चांदोबाचा दिवा
विदेश
'
आई ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला -
उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..
आई ग आई ,
चांदण्यांच्या पणत्या
किती चांगल्या -
उंच उंच आकाशात
कुणी लावल्या ..
आई ग आई ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून -
चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..
आई ग आई ,
चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात ..
.
मंगळागौरीच्या काही खेळांतील
मंगळागौरीच्या काही खेळांतील ठेक्यांवर अजरा पाठभेद करून म्हटलेय तर बसतेय. (विशेषतः पगडफु बाई पगडफू - का असेच कायसेसे - गाणे आहे ना, तत्सम चाल)
अभिप्रेत चाल आहे का कोणती?