मोदी मॅजिक आणि Tipping point

२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश अभूतपूर्व आहे, १९८४ नंतर एखाद्या पक्षाला बहुमत मिळण्याची पहिलीच वेळ. ह्या निकालाची जी लोकप्रिय कारणमिमांसा आहे त्यामधे प्रामुख्याने मोदींचे प्रभावशाली कँपेन, काँग्रेसचा नाकर्तेपणा किंवा प्रचाराचा कमकुवतपणा हे घटक आढळतात. ही कारणमिमांसा एकप्रकारे माध्यमांद्वारे जे चित्र जनतेसमोर आले त्याचे सार आहे. ह्याच निकालाकडे बघण्याचा एरवी एक जुनाच पण ह्या निकालासंदर्भात नवीन असा परिप्रेक्ष्य मांडण्याचा मी इथे प्रयत्न करतो आहे, त्यावर त्याच अनुषंगाने चर्चा व्हावी असे वाटते.

Tipping point - माल्कम ग्लॅडवेल त्याच्या "The Tipping Point" ह्या पुस्तकामध्ये एखाद्या 'मॅजिकल' वाटणार्‍या सामाजिक घटनांच्या मागचे रहस्य सांगताना म्हणतो - "Ideas and products and messages and behaviors spread like viruses do" म्हणजेच एखाद्या व्हायरसप्रमाणे काही विचार गतीने पसरू शकतात. १९९० च्या दशकामधे न विकल्या जाणार्‍या 'हश पपिज्' ब्रॅंडच्या बुटांना न्युयॉर्कमधे काही मॉडर्न लोकांनी घातल्यामुळे अचानक मागणी आली आणि थोड्याच वेळात देशभर 'हश पपिज्' प्रचंड यशस्वी ठरले. माल्कमच्या मते काही विशेष सामाजिक कौशल्ये(The Law Of The Few) असणारी पण मोजकीच माणसे हे काम तुलनेने सहजतेने करू शकतात, ३ प्रकारची माणसे म्हणजे १. जोडणारी (Connectors) - ह्या माणसांचे सोशल नेटवर्क उत्तम असते आणि ते ठरावीक कल्पना, विचार समाजातील विविध वर्तुळांमध्ये प्रभावीपणे पसरवू शकतात, माल्कम ह्याचे उदाहरण म्हणून अमेरिकेच्या स्वातंत्र्य इतिहासातील पहिले आणि गाजलेले नाव 'Paul Revere' चे घेतो. २. मेव्हन - अशी माणसे ज्यांच्याकडे विषयाचे तपशीलवार ज्ञान असते आणि ते समाजापुढे आणण्यास ते उत्सूक असतात, आपण बर्‍याचदा अशा लोकांवर तपशीलवार माहितीसाठी विसंबून असतो उदा. इथे भांडवलशाहीबद्दल माहितीसाठी गब्बर किंवा उच्चकला विषयासाठी अमुक किंवा चिंतातूर जंतू वगैरे. अर्थात त्यांच्याकडची माहिती सांगण्यास ते उत्सुक असतात किंवा नाही हे मत सापेक्ष असू शकते. ३. सेल्समन - हे लोक एखादी गोष्ट गळी उतरवण्यात निपुण असतात, त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी सांगितलेल्या विचारांवर लोकांचा तुलनेने चटकन विश्वास बसतो, त्यांच्या कल्पना लोक पटकन स्वीकारतात. तसेच माणसांप्रमाणेच दोन इतर घटक ही हे घडवण्यास कारणीभूत ठरतात १) स्टिकिनेस घटक - एखादी घटना जेवढी लोकांच्या मनात घर करु शकते/चिकटून राहू शकते तेवढी ती जास्त प्रभावी होऊ शकते, २) संदर्भ चौकटीचा प्रभाव - कोणत्या संदर्भ चौकटीत आणि काळात घटना घडते हे त्या घटनेच्या यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते.

माल्कमच्या ह्या विश्लेषणाचा आधार घेऊन असे सांगता येणे शक्य आहे काय की मोदी नावाचा विचार हा The Law Of The Few ने गेल्या १.५ ते २ वर्षामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या वर्तुळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतिने पसरवला, हे Few खालच्या वर्गामध्ये विकास करणारा, मध्यमवर्गामधे हिंदू आणि विकास करणारा आणि व्यवसायिक वर्तुळामध्ये व्यवसायाला पूरक, आणि इंटूक वर्गामध्ये विकासाभिमूख पण हुकूमशाही पद्धतीचा अशा अनेक भूमिकांमध्ये त्या विचाराचा परिचय समाजापुढे माध्यमांद्वारे सातत्याने मांडत राहिले, त्यातील बहूदा विकासाभिमूख ह्या घटकामध्ये स्टिकिनेस होता (म्हणजे व्हायब्रंट गुजराथ, सौर्य उर्जा निर्मिती, अडानी, नॅनो वगैरे) तर त्याला सत्ताधारी पक्षाच्या घोटाळ्यांची, नाकर्तेपणाची आणि नेतृत्वाच्या अभावाची संदर्भ चौकट लाभली. काही नकारात्मक घटकांनी पण समाजातील प्रो-हिंदू गटासाठी स्टिकिनेसचे काम केले उदा. गोध्रा घटना ही जरी मानवतेच्या दृष्टिकोनातून वाईट असली तरी असाच नेता हवा होता ह्या भावनेला वाहणार्‍या लोकांना ती कुठेतरी हवी-हवीशी वाटणारी होती त्यामुळे त्याचे चर्वितचर्वण हे अशा लोकांसाठी हा विचार अधिक पक्का करणारे ठरले. मोदींच्या विकासाला नावे ठेवणारे पण ते सत्य व्यवस्थित मांडणारे आणि गळी उतरविणारे सेल्समन मोदीविरोधी गटात नसल्याने आणि त्याउलट असे सगळेच लोक प्रो-मोदी गटात असल्याने मोदी आणि भाजपपेक्षा मोदी नावाचा हा विचारच अधिक प्रभावी ठरत गेला, काँग्रेसच्या नेतृत्वपदी आधी मनमोहन सिंग आणि नंतर राहूल गांधी असल्याने व त्याचबरोबर गेल्या काही वर्षातील घोटाळ्यांच्या आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर मोदी विचार रुजायला प्रभावशाली चौकट आयतीच मिळाली. ह्या सगळ्या घटकांमुळे एका टिपिंग पॉइंटप्रमाणे मोदींची लाट भारतभर पसरली आणि त्यातच लोकांनी मतदान करून त्यांना निवडून आणले.

आता हे विश्लेषणही आतापर्यंत माध्यमात मांडलेल्या विश्लेषणाप्रमाणेच आहे, फक्त फरक आहे तो कमी काळात आणि प्रत्यक्ष माहिती नसलेल्या आणि माध्यमातून पसरवलेल्या भूमिकेवर आयतेच मिळालेल्या योग्य संदर्भ चौकटीवर लोकांच्या चटकन विश्वास बसण्याच्या प्रकाराचा. मला हे विश्लेषण पटते कारण मोदींनी नक्की काय केले आहे हे न जाणता ही त्याच्या बद्दल असलेल्या मनातल्या छबीवर प्रभावित होऊनच अनेक लोकांनी त्यांना मत दिले आहे हे स्पष्ट आणि स्वच्छ आहे. अर्थात ह्या विश्लेषणाच्या पलिकडेही अनेक घटक आहेत किंवा असतील पण मोदी फॅक्टर कडे एक मॅजिक म्हणून बघितल्यास त्यामागची कारणमिमांसा टिपिंग पॉइंट हे तत्त्व योग्यपणे विषद करते असे माझे मत झाले आहे.

जाता-जाता- हे टिपिंग पॉइंटचे तत्त्व अण्णांच्या आंदोलनाला किंवा केजरीवालच्या दिल्लीतील यशाला ही कारणीभूत ठरले असे माझे मत आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

असेल तसेही. पण लोकांपुढे दुसरा पर्याय तरी काय ठेवला इतर पक्षांनी?
एखादा म्हणाला/ली - नाही आवडत मला मोदी. दुसरा कोणीतरी बघून त्याला मत देऊ. पर्याय काय -
अ)सदैव जत्रेत हरवल्यासारखा वाटणारा राहुल.
ब) गल्ली क्रिकेटमध्ये कसं, टीम वाटून झाली तरी ज्यांना कुणी घेत नाही ते लोक : म्हणजे तिसरी आघाडी.
क) केजरीवाल काका - आधीच आआप म्ह्णजे चार आने की मुर्गी और बारह आने का मसाला असला प्रकार, त्यात ह्यांना मत दिलं आणि त्यांनी एके दिवशी अचानक राजिनामाच दिला तर काय घ्या? नस्तं लफडं नकोच.
ड) विकासाचा (खरा खोटा) डंका पिटणारे मोदीभौ.
इ) यापयकी नाय.

method of elimination वापरुन उरले ते मोदी....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोलावारी डी , गंगाम डान्स , नरेंद्र मोडी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

लेख व अस्वल ह्यांचा प्र्तिसाअद दोन्ही वविच्चारणीय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मोदींचा विजय हा फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धतीचा व्यवस्थित अभ्यास व त्या पद्धतीची बलस्थाने व तृटी दोन्हीचा फायदा करून घेत मिळवलेला चतुर विजय आहे. काँग्रेसला भाजपाला २००९मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते मिळूनही त्यांच्या १/३ जागा मिळाल्या हे काँग्रेससारख्या या पद्धतीला कोळून प्यालेल्या पक्षाला अत्यंत लाजीरवाणे आहे हे खरेच!

एलेक्टॉरल रिफॉर्म्सचे प्रोमिस करणार्‍या भाजपाने खरंतर सध्या त्या भानगडीत न पडलेलेच बरे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोहियांपासूनचे लोक नेहमी असे म्हणत की काँग्रेसला खरे तर मिळालेल्या मतांच्या ५० टक्क्याहून कमी मते मिळतात. (कॉंग्रेसच्या विरोधातली मतं जास्त असतात). ही जास्त असलेली मतं अनेक पक्षांच्या उमेदवारांत विभागली गेल्यामुळे कॉंग्रेस निवडून येते. अर्थातच हे लॉजिक खरेच होते.

त्यावर उपाय म्हणून वेळोवेळी सगळ्या विरोधी पक्षांचा मिळून एक उमेदवार द्यावा अशी टूम खूप काळ अस्तित्वात होती. त्यानुसार ६७, ७७, ८९, ९८, ९९ च्या निवडणुकीत असे सामायिक उमेदवार देऊन कॉंग्रेसचा पराभव केला गेला (६७ मध्ये टफ फाइट). यातला जन्तेच्या दृष्टीने अडचणीचा भाग म्हणजे ठाण्याला भाजपचा प्रभाव म्हणून भाजपचा समायिक उमेदवार (किंवा कुठे कम्युनिस्ट प्रभावी म्हणून कम्युनिस्ट उमेदवार) दिला तर समाजवादी मतदाराला भाजपला (किंवा हिंदुत्ववादी मतदाराला कम्युनिस्टाला) मत द्यावे लागे.

यावेळी उमेदवार सामायिकीकरण व्हायच्या ऐवजी मतदारांचे समायिकीकरण झाले. काँग्रेसच्या विरोधातली (जवळजवळ) सगळी मते मोदी/भाजपच्या पारड्यात पडली.

>>एलेक्टॉरल रिफॉर्म्सचे प्रोमिस करणार्‍या भाजपाने खरंतर सध्या त्या भानगडीत न पडलेलेच बरे.
हॅ हॅ हॅ. भाजपला यापूर्वीही जे यश मिळाले तेसुद्धा असेच मिळाले आहे. तेव्हा ते या भानगडीत पडणारच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख आणि प्रतिसाद पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त मुद्दा आहे.

मी टिपिंग पॉईंट हे पुस्तक वाचलेले नाही पण त्याबद्दल वाचलेले आहे. माझ्या आवडत्या "अबनॉर्मल रिटर्न्स" ब्लॉगवर व्हाय थिंग्स गो व्हायरल ह्या पुस्तकाबद्दल सुद्धा मधे वाचले होते. त्यातही हीच संकल्पना विशद केली गेली आहे असे दिसते. मी हे सुद्धा पुस्तक वाचलेले नाही.

अर्थशास्त्रात नेटवर्क इफेक्ट्स नावाची एक संकल्पना शिकवली जाते. ती गणितातून आयात केली गेलेली असावी. यात सुद्धा विशियस सायकल व वर्च्युअस सायकल ह्या दोन उपसंकल्पना आहेत. व्हर्च्युअस सायकल ही सुद्धा टिपिंग पॉईंट सारखीच संकल्पना वाटते. इन्क्रिझिंग रिटर्न्स ही सुद्धा एक निगडित संकल्पना आहे. भाषा (बोली, संगणकीय), ट्रेडिंग नेटवर्क्स (उदा. ebay), टेलिफोन, फॅक्स, सोशल मिडिया (उदा. फेसबुक) यांना या संकल्पना कमीअधिक प्रमाणावर लागू पडतात. प्रा. हॅल वारियन ह्यांनी लिहिलेले इन्फर्मेशन रूल्स ह्या पुस्तकात ह्या सर्व संकल्पना विशद करण्यात आलेल्या आहेत. प्रा. वारियन आज गूगल चे चीफ इकॉनॉमिस्ट आहेत.

भाषाधारित संस्कृती की ज्यामधे सण, साहित्य, संगीत, क्युसिन, नाटके, कविता, नृत्य, कला यांचा एक क्लस्टर बनतो व त्यासही नेटवर्क इफेक्ट्स लागू पडतात. मल्टी साईडेड नेटवर्क इफेक्ट्स. म्हणूनच मनसे ने मराठी खाद्य संमेलन भरवले होते ती संकल्पना एकदम उच्च होती. इंग्रजीचा जगभर प्रसार होण्यात नेटवर्क इफेक्ट्स चा मोठा हातभार आहे.

प्राध्यापक सुशील भिकचंदानी यांनी यावर इन्फर्मेशन कॅसकेड्स ची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना सुद्धा अशीच निगडीत आहे. आमच्या एका इन्व्ह्स्टमेंट च्या क्लास मधे मी सरांना यावर प्रश्न विचारले होते तेव्हा सर खुश झाले होते व नंतर सरांनी तो तपशीलवार शिकवायचा यत्न केला होता पण विद्यार्थ्यांच्या उत्साहात कमतरता आढळल्याने सोडून दिला (असे आपले माझे मत हो.). भिकचंदानी यांचा तो हा पेपर आहे - A Theory of Fads, Fashion, Custom, and Cultural Change as Informational Cascades. मी थोडा वाचला. पण माझा गणितात नेहमीच भोपळा असल्याने तपशील फारसा समजला नाही. मी फक्त सिनॉप्सिस व निष्कर्ष वाचला व नंतर जय महाराष्ट्र म्हणालो.

मोदींचा विजय हा निदान काही प्रमाणावर तरी असाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींचा विजय हा निदान काही प्रमाणावर तरी असाच आहे.

मोठ्या प्रमाणावर असाच आहे, त्यांनी नक्की काय कामे केली आहेत हे माहित नसतानाच केवळ उभ्या केलेल्या छबीवर विसंबून मतदान करणार्‍यांची तसेच न करणार्‍यांची संख्या बरीच आहे.

मोदी 'ahead of the curve' असण्यापेक्षाही ते 'ahead of the curve' आहेत (चांगल्या किंवा वाईट अर्थाने) ह्या उभ्या असलेल्या शो वरच बरेचसे मतदान झाले आणि नशीबाने मोदींना त्याचा फायदा झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोध्रा घटना ही जरी मानवतेच्या दृष्टिकोनातून वाईट असली तरी असाच नेता हवा होता ह्या भावनेला वाहणार्‍या लोकांना ती कुठेतरी हवी-हवीशी वाटणारी होती

एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गोधरा घटने बाबत तथ्य पूर्ण माहिती नाही. अज्ञानत: वश अधिकांश लिहिणारे मोदींशी संबंध लावतात. मोदीच देशातले एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांच्या पोलीस खात्याने अल्पसंख्यक लोकांना वाचविण्यासाठी १०० हून अधिक दंगेखोरना गोळीने उडविले होते आणि दंग्यांवर नियंत्रण केले होते. दुसरा कुठला मुख्यमंत्री असता तर परिस्थिती अधिक बिकट झाली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांच्या पोलीस खात्याने अल्पसंख्यक लोकांना वाचविण्यासाठी १०० हून अधिक दंगेखोरना गोळीने उडविले होते आणि दंग्यांवर नियंत्रण केले होते

हो पण दंगलीतील हिंसाचाराला बळी पडलेले आणि पोलीसांच्या गोळीबारात बळी पडलेले या दोन्हींमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त दिसते. हे थोडे संशयास्पद वाटते. मात्र सुप्रीम कोर्टाने क्लीन चीट दिल्यामुळे प्रत्यक्ष मोदींवर आरोप करता येणार नाही.

दंगलीतील १२०० बळींपैकी ९५० मुस्लिम.
दंगलीतील पोलीसांच्या गोळीबारात बळी पडलेल्या १८४ पैकी १०४ मुस्लिम.

http://www.hindustantimes.com/india-news/more-muslims-than-hindus-died-i...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0