तू सुटलास!

एक क्रिकेट सोडलं तर बाकी सगळ्या खेळांत, सुटवायची गरज असायची.
क्रिकेट खेळताना स्पेशल पद्धत असे, पण जर टीम टीम खेळत नसाल, तरच.
नंबर नंबर ह्या पद्धतीत, पोरं नंबरप्रमाणे बॅटिंग करत. आणि त्यासाठी नंबर हवे!
मग पाठीवर नंबर पाडण्याची ती स्पेशल पद्धत वापरत. ह्यात एखादा बकरा निवडला जाई. आणि सगळी जनता त्याच्या समोर उभी असे. मग क्याप्टन आणि वाइस्क्याप्टन- असे दोघे मागे जात.
आणि मग जीवाच्या आकांताने त्या बकर्याच्या पाठीवर गुद्दे मारुन, एक आकडा बोटाने निवडत.
"हा कोणाचा"?
बकरा बराच वेळ विचार करून म्हणे - "ह्याचा"
"हा कोणाचा"?
बकरा पुन्हा विचार करून सांगे - "त्याचा"
काहीवेळा आपला बॅटिंगचा नंबर पाहून पोरं चेकाळत आणि मग नंबर पाडणारे त्यांना धाक देत - "सांगू नको रे". बरेचदा ह्यात "चिटिंग" होई, आणि नेमके क्याप्टन आणि वाइस्क्याप्टन बॅटिंगला उतरत.

बाकी कुठलाही खेळ असू दे, त्याला "राज्य कुणावर?" ह्या प्रश्नानेच सुरुवात होत असते. मग ते लपाछुपी, पकडापकडी, विषामृत किंवा साखळी - काहीही असो.
आमच्या मनात आलं असतं तर ऑलिंपिकमध्ये सुद्धा!
मग त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात. त्या सगळ्यांचा मुख्य हेतू असे - राज्य घेणारा गडी शोधणे. मग एकेकाला बाद करत करत शेवटी तो राज्याचा धनी सापडे.
मग ह्यात अनेक प्रकार असत,काही सोपे तर काही किचकट!

सोप्प्या प्रकारांत पहिला म्हणजे १०-२० करणे. सगळ्या भिडूंना जवळपास एका वर्तुळात गोळा करायचं, आणि कुणापासून तरी मोजायला सुरुवात करायची.
मग १०-२०-३० असं करता करता ज्याला १०० येतील, तो "सुटायचा". हे सुटणं खरोखरच सुटणं होतं. जीव भांडयात पडल्याचा अनुभव यायचा.
बरं , १०-२० मध्ये चीटिंगला प्रचंड वाव होता. बरेचदा हे केलं, की मग कुठुन सुरुवात केली तर आपण "सुटू" ते सहज लक्षात यायचं ! म्हणून मग मोठ्या आणि कठिण खेळांत आम्ही १०-२० आपसूकच बाद केलं.

त्यानंतर होती ती निरर्थक पण इंटरेस्टिंग अशी गाणी. ह्यांचा मस्त उपयोग होई. एक तर कोणी त्यांचा क्रम लक्षात ठेवत नसे, आणि ती खूप कॅची होती!
म्हणजे -
"आज शनिवार है , चूहे को बुखार है
चूहा गया डॉक्टर के पास
डॉक्टर ने मारी सुई,
चुहा बोला उइ उइ उइ"

आणि मग ते जीवाला गोड वाटणारे शब्द - तू सुटलास!

किंवा मग दुसरं एक -

"अँड डँड डँड डो
इल्ल पिल्ल पिल्ल पो
ऐसा कैसा हो गया?
अँड-डँड-डँड-डो"

तू सुटलास!

ह्यतल्या प्रत्येक - ला एकेका भिडूवर हाताचं बोट ठेवून खात्री करायला लागायची.
आणखी एक तर भलतंच होतं.

"इंकी पिंकी पाँकी
फादं हादं डाँकी
डॉंंकी डाइ फादं क्राई
इंकी-पिंकी-पाँकी"

तू सुटलास!

तेव्हा अर्थ न समजता म्हणायचो. फादं हादं डाँकी ह्या गूढ वाक्याचा अर्थ काय, हे बरेच दिवस माहिती नव्हतं. नंतर आपण जे काही बोलयचो ते विंग्रजी होतं हे समजल्यावर डोक्यात बल्ब पेटला.

अजून एक पाणचट गाणं म्हणजे -
"आदा पादा कोण पादा
___जीचा घोडा पादा
आम डाम ढूस
इस्ने मारी फूssssस"
(स पूर्ण)
तू सुटलास!

ह्यात नक्की कोणाचा घोडा पादत असे, ते मला कधीच नीटसं समजलं नाही!

गाण्यांव्यतिरिक्त अजून एक पद्धत म्हणजे "जास्ती की मेजॉरीटी". ह्या भयानक प्रकारात, पोरं कोंडाळं करून उभी असत. आणि मग एक जण आवाज देई- "जाsssस्तीची मेजॉssssरिटी!"
असं म्हटलं, की पोरं हाताचा त़ळवा उपडा किंवा पालथा करुन आजूबाजूला बघत. मग जे संख्येने कमी आहेत, ते बाद. असं करून मग पुढची राउंड.
बरेचदा पोरं काय वाट्टेल ते ओरडत - "जास्तीची मायनॉरिटी" किंवा "कमीची मेजॉरिटी" पण नियम मात्र एकच पाळला जाई.

कुठलीही पद्धत असो, "तू सुटलास!" हे शेपूट मला वेगळं काढताच येत नाही.

टीप - सांगायचा मुद्दा हा, की वेगवेगळया पद्धतींनी राज्य कुणावर? ह्या कूट्प्रश्नाचा उलगडा केला जाई. तुम्हाला अजून अशा काही पद्धती माहिती आहेत का? जरूर सांगा!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. काही पाठभेद खालीलप्रमाणे.

"आऽदाऽमऽदाऽ ताऽनाऽजीऽचाऽ घोऽडाऽ ठूऽसंऽकऽरूऽनंऽ पाऽदलाऽ!!" ला ज्याच्यावर येणार त्याचा नं. पैला.

शिवाय, चकणे या प्रकाराचा उल्लेखच दिसला नाही. जास्तीची मेजॉरिटी इ. जास्त मोठा पॉप्युलेशन साईझ असेल तेव्हा असे. कमी साईझसाठी विषम संख्येइतके लोक घेत- ३,५ बीइंग दि मोस्ट टिपिकल नंबर्स. अन पाचातून २ तसेच तिनातून १ असे बाहेर निघत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चकणे आठवत नाहीये!, फोड करून सांगा की नीट..
@पादा -हे मी ऐकलं नव्हतं! व्हेरियेशन दिसतंय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमी सँपल साईझ असेल तेव्हा चकायचे. त्यात ३ किंवा ५ लोक यायचे. ३ मधून १ आणि ५ मधून २ असे बाहेर निघायचे. प्रत्येकाने एकमेकांचे हात धरून नंतर आपापल्या हातावर दुसरा हात ठेवायचा. तळव्याचा 'काळा' किंवा 'गोरा' भाग येईल त्याप्रमाणे समजा ३ लोकांचा एकच कलर आला तर उरलेले दोघे बाहेर. सेम अबौट १ फ्रॉम ३.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सेम टू सेम.
बादवे, भारी धागा आहे.
आमच्याकडे - कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाई, कच्चं दूध पीत नाई.... असंही कायसंसं एक सुटायचं गाणं होतं. पहिली ओळ आठवेना बॉ मला.
पण मला आठवत नाही, तर नवल नाही म्हणा. हे असले फुकट पळापळी करायचे मैदानी खेळ मला लई बोअर व्हायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्याला आम्ही फडकणे म्हणायचो. चकणे फक्त गोट्या खेळताना असायचे, ज्याची गोटी गलीच्या जास्त जवळ तो पहिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चकणे फक्त गोट्या खेळताना. बाकी ऐकलं नाहिये.
आणी ते गाणं मला असं काहीसं आठवतं -
कोरा कागद निळी शाई
आम्ही कुणाला भीत नाही
कच्चं दूध पीत नाही
वरती बघून सांगा - दगड का माती/ डोंगर का पाणी/ वगैरे.

पण हे फक्त ठराविक खेळासाठीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी गोट्या खेळलेलो नाही. मात्र, (तपशील विसरलेलो असलो तरी) 'चकणे' हा प्रकार कोणत्यातरी खेळात वापरल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वला 'रामोजीचा' घोडा पादतं असे

अजून एका 'सूटी' काव्याची भर घालवी असे

अक्कड बक्कड बम्बे बो
अस्सी नब्बे पूरे सो
सो से निकला धागा
चोर निकलकर भागा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्यात तर ब्वॉ दामाजीचा घोडा पादत असे.

आणखी एक ऐकलेले आहे ते असे :
इब डीब डीब ( इथे हाताचा पंजा मुलांच्या वर्तुळाच्या मधोमध झटकणे. चेंडूला टप्पे मारल्यागत.)
माय ब्लू शीप
सेलिंग इन द वॉटर
( इथे , वॉटरशी यमक साधणारी ओळ)
इब डीब डीब ( हे मात्र भिडू मोजत, कारण शेवटच्या डीबला सूट मिळते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'द बिग बँग थिअरी' मालिकेतली ही नर्डी पद्धत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin हम्म. आजकालची ल्हान मुलं काय करतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे, चकण्याचे आद्य गीत कुणाला कसे आठवले नाही? 'अडम् तडम् तड तड बाजा, हुक्कड तिक्कड लेशमास,करवंद डाळिम फुल्ला'. फुल्ला येईल तो सुटला. आणखी शिवाय 'इठलम् तिठलम् पिठलम् फू, ऐसे कैसे कारण डेज, सिक्स सेवेन डेज' यात डेज येईल तो सुटला. आणखी एक 'घराणेदार' ऐतिहासिक चकणे- 'गिझ्नी, घोरी, गुलाम खिल्जी, तुघलक सय्यद लोदी' लोदी येईल त्याच्या पाठीत गुद्दा हाणून त्याला बाहेर काढायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा!
लै मजेदार लेखन आहे. प्रतिसादातील उदा ही मस्त.
हल्लीच्या पोरांना असं दंगा करून सुटताना बघितलं नव्हतं

आमच्याकडे पीटीच्या तासाला वेळ जायला नको म्हणून आधीचा तास चालु असतानाच बसल्याबसल्या सोपी जावी म्हणून रस्सीखेच टाईप समसमान संख्येची ठाम गरज नसणारी टीम पाडायला पुस्तकाचा वापर करत असु. कोणतेही रँडम पान उचलायचे समसंख्येचं आलं तर एका टिम मधे नैतर दुसर्‍या. शेवटी शुन्य आला तर बाजुला थांबायचं जर विषम संख्येची टिम अगदीच कमी भरली तर शुन्य वाले तिथे

अवांतरः श्रावणच्या स्मरणदिनाच्या आसपास आल्याने टायटल वाचून उघडलाच नव्हता. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'चकने' , अक्कड बक्कड बम्बे बो , कोरा कागद फिक्की शाई सगळेच प्रकार अनुभवले आहेत.

लपाछुपी, पकडापकडी, विषामृत साखळी सोबत लगोरी, धाबाधूबी(कापडाचा किंवा प्लॅस्टीकचा बॉल एकमेकाना माराने ), चिमणी उड कावळा उड, जॉली, शिव्यांचा सप्का लावणे(तोंडातुन शिवी निघाली की दे गुद्दा, मग 'आबे', 'काबे' ही पण एक शिवीच आहे याची चिकित्सा)
गल्ली क्रिकेट चे विनोदी नियम एक टप्पा आउट, घरात बॉल गेला की आउट, सिक्स मारला की ऑउट ,जो पहीले बोलींग करेल तो शेवटून बॅटींग करेन.
मागे कीपरने बॉल कॅच केला की बॅटीला बॉलचा कट लागला होता त्यासाठीची भांडणं, सहा बॉलचा ओव्हर संपला की नाही त्यासाठी सहा बॉल मोजून दाखवणे- जबराट होतं राव सगळं.
मस्त धागा सगळ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

अवांतर किस्सा : आदा-पादा वरून आठवलं. पादाने हे शिष्टाचाराला धरुन नसलेल्याने घरी-दारी कधीही बापजन्मात बायकांना आवाज करून पादातांना ऐकलं नव्हत. पुरुष मात्र जोरजोरात पादायचे. त्यावरून माझ्या बाल-मनाने मुली-बायका कधीही पादत नसतात असा समज करून घेतलेला. एकदा एक काकू जोरात पादल्या तेव्हा गैरसमज दूर झाला तेव्हा मी कदाचित सातवीत-आठवीत असेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहा बॉलचा ओव्हर संपला की नाही त्यासाठी सहा बॉल मोजून दाखवणे-

हा हा हा... किती बॉल झाले याचं उत्तर कितीही झाले असले तरी कायम ४ बॉल झाले असं मिळायचं ते आठवलं. गटारातले बॉल सरळ हाताने काढणे, कोणाच्या घरात बॉल गेल्यावर समस्त पब्लिकने पळून जाणे, मग एखाद्या टर्रेबाज पोराने धीर करून त्या घरात जाउन बॉल मागणे बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. एका दुष्ट बाईंनी त्यांच्या घरात बॉल गेला तेव्हा विळीने चिरला होता तो रबरी बॉल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे हे हे मी ६ ७ वर्षांची असताना घरात आलेला बॉल आईकडे घेऊन गेलेले चिरून दे म्हणून ;-). आई माझ्याएवढी दूष्ट नसल्याने तसाच द्यावा लागला Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुष्ट अस्मि आज्जी |(

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती बॉल झाले याचं उत्तर कितीही झाले असले तरी कायम ४ बॉल झाले असं मिळायचं
अगदी अगदी Smile

हा..ह..ह.. अशी एक दुष्ट बाई तरी प्रत्येक गल्लीत असायचीच आणि तिच्याच घरासमोर खेळायला मोकळी जागा पण असायची

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाच्या घरात बॉल गेल्यावर समस्त पब्लिकने पळून जाणे, मग एखाद्या टर्रेबाज पोराने धीर करून त्या घरात जाउन बॉल मागणे बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. एका दुष्ट बाईंनी त्यांच्या घरात बॉल गेला तेव्हा विळीने चिरला होता तो रबरी बॉल...

चिरपरिचित आठवण Smile

बाकी अशा चिरलेल्या रब्बरी बॉलच्या तुकड्याची आतली बाजू बाहेर करून तयार झालेल्या खोलगट खळग्यात लहान खडे भरणे आणि तो तुकडा पूर्वस्थितीत येऊ लागल्यावर ते खडे हवेत कसे उडतात ते पाहणे, हाही एक फावल्या वेळेतला खेळ होता. मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोर्सेस, दुसरं काय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो तुकडा पूर्वस्थितीत येऊ लागल्यावर ते खडे हवेत कसे उडतात ते पाहणे

Smile ह्या फंक्शनने हिंसा करता येणं फारसं शक्य नाही हे लक्षात आल्यावर हिरमुसलेले चेहरेही आठवतात, मग बॉल चिरल्यावर कॉन्ट्री काढून नवीन बॉल आणणंही अनिवार्य होतं, त्यासाठी घरी बोलणी खायला लागायची ती वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गल्ली क्रिकेटवरची चर्चा ऐकून गविंचा हा अजरामर लेख आठवला.

http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:dtbwsf_0BRYJ:www.mi...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला आठवणारं एक गाणं म्हणजे

अल पक लो लो
मन पक लो लो
आटि कुटी आटि कुटी
चै चा चो

जास्तीची मेजॉरिटी आणि कमीची मेजॉरिटीपण करायचो. आमच्या वडलांनी 'अरे कमीची मेजॉरिटी नसते रे' असं सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्याच ज्ञानावर शंका घेऊन आमच्या मेजॉरिट्या चालू ठेवल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा..मेजॉरिटी नाही ती मेजॉर्टी असल्याने कमी-जास्तीची कशाचीपण असू शकायची बहुतेक. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असाच दुसरा एक शब्द म्हणजे पार्सिलिटी. टीचर नेहेमी पार्सिलिटी करणारच. मूळ शब्द पार्शॅलिटी आहे असं कुणी स्कॉलरने सांगितलं तरी त्याचीच टर उडवायची. नाट्याठोss,हूझ्धट्,टाम्प्लिस हेच शब्द तेव्हा बरोबर असायचे. नॉट अ‍ॅट होम, हाउज़दॅट, टाइम प्लीज़ हे शब्द मुळी शब्दकोशात नव्हतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी सहमत पण टाम्प्लिस ऐवजी टँप्लीज हाच उच्चार ऐकलाय.

तदुपरि, हूझ्धट् हा उच्चार एक सॅक्रिलेज आहे. खरा उच्चास "आऽवस्देऽ!" असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याचंच एक व्हर्जन म्हणावं असं:

चिकरक चो चा
चो चक लोरम
गुंडो लोरम
वनपकवन
अक्को टक्को
एटीकेटीकेटीको
एटिफाय एटिफाय
ची चाय चो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ड्याम इंटरेस्टिंग!
हे गाणं "तारे जमीन पर" मध्ये "बम बम बोले"..च्या आधी आहे! पण मला वाटलं उगाच काहीतरी गडबडगुंडा लिवलाय प्रसून जोशींनी!
ते काहीसं असं आहे -

"चकलकची चाय चो चक लोरम
गंडोवंडो लकलकट्म
अक्को टक्को इडीगिडीगिडीगो
इडिबायइडिबाय चिकिचकचो
गिलीगीलीमल सुलूसुलूमल
मकनक हुकुबुकुरे टुकुबुकुरे
चकलक भिक्कोचिक्को सिलिसिलिसिलिगो
अगडदुम बगड्दुम चिकिचकचो!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असं होतं...

आरिंग मिरिंग
लोंगा तिरिंग
लोंगा तिरचा
डुब डुब बाजा
गैया गोपी
उतरला राजा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

हे आम्ही

अरिंग मिरिंग
लवंग चिरिंग
चिरता चिरता
डुग डुग बाजा
गाई गोपी
उतरला राजा!

असे म्हणायचो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर -कोणी गुलबक्षीच्या कळ्या पाण्यात टाकून चुट्चुट फुटताना पाहील्यात की नाही?

मूळ मुद्द्याला धरुन - २ मुलं/मुली कॅप्टन व्हायचे. मग इतरांनी कोणत्या टीमधे जायचे याकरता २ -२ च्या गटाने नावे पाडून /ठेवून यायचे. उदा - मी विळी तू साणशी.
मग त्या दोन कप्तानांना विचारायचे विळी की साणशी अन तशा टीम पडायच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाण्यात तर टाकायचोच पण त्या बिया तोंडात ठेवूनही फोडायचो. गुलबक्षीलाच अबोलीही म्हणतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुलबक्षीलाच अबोलीही म्हणतात ना?

नाही. गुलबक्षीची फुलं भडक गुलाबी (राणी कलर!) रंगाची असतात. अबोलीची फुलं नारिंगी रंगाची असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होय होय सॉरी अबोलीच्या बियाच म्हणायच्या होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चकणे, पाठीवर गुद्दे मारणे हे आम्हीपण वापरायचो.
अजुन १ पद्धत-
एकाने जमीनीवर मातीत कोणत्याही क्रमाने, जितके खेळाडू असतील तितके आकडे लिहायचे. प्रत्येक आकड्यासमोर एक लांब रेघ ओढायची आणी मग त्या आकड्यांना बॅटने झाकायचं. आता प्रत्येकाने एक रेघ निवडायची. आणी मग खेळायला 'सुट्टायचं'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटने रेघा झाकणे हा प्रकार आम्हीपण करायचो. तुंबा मजा बरतित्तु!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हापिसात असं चकुन सुटणार्‍याला प्रमोशन मिळाल्यास तुंबा मज्जा येईल असा विचार मनात च'म'कुन गेला. Wink

"आरामीट किडा घर कोनसा, मै बोलूं? हा बोल" हे कोण खेळायचं का?
मुंबईहून सुट्टीला गावी आलेली एक मैत्रीण 'हाईड&सीक' खेळूया म्हणून मागे लागली की आम्ही सांगायचो, हे-हे आम्हाला असले खेळ आवडत नाहीत. मग आम्ही लप्पाछप्पी खेळायला जायचो.
गोट्यांना 'आयरं' म्हणायचो. विटी-दांडूला चिन्नी-दांडू, विष-अमृतला अबू-ढबू, डबा-ऐस-पैसला डबा-टिम-टिम. रप्पा-रप्पीला धापा-धुपी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यसवायजी आपलं गाव कोणतं म्हणायच ?

अजून एक-दोन खेळ,
१. नदी की पहाड :ज्याच्यावर राज्य असेल त्यानी नदी म्ह्टलं की खोलगट भागत जाउन उभं रहायचं आणि पहाडासाठी उंचवटा शोधायचा... काही हुकलं की राज्य असणारा हात लावून आउट करायचा.
२. पिंकी-पिंकी व्हाट कलर रंग कोणता?असं गाणं गात एक पण एक खेळ होता?: यात एक मुलगी ही पि़ंकी असायची ती सांगेल त्या रंगाच्या वस्तू आणून द्यायच्या तीला...क्वचित खेळलोय.
३. 'चकने' यातला एक प्रकार.
वहीनी-वहीनी फुलं द्या
खालचे वरचे वेचून द्या
कुलूप कुणी फोडलं
हा पहा चोर सापडला ... असं काहीसं गाणं म्हणत (संगीतखुर्ची छाप)
दोन गडी आमोरासामोर उभं राहुन ते दोन्ही हाताचा बगीचा ( हे असं |__/\__| काहीसं ) करून त्यामधून एक एक गडी सोडायचा आणि जो चोर सापडला त्याच्यावर राज्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं गाव निपाणी. aka निप्पाणी. कर्नाटकात आहे त्यामुळे बर्‍याचदा कन्नड शब्द मिसळायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यावरून आठवलं.,, आमच्या घरामागे एकदा पोरापोरींचा कल्ला चालू होता.
नीट लक्ष न देतासुद्धा हे ऐकयला आलं
"कलकल विठ्ठल दू यू वाSSS"
भेंडी समजेना काय ते. बरं, विचारायचं को़णाला? मेंदू हॅंग झाला थोडावेळ.

मग जाउन प्रतेक्ष पाहीलं तर समजलं
"कलर कलर व्हिच कलर डू यू वाँट?" Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिंकी-पिंकी व्हाट कलर रंग कोणता

आम्ही टिपी टिपी टिप टॉप.... व्हिच कलर डु यु वॉन्ट
खेळायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि प्रतिक्रिया मनोरंजक!

काय गंमत आहे - मोठेपणी आपल्यावर राज्य यावं (पक्षी अधिक अधिकार मि़ळावेत) म्हणून घडपडणारी माणसे, लहानपणीमात्र "राज्य" दुसर्‍यावर ढकलून आपणास कसे "सुटता" यईल यासाठी आटापिटा करीत असतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0