसच्या चुका सुद्धा ते दाखवून देतात. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अतिशयच सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>वा.. थत्तेचाचांचा हा गुण आवडतो बुवा मला. कॉग्रेससमर्थक असले तरी काँग्रेसच्या चुका सुद्धा ते दाखवून देतात.

हॅ हॅ हॅ. मी फक्त त्या म्हणाल्या असं सांगितलं. ती त्यांची चूक होती किंवा त्या चुकीचं बोलल्या असं मी म्हटलं नाही. Smile (अर्थात ते बरोबर होतं असंही मी म्हटलं नाही). Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(अर्थात ते बरोबर होतं असंही मी म्हटलं नाही)

Smile
हेही नसे थोडके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मलाही नितिनजींची स्तुती करण्याची उबळ येतेय. पण आवरतो. लोक नंतर असले कोट अगेंस्ट मधे वापरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सोनिया गांधी यांनी त्यांना मौत के सौदागर म्हटले होते असे आठवते.

"हिटलर, गूंडा, मारेकरी, कसाई, जातीयवादी, खूनी, राक्षस" या अतिलोकप्रिय विशेषणांत "मौत के सौदागर" हे अतिसामान्य विशेषण अम्हांस दिसुन आले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही अगोदर तुमचे रुपक कसे चूक नाही ते सांगा. कोणी स्वतःची जात/वर्ग सांगीतला तर चूक काय? मग तुम्ही का इतक्या हेटाळणीने "मधे जात का आणली" असा सुर लावलाय रुपकात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जात सांगणे चुक आहे, असे मी कोठेही म्हतले नाही, जोशीबुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हा : हे पाहा तू मला नीच म्हणालास. वाघ-सिंह, चित्ते-बिबटे या उच्चवर्णीय शिकारी प्राण्यांपेक्षा आमची जात नीच आहे, म्हणूनच तू असे बोललास. मी जर का, वाघ, सिंहाच्या जातीत जन्मलो असतो, तर तू असे बोलण्याची हिंमत केली नसती.
काळविट : भाऊ, येथे जातीचा काय संबंध?
कोल्हा : तू माझी जात काढलीस.

मोदीने आपल्या जातीचा शेवटी उल्लेख केला. त्याने जातीचा फायदा घेतला, इ इ आरोप रुपकात आहे. दिसतंय ते. आता मी पून्हा विचारतो - मोदी ओबीसी आहेत हे खोटं आहे का? मग इतक्या हेटाळणीने रुपक का लिहिलं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरिल परिच्छेदत "जात सांगणे चुक आहे", असे वाक्य कोण्ते आहे बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हा मुद्दाम जात मधे घुसडून भांडत आहे असे तुम्हाला रुपकात म्हणायचे नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काळविट : भाऊ, येथे जातीचा काय संबंध?

या वाक्याचा अर्थ असा आहे : "मी जातीबद्दल काहीही बोललो नाही, तरी तुम्ही माझ्यावर जात काढल्याचा आरोप कर्ताय"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियंका म्हणाली "मी तर फक्त तुम्ही नीच आहात म्हणाले. मी ओबीसी वैगेरे म्हणाले नाही." असा होतो ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>कोणी स्वतःची जात/वर्ग सांगीतला तर चूक काय?

कोणी इतराने सांगितली तर माहिती नै..... पण संघाच्या सच्च्या पाइकाने तरी सांगू नये. (संघात जातिभेदाला थारा नाही असे नुकतेच एका लांबलचक प्रतिसादातून कळले).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चर्चा फक्त रुपकाच्या (अ)चूकतेबद्दल आहे.

बाय द वे - संघाच्या लोकांनी इतका मोठा आदर्श पाळावा अशी आपली खरीखुरी अपेक्षा असेल तर तुम्ही काँग्रेसवाले नाहीतच. कारण इथून पुढचा विचार करायला माणूस फार पुढारलेला लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संघाच्या लोकांनी इतका मोठा आदर्श पाळावा अशी आपली खरीखुरी अपेक्षा असेल तर तुम्ही काँग्रेसवाले नाहीतच. कारण इथून पुढचा विचार करायला माणूस फार पुढारलेला लागतो.

संजय जोशींएवढा पुढारलेला का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, चर्चा मोदींबद्दल चाललीय. संजयबद्दल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही चर्चा संघोट्यांच्या पुढारलेपणाकडे नेली. मी नाही. मी फक्त तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा पुढे नेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, संघोटे मागास. मान्य. पण तुमचे काळवीट साळसूद नाही ते मान्य आहे कि नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काळ्वीट साळ्सुद नव्हे गरिब, अश्राप असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, ते गरीब्/अश्राप नाही, हे रुपक एकांगी आहे, हे मान्य कि नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे रुपक गरीब्/अश्राप आहे, हे मला १००% मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ना. ना. तुमच्यासारखा खंदा लेखक नि समर्थक असल्यावर ते अश्राप कसे?

बाय द वे - तुम्ही फक्त कॉंग्रेसचे समर्थन करो म्हणा, ते ठिक आहे. बरेच लोक करतात. मी पण बरेचदा करतो. पण मी संतुलित लिहिले आहे म्हणून वाचकांची दिशाभूल करू नका. मोदी नि प्रियंका दोघेही अजून औचित्यपूर्ण वागू शकले असते असे म्हणू नि समारोप करू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आता एका नव्या रूपकावर चर्चा करू या का? रूपक असे आहे :
"तेजा हा एक गरीब आणि अश्राप जीव आहे."
मला वाटते या रूपकावर तरी आपल्या दोघांत मतभेद होणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चला, भरुन पावलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0