स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला)

दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली.

साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ.

कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या. एका काचेच्या भांड्यात मिरच्या ,लिंबाचा रस, मोहरीची डाळ आणि मीठ कालवून मिरच्याना १ दिवस मुरु द्या. या मिरच्या फ्रीज मध्ये ठेवल्यास ८-१० दिवस टिकतात. फ्रीज नसल्यास ६-७ दिवस टिकतात.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

फोटो छान आहे.
लसणाचं काय करायच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लसणाचं काय करायच?

फोटोत घालायचा.

कित्ती सोप्पे सोप्पे प्रश्न विचारता हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै कै. व्हँपायरला पळवून लावायला वापरायचा तो लसूण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेशिपीमध्ये लिंबू आणि मिरची दिलेली आहे. (वेल, लिंबाचा रस दिलेला आहे, तो लिंबापासूनच आला असणार ना?) तेवढे मिरची-लिंबू एखाद्या दोरीला टांगले, तर व्हँपायरला पळवून लावायला पुरेसे ठरणार नाही काय?

त्याकरिता लसूण कशासाठी हवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंबू मिरची टांगून ठेवली तर छोले भटूरे खाताना तोंडी लावायला काय असणार?

आणि बहुतेक व्हँपायरला लिंबूमिरचीने काय फरक पडत नाही. चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंबू मिरची टांगून ठेवली तर छोले भटूरे खाताना तोंडी लावायला काय असणार?

सोप्पे तर आहे! अर्थात, दुसरी लिंबूमिरची.

आणि बहुतेक व्हँपायरला लिंबूमिरचीने काय फरक पडत नाही. चूभूद्याघ्या.

ते तुम्हालाच ठाऊक. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शापातून मुक्ती मिळवण्यासाठी Wink लसणाचा वापर केल्याचे साईनफेल्डमध्ये पाहिले आहे

http://www.seinfeldscripts.com/TheConversion.htm

http://www.youtube.com/watch?v=UEiMv4mCI1g

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
कव्होर्का !!
रच्याकने तो शाप नव्हताच. ते वरदान होतं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा हा हा _/\_
पण ते पटाईत काका गेले कुठे लसणाच काय करायच न सांगताच? तसाच कच्चा एकत्र करून मुरायला ठेवायचा का तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसच वाटतय. कच्चा मुरवून मिर्चीसारखा खायचा असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हालापिन्यो Jalapeño ह्या माफक तिखट मिरच्यांचे बारीक तुकडे करून पांढर्‍या विनेगरमध्ये थोडया मिठासह टाकावे आणि बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. दोनचार दिवसानंतर मिरच्या चांगल्या मुरल्या की खाण्यायोग्य होतात. कशातहि ह्या मिरच्यांचे काही तुकडे टाकल्यास त्या पदार्थाला चांगली तिखट आंबट चव येते. विनेगरमुळे मिरच्या खूप दिवस टिकतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या मिरच्या फ्रीज मध्ये ठेवल्यास ८-१० दिवस टिकतात. फ्रीज नसल्यास ६-७ दिवस टिकतात.

फ्रीज असला, पण फ्रीजमध्ये नाही ठेवल्या, तर साधारणतः किती दिवस टिकाव्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण फ्रीज उघडून त्याच्यासमोर ठेवल्यास फ्रीज बंद करुन त्याच्यासमोर ठेवल्यापेक्षा जास्त दिवस टिकतील असा अंदाज आहे, काय म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रीज उघडा ठेवल्यास खोली - आणि पर्यायाने मिरच्या - थंड होण्याऐवजी उलट (काँप्रेसरमुळे) गरम होईल/होतील, अशी अटकळ आहे. (चूभूद्याघ्या / कॉलिंग रेसिडेण्ट पदार्थवैज्ञानिक आणि/किंवा थर्मोडायन्यामिक्सवाले.)

कोणी गंभीरपणे या प्रतिसादाची दखल घेईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्यावेळ तुम्ही हुश्शार लोकांना बोलावीत होतात म्हंटलं आपण जरा मागं उभे रहावे, मूळ शंकेबद्दल, तुमचा तर्क बरोबर आहे, खोलीभर एरियाला थंड करण्याच्या प्रक्रियेत फ्रीजने बाहेर टाकलेली उष्णता त्याच्या थंडपणापेक्षा अधिक असेल त्यामुळे खोली थंड होण्याएवजी गरम होण्याची शक्यता अधिक. दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी खूप प्रयत्न केला पण यातून सध्याच्या निवडणुकांबाबत, निकालांबाबत किंवा राजकीय परिस्थितीबाबत नक्की काय भाष्य केलं आहे याचा बिलकुल पत्ता लागला नाही. Smile कोणाच्या तरी नाकाला मिरच्या झोंबणे वगैरे अर्थ आहे का? Smile

ज्योक्स असाइड, पाककृती झणझणीत दिसते आहे. मुंबई-पुण्याकडे वडापावबरोबर किंवा बटाटेवड्यांबरोबरदेखील तिखट मिरच्या मिळतात. मात्र त्या फक्त मिरची आणि जाड मीठ यांचं मिश्रण असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिरच्या आवडल्या.
बाकी हा पदार्थ मराठवाड्याचा आहे . बाकीच्याला झेपणार नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल बायकोच्या मैत्रिणीने खास इम्फाळवरून किंग मिरचीचा अचार आणून दिला होता. भरपूर तेलातलं ते लोणचं खाण्याचा मोह आवरेना. मग १/२ मिलि पानात घेतलं. त्याचं नुसतं लालसर तेल भातात मिसळलं तर शत्रूपक्षाच्या सेनेच्या धूळीने गारद व्हावं तसा प्रकार झाला. हलकीशी मिरची खाल्ली नि बसलेला करंट अविस्मरणीय आहे. आता १२ तास उलटून गेले आहेत तरीही तोंडात उन्हाळा जाणवतो आहे.

लातूर उस्मानाबादमधे गावांत जास्त मिरच्या खाण्याच्या ज्या शेतकर्‍यांत स्पर्धा लागतात तिथे या मिरच्या वाटल्या पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हीच ती "जोलोकिया" मिरची काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

यस. ती मणिपूर, नागालँड नि मेघालय 'आमचीच' आहे असे म्हणून भांडत असतात. फार भयानक प्रकार आहे. स्थानिकांना लहानपणापासून सवय असल्याने फरक पडत नाही.

आमचे वडील अर्धा पाव किलो ही किंग मिर्ची घेऊन जातात नि नातेवाईकांत वाटतात. ही थोडीशी पूड मिसळल्याने मिरचीवरचा वार्षिक खर्च कमी होतो असे सगळ्यांचे म्हणणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.