राम पटवर्धन, श्री.पु. भागवत, अनंत अंतरकर; मौज प्रकाशन आणि सत्यकथा (मासिक)

'मौज' प्रकाशनाचे बहुश्रुत व साक्षेपी संपादक आणि लेखक राम पटवर्धन यांच्या निधनाची ऐसी अक्षरेच्या मुखपृष्ठावर आणि हि बातमी वाचली का या सदरात दखल घेतली आहेच. परंतु विकिपीडियावर (मराठी आणि इंग्रजी दोन्ही) राम पटवर्धनांबद्दल लेखही आढळत नाही. मला स्वतःसही त्यांच्या योगदानाबद्दल पुरेशी कल्पना नाही अशीच स्थिती नवीन पिढीतील बर्‍याच जणांची असू शकते. पण मराठी साहित्यातील योगदानाचा महत्वाचा टप्पा त्यांच्या उल्लेखा शिवाय पुर्ण होऊ शकणार नाही असे दिसते. त्यांचे समकालीन श्री.पु. भागवत, अनंत अंतरकर यांच्या बद्दल मराठी विकिपीडियावर लेख आढळतात पण माहिती खूपच तूटपुंजीच आहे.

या दुखःद प्रसंगाच्या निमीत्ताने का असेना आपण मराठी भाषेच्या सत्यकथेच्या कालखंडाबद्दल आणि या व्यक्तींबद्दल ज्ञानकोशीय लेखन करू शकलो तर त्या आठवणींना अधीक चांगला न्याय दिल्यासारखे होईल असे वाटते.

राम पटवर्धन, श्री.पु. भागवत, अनंत अंतरकर; मौज प्रकाशन आणि सत्यकथा (मासिक) यांच्या बद्दल संदर्भा सहित परिच्छेद लेखन करून मिळाल्यास ऐसि अक्षरेच्या या व्यासपिठाचा सामुहीक लेखनाच्या माध्यमातून समूचीत उपयोग होऊ शकेल असा विश्वास आणि विनंती आहे. या धागा लेखनात आपल्या सुचवल्या जाणार्‍या सुचनांनुसार बदलही करूयात. आपले स्वत;चे या धाग्यावरील प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त होत आहे असे गृहीत धरले जाईल.

प्रतिसादांसाठी धन्यवाद.

***राम पटवर्धन***
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र = (कॉपीराईट फ्री {{छायाचित्र हवे}})
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = रामचंद्र वामन पटवर्धन
| टोपण_नाव = आप्पा (संदर्भ: http://ardheakash.blogspot.in/2014/06/blog-post_4.html )
| जन्म_दिनांक = [[मार्च २१]], [[इ.स. १९२८]] - (संदर्भ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/editor-ram-pat... )
| जन्म_स्थान = गणेशगुळे (पूर्वीचं आगरगुळे), रत्नागिरी जिल्हा (संदर्भ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/editor-ram-pat... )
| मृत्यू_दिनांक = [[जून ३]], [[इ.स. २०१४|इ.स. २०१४]]
| मृत्यू_स्थान = ठाणे
| कार्यक्षेत्र = साहित्य, शिक्षण
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = संपादन, अनुवाद
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = वामन पटवर्धन
| आई_नाव =
| पत्नी_नाव = ललिता
| अपत्ये = श्रीरंग, अनिरुद्ध (अनिल) (संदर्भः http://ramjagtap.blogspot.in/2014/06/blog-post.html)
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}

राम पटवर्धन (जन्म: [[मार्च २१]], [[इ.स. १९२८]] - [[जून ३]], [[इ.स. २०१४|इ.स. २०१४]]) हे मराठी अनुवादक आणि संपादक होते. (संदर्भःhttp://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Ram-Patwa...)

==व्यक्तीगत जीवन==
राम पटवर्धनांचा पेहराव खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी असा असे.(संदर्भःhttp://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-aw... )
===बालपण आणि शिक्षण===
शालेय शिक्षण रत्नागिरीत केले. शालेय जीवनात त्यांनी एका लेेखाचा अनुवाद करून आपले शिक्षक पु. ल. देशपांडे यांना तो दाखवला. पुलंनी तो अनुवाद ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. (संदर्भ: http://www.tarunbharat.net/Encyc/2014/6/7/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0... ) मुंबईत येऊन त्यांनी १९५२ मध्ये बी.ए. व १९५४ मध्ये मराठी व संस्कृत विषय घेऊन एम. ए. झालेल्या पटवर्धनांचे शिक्षण कठीण परिस्थितीत झाले.(संदर्भःhttp://tarunbharat.net/Encyc/2014/6/5/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7.aspx?N...). शिक्षणा साठी त्यांना ... आणि ... शिष्यवृत्या मिळाल्या. (संदर्भःhttp://www.loksatta.com/mumbai-news/marathi-editor-known-for-mauj-ram-pa...). शिक्षणासोबत सरकारी नोकरीही केली(कार्यकाळ आणि काय काम ते हवे ) . (संदर्भःhttp://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-aw...)
===महाविद्यालयीन कारकीर्द===
सिडनेहॅम, रुइया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापन केले (कार्यकाळ हवेत).(संदर्भःhttp://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-aw...)
===संपादकीय कारकीर्द===
श्री. पु. भागवत यांच्या आग्रहावरून ते 'मौज' साप्ताहिकात नोकरीस लागले (१९४९). (संदर्भ : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/editor-ram-pat... ) दैनिक लोकसत्ताच्या वृत्तनोंदीनुसार नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रूळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते.(संदर्भःhttp://www.loksatta.com/mumbai-news/marathi-editor-known-for-mauj-ram-pa... ) अनेक लेखक राम पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखकांचा मौजच्या कार्यालयात अनेकदा येत असत. दैनिक दिव्यमराठीच्या प्रतिनिधींच्या वृत्तनोंदीनुसार ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत.(संदर्भःhttp://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-aw... ) ‘गोळीबंद’ लेखनाचे ते पुरस्कर्ते होते. (गोळीबंद हा त्यांचाच शब्द.) लेखन कसे ‘कसून’ करायला हवे (‘कसून’ हा शंकर वैद्य सरांचा शब्द) किंवा लेखन हे निर्दोष असायला हवे. ( हा बहुधा श्री. पुं.चा शब्द). या पद्धतीच्या लिखाणासाठी ‘सत्यकथा’ इरेला पेटली होती. आणि त्यांचे ते ‘इरेला पेटणे’ केवळ एका मासिकांसाठी नव्हते, तर ते समस्त मराठी वाड.मयासाठी होते.

१९६०पर्यंत त्यांनी 'मौज'चे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिलं. 'मौजे'त संपूर्ण जीवनाचं प्रतिबिंब पडेल असं साहित्य मिळवून छापलं. त्यासाठी वसंत पळशीकर, संभाजी कदम, ज्ञानेश्वर नाडकर्णी, अशोक रानडे अशा विविध क्षेत्रातल्या लेखक मंडळीना लिहितं केलं. १९६०नंतर त्यांनी 'सत्यकथा'ची धुरा स्वीकारली आणि 'सत्यकथा' बंद होईपर्यंत ती सांभाळली. (http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/editor-ram-pat... )

१९८५ मध्ये शान्ता शेळके यांचा 'अनोळख' हा काव्यसंग्रह संपादीत केला. (संदर्भ: http://books.google.co.in/books?id=wbgxAwAAQBAJ&pg=PT5&lpg=PT5&dq=%22%E0... शान्ता शेळके यांची अनोळख ग्रंथास प्रस्तावना)

'मौज'मधून निवृत्त झाल्यावर त्यांनी मारूती चित्तमपल्ली यांचे 'चकवा चांदण', मीना प्रभूंचे 'माझं लंडन', श्रद्धानंद महिला आश्रमावर आधारित अचला जोशी यांचे 'आश्रम नावाचे घर' ही पुस्तके त्यांनी संपादित केले होते. सरोजिनी वैद्य यांच्या आग्रहास्तव त्यांनी राज्य मराठी परिषदेची काही पुस्तकेही संपादित केली होती. ज्ञानदेवीचे ३ खंड, आठवणीतल्या कविता - ४ खंडचे संपादनही त्यांनी केले होते. (संदर्भ: http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/ram-patwardhan... )

===टिका आणि प्रतिसाद===
राम पटवर्धन यांना आवडलेले लेखनच सत्यकथेच्या माध्यमातून छापले जात असे, असा आरोप करून लघुनियतकालिकांतील लेखकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सत्यकथा ही सदाशिवपेठी आहे, असे आरोप त्यांच्यावर झाले. वेळप्रसंगी राजा ढाले वगैरे मंडळींनी सत्यकथेची सत्यकथेच्या अंकाच्या प्रतींचे प्रातिनिधीक दहन केले. (संदर्भः http://www.tarunbharat.net/Encyc/2014/6/7/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0... ) पण राम पटवर्धन खुल्या मनाचे संपादक होते, अंकाचे दहन करू इच्छिणारे लोक सत्यकथेच्या प्रति आणण्याचे विसरले तर राम पटवर्धनांनी कार्यालयातील सहकार्‍या मार्फत नाराज आंदोलक मंडळींना सत्यकथेच्या प्रतिही पाठवल्या. (संदर्भ : http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=202 साहित्यपूजक-ले. अरूण म्हात्रे )

पटवर्धन यांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिले, लिहिते केले. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी `सत्यकथे’त आणल. (संदर्भः http://navshakti.co.in/featured/169870/ )

===अनुवाद/लेखन कारकीर्द===
साहित्याच्या विश्वात साहित्य संपादक या नात्याने स्वतःचा वेगळा ठसा उठवूनही पटवर्धनांनी स्वत: मात्र फारसे लेखन केले नाही.
शालेय जीवनातच पटवर्धनांनी चेकाव्हच्या काही कथांचे भाषांतर केले होते. महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकीया नुसार मार्जोरी रॉलिंग्जच्या 'यार्लिग'चा 'पाडस' हा त्यांनी केलेला अनुवाद गाजला. राम पटवर्धन यांनी 'नाइन फिफ्टी टू फ्रिडम' या पुस्तकाचा 'अखेरचा रामराम' या नावाने मराठी अनुवाद केला. बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक 'योगदीपिका' नावाने मराठी भाषेत अनुवादीत केले. (संदर्भःhttp://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Ram-Patwa...)

===निधन===
१९९७ - ९८ पर्यंत चुनाभट्टी परिसरात ते वास्तव्यास असत.( संदर्भ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/ram-patwardhan... ) ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमागील आनंदपार्क संकुलात १९९८ पासून ते मुला-नातवंडांसमवेत राहात होते. ३ जून २०१४ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. 'मौज' प्रकाशनगृहाचे संजय भागवत, चित्रकार ज्योत्स्ना कदम, कवी अरूण म्हात्रे याप्रसंगी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, अनिरूद्ध, श्रीरंग ही मुले, सुन आणि नात ऋजुता असा परिवार आहे. (संदर्भः http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-editor-known-for-mauj-ram-pa...)

तळटीप: या लेखाचे प्रारंभिक लेखन ऐसीअक्षरे http://www.aisiakshare.com या मराठी संस्थळावर विकिपानांसाठी या सदरातून केले गेले आहे.

*** साप्ताहिक मौज***
साप्ताहिक मौजची स्थापना ..... साली झाली. त्याचे संपादक इ.स......... ते इ.स....... हे आणि इ.स......... ते इ.स....... हे संपादक होते. राम प्रधान यांनी .१९४९ते १९६० या कालावधीत मौजचे संपादक म्हणून काम पाहिले. मौज साप्ताहिकाचे प्रकाशन १९६० साली थांबले. (संदर्भ: http://www.loksatta.com/lokrang-news/legendary-editor-ram-patwardhan-585... दैनिक लोकसत्ता - प्रभा गणोरकर)

*** सत्यकथा (मासिक) ***
सत्यकथा (मासिक) ची स्थापना १९३३ साली झाली (दुजोरा हवा) . त्याचे संपादक इ.स......... ते इ.स....... हे आणि इ.स......... ते इ.स....... हे संपादक होते. राम प्रधान यांनी ...... ते ...... या कालावधीत सत्यकथाचे संपादक म्हणून काम पाहिले. सत्यकथा मासिकाचे प्रकाशन १९८२ साली थांबले. (संदर्भ: http://www.loksatta.com/lokrang-news/legendary-editor-ram-patwardhan-585... दैनिक लोकसत्ता - प्रभा गणोरकर)

......,........,......... आणि ......... इत्यादी लेखक आणि कविंनी सत्यकथातून लेखन केले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आजच्या मटाच्या अग्रलेखाचा काही उपेग होतोय का बघा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय, लेख पाहिले आहेत. सवड मिळेल तसे अद्ययावत करेन. प्रतिसादासाठी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

'तरुण भारत'मधला प्रकाश एदलाबादकर यांचा लेख. (बी.ए., एम.ए.ची वर्षं त्यात आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बर्‍यापैकी ओळख आहे. मी त्यांना भेटून माहीती जमा करून बघतो. (राजेश घासकडवी हे भारत दौर्‍यावर असताना एक दिवस आपण त्यांना जाऊन भेटू या असे मी घासकडवींना म्हटल्याचे आठवते पण नंतर ते काही जमले नाही. ) राम पटवर्धन आणि जी ए कुळकर्णी यांचा पत्र व्यवहार जर मला वाचायला अनिलनी दिला तर मी आणखी भर घालू शकेन असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे करता आलेतर खूपच छान होईल, मराठीत माहितीच्या नोंदी पुरेशा घेतल्या जात नाहीत आणि रिकाम्या जागा शिल्लक राहतात पण आपल्या साहाय्याने हे चित्र बदलू शकते हा विचार दिलासा देऊन जातो. श्रीराम जगताप यांच्या ब्लॉगवर त्यांच्या अपत्यांची नावे श्रीरंग आणि अनिरुद्ध अशी दिली आहेत आपण ते अनील असे दिले आहे, त्यांच्या आईंचे नाव आंतरजालावर तर नाही आढळले याबाबतही अधीक माहिती द्यावी. अजून एक महत्वाचे म्हणजे त्यांची काही छायाचित्रे लेखीस्वरूपात कॉपीराईट फ्रीकरून मिळाल्यास सुद्धा ती सुद्धा हवीत.

त्यांचे साहित्यिकांना घडवणे, त्यांची संपादकीय कारकीर्द या बाबतचा ज्ञानकोशीय परिच्छेद अधीक सविस्तर माझ्या पेक्षा अधीक जाणत्या व्यक्तीने लिहून दिल्यास हवा आहे सोबतच साहित्यिक वर्तुळातील त्यांच्या सोबतचा सहवासाबद्दल या निमीत्ताने अधीक माहिती मिळाल्यास सर्वांनाच आवडेल असे वाटते.

त्यांची खासकरून संपादन कसे करावे अथवा साहित्या विषयी त्यांनी व्यक्त केलेले उल्लेखनीय विचार त्यांच्या शब्दात उपलब्ध असतील तर तेही हवे आहेत. या विशेष कारणा साठी मराठी विकिपीडियाचा बन्धूप्रकल्प विकिक्वोट्स येथे स्वतंत्र लेखपान बनवले आहेत त्यात सध्या खालील वाक्ये जोडली आहेत.

* ‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’

* ‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय? त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का? की पुरेसं मिळत नाहीये?त्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’

प्रतिसादांसाठी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ते व्यवसायानी वकील आहेत.श्री राम पटवर्धन ठाण्यात रहायला येण्यापूर्वी समर्थ नगर चुनाभट्टी येथे राहत असत. समर्थ नगरचे जुने जाणते असे बरेच लोक अजूनही भेटतात. (अजूनही : पुनर्बांधणी आणि स्थलांतरण या संदर्भाने) केईएम चे सुप्रसिध्द शल्य चिकीत्सक डॉ. जयप्रकाश हर्डीकर -सिनेतारका अश्विनी भावे -जनरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य मुकुंद बर्वे अशी अनेक माणसे समर्थ नगरचे रहीवासी होते. पटवर्धनांच्या आठवणि लिहू शकतील अशी बरीच नावे आता एकेक करून आठवतो आहे. माझे एक स्नेही रवींद्र रानडे सतरा वर्षे मौजेत कामाला होते.
शक्य तितक्या कमी वेळात ही माहीती जमा करण्याचा प्रयत्न करतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रतिसादाने उत्साहीत होऊन मी धागा मजकुर अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे अजून बर्‍याचदा हात फिरवायला लागेल हे खरे पण आपल्याकडून येणारी माहिती आंतर्भूत करण्याएवढे किमान काम असावे असा उद्देश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अनेक वृत्तपत्रांनी कालच्या रविवार पुरवण्यांमध्ये राम पटवर्धनांविषयीचे लेख छापले.
'सकाळ'मध्ये रामदास भटकळ
'तरुण भारत'मध्ये अजय कुळकर्णी

'लोकसत्ता'मध्ये प्रभा गणोरकर, अंबरीश मिश्र, दीपक घारे (ह्यात 'मौज' आणि 'सत्यकथेचा कालखंड मिळेल), आशा बगे ('मारवा'चा किस्सा ह्यात मिळेल. मुख्य दुवा मोडला होता म्हणून इ-पेपरवरून क्लिप करून दुवा दिला आहे.), वसंत सरवट्यांचं अर्कचित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे लेख पाहण्यात आले नव्हते. माहिती अद्ययावत करतो आहे. दुव्यांबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.