भुतं : एक चिंतन

लहानपणी बहुतेकांना “मोठेपणी कोण होणार” हा यक्षप्रश्न विचारलेला असतोच. मग त्याला चित्रविचित्र उत्तर देणे हे त्या बाळांचं कर्तव्य होऊन बसतं.
अशाच एका पाहुणेकाकांनी मला विचारलं होतं -

“ काय मग अस्वल, कोण होणार तू मोठा झाल्यावर?“
“मी अमावस्येच्या रात्री भुतं शोधणार आहे”

आमचं अस्वली उत्तर ऐकून बहुधा पाहुणेकाकांनी ह्याह्याह्या करत चहात तोंड घातलं. ही भुतांची आवड तेव्हापासूनची आहे.

भुतं नेमकी आयुष्यात कधी डोकावली ते आठवत नाही. पण जाणतेपणी ऐकलेली पहिली भुताची गोष्ट आमच्या एका थोरल्या मावसभावाच्या नावे जमा आहे.
त्याने कोणत्याश्या इंग्रजी पिक्चरची ष्टोरी आम्हाला एका गणपतीतल्या रात्री सांगितली होती. त्यातलं भूत “heart, liver kidneys… in your bed” असं म्हणून मुलांना मारून टाकी. हार्टलिवरकीडनीस- हा माझ्या दृष्टीने एकच शब्द होता- ची भीती चांगलीच आठवते.

भुतांशी अशी क्वचित गाठभेट होत असली तरी भुतांबद्दलची अथोरिटी भेटली ती आजीच्या रुपात. तिच्याकडे न संपणारया कथा होत्या. महाभारत, रामायण, हितोपदेश आणि काय काय. पण त्या सगळ्यापेक्षा जास्त डिमांड भुतांची असे. आणि माझी अर्थशात्राचा ‘अ’देखील माहिती नसलेली गावठी आज्जी ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्व अचूक हेरून मला भुताखेतांच्या प्रदेशात बिनधास्त घेऊन जाई. मग रात्री आईबाबांना नावापुरतं गुड नाईट करून आज्जीच्या गोधडीत गुरफटून रोजची भुताची गोष्ट चालू! आजीकडे बरीच भुतं येउनजाउन असावीत. बस चालवताना गायब झालेला ड्रायव्हर, पिंपळाखाली बसू नको असं बजावूनदेखील तिथेच रात्री झोपलेला भिकू, गावाच्या वेशीबाहेर झोपडीत राहणारी वेडी जनी ही सगळी टीम बरेचदा त्या गोष्टींमध्ये समाविष्ट होई.

क्वचित कधीतरी गोष्टींत स्पेशल appearance असे. रात्रीबेरात्री भीक मागायला येणारी एक बाई असे, जी हाकेला ओ देताच नाहीशी व्हायची. किंवा भल्या पहाटे घरासमोर उतरणाऱ्या ४-५ बायका ज्यांचे चेहेरे कधीच कुणाला दिसायचे नाहीत. वडे तळायला बसल्यावर अचानक आत आलेला नुसताच हात आणि ‘माका दी गो वडो’ अशी पृच्छा – ह्या आणि असल्या किश्श्यांनी आजीने माझ्याकडून कैक वन्समोर मिळवले आहेत.
पण मग सगळ्या छोट्या मुलांचं होतं तेच झालं, आम्हाला (अस्वल असूनही) शिंग फुटली आणि आजीच्या गोष्टीतली भुतं फारच बाळबोध वाटु लागली. हद्द म्हणजे अशा सोम्यागोम्या भुतांची भीती वाटेना. मग आजीकडे आणखी भीतीदायक भुतांची मागणी सुरु झाली. पण माझ्या कोकणातल्या आजीच्या मते कोकणापेक्षा भीतीदायक भुतं कुठेही अस्तित्वात नव्हती.

अशावेळी इष्टापत्ती म्हणून काही खास मित्र कामी आले. त्यांनी आपापल्या आज्या,काक्या आणि आत्त्या सदृश लोकांकडून स्वकष्टाने मिळवलेल्या भूतकथा माझी भूत-भूक भागवू लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वेळा ह्या गोष्टीतले लोक माझ्या चांगलेच ओळखीचे असत. पण त्यांची नावं वेगळी असत. आजीच्या गोष्टीतलेच लोक इथे वेगळ्या नावांनी वावरत होते!

काहीकाही गोष्टी मात्र भलत्याच भयानक होत्या. म्हणजे-

देवळाच्या पुजाऱ्याला रात्री अपरात्री ऐकू येणारे विचित्र आवाज आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यावर सकाळी लोकांना मिळालेलं पुजाऱ्याचं छिन्नविछिन्न प्रेत; समुद्रात मासेमारीसाठी गेलेले आणि कधीच परत न आलेले एक कोळी काका, ज्यांचा फक्त डोळाच लाटेबरोबर वाहून आला होता; रिक्षा चालवताना मागे न बघण्याची ताकीद मिळूनही मागे बघणारा आणि मग सीटवरचे प्रेताचे तुकडे बघून वेड लागलेला रिक्षावाला – ह्या गोष्टी मला आता जास्त भीतीदायक वाटायला लागल्या.

भुताच्या गोष्टी तितक्याश्या दुर्मिळ नसतात हे कळल्यावर मी जमेल त्याला जमेल तिथे भुताबद्द्ल विचारायला सुरुवात केली.आसपास थोडी चौकशी केल्यावर मला धक्काच बसला. माझ्या ओळखीतल्या कित्येक लोकांना भुताबद्द्ल चांगलीच माहिती होती! बहुतेकांच्या ओळखीतल्या कोणीतरी भूत स्वतः पाहिलं होतं! माझ्या एका जवळच्या मित्राच्या मावशीच्या दूरच्या मैत्रीणीने, माझ्या काकांच्या ऑफिसमधल्या एका प्यूनच्या मावसभावाने, आमच्या शाळेतल्या मारुतीदादाच्या शेजाऱ्याने – ह्या सगळ्यांनी भूतं स्वतः पाहिल्याचं मला जेव्हा समजलं तेव्हा मला कसला बेक्कार आनंद झाला होता. म्हणजे आता भुतं बघणं हे शक्य होतं. मी ह्या सगळ्यांना भेटता येईल का ते बघायचा सपाटा लावला. पण मित्राच्या मावशीची मैत्रीण तितकीशी संपर्कात नव्हती. काकांच्या ऑफिसमधला प्यून आपल्या मावसभावाला शेवटचं १० वर्षंपूर्वी भेटला होता आणि त्या शेजाऱ्याला शाळेतल्या मारुतीदादाने भूताबाद्द्ल विचारल्यावर तो हसून गप्प झाला. भूतांना भेटणं अवघड काम होतं खरं. धीर सोडून चालणार नव्हतं.

गावी गेल्यावर कित्याकदा घरातल्या जवळपास प्रत्येकाला मी भुतांबद्दल सांगा म्हणून भंडावून सोडलेलं होतं. मी आणि एक नात्यातली बहीण, अशा दोघांनी बरेचदा भूतांविषयी गंभीर चर्चा केलेली आठवते! भुताबद्दल अनुभव घ्यायची खरीखुरी जागा म्हणजे स्मशान, म्हणून गावाजवळच्या किरीस्ताव स्मशानातदेखील आम्ही रात्री गुपचूप जाऊन आलेलो, भूक लागेल म्हणून थोडे लाडू नेलेले आठवतात. गणपती आले, की त्या दिवसांत घरापुढल्या मंडपात रात्री गप्पा रंगवल्या. मग अशावेळी, त्या एका निरांजनाच्या उजेडात मोट्ठे डोळे करून भुतांच्या नावे बरीच थापाथापी चाले. फारच उशीर झाला तर एखादी आत्या रपाटा हाणून देई आणि मग उरलेली गोष्ट कुजबुजत पूर्ण करावी लागे.

फुटलेली शिंग पुरेशी उंच उगवल्यावर आमच्या एका मित्राला नवा साक्षात्कार झाला – लायब्ररी! आमच्या घरापासून थुकायच्या अंतरावर एक मोठ्ठ्या लोकांची छोटी लायब्ररी होती. मेम्बरशीप नसली तरी ओळख असल्यामुळे त्याल तिथून पुस्तकं उचलता येत. तिथून हे वीर अंदाजपंचे पुस्तकं उचलीत. मग आम्ही ३ मित्रांनी भुताचा नीट अभ्यास करायचं ठरवलं. भुताच्या खऱ्या गोष्टी कुठल्या पुस्तकात मिळतात ती पुस्तकं आम्ही शोधू लागलो. बरेचदा हाती कचराच येई. पण मग “अबकडइ”सारखे दिवाळी अंक किंवा हिंदू धर्मविषयक काही मासिके ह्यातून आमच्या भूतशोधाला चालना मिळे. ह्या संशोधनाच्या आम्ही बैठका घेत असू. महिन्यातून एकदा साधारण गृहपाठाचा अंदाज घेऊन ह्या मिटिंगा होत असत. आमच्या कंपूतील एका मित्राने एकदा अशीच तडकाफडकी एक मिटिंग बोलावली.
“काय रे, अर्जंट आज?”

“हो, मोठा क्लू मिळालाय. मुंबईत फोर्टमध्ये एक प्रेस आहे म्हणे. तिथे रात्री २-३ च्या दरम्यान पोचलं की हमखास भूत दिसतं असं आमच्या समोरचा वडापाववाला म्हणाला.”

“त्याने पाहिलंय का?”

“नाही, त्याचं एका गिऱ्हाईक तिथे काम करतं म्हणे, जाउया का?”

” नक्की दिसतं का भूत?”

“हो. बरचसं कुरूप आहे आणि हातात एक चाकू असतो म्हणे.”

भूत बघायचा चान्स कधी नव्हे तो इतका जवळ आला होता. थोडा विचार केल्यावर एका मित्राला आठवलं की त्याचे आजोबा आजारी होते. दुसऱ्या मित्राचा गृहपाठ अपूर्ण होता आणि मला अचानक लक्षात आलं, की भूतं बघायला मनुष्यगण लागतो, आणि माझा मनुष्यगण नव्हता. फुकाफुकी जीवाशी खेळण्यात काय अर्थ होता?

मग आमचं भूत संशोधन साक्षात्काराकडून रिसर्चकडे वळलं. त्या लायब्ररीमुळे भुताशिवाय जगात बरीच रहस्ये आहेत हे सत्य आम्हाला समजलं. अनसुलझे रहस्य असं भरघोस नाव असलेल्या एका अनुवादित पुस्तकात अशी बरीच रहस्य दिली होती. मग बर्मुडा त्र्यांगल, ममी, उडत्या तबकड्या, झोंबी, परकायाप्रवेश अशा विषयांना तोंडं फुटली. माझे मित्र आता भूतांपेक्षा ह्या गोष्टींकडे वळतात की काय, अशी मला भीतीही वाटून गेली. पण त्याआधीच एकदा लायब्ररीतून काही भलतीच विशिष्ट पुस्तकं हाती लागली- आणि भारतवर्ष किमान ३ होतकरू भूत-शोधकांना कायमचा मुकला.

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

Biggrin अस्वल प्रजातीतपण मनुष्यगण असतो का?
यानिमित्ताने भुतांची किंवा त्यांचे इतर प्रकारची चांगली पुस्तके, सिनेमे सुचवा. परवाच बीस साल बाद पाहिला बरा आहे. डरना मना है, डरना जरुरी है, भूत हे सिनेमेपण आवडलेले. व्हँपायर आहे का भारतीय, मराठी सौंस्कृतीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्यांत जैसा राक्षसगणु
तद्वत मनुष्यगणु, अस्वलांत ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@भुतांची किंवा त्यांचे इतर प्रकारची चांगली पुस्तके, सिनेमे:
पुस्तके मराठीत म्हणाल तर रत्नाकर मतकरींच्या गूढकथा आहेतच. नंतर जरी पुनरावृत्ती वाटली तरी नवीन वाचताना मजा येते.
मग धारप द ग्रेट! त्यांचे "अनोळखी दिशा" ह्या नावाचे कथासंग्रह आहेत, ते जरूर वाचून पहा. मात्र ह्याच नावाची महेश डयाम-ईट कोठारे दिग्दर्शित मालिका टाळाच.
मराठीत इतर लेखकांच्या परिणामकारक भयकथा मी वाचल्या नाहियेत.
इंग्रजीत तर खजिना आहे. नवीन हवा असेल तर स्टिफन किंग,Richard Matheson इ.
जुने म्हणाल तर M r James, H. P. Lovecraft, शेरलॉक वाले डॉयल साहेबसुद्धा.
एक खास भारतीय अशा विषयावरची भय कादंबरी म्हणून "the song of kali" ह्या पुस्तकाचा उल्लेख करीन. जबरदस्त विषय आणि परिणामकारक वातावरणनिर्मिती!

सिनेमे - फार आहेत हो! हमखास चांगले भुताळी सिनेमे कोरियन, जपानी किंवा फ्रेंचमध्ये खूप मिळतील.!
हिंदीत हल्लीच पाहिलेला "question mark" उर्फ "?" हा सिनेमा आवडला. इथे पहाता येईल. रात सुद्धा छान भयपट आहे.
तुम्ही रामसे बंधूपर्यंत पोचायला तयार असाल तर पुराना/नी (मंदीर, हवेली, टेबल, खुर्ची, मसण इ.) चित्रपट जरूर पहा.
ह्यापे़क्षा खाली मग तुम्हाला खूनी रात, खूनी पंजा, चुडैल नं. १ इ. दुर्मिळ खजिना सापडेल.

मराठीत मात्र आम्हाला येकच माहिती आहे- "एक रात्र मंतरलेली" Dirol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत मात्र आम्हाला येकच माहिती आहे- "एक रात्र मंतरलेली"
............एऽऽ मास्तुरे ह्हे ह्हे ! अशोक सराफ, दिलिप प्रभावळकरांचा 'एक डाव भुताचा' विसरलात ? तो एकवेळ मनोरंजक होता म्हणून सोडून देता येईल पण 'सर्वसाक्षी' (१९७८) हा एक (योग्य त्या वयात/वेळी पाहिल्यास) टरकावणारा चित्रपट होता.
पालेकरांचा 'आक्रित'ही विषयाशी संबंधित आहे.
गेला बाजार राजदत्त दिग्दर्शित 'अर्धांगी' (१९८५) यातही आशा काळे अन्यायाचा बदला घेण्यासाठी योग्य त्या भूमिकेत जातात, इ. इ.

हिंदीतला 'गहराई' (१९८०) हा अवश्य पाहा. पद्मिनी कोल्हापुरे १४/१५ वर्षांची असतानाचा चित्रपट.

आणि हो... दूरदर्शनवरची 'किले का रहस्य' (१९८९) ही मालिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा बरीच मोठी यादी मिळाली की! धन्यवाद अस्वल आणि अमुक Smile
किंगची दोनच पुस्तकं वाचलीयत. द शायनिंग जितक आवडल तितकच डॉक्टर स्लीप बोअर झाल. डॉयलच्या लघुकथा वाचल्यात. भारीयत! बाकीचे लेखक काही वाचले नाहीत.
हा हा मास्तुरे लय भारी होता परत बघायला हवा. चमत्कारपण बरा होता तसा. बाकीचे सिनेमे बघते वेळ मिळेल तसे. दिवसाच बघावे लागणार कारण रागिणी MMS सारखी भंकसपण संध्याकाळी बघताना आमची तंतरलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

omen पाहिला; झालच तर जर्मनी का कुठल्यातरी सत्यकथेवर The Exorcism of Emily Rose पाहिला.
काहीही पाहून भीती वगैरे अज्याबात वाटली नाही. (Exorcism पाहताना अत्यंत कमी आवाजात पाहिला, हे कबूल करतो.
omen फुल्ल व्हॉल्यूम मध्ये ऐन रात्री बघताना शेवटी कंटाळा यायला लागला.
अज्याबात घाबरायला झालं नाही.
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खरं आहे- भीती अजीबात वाटत नाही. मात्र ह चित्रपट ज्या घटनेवर आधारित आहे, ती घटना खरोखरीच वाईट आहे.
अ‍ॅनेलिस मिचेल ह्या मुलीवर असा प्रयोग करण्यात आला होता. ह्या सगळ्याचे पर्यावसान तिचा भूकबळी म्हणून मृत्यू होण्यात झालं.
केवळ गैरसमजूती आणि अंधश्रद्धा ह्याचा परिणाम न होऊ देता योग्य वैद्यकिय मदत जर तिने वेळीच स्विकारली असती तर ?
चित्रपटामुळे आणि ह्या माहितीमुळे ही गोष्ट भयपटाऐवजी एक शोकांतिका म्हणून लक्षात राहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
मलाही शोकांतिकाच वाटली.
पण काही conspiracy theory, charriots of god,ancient aliens वगैरे छापाच्या आवडी असणार्‍या
मंडळी मात्र गंभीरपणे हा भयपट असल्याचे सांगत होती. ह्या सत्य घटनेमुळे पॅरा नॅचरल गोष्टींवरचाअ त्यांचा विश्वास
दृढ झाला असं त्यांचं म्हणणं.
स्वतः सिनेमावाल्यांना भयपट बनवायची इच्छा होती की शोकांतिका; हे मात्र समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शाळेत 'आहट' नामक भुताच्या सिरियलबद्दल सतत होणाऱ्या चर्चेमुळे उत्सुकतेने माझा लेक टीव्ही लावून ती बघू लागला . या फालतू सिरियल मध्ये तो अडकतो की काय म्हणून माझा जीव कासावीस होऊ लागला . तो बघू लागला की मी बाजूलाच बसून त्याला , अरे ,पार्श्वसंगीतामुळे पल्पिटेशन होत , म्युट करून बघ वगैरे सल्ले देऊ लागले . प्रथम तो ऐकेना , मग मी सो कॉल्ड भीतीदायक प्रसंगामध्ये त्या संगीताच्या वरताण भीषण किंकाळ्या मारू लागले . माझे कोवळे , निष्पाप लेकरू भिऊ लागले . मग त्याने म्युट करून १/२ एपिसोड बघितले आणि काहीच भीती वाटत नाही , सगळे बकवास आहे असे त्याच्या लक्षात आले आणि तो पुन्हा त्या टुक्कार मालिकेच्या फंदात पडला नाही . ही हॉ हॉ हॉ …................

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या लेकाला माझी सहानुभूती पोचवाल का प्लीज? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

;;) अशीच अमुची आई असती तरी म्हण ग मेघना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण 'असती' कशाला हवं आहे? अशीच 'आहे' अमुची माता! आम्हीही कौतुकानं 'आहट' बघायचा प्रयत्न करायचो, तेव्हा ती त्यातल्या निरागस विनोदांना मनापासून खुदखुदत असायची. वातावरणनिर्मिती गंडायची! यथावकाश आम्ही 'आहट'चा नाद सोडला.

पण हा अन्याव आहे. आमच्या स्वतंत्र अभिरुचीवरचा हल्ला आहे. मी त्रिवार आणि जळजळीत निषेध करते त्याचा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शेवटी काय ध्येय एक , मार्ग अनेक ROFL तिला सेम पिंच कर माझ्यातर्फे Blum 3 कल्पक मातृत्वाचा विजय असो !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला हॉरर पिक्चरचं ठीक आहे पण मी "उत्सव" सिनेमा पाहू लागले तर सासूबाईंनी "शी! चांगला नाही तो सिनेमा .... बंद कर" म्हणून म्हणून इतका धोशा लावून विरस केला की मला बंद करायला लागला. आता तुम्हाला कसं कळलं तो सिनेमा वाईट आहे म्हणजे तुम्ही पाहीला मग सूनेनी पाहीला तर काय होतं? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत 'आहट' नामक भुताच्या सिरियलबद्दल सतत होणाऱ्या चर्चेमुळे उत्सुकतेने माझा लेक टीव्ही लावून ती बघू लागला..

लेक म्हणजे मुलगी असे आम्ही समजत होतो. पण आपण "माझा लेक" म्हट्लेय, याचा अर्थ तुम्हाला मुलगा अपेक्षित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तर ना, लेक म्हणजे तलाव समजत होते, जो फोनसारखा ट्यापपण करता येतो. असो.

अस्वल गुदगुल्या करून हसवून मारतं म्हणतात. पण या अस्वलाची शैली जीवघेणी विनोदी दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान आत्मनिवेदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पंचमहाभूते असा शब्द प्रथम ऐकला तेव्हा भुतांच्या कल्पनांविषयी गोंधळ अजुन वाढला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कमी वारंवारीतेचा ध्वनी हे अनेक भासांचे शास्त्रशुद्ध कारण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल अशाच होणारय सामान्य भासांवर हिस्टरी च्यानलवर एक कार्यक्रम होता.
लगोलग माणसची स्मृती/मेमरी कशी दगा देते(न पाहिलेलेही, न घडलेलेही आठवायला लागते) ह्यावरही एक कार्यक्रम होता.
हे सर्वच सामान्य व्यक्ती म्हणवल्या जाणार्‍यांच्या बाबत होते.
नेमकी अशीच एक चुकीची "आठवण" बुशसाहेबांना आली आणि हजारो कॉन्स्पिरसी थेर्‍यांना बळ देउन गेली.
(९/११ला पहिला टॉवर पडताना पाहिल्याचे त्यांना "आठवत" होते.
पब्लिकला वाटले ह्यानेच ते टावर पाडायचा प्लान केला , व प्लान अंमलात येताना खात्री होण्यासाठी
म्हणून गुप्त यंत्रणेद्वारे कुठूनतरी बघत होता वगैरे.)
मानवी मेंदुचे व्यवहार हे अजब गजब , कधी गंमतीदार व कधी क्लिष्ट असे आहेत खरे.
(optical illusion मधली कैक चित्रे ह्याचा आदर्श नमुना ठरावीत.
अस्तित्वात नसलेला गुलाबी ठिपका हलता दिसू लागणे, दोन एकसारख्या शेड्स फक्त शेजारच्या
चौकटीमुळे फारच वेगळ्या भासणे वगैरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा हा, लैच जबरी हो. भूतगाथा आवडलीच एकदम!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवडलं! पुरानी हवेलीछाप रामसे चित्रपट, आहट, नारायण धारप इ प्रकारांचा मीही मोठ्ठा फॅन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुरानी हवेलीछाप रामसे चित्रपट

ह्याचे तुम्ही फॅन असाल तर ही यूट्युब जागा नक्की पहा!
हे काका सातत्याने बी दर्जाचे हॉररपट पुरवित असतात Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास!

मधेच एकदम मिरासदारांची आठवण पण झाली! (चिंतन फक्कड जमल्याची ही पावती)

- ('झाड' असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तरुणपणी भुतांचे पिक्चर वेगळ्याच (त्यात सहसा असलेली बोनस दृष्ये) कारणाने पहायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खूप हसले. लेख छान जमला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वल उगाच भूतांची चेष्टा नका करत जाऊ. डीप डाउन कुठेतरी भीती वाटतच असणार.
काही जागांच्या बाबतीत नक्की सांगू शकतो तिथे काहीतरी आहे.
सिरिअल्स आणि फिल्म्स मध्ये काय वाट्टेल ते दाखवतात एडीट करून.

एकदा रात्री बाईक वरून आंबा किंवा गगनबावडा घाट पार करून या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

काय सांगता? Smile

मी कोकणातला एक किस्सा ऐकलेला. म्हणे कोणीतरी रात्री चलताना शेजारुन काहीतरी चालू लागलं ते मध्येच बकरी तर मध्येच गाढव काहीही रुपे घेत होतं. हा चालत निघालेला माणूस जबर्‍या होता त्याची तंतरलेली पण त्याने दत्ताचा जप म्हणे तसाच चालू ठेवला. मग टळलं म्हणे काय जे होतं ते.

या कथेत - "ते" हा नपुसकलिंगी कर्ताच घोर लावून जातो. म्हणजे सगळा इफेक्ट त्या "ते/होतं/टळलं" वगैरे नपुसकलिंगी शब्दांनीच येतो. Smile
_______________________________
अजून एक पुण्यातल्या पूराची गोष्ट ऐकलेली .... कोणीतरी म्हणे मोरीत आंघोळ करत होतं न पूर आला. अजूनही त्या ठिकाणी "दार उघडा/दार उघडा" असा आवाज ऐकू येतो.
ही गोष्ट जेव्हा जेव्हा ऐकली/सांगीतली जाते तेव्हा तेव्हा मोरीत निर्वस्त्रावस्थेत पूरात वाहून गेलेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी बरेच जण हसताना पाहीले आहेत. Sad
______________________________
मी लहान असताना पुण्यात हाकामारीची आवई उठलेली. रात्री बेरात्री तुमच्या नावाने हाक येते अन तिला ओ दिली की खेळ खल्लास म्हणे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुशेगाद्मिया .. भोत डेंजर लगता ये घाट.
मा की किरकिरी, कभी जाकु आते उधर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सासूना सासर्याने उत्सव दाखवला असणार!
उत्सव सिनेमा आणि भुताचा काय संबंध? असेल संबंध मला रेखा पहिल्यापासूनच भूत वाटत आली आहे. त्या ओम शांती ओम गाण्यात पक्की सायको थ्रिलर दिसते. एवढे का फिदा असतात हे एजेड लोक रेखामागे काय माहिती. ना चेहरा ना ग्रेस. आमची चीत्रांगंदा सेन कशी आहे बघा?

अस्वल परानोर्माल घडमोडी घाटात लई होतात. एकदा इलेक्ट्रो माग्नेतिक सेन्स करणर मशीन आणि कॅमेरा घेऊन घाटाच्या प्रत्येक वळणावर थांबला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मस्त! मजा आली वाचून.
कोणाकडे विविध भुतं तयार कशी होतात आणि भुत बनल्यावर नक्की काय काय करतात याची माहिती आहे का? असेल तर या धाग्यवर संकलित करुयात.
मुंजा :- माझ्या माहितीप्रमाणे सोडमुंज न करता एखाद्यानी लग्न केलं तर तो मेला की त्या माणसाचा मुंजा होतो. पिंपळावर बसतो. वगैरे वगैरे..
समंध, हडळ, डाकिण, हाकामारी, लावसट, पिशाच्च हे लोक अनुक्रमे कसे बनतात आणि काय करतात याची माहिती असल्यास लिहावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विद्वान ब्राह्मण काही वाईट योगाने मेल्यास ब्रह्मराक्षस होतो असे ऐकून आहे. परंतु या योनीत त्याचे ज्ञान शाबूत रहाते म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लावसट शब्द पहिल्यांदाच ऐकला. वेताळ, चेटुक, चेटकीण राहीली की. आणि ते यक्ष, किन्नर असतात त्यांच्याबद्दलपण माहिती असल्यास सांगा. परी चा मेल व्हर्जन असतो का काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हो.. वेताळ विसरलोच होतो. खवीस पण राहिलं.
यक्ष किन्नर हि भूतं नसावित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लावसट स्त्री-भूत आहे. लहान मुलांना मारते. ( आणि खाते) अस पाहिलं एका ठिकाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी परीचा मेल वर्जन आहे .अन्जेलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

ऐसी वरचा ट्रोल मेल्यावर त्याचा काय भूत तयार होईल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

भुतांचेही प्रकार बरेच असतात. वेगवेगळ्या स्थितीत, वयात, सोशल स्टेटसमध्ये, विविध लिंगाच्या व्यक्ती मेल्या की त्यांचे रुपांतर वेगळ्या भुतात होते Wink

पुरूषपार्टितः
खवीस (मुसलमान भूत)
वेताळ (भुतांचा राजा)
आग्यावेताळ
राक्षस
मुंजा (मुंज झालेल्या पण सोडमुंज व्हायच्या अगोदर मेलेल्या मुलाचे भूत)
आसरा
इर - वीर(युद्धात मेलेल्याचे भुत)
पिशाच्च
गिरा
ब्रह्मसमंध
चकवा
झोटिंग (मुसलमानी भुत)

स्त्रीपार्टी:
डंखीण (ठाकुर जातीतील स्त्रीचे भुत)
जखाई (बाळंतपणात मेलेलीचे)
जखीण (विहिरीत बुडून मेलेलीचे)
कैदाशीण (तुरूंगात/घरात डांबुन ठेवले असता/कुठेतरी आदकली असता मेलेलीच_)
हडळ
हाकमारी

परदेशी भुते:
ड्रॅक्युला
सैतान
पोल्टरगाईस्ट
व्हँपायर
झोंबी
फँटम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा.. ब्रह्मसमंध, गिरा, चकवा ही नावं पहिल्यांदाच ऐकली. हे लोक कसे बनतात आणि काय काय करामती करतात तेही लिहा माहिती असेल तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ब्रह्मसमंध ब्राह्मणाचे भूत असते
चकवा ही वनस्पती आहे असे माझे मत आहे मात्र कोकणात हे भूत लोकांना खाऊ घालते मात्र पाणी देत नाही आणि पाणी शोधत शोधत माणूस मरतो. शहरांत हे भूत व्यक्तीला गोल गोल फिरवते व सारखे एकाच जागी माणूस जातो.

गिरा = गिर्‍हा असावे.

बाकी यावर डिटेलवार चर्चा झाली होती उपक्रमावर तो धागा शोधत होतो. आता मिळाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बास बास... हीच माहीती हवी होती. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे भूत लोकांना खाऊ घालते मात्र पाणी देत नाही आणि पाणी शोधत शोधत माणूस मरतो.

हॅहॅहॅ, हे म्हणजे प्रतिसाद देतं पण श्रेणी देत नाही असं म्हणण्यासारखं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भलतेच माहितगार दिसता तुम्ही!
झोटिंगशाही वाले झोटिंग ते हेच बहुधा..

अवांतर - ह्यातील काही काही नावं सदस्यनाव म्हणून बेष्ट आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0