खेळी
काय बोलते आहेस तू मन्थरे! तू जाणतेस, सारे नगरजन जाणतात, इतकेच काय ही गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी लख्ख आहे जर कौसल्या वयाने ज्येष्ठ असेल तर मी रूपाने श्रेष्ठ आहे. मला पाहील्याशिवाया, माझ्याशी बोलल्याशिवाय महाराजांना एक दिवसाही करमत नाही. माझे चातुर्य, माझा वादविवाद इतकेच काय माझे निर्णय सार्या सार्याचे महाराज कौतुक करतात. तेव्हा तू म्हणतेस तसे होणे शक्यच नाही. एकवेळ सूर्य पश्चिमेस उगवेल, चंद्र आग ओकेल, समुद्र मर्यादा सोडेल-नदी अवखळपणा , पण महाराजांच्या हृदयातील माझे स्थान ढळणार नाही.
माझ्या आत्मविश्वासावर अशी छद्मी हसू नकोस मन्थरे. वाद-प्रतिवाद करा. मला पटवून दे. ऐक,तुझी भीती अनाठायी आहे. महाराज माझ्या कह्यात आहेत. अगदी माझ्या मुठीत.
काय? वयापरत्वे परिस्थिती बदलते म्हणतेस? फक्त सौंदर्याच्या भरवशावर रहाणे भोळेपणा आहे असे म्हणतेस? पुरुषांच्या स्तियांमधील रुचीस वृद्धत्वात ओहोटी लागते म्हणतेस? असेल बाई असेल, तू चार पावसाळे अधिक पाहिलेत. पण मग काय करू तरी काय? तूच सांग.
काय? काय बोलतेस तू हे, शुद्धीवर आहेस ना? अगं परवाच तर नाही का महाराजांनी निर्णयाचे सूतोवाच केले - रामाला राज्याभिषेक. मग हे "भरताला राज्याभिषेकाचे" तुझ्या डोक्यात तरी कसे आले? मला माहीत आहे तू भारताचे दाईपण केले आहेस , तू त्याच्या भल्याचाच विचार करणार पण म्हणून तुला वाट्टेल ते मी बोलू देणार नाही.
अन जर भारत राजा झालाच तर त्याने होईल काय? राम काय किंवा भरत काय कोणीना कोणी तरी गादीवर येणारच, त्याने फरक काय पडतो?
मी राजमाता- तू राजदासी? अन अन्यथा, कौसल्या राजमाता मग पट्टराणी? अन भरत केवळ भारवाही सेवक? हा विचारच मी केला नाही ग.अन होय मला विश्वासात न घेता फक्त निर्णयाचे सुतोवाच केले ते परत परत बोलायची गरज नाही मंथरे. मी जाणून आहे ते.
थांब मन्थरे थांब. तझ्या जीभेचा पट्टा आधी थांबव. मी भोळी असेन पण मूढ नाहीच नाही. मी बघ आता कसे निर्णय फिरवते. माझं ऐकलं नाही तर ते महाराज कसले?
मला शक्य नाही म्हणतेस? अगं वेडे आजू इतक्या तपाच्या सहवासा नंतरही तुझ्या कैकयीला ओळखत नाहीस? खरच चंद्रहार म्हणून सर्प ल्यायला निघाले होते, पायस म्हणून विष प्यायला. जर राम राजा होउ शकतो तर माझा भरत का नाही? अन महाराजांनी तरी मलां विश्वासात कुठे घेतला ग? मला फक्त निर्णय कळवला. या गोष्टीचा त्यांना नाही पश्चात्ताप करावयास लावला, तर नावाची कैकयी नाही मी.
तू बघच मी कशी चक्र फिरवते मी कशी खेळी खेळते. एकदा लक्ष्यावर ध्यान केंद्रित केले की ते गाठेपर्यंत ना उसंत ना आराम हे मी सारथ्यकलेत शिकले आहेच . आता ध्येय एकच "रामाला वनवास, अन माझ्या भारताचा राज्याभिषेक! मी पट्टराणी- राजमाता. महाराज माझ्या मुठीत, तू पहाच माझं कर्तुत्व."
प्रतिक्रिया
नाट्यछटा
नाट्यछटा हे प्रकरण लै दिवसात पाहण्यात आलं नव्हतं.
पुन्हा दर्शन झालेलं पाहून छान वाटलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छान लिहीलय. आवडले.
छान लिहीलय. आवडले.
छानच लिहीलंय. रामायण म्हणजे
छानच लिहीलंय. रामायण म्हणजे आद्य डेली सोप आहे असं थोडंसं अधोरेखित केल्यासारखं वाटून गेलं.
पट्टराणी मधे पट्ट म्हणजे काय?
पट्टराणी मधे पट्ट म्हणजे काय? चंद्रहार काय असतो? नाट्यछटा म्हणजे एकाच माणसाचे संवाद?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बरेच दिवसांनी नाट्यछटा
जरा जुन्या इष्टाईलची आहे, पण छान!
बाकी यानंतर काही वेळातच "माता न तु वैरीणी" वाजायला सुरू होणार असे वाटले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बरेच दिवसांनी नाट्यछटा
जरा जुन्या इष्टाईलची आहे, पण छान!
बाकी यानंतर काही वेळातच "माता न तु वैरीणी" वाजायला सुरू होणार असे वाटले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सर्वांचे खूप धन्यवाद.कोणी
सर्वांचे खूप धन्यवाद.
कोणी भिन्न लिंगी परकायाप्रवेशात्मक नाट्यछटा लिहीली आहे का?
मागे मी फूलवेलीचे मनोगत लिहीले होते त्यातही "ती" वेल झाले होते. पुरषाच्या दृष्टीकोनातून, पुरषाला "मी" असे संबोधून नाट्यछटा लिहीणे आत्तातरी फार अवघड वाटते आहे.
मंथरा नसती तर कैकयीने राम
मंथरा नसती तर कैकयीने राम राजा बनण्यास आपत्ती घेतली नसती का?
मंथरेचा व्यक्तिगत काय स्वार्थ असावा?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मानसशास्त्राच्या
मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून माझं तरी मत आहे की माहेरची माहेरची म्हणून मंथरेला शेफारुन ठेवली होती, काम कमी दिलेले होते मग आहेच रिकामे डोके, सैतानाचा कारखाना. अजून एक असे असावे की मंथरेनी कैकयीच्या कल्याणाची गोष्ट/ड्यूटी फारच सिरीअसली घेतली अन वाट्टेल ते सल्ले काय दिले, निर्णय काय फिरवले. पायातील वहाण पायात नव्हती हीच ती चूक. दासी दासी म्हणता मंथराच सल्लागार होऊन बसली.
असो!
असो!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
का? नै म्ह. रामायण हे
का?
नै म्ह. रामायण हे काल्पनिकच नव्हे तर तद्दन प्रतिगामी नि बूर्झ्वा मनुवादी विचारांचे प्रतिनिधित्व करणारे आहे याबद्दल आमच्या मनात यत्किंचितही शंका नाही, पण तरी कारण कळू शकेल काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तद्दन प्रतिगामी नि बूर्झ्वा
असेल. शक्य आहे.
पण मला त्याच्याशी अजिबात देणं घेणं नाही.शतश्लोकी रामायण ऐकताना जी अपार शांती अनुभवास येते, तिला तोडच नाही. मग ते संगीत आहे की वाल्मीकींचे शब्द, काल्पनिक आहे की सत्य या उहापोहात मी पडत नाही.
- हा प्रतिसाद फक्त बॅटमॅन यांना उद्देश्यून नसून, माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिलेला आहे.
_____________
बहुतेक, मेघनाला "पायातली वहाण" हा शब्दप्रयोग खटकला असावा. कारण दासी म्हणजे "वहाण" आदि बोलणे योग्य नव्हे असे तिला म्हणायचे असावे. ते मी मान्य करते. दासी म्हणजे कर्माने नीच असे मला म्हणायचे नव्हते. पण तिने कुटुंबात ढवळाढवळ करु नये इतकाच मतीतार्थ होता. भाषा विखारी झाली याबद्दल क्षमस्व.
तसेच आत्मपरीक्षणाची संधी मेघनाने दिली म्हणून तिचे आभारही.
पायातील वहाण पायात नव्हती
पायातील वहाण पायात
मंथराच नव्हे सर्वच स्त्रियांना सदर वाक्प्रचार लागू करता यावा असे मानणारा एक गट आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छ्या:!
चुकीची काडी चुकीच्या ठिकाणी कशी टाकावी हे मनोबाकडून शिकावं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छान
नाट्यछटा आवडली.
दिवाकरांनी स्त्री, पुरुष, वस्तू अशा विविध भूमिकांतून नाट्यछटा लिहिलेल्या आहेत.
भरताच्या दृष्टिकोनातून लिहून बघा.