मसालेदार चटपटीत गुजराती ढोकळा

मेरे भाईयो और बहनो ,
व्यासपीठावरील मान्यवर , नरेंद्र मोडी , राहूल , केजरी , उद्धव , राज , राणे , जस्टीन टिंबरलेक , जस्टीन बेबर , निकी मिनाज , मिरांडा केर , कारला ब्रुनी या सर्वांचे स्मरण करून मी माझ्या भाषणाला सुरवात करतो.
सर्वात पहिल्यांदा ऐसी वरच्या माझ्या सर्व चाहत्या मंडळीची माफी मागतो. जसा चातक पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेंब थेंबाची वाट बघतो त्याप्रमाणे ऐसी वरील आणि जालावारील माझे चाहते या महत्वच्या प्रसंगी मी निवडणुकीच्या निकालानंतर मी काय संदेश देतो याची वाट बघत आहेत याची मला जाणीव आहे.

सुरवातीला नरेंद्र मोडी जी यांचे हार्दिक अभिनंदन. गिर च्या अभयारण्यात सिंह बघितले होते आज बडोद्याच्या स्टेज वरती सिंह बघितला. भारताच्या अशोक चिन्हात जे सिंह आहेत त्यातला एक चेहरा आज जिवंत होऊन बोलू लागला आहे असे वाटले.

२००४ च्या इलेक्शनच्या वेळेस सोनिया गांधीची गाडी आमच्या घरासमोरून गेली होती. बाईने हात बाहेर काढून दाखवला होता सगळ्या लोकांना. ढीगभर गर्दी होती. दोन तास कुठल्यातरी वेगळ्याच उच्चाराममध्ये बाई भाषण करत होती. लोक वेडी झाली होती टेरेस वर वैगेरे जाऊन बघत आहेत भाषण. लाइव सोनिया गांधी. आपल्यला वाटत होत हि बाई काय भारतीय नाही म्हणून.
केवढी मोठी सिक्युरिटी लावली होती तिच्यामागे. खास ती येणार म्हणून आख्खा रस्ता साफ केला होता.
त्यावेळेस आम्ही शाखेत जात होतो. आमच्या शाखेत एक उस्मान नावाचा मुलगा पण यायचा. एके दिवशी त्याचा बाप आला आणि त्याला कानाखाली मारून घेऊन गेला. आमच्या बापूने शाखा शिक्षकाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण उस्मान चा बाप काही एकला नाही. शाखेत काय व्हायचं ? सूर्यनमस्कार आणि खेळणे या शिवाय चार वर्षे काही केलाच नाही. बापूने एके दिवशी काहीतरी कार्यक्रमासाठी घरी बोलवलं तिथे एक कट्टी म्हणून मोठा प्रचारक आला होता. अनिवेज आम्ही शाखेत खाकी चड्डी वैगेरे घालून जात नव्हतो काजुअल्स मध्ये जायचो.

तर हा कट्टी म्हणजे मोठा आरएसएस चा कार्यकर्ता होता हा चड्डी घालून आला होता. मला एकदम एरिया प्रमुख वैगेरे केला. शाळा आमच्या डोक्यावर चढली आणि वेळ मिळेना शाखा सुटली. कोणीच शाखेत जाईना. नंतर लोंडीयाबाजी कडे इंटरेस्ट वळला. देश निर्माण वैगेरे गेल खड्ड्यात.

हि सगळी भानगड कळली. तरीपण शाखा काय चुकीच करत नव्हती कधी कुठल्या धर्माला शिव्या नाही दिल्या. आपण आपल रक्षण करणे एवढाच शिकवायचे.

वाजपेयी इंडिया शायनिंग बियानिंग काय काय केला. हायवे बांधला म्हणे. रोज त्याच हायवे वरून जातो. युद्ध बिध केला पाकिस्तान बरोबर. जिंकला पण. बाकी वाजपेयी कविता भारी म्हणायचा. खास म्हणजे त्यांचा पॉज. गडकरी कायम सांगत असतात पंचावन्न फ्लायोवर बांधले. खर काय काय माहिती?

वाजपेयी पण गेले. कस काय चूक झाली काही कळाल नाही. सोनिया गांधीने एकदम पंतप्रधान पद नाकारून "आतला आवाज " एकूण मोठा ड्रामा केला. च्यायला मागचा इतिहास बघितला तर सगळे हिंसेत मेले यांच्या घरातले म्हणून बाई घाबरली असणार आणि मनमोहनला पपेट म्हणून नाचवत असणार.

मनमोहन चिंदबरम(लुंगी डान्स)
फादर आमचे लई कौतुक करणार दोघांच. बघा एवढा केम्ब्रिज मध्ये शिकून आला तरी लुंगी घालून पार्लमेंट मध्ये जातो. मनमोहन नि काय जादू केली काय माहिती सगळे आय टी वाले भसाभस अमेरिकेला पळू लागले. काल परवा सोमवार पेठेत राहणारी पोर डायरेक्ट फिलाडेल्फिया. नक्की जादू कुणी केली हेच नाही कळाल. मध्येच रिसेशन आल तरीपण इंडिया च एकदम सगळ ओके होत. लई मोठा काय नुकसान झाल नाही. फक्त ८० ची किंगफिशर १०० ला झाली. महागाई तशीपण काळानुसार वाढतच असते.
महाराष्ट्रात नवीन बोंबाबोंब सुरु झाली. राज उद्धव. घरातली प्रकरण चव्हाट्यावर आणून त्याच राजकारण करणार आणि एकमेकांच्या उरावर बसून मराठी लोकांच नुकसान करणार. महाजनपण त्यातच गेला. बातमी वाचली आणि शॉकच झालो होतो. राजची पार्टी ठीकठाक वाटत होती.
बाकी राष्ट्रवादीवाले त्यांच्या तुमब्दया भारतच होते. त्यात काही खंड नव्हता पडला. लवासाच्या जाहिराती बघितल्या साला डोकच फिरलं. एवढे पैसे कसे काय उभा करू शकतो. नक्कीच काहीतरी काळ असणार यात. तो पुतण्या एक कार्टून. पोवेर्फुल आहे पण.

सगळ्यात वाईट म्हणजे जैतापूर मध्ये अनुउर्जा प्रकल्प आणणार त्यात निषेध करणायांना गोळ्या घातल्या. यापेक्षा वाईट काय?

कोणीही हिंदुत्वाद्वादी, बहाईवादी , झुलुवादी सरकार आल तरी चालेल पण कोन्ग्रेस ची मॉम सीस एक करायचं हे ठरलं होत. ओपन गंगाम स्टाईल!

सो टुडे कोन्ग्रेस खल्लास झाल आहे. मालवणकर उडाला , नाशिकचा राजा उडला अजून काय पाहिजे ?च्यायला वोट कारण सार्थक झाल.
फर्स्ट टाईम सगळी लोक मिळून काय करू शकतात हे कळाल.

आता हे इन्तेलेक्चुअल जर्नालीस्त लोक मंदिर आणि दंगलीचे विषय काढतील. फुकट अभिव्यक्तीच्या नावाखाली सरकारला वेठीस धरतील. हे सगळ चांगलच आहे म्हणा खरा कलावंत पण आताच फुलेल.

लेट्स सी मोडी काय काय करणार ते.........

आपण आता रेसिपी बघू
साहित्य:
१ कप बेसन पिठ
२ चमचे रवा
१ कप पातळ ताक
२ लहान चमचे साखर
१/२ चमचा मिरची पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ लहान चमचा हळद
२ लहान चमचे इनो
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा तेल
चवीपुरते मिठ
फोडणीसाठी: १ चमचा तेल, १/२ चमचा मोहोरी, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १/२ लहान चमचा हिंग
१ चमचा लिंबाचा रस
१ लहान चमचा साखर
२ चमचे पाणी

कृती:
१) १ कप बेसन पिठ, २ चमचे रवा, २ लहान चमचे साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात १ ते सव्वा कप ताक घालावे.
२) वरील मिश्रण तयार झाले कि मिश्रणाचे दोन वेगवेगळे भाग करावे व वेगवेगळ्या भांड्यत ठेवावे.
३) एक मध्यम खोलीचा पसरट फ्राईंग पॅन घ्यावा. त्यात अर्ध्यापेक्षा किंचीत कमी भरेल एवढे पाणी उकळत ठेवावे. त्या पॅनमध्ये राहिल एवढ्या उंचीचे मेटलचे भांडे घ्यावे त्याला तेलाचा हात लावून घ्यावा. फ्राईंग पॅनच्या झाकणाला स्वच्छ पंचा बांधून घ्यावा म्हणजे वाफेचे पाणी ढोकळ्यात न पडता पंच्यात शोषले जाईल.
४) एक भाग मिश्रणात १ टिस्पून इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या पॅनमध्ये ठेवावे वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे. मध्यम आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे. पाणी कमी पडले आणि सर्व पाणी संपले तर ढोकळा भांड्याच्या तळाला चिकटून करपू शकतो.
५) जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
६) १५ मिनीटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनीटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.
ढोकळयाच्या मिश्रणाचा उरलेला भागही वरील प्रमाणेच वाफवून घ्यावा.
हा ढोकळा हिरव्या तिखट चटणी बरोबर झकासच लागतो.

टीप:
१) हा ढोकळा कूकरमध्येसुद्धा करू शकतो. फक्त कूकरच्या झाकणाला पंचा बांधून घ्यावा व ते झाकण नुसतेच वर ठेवावे, कूकर बंद करू नये. किंवा कूकरच्या झाकणापेक्षा जाडसर थाळीला पंचा बांधून ती कूकरवर झाकणासारखी ठेवावी.

नमो जय हिन्द जय महाराष्ट्र जय बर्मुडा जय मियामी जय कोस्ता रिका जय बोरा बोरा आयलंड

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

_/\_नमो नमो_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

जय स्रीक्रिष्ण ! १५ ऑगस्टला फाफडा , २६ जानेवारीला उंधियु वगैरे आन्देव Smile
<कोन्ग्रेस ची मॉम सीस एक करायचं हे ठरलं होत> आता कशाचे कालवण करणार याची उत्सुकता आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात!!!! लेख मस्त आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ढोकळ्याच्या कृतीत पंचालाही रोल आहे तर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंच्याच्या जागी "जुन मळकटलेल नवऱ्याच बनियान" अस म्हंटल असत तर ते सयुंक्तिक वाटल नसत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

जबरा पाककृती आहे. पाककृतीत इनो घातला तो कोणासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनो कुणासाठी हे कळल नसेल तर मग मोडी आल्यावर एवढे का घाबरलाय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

लेखाची इस्टाईल प्रचंड आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीचा ओस पाककृती विभाग 'अच्छे दिन' आल्यावर लगेच बहरायला लागलाय. लेखाची इस्टाईल मलाही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थान्क्स बेब्ज!
गुड डेज आर कमिंग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

जय पापुआ न्युगीनी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™