भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?
भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते? मला किती टक्के लोकांची प्रथमभाषा हिंदी आहे हे नको आहे (हे साधारण ४० टक्क्यांच्या आसपास असल्याचे वाचले आहे - सर्वसाधारणपणे ज्याला हिंदी पट्टा म्हटले जाते तो). असा भाग सोडूनही हिंदी येणारेही बरेच जण असावेत असे वाटते, उदा. महाराष्ट्रातले बहुतांश लोक, गुजरात, प. बंगालमधील काही लोक, दाक्षिणात्य राज्यांतीलही काही लोक वगैरे. हे सगळे पकडून हिंदी येणारे किती जण असतील? अनेकदा हिंदीविरोधी मतांमध्ये 'हिंदी फक्त ४०% लोकांना येते, बाकी ६०% लोकांना हिंदी येत नाही' छाप विधाने असतात, पण हिंदी येणारे बरेच जास्त असतील असे वाटते.
अगदी रफलि बोलायचं तर
दक्षिणेकडची चार अन नॉर्थ ईस्टकडची सर्व साताठधा राज्ये वगळायची म्हटली तरी उर्वरित किमान ७०% लोकांना हिंदी येते/समजते असेच म्हणावे लागेल. हे चूक आहे पण ऑन द कॉशस साईड एरर आहे. त्यामुळे भारतात >७०% लोकांना हिंदी आर्रामात येते/समजते. अर्थात हा ट्रेंड गेल्या शतकापासून सलग चढता आहे असे मला वाटते.
चला मग तर तीही राज्ये
चला मग तर तीही राज्ये समाविष्ट झाली. उरली फक्त दक्षिणेकडची ४ राज्ये. त्यांची लोकसंख्या साधारणपणे २५ कोटी धरा.
कर्नाटक-तमिळनाडू: प्रत्येकी ७ कोटी, केरळ ४ तर आंध्र(जुनेवाले कंप्लीट) ८ कोटी= २५ कोटी. म्ह. १२० कोटीपैकी किमान ९५ कोटींना हिंदी समजते, द्याटिज़
९५/१२०=१९/२४=०.७९ (अप्रॉक्स). म्ह. जवळपास ७९% लोकांना हिंदी येते/समजते.
समजते
पण "हो हिंदी वापरास आमची (कुरकुरत का असेना) मान्यता आहे" असे म्हणणारे किती ?
आणि कर्नाटक, आंध्र ह्यांना "हिंदी समजणारे प्रदेश " धरलेत.
आता असं बघा :-
तुम्हाला हिंदी समजते का ? असा प्रश्न भारतभरातल्या लोकांना विचारला तर तर वरती जे १२५कोटी पैकी ११० कोटी हा आकडा आलाय तो तसाच
येइल का ? की सत्तर ऐंशी कोटीपर्यंत खाली येइल ?
लोकांची उत्तरं खरी मानायची की इथली गृहितकं ? ;)
असेलही
पण दक्षिणेच्या लोकांना धरताना त्यांना हिंदी येते की नाही हे त्यांनाच ठरवू द्यावं असं वाटतं.
निदान "मला हिंदी येत नाही" हे म्हणण्याचा तरी अधिकार प्रत्येकाचा असावा.
ह्याउलट "मला हिंदी येते" असे एखाद्याचे म्हणणे असेल तर त्याची त्यातील पात्रता तपासण्यासाठी
काही काठिण्यपातळीच्या परिक्षा (toefl,ielts च्या धर्तीवर) असण्यास माझी ना नाही.
च्यायला! एकदा सांगितलं
च्यायला! एकदा सांगितलं ना अख्खी दक्षिण हिंदीनिरक्षर धर म्हणून? पुन्हा तेच तेच काय लावतोएस? अख्खी दक्षिण वगळून टक्केवारी काढली तरी ८०% भरते.
अर्थात, दक्षिणेचे % हे 'शाकाय वा स्यात् लवणाय वा स्यात्' असल्याने धरा, न धरा- मेजॉरिटीत्वात फरक पडत नाही इतकाच मुद्दा आहे.
+१
+१
अरुणाचलातल्या मोजक्याच लोकांशी परिचय आहे. जितक्यांशी आहे त्यांना हिंदी येते. भलेही त्यांचा accent वेगळा असेल; पण येते.
तसेही पंजाबी, गुज्जू आणि मराठी असे सारेच आपापला मूळ लहेजा घेउनच , त्याच ढाच्यात हिंदी बोलतात की!
गुज्जूंची हिंदी गोग्गोड वाटते, आवडते ब्वा आपल्याला.
भारतात किती टक्के लोकांना
भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?
यात विविध स्तरावरील टक्केवारी वेगळी यावी.
येते म्हणजे कोणत्या पातळीवर? निव्वळ समजते, हिंदी वाचता येते, देवनागरी लिपितून हिंदी लिहिता येते, स्वतःला वाक्य रचना करता येते, चांगला शब्दसंग्रह आहे यापैकी प्रत्येक स्तरावर वेगवेगळी आकडेवारी यावी.
ही टक्केवारी कशासाठी हवी आहे त्यावर यापैकी तुम्हाला कोणती टक्केवारी अपेक्षित आहे? हे ठरवता येईल.
उत्तर
यात विविध स्तरावरील टक्केवारी वेगळी यावी.
मान्य.
येते म्हणजे कोणत्या पातळीवर? निव्वळ समजते, हिंदी वाचता येते, देवनागरी लिपितून हिंदी लिहिता येते, स्वतःला वाक्य रचना करता येते, चांगला शब्दसंग्रह आहे यापैकी प्रत्येक स्तरावर वेगवेगळी आकडेवारी यावी.
मला इथे हिंदी येणे म्हणजे फार उच्चप्रतीचे हिंदी येणे अपेक्षित नाही. मनात साधारण दोन गट आले
अ. समजणे, संवाद साधण्याइतपत बोलता येणे, वाचता येणे आणि तितपत लिहिता येणे. ह्या गटात अर्थात निरक्षर येणार नाहीत. अगदी बिनचूक लिहिता-बोलता यावे अशी अपेक्षा नाही, तसे म्हटल्यास हिंदीभाषक पट्ट्यातीलच अनेक जणांना येत नाही वगैरे मुद्दे येतील.
ब. समजणे, संवाद साधण्याइतपत बोलता येणे. ह्या गटात अ गटापेक्षा आणखी लोकांची भर पडेल. विशेषत: काही बंगालीभाषक, काही दाक्षिणात्य इ. ज्यांना हिंदी लिहिता-वाचता येत नाही.
ही टक्केवारी कशासाठी हवी आहे त्यावर यापैकी तुम्हाला कोणती टक्केवारी अपेक्षित आहे? हे ठरवता येईल.
फार विशिष्ट हेतू असा नाही. कुतूहल आहे. भारतात ४० % हिंदीभाषक आहेत म्हणताना ती प्रथमभाषकांची संख्या असते (माझ्या माहितीप्रमाणे). आजघडीला द्वितीयभाषा म्हणून हिंदी येणार्यांची संख्याही बर्यापैकी असावी, परंतु ही किती असावी ह्याचा आकडा फारसा दिसला नाही. (उदा. इंग्रजीबद्दल मूलभाषकांची (नेटिव्ह) संख्या, तसेच प्रथम किंवा द्वितीयभाषा म्हणून बोलणार्यांची एकुण संख्या अशा दोन प्रकारच्या आकडेवारी दिसतात.
....
@बॅटमॅनः ८०% आकडा हा फारच जास्त वाटतो.
महाराष्ट्रात?
महाराष्ट्रासारख्या राज्यांत सगळ्यांना हिंदी येते असं गृहितक वरच्या काही प्रतिसादांत दिसतंय. पण ते तितकंसं खरं नाही. आदिवासीबहुल प्रदेशांत तर मराठीदेखील समजत नाही. शिक्षणातून प्रमाण मराठी लादली जाते त्याचा त्यांना त्रास होतो. अशा माणसांना जुजबी संभाषणापुरतीही हिंदी येत असेल असं नाही. किंवा, खेडोपाडी तंबूतल्या सिनेमांमध्ये अजूनही टिनपाट (आणि मुंबई-पुण्याला प्रदर्शितही होत नाहीत असे) मराठी सिनेमे भरभरून पाहायला मिळतात, पण हिंदी सिनेमा म्हणाल तर एखादा सलमान खानचा वगैरे असतो. अशा ठिकाणी किती लोकांना हिंदी बोलता येत असेल ते सांगता येत नाही. स्वातंत्र्यानंतरच्या आदर्शवादी वातावरणात लोक हिंदी शिकले असतीलही, पण नंतरच्या काळातली खेड्यांतली हिंदीची जागा त्यातल्या त्यात टिकली असेल तर ती टीव्ही आणि सिनेमामुळे. त्यात पुन्हा मध्य प्रदेशाला लागून असलेली खेडी आणि आंध्र किंवा कर्नाटक सीमेवरची खेडी ह्यांत फरक असावा.
आकडेवारी नाही आणि कदाचित
आकडेवारी नाही आणि कदाचित प्रश्न विचारण्यामागच्या हेतूशीही फार संबंध नसेल, पण हिंदी बोलणारी भारतीय जनता याबद्दल शशी थरूर यांचा लेख कालच वाचनात आला. हिंदी टिकली आणि वाढते आहे ती टीव्ही, बॉलिवूड या करमणूकीमुळे असं थरूर यांचंही म्हणणं आहे.
Why The Hindi-First Order Threatens Efficiency
मोदी
मोदींना इंग्रजी बोलण्याचा अात्मविश्वास नसल्यामुळे हा सरकारी हिंदीचा उदोउदो चालला आहे असा माझा एक (गैर)समज आहे. त्यात वरील चर्चेत मराठी मंडळींना हिंदीचे फारच कौतुक दिसते आहे. मराठीतून ट्विट का नाही म्हणे? मराठी सुद्धा संघराज्याची एक भाषा आहेच. नोटेवर सुद्धा मराठीत किंमत छापतात.
बाकी रस्त्यावर बोलण्याइतकी हिंदी अनेकांना येते मात्र सरकारला अपेक्षित असलेली प्रशासनाची भाषा ती नाही. प्रशासकीय हिंदी फारच दिव्य आहे.
डीकलोनायझेशन
हिंदीसोबत मराठीचाही आग्रह धरला तर वसाहतवाद?
हिंदी नको असे नाही. प्रादेशिक भाषांपैकी हिंदीला प्राधान्य याला आक्षेप आहे. हिंदीबरोबरच मराठीतही ट्विट करा की. शशी थरुर यांनी चांगले उदाहरण दिले आहे. मुलायमसिंग यांनी हिंदीत पत्रव्यवहार केला तर चालतो. ज्योती बसूंनी बंगालीत उत्तर दिले तर विचित्र का वाटते बॉ?
बाकी शिवशेणा आणि मनसेला हा मुद्दा समजला तरी आहे काय?
पारतंत्र्यवाचक
पण 'इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसेल' हे पारतंत्र्यवाचक पालुपद अस्थानी होतं.
मोदींना इंग्रजी येणे न येणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मोदींना इंग्रजी येत नसल्याने त्यांना येणाऱ्या दुसऱ्याच एका प्रादेशिक भाषेला सरकारी प्राधान्य दिले जात आहे की काय अशी शंका फक्त व्यक्त केली. मुलायम वगैरे मंडळींचाही तोच प्रॉब्लेम आहे. इंग्रजी येत नसल्याने हिंदीचा उदोउदो करतात.
मोदीला इंग्रजी बोलता येते,
मोदीला इंग्रजी बोलता येते, समजतेही उत्तम. त्यामुळे अन्य राष्ट्राध्यक्ष इंग्रजीत बोलतात ते समजावण्यासाठी मोदीला ट्रान्सलेटर लागत नाही, तशी न्यूजच आली होती.
अन दिले थोडे प्राधान्य तर फार काही बिघडत नाही. एका मर्यादेपलीकडे तसेही इंग्रजीचे स्तोम माजवायचे कारण नाही. अन मोदी काही म्हणाला तरी खालपर्यंत ते पूर्णपणे झिरपणारे थोडीच? आहे त्यापेक्षा चार जादा लोक हिंदी बोलले तर माझ्या मते बिघडत नाही.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अशी शंका येणे हे मला जरा रोचक वाटते. मोदी नसून अन्य कोणी पंप्र असता तरी माझे हेच मत असते. इंग्रजीचा इतका उदोउदो झालाय की अन्य भाषेला अग्रिमस्थान दिलेले विचित्र वाटतेयसे दिसतेय, म्हणून तशी टिपणी केली.
यद्यपि मुलायमसिंगबद्दल सहमत आहे.
(उगाच)
शशी थरूरांना निश्चितच हिंदी येत नसणार. गूगल करूनही "देशातले अन्य लोक हिंदीत बोलतात ते समजण्यासाठी थरूरांना ट्रान्सलेटर लागत नाही" अशी बातमी सापडली नाही. थरूरांना हिंदी येत नाही म्हणून ते "हिंदी का लादता" अशा प्रकारचे विचार मांडतात. शिवाय चार जादा लोक हिंदी बोलण्याच्या कल्पनेनेच थरूरांना पोटशूळ उठतो.
पण मनमोहन सिंगांना निश्चित हिंदी येत असणार. त्यांनी कुठे काही कॉमेंट केली आहे?
एक रोचक लेख
एकुणच हिंदी व इंग्रजी या दोन्ही 'सत्ताधिशांच्या' भाषा आहेत. बहुसंख्य जनसामान्यांना त्या दोन्ही 'परक्या' आहेत. ज्यांना प्रादेशिक भाषा म्हटले जाते (म्हणून हिणवले जाते) त्यांच्यापेक्षा हिंदी ही व्याप्तीमध्ये फार वेगळी नाही (मुद्दामहुन विविध भाषांना हिंदी या नावाखाली ढकलल्याने हिंदीभाषिक लोकसंख्या मोठी दिसते) वगैरे मुद्द्यांवरून लिहिलेला Hindi English controversy and Gujrat Model हा लेख रोचक आहे.
हिंदीविरोधकांना भारतात किती
हिंदीविरोधकांना भारतात किती लोकांना हिंदी येत नाही यापेक्षा किती लोकांना इंग्रजी येत नाही ते मोजा म्हणावं. येड पांघरून सोता पेडगावला जायला हरकत, लोकाले नेऊ नगा.
भारतात जम्मू काश्मिर, हिमाचल, पंजाब, हरयाणा, राज्स्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरीसा, आसाम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, तेलंगाणा इथे (आणि शेजारी पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, भूतान, इथे) जरासाही संबंध आला तर हिंदी "नेटिव फ्ल्यूएंसीने" येते. याउलट नेटीव फ्ल्यूएंसीने इंग्रजी यायला काँवेंटात कितीही घासली तरी शेवटी बोंबाबबच असते.